मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 32 – भृण हत्या ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है  सामजिक व्यवस्था को झकझोरती हुई एक कविता  “भृण हत्या” । )

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 32 ☆ 

 ☆ भृण हत्या

 

करा विचार जरासा

नका होऊ अविचारी।

पुत्र मोहापाई  का हो

भृणहत्या ही उदरी।

 

आजी आत्या मामी काकी

आई ताई मावळण।

रुपे नारीची अनेक

करी प्रेम उधळण।

 

वंश वेल वाढवीन

उद्धरीन दोन्ही कुळे ।

तरी का हो आई बाबा

खिन्न होता  माझ्यामुळे।

 

तुझ्या हाती सोपविली

माझ्या श्वासाची ही दोरं

नको फिरवू ग सुरी

होई घायाळ ही पोरं

 

मुले जरी वंश दीप

मुली तरी कुठे कमी।

खुडू नको गर्भी कळी

फुलण्याची द्या ना हमी।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ कविता ☆ फुले विद्यापीठ  .. . . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है भारत वर्ष में स्त्री शिक्षा में क्रान्ति लाने वाली महान स्त्री शक्ति  सावित्री बाई फुले पर आधारित उनकी काव्यात्मक अभिव्यक्ति फुले विद्यापीठ  .. . . . !  )

 ☆ फुले विद्यापीठ  .. . . . !  ☆

(श्री विजय सातपुते जी की फेसबुक वाल से साभार )

तव्यावर भाकर भाजता भाजता

ज्योतिबाच्या इच्छेखातर,

गिरवाया शिकली  अक्षर

कधी पिठात. .  तर कधी. . धूळपाटिवर. . . !

लिवाय शिकली. . .  वाचाय शिकली,

तवा उमगलं माता सावित्रीला ..

या समाजानं अज्ञानाच्या चुलाण्यावर

रांधलेला रूढी परंपरेचा तवा .. .

तापायला नगं . . .  तळपायला हवा. . . !

बाईवर लादलेली ,  पिढ्या पिढ्यांची . .

वर्तुळाकार बंधन  . . . तिची तिनच मोडाया हवी. !

चूल नी मूल, यात गुतलेली बाई

परीघाच्या बाहेर पडायला हवी.

भाकर थापणारी बाई , साक्षर व्हायला हवी.

अशी सोत्ता साक्षर झालेली साऊ, घरा घरात पोचली.

तिच्या भाषणातून बोलायची ती.. .

”बाई तुझी दोन घर हाईत . .

एक मनातलं… आन् दुसर जनातलं . . . !

जनातल्या घरासाठीच जलमते तू . . .

आन् घरातल्या घरातच मरतेस तू. . . . !

पर बाई , तुझ्या काळजातल्या घराचं काय ?

त्याला बी गरज हाय . . . अन्नाची नाय ज्ञानाची .

गरज हाय आता, घराच घरपण राखायची. . . !

बाई तू फकस्त ‘बाई ‘ नाय ‘बाईमाणूस ‘ हाय.

आता बायांनो, चुलीतला जाळ नाय

मनातला जाळ फुलवायचा. . . !

निस्ती बाई नाय, बाईमाणूस जगवायचा . . . !

आता एकटीने नाय,एक जुटीन संसार रांधायचा. . . !

काळ्या पाटीचा चौकोनी तवा

माणूस वाचत गिरवायचा …!”

घरातल्या बाईला साक्षर करीत

घर जिवंत ठेवणार्‍या, भाकरीच्या पिठात

माता सावित्रीने, ज्ञानाचं पीठ पेरलं.

अडाण्याला ज्ञान दिलं ,विचारांच दान दिलं .

तवापासून बाईमाणसाला , शिक्षण क्षेत्र खुलं झालं.

समाजात प्रगती झाली, शिक्षणात क्रांती झाली.

म्हणूनच विद्येच्या माहेरी, या पुण्यात,

पुणे विद्यापीठाचं , फुले विद्यापीठ झालं .

माता सावित्रीचं ,  ‘फुले विद्यापीठ ‘ झालं. . . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 17 ☆ हुर्डा पार्टी ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनकी विनोदपूर्ण  कविता  हुर्डा पार्टी । इस कविता के सन्दर्भ में उल्लेखनीय है कि आप ‘ लोकमान्य हास्य  योग  संघ, दौलतनगर शाखा आनंदनगर पुणे की सदस्य रही हैं। उनके वर्ग की  सदस्याओं द्वारा  एक छोटी  पिकनिक ट्रिप  का आयोजन किया गया। किन्तु, वह ट्रिप कैंसिल हो गई। उन्होंने  काव्यात्मक कल्पना की है कि- यदि ट्रिप  सफलतापूर्वक आयोजित की जाती  तो कितना आनंद आता। मित्रों जीवन में आनंद का अपना महत्व है। आप भी इस काल्पनिक ट्रिप का आनंद लीजिये जिसे श्रीमती उर्मिला जी ने बड़े ही आनंदमय होकर कविता में शब्दबद्ध किया है।)  

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 17 ☆

☆ हुर्डा पार्टी ☆

लोकमान्य हास्य योग. संघाच्या !

आम्ही साऱ्या निघालो पार्टीला!

अहो ! कसल्या काय विचारता ? अहो…

हुर्डा पार्टीला !!

 

गाडीत गप्पा ठोकीत !

चिमणचारा चाखीत !

हास्य विनोदाला आला ऊत!!

 

सोडून घरादाराची काळजी !

आज आम्ही आमच्या मनमौजी!

 

गाण्यांच्या रंगल्या की हो भेंड्या !

एकमेकीला करतोय कुरघोड्या !!

 

गुळभेंडी ज्वारीच्या शेतात !

खोडून कणसं आणली हातात !!

 

शेण्यांची आगटी पेटवुनी !

घेतली कणसं आम्ही भाजूनी !!!

 

खाया बसलो मांडा ठोकुनी !

हुर्ड्याला दही लसनीची चटनी !

ताव मारतोय त्यावर साऱ्याजनी !!

 

भन्नाटच हुर्डा पार्टी रंगली !

गाडीवाल्याची हाक कानी आली !

चला चला निघायची वेळ झाली !

अहो..चला…!!

 

लागलो एकमेकींना उठवायला !

हुर्डा खाऊन जडपणा आला !!

 

पण. ! मस्त झाली आपली हुर्डा पार्टी !

सख्यांनो..ऽऽऽ..

आत्ता पुढली कुठं रंगणार आपली पार्टी !!

 

©®उर्मिला इंगळे

दिनांक:-९-१-२०२०

9028815585

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 24 ☆ कुस्करलेल्या कळ्यांचा न्याय ☆ सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

(सौ. सुजाता काळे जी  मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं। वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं।  उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है  सादरपूर्वक सौ. सुजाता काळे जी की आज के दौर में स्त्री  जीवन की कठिन परिस्थितियों पर जीवन के कटु सत्य को उजागर करती एक भावप्रवण  समसामयिक मराठी कविता  “कुस्करलेल्या कळ्यांचा न्याय”।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 24 ☆

☆ मराठी कविता – कुस्करलेल्या कळ्यांचा न्याय

 

कुठे कुठे राखायची

स्वतःचीच मी आब?

का-कधी करायची?

स्वतःची झाक- पाक.

 

किती कशा पाळू वेळा?

घराबाहेर पडायला,

गरजेविना कोणी का जातं?

अंधारात फिरायला.

 

मी बाहेर असले की

आई- बा ला धाकधूक,

कोल्हे, लांडगा टपलाय

मुलगी म्हणून का माझी चूक?

 

मला स्वातंत्र्य मिळावे म्हणून

रमा, सावित्री झटल्या,

आता माझी होळी करून

मुसक्या बांधून टाकल्या.

 

निसर्गाने मला बनवून

मातृत्वाचं दान दिलं,

वासनेच्या राक्षसांनी मला,

प्रियांका कधी निर्भया केलं.

 

माझे लचके तोडताना,

त्यांना वयाचं बंधन नाही,

कधी मुलगी, बहिण, आई

आजीला पण सोडत नाही.

 

साफ स्वच्छता सुरू आहे,

गल्ली अन् बोळांतून

वासनेची घाण भिनलीय,

नराधमांच्या डोक्यातून.

 

देहाचा माज उतरवितात,

कोवळ्या कळयांना कुस्करून

देहाच्या चिंध्या करून,

कधी गर्भारपणाचं ओझं लादून.

 

कधी थांबणार विटंबना

माय-लेकी व सुनांची

न्याय देवता जागी होवो

कुस्करलेलया कळ्यांची

 

इथे कोणी राम नाही

अहिल्येच्या उद्धारी

फुकट बळी जाऊ नये

न्यायासाठी हे गं नारी.

 

© सुजाता काळे

पंचगनी, महाराष्ट्र, मोब – 9975577684

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 30 – मराठी क्षणिकाएं …! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजितजी की कलम का जादू ही तो है!  आज प्रस्तुत है कुछ अतिसुन्दर  मराठी क्षणिकाएं …! )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #30☆ 

मराठी क्षणिकाएं …! ☆ 

 

[ 1 ]

हल्ली हल्ली शब्दांचाही

विसर पडू लागलाय

हे आयुष्या तुला संभाळता संभाळता….,

अक्षरांचा हात सुटू लागलाय..

 

[ 2 ]

लहान असताना . . .

फुलपाखरू पकडताना ,

जितकी तारांबळ उडायची ना…

तितकीच तारांबळ ,

सुखाच्या बाबतीत होते हल्ली…!

 

[ 3 ]

मी ठरवलंय आजपासून

मनाशी वाद नाही घालायचा

वाद झालाच तर

विकोपाला नाही न्यायचा…

 

[ 4 ]

सरत्या उन्हात आठवणींचा

सुरू होतो पुन्हा खेळ

जुन्याच आठवणींना पुन्हा

नव्याने घेऊन येते कातरवेळ…

 

© सुजित कदम, पुणे

7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 32 – अनुवंश ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनकी अतिसुन्दर कविता  “अनुवंश.  सुश्री प्रभा जी की कविता अनुवंश एक गंभीर काव्य विमर्श है ।  यदि हम अपनी अब तक की  जीवन यात्रा पर विचार करें  तो पाएंगे कि हमने अनुवांशिक क्या पाया। निश्चित ही हमने  कवि के रूप में  भरे पुरे संयुक्त परिवार में  अपने अस्तित्व का एकाकी जीवन ही जिया है । हां संस्कार जरूर हमारे साथ चलते रहे और उन संस्कारों, जीवन के खट्टे मीठे अनुभवों ने हमारे कवि मन की नींव रखी । फिर हम रचते रहे अपना साहित्यिक संसार । नीलकमल जैसे चित्रपट हमें जरूर कल्पना के सागर में ले गए होंगे कि हमारा पूर्व जन्म कैसा रहा होगा ?

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 32 ☆

☆ अनुवंश ☆ 

 

मी काहीच घेतले नाही

माझ्या आईबापाकडून वारसा हक्काने,

किंवा त्यांच्यातले

काहीच उतरले नाही माझ्यात

अनुवंशाने !

भल्या थोरल्या वाड्यात,

एकत्र कुटुंबात,

कुणीच नव्हते कुणाचे

असे आता वाटते !

चुलीला पोतेरे घालणारे

सालंकृत घरंदाज बायकी हात

किंवा दर बुधवारी शेतमजुरांना पगार वाटणारे

पैसेवाले बेबंद पुरुषी हात

कधीच वाटले नाहीत….

भक्कम आधाराचे किंवा आश्वासक!

सुखवस्तू कुटुंबात

आपसूक वाढतात मुले

सुरक्षित,नीटनेटकी!

तरीही त्या भरल्या घरात

अगदी एकटेच वाटत राहिले

आणि एकाकीही……

त्या एकांत बेटावर

स्वतःला अंतर्बाह्य न्याहाळताना

अवघ्या अस्तित्वावर उमलत गेली

कवितेची असंख्य नीळी कमळं….

 

“नीलकमल आ जाओ….”

अशी साद घालणा-या

चित्रपटातल्या गतजन्मीच्या

प्रियकरा सारखीच,

कविता खुणावत राहिली

आणि मीही गुमान चालत राहिले

त्या अभिमंत्रित वाटांवरून  ……

हा कुठला अनुवंश उतरला आहे माझ्यात?

जे जाणवले,जे न्याहाळले,

जे सोसले,जे भोगले,

ते खदखदते आहे….धगधगते आहे…उसळते आहे…

काहीतरी वेगळेच रसायन

धावते आहे माझ्या धमन्यातून!

त्यावर आप्त स्वकियांचे शेरे ताशेरे…

अवहेलना, अपमान, खच्चीकरण!

आणि या सा-याहून वेगळं….

एक जग कवितेचं!

“ये हृदयीचे ते हृदयी”

पोहचविताना झालेल्या आनंदाचं!

माझ्यातून उगवलेल्या माझंच…..

जगातल्या पहिल्या कवयित्रीचं—-

संवेदन, जखमी हृदय, झालेली उपेक्षा, हेटाळणी आणि

बरेच काही….

मिळाले आहे वारसाहक्काने मला

आणि तिच्यातलीच सृजनशीलताही

अनुवंशाने उतरली असावी माझ्यात!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #32 – नंदलाला ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक  भावप्रवण कविता  “नंदलाला”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 32☆

 

☆ नंदलाला ☆

 

प्राशले विष, ना तरीही घात झाला

ना कुठेही पीळ पडला आतड्याला

 

रासक्रीडा खेळण्याचे भाग्य नाही

देह भजनी फक्त त्याच्या लागलेला

 

प्रीतिच्या वाटेत आले कैक धोंडे

धर्म भक्तीचाच होता पाळलेला

 

मीच राधा मीच मीरा एक आम्ही

या जगाने भेद आहे मांडलेला

 

नाव त्यांनी ठेवलेले होय मीरा

मी कधीही सोडले ना राधिकेला

 

दर्शनाची आस आहे सावळ्याच्या

चुंबते मी रोज त्याच्या बासरीला

 

एकतारी ‘बासरीचे’ सूर काढी

बोट माझे वाटते मज नंदलाला

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 31 – बालगीत – फटाके ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है अतिसुन्दर बालगीत “फटाके” । )

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 31 ☆ 

 ☆ बालगीत – फटाके

 

हवे कशाला उगा फटाके

ध्वनी प्रदूषण वाढायला।

जीव चिमुकले,  प्राणी पक्षी

वाट मिळेना धावायला ।

 

आनंदाचा सण दिवाळी,

सारे आनंदाने गाऊ या।

मना मनाती ज्योत लावूनी,

आज माणूसकीला जागू या।

 

दीन दुखी नि अनाथ बाळा,

नित हात तयाला देऊ या।

अंधःकारी बुडत्या वाटा,

सहकार्याने उजळू या।

 

रोज धमाके करू नव्याने,

कुजट विचारा उडवू या।

ऐक्याचे भूईनळे लावूनी,

आनंद जगती वाटू या।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ☆ कविता – जर ….! ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

हमारे लिए यह गर्व का विषय है कि  ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उस्मानाबाद  में वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री प्रभा सोनवणे  जी की गरिमामय काव्य प्रस्तुति निमंत्रित कवि सम्मलेन  में आज 12 जनवरी 2020 को दोपहर 12 बजे से 2 बजे के सत्र में  मंडप – 2 सेतुमाधवराव पगड़ी साहित्यमंच पर सुनिश्चित की गई है। आप आज इस अभूतपूर्व अखिल भारतीय कार्यक्रम में अपनी कविता  ‘जर…..’ प्रस्तुत कर  रहीं हैं । हम आपकी यह रचना ससम्मान अपने पाठकों  के साथ साझा करने जा रहे हैं। )

इस गरिमामय प्रस्तुति के लिए ई-अभिव्यक्ति की ओर से हार्दिक शुभकामनायें

☆ जर….. ☆ 

जर मी जगलेच सत्तर वर्षे….

तर लिहिन एका म्हाता-या परीची कथा…

कुणाला आवडो न आवडो…

त्यात असेल एक गाव….

परीकथेतला….

आजोबा म्हणायचे,

“तुम्ही काहीही  सांगाल, आम्हाला खरं वाटलं पाहिजे ना ? ”

 

परी सांगेल तिची खरीखुरी कहाणी,

परीकथेत असतील इतरही प-या,

यक्ष ,जादू च्या छड्या, चेटकिणी,

घडेल काही आक्रित,

नियती वाचवेल प्रत्येकवेळी परीला…..

परीला पडतील स्वप्न….अगदी साधीसुधी….

ती खेळेल भातुकलीचा खेळ

बाहुला बाहुलीचे लग्न ही लावेल….

 

ती हरवेल कधी जंगलात, कधी गर्दीत….

तिला सापडणार नाहीत हवे ते रस्ते…

ती रस्ता चुकेल, रडेल,

दुखेल, खुपेल तिलाही…

ती सहन करेल तोंड दाबून बुक्क्यांचा मार…

 

आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध च घडणार आहे,

हे माहित असूनही,

ती लावेल पत्त्यांचे

नवे नवे डाव आणि हरत राहिल वारंवार!

 

परी सांगेल तिची खरीखुरी कहाणी, गाईल गाणी,

खेळेल  ऐलोमा पैलोमा….

 

ती करेल स्वयंपाक, थापिल भाकरी, कधी सुगरण असेल ती तर कधी करपेल तिचा भात,पोळी कच्ची राहिल,

आडाचं पाणी काढायला जाताना…तिचे पडतील ही दोन दात…

केस पांढरे होतील, सुरकुत्या पडतील चेह-यावर…..

परी म्हातारी होईल, तरीही तिला काढावसं वाटेल आडाचं पाणी….

कुणी म्हणेल ही सहजपणे….

“धप्पकन पडली त्यात”

ती पडेल आडात,पाण्यात की खडकावर माहित नाही…..

तिने हातात गच्च धरून ठेवलेला शिंपला पडेल त्याच आडात…

 

आणि आजूबाजूच्या फेर धरणा-या तरूण प-या म्हणतील….

आडात पडला शिंपला…..तिचा खेळ संपला!

 

जर मी जगलेच सत्तर वर्षे तर लिहिन एका म्हाता-या परीची कथा…..

जी आली होती जन्माला बाईच्या जातीत…..आणि मेली ही बाई म्हणूनच!

 

आणि ही कथा तुम्हाला नक्कीच खरी वाटेल

परीकथा असूनही..

 

© प्रभा सोनवणे 

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

 

आदरणीया सुश्री प्रभा सोनवणे जी का अति-लोकप्रिय मराठी साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात”  शीर्षक से प्रत्येक बुधवार को नियमित रूप से प्रकाशित होता है। 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उस्मानाबाद ☆ कविता – दिलाची सलामी. . . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं ।

उस्मानाबाद में त्रिदिवसीय 93 वां अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मलेन  (10-12 जनवरी 2020) का आयोजन संपन्न हो रहा है।आज 11 जनवरी 2020 (3.30 से 4.30 के मध्य ) को  ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उस्मानाबाद  में आपकी   गौरवपूर्ण काव्य प्रस्तुति है। आप आज इस  अभूतपूर्व अखिल भारतीय कार्यक्रम में अपनी कविता दिलाची सलामी. . . . ! प्रस्तुत कर रहे हैं। हम आपकी यह रचना ससम्मान अपने पाठकों से साझा करने जा रहे हैं।  इस उपलब्धि के लिए ई-अभिव्यक्ति की ओर से हार्दिक शुभकामनायें । )

 ☆ दिलाची सलामी. . . . ! ☆

 

बसा सावलीला, जिवा शांतवाया

शिवारात माझ्या, रूजे बापमाया .

परी बापमाया, कशी आकळेना ?

दिठीला दिठीची, मिठी सोडवेना.

 

घरे चंद्रमौळी, तुझ्या काळजाची

तिथे माय माझी, तुला साथ द्याची

मनाच्या शिवारी ,सुगी आसवांची

तिथे सांधली तू, मने माणसांची.

 

जरी दुःख  आले, कुणा गांजवाया

सुखे बाप धावे , तया घालवाया

किती भांडलो ते, क्षणी आठवेना

परी याद त्याची, झणी सांगवेना.

 

कुणा भोवलेली , कुणी भोगलेली

सदा ती गरीबी, शिरी खोवलेली .

कधी ऊत नाही, कधी मात नाही

शिळ्या भाकरीची,  कधी लाज नाही.

 

कधी साहिली ना , कुणाची गुलामी

झुके नित्य माथा, सदा रामनामी .

सणाला सुगीला , तुझा देह राबे

तरी सावकारी, असे पाश मागे .

 

जरी वाहिली रे , नदी आसवांची

तिथे नाव येई , तुझ्या आठवांची

गरीबीतही तू , दिले सौख्य नामी

तुला बापराजा , दिलाची सलामी.

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares