मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माय…. श्री सोमनाथ चौधरी  ☆ प्रस्तुती –  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई  ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– माय…. श्री सोमनाथ चौधरी  ? ☆ प्रस्तुती –  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

पोट तुझं भरलं असेल तर,

देवा माझ्यासाठी घेऊ का,

तुझं राहिलेलं उष्ट,

माझ्या घरी मी नेऊ का.?

देवा इथे मात्र तुमची,

मस्त अंगत पंगत रंगलीय,

घरात पीठ नाही म्हणून,

सकाळीच आई बाबासोबत भांडलीय.

आटवा भर पिठासाठी,

आई सगळ्या गल्लीत हिंडली,

सगळ्या शेजारच्यांनी,

तुझ्या निवदाची सबब सांगितली.

देवा आज सकाळी मला,

सडकून भूक लागली,

अचानक तुला आठवून,

तुझ्या मंदिराकडे धूम ठोकली.

देवा मला तुझा ,

कधी कधी हेवा वाटतो,

एका जाग्यावर बसून,

मस्त निवदाचा मलिदा लाटतो.

दर्शनासाठी आलेल्या लोकांनी,

नारळाचा तुकडा हातावर ठेवला,

तुला मात्र देवा त्यांनी,

अर्धा नारळचं वाहिला.

माफ कर देवा मला,

तुझा घास हिसकावतोय,

अर्ध्या कोर तुकड्यासाठी,

भाऊ माझा घरात रडतोय.

देवा मी आता ठरवलंय,

तुझ्यासोबत बंड करायचं,

माझ्या भाकरीच्या प्रश्नासाठी,

स्वतःच पेटून उठायचं!”

❤️

कवी – श्री सोमनाथ चौधरी 

प्रस्तुति – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उसनी गाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ उसनी गाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

डोळ्यात वाचली मी               

             होती तुझ्या कहाणी

तेथे समर्पणाची

            मज भेटली निशाणी

 

निरखून डोह गहीरा

                अंदाज घेतला मी

मग खोल खोल पाणी

                 पोहून पाहिले मी

 

त्या काळजात दडले

               ते स्वप्न जाणले मी

स्वप्नात आशयाचे

              घर छान बांधले मी

 

तू शब्द दिलेला तेव्हा

              झेलून घेतला हाती

मजबूत कराया धजलो

           मी दोघा मधली नाती

 

शेवटच्या थांब्या साठी

           भरधाव धावणे नडले

घसरून तोल जाताना

           विपरीतच सारे घडले

 

आताही रोज फुला़ंचा

       मज काच जाचतो भारी

पण रोज तुझ्या स्मरणाची

          मन मारून घडते वारी

 

वठलेल्या झाडाला ही

        मी बसतो घालत पाणी

हट्टाने म्हणतो सारी

       दुस-यांची उसणी गाणी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 169 ☆ विसावा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 169 ?

☆ विसावा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कोठे तरी जिवाला

लाभो जरा विसावा

करतेय    ईश्वराचा

सर्वस्वी हाच धावा

 

संसार मांडला का

माझे मला कळेना

तारूण्य काय असते

तेव्हा कळले मुळीना

 

प्रवाहपतिता परि हे

आयुष्य पार पडले

जे नको घडाया ते

अवचित येथे घडले

 

जगरहाटीच असते ?

होते प्रारब्ध हेच?

 गा-या भिंगो-या की

नाच गं घुमा नाचच ??

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेम लता… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ प्रेम लता… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सहजची भेटता तू आणि मी,

काही चमकले हृदयीच्या हृदयी!

बीज अचानक मनी पेरले

प्रीतीचे  का ते काहीतरी!

तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशी,

बीज अंकुरे मम हृदयी!

प्रेम पाण्याचे सिंचन करिता,

अंकुर वाढे दिवसांमाशी!

मनी वाढली प्रेम न् आशा,

रोप वाढता पाचव्या दिवशी!

प्रीतफूल उमलले त्यावरी,

‘प्रपोज डे’ च्या त्या दिवशी!

फूल प्रीतीचे मिळे मला,

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी,

फूल बदलले फळात तेव्हा,

परिपक्व प्रेम मिळे हृदयी!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #175 ☆ उर्वशी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 175 ?

☆ उर्वशी… ☆

रोज रोज तू नवीन भासते अशी

दूरचा उगाच पाहु सांग का शशी ?

 

स्वर्गलोक छान वाटला कुणा जरी

भूवरील तूच मेनका नि उर्वशी

 

खूप दानशूर भेटतीलही तुला

काळजी जरूर घे पडू नको फशी

 

ओठ लाल बोलुदेत कान हासुदे

मूक मूक राहतेस तू अशी कशी

 

वात थंडगार फार देइ यातना

तप्त या मिठीस का उगाच टाळशी

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋतूनाद… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

अल्प परिचय

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सहभाग 4 फेब्रुवारी 1996 आळंदी नंतर 4 फेब्रु. 2023…

वृत्तबद्ध काव्य रचना करण्याची विशेष आवड.’ऋतूपर्ण ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.

सध्या सांगली येथे इंग्लिश क्लासेस घेतात.

? कवितेचा उत्सव ? 

🙏 ऋतूनाद… 🙏 श्री विनायक कुलकर्णी ⭐ 

(भृंगावर्तनी,समजाती)

मात्रावृत्त..६-६-६-६=२४

गड गड गड मेघ कसे अवचित हे गडगडती

थड थड थड या चपला नभांगणी थडथडती

 

सर सर सर जलधारा धरतीवर कोसळती

झर झर झर तोय कसे पर्णातून ओघळती

 

खळ खळ खळ धवल धवल पाण्याचे पाट किती

 सळ सळ सळ समिराच्या गाण्याचे थाट किती

 

चम चम चम अधुन मधुन रविराजा चमचमतो

घम घम घम गंध नवा मातीचा घमघमतो

 

ढम ढम ढम ढोल तिथे आकाशी ढमढमतो

छम छम छम ताल धरत मयुर इथे छमछमतो

 

© विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 117 ☆ अभंग…  अंतरी नसावा…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 117 ? 

☆ अभंग…  अंतरी नसावा

आतला आवाज, ऐकावा सर्वांनी

साधावी पर्वणी, ज्याची त्यांनी.!!

 

अनेकांचे मत, ऐकुनीया घ्यावे

बाकीचे करावे, हवे-तेच.!!

 

उच नीच भेद, सोडूनिया द्यावा

सर्वांशी करावा, सद् व्यापार.!!

 

मनाची थोरवी, प्रगट करावी

अलिप्त असावी, वैर-बुद्धी.!!

 

कवी राज म्हणे, क्षण हा जपावा

अंतरी नसावा, अहंकार.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 48 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 48 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

८९.

गोंगाट नको, मोठा आवाज नको –

ही माझ्या धन्याची इच्छा मी यापुढं फक्त पुटपुटणार. गीताच्या गुणगुणण्यांतून माझ्या

ऱ्हदयाचं बोलणं असेल.

 

राजबाजारात माणसं जायची घाई करतात.

सगळे खरेदीदार विक्रेते तिथं आहेत.

दिवसाच्या माध्यान्ही, कामाच्या घाईच्या वेळी

(अवेळी) मला रजा असते.

तर मग अशा अवेळीच माझ्या बागेत फुलं फुलोत,

माध्यान्हीच्या मधमाशा

त्यांची आळसट धून तेव्हा छेडोत.

 

बऱ्या – वाईटाच्या झगड्यात किती तरी दिवस

मी घालवले. माझ्या रिकामटेकड्या कालावधीच्या

सवंगड्यांची इच्छा अशी की माझं मन

मी पूर्णपणे त्यांच्याकडं लावावं.

 

पण मला अचानक ही हाक का आली,

तिचा निरुपयोगी क्षुद्र परिणाम काय हे माहित नाही.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जि  व  ल  ग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 जि  व  ल  ग ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

आता थांबवीन म्हणतो

जरा शब्दांशी ते खेळणे,

त्यांनी तरी किती नाचावे

नेहमी माझ्या मनाप्रमाणे !

 

कशी कोण जाणे याची

लागली शब्दांना कुणकुण,

सोडले अचानक त्यांनी

माझ्या डोक्यातील ठाणं !

 

गेले असेच दोन दिवस

सरल्या त्या दोन रात्री,

‘ते’ परतणे शक्य नाही

मज याची झाली खात्री !

 

पण आज अवचित पडता

थाप डोक्याच्या दारावर,

उघडून पाहता दिसले

माझेच मला जुने मैतर !

 

गळा भेट होता आमची

मनोमनी सारे सुखावलो,

नाही सोडणार साथ कधी

एकमेका वचन देते झालो !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संघटना… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

 कवितेचा उत्सव ?

☆ संघटना… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सुविचारी संघटन

यशाचे गमक, सार

ताकदीने पुढे यावा

सृजनांचा कारभार

 

शिस्त युक्ती सातत्य हा

संघटनेचा प्राण हो

कार्यमग्न सेवेकरी

संघटनेची शान हो

 

अन्यायाला प्रतिकार

सभासद शिल्पकार

संघटना उत्कर्षात

प्रामाणिक व्यवहार

 

अविरत ध्यास हवा

नाविण्याचा अंगीकार

संघटन प्रदर्शनी

अप्रतिम अविष्कार

 

नवनवीन क्षेत्रात

पाऊल पुढे पडावे

संघटनेचे मंत्र ते

विश्वाने हो वाखाणावे

 

संस्कृतीची जपणूक

सतर्क धर्म रक्षणी

संघटन असावे जे

असेच बहुलक्षणी

 

जीवन प्रवास होई

संघटनेत सुखाचा

स्वीकारून मार्ग असा

आरंभ व्हावा कार्याचा.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares