मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #210 ☆ हरला नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 210 ?

☆ हरला नाही… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

भात्यामधला बाणच त्याच्या सुटला नाही

जखमी झाले कशी जरी तो भिडला नाही

मला न कळले कधी निशाणा धरला त्याने

नेम बरोबर बर्मी बसला चुकला नाही

माहिर होता अशा सोंगट्या टाकायाचा

डाव कुणाला कधीच त्याचा कळला नाही

बऱ्याच वेळा चुका जाहल्या होत्या माझ्या

तरी कधीही माझ्यावरती  चिडला नाही

गुन्हास नसते माफी आहे सत्य अबाधित

कधीच थारा अपराधाला दिधला नाही

जुनाट वाटा किती चकाचक झाल्या आता

कधी चुकीच्या वाटेवरती वळला नाही

गुलाम होता राजा झाला तो कष्टाने 

काळासोबत युद्ध छेडले हरला नाही

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ काकस्पर्श… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– काकस्पर्श…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

पितृपक्ष चालू आहे,

सगळीकडे धावाधाव |

खाऊन खाऊन आता

पोट भरलंय राव |

वर्षभर सगळे हुसकवती ,

कुणीच देत नाही भाव |

दाही दिशा ओरडत,

फिरतो कावकाव |

केवळ श्राद्ध करण्यापुरतंच

आठवतं आमचं नाव |

आम्ही मृतांसाठी पिंडाला शिवतो,

इतकंच माणसांना ठावं |

काकस्पर्श नाही झाला,

अर्थ गतात्मा इच्छा अपूर्ण |

दर्भाचा कावळा लावून म्हणती ,

अपूर्ण इच्छा करू पूर्ण |

काँक्रीटच्या जंगलात,

हरवला नैसर्गिक अधिवास |

रोडावली हो संख्या,

पितृपक्षापुरतीच आमची आस |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लोकशाही… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ लोकशाही☆ प्रा तुकाराम दादा पाटील

देवध्यानी सोनचाफा बहरला दारात आहे

 आत्मप्रौढीच्या खरा तो गुंतला प्रेमात आहे

शक्तिशाली राबणारे  हात दोन्ही भक्त झाले

 आदराने देव त्यानी पेरला रानात आहे

न्यायनिष्ठा पाळणारा कायदा लाचार झाला

 लोकनेत्यांनीच त्याला डांबला नोटात आहे

देवतांची आरती ही थांबली होती कशाने

जातिभेदाच्या कृपेने रोखली वादात आहे

लाजमोडे लोकसारे लाजही कोळून प्याले

घातपाती द्वेष त्यानी लपवला पोटात आहे

दैत्य झाले आज सारे राजसत्ता मागणारे

दहशतीची आग आता पसरली जोमात आहे

धावणारा देश आहे चालला कोठे कळेना

दीनवाणी लोकशाही कोणत्या शोधात आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 147 ☆ सत्यपरिस्थिती ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 147 ? 

☆ सत्यपरिस्थिती… 

अध्याय माझा संपेल

मी रुद्र भूमीत असेल 

घरी पेटतील चुली

सडा सारवण होईल 

 

 जेवायला बसतील सर्व

अश्रू डोळ्यांचे थांबतील 

माझ्याच घरातील सर्व

भोजनाचा स्वाद घेतील… 

 

 स्वाद घेत घेत भोजनाचा

आग्रह एकमेकांना होईल 

रुदन संपेल त्या क्षणाला

कामाला हात लागतील…

 

 हे जीवन क्षणभंगुर

इथे कुणाचे स्थिर ते काय 

आला त्याला जावे लागणार

यात आश्चर्य नाय…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देवीचे गायत्रीमंत्र – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ देवीचे गायत्रीमंत्र – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत गायत्रीमंत्र

धूमावती ॐ धूमावत्यै च विद्महे संहारिण्यै च धीमहि तन्नो धूमा प्रचोदयात् ॥

 मराठी भावानुवाद

ॐ 

ध्यान करितो धूमावती संहारिणीचे 

दान देई हे धूमा 

अमुच्या बुद्धीला श्रेष्ठ प्रेरणेचे

संस्कृत गायत्रीमंत्र

दुर्गा ॐ कात्यायन्यै विद्महे कन्याकुमार्यै धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॥

मराठी भावानुवाद

दुर्गा ॐ 

ध्यान करितो कात्यायनी कन्याकुमारीचे

दान देई हे दुर्गे 

अमुच्या बुद्धीला श्रेष्ठ प्रेरणेचे

संस्कृत गायत्रीमंत्र 

ॐ महादेव्यै च विद्महे दुर्गायै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

मराठी भावानुवाद 

ॐ 

ध्यान करितो महादेवी दुर्गेचे

दान देई हे देवी 

अमुच्या बुद्धीला श्रेष्ठ प्रेरणेचे

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “घटस्थापना…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “घटस्थापना…” ☆ श्री सुनील देशपांडे

मस्तिष्काच्या घटात आपण

मेंदू सिंहासन बनवूया

सद्सदविवेक बुद्धी देवी

त्याच्या वरती बसवूया

मानवजाती नसे पांगळी

धर्म जातीच्या कुबड्या फेकू

बंधुत्वाचा जागर घडवून

अवयावदाते बनूया

पळे मोजती घटका

आणिक तास वाजे ठणाणा

तर्क बुद्धीचा जागर घडवू

अवयवदान करूया

अवयवदाने मृत्यू मरतो

माणुसकीला जगवूया

जिवा शिवाच्या अमरत्वाचा

जागर आता घडवूया

मृत्यूनंतर या देहाचे

कशास वाटे प्रेम कुणाला?

देहदान संकल्पा योगे

घडवूया नव्या युगाला .

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वही… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वही… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

घाव सोसले काळाचे

ऊन..पाऊस झेलला

काळरात्री जागविता

सूर्यप्रकाश भेटला

 

आता होतसे कौतुक

मिळे मान.. सन्मानही

तरी मनाशी अजून

ओल्या कवितांची वही……

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी मस्त आहे…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी मस्त आहे…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

   वय झाले अजून मस्ती गेली नाही 

   विचार धावतात पण शरीर साथ देत नाही

   कळते आहे पण वळत नाही 

   कोणावर विश्वास ठेवायचा तेच समजत नाही 

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

  काय होतय सांगता येत नाही 

  दुखतात गुडघे सांगायचे नाही

  कुणाकडे जाता येत नाही 

 सावकाश चालायचे हेच आता उरले 

  तरी पण मी मस्त आहे…. 

 

  थकले शरीर जरी 

  नजर अजून शाबूत आहे

  थकल्या जीवाला 

  थोडी उभारी देत आहे

  तरी पण मी मस्त आहे…. 

 

   दात पोखरून टोप्या घातल्यात

   तेव्हा कुठे दुःख थांबले 

   कुस्करून खाल्ले 

   तेव्हां पचायला लागले  

   तरी पण मी मस्त आहे….. .

 

   वाचायला घेतले धुरकट दिसते 

   चष्मा लावला तर पाणी सुटते 

   डोळे पुसत वाचण्यापेक्षा 

    न वाचलेले परवडते 

   तरी पण मी मस्त आहे….. 

 

   लिहायला घेतले तर हात कापतात

   शब्दांवरच्या रेषा सरळ कुठे येतात 

   साधी स्वाक्षरी पण धड येत नाही 

   चेक परत का येतात तेच समजत नाही 

   तरी पण मी मस्त आहे….. 

 

   काळेनिळे मोजे उलटून सुलटून पहातो 

   तरीसुद्धा कधीतरी रंग धोका देतो 

   उलटा बनियन तर नेहमीच असतो 

   तरी बरे तो आत झाकला जातो 

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

   कानात हुंकार वाजत असतात 

   शब्द अस्पष्ट ऐकू येतात 

   अनुभवाने समजून  घेतो 

   आणि मगच उत्तर देतो 

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

    वाचयला घेतले तरी लक्ष लागत नाही 

    वाचलेले सुद्धा काही लक्षात रहात नाही 

    मित्रांशिवाय कुणाला काही सांगत नाही 

    समदुःखाची कथा बाकीच्यांना पटणार नाही 

    तरी पण मी मस्त आहे….. 

 

    बरेच आयुष्य जगून घेतले 

    अजून थोडे बाकी आहे 

    उरलेले मात्र सुखात जावे 

    एवढीच इच्छा बाकी आहे 

    तरी पण मी मस्त आहे…. 

 

   संसाराचे सारे पाश 

   आता पूर्ण सोडायचे आहेत

   उरलेली पुंजी संपेपर्यंत

   आनंदी जगायचे आहे

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

   आपल्याच धुंदीत जगलो आहे 

   पाहिजे ते मिळवले आहे

   उपभोगून आयुष्य सारे

   गात्रे शिथिल होत आहेत

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

  आयुष्यात ज्यांनी साथ दिली 

  काहींनी मधेच साथ सोडली 

  कोणाचेच काही अडलं नाही

  तरी सर्वांचा मी आभारी आहे

  तरी पण मी मस्त आहे…. 

 

  प्रत्येक जण एकटाच जन्म घेतो आणि मरतो

  जन्म घेतांना स्वतः रडतो बाकी खुश होतात

  मरतांना आपण शांत असावे

  बाकी काय करतात त्यांची चिंता नाही

  तरी पण मी मस्त आहे…. 

 

   भार कोणावर टाकायचा नाही 

   झटपट मात्र बोलावणे यावे 

   इतरांना हवे हवे वाटतांना 

   आपण निसर्गात विलीन व्हावे 

   तरी पण मी मस्त आहे…. 

 

  आणि  तिथे पण मी मस्त रहावे….

 

कवी : अज्ञात 

(सर्व वरिष्ठ नागरीकांना समर्पित… (मी पण)) 

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– माझे विसर्जन… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – माझे विसर्जन… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

विसर्जन न करता मला

इथे ठेवलं बरं झालं

पृथ्वीवरील  निसर्गात

निवांतपणे  रहाता आलं —

उत्सवातला कलकलाट

ऐकू येणं बंद झालं 

पाण्यातील विसर्जनाने

हळूहळू विरघळणं ठीक वाटलं —

डॉल्बीचा दणदणाट नि लेसरची

नकोच वाटते भक्ति भीक

एवढे मोठे कान माझे

कर्कश्श आवाज आणखी —

मोठा मोठाच वाटतो 

त्यापेक्षा अशा निसर्गात

शांतपणे राहण बर

मीच निर्मिल्या निसर्गात —

 हळू हळू मिसळण खर

 माझ्या मूर्ती दान करा

 कलाकाराला परत द्या

 नव रूप घेऊन  त्यातून

भेटेन पुढल्या वर्षी तुम्हाला

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – विश्वास…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  कवितेचा उत्सव ?

– विश्वास – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

कितीदा स्वतः शी भांडावे..

गळी दाटल्या हुंदक्याना

मनातल्या मनातच कोंडावे..

सर्व जाणून ही हे वेडे मन

ऐकतच नाही..

नको भांडू स्वतः शी हे

त्याला पटतच नाही..

माहित असूनही काटेरी वाट

पुन्हा पुन्हा निवडावी..

रक्तबंबाळ करून स्वतःला

पुन्हा एक कडू आठवण उरी साठवावी..

बास झालं आता लोक

काय म्हणतील म्हणून जगणं..

माझं माझं म्हणून आगीशी खेळणं,

भस्म सारं होणारच आहे..

मग का पोळण्याची चिंता बाळगावी..

झोकून दिलं आजवर दुसऱ्यांसाठी..

चल उठ आता जगून घे

 चार क्षण स्वतः साठी..

येईनात किती का अडचणी..

दिसू न दे कधी डोळ्यातलं पाणी..

विश्वास ठेव मनी सदैव जिंकण्याचा..

हाच विश्वास करेल मार्ग सोप्पा जगण्याचा…

©️®️सौ. अलका ओमप्रकाश…

 

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares