मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणेश विनवणी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ गणेश विनवणी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

विनवी तुजला श्री गणराया

अज्ञाना मम दूर कराया ||धृ||

 

चतुर्थीला रे पूजिती तुजला

श्री गणेशा पावसी सकला

चौदा विद्या, चौसष्ट कला

देशी तू‌ रे, तुज भक्ताला ||१||

 

गजानना रे मंगल कार्या

निमंत्रिती तुज पूर्ण कराया

हेरंबा रे प्रार्थिती तुजला

वरदहस्त हा द्यावा सकला ||२||

 

भावभक्तीचे पुष्प अर्पिण्या

अधीर जाहली अवघी‌ काया

मनोभावे वंदन तुजला

लोटांगण रे तुझिया पाया ||३||

 

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महालक्ष्मी माते ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

🌸 महालक्ष्मी माते… 🌸 सौ. विद्या वसंत पराडकर ☆

हे‌ त्रिभुवन सुंदरी माते

लक्ष,लक्ष प्रणाम तुज करते

 

जगाच्या पालन कर्त्या ची कांता तू ग

महालक्ष्मी म्हणून ओळख तुझी ग

 

भाद्रपद मासी सोडून आपले सासर

तीन दिवस जवळ केले माहेर

 

तव आगमने घरे दारे सजली

प्रसन्नता बघ मुखावर‌आली

 

नक्षत्रांचे दीप लावूनी अंबर बघ    सजले

मंगल तोरण नभोमडपी विविध रंगी रंगले

 

कोणती पैठणी तुज नेसवू ग

कोणत्या चोळीने तू खुलशी ग

 

पायी पैंजण रूणझुण रूणझुण

नथ खुलली सौंदर्य यौवन

 

जेष्ठा नक्षत्री पूजन करते

ललाट भाळी मळवट भरते

 

वाहू ‌तुजला पुष्पमाला ग

चमेली, चंपक, जाई जुई ग

 

सोळा पदार्थांचा नैवैद्य अर्पिते

भाव भक्ती ची निरांजन ओवाळीते

 

अलौकिक लावण्याने मंत्रमुग्ध होऊ या

दो हस्ताने प्रणाम करून या

 

तव चरण कमलाचा भ्रमर असे मी

तव पुनः दर्शनाची तृषार्त असे मी 

 

© सौ विद्या वसंत पराडकर

वारजे पुणे.

ई मेल- [email protected]

मो.नंबर – 91-9225337330 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मोरया रे – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – मोरया रे –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

-(षडाक्षरी)-

दरवर्षी येते

गणेश चतुर्थी

रांगोळी द्वाराशी

तव स्वागतार्थी…

होते सुरुवात

मंगल कार्याची

पूजा करोनीच

श्री गणरायाची…

गणराज असे

विद्येचे दैवत

अस्तित्व तयाचे

चराचरी व्याप्त…

शुभारंभ होई

तुजसी स्मरूनी

कार्यपूर्ती करी

विघ्नांसी सारूनी…

सदाप्रिय तुज

नैवेद्य मोदक

तू तर अससी

सर्वांचा चालक…

तुजपाशी असे

ज्ञानाचे भांडार

तुजवरी भक्ती

तूंच सर्वेश्वर…!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

ठाणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवीश्वर…☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ कवीश्वर… ☆ सौ. मुग्धा कानिटकर 

कवी रचतो सृष्टी

सृष्टी नाम शब्द

शब्द  होई काव्य

काव्य नूतन नित्य

नित्य रंगवी स्वरूप

स्वरूप निनादे स्वर

स्वर करत संकल्प

संकल्प साधत वाङ्मय

वाङ्मय प्रकट वाणी

वाणी  दर्शन ईश्वर

ईश्वर वर्णाकृती जशी

जशी साक्षात चित्रवाणी

चित्रवाणी खेळ प्रकाश

प्रकाश अनंत दिव्य

दिव्य भासे विश्व

विश्व पालक विष्णू

विष्णू  हाच कवीश्वर

विष्णू हाच कवीश्वर

© सौ. मुग्धा कानिटकर

सांगली

फोन 9403726078

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 118 – बाळ गीत – गुणवत्तेचा ध्यास ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 118  – बाळ गीत – गुणवत्तेचा ध्यास 

गुणवत्तेचा ध्यास लागला

गुरुजींच्या राग पळाला ।

गुरुजी आले खेळायला

आलीय रंगत शिकण्याला ।।धृ।।

 

गोष्टी गाणी धमाल सारी

तालात नाचती पोरं  पोरी ।

बदलून गेली शाळा सारी

गुरुजीही लागले नाचायला ।

हो आलीय रंगत …  ।।१।।

 

साहित्याची जत्रा भरली

सारीच मुले खेळत रंगली।

खेळातून ही अक्षरे जुळली

मजाच येते ही शिकामाला

हो आलीय रंगत … ।।२।।

 

चढवू मुखवटे खोटे खोटे

बनुया सैनिक छोटे-छोटे ।

अभिनयातून गोष्टही पटे

खोटी तलवारी खेळायाला

हो आलीय रंगत … ।।३।।

 

अंका ऐवजी दाखवू बोटे

कृती करूनी अंकही पटे।

झटक्यात करू दशक सुटे।

टाळ्या नी वाजवायला ।

गणिती भाषा शिकण्याला … ।।४।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी फुलवेडी वेल ☆ शिरीष पै ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ माझी फुलवेडी वेल ☆ शिरीष पै ☆

माझी फुलवेडी वेल

तिची फुलांची लहर

नेमावाचून बहर

 

तिची फुलण्याची खुशी

जेव्हा लागतसे कळ

पानापानामागे फूल

 

असा प्राणाचा बहर

रोज येईल कुठून

देठ जाईल तुटून

 

देठ तुटताना तरी

डोळे यावेत भरून

वेड वेलीचे स्मरून

 

– शिरीष पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हवे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हवे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

               भेटायला हवे

               बोलायला हवे

 

               दु:ख सुखापरी

               झेलायला हवे

 

               कोठेतरी.. कधी

               थांबायला हवे

 

               डोळे दुज्याप्रती

               ओलायला हवे

 

               वारा फिरे तसे

               चालायला हवे

 

               सांजावता ‘तिथे’

               पोचायला हवे

 

               ‘नाही’ कधीतरी

                सांगायला हवे

 

                बोलावया; पुरे

                ऐकायला हवे

 

                भूतास संशयी

                गाडायला हवे

 

                आल्या भरू मना

                सांडायला हवे

 

                वागेल तो; तसे

                वागायला हवे

 

                आयुष्य पाहिजे?

                सोसायला हवे

 

                बाकी उरावया

                भागायला हवे

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #140 ☆ गणाधीश गणपती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 140 – विजय साहित्य ?

☆ गणाधीश गणपती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

माझा गणपती बाप्पा

कलागुण अधिपती

आद्य काव्य लेखनिक

गणाधीश गणपती…! १

 

माझा गणपती बाप्पा

पाई जास्वंदीचे फूल

लोटांगण देवा तुला

नको संकट चाहूल….! २

 

अष्ट विनायक क्षेत्री

पाहू तुझे निजरूप

सुखकर्ता दुःख हर्ता

परीमळे दीप धूप….! ३

 

गौरी पुत्र गजानन

लंबोदर एकदंत

आहे संकट नाशक

दूर करी क्लेष खंत….! ४

 

माझा बाप्पा गणपती

माझा सखा सवंगडी

जपोनीया ठेवितसे

गोड गुपिते ती बडी…..! ५

 

कार्यारंभी स्तवनाने

कार्य निर्विघ्न सफल.

आहे ओंकार स्वरूप

विघ्नेश्वर हा सकल…..! ६

 

कला आणि विद्याधीश

माझा बाप्पा गणपती

नाम संकीर्तनी वाढो

कविराज मतीगती……!७

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #124 – अष्टविनायक…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 124 – अष्टविनायक…! ☆

🕉️

मोरगावी मोरेश्वर

होई यात्रेस आरंभ

अष्ट विनायक यात्रा

कृपा प्रसाद प्रारंभ….!

🕉️

गजमुख सिद्धटेक

सोंड उजवी शोभते

हिरे जडीत स्वयंभू

मूर्ती अंतरी ठसते….!

🕉️

बल्लाळेश्वराची मूर्ती

पाली गावचे भूषण

हिरे जडीत नेत्रांनी

करी भक्तांचे रक्षण….!

🕉️

महाडचा विनायक

आहे दैवत कडक

सोंड उजवी तयाची

पाहू यात एकटक….!

🕉️

थेऊरचा चिंतामणी

लाभे सौख्य समाधान

जणू चिरेबंदी वाडा

देई आशीर्वादी वाण…!

🕉️

लेण्याद्रीचा गणपती

जणू निसर्ग कोंदण

रुप विलोभनीय ते

भक्ती भावाचे गोंदण….!

🕉️

ओझरचा विघ्नेश्वर

नदिकाठी देवालय

नवसाला पावणारा

देई भक्तांना अभय….!

🕉️

महागणपती ख्याती

त्याचा अपार लौकिक

रांजणगावात वसे

मुर्ती तेज अलौकिक….!

🕉️

अष्टविनायक असे

करी संकटांना दूर

अंतरात निनादतो

मोरयाचा एक सूर….!

🕉️

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू आणि मी… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तू आणि मी … ☆ सौ राधिका भांडारकर

आठवतात मजला

ते सागर किनारे

बुडत्या सूर्याच्या साक्षीने

दिलेले प्रीत नजारे…

 

चिंब पावसातले ते

स्पर्श ओले थरथरते

तुझ्या देहगंधातले

तरंग ते आठवते….

 

तू प्रतिक्षा केलीस माझी

त्या हिरव्या झाडाखाली

दोघांच्या भेटीची ओढ

राघू मैनेने पाहिली..

 

हाती हात गुंफुनी

त्या माळरानातूनी

मुक्त चालताना

कितीदा घेतले लपेटुनी…

 

सळसळ पर्णांची

छुमछुम पाण्याची

मिसळली तालात

धून आपल्या प्रेमाची…

 

वेचते आहे क्षण सारे

तुझ्या माझ्या शिंपल्यातले

खिडकीवर टपटपणारा पाऊस

सांडतो मोती आठवणीतले,,,.

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares