सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री नीलम माणगावे

💐अ भि नं द न 💐

ई-अभिव्यक्तीच्या नामवंत ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री नीलम माणगावे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे २०२२ या वर्षासाठीचा “ना.घ. देशपांडे पुरस्कार“ जाहीर झाला आहे. 

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

💐अ भि नं द न 💐

तसेच आपल्या ग्रुपमधील प्रसिद्ध लेखिका सुश्री वंदना हुळबत्ते यांना त्यांच्या “गांडुळाशी मैत्री“ या पुस्तकासाठी, पश्चिम महाराष्ट्र साहित्य परिषदेचा बाल साहित्यासाठीचा पुरस्कार लाभला आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठही पुस्तकाइतकंच आकर्षक आहे, ज्याचा फोटो खाली देत आहे.

💐 💐  

 सुश्री नीलम माणगावे यांची एक कविता इथे प्रस्तुत करत आहोत. 

☆ नीलम ताईंची कविता ती ☆

ती चालायला शिकवते

धडपडायला लावते

पुराण पुरुषाच्या पुरुषत्त्वाला आव्हान देऊन

स्त्रियांच्या पाठीशी ठाम राहते

मनुवाद झिडकारून

मुक्ततेची वाट दाखवते

म्हणून तिला म्हणती मुक्ता !

 

ती इतिहासाचा वीररस

वर्तमानाचा धीररस

भविष्याचा स्वप्नरस

म्हणून ती आशा !

 

बाभळीच्या काट्यांवरच काय

विंचवाच्या डंखावरही

ती प्रेम करते

म्हणून ती स्नेहदा !

 

ती आद्य गुरु –  जगणं रुजवणारी

ती व्यवस्थापक –  शिस्त लावणारी

ती पहिली पाटी –  लिहिणं शिकवणारी

म्हणून ती शारदा !

💐 सुश्री नीलम माणगावे आणि सुश्री वंदना हुलबत्ते या दोघींचेही ई-अभिव्यक्तीतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील अशाच यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments