ई-अभिव्यक्तीच्या नामवंत ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री नीलम माणगावे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे २०२२ या वर्षासाठीचा “ना.घ. देशपांडे पुरस्कार“ जाहीर झाला आहे.
सौ. वंदना अशोक हुळबत्ते
💐अ भि नं द न 💐
तसेच आपल्या ग्रुपमधील प्रसिद्ध लेखिका सुश्री वंदना हुळबत्ते यांना त्यांच्या “गांडुळाशी मैत्री“ या पुस्तकासाठी, पश्चिम महाराष्ट्र साहित्य परिषदेचा बाल साहित्यासाठीचा पुरस्कार लाभला आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठही पुस्तकाइतकंच आकर्षक आहे, ज्याचा फोटो खाली देत आहे.
💐 💐
सुश्री नीलम माणगावे यांची एक कविता इथे प्रस्तुत करत आहोत.
☆ नीलम ताईंची कविता— ती ☆
ती चालायला शिकवते
धडपडायला लावते
पुराण पुरुषाच्या पुरुषत्त्वाला आव्हान देऊन
स्त्रियांच्या पाठीशी ठाम राहते
मनुवाद झिडकारून
मुक्ततेची वाट दाखवते
म्हणून तिला म्हणती मुक्ता !
ती इतिहासाचा वीररस
वर्तमानाचा धीररस
भविष्याचा स्वप्नरस
म्हणून ती आशा !
बाभळीच्या काट्यांवरच काय
विंचवाच्या डंखावरही
ती प्रेम करते
म्हणून ती स्नेहदा !
ती आद्य गुरु – जगणं रुजवणारी
ती व्यवस्थापक – शिस्त लावणारी
ती पहिली पाटी – लिहिणं शिकवणारी
म्हणून ती शारदा !
💐 सुश्री नीलम माणगावे आणि सुश्री वंदना हुलबत्ते या दोघींचेही ई-अभिव्यक्तीतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील अशाच यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
विश्वातील असा स्रोत आहे ज्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. सहाय्य, उपचार आणि नकारात्मक ऊर्जा किंवा अस्पष्ट कंपनांपासून संरक्षणासाठी पांढर्या प्रकाशाला कोणीही (बरे करणारे, सहानुभूती देणारे कोणीही!) आवाहन करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे पांढर्या प्रकाशाचा वापर कोणालाही किंवा कशालाही इजा करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. तसेच त्याने कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ शकत नाही.
व्हाईट लाइट बोलावणे पांढऱ्या प्रकाशासाठी ओरडणे किंवा गुडघे टेकून प्रार्थना करण्याची विनंती करण्यासारखे नाही. आपण धार्मिक असणे आवश्यक नाही, फक्त तो प्राप्त करण्यासाठी खुले असावे. प्रकाश सर्वांसाठी उपलब्ध आहे… जर तुम्ही त्याच्या उपचार आणि कंपनांना स्वीकारत असाल तर तो अधिक सहज उपलब्ध आहे.
शुद्धीकरण आणि परिवर्तनासाठी नकारात्मक किंवा गलिच्छ ऊर्जा पांढर्या प्रकाशाकडे पाठविली जाऊ शकते किंवा निर्देशित केली जाऊ शकते. उदाहरणार्थ तुम्ही विनंती करू शकता की तुम्ही तुमच्या मधून बाहेर काढलेल्या अशुद्धता शुद्धीकरणासाठी पांढर्या प्रकाशाकडे पाठवत आहे.
पांढर्या प्रकाशाच्या परिवर्तनाची संकल्पना अगदी सोपी आहे.जसे तुमचे सर्व घाणेरडे कपडे पॅक करण्याचा आणि ड्राय क्लीनला टाकण्याचा विचार करा. तुमचे कपडे जसे एका बॅग मध्ये भरून लॉंड्रीत देता आणि काही दिवसांनी ते स्वच्छ होऊन परत येतात तसेच हे आहे.
पांढर्या प्रकाशाच्या क्षेत्रात जे काही प्रवेश करते किंवा ज्यावर पांढरा प्रकाश पडतो ते स्वच्छ आणि शुद्ध होऊन बाहेर येते.
पांढरा प्रकाश देवदूत,चांगल्या शक्ती घेऊन येतात.
विश्वास ठेवा की जेव्हा तुम्हाला पांढर्या प्रकाशाच्या संरक्षणाची इच्छा असेल तेव्हा तो तुम्हाला मिळेल. जसे की रिक्षा ला कॉल करणे. तुम्हाला फक्त दरवाजा उघडण्याची आणि प्रकाशाचे स्वागत करण्याची आवश्यकता आहे.
आपल्याला जीवनात मिळालेले धडे,वाईट अनुभव,नकळत केलेली चुकीची कर्म इत्यादी सर्व गोंधळातून बाहेर पडण्याचे ठिकाण आहे.तसेच अत्यंत विश्रांतीची जागा आहे.
पांढर्या प्रकाशाचे व्हिज्युअलायझेशन व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. काहींना पांढर्या रंगात लहान धूमकेतूसारखे चमकणारे चमक दिसू शकतात, तर इतरांना चमकणारे मोठे पांढरे गोळे दिसू शकतात.काहींना पांढरे सोनेरी किरण दिसतात.काहींना प्रकाशाचा शॉवर दिसतो.काहींना उजेड दिसत नाही पण जाणवतो.काहीतरी आपल्या कडे येत आहे असे वाटते.अशा कोणत्याही स्वरूपात ही अनुभूती येते.
दिवसातून 10 मिनिटांनी सुरुवात करा, हळूहळू कालावधी 30 मिनिटांपर्यंत वाढवा.
श्वेत प्रकाश/white light ध्यान काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?
तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. त्यापैकी काही येथे आहेत:
🪷 तुमची प्रेरणा सुधारते आणि वाढवते .
🪷 दृढनिश्चय आणि सहनशक्ती सामर्थ्य देते.
🪷 तुम्हाला तुमच्या ध्येयांवर अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.
🪷 तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करते .
🪷 आत्मविश्वास सुधारतो.
🪷 यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करते.
🪷 स्पष्ट विचार प्रक्रिया करण्यास मदत करते.
🪷 अडकलेला गाभा स्वच्छ आणि साफ करतो आणि अशा प्रकारे तुम्हाला आजारापासून दूर ठेवतो.
पांढऱ्या प्रकाशाच्या ध्यानाचा सराव करण्यासाठी तुम्हाला दिवसातून फक्त 10 मिनिटे लागतात. जेव्हा तुम्ही मनाच्या निवांत अवस्थेत याचा सराव करता तेव्हा परिणाम चांगले मिळतात, तुम्ही जागे होताच हे करणे सुरू करण्याचा सल्ला दिला जातो.
सर्वोत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही काही गोष्टी तुमच्या मनात ठेवल्याचे सुनिश्चित करा.
🪷 धीर धरा.
🪷 प्रामाणिक रहा.
🪷 परिणामांची अपेक्षा ठेवून कधीही ध्यान करू नका.
🪷 नकारात्मक विचार नेहमी तुमच्या फोकसपासून दूर ठेवा.
🪷 नेहमी सकारात्मक उर्जेने वावरत रहा.
🪷 पूर्णपणे दयाळूपणे ध्यान करा.
श्वेत प्रकाश ध्यान हे शुद्धीकरण आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हे तुमचे शरीर आणि मन पुन्हा टवटवीत करण्यास मदत करते. आणि राग, चिंता आणि तणाव यासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते . यात प्रत्येक अवयवांना व मन त्यातील विचारांना स्थिर,शुद्ध करणे हे होत असते. त्यामुळे आपल्यातील प्रेरणा आणि सहनशक्ती वाढते, चांगले विचार करण्याचे प्रमाण वाढते, उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करणे जमू लागते, दृष्टीकोन बदलतो, आत्मविश्वास वाढतो,आपण स्पष्ट आणि तर्कशुद्ध विचार करू लागतो. आणि शरीर शुद्ध होते. हे या ध्यान तंत्राचे काही प्रमुख फायदे आहेत. हे ध्यान दिवसातून किमान 10 मिनिटे आरामशीर मनःस्थितीसह स्वतःमध्ये हळूहळू परिवर्तन करण्यासाठी करा.
पांढरा प्रकाश ध्यान तुमची नैसर्गिक उपचार क्षमता वाढवते असे मानले जाते.
हे तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करते आणि तुमचा आत्मविश्वास आणि प्रेरणा सुधारते.
हे मन स्वच्छ करते आणि तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी दयाळू, प्रामाणिक आणि संयमाने ध्यान करा.
आला! काळा वड्डा! नाही नाही काळदेव! काळुराम! असं म्हणत, इश्मत, मुश्ताक आणि जेनीनं एकमेकांना टाळ्या दिल्या. त्यांच्या अचकट विचकट हसण्यानं जबीलच्या मस्तकात तीव्र सणक गेली. तेवढ्याच जोरात हातातला दगड जबीलने त्यांच्याकडे भिरकावला. इश्मतच्या डोळ्याला रक्ताची धार लागली.
प्रिन्सिपल मार्थासमोर जबील, भीतीनं, तेवढाच संतापानं आणि वेदनेनं, थरथर कापत उभा होता. आता जबरदस्त शिक्षा होणार हे त्याला कळून चुकलं होतं.
‘‘इसके पेरंट्सको बुलालो, इमिजिएट!’’ असं म्हणत, त्या जबीलच्या जवळ पोहोचल्या. एरवी प्रेमळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्था मॅडमचा जेवढा संताप, धाक अन् दरारा होता; तेवढाच जबीलच्या डोळ्यात त्वेष आणि संताप होता. हाताच्या मुठी घट्ट आवळून, त्या मागे बांधून जबील उभा होता.
लहानपणापासून काळा-काळा म्हणून चिडवणारी, हिणवणारी अनेक दृष्यं, त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होती.
‘‘हात आगे!’’
मोठ्ठी छडी, त्याच्या डोळ्यासमोर नाचवत मार्था मॅडम ओरडल्या.
ओठ घट्ट आवळून, जबील टपोरे डोळे ताणून, त्यांच्याकडे बघत राहिला.
‘‘हात आगे! सुनाई नही देता?’’
तरीही जबील तसाच!
संतापाने बेभान झालेल्या मार्था मॅडमने त्याच्या खांद्यावर सटकन् छडी मारली.
त्याबरोबर जबीलच्या उजव्या हाताची मूठ पुढे आली अन् त्याच्या चारही बोटांनी मार्था मॅडमच्या हातावर काळ्याकुट्ट, तेलकट, वंगणासारख्या पदार्थाचा फटकारा मारला. मार्था मॅडमच्या गोर्या धप्प हातावर जबीलचे इवल्याश्या चार बोटांचे काळे कुट्ट फटकारे उठून दिसत होते. त्या जागी मॅडमना प्रचंड झोंबू लागलं. ‘‘स्स्… हां…!’’ करून त्या चित्कारल्या. हातातली छडी गळून पडली. त्या हाताकडे बघत राहिल्या. अनपेक्षित प्रकाराने सारेच गोंधळले. मॅडमच्या भोवती जमा झाले. संधीचा फायदा घेऊन जबीलने धूम ठोकली. शाळेच्या गेटवरून उडी मारून, तो पसार झाला.
मार्था मॅडम निवृत्त होऊन बरीच वर्ष झाली, तरी त्यांच्या हातावरची खूण मिटली नव्हती. त्यासाठी त्यांनी अनेक औषधोपचारही केले. पण ती जन्माचीच खूण त्यांच्या हातावर उमटली.
मार्था मॅडमच्या हातात एक पत्र होतं.
‘‘मॅडम, मी तुमचा विद्यार्थी आहे. माझ्या संशोधनासाठी मिळालेला पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्याची इच्छा आहे…’’ असं म्हणून कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची विनंती केली होती.
खाली सही – J. B. L. अशी अक्षरं होती. जस्ट बी लव्हिंग – असा त्याचा विस्तार आणि अर्थही होता. कितीही डोक्याला ताण दिला तरी मॅडमना काही आठवेना. पण विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी कार्यक्रमाला जाण्याचं त्यांनी निश्चित केलं. कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी मॅडमसाठी कार पाठवली होती. मॅडम व्यासपीठावर येताच, एका व्यक्तीनं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मॅडमने त्याच्या खांद्याला धरून उठवलं.
‘‘मॅडम माफ केलंत का मला? मी जबील. ओळखलतं का मला?’’
मॅडमने आश्चर्यानं ‘आ’ केला. त्याचवेळेस त्यांचा उजवा हात डाव्या हातावरच्या खुणेवरून फिरत राहिला. J. B. L. अक्षराचा अर्थही उलगडला.
‘‘मॅडम, माणसांच्या कातडीचा काळा रंग बदलण्यासाठी मी औषध शोधून काढलं आहे. त्यासाठी मला हा पुरस्कार मिळत आहे. त्या दिवशी तुम्ही मारलेल्या छडीमुळेच मी हा शोध लावू शकलो. हा पुरस्कार मी तुम्हाला प्रदान करत आहे.’’ असं म्हणून जबीलनं मॅडमच्या हातात पुरस्कार ठेवला. त्यावरची जे. बी. एल. अक्षरं उठून दिसत होती.
‘‘जस्ट बी लव्हिंग’’ असं म्हणत जबीलनं डबीतलं औषध, मार्था मॅडमच्या हातावर प्रेमानं, हळुवार हातानं लावलं. म्हणाला, ‘‘मॅडम रोज हे औषध लावलं तर महिनाभरात हे व्रण नाहिसे होतील. एवढंच नाही, कोणताही काळा माणूस त्यामुळं गोरापान होईल. पण एकदा माफ केलं म्हणा.’’
मॅडमच्या पाण्यानं भरलेल्या डोळ्यापुढं, छोटा जबील दिसत होता. इतक्याश्या हातानं फटका मारणारा. समोर उभं राहून जबील विचारत होता, ‘‘माफ केलंत का मॅडम? सांगा ना.’’
☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
(काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.) इथून पुढे —
त्याच्या पुतणीचं अॅडमिशन इथं पुण्यातच झालं होतं इंजिनियरींगचं. कॉलेजच्या होस्टेलवर राहणं जवळपास निश्चितच झालेलं असताना यानं तिचा बाडबिस्तरा घरात आणून ठेवला. आणि तिच्यासोबत तो ही इंजिनियर झाला…तिस-यांदा..एकदा तो स्वत:,नंतर चिरंजीव आणि आता ही! कारण तिच्या सर्व अभ्यासात हा पूर्णपणे सहभागी झाला होता. गणित विषय पक्का असल्याने आणि शिकवण्याची प्रचंड हौस आणि आवाका असल्याने नोकरीच्या कामांतून हा नेमका वेळ काढायचाच. थोडक्यात एक मुलगी नसल्याचे शल्य याने भाची,पुतणी आणि सून यांच्यामार्फत सुसह्य करून घेतले होते.
आपला वाढदिवस या ही वेळेस नेहमीसारखा साजरा होणार एवढंच त्याला वाटलं. सोन्याची चेन करून घेतली बळेबळेच. कशाला? हा त्याचा सततचा प्रश्न मी न सोडवताच पुढच्या प्रश्नाला सुरुवात करायचे….असू दे रे….हे उत्तर तर जणू कॉपी पेस्ट करून ठेवले होते मनात. सोनं म्हणजे गुंतवणूक असं सांगितलं त्याला. त्याला शोभेल असा पोशाखही तयार करून घेतला. मुलगा परदेशी…सूनबाईही त्याच्यासोबत…मग कशाला करायचा एवढा थाटमाट? हा त्याचा प्रश्न योग्यच होता. पण मी तो ऑप्शनला टाकला.
मुळात तो एकसष्ट वर्षांचा दिसत नाही…..तो मूळातच उत्तम चालीचा असल्याने वजन नेहमीच आटोक्यात. पण सरकारी खात्याच्या चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजात वजन भरपूर. पण हे वजन कुणावरही टाकण्याची त्याच्यावर वेळ येत नाही आणि त्याची इच्छाही नसते. त्यामुळे त्याची एकसष्टी होते आहे, हे अनेकांना आश्चर्याचे होते. शिवाय तो हा सोपस्कार करून घ्यायला तयार झालाच कसा? हाही प्रश्न अनेकांना पडला. मग त्यांना सांगावे लागले..यातलं त्याला काहीही माहित नाही…त्याला थेट कार्यक्रम स्थळी आणणार आहे….मंदिरात जायचंय असं खोटं सांगून!
मी सकाळपासून तयारीत. तर साहेब निवांतपणे त्यांच्या लेखनाच्या,संशोधनाच्या कामांत व्यग्र. दुपारचे जेवणही बेताचेच घेतले. रात्री बाहेरच जेवायचं आहे म्हणून दुपारी कमी जेवावे…हा त्याचा विचार. कार्यक्रमात मला त्याच्याविषयी बोलायचंच होतं…पण काय काय सांगणार? ‘तु योग्य तेच करशील याची मला खात्री आहे’ असं तो लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला सांगत आलाय. त्यामुळे मी तसा प्रयत्नही केला. आणि त्यानेही तो गोड मानून घेतला. तु माझ्या या मोठ्या परिवाराचा एक भाग झाली आहेस… या परिवाराची सर्व सुख-दु:खे,अडचणी आता तुझ्याही आहेत’ असं म्हणून त्याने संसार सुरू केला. आपलं एक स्वत:चं घर असावं असं त्यालाही वाटत होतं. पण पगारात भागवा या तत्वावर निष्ठा असल्याने त्याच्या आणि माझ्या पगारात घर नजरेच्या टप्प्यात लवकर आलेच नाही. पण देवाच्या कृपेने डोईवर छप्पर आलं. आणि मग आम्ही ते निगुतीनं सजवलं. एक मुलगा..तो ही बाप से सवाई. वडील एवढे अधिकारी असूनही त्याने कधीही कुठल्या नियमांचा भंग केला नाही…अगदी कुणी पहात नसताना सुद्धा!
संसार सुरू असताना त्याने माझा नवरा,माझ्या आणि त्याच्याही पालकांचा मुलगा, भावाचा आणि बहिणीचा भाऊ, भाच्यांचा मामा, पुतण्यांचा काका, सहका-यांचा मार्गदर्शक, नवोदितांचा प्रशिक्षक, वाचकांचा लेखक, श्रोत्यांचा व्याख्याता, शाळकरी विद्यार्थ्यांचा शिक्षक अशा अनेक भूमिका त्याने लीलया पार पाड्ल्या.
नोकरीत,त्यातून शासकीय नोकरीत अनेक आव्हाने असतातच…व्यवस्था बदलण्याच्या वेळखाऊ कामात वेळ घालवण्यापेक्षा व्यवस्थेत राहून शास्त्रीय, संशोधनाच्या, जनसंपर्काच्या माध्यामातून शक्य ते करीत राहणे त्याने शिकून घेतले होते. त्याच्या कुण्या साहेबांनी दिलेला Love all, Trust a few but do wrong to none अर्थात प्रेम सर्वांवर करा,त्यातला काहींच्यावर विश्वास ठेवा मात्र वाईट कुणाचंच करू नका! हा कानमंत्र त्याने प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यामुळे निवृत्तीनंतर आजही त्याला देशभरात लोक बोलावतात आणि तो ही न कंटाळता जातो. अर्थात आता मी ही सोबत जातेच. त्याच्या व्याख्यानांना मिळणारा प्रतिसाद पाहते, तेंव्हा मलाही छान वाटतं!
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून मी फोन सायलेंटवर ठेवला होता….चोरून बोलायचं कार्यक्रमाची तयारी करणा-या लोकांशी! चार वाजताच घराबाहेर पडले…म्हटलं जरा मैत्रिणीच्या घरी जाऊन येते…तिच्या घरी पुजेचा कार्यक्रम आहे. मी साडेपाच वाजता तयार रहा…आपण मंदिरात जाऊ आणि मग नंतर जेवायला. मी आलेच..असं म्हणून मी सटकले आणि थेट कार्यालयात गेले. तयारी अंतिम टप्प्यात होती. बोलावलेले सर्वच आलेले होते…तयारीत. घटिका जवळ आली….कार्यालयात शांतता ठेवली होतीच. दिवेही मंद केले होते. फुलांची पायघडी तयार होती. रेडी? मी सर्वांना म्हटले…आणि रिक्षा करून घरी गेले. त्याला नवा ड्रेस, सोन्याची चेन घालायला लावली. ती चेन त्याने लगबगीने शर्टच्या आत घालायचा प्रयत्न सुरू केला. मी म्हटलं ‘असू दे थोडा वेळ! छान दिसतीये! रिक्षा कार्यालयाच्या आत जाऊ लागली तेंव्हा तो चमकला. अगं इथं कुठलं हॉटेल? हे तर कार्यालय दिसतंय! मी त्याला हाताला धरून हॉल मध्ये नेलं. सनईच्या सुरांनी त्याचं स्वागत झालं. त्याच्या गळ्यातली चेन चमकत होती. एवढ्या लोकांना पाहून त्याने ती चेन लगेच शर्टमध्ये लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दिवे प्रखर लागले आणि त्याची अत्यंत प्रेमची माणसं उठून उभी राहिली…टाळ्यांचा गजर झाला. त्याला कुणाकुणाला भेटावं,काय बोलावं हे सुचेना. बालपणीचे मित्र, शाळा-कॉलेजातले मित्र,खात्यातली जुनी जाणती माणसं…..सर्व अगदी जवळचे नातलग…! फुलपाखराला मधाने शिगोशीग भरलेल्या फुलांच्या मोठ्या बगिच्यात सोडून द्यावं तसं झालं… एखाद्या लहान मुलासारखा भांबावून गेला बिचारा.
त्याला हाताला धरून मी मंचावर घेऊन जाऊ लागले…फुलांच्या पायघड्यांवर पाऊल टाकले तर ती कुस्करून जातील म्हणून तो आधी तयारच होईना…पण मग पायांतल्या चपला काढून अलगद चालत गेला…त्यानं त्याच्या सहवासातल्यांना आतापर्यंत या फुलांसारखंच जपलंय.
मग एकसष्ट दिव्यांनी ओवाळणं,केक कापणं,त्याला गोडाची आवड..त्यातल्या त्यात सातारी कंदी पेढ्यांचं जास्त कौतुक म्हणून मित्रांनी आणलेला पेढे-हार….सर्व सर्व मनासारखं झालं..!
मग मी बोलायला उभी राहिले तर मनात असलेलं सर्वच उंचबळून आलं….जमेल तेव्हढं सांगून टाकलं….आणि इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्याला सर्वांदेखत,सार्वजनिकरित्या आय लव यू! म्हटलं! त्याच्या चेहरा त्या कंदी पेढ्यांपेक्षाही गोड दिसत होता यावेळी !
– समाप्त –
— एका पत्नीचे मनोगत
(नुकताच हा सोहळा पाहिला आणि प्रत्यक्ष अनुभवला. एका सुशील माणसाच्या पत्नीच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला हा लेख. व्यक्तींची नावे,पदे आणि इतर तपशील महत्त्वाचा नाही म्हणून तो लिहिला नाही. कारण प्रेम एकाच वेळेस वैय्यक्तिकही असते आणि वैश्विकही. आपल्या आसपास अशी माणसं असणं हे आपलं आणि समाजाचं सुदैवच की ! एक नातं असं रूपाला येऊ शकतं, बहरू शकतं हे केवळ गोड… )
शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य – भाग – ३ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆
(त्यामुळे काम या पुरुषार्थाशी माझा दूरान्वयानेही संबंध आला नाही. मला सहा महिन्यांचा कालावधी द्या. मी सहा महिन्यांचे आत कधीही येईन.) – इथून पुढे —
भारती-माता, यांचे दुसरे नाव सरस्वती होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे सरस्वती देवींना भूलोकी जन्म घ्यावा लागला होता. भगवान शिव जेव्हा भूलोकी जन्म घेतील, तेव्हा त्यांच्या दर्शनाने या सरस्वती देवी मुक्त होतील, असा श्री विष्णूंनी भारती देवींच्या वडिलांना दृष्टांत दिला होता. आचार्य दुसऱ्या दिवशी महिष्मती सोडून निघणार होते. त्या रात्री मंडन अत्यंत शांत व मूक होते. त्यांच्या मनात कोणतीच शंका उरली नव्हती. कोणत्याच कामाची आसक्ती उरली नव्हती. त्यांनी मनाने केव्हाच संन्यास स्वीकारला होता. त्या रात्री भारतीने आपल्या मुलाची करावी तशी आचार्यांची सेवा केली. ती मनोमन समजली होती की आता आपले जीवन संपले आहे. आचार्यांना निरोप देण्यासाठी रस्ते सजवले होते. सारे याज्ञिक, वेदज्ञ, प्रतिष्ठित नागरिक, ईश्वर भक्त मंडन मिश्रांच्या निवासाकडे आले होते.
आचार्य पुढे जात असता, अमृतपूरच्या राजाचे निधन झालेले दिसले. पर्वतावरील एका गुहेत आचार्यांनी , मी, देह ठेवणार असल्याचे व त्या राजाच्या शरीरात मी प्रवेश करणार असल्याचे सुखाचार्य, पद्मपादाचार्य व हस्तामलकाचार्य या तीनच शिष्यांना सांगितले. त्या गुहेत त्यांच्या शरीराचे रक्षण करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवली. कोणत्याही संकटाची चाहूल लागली तरी मला म्हणजे राजाला येऊन एक श्लोक सांगितला तो म्हणा. त्याक्षणी मी माझ्या शरीरात प्रवेश करेन.
तिकडे राजाचे अंत्यदर्शनासाठी राजाला फुलांचे गादीवर ठेवले. इतक्यातच राजाने हालचाल केल्याचा भास झाला. झोपेतून उठावे तसे राजा उठून बसला अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांनी प्रसंगावधान दाखवून कणकेची प्रतिमा करून तिचे दहन केले. सर्व राज्यात आनंद झाला. दुसऱ्या दिवशी राजपुरोहिताने योग्य तो अभिषेक केल्यावर, राज्यकारभार सुरू झाला. वेळच्यावेळी राज्यसभा सुरू व्हायची. पटापट निर्णय दिले जायचे. राज दरबारात नवचैतन्य निर्माण झाले होते. राज्यातील प्रजेत अपूर्व आत्मविश्वास निर्माण झाला. सर्वजण चांगले वागू लागले. मंदिरांचे पुनरुज्जीवन झाले. हरिभक्ति फुलून जाऊ लागली.
राणी पहिल्याच भेटीत मोहरून गेली. राजा प्रेमाने वागतो, पण तो अलिप्त असल्याचे तिला जाणवत होते. राजा पूर्वीप्रमाणे दासींकडे पहात नसे. त्यामुळे राणी स्वतः सर्व सेवा करू लागली.
हळुहळू मंत्रिमंडळाला संशय येऊ लागला की आपला राजा इतका कसा बदलला? वीस दिवसांनी मंत्रिमंडळाने गुप्त बैठक घेतली. त्यांना जाणवले की कोणीतरी योग्याने राजाच्या शरीरात प्रवेश केला असावा. मच्छिंद्रनाथांनी जसे आपले शरीर लपवून ठेवले होते, तसे काही घडले का? असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे गुप्तपणे शोध घेण्याचे व अशा योग्याचे ते शरीर शोधून अग्नी दिला पाहिजे, म्हणजे हा योगी राजाचे शरीर सोडून कुठेही जाणार नाही व आपला राजा चक्रवर्ती होईल असे त्यांनी ठरवले.
ही बातमी चित्सुखानंदांनी राजवाड्यात येऊन, ठरल्याप्रमाणे खुणेचा श्लोक म्हणून, राजाला सांगितली. आचार्य काय समजायचे ते समजले व परत गुहेत ठेवलेल्या शरीरात प्रवेश करून त्या स्थानापासून दूरवर निघून गेले.
हे शरीर ठेवले होते, ती जागा, नर्मदेकाठी, मंडलेश्वर या गावी, गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे आहे.
दीड-दोन महिन्यातच ते परत महिष्मतीला आले. चर्चेमध्ये आचार्यांनी भारती देवींचे पूर्ण समाधान केले. त्या म्हणाल्या, आपण साक्षात सदाशिव आहात. आपणास माझा नमस्कार. आपण साक्षात जगद्गुरुच आहात. मी माझ्या पतीला संन्यास दीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. आचार्यांनी मंडन मिश्रांना संन्यास दिला.
त्या काळात काश्मीर म्हणजे पंडितांचे आगर होते. श्रीनगर मध्ये फार पूर्वी सर्वज्ञ पीठ स्थापन झाले होते. त्या पीठाचे, तीन दिशांचे दरवाजे उघडलेले होते. पंडितांनी तो मान मिळवला होता. पण दक्षिणेकडचा दरवाजा बंद होता. आचार्य दक्षिणेकडून आले होते. तेथील विद्वानांमध्ये चर्चा होऊन, आचार्यांसाठी दक्षिणेकडील दार उघडले गेले व त्या सर्वज्ञ पिठावर बसण्याचा त्यांना मान मिळाला.
बौद्ध व जैन पंथीय आचार्यांनी शंकराचार्यांना मनोमन मान्यता दिली. पण सभा सोडून चालते झाले.
नंतर त्यांनी द्वारकेमध्ये पहिल्या धर्मपीठाची स्थापना केली. द्वारकेमध्ये श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. तेव्हा अच्युताष्टकाची रचना केली. नंतर प्रभास व उज्जैनीस भेट दिली. नेपाळला दर्शनासाठी गेले. वैदिक सनातन धर्माच्या पताका, नेपाळच्या सर्व मंदिरांवर उभारल्या. आचार्य यांना कैलास पर्वतावर जाऊन शिवदर्शनाची ओढ लागली होती. त्यांनी केलेल्या प्रार्थनेवर प्रसन्न झालेल्या दत्तगुरूंनी, आचार्य यांचा उजवा हात धरला व आपल्या योगसामर्थ्याने एका क्षणात त्यांना भगवान शिवांच्या समीप कैलासावर आणले. तिथे शतश्लोकी शिवानंद लहरींची रचना झाली. आचार्यांनी केलेल्या, या भक्तीमय स्तोत्राने प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी आचार्यांना पाच स्फटिकलिंगे दिली व सांगितले, यांच्या पूजनाने तुला अमोघ ज्ञान प्राप्त होईल.
आचार्यांनी जगन्नाथ पुरी येथे मठ स्थापन केला.
नंतर आचार्य, महाराष्ट्रातल्या वैकुंठाकडे म्हणजेच पंढरपूरला आले. पांडुरंगाचे दर्शन होताच पांडुरंगाष्टक म्हणून प्रार्थना करू लागले.
आचार्यांनी चौथ्या
धर्मपीठाची स्थापना शृंगेरी येथे केली.
शेवटी, कांची येथे
धर्मपीठाची स्थापना केली.
अशा प्रकारे चार दिशांना चार धर्मपीठांची स्थापना केली.
कांचीमध्ये कोण, कोणत्या धर्मापीठावर राहील, ते सांगितले.
त्यांनी धारण केलेला दंड, नर्मदा मातेने पावन केलेला कमंडलू, त्यांच्या पादुका…. यांच्यावर कोणाचा हक्क राहील, हे सांगितले.
ते म्हणाले माझा बहिश्चर प्राण, म्हणजे कैलासावर भगवान शिवांकडून प्राप्त झालेल्या त्या सौंदर्य लहरी,
माझ्या शिवानंद लहरींसह, प्राणरूपाने आपणा सर्वांसाठी ठेवून जात आहे. व आपल्या मधुर वाणीने
भज गोविंदम्
भज गोविंदम।।
हे आपल्या गुरूंचा उल्लेख असलेले व गुरुगोविंदयतींना प्रिय असलेले भजन म्हणायला सुरुवात केली.
सर्व शिष्यांच्या एका सुराने कांची मठाचा आसमंत भरून गेला. एका क्षणी धून थांबली; व सर्वत्र, नीरव शांतता पसरली. कारण आचार्य आसनावर नव्हते.
दंड तेजाळला होता. कमांडलू प्रभावी दिसत होता.
पादुका तेजःपुंज दिसत होत्या.
आणि सौंदर्य लहरीच्या पोथीतून व त्याखाली असलेल्या शिवानंद लहरींच्या पोथीतून, दिव्य असा, शीतल प्रकाश बाहेर पसरत होता.
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने ‘माफ’ करा.
दुसरे रत्न – विसरा
दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. ‘निःस्वार्थ’ भावना ठेवा.
तिसरे रत्न – विश्वास
नेहमी ‘स्वकष्ट’ आणि ‘निसर्गा’वरअतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.
चौथे रत्न – नातं
समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होतं ते नातं. नात्याला जपा, नात्याला तडा जाऊ देऊ नका.
पाचवे रत्न – दान
नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही. उलट दान केल्याने मिळतो मान.आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं.
सहावे रत्न – आरोग्य
दररोज व्यायाम करा, योगासने करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा.
सातवे रत्न – वैराग्य
नेहमी लक्षात ठेवा की, ‘जन्म’ आणि ‘मरण’ कधीच कुणालाच चुकलेले नाही. ‘जन्म’ घेतला म्हणजे ‘मृत्यु’ अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळत बसू नका. ‘जीवन’ खूप सुंदर आहे, आनंदाने जगा.
माणूस जसा बदलत चालला आहे, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.
निसर्गाची ताकद आहे बघा.निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.
ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत,
तो तोडताना दहा वेळेस विचार करतो.
आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो,
मग ती झाडे असो की नाती…
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता “मित्र को पत्र…”।)