मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 116 ☆ कादंबरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 116 ?

☆ कादंबरी ☆

मंदिरी आराधना

सागरी आराधना

 

कोण जाणे कोणती

सावरी आराधना

 

कृष्ण राधे सारखी

पावरी आराधना

 

मत्स्यमा-या नेहमी

म्हावरी आराधना

 

पौर्णिमेला जागते

जागरी आराधना

 

दीपपूजेच्या दिनी

शर्वरी आराधना

 

एकदा लाभो मला

भर्जरी आराधना

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ नववर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆

 

कँलेंडर बदलतं नि वर्ष नवं येतं

सांगा बरं नक्की काय घडतं?

बदलतात का सूर्य-चंद्र?

नाही हो! स्रुष्टी नाही च बदलत.

बदलतं फक्त आपलं मन.

नव्या आशा,नवोन्मेष, संकल्पांचं दालन.

भविष्याचा वेध घेण्या, एक नवं कारण.

जीवनाला उभारी देतं, स्वागतोत्सुक मन

चित्तव्रुत्ती बदलण्याचं, ठरतं एक साधन.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 120 ☆ भरवसा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 120 ?

☆ भरवसा ☆

तुझ्या डोळ्यांत आरसा

तिथे अंधार हा कसा

 

मेंदू लागला पोखरू

नाही झोपत पाखरू

एक ध्यास मनामध्ये

एका फुलाची लालसा

 

नाते फूल पाखराचे

आहे मला जपायचे

दोघे मिळून जपुया

पिढीजात हा वारसा

 

फूल होता या कळीचे

भाग्य फुले डहाळीचे

गंध दूरवर जाई

होई पाकळ्यांचा पसा

 

जाई काट्याला शरण

त्याच्या सोबती मरण

क्षणभंगुर आयुष्य

नाही त्याचा भरवसा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकच सत्य… ☆ श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ एकच सत्य… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

कर दोन तरी,

नमस्कार एक.

दोन्हीं डोळ्यातले,

भाव एकएक.

दोन पायांखाली,

वाट एकएक.

भक्ती प्रणय वेगळे,

प्रेम एकएक.

मीरा राधा वेगळीही,

श्याम एकएक.

भिन्नता वेगळी,

संकल्पना एकएक.

जरी प्रार्थना वेगळ्या,

असो मागणेही एक.

तुझ्या माझ्यातले द्वैत,

व्हावे एकएक.

न उरावे अद्वैत,

सत्य समजावे एक.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जगावेगळी माऊली….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ जगावेगळी माउली ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

कै. सिंधुताई सपकाळ

फाटून लक्तरं झालेलं कापड

जे उपयोगी येत नाही कधी

तसाच तुझाही तेव्हाचा जन्म

म्हणून नाव ठेवलं गेलं चिंधी!

 

सोसल्यास अनंत समाजकळा

लावत अनाथांना माउली लळा

गुरे वळवताना वळवलस मन

गुरांसह घेतलंस शिक्षण धन !

 

शेणाचे महत्त्व जाणून तुझे

लिलावाविरुध्दचे संतापी बंड

शीलावरचा वज्राघात सोसत

मोजलीस गं काळीज किंमत!

 

रस्तोरस्ती भीक मागितलीस

अनाथपोरक्यांची आई झालीस

दिलेली भीक विसरून गेले

आईपण तुझ्या पदरात टाकले!

 

विविध संस्थांची उभारणी करत

समाजाशी ऋण बांधत बांधत

लेकुरवाळी झालीस तू सिंधूमाई

हीच तुझ्या आयुष्याची कमाई !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माई तुझ्या वेदनांना अंत नाही.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ माई तुझ्या वेदनाना अंत नाही… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कै. सिंधुताई सपकाळ

 सिंधुताई, माय माऊली,

 कष्टमय आयुष्य जगली!

 झुंजत झुंजत आयुष्याशी,

 निरपेक्ष, निरामय जीवन जगली!

 

 जन्म जाहला जिथे तिच्या,

 आयुष्याला मोलचं नव्हते!

 वाढत होती जणू बेवारशी,

 प्रेम, जिव्हाळा तिथे न भेटे!

 

 ज्यांनी द्यावा तिला आसरा,

 असे सासर तिला पारखे!

 माय माऊली टाकून दिली,

 जग अवघे वागे शत्रू सारखे!

 

 स्मशानातच तिला लाभले,

 सुख कसे ते अनोळखी!

 प्रेताची आगच बनली ,

 ठेवी न तिला रोज भूखी!

 

 हाल अपेष्टांचे डोंगर लंघुनी,

 जाहलीस तू प्रेममयी!

 अनाथांची माय बनुनी,

 प्रेमभाव ओतलास जगी!

 

 जरी तुझे अस्तित्व लोपले,

 तेज तुझे राहील जगी!

 त्या तेजाच्या प्रकाशात ,

 नित्य चमकशील तू नभी!

 

© सौ. सुहास उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 64 ☆ नेत्र … ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 64 ? 

☆ नेत्र … ☆

(अष्ट-अक्षरी)

नेत्र पाहतील जेव्हा, तेव्हा खरे समजावे

उगा कधीच कुठेच, मन भटकू न द्यावे…

 

मन भटकू न द्यावे, योग्य तेच आचारावे

स्थिर अस्थिर जीवन, मर्म स्वतःचे जाणावे…

 

मर्म स्वतःचे जाणावे, जन्म एकदा मिळतो

सर्व सोडून जातांना, कीर्ती गंध तो उरतो…

 

कीर्ती गंध तो उरतो, सत्य करावे बोलणे

राज केले उक्त पहा, पुढे नाहीच सांगणे…

 

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – २९– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – २९– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१]

माझीच सावली

पसरतो मी माझ्या रस्त्यावर

कारणदिवा आहे माझ्याकडे

पण न पेटवलेला….

 

[२]

चवच सारी

हरवून बसलास

आणि आता

अन्नाला

दोष देतोस?

 

[३]

नम्रतेचा शिखर

गाठता आलं

तरच जवळ जाता येतं

शिखराच्या

 

[४]

समृद्ध अन यशस्वी लोक

फुशारकी मारतात जेव्हा

ईश्वरी कृपेची

तेव्हा

किती शरमून जातो ईश्वर

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी वनवासी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ मी वनवासी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

(शेल काव्य रचना)

जन्मा येताच नकोशी

नकोशी माता पित्याला

सुरू झाला वनवास

वनवास पुजलेला…१

 

पतीच्या सदनी सुख

सुख स्वप्नी ही  न मिळे

सोसताना सारे भोग

भोग शब्दांत ओघळे…२

 

अन्यायाविरुद्ध ऊभी

ऊभी राहिली माऊली

अनाथांचे पाही दुःख

दुःख सोसण्या धावली..३

 

ममता बाल सदन

सदन केले स्थापन

गरजूंना अनाथांना

अनाथांना ते अर्पण..४

 

मी वनवासी म्हणत

म्हणत आयुष्य वेचले

माया ममतेचे छत्र

छत्र आज हरपले…५

 

 तळपत्या उन्हातली

उन्हातली तू सावली

जगायला शिकवले

शिकवले तू  माऊली..६

 

भूक तान्ही असताना

असताना घास गेला

जगणे देणारा श्वास

श्वास पोरका हा झाला..७

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माई… ☆ सुश्री आशा नलवडे

कै. सिंधुताई सपकाळ

? कवितेचा उत्सव ?

☆ माई… ☆ सुश्री आशा नलवडे ☆

?माई कुठं सापडलं ग दार तुला,

सर्व संकटातून बाहेर पडायला,

जवळ केलस तू झिडकारलेल्या जींदगीला,

पारखी झाली होतीस तूच चिमूटभर दयेला,

तव्हांच पिळ पडला का ग तुझ्या रिदयाला.

 

? संकटाची झगडताना मायचाबी आधार तुटला,

तवां बोटभर चिंधी बी नाय आली कामाला

अथांग सिंधू होण्याच वचन तवांच दिलस देवाला

भूकेलेलेल्या भाकर दिलीस चिमटा काढून पोटाला,

देवालाच दया आली ताकद दिली जगायला.

 

? मनाला दिलीस उभारी बळ आले लढायला,

जे षोटात तेच व्हटात म्हणून वाचा फोडलीस अन्यायाला,

सय येते बहिणाबाईंची ऐकून तुझ्या शब्दाला,

पोटासाठी,धनासाठी कित्येक जवळ करतात शिक्षणाला,

पाटीपुरती अक्षरे गिरवून ‘माय’ न्याय दिलास बापाला.

 

? बापामुळेच शिक्षणाचा अर्थ कळला तुझ्या रिदयाला,

हृदयातील शिक्षणाने ‘धडा’दिला जगाला,

फार मोठी झेप तुझी गवसणी गगनाला,

निराधारांसाठी  दूर ठेवलेस काळजातील ‘ममतेला’,

सोताचे अश्रु गिळून आनंद दिलास जगाला….

….खूप काही तुझ्याकडून शिकायला मिळाले आम्हांला.?

 

© सुश्रीआशा नलवडे

बोरीवली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares