श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

🤔 असं घडलं असतं तर 🤔 श्री सुहास सोहोनी ☆

असं घडलं असतं तर …

चित्र थोडं वेगळं असतं …

असं घडलं नसतं तरी …

चित्र वेगळंच दिसलं असतं….!

 

अति श्रीमंती लाभती तर…

कष्टांचं मोल कळलं नसतं …

गरिबी झिम्मा खेळती तर …

भिक्षेचं मोल कळलं असतं …

 

नात्यांचा गुंता नसता तर …

मस्त कलंदर झालोअसतो …

गाणारा बंजारा किंवा …

भटका फकीर झालो असतो …

 

राजकारण चिकटतं तर …

नेता बिलंदर झालो असतो …

सत्ता पैसा हाव प्रतिष्ठा …

यातच गरगरत राहिलो असतो…

 

गुरूमुखातुन जर मिळता तर …

अनुग्रहाचा दैवी लाभ …

समाधिस्थ मग झालो असतो …

बर्फगुहेतिल योगी आज …

 

पण मी जसा आहे …

तसाच मी छान आहे …

गुणावगुणांचा या साऱ्या …

माझ्यात थोडा अंश आहे …

 

श्रीमंत आहे गरीब आहे …

बंजारा तसाच फकीर आहे …

वाडगाभरून सभ्य आहे …

तरी चमचाभर सद् बिलंदर आहे …

 

विश्वात्मका आता मला …

आत्मचिंतनाची लाव गोडी …

बर्फातल्या योगीयाची …

थोडी जुळावी रे जोडी …

🌹

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments