मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा : दोन अलक ☆ सुश्री नीशा डांगे 

सुश्री नीशा डांगे 

संक्षिप्त परिचय

जि. प. शिक्षिका/ साहित्यिका

प्रकाशीत साहित्य:- मुग्धायणी काव्यसंग्रह  प्रकाशनाच्या वाटेवर:- दीर्घकथा संग्रह, लघुकथा संग्रह, बालकथा संग्रह

प्राप्त पुरस्कार:- पदमगंधा राज्यस्तरीय पुरस्कार, शब्द अंतरीचे कडून कोहिनूर पुरस्कार, मनस्पर्शी कडून साहित्य रत्न पुरस्कार, वीरशैव लिंगायत समाजाकडून 2 वेळा समाजभूषण पुरस्कार प्राप्त

 ☆ जीवनरंग ☆ लघुकथा : दोन अलक ☆

अलक लेखन क्रमांक 1

दूरदर्शनवर महाभारत पाहतांना मोहित म्हणाला

“आई तू का नाही ग यज्ञातून एकदम मोठी मुले काढलीस ?”

“का रे?” आई आश्र्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली

मोठा असतो ना तर शाळेतून घरी आल्यावर एकटे राहताना मला भीती वाटली नसती

 

अलक लेखन क्रमांक 2

प्रजासत्ताकदिनी सायंकाळी ध्वज उतरवून गुरुजी घरी गेल्याबरोबर मुलांनी कुंपण नसलेल्या शाळेत धुमाकूळ घातला. रंगीबेरंगी पताका तोडून मुलांनी त्याचे छोटे छोटे ध्वज बनविले आणि आपापल्या घरावर लावले. कोणी भगवा, कोणी निळा, कोणी हिरवा……..

सुश्री निशा डांगे

पुसद

मो 84218754

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – संकीर्ण ☆ लोककथा : वाखन पठारावरील लोककथा  ☆ सुश्री मंजुषा देशपांडे

सुश्री मंजुषा देशपांडे

 ☆ संकीर्ण : लोककथा  : वाखन पठारावरील लोककथा  ☆ सुश्री मंजुषा देशपांडे

ही लोककथा आहे.  एकदा म्हणे समुद्र आणि पृथ्वीमध्ये सर्व बहिण भावंडांच्यात असते तसे भांडण लागले.  या कथेत सूर्याची मुलगी पृथ्वी आणि  समुद्र व चंद्र मुलगे.   पृथ्वी आणि समुद्राचे एक मिनिट पटत नसे. चंद्र धाकटा,  तो कधी पृथ्वीच्या तर कधी समुद्राच्या पार्टीत.  तर पृथ्वी आणि समुद्राच्या  कडाक्याच्या  भांडणाचे कारण म्हणजे समुद्र पृथ्वीच्या हद्दीत शिरत होता आणि त्यासाठी वा-याच्या मदतीने त्याने मोठमोठ्या लाटा निर्माण करून त्याच्या किना-यालगतची पृथ्वीवरील झाडे आणि घरे दणादणा हलवली,  पृथ्वीला भयंकर राग आला ती तडक सूर्याकडे गेली. चंद्र  होताच साक्षीला.  सूर्याने समुद्राला बोलावले,  समुद्र कसला खट,  काय म्हणाला असेल… तर..म्हणे चंद्राने त्याला उकसवलं,  तो जवळ आला,  लांब गेला.  समुद्र आणि चंद्राच्या खेळात वारा सामिल झाला,  आणि त्यामुळे ते.. काय पृथ्वीला त्रास झाला.  समुद्राला काही पृथ्वीची खोडी काढायची नव्हती. असे साळसूदपणे सांगून त्याने चंद्राकडे पाहून डोळे मिचकावले. सूर्याला काही ते दिसले नाही पण पृथ्वीला दिसल्यामुळे तिचा चरफडाट झाला. पण ती काही न बोलता निघून गेली.  तिने समुद्राला धडा शिकवायचा ठरवला,  विचार करता करता तिला एक युक्ती सुचली,  त्या टेथिस महासागराचा तर तिला फारच वैताग येई, कारण त्याच्यामुळे तिचे तुकडे पडल्यासारखे झाले होते.  तिने समुद्रात लपलेल्या हिमालयाला विचारले,  तुला पहायचंय ना आकाश?  तो पौर्णिमेचा चंद्र…ते हिरवेगार देवदार… हिमालयाला पाहिजेच होते.  त्याला समुद्राची भीती वाटे पण तो तयार झाला.  पृथ्वी म्हणाली,  “ज्या दिवशी तो चंद्रोबा फूल फाॅर्मात असतो, त्या दिवशी तो आणि समुद्र भयंकर दंगा करत असतात आणि त्याचे इकडे तिकडे कुठे लक्ष नसते,  त्या दिवशी तू जोरात उसळी मारून वर ये… हिमालय तयारच होता,  तो दिवस अर्थातच पौर्णिमेचा होता. हिमालय वर आल्यावर सर्वानाच आनंद झाला पण समुद्राला भयंकर राग आला, तो त्याच्या अक्राळ विक्राळ लाटा आपटायला लागला.  पृथ्वीला म्हणे, ” तुझे तुकडे करून टाकीन” रागारागात पृथ्वीच्या घरी गेला आणि जोरजोरात दार वाजवायला लागला.  दिवस होते श्रावणाचे, त्यामुळे पृथ्वीबाई ठेवणीतला हिरवा कंच शालू नेसल्या आणि रंगीबेरंगी फूले भावाच्या अंगावर उधळत त्यानी त्याला घरात घेतले ओवाळले आणि म्हटले,  आजपासून आपल्या नात्याची नवी सुरुवात करू.  भांडणे विसरून जाऊ…माझी मुले तुला दरवर्षी नारळ अर्पण करतील. हा दिवस भावा बहिणीच्या स्नेहाचे प्रतिक होईल.  भावाने स्वतःच्या मर्यादेत राहिल्यास… दरवर्षी… अगदी दरवर्षी सर्व भाऊ बहिणी हा सण साजरा करतील… अशी कोपरखळीही मारायला ती विसरली नाही.

ही गोष्ट मूळच्या वाखन पठारावरील मोहम्मद हुसेन या माझ्या सहसंशोधक मित्राने सांगितली होती.

©  सुश्री मंजुषा देशपांडे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – बाई – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा – अनुवाद – सुश्री माया महाजन

सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

☆ जीवनरंग : लघुकथा – बाई – भावानुवाद सुश्री माया महाजन ☆

शहरातील झाडून सर्व महिला समित्यांनी एकत्र येऊन आयोजन केले. खूप मोठ्या संख्येने महिला एकत्रित झाल्या. कलेक्टर कमिशनर, मेयर यांच्या बायकांबरोबरच काही नेत्यांच्या पत्नीदेखील आमंत्रित होत्या.

महिलांवर होणार्‍या अत्याचारांविरोधात मोकळेपणी, स्पष्टपणे चर्चा झडल्या ज्यात हुंडा, कुटुंबाकडून होणारे शोषण, नोकरदार महिलांना सहकारी पुरुषांकडून होणारा त्रास, स्त्री भ्रूणहत्या इत्यादी मुद्यांवर भरपूर चर्चा झाली. या मुद्यांवर काही प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आले.

दिवसभराच्या या व्यस्ततेनंतर माधुरी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा रात्र झाली होती. जेवणे वगैरे उरकल्यानंतर ती थकलेली अशी पलंगावर पडली की नवर्‍याने तिला जवळ ओढले. माधुरी म्हणाली, ‘‘आज मी खूप थकून गेलेय…’’ नवरा एकदम चवताळून म्हणाला, ‘‘सगळा दिवस भाषणबाजी, घोषणाबाजी करताना स्टेजवर नाचताना थकवा नाही आला आणि आता मला पाहताच थकवा जाणवायला लागला का? समजतेस कोण स्वत:ला.’’

नवर्‍याची मारझोड सहन करून त्याची हवस पूर्ण करून जेव्हा ती पलंगावर मूक अश्रू गाळत पडली तेव्हा विचार करत होती, ‘हाच तर मुद्दा आज आपण मांडला होता, नवर्‍याकडून शोषण, उपेक्षा, मानहानी शेवटी बायकोने कसे तोंड द्यावे या सर्वाला! कुठपर्यंत हे सगळे सहन करावे तिने?

यातून सोडवणूक कधी? तिने मांडलेल्या या मुद्यावर प्रस्ताव मंजूर केला गेला. त्यांनी सर्वांनी अभिनंदन केले होते तिचे.

आता तिला वाटायला लागले की अभिनंदन करणारे जणू आता तिला टोमणे मारत आहेत, तिची चेष्टा करताहेत. पाह्यलं? चालली होती मोठी क्रांतिकारी बनायला.

विसरू नकोस तू बाई आहेस बाई…

 

मूळ हिंदी कथा- औरत- नरेन्द्र कौर छाबड़ा, मो.- ९३२५२६१०७९  अनुवाद- माया महाजन, मो.-९८५०५६६४४२

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्फुट लेख – ताण (टेंशन) ☆ सुश्री अनुराधा फाटक

☆ विविधा: स्फुट लेख – सुश्री अनुराधा फाटक   ☆

संध्याकाळची वेळ होती.मी अंगणात तांदूळ निवडत बसले होते.

‘काय करताय काकू?’ म्हणतच शेजारची रमा माझ्याजवळ येऊन बसली .

‘रिकामा वेत्र आहे. दुसरं काही काम नाही म्हणून बषले आपली तांदूळ निवडत पण तू आता इथं कशी?’

‘उद्या दहावीचा रिझर्ल्ट असल्याचे आता बातम्यात सांगितले आणि एकदम टेन्शन आलं काही सुचेना आले तुमच्याकडं ‘ तांदळात हात घालत रमा म्हणाली.

‘इतकं कसलं टेन्शन घ्यायचं? तुम्ही अलिकडची मुलं म्हणजे..कशाचं टेन्शन घ्याल काही कळत नाही.

‘काकू, सध्या आमच्याकडंच प्रत्येकाचं लक्ष आहे. किती मार्कस मिळतील? पुढं काय करायचं ?याचा विचार आमच्यापूक्षा आमचे आईवडीलच करतात.आता बाबा ऑफिसमधून आले की तोच विषय घरात असणार’

रमा बोलत असतनाच रमाच्या आईची हाक आली. पटकन तांदळातला हात काढून रमा घरी गेली.मीही शरद येईपर्यंत स्वयंपाक व्हायला हवा म्हणत उठलेरात्रीची जेवणं झाली.सर्व आवराआवरी करून मिही अंथरुणाला पाठ टेकली. आणि रमा नजरेसमोर आली.

‘आमचा विचार आमच्यापेक्षा आमचे आईवडीलच करतात’

रमाचं ते वाक्य आठवलं आणि मला आमचं शालेय जीवन आठवलं शाळेत नाव घातलं की आईवडिलांची जबाबदारी संपायची. शाळेसाठी लागणारी वह्या पुस्तके, भरावयाची फी याची आठवण केली तरी वडील ओरडायचे. कधी जुनी पुस्तके मिळायची कधी तीही नसायची, वह्याचे तेच.. फी थकलेली असायची. सारखं विचारलं की, शाळा सोडा हे उत्तर ठरलेलं असायचं.मग आमचे प्रश्न आम्हीच सोडवायचो. कुणाची तरी पुस्तकं, पाठकोऱ्या वह्या वापरून अभ्यास व्हायचा, वरच्या वर्गात जायचो.. पण त्यामुळं आम्ही स्वावलंबी झालो.सुटीत काहीतरी उद्योग करून शाळेची तयारी व्हायची. परीक्षेचे तेच घरात परीक्षा झालेली कळायची नाही की निकाल लागलेला. तरीही आम्ही शिकलो. आता सर्वच बदलंल. मुलांच्या आधी पालकानाच सगळी घाई!

‘आई, झोपायचं नाही कां?’

शरदच्या आवाजाने भानावर आले घड्याळ बघितले.बराच उशीर झाला होता आज रमाचा रिझर्ल्ट! असं म्हणतच मीशरद ऑफिसला गेला तसं भरभर घरातलं आवरलं.केव्हा एकदा रमाला भेटत्येय असं मला झालं होतं.’ रमा नक्कीच चागल्या मार्कानी पास झाली असणार. तिला काहीतरी घेऊन जावं.. नको काय हवं ते तिलाच विचारावं. ‘स्वतःशी बोलतच मी रमाचं घर गाठलं. मी दरवाजाला हात लावताच नुसता पुढं ओढलेला दरवाजा लगेच उघडला.घरातलं वातावरण

एकदम शांत होतं. स्वयंपाक घरातल्या आवाजाने रमाची आई

स्वयंपाकघरात असल्याचे सांगितले आणि मी इकडंतिकडं न बघता स्वयंपाक घरातच गेले.

‘काय चाललयं?’

रमाची आई स्वयंपाक करताना दिसत असतानाही मी विचारलं.

तसं त्यानी माझ्याकडं वळून बघितलं. त्यांचा चेहरा उतरलेला होता.

‘काय झालं?’

रमाच्या आईजवळ जात मी विचारलं.

‘आमची रमा..’ डोळ्याला पदर लावत त्या म्हणाल्या.

‘कुठं आहे रमा?’ मी तिच्यासाठीच म्हणजे तिचं अभिनंदन करण्यासाठीच आले.’

‘कसलं अभिनंदन आणि कसलं काय? दार लावून बसली आहे ती आपल्या खोलीत. किती वेळ झाला. मी हाका मारल्या पण ती दारच उघडत नाही. काय करायचं हो शरदची आई? ‘मार्कस फार कमी पडले कां?’

नव्वद टक्के मिळाले. पण तिच्या वडिलांची तिच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा होती. त्यांच्या ऑफिसमधल्या शिपायाच्या मुलाला नव्व्याण्णव टक्के मिळाले आहेत त्यामुळं त्याना ते कमी वाटले ‘

मी पटकन तिच्या खोलीजवळ जाऊन तिला हाक मारली. माझा आवाज ऐकताच तिनं दार उघडलं.रडूनरडून तिचे डोळे लाल झाले होते.

‘रमा, तुझे मार्कस चांगले आहेत मी तुला बक्षीसही देणार आहे’

मी असं म्हणताच रमा पटकन माझ्या गळ्यात पडून रडू लागली. थोडावेळ मी तिला रडू दिलं ती शांत होताच मी म्हणाले,

‘इतकं वाईट वाटून घ्यायचं नाही. तू लहान असल्यापासून तुझी हुशारी मी बघत आहे आणि मार्कसही वाईट नाहीत’

पण बाबा..’

‘मी सांगते बाबांना, तुझ्यामुळं तुझी आईही.. जा तोंड धू. दोघी जेवा. संध्याकाळी तुझे बाबा आल्यावर मी तुझे बक्षीस घेऊन येते’ रमाची समजूत काढून मी घरी आले पण रमाचेच विचार मनात होते.

रमा सर्व क्षेत्रात हुशार! शाळेतील सर्वांगीण विकासाचे बक्षीसही तिला मिळाले होते पण हल्ली मुलांच्याऐवजी मुलांच्या पालकांच्याच आपल्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहे. मुलांची आवड, कुवत याचा विचारच केला जात नाही. दहावीत असतानाही स्वतःच्या इच्छेने रमाने वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेतला होता, नंबरही मिळवले होते. ती केवळ पुस्तकातला किडा नव्हती. याचा विचार न करता  तिच्या वडालांनी कमी मार्क मिळाले म्हणून दुखवले होते. हे मलाही पटले नाही. दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचे सर्वस्व नाही.पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी ते पुरेसे होते.शिपायाच्या मुलाचे मार्क नक्कीच कौतुकास्पद पण याचा अर्थ रमाचे मार्कस कौतुकास्पद नाहीत असे होत नाही. उलट अशा पालकांनी आपल्या मुलांचे अधिक कौतुक करून त्याना प्रोत्साहन दिले पाहिजे आताच्या काळात पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरीने इतर कलांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून आपल्या अपेक्षेपेक्षा मुलांची आवड महत्त्वाची समजून त्याना जे हवे ते द्यावे प्रत्येकवेळा आमच्यावेळी असे नव्हते म्हणून मुलांना नाराज करू नये. या विस्तारलेल्या जगात त्याना त्यांच्या पंखानी उडू द्यावे

© सुश्री अनुराधा फाटक

मोबाइल – 9011058658

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवण : मोठी माणसं – प्रा. तुकाराम पाटील

☆ मनमंजुषेतून : आठवण : मोठी माणसं – प्रा. तुकाराम पाटील ☆

मनोहर शेरकर ९८च्या एम.पी.एस.सी.चा बेस्ट कंॅडिडेट.लगेचच पी.एस.आय बनला.आज तो खात्याच कर्तबगार आफिसर म्हणून  गाजतो आहे .वर्षा पूर्वीच तो बदलून इथे आला. आपल्या चोख कामगिरीने इथले बिघडलेले वातावरण नियंत्रणा खाली  आणले. आता सारा परिसर योग्य बंदोबस्तात सुरळीत झाला आहे .याही भागात कोरोना आला आणि पाठलाग करत आले लाॅकडाऊन.सगळ वातावरण तंग. जबर बंदोबस्त ठेवूनही मोकाट फिरणा-या टवाळखोरासाठी परिसरात सातत्यान दिवसरात्र गस्त घालावी लागत होती.लोक दारापर्यंत आलेल्या मरणालाही गांभिर्यान घेत नाहीत याची त्याला प्रचंड चीड आली होती.मग मात्र आदेश न पाळणारावर तो नाईलाजान कठोर कारवाई करत होता .उगाचच फिरणाराना दंडुक्याचा चांगलाच प्रसाद देत होता. त्याचा नाईलाज होता पण आता फिरणाराना याच भाषेत सांगाव लागत होत.

सकाळचे दहा वाजले असतील.मनोहरणे तीन शिपाई बरोबर घेतले.जीप स्टार्ट केली आणि  मेन चौकात येवून तो थांबला. दोन पोर बुलेट उडवत आली त्याना मनोहरन थांबवल .विचारपूस केली .पोरांची उडवाउडवीची उत्तर मिळताच त्याना दंडुके लगवून घरी पिटाळल.मग त्याच लक्ष दुकानांच्या रांगेकड गेल.सगळ्या दुकानांची दार बंद होती.पण कोप-यातल्या एका दुकानाच शटर उघड होत .एक म्हातारी खुर्ची टाकून दारात बसलेली दिसली त्याला.त्याचा पारा चढला. तो तणतणत त्या म्हातारी जवळ गेला .म्हणाला

“कशाला उघडं ठेवलय दुकान.सगळी दुकान बंद आहेत .तुझच तेवढ उघड कशाला ठेवलयस.”

म्हातारी गोंधळली. तिला कहीच बोलता येइना. तोवर मनोहर दुकानात गेला. ते दुकान नव्हत हे त्याच्या लक्षात आल. मग तो म्हातारीची विचारपुस करत ह्मणाला

“आजी कशाला शटर उघडून बसलाय. ते बंदकरून घ्या आधी नहीतर शिपाई येवून तुम्हाला त्रास देतील दुकानआहे अस समजून”. मग म्हातारी पडेल आवाजात म्हणाली

“साहेब  शटर बंदच होत इतकावेळ पण माझा म्हातारा म्हणाला उघड शटर लय उकाडा हाय, जीवाची तलकी व्हायला लागलीया. म्हणून उघडलय आत्ताच.”

“कुठ आहे  म्हातारा”

“आत बाजेवरवर पडलाय”

मनोहर आतल्या खोलीत गेला. म्हातारा टावेलान वार घेत बाजेवर बसला होता. मनोहरन बारीक नजरेन खोलीची पहाणी केली. त्या दोघाची हालत त्याच्या लक्षात आली. मनोहरन सहज विचारल.

कुणी पोरबाळ दिसत न्हाईत. म्हातारा हासत म्हणाला.”एकच पोरगा हाय. त्यो मिलिटरीत हाय.आम्ही नवरा बायको  दोघच असतो हितं.”

मनोहरला खूप काही कळून चुकल. तेवढ्यात म्हातारी  म्हणाली.” घरातल्या खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू  कालच संपल्या.सकाळपसन काहीच नाही खायाला.सगळच बंद हाय कुठन काय आणाव काय कळना झालया.कस दिवस काढायच पुढच?”

मनोहर हे ऐकून लगेच बाहेर पडला.त्यान एका शिपायाला बोलावल.आपल्या जवळचे दोन हजर रूपये शिपायाच्या हातावर ठेवत तो म्हणाला.”जा पेठेत तुमच्या ओळखीच्या दुकानदाराकडून घरात लागणार वाणसामान लगेच घेवून या. तुम्ही येई पर्यंत मी आहे  इथेच.”

शिपाई  तातडीने गेला साहित्य घेवून लगेच परत आला .मनोहरने आणखी हजार रूपये शिपायाला दिले.आणि म्हणाला “हे त्या आजीला देवून या.” शिपाई गेला .त्याने सामान खाली  ठेवले आजीच्या हातावर हजार रुपये ठेवत तो म्हणाला.”आमच्या साहेबानी दिलेत” ‘शिपाई  आला मनोहरने जीप स्टेशनकडे पळवली. म्हतारा म्हातारी भरल्या डोळ्यनी एका मेकाकडे नुसती पहातच बसली.

दुसरा दिवस उजाडला

म्हातारीने पुन्हा शटर खोलले आणि ती दोघ पायरीवर बसून साहेबाची वाट बघू लागली. दहाच्या सुमारास जीप आली. थांबली. मनोहरला उतरलेला पाहून म्हातारा म्हातारी साहेब  साहेब करून हाका मारू लागले.मग मनोहर नाइलाजानेच त्यांच्या जवळ  गेला .म्हातारी म्हणाली “बाळा फार उपकार झाले  तुझे .हे बघ आता तू आमच ऐक .तू दिलेल वाणसामान आमच्या गरजेच हाय. तेवढ घेतो  आम्ही. पण हे पैसे नकोत. हे तू परत घे. आणि  आमच्या सारख्या गरजूला यातन मदत कर. देव तुला उदंड यश देवो.” आता आश्चर्य करायची पाळी  मनोहरची होती.त्याला वाटल जगात गरिबालाही माणूसकीची कणव जोपासता येते . मीच फार मोठा नही कुणी. माझ्या माझ्या पेक्षाही खूप मोठ्या मनाची माणस आहेत समाजात. जपल पाहिजे त्याना. नाहीतर वाळवंटच होईल सा-या जगण्याच.

© श्री तुकाराम पाटील

चिंचवड पुणे ३३

मो .९०७५६३४८२४

२/८/२०

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग – लघुकथा ☆ तिरंगा – सुश्री मीरा जैन – अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

सुश्री मीरा जैन 

☆ जीवनरंग : लघुकथा – तिरंगा ☆

त्या प्रौढ बाईच्या, वैजूच्या टोपलीत, दोन तासातच नोटांचा ढीग लागला. तिला कुणालाच काही सांगावं लागलं नाही की तिने कुणाची विनवणी पण केली नाही. तिच्या टोपलीत छोटे छोटे तिरंगी झेंडे होते. त्याच्याजवळ तिने एक पाटी लावली होती. त्यावर लिहिलेलं होतं, ‘तिरंगा विकू शकेल, अशी कुणाचीच हिम्मत नाही आणि तो विकत घेता येईल, अशी ताकदही कुणाची नाही. हा तिरंगा सगळ्या देशाचा रक्षणकर्ता आहे. त्याच्या राज्यात कोण, कसा उपाशी राहील? तो आज तत्परतेने माझ्याजवळ उभा आहे. आपण हा सन्मानपूर्वक घेऊन जा आणि स्वेच्छेने आपल्याला जे द्यायचं असेल, ते द्या.’

© मीरा जैन

उज्जैन, मध्यप्रदेश

मूळ कथा – मीरा जैन    अनुवाद – उज्ज्वला केळकर 

Please share your Post !

Shares

हिन्दी/मराठी साहित्य – लघुकथा ☆ साप्ताहिक स्तम्भ – जीवन रंग #5 ☆ सुश्री वसुधा गाडगिल की हिन्दी लघुकथा ‘स्नेहरस’ एवं मराठी भावानुवाद ☆ श्रीमति उज्ज्वला केळकर

श्रीमति उज्ज्वला केळकर

(सुप्रसिद्ध वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उज्ज्वला केळकर जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आपके कई साहित्य का हिन्दी अनुवाद भी हुआ है। इसके अतिरिक्त आपने कुछ हिंदी साहित्य का मराठी अनुवाद भी किया है। आप कई पुरस्कारों/अलंकारणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी अब तक 60 से अधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं जिनमें बाल वाङ्गमय -30 से अधिक, कथा संग्रह – 4, कविता संग्रह-2, संकीर्ण -2 ( मराठी )।  इनके अतिरिक्त  हिंदी से अनुवादित कथा संग्रह – 16, उपन्यास – 6,  लघुकथा संग्रह – 6, तत्वज्ञान पर – 6 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  

आज प्रस्तुत है  सर्वप्रथम सुश्री वसुधा गाडगिल जी की  मूल हिंदी लघुकथा  ‘स्नेहरस ’ एवं  तत्पश्चात श्रीमति उज्ज्वला केळकर जी  द्वारा मराठी भावानुवाद  ‘स्नेहरस

☆ साप्ताहिक स्तम्भ – जीवन रंग #5 ☆ 

सुश्री वसुधा गाडगिल

(सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार सुश्री वसुधा गाडगिल जी का ई- अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है । पूर्व प्राध्यापक (हिन्दी साहित्य), महर्षि वेद विज्ञान कला एवं वाणिज्य महाविद्यालय, जबलपुर, मध्य प्रदेश. कविता, कहानी, लघुकथा, आलेख, यात्रा – वृत्तांत, संस्मरण, जीवनी, हिन्दी- मराठी भाषानुवाद । सामाजिक, पारिवारिक, राजनैतिक, भाषा तथा पर्यावरण पर रचना कर्म। विदेशों में हिन्दी भाषा के प्रचार – प्रसार के लिये एकल स्तर पर प्रयत्नशील। अखिल भारतीय साहित्य सम्मेलनों में सहभागिता, विभिन्न पत्र-पत्रिकाओं ,आकाशवाणी , दैनिक समाचार पत्रों में रचनाएं प्रकाशित। हिन्दी एकल लघुकथा संग्रह ” साझामन ” प्रकाशित। पंचतत्वों में जलतत्व पर “धारा”, साझा संग्रह प्रकाशित। प्रमुख साझा संकलन “कृति-आकृति” तथा “शिखर पर बैठकर” में लघुकथाएं प्रकाशित , “भाषा सखी”.उपक्रम में हिन्दी से मराठी अनुवाद में सहभागिता। मनुमुक्त मानव मेमोरियल ट्रस्ट, नारनौल (हरियाणा ) द्वारा “डॉ. मनुमुक्त मानव लघुकथा गौरव सम्मान”, लघुकथा शोध केन्द्र , भोपाल द्वारा  दिल्ली अधिवेशन में “लघुकथा श्री” सम्मान । वर्तमान में स्वतंत्र लेखन। )

☆ स्नेहरस 

कॉलोनी की दूसरी गली में बड़े से प्लॉट पर बहुमंज़िला इमारत बन रही थी। प्लॉट के एक ओर ईंटों की चारदीवारी बनाकर चौकीदार ने पत्नी के साथ छोटी – सी गृहस्थी बसाई थी। चारदीवारी में कुल जमा चार बर्तनों की रसोई भी थी। वहीं बगल से मिश्रा चाची शाम की सैर से लौट रही थीं। उनकी वक्र दृष्टि दीवार पर ठहर गई ! ईंटों के बीच स्वमेव बने  छेदों से धुंआँ निकल रहा था। धुंआँ देख मिश्रा चाची टाट के फटे पर्दे को खींचकर तनतनायीं

“कैसा खाना बनाती है ! पार्किंग में धुँआँ फैल जाता है  तड़के की गंध फैलती है सो अलग ! हें…”

पति की थाली में कटोरी में दाल परोसती चौकीदार की पत्नी के हाथ एक पल के लिये रूक गये फिर कटोरी में दाल परोसकर थाली लेकर मिश्रा चाची के करीब आकर वह प्रेमभाव से बोली

“आओ ना मैडमजी, चख कर तो देखो !”

गुस्से से लाल – पीली हुई मिश्रा चाची ने  चौकीदारीन को तरेरकर देखा । दड़बेनुमा कमरे में फैली महक से अचानक मिश्राचाची की नासिका फूलने लगी और रसना  ललचा उठी !उन्होंने थाली में रखी कटोरी मुँह को लगा ली। दाल चखते हुए बोलीं

“सुन , मेरे घर खाना बनाएगी ?”

चौकीदारीन के मन का स्नेह आँखों और हाथों के रास्ते  मिश्रा चाची के दिल तक पहुँच चुका था!

 

– डॉ. वसुधा गाडगीळ , इंदौर.© वसुधा गाडगिल

संपर्क –  डॉ. वसुधा गाडगिल  , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.

❃❃❃❃❃❃

☆ स्नेहरस 

(मूल कथा – स्नेहरस मूल लेखिका – डॉ. वसुधा गाडगीळ अनुवाद – उज्ज्वला केळकर)

कॉलनीच्या दुसर्‍या गल्लीत मोठ्या प्लॉटवर एक बहुमजली इमारत होत होती. प्लॉटच्या एका बाजूला विटांच्या चार भिंती  बनवून चौकीदाराने आपल्या पत्नीसमवेत छोटासा संसार मांडला होता. चार भिंतीत एकूण चार भांडी असलेलं स्वैपाकघरही होतं. मिश्रा आंटी आपलं संध्याकाळचं फिरणं संपवून त्याच्या शेजारून चालली होती. विटांच्यामध्ये आपोआप पडलेल्या भेगातून धूर बाहेर येत होता. मिश्रा आंटी आपलं संध्याकाळचं फिरणं संपवून त्याच्या शेजारून चालली होती. धूर बघून मिश्रा आंटीनं तरटाचा फाटका पडदा खेचला आणि तणतणत म्हणाली,

‘कसा स्वैपाक करतेयस ग! पार्किंगमध्ये सगळा धूरच धूर झालाय. फोडणीचा वास पसरलाय, ते वेगळच. पतीच्या थाळीतील वाटीत डाळ वाढता वाढता तिचा हात एकदम थबकला. मग वाटीत डाळ घालून ती थाळीत ठेवत ती मिश्रा काकीच्या जवळ आली आणि प्रेमाने म्हणाली, ‘या ना मॅडम, जरा चाखून तर बघा.

रागाने लाल – पिवळी झालेली मिश्रा काकी तिच्याकडे टवकारून बघू लागली. त्या डबकेवजा खोलीत पसरलेल्या डाळीच्या सुगंधाने अचानक मिश्रा काकीच्या नाकपुड्या फुलू लागल्या. जिभेला पाणी सुटलं. तिने थाळीतली वाटी तोंडाला लावली. डाळीचा स्वाद घेत ती म्हणाली,

‘काय ग, उद्यापासून माझ्या घरी स्वैपाकाला येशील?

चौकीदारणीच्या मनाचा स्नेह, डोळे आणि हातांच्या रस्त्याने मिश्रा काकीच्या हृदयापर्यंत पोचला होता.

 

© श्रीमति उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे # 40 – रेल्वेत भेटलेली मस्त मैत्रीण ! ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी  का एक विस्मरणीय संस्मरण   “रेल्वेत भेटलेली मस्त मैत्रीण  !”।  उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है।  ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )

☆ केल्याने होतं आहे रे # 40 ☆

☆ रेल्वेत भेटलेली मस्त मैत्रीण  ! ☆ 

साधारण पंचवीस वर्षांपूर्वीची घटना…..

सातारा रेल्वे स्टेशनवर बंगलोरला निघालो होतो.कोरेगाव गेलं रहिमतपूर स्टेशन आलं तशी एक साधारण पस्तीशीची एक खेडवळ बाई डोक्यावर पिशवी  हातात ट्रंक घेऊन चढायचा प्रयत्न करत होती दोन्ही हात सामानाला गुंतलेले ..

मग काय..ती म्हणाली ” काय बया पायऱ्या तरी केल्यात्या ..रेल्वेवाल्यांनला इवढं सारीक कळत न्हाय..आवं बाया मानसास्नी चढाय तरी याया पायजेल का नगं .! ”

बहुधा ती पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास करत असावी.

मी दाराशी जाऊन तिच्या डोक्यावरची पिशवी उचलून घेतली त्यामुळं तिचा उजवा हात मोकळा झाला मग त्या हाताच्या आधारानं ती डब्यात आली.अन् दाणकन् तो  दणकट देह समोरच्याच रिकाम्या बर्थवर दिला झोकून .म्हणाली ” ” ”  कित्ती येळ वाट पहातिया पन् गाडी म्हनून येळवर यील ती रेल्वी कसली वं…  नंनंदेच  घर टेसनापस्न जवळच हाय तवा ऐकू यत समदं..आज आमकी  गाडी दोन तास उशीराने धावत आहे.

….अवं . कसलं काय आन् फाटक्यात पाय.

..”!

” कुठं चाललाय..?

” आवं सांगलीच्या तितं आमचं गाव हाय……..”

पण तुम्ही तर आता इथं रहिमतपुरला गाडीत चढलात..?

आवं हितं माजी ननंद ऱ्हातीया म्हनलं आलोया हिकडं तवा जावांवं भिटून तिला…”

” आवं मंबईला गेलती भनीकडं .लयी दीस बलवत हुती भन म्हनलं जावावं .. मंबई बगाव..”

गेली बया पन् कसलं काय आन् शेनात पाय….!”

गेली तितं तर बया भराभरा डोक्यावर फिरतंय …..म्हनंलं ” हे गं काय? त म्हन्ती ” अगं हितं लयी गरम हुत असतं तवा पंखा लावायलाच लागतोया.

म्हनलं “. बरं हाय बया आमच्या गावाकडं कसं समदं मोकळं  ढाकळं .घरात बसा भायेर बसा कसलं भन्नाट येतया वारं……! … “कसली बया तुझी मंबई साधं वारं सुदिक पंक्यानं आन् ती बी  इकात  घियाचं…”!

तिला म्हटलं .. तुमच्या घरी पंखा नाही.. कां…?”

तशी ती ..”छ्या बया आमच्या खेड्यागावात  कशाला पायज्येल ह्यो पंका न् बिंका…! मस्त वारं सुटतया बघा….आन् त्ये बी फुकाट……”!

” आवं त्या आमच्या मंबईच्या भनीकडं सक्काळी उटले आपली बगते तर कुट्ट्ं म्हनून मोकळी जागा न्हाई ..आवं सक्काळी सक्काळी मानसाला जायाला व्हंवं कां नगं..सांगा बरं…?

नुसतीच म्हनत्यात मंबई लयी.ऽऽ…म्होट्टी….”.!”

तशी भनीन मला न्हेलं दरवाजा उगाडला न् म्हनली  “जा हितं….!..आन् बघते तं काय  तितं पादुका !…अग बया…?

पयला नमस्कार क्येला बघा ! म्हनलं देवा परवास समदा ब्येस झाला बग…तुज्या कुरपेनं…”!

तशी भन आली म्हनली ,

“अगं ताई हे काय देवळ न्हाई ह्याला संडास म्हणत्यात.सकाळी हितंच जायाचं असतया जा….. !”

म्या श्याप सांगितलं.. म्हनलं ,” म्या न्हाई बया पादुकावर पाय ठिऊन पाप डोक्यावं घ्यियाची…….!”मंग काय..?

आवं तिनं घेतलं की भायेरनं दार लावून ……न् मी  आत..हुबी….”!

कसंबसं दोन दीस काडलं बया मंबईत  न् आले बया परत.प्वाॅट लयी गच्चं झाल्यालं मंग  यस्टीनं हितंआली…”..!

आमच्या गावाला जायाला लयी येळ लागल म्हून हितं नंनंद ऱ्हाती तिच्याकडं ग्येले तितं काय म्हनत्यात ते नाटकात ते ” होल वावर इज आवर …” .! तितं ग्येले बया खळाखळा एकदा प्वाॅट रितं झालं तवा बरं वाटलं बगा….”!

विक्रेत्याच्या सामोस्यांच्या  खमंगवासाने आमची भूकही चाळवली.आम्ही सामोसे घेतले तिला म्हटलं घ्या   गरम गरम .”.. !

” नग बया , माज्या नंदनं दिलीयाकी मला डाळकांदा भाकर बांदून…मी खाईन नंतरनं…..तुम्ही खावा…!”

पण नंतर बहुधा सामोशाच्या वासानं तिलाही खावंसं वाटलं असावं मग म्हणाली…

” ये…..पोऱ्या बगु वाईच एकांदा…लयी नगं… वास ब्येष्ट येतुया…म्हनून……”!

आणि तिनंही एक घेतला चव मस्त लागतीय  म्हणल्यावर आणखी दोन खाल्ले. म्हणाली ” आता बास झालं बया.दुपारच्या जेवणाची बेगमीच झाली बगा….”!

तिचं तोंड खाण्यात गुंतल्यामुळं तेवढाच  आमच्या श्रवणेंद्रियांना विश्राम मिळाला.आम्हालाही जरा डुलकी यायला लागली…थोडा वेळ शांततेत गेला.जरा बरं वाटलं.

तिनं विचारलं..” ताई कुटं जाऊ लयी लागलीया..”

मी खुणेनेच दाखवलं तशी…

ती गेली दार उघडलन् …. ओरडली अगं बया ..ऽऽ…ऽ. हितंबी पादुका…ऽऽ…. !”

तेवढ्यात गाडी एका छोट्याशा स्टेशनवर थांबली तशी ती डब्याच्या दाराकडं धावली अन् म्हणाली ……

“आवं जरा.. ….कंडाक्टरला म्हनावं आलेचं. बरं कां………”!. असं म्हणत आम्ही काही सांगण्याच्या आधीच ती उतरुन धूम चकाट……….!

 

©️®️उर्मिला इंगळे

सातारा

दिनांक:-१२-७-२०

!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!

Please share your Post !

Shares

हिन्दी/मराठी साहित्य – लघुकथा ☆ डॉ लता अग्रवाल की हिन्दी लघुकथा ‘अर्धांगिनी’ एवं मराठी भावानुवाद ☆ श्रीमति उज्ज्वला केळकर

श्रीमति उज्ज्वला केळकर

(सुप्रसिद्ध वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उज्ज्वला केळकर जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आपके कई साहित्य का हिन्दी अनुवाद भी हुआ है। इसके अतिरिक्त आपने कुछ हिंदी साहित्य का मराठी अनुवाद भी किया है। आप कई पुरस्कारों/अलंकारणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी अब तक 60 से अधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं जिनमें बाल वाङ्गमय -30 से अधिक, कथा संग्रह – 4, कविता संग्रह-2, संकीर्ण -2 ( मराठी )।  इनके अतिरिक्त  हिंदी से अनुवादित कथा संग्रह – 16, उपन्यास – 6,  लघुकथा संग्रह – 6, तत्वज्ञान पर – 6 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं। )

आज प्रस्तुत है  सर्वप्रथम डॉ लता अग्रवाल जी  की  मूल हिंदी लघुकथा  ‘अर्धांगिनी’ एवं  तत्पश्चात श्रीमति उज्ज्वला केळकर जी  द्वारा मराठी भावानुवाद ‘अर्धांगिनी

❃❃❃❃❃❃❃❃❃❃

डॉ लता अग्रवाल

(सुप्रसिद्ध हिंदी वरिष्ठ साहित्यकार  एवं शिक्षाविद डॉ लता अग्रवाल जी का ई- अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है । आप महाविद्यालय में प्राचार्य पद  पर सेवारत हैं । प्रकाशन शिक्षा पर – 16 पुस्तकें, कविता संग्रह –4,  बाल साहित्य – 5, कहानी संग्रह – 2, लघुकथा संग्रह – 5, साक्षात्कार संग्रह –1, उपन्यास – 1, समीक्षा – 3, लघुरूपक – 18 । पिछले 10 वर्षों से आकाशवाणी एवं दूरदर्शन पर संचालन, कहानी तथा कविताओं का प्रसारण, राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पत्रिका में रचनाएँ प्रकाशित | )

☆ अर्धांगिनी 

“अच्छा ! माँ –बाबा ! मैं चलता हूँ।”

“कितनी बार कहा है चलता हूँ नहीं आता हूँ कहते हैं बेटा।” मां ने गंभीर चेहरे पर बनावटी शिकायत का भाव लाते हुए कहा।

“ओह हां ! आता हूं माँ –बाबा।” अभी 8 ही दिन हुए हैं अवधेश के विवाह को, पूरे 1 माह की छुट्टी लेकर आया था, विवाह के पश्चात पत्नी को कहीं मनोरम स्थान पर घुमाने ले जायेगा …दोनों एक दूसरे के मन के भाव जानेंगे, मगर अटारी बॉर्डर पर हुए सैनिक हमले में कई सैनिक मारे गए अतः हेड ऑफिस से कॉल आया,

‘लेफ्टिनेंट अवधेश ! इमीजियेट ज्वाइन योर ड्यूटी।’ आदेश पाते हैं अवधेश ने जब अपनी नवविवाहित पत्नी से सकुचाते हुए कहा,

“सीमा ! हेड क्वार्टर से बुलावा आया है मुझे अर्जेंट ही जाना होगा।”

“क्या कल ही चले जायेंगे ?”

“हां ! अलसुबह निकलना होगा।”

“कुछ दिन और नहीं रुक सकते।” सीमा ने आत्मीय भाव से पूछा।

“नहीं सीमा उधर बॉर्डर पर मेरी आवश्यकता है …मेरा इंतजार हो रहा होगा। पता नहीं मेरे कौन-कौन साथी …।” अपने अनजाने खोये साथियों के शोक की कल्पना में अवधेश के स्वर डूब गये।

“फिर कब लौटना होगा ?”

“कह नहीं सकता …जब तक सीमा पर शांति बहाल ना हो या …शायद ……।”

“बस आगे कुछ मत कहिए, अच्छा सोचिये सब शुभ होगा।” सीमा ने पति के होठों पर प्यार से उंगली रखते हुए कहा।

“मैं जानता हूँ सीमा यह सप्ताह तुम्हारा रीति रिवाजों की औपचारिकता और मेहमान नवाजी के बीच बीत गया और अब हमें अपना हनीमून भी कैंसिल करना होगा मैं तुम्हें कुछ नहीं दे पाया उल्टे अब घर की मां -बाबा की देखभाल भी तुम्हें सौंपे जा रहा हूं। ” अवधेश ने सीमा को सीने से लगाते हुए कहा।

“आप चिंता मत कीजिए जी, हम सैनिकों की पत्नियों को ईश्वर अतिरिक्त साहस और धैर्य देकर भेजता है। आप निश्चिंत रहें आपके लौटने तक मैं मां -बाबा का पूरा ख्याल रखूंगी और आपका इंतजार करूंगी।” पत्नी ने अवधेश के मन का बोझ उतार दिया। अत: आज जाते हुए अवधेश स्वयं को  हल्का महसूस कर रहा था अपना प्रतिनिधि मां -बाबा की सेवा के लिए जो छोड़े जा रहा था। जाते हुए घर के बाहर गांव के कई लोग जमा थे बुजुर्ग कह रहे थे,

‘गांव के अपने इस लाड़ले पर हमें नाज है।’ युवा, बच्चे सभी अवधेश को सैल्यूट देते हुए,

‘जय हिन्द अवधेश भैय्या’ कह रहे थे।  दूर दहलीज पर पर्दे की ओट में खड़ी सीमा की ओर देखते हुए आंखों में कृतज्ञता का भाव लिए अवधेश ने एक जोरदार सैल्यूट दिया,

‘थैंक्स अर्धांगिनी, सही मायने में सैनिक तो तुम हो जो अपने जीवन के अमूल्य पल हंसते- हंसते हम पर कुर्बान कर देती हो।’ भाव सीमा तक पहुंच गये थे, उसके मुट्ठी के कसाव ने पर्दे  को जोर से भींच लिया ।

© डॉ लता अग्रवाल

भोपाल, मध्यप्रदेश मो – ९९२६४८१८७८

❃❃❃❃❃❃❃❃❃❃

☆ अर्धांगिनी 

(मूळ  रचना –  डॉ लता अग्रवाल भोपाल  अनुवाद – उज्ज्वला केळकर  )

 ‘अच्छा! आई-बाबा मी जातो.’

‘किती वेळा सांगितलं, जातो, नाही येतो, म्हणावं रे!’ आई गंभीर चेहर्‍याने  खोट्या तक्रारीच्या सुरात म्हणाली.

‘ओह! येतो!’

अवधेशाच्या विवाहाला अद्याप आठ दिवससुद्धा झाले नव्हते. चांगली एक महिन्याची सुट्टी घेऊन आला होता तो. विवाहानंतर पत्नीला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी तो घेऊन जाणार होता. दोघांना एकमेकांच्या मनातले भाव नीटपणे जाणून घेता येतील. पण अटारी बॉर्डरवर सैनिकांवर आक्रमण झाले. अनेक सैनिक मारले गेले. हेड ऑफिसमधून त्याला कॉल आला, ’लेफ्टनंट अवधेश, ताबडतोब तुमच्या ड्यूटीवर हजार व्हा.’ आदेश मिळताच अवधेश आपल्या नवपरिणीत पत्नीला संकोचत म्हणाला, ‘सीमा, हेडक्वार्टरवरून आदेश आलाय, मला लगेचच निघायला हवं!’

‘उद्याच निघणार?’

‘हो! उद्या पहाटेच निघायला हवं’

‘आणखी काही दिवस नाही थांबू शकणार?’ सीमानं आत्मीयतेने विचारलं .

‘नाही सीमा, तिकडे बॉर्डरवर माझी वाट बघत असतील. कुणास ठाऊक माझे कोण कोण साथी…’ आपल्या अज्ञात हरवलेल्या साथिदारांच्या शोकाच्या कल्पनेने अवधेशचा स्वर भिजून गेला.

‘परत कधी येणं होईल?’

‘काही सांगता येत नाही. जोपर्यंत सीमेवर शांतीचा वातावरण… किंवा मग…’

‘बस… बस .. पुढे काही बोलू नका. चांगला विचार करा. सगळं शुभ होईल. सीमा पतीच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली.’

‘सीमा, हा आठवडा रीती-रिवाजांची औपचारिकता आणि पाहुण्यांचे आदरसत्कार करण्यात निघून गेला॰ आता तर आपल्याला आपला हनीमूनही कॅन्सल करावा लागतोय. मी तुला काहीच देऊ शकलो नाही. उलट आई-बाबांना सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवून चाललोय.’ सीमाला छातीशी कवटाळत अवधेश म्हणाला.

‘आपण काळजी करू नका. आम्हा सैनिकांच्या पत्नींना ईश्वर अतिरिक्त साहस आणि धैर्य देऊन पाठवत असतो. आपण निश्चिंत रहा. आपण येईपर्यंत आई-बाबांची मी नीट काळजी घेईन आणि आपली वाट पाहीन.’ सीमाने अवधेशच्या मनावर असलेला भार  हलका केला. त्यामुळे आज घरातून बाहेर पडताना अवधेशला अगदी हलकं हलकं वाटत होतं॰ आपल्या आई-बाबांची सेवा करण्यासाठी तो आपला प्रतिनिधी मागे ठेवून जात होता. तो घराबाहेर पडला, तेव्हा बाहेर किती तरी लोक त्याला निरोप देण्यासाठी जमा झाले होते. ज्येष्ठ मंडळी म्हणत होती, ‘गावाच्या या लाडक्या मुलाचा आम्हाला अभिमान आहे.’ तरुण , मुले सगळे अवधेशला सॅल्यूट देत म्हणत होते, ‘जय हिंद अवधेशभैय्या!’ दूर उंबरठ्यावर पडद्याआड उभ्या असलेल्या सीमाकडे बघताना त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती. अवधेशने तिला एक जोरदार सॅल्यूट देत, तो डोळ्यांनीच म्हणाला , ‘थॅंक्स अर्धांगिनी खर्‍या अर्थाने तूच सैनिक आहेस. आपल्या जीवनातले अमूल्य क्षण तू हसत हसत आमच्यावरून ओवाळून टाकतेस.’

त्याच्या मनातले भाव सीमापर्यंत पोचले. तिच्या मुठीने पडद्याची कड घट्ट धरून ठेवली.

 

© श्रीमति उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares

हिन्दी/मराठी साहित्य – लघुकथा ☆ साप्ताहिक स्तम्भ – जीवन रंग #4 ☆ मराठी लघुकथा ‘पुतळा’ – हिन्दी भावानुवाद ☆ श्रीमति उज्ज्वला केळकर

श्रीमति उज्ज्वला केळकर

(सुप्रसिद्ध वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उज्ज्वला केळकर जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आपके कई साहित्य का हिन्दी अनुवाद भी हुआ है। इसके अतिरिक्त आपने कुछ हिंदी साहित्य का मराठी अनुवाद भी किया है। आप कई पुरस्कारों/अलंकारणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी अब तक 60 से अधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं जिनमें बाल वाङ्गमय -30 से अधिक, कथा संग्रह – 4, कविता संग्रह-2, संकीर्ण -2 ( मराठी )।  इनके अतिरिक्त  हिंदी से अनुवादित कथा संग्रह – 16, उपन्यास – 6,  लघुकथा संग्रह – 6, तत्वज्ञान पर – 6 पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  

आज प्रस्तुत है  श्रीमति उज्ज्वला केळकर जी  की मूल मराठी  लघुकथा  ‘पुतळा’ एवं  तत्पश्चात आपके ही द्वारा इस  लघुकथा का हिंदी अनुवाद  ।

☆ साप्ताहिक स्तम्भ – जीवन रंग #4 ☆ 

☆ पुतळा

 ‘साहेब…’

‘बोल….’

‘सरकारच्या प्रत्येक योजनेबद्दल, निर्णयाबद्दल टीका करणं, हीच आपली  पक्षीय नीति आहे. होय नं?’

‘बरं.. मग … ‘

‘मग त्या दिवशी आपण मुख्यमंत्रीजींच्या नव्या घोषणेचं स्वागत कसं केलत?

‘ मी? स्वागत केलं? कसली घोषणा ? कसलं स्वागत ?’

‘तीच घोषणा … नगराच्या मधोमध नेताजींचा पुतळा उभा करायची घोषणा … त्या दिवशी आपण म्हणाला होतात, सरकारच्या सगळ्या विधायक कार्यात आमचा पक्ष सहकार्य करेल. आपल्या दृष्टीने तर सरकारचं कुठलच कार्य विधायक नसतं. मग यावेळी सहकार्याची भाषा कशी काय?

‘अरे, मुर्खा, पुतळा उभा करायचा तर देणग्या गोळा करायला नकोत? ..’

‘हां… ते आहेच.’

‘त्या कामात आपण त्यांना मदत करू .’

‘पण का?’

‘तेव्हाच मग देणगीतील काही पैसा आपल्या तिजोरीत जमा होईल नं?

‘हूं … ‘

‘पुतळा उभा केल्यानंतर कधी-ना-कधी , कुणी-ना-कुणी त्या पुतळ्याची विटंबना करेल किंवा तिथे तोडफोड करेल…’

‘पण असं झालं नाही तर…’

‘ती व्यवस्थादेखील आपण करू. मग आंदोलन होईल. लूट –मार होईल. दंगे-धोपे होतील. तेव्हा मग आपली चांदीच चांदी॰…

 

©श्रीमति उज्ज्वला केळकर

❃❃❃❃❃❃

☆  प्रतिमा

(मराठी कथा – पुतळा   मूळ लेखिका – उज्ज्वला केळकर)

‘साहबजी…’

‘बोल…’

‘सरकार की हर योजना, निर्णय की आलोचना करना , यही हमारी पक्षीय नीति है. है नं?’

‘हं.. तो फिर… ‘

‘तो उस दिन आपने मुख्यमंत्रीजी की घोषणा का स्वागत कैसे किया?’

‘मै ने किया ?  कैसी घोषणा ? कैसा स्वागत ?’

‘वही … नगर के बीचों बीच उस नेताजी की प्रतिमा स्थापित करने की घोषणा … उस दिन आप ने कहा  था, सरकार के सभी विधायक कार्यों में हमारा पक्ष अपना सहयोग देगा. अपनी दृष्टि से तो सरकार का कोई भी कार्य विधायक हो ही नहीं सकता. तो फिर इस बार सहयोग की भाषा कैसी?

‘अरे, मूरख प्रतिमा बनानी है, तो चंदा इकठ्ठा करना ही पड़ेगा ..’

‘हां! सो तो है !’

‘इस काम में हम उन की मदद करेंगे.’

‘क्यों?’

‘तभी तो चंदे का कुछ हिस्सा अपनी तिजोरी में भी आ जाएगा नं?

‘हूं … ‘

‘प्रतिमा की स्थापना करने के बाद कभी – न – कभी , कोई –न – कोई उस की विडम्बना करेगा. उसे तोड भी सकता है.’

‘मगर ऐसा नहीं हुआ तो…’

‘तो उस की व्यवस्था भी हम करेंगे . तब आंदोलन होगा. लूट-मार होगी. दंगा-फसाद  होगा. तब तो समझो अपनी चांदी – ही – चांदी…’

 

© श्रीमति उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares
image_print