मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ एकटी – कवी – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ?  एकटी – कवी – अज्ञात  ? ☆ संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

येतोस इथे

होऊन पाहुणा आता

रामतोस जुन्या

मित्रांसह येता जाता

मी थकले तरीही

तुजसाठी वावरते

जे आवडते तुज

तेच रांधुनी देते

पण ध्यान तुझे

मजपाशी असते नसते

मी तरीही तुजला

मनात टीपुनी घेते

ती सुट्टीही का

लवकर सरूनी जाते

तू गेल्यावरती

पुनः एकटी होते

कवी – अज्ञात 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ ‘डर’ श्री संजय भरद्वाज (मूल हिन्दी रचना) – ‘भीती’ (भावानुवाद) ☆ सुश्री आसावरी काकडे ☆

सुश्री आसावरी काकडे
आज प्रस्तुत है श्री संजय भरद्वाज जी की हिंदी कविता “डर” का मराठी की वरिष्ठ साहित्यकार सुश्री आसावरी काकडे जी द्वारा मराठी अनुवाद।)
श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना

? संजय दृष्टि –  डर ??

मनुष्य जाति में

होता है

एकल प्रसव,

कभी-कभार जुड़वाँ,

और दुर्लभ से दुर्लभतम

तीन या चार,

डरता हूँ,

ये निरंतर

प्रसूत होती लेखनी

और जन्मती रचनाएँ,

मुझे, जाति बहिष्कृत

न करा दें….!

© संजय भारद्वाज 

(शुक्र. 4 दिस. 2015 रात्रि 9:56 बजे)

मोबाइल– 9890122603, संजयउवाच@डाटामेल.भारत, [email protected]

☆☆☆☆☆

सुश्री आसावरी काकडे जी द्वारा मराठी भावानुवाद   

? भीती ??

मनुष्य प्रजातीत

एक प्रसूती एक जन्म…

कधी कधी जुळं जन्माला येतं

तीन-चार तर दुर्लभच …

भीती वाटतेय

निरंतर प्रसूत होणारी ही लेखणी,

तिचे अविरत सृजन

मला जातीबाहेर तर नाही करणार…?

© सुश्री आसावरी काकडे

संपर्क –  ‘सेतू’ , डी-१/३, स्टेट बँक नगर, कर्वेनगर, पुणे – ४११ ०५२. मोबाईल : +९१- ९७६२२०९०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुखी माणसाचा सदरा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ सुखी माणसाचा सदरा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सुखी माणसाचा चोरावा सदरा

कुणी असे सुखी, जगी सांगा जरा.

 

धन-दौलत आहे चिंता खातसे

ज्ञानी परंतु समाजाची ती कारा.

 

राजा प्रजेचा शत्रु सिंहासनार्थी

बंधू-भाव छळती कौरवी नारा.

 

रित प्रत्येकाची स्वार्थ प्रमाणात

शोध आत्मानंदी व्यर्थ चंद्र-तारा.

 

सुखी माणसाचा चोरावा चेहरा

डोळ्यात आसवे माया शिरजोरा.

 

फासूनीया रंग भुमिका साधतो

विदुषक जीवनात दैव दोरा.

 

सुखी माणसाचे चोरावे काळीज

विकारदुषित मौज नशा भारा.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 158 ☆ सुरैय्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 158 ?

☆ सुरैय्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मी खूप वर्षांनी पाहिलं तुला,

फेसबुक वर!

तू माझ्याच वयाची—

एकेकाळची मैत्रीण!

तू स्विकारलीस माझी रिक्वेस्ट,

पण साधला नाहीस संवाद!

तू उच्च शिक्षित,

उच्चपदस्थ  !

 

 जेव्हा जमलं आपलं मैत्र,

तेव्हा होतो आपण,

एकाच नावेतल्या प्रवासी!

खरंतर गृहिणीच…आईसुद्धा!

पण शिकत होतो,

आपापल्या वकुबानुसार!

 

बराच मोठा असतो गं,

पस्तीस चाळीस वर्षाचा कालखंड…

आणि आयुष्यात झालेली उलथापालथही!

तरीही ओळखलं आपण एकमेकींना!

जिथे भेटलो होतो कधी,

ते बालगंधर्व….

बकुळीचे वळेसर…

विस्मरणात गेले होते खरेतर..

पण परवा बालगंधर्वमधले,

फोटो तू लाईक केलेस….

तेव्हा आठवला बकुळीचा गंध..

आणि तू !

 

तेव्हा मी तुला

 “सुरैय्या” सारखी दिसतेस म्हटलं होतं..

आणि तू म्हणालीस….

लग्न झाल्यापासून माझा नवरा

मला कधीच म्हणाला नाही…

“तू सुंदर दिसतेस”

 

बस्स इतकंच आठवतंय!

आणि नाही जाणून घ्यावसं वाटत

पुढचं काहीच….

 

फेसबुकच्या पानावर,

तू आजही भासतेस सुरैय्याच…

अधिक ग्रेसफुल!

सा-या प्रगल्भ जाणिवा सांभाळत!

 

मी पुसून टाकते,

मनातले असंख्य प्रश्न….

आणि नाही जाणू इच्छित….

तीन अंकी नाटकातले…

पुढचे दोन !

© प्रभा सोनवणे

३ नोव्हेंबर २०२२

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ बालदिन… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ बालदिन … ☆ सौ. जयश्री पाटील ☆

पहिले पंतप्रधान स्वतंत्र भारताचे

प्रभावी वक्ते आणि दूत होते शांतीचे

 

हसरा टपोरा गुलाब शोभे त्यांच्या कोटावर

खूप खूप प्रेम करत ते लहान मुलांवर

 

मुलांना पण होता फारच लळा त्यांचा

लाडाने हाक मारत त्यांना नेहरू चाचा

 

रात्रंदिवस स्वप्न पाहायचे ते शांतीचे

न भांडता भविष्य उज्वल बनविण्याचे

 

त्यांचे स्वप्न आपल्याला खरं खरं करायचंय

म्हणून तर अभ्यास नी योग्य ते करायचंय

 

वाढदिवस त्यांचा करतो आपण साजरा

बालदिन म्हणूनच आवडतो मुलांना खरा

 

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #165 ☆ जखमांचा वावर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 165 ?

☆ जखमांचा वावर… ☆

खिळा भिंतीला ठोकला,  आत वीट हादरली

हातोड्याने पुन्हा पुन्हा, वीट किती पोखरली

 

भिंत सांभाळे घराला, ऊन्ह-वात करे तोरा

बाहेरून पावसाने, भिंत किती झोडपली

 

आहे जखमांचा वावर, दुःख छळतंय भारी

नव्हे भिंतीला पोपडा, आहे खपली धरली

 

नको विश्वास ठेवाया, रंगावरती वरच्या

आत डोकावून पाहू, भिंत आतून खचली

 

कौल बापाच्या सारखा, असे हात डोईवर

होती सावली आधार, म्हणून ती सावरली

 

वासा छताच्या खालचा, त्यास भय वाळवीचे

विरोधाला जुमानेना, लाकडे हि पोखरली

 

दिसे विटांचा सांगाडा, छत उडून गेलेले

पायाखालच्या मातीत, भिंत आज विसावली

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अवकाळी पाऊस… ☆ मेहबूब जमादार ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ अवकाळी पाऊस… ☆ मेहबूब जमादार ☆

भर सुगीत आली

पावसाची कथा

पिक गेलं वाहून

कुणा सांगू ही व्यथा

 

पिक फुलता रानी

थके त्याला स्मरून

हाती येता पिक

येतं आभाळ भरून

 

गेलं अंधारून सारं

चित्त विरलं धुक्यात

पाणी भरल्या रानांत

गेली  वाट हरवत

 

कसं पडतं सपान

तुला आलेल्या सुगीचं

का रे तुला समजेनां

गुज दडल्या मनींच

 

हरसाली हिच त-हा

तरी असतं तूझं येणं

किती विणवलं तरी

वरं तूझं कडाडणं

 

डोळं भरूनिया गेलं

तरी नाही परतावा

सांग? शेतकरी राजानं

हात कुठे पसरावा

– मेहबूब जमादार

मु -कासमवाडी पो .पे ठ  जि .सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ !! सूर्य !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ !! सूर्य !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

आला दिनकर पूर्वेस

सुवर्ण रश्मी घेऊन हजार

आला आसमंत उजळत

रंग आकाशी पसरे चौफेर

 

आरक्त लाली क्षितीजावर

जाहली सुरू पक्षांची किलबिल

करती कलरव कलकल

दशदिशा करती पुकार

 

सूर्याच्या किरणांनी

जाग पापण्यांना आणली

किमया त्या किरणांची

ओल्या दवांनी जाणली

 

ललना घेऊनी घट कमरेवरी

शिंपती जल अंगणी

रेखूनी सडा- रांगोळी

सजविती अंगणी…!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 106 ☆ कुठे हरवली प्रीत… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 106 ? 

☆ कुठे हरवली प्रीत… ☆

(दश अक्षरी) 

कुठे हरवली प्रीत सांगा

तुटला कसा प्रेमाचा धागा…०१

 

स्नेह कसे आटले विटले

तिरस्काराचे बाण रुतले…०२

 

अशी कशी ही बात घडली

संयमाची घडी विस्कटली…०३

 

मधु बोलणे लोप पावले

जसे अंगीचे रक्त नासले…०४

 

तिटकारा हा एकमेकांचा

नायनाट ऋणानुबंधाचा…०५

 

अंधःकार भासतो सर्वदूर

लेकीचे तुटलेच माहेर…०६

 

भावास बहीण जड झाली

पैश्याची तिजोरी, का रुसली…०७

 

कोडे पडले मना-मनाला

गूढ उकलेना, ते देवाला…०८

 

माणूस मी कसा घडवला

होता छान, कसा बिघडला…०९

 

राज विषद, मन मोकळे

सु-संस्कार, सोनेचं पिवळे…१०

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 37 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 37 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५७.

प्रकाश, माझा प्रकाश,

विश्व भरून राहिलेला प्रकाश

नयनाला स्पर्श करून

ऱ्हदयाला आनंद देणारा प्रकाश

 

हे जीवलगा, माझ्या जीवनात

आनंद नाचून राहिला आहे

माझ्या प्रेमाच्या तारा प्रकाशात झंकारल्या आहेत.

प्रकाशामुळेच आकाश विस्तारते,

वारा बेफाट वाहतो, भूमीवर सर्वत्र हास्य पसरते.

 

फुलपाखरं आपल्या नौका

प्रकाशसमुद्रात सोडतात,

लिली आणि जास्मिनची फुलं फुलतात

ती प्रकाशाच्या लाटांवर!

 

हे प्राणसख्या, प्रत्येक ढगाच्या

सोनेरी छटेवर प्रकाश आहे

मुक्तपणे मोत्यांची उधळण करतो आहे.

 

पानांपानांतून अमर्याद

आनंदाची उधळण तो करतो.

स्वर्गनदी दुथडी भरून वाहते आहे.

सर्वत्र आनंद भरून राहिला आहे.

५८.

अल्लड गवत पात्याच्या तालावर

आनंदात जे सर्व पृथ्वी फुलवतं,

 

जन्म- मृत्यू या जुळ्या भावंडांना

जगभर ते नाचवत ठेवतं,

 

हसत हसत सर्व जीवन वादळीवाऱ्यातही

ते डोलवतं आणि जागं ठेवतं.

 

फुललेल्या लाल कमळाच्या पाकळीवर

आसूभरल्या नयनांनी ते विसावतं,

 

आपल्याकडं असलेलं सर्वस्व

मूकपणं जे धुळीत उधळतं,

 

त्या माझ्या आनंदगीताच्या सुरावटीत

सर्वानंदाचे स्वर मिळावेत.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares