मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ☆ साने गुरूजी ☆

साने गुरूजी

? कवितेचा उत्सव ?

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ☆ साने गुरूजी ☆

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले

राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

 

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन

तिमिर घोर संहारिन, या बंधु सहाय्याला हो

 

हातात हात घालून, हृदयास हृदय जोडून

ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

 

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ

विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

 

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरूषार्थ

हे जीवन ना तरि  व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

 

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल

जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो

 

 – साने गुरुजी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 106 – दान मागते धरणी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 106 – दान मागते धरणी ☆

वृक्षवल्ली या फुलल्या सुंदर स्वर्ग भासते अवनी।

लाड पुरविण्या कुशीत घेई धरा नसे ही जननी।

 

अविरत शमवी क्षुधा तृषाही भरण पोषणा सजली।

अमृत रसमय फळे चाखण्या नित्य देतसे वदनी।

 

सोनेरी तव किरण भास्करा शेत शिवारी डुलती।

पहाट वारा मना भुलवितो शीतल छाया सदनी।

 

आनंदाची करण्या उधळण चंद्र चांदणे जमती।

नयन रंम्य  त्या सोनकिड्यांनी नयन मनोहर रजनी ।

 

निसर्गास या नकोस लावू नजर मानवा जहरी।

जीव चक्र हे अखंड फिरते वसुंधरेच्या भवनी ।

 

भू जल वायू टाळ प्रदूषण दान मागते धरणी।

स्वच्छंदाने खुशाल घेई उंच भरारी गगनी।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्य फाटले तेंव्हा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ आयुष्य फाटले तेंव्हा…   सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

आयुष्य फाटले तेंव्हा

शब्दाने शिवित गेले

जोडून शब्द मी तेंव्हा

कविता करीत गेले

 

मुडपून दुखऱ्या भागा

हळूवार घातली टिप

प्रत्येक टाक्यामागे

मूरे अश्रू आपोआप

 

ते जिथे फाटले जादा

त्या कधी सांधले नाही

रफुच्या छान टाक्यांनी

मी केली हो चतुराई

 

ठिगळाच्या तुकड्यांनी मी

त्या कधी लपवीले नाही

..काढून त्वचेची साल

मी दुख: झाकले  बाई.

 

आयुष्य वाटते आता

सुरेख तलमसे वस्त्र

आतुन टोचते काही

की  तडजोडीचे अस्त्र

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #128 – पैलतीरी… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 129 – विजय साहित्य ?

☆ पैलतीरी… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

पैलतीरी विठू 

कळे कर्मातून

वळे शब्दातून, 

पदोपदी. . . !

 

पैलतीरी भक्ती

काळजाची छाया

जपतोय माया, 

उराउरी. . . !

 

पैलतीरी भाव

नात्यांचे गणित

हातचे राखून,

सोडवितो. . . . !

 

पैलतीरी मोक्ष

संवादाचा नाद

टाळातोच वाद,

 अनाठायी. . . !

 

पैलतीरी संत

अनुभवी धडा

चुकांचाच पाढा,

वाचू नये. . . . !

 

पैलतीरी वारी

पिढ्यांचे संचित

होई संस्कारित, 

कृतीतून. . . . !

 

पैलतीरी मेळा

नाते भावनांचे

जाते वेदनांचे, 

भारवाही .. . . . !

 

पैलतीरी छंद

यशोकिर्ती ध्यास

कर्तव्याची  आस, 

लागलेली. . . . !

 

पैलतीरी हरी

सदा सालंकृत

शब्द  आलंकृत ,

 काव्यामाजी . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #112 – अष्टविनायक…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 112 – अष्टविनायक…! ☆

मोरगावी मोरेश्वर

होई यात्रेस आरंभ

अष्ट विनायक यात्रा

कृपा प्रसाद प्रारंभ….! १

 

गजमुख सिद्धटेक

सोंड उजवी शोभते

हिरे जडीत स्वयंभू

मूर्ती अंतरी ठसते….! २

 

बल्लाळेश्वराची मूर्ती

पाली गावचे भूषण

हिरे जडीत नेत्रांनी

करी भक्तांचे रक्षण….! ३

 

महाडचा विनायक

आहे दैवत कडक

सोंड उजवी तयाची

पाहू यात एकटक….! ४

 

थेऊरचा चिंतामणी

लाभे सौख्य समाधान

जणू चिरेबंदी वाडा

देई आशीर्वादी वाण…! ५

 

लेण्याद्रीचा गणपती

जणू निसर्ग कोंदण

रुप विलोभनीय ते

भक्ती भावाचे गोंदण….! ६

 

ओझरचा विघ्नेश्वर

नदिकाठी देवालय

 नवसाला पावणारा

देई भक्तांना अभय….! ७

 

महागणपती ख्याती

त्याचा अपार लौकिक

रांजणगावात वसे

मुर्ती तेज अलौकिक….! ८

 

अष्टविनायक असे

करी संकटांना दूर

अंतरात निनादतो

मोरयाचा एक सूर….! ९

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त – निसर्ग रक्षण ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त – निसर्ग रक्षण ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

पहिली माझी ओवी गं

निसर्गाचे रक्षण

झाडे, वेली जपुया

खत,पाणी देऊन…

 

दुसरी माझी ओवी गं

वसुंधरेला जपूया

मातीमधल्या अंकुराला

मायेचे शिंपण

 

तिसरी माझी ओवी गं

पाणीसाठा जपूया

नदी,विहीरीमधुनी

कचरा तो काढुया

 

चौथी माझी ओवी गं

पर्यावरणाचे राखण

प्लॅस्टिक चा वापर टाळून

प्राणीमात्रा जगवूया

 

पाचवी माझी ओवी गं

शेत मळे पिकवूया

पाऊस पाणी पडण्यासाठी

एक तरी झाड लावूया

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भाव वात्सल्याचा … ☆ श्री प्रमोद जोशी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  भाव वात्सल्याचा …  ?  श्री प्रमोद जोशी ☆

तिच्या डोक्यावर वीट,

झोळीमध्ये पांडुरंग!

त्याच्या नैवैद्याकारणे,

आई श्रमामधे दंग!

तिच्या येरझाऱ्यामधे,

चाले पंढरीची वारी!

तिचे बाळाशी अद्वैत,

तिला नको मुक्ती चारी!

तुळशीच्या जागी वीट,

आणि वहातुक दिंडी!

झोळीमधे पहा मूर्ती,

दारिद्र्यात राजबिंडी!

गंधफुलांजागी हिच्या,

नशिबात विटा,वाळू!

झोळी झालेली पाळणा,

झोक्यावीण झोपे बाळू!

दारिद्र्यात मातृत्वाला,

येते वेगळी चमक !

रडण्यावाचुनी बघे,

कुतुहल टकमक!

तिची अद्भूत चिकाटी,

त्यांचे बाल्य समंजस!

बघा,सजण्यावाचून,

किती दृश्य हे लोभस!

उन्हालाही स्वतेजाचा,

येतो मनोमनी रग!

त्याच्या इशाऱ्यावरुन,

येते झुळुकीला जाग!

भाव वात्सल्याचा कधी,

कसा असेल गरीब?

दशदिशा वणव्याच्या,

तिचे ऊर चिंबचिंब!

चित्र – अनामिक  

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पर्यावरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ पर्यावरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

जसं तान्ह्या बाळास पांघरूण,

तसं अवनीस घातले आवरण !

 

आतून उबदार, बाहेर देखणे,

निसर्गाचे ल्यायले तिने लेणे !

 

सृजन निर्मिती करीतसे धरा,

सिंचन तिला पावसाचे करा!

 

माती पाण्याच्या संगतीत,

हिरवी रोपे भूवर तरतात!

 

जगवते ती प्राणिमात्रांना,

जाणीव ठेवा तिची मना!

 

सांभाळावी जीवापाड  तिला,

हानी न करावी भूतलाला!

 

पंचमहाभूतांची निर्मिती,

ईश्वरे केली प्राणीमात्रांसाठी!

 

जपू या पर्यावरणाला,

 उतराई होऊ या सृजन सृष्टीला!

 

जाणीव कायम मनात ठेवू,

पर्यावरणाला जपून राहू!

 

नाही पर्यावरणाचा एकच दिन,

साथ देऊ त्यास आपण रात्रंदिन!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 135 ☆ गाव आठवांचा एक… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 135 ?

☆ गाव आठवांचा एक… ☆

गाव आठवांचा एक

रोज स्वप्नात दिसतो

दिसे डोंगर साजिरा

सूर्य जाताना हसतो

 

सूर्य जाताना हसतो

पश्चिमाही लालेलाल

सांज सावळी होताना

वारा पुसे हालचाल

 

वारा पुसे हालचाल

वृक्ष वेली धुंदावती

आल्या गेल्या पाहुण्यांशी

चूली पेटत्या बोलती

 

चूली पेटत्या बोलती

येतो गंध भाकरीचा

बेत फक्कड असावा

वास छान ओळखीचा

 

 वास छान ओळखीचा

येते दाटून ही भूक

माय प्रेमाने वाढते

याला म्हणतात सुख

 

याला म्हणतात सुख

ओटी भरून घेतले

आणि गावाच्या बाहेर

    नवे शहर गाठले

 

नवे शहर गाठले

परी गाव खुणावते

त्या पाण्यात पाटाच्या

अनवाणी घोटाळते

 

अनवाणी घोटाळते

कधी बोरी बाभळीशी

सांगा विसरू कशी मी

 आहे नित्य हृदयाशी !

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ लिम्ब… शांता शेळके ☆ रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ लिम्ब… शांता शेळके ☆ रसग्रहण – श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ लिम्ब… शांता शेळके ☆

निळ्या निळ्या आकाशाची

पार्श्वभूमी चेतोहार

भव्य वृक्ष हा लिंबाचा

शोभतसे तिच्यावर

 

किती रम्य दिसे याचा

पर्णसंभार हिरवा

पाहताच तयाकडे

लाभे मनाला गारवा

 

बलशाली याचा बुंधा

फांद्या सुदीर्घ विशाला

भय दूर घालवून

स्थैर्य देतात चित्ताला

 

उग्र जरा परी गोड

गन्ध मोहरास याच्या

कटु मधुर भावना

जणु माझ्याच मनीच्या

 

टक लावून कितीदा

बघते मी याच्याकडे

सुखदुःख अंतरीचे

सर्व करीते उघडे!

 

माझ्या नयनांची भाषा

सारी कळते यालाही

मूक भाषेत आपुल्या

मज दिलासा तो देई

 

स्नेहभाव आम्हातील

नाही कुणा कळायाचे

ज्ञात आहे आम्हांलाच

मुग्ध नाते हे आमुचे !

– शांताबाई शेळके

☆ काव्यानंद – लिम्ब….शांताबाई शेळके ☆

शांताबाई शेळके यांच्या आत्मपर कवितांपैकी एक कविता–लिम्ब  (अर्थात  कडुलिम्ब!)

निसर्गाचा आणि मानवी मनाचा संबंध हा अनादी कालापासूनचा आहे.आपल्या आनंदाच्या उत्सवात माणूस निसर्गाला विसरलेला नाही आणि आपल्या दुःखाचा भार हलका करण्यासाठी निसर्गासारखा दुसरा मित्र नाही.’आपुलाच वाद आपणाशी’ हा सुद्धा निसर्गाच्या सहवासातच होतो.त्यामुळे शांताबाईंसारख्या कवयित्रीने निसर्गाशी साधलेली जवळीक आणि संवाद समजून घेण्यासारखा आहे.

‘लिम्ब’ ही  कविता वाचल्यावर प्रथमदर्शनी ती  निसर्ग कविता वाटते.असे वाटण्याचे कारण म्हणजे कवितेचे शिर्षक आणि पहिली तीन कडवी.पहिल्या तीन कडव्यात बाईंनी  लिंबाच्या झाडाचे फक्त वर्णन केले आहे.बलशाली बुंधा असलेला,विशाल फांद्या असलेला,त्याच्या पर्णसंभारामुळे मनाला गारवा देणारा,आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर पसरलेला हा भव्य वृक्ष मन आकर्षित करून घेणारा असा आहे.कुठे दिसला असेल हा वृक्ष त्यांना ? एखाद्या माळावर,प्रवासात,एखाद्या खेड्यात किंवा कदाचित अगदी घराजवळही.पण त्यांनी केलेले वर्णन हे इतके बोलके आहे की तो आपल्याला मात्र पुस्तकाच्या पानातून सहज भेटून जातो.पण कविता इथे संपत नाही तर इथे सुरू होते.कारण कुठेही सहजासहजी दिसणारा हा वृक्ष कवयित्रीचा सखा बनून जातो.

पुढच्या तीन कडव्यात त्या काय म्हणतात पहा.कडुलिम्बाच्या मोहोराला येणारा गंध गोडसर उग्र असा असतो.आपल्या मनातील भावनाही अशाच नाहीत का? थोड्या गोड तर थोड्या गोड.त्यामुळेच त्यांची आणि लिंबाची  मैत्री होते.आत्ममग्न अवस्थेत एकटक त्याच्याकडे बघत असताना,नकळतपणे आपल्या मनातील सुखदुःख  त्या वृक्षासमोर उघडे करत असतात.जितक्या नकळतपणे मैत्रिणिशी बोलावे तितक्या सहजपणे त्या वृक्षाशी मनातल्या मनात बोलत असतात.या एकटक बघण्यातूनच त्या वृक्षालाही त्यांच्या डोळ्यांची भाषा समजू लागली आहे आणि तोही आपल्या मूक भाषेतून त्यांच्याशी समजुतिचा संवाद साधत आहे.निसर्गाशी एकरूप होणं याशिवाय वेगळं काय असतं ?त्यामुळे ही मैत्री इतकी घट्ट झाली आहे की त्यांच्यातले मुग्ध नाते हे शब्दांच्या पलिकडले आहे आणि म्हणूनच ते इतरांना समजण्यासारखे नाही.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे तसा तो निसर्गप्रियही आहे.आपण निसर्गाशी जितकी जवळीक साधावी तितका तो आपलासा होऊन जातो.मग तोच आपला सुखदुःखातील भागीदार बनतो.आपली विमनस्क अवस्था दूर करायला मदत करतो.कवयित्रीच्या आत्ममग्नतेमुळे रसिकांना ,साध्या सोप्या भाषेतील पण उत्तम कविता वाचायला मिळाली आहे.लिम्बासारखीच गारवा देणारी आणि मन सदैव हिरवे गार

ठेवणारी!

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares