मराठी साहित्य – कादंबरी ☆ मित….. (भाग-2) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ मित……  (भाग 2)☆

(मन प्रीतीने भरते आणि प्रेमाचा खेळ सुरू होतो. मग कधीकाळी उजाड वाटणारं रानही मग हिरवे गार मनमोहक वाटायला लागते. एक फोटो पाहून त्यावर भाळलेला मितवर त्याचा काय बदल होतोय……..)

फोटो पाहता त्याला कधी झोप लागली ते त्याला कळलेच नाही. रात्री उशीरापर्यंत तो जागा होता. आणि थंडीचे दिवस होते. म्हणून मित सकाळी उशीरापर्यंत झोपून राहीला. पहाटेची गुलाबी थंडीत त्याला झोपणयाचा अधिक मोह चढत होता. सकाळी फोन वाजला तेव्हा त्याला जाग आली. त्याने उशाखालून मोबाईल घातला आणि न पाहताच फोन उचलला आणि तसाच अर्ध झोपेत बोलायला लागला. समोरचा कणखर आवाज ऐकून त्याची झोपच उडाली. मित ” हो पप्पा मी बसतो गाडीत. सायंकाळपर्यंत पोहोचेन घरी ” आणि फोन ठेवला.

बाबांनी बोलावून घेतलं म्हणून मित घरी आला. सहा सात महिन्यानंतर तो घरी परतला होता. बाबांनी त्याला दहा -पंधरा दिवसांसाठी बोलावले होते. तसा मनमिळाऊ स्वभाव तर त्याचा होताच. पण मोठ्या शहरात शिकतो आणि उत्तम लिखाण करून ब-याच ठीकाणी त्याने बक्षिसे मिळविल्या कारणाने गावातली लोक त्याला विषेश आदराने बघायचे. त्याचं बोलणं एखाद्याला मोटिवेट करण्यासारखं असायचं. म्हणून कधी फोनवर तर कधी प्रत्यक्ष भेटून त्याची मित्रमंडळी त्यांच्याकडून कधी सल्ला तर कधी मार्गदर्शन घ्यायचे. गावात आल्यापासून त्याच्या भोवती मित्रमंडळ  असायचे. त्याला तशी क्रिकेटची ही भारी आवड होती. मित आला म्हणून सुमितने त्याला क्रिकेट खेळायला शाळेच्या मैदानावर बोलावले. खेळून झाल्यावर सर्व आपापल्या घरी परतले पण मित मात्र अजूनही तेथेच होता. शाळेच्या आवारात लावलेल्या झाडांजवळ जाऊन तो बालपणातल्या शाळेतल्या आठवणी जागा करू लागला. आणि एकटाच स्वतःशी हसत तर कधी गंभीर मुद्रेत तया झाडाचं आणि शाळेचं  निरीक्षण करू लागला. शेवटी तो एका निलगीरीच्या झाडाजवळ येऊन त्या झाडाला टेकून उभा राहिला. आणि गाणे गायला सुरवात केली. ” ऐ दिल तेरी मर्जी है क्या बता भी दे, खो ना जाऊ जूल्फो मे कही, बचा भी ले ” सुरेल अशा आवाजात तो हे गाणे गात होता. त्याचं आवडतं गाणं होतं म्हणून त्याने ते त्याच्या आवाजात रेकॉर्डही केलं होतं. बाजूलाच रस्त्यावरून जात असलेले रामदास अहिरेंनी ते सुर एकले. आणि त्यांच्याही नकळत त्यांचे पाय मित कडे वळले.

गाणं संपल्यावर त्याने डोळे उघडले. समोरचा अंधूक नजारा आणि डोळयात झालेला गारवा अनूभवून मित प्रसन्न झाला. त्याच्या चेह-यावर हलके स्मित आपसूकच पसरले. त्याचे गाणे एकून जणू वातावरणच रोमँटीक झाले होते. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. तेव्हा समोर रामदासभाऊ दिसले. त्याने स्मित हसून त्यांना नमस्कार वजा मान हलवली.   “सुरेल गातोस तू. मन अगदी प्रफुल्लित करतोस बघ” असं  म्हणून रामदास भाऊंनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. “धन्यवाद. पण तुमच्या एवढे नाही” रामदासभाऊ गावातले गीत गायन पार्टीचे संस्थापक होते. कोणाचाही घरी काही खास कार्यक्रम असला की रामदासभाऊ आणि पार्टीला हमखास बोलावणे असायचं. आणि रामभाऊही कसलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे सहभागी होत. ” तुझ्या बाबांनी एकदा म्हटलं होतं. पण अपेक्षेपेक्षा अधिक गोड आवाज आहे तुझा आज रात्री छगन आबांच्या घरी गीत गायनाचा कार्यक्रम आहे. ये सहभागी व्हायला ” रामभाऊंनी जास्त न घुमवत सरळ विचारले. त्यानेही स्मित हास्य करत होकारार्थी मान हलवली. ” ये मग रात्री साडेनऊला ” आणि ते तिथून निघून गेले.

 ( क्रमशः )

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कादंबरी ☆ मित….. (भाग-1) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ मित……  (भाग 1)☆

“Hi”

शेवटी तो मॅसेज आलाच ज्याची मागच्या महिन्याभरापासून मित वाट बघत होता. इंस्टाग्रामवर ” रिमझीम लवर” नाव असलेल्या त्या अकाउंटवर एका मुलीचा फोटो पाहून मित त्यावर मोहित झाला होता. कितीही झूम केला तरी फोटो फूलस्क्रीन होत नव्हता. आणि लहानशा गोलाकारात बघून त्याचे मन भरत नव्हते. म्हणून त्याने त्या अकाउंटला फाॅलो केले. प्रायवैट अकाउंट असलयामूळे “रिक्वेस्टेड” त्याच्या स्क्रिनवर दिसत होते. नाव लक्षात राहावे म्हणून त्याने स्क्रीनशाॅट काढून ठेवला. पुर्ण फोटो पाहण्याची त्याची बेचैनी काही कमी होत नव्हती. पण अशा नावाची अकाउंट्स ही मुलांची पण असतात. फेसबूक, इंस्टाग्राम किंवा अन्य सोशल मिडिया अॅप वर बनावट आय डी ओपन करून मुलींच्या शोधात असणा-या मुलांची निव्वळ टर उडवण्यासाठी, कधी कधी जवळच्या मित्राची फजिती  करण्यासाठी अशी अकाउंट तयार केली जातात. हे त्याच्या लक्षात आलेच होते. पण फक्त जाणून घ्यावे या उद्देशाने त्याने फाॅलो रिक्वेस्ट कॅन्सल केली नाही. बेचैनी एवढी होती की क्षणभर ही धीर त्याला निघत नव्हता. पण काय करणार, रिक्वेस्ट स्विकारली तेव्हाच त्याला तिची प्रोफाईल बघता येणार होती.

आज कित्येकदा मितने मोबाईल डाटा चालू करून इंस्टाग्राम नोटीफिकेशन चेक केले होते. एव्हाना सर्वच अॅपची नोटीफिकेशन त्याने बंद करून ठेवली होती. पण आज त्याने ती पुन्हा चालू करून पुन्हा पुन्हा तपासत होता. त्यांच हे बदलणं त्याच्या गृपच्या मुलांनाही नविन होतं. काहीतरी विचारांत राहणारा, शांत शांत एका कोप-यात राहणारा, आणि कोणाचा फोन आल्याशिवाय मोबाईलला न बघणारा मित  आज मात्र मोबाईलला खुपदा चालू करून पाहत होता.

रात्रीच्या जेवणानंतर नित्य सवयीप्रमाने शत पावली करण्यासाठी कॅटीनबाहेर गेला. चालता चालता न राहवून त्याने  पुन्हा मोबाईल डाटा चालू केला.  आणि फायनली त्याला ती नोटीफिकेशन मिळाली “रिमझिम लवर अॅक्सप्ट युवर फ्रेंड रिक्वेस्ट”. ती पाहून तो आनंदुन गेला. अवघ्या काही तासांत त्याची रिक्वेस्ट अॅक्सेस्ट झाली होती. अती उत्साह न दाखवता नेहमीप्रमाणे शांत डोकं ठेऊन तो रूमवर जाऊन बेडवर पडून निवांत फोटो पाहावे असा विचार करून तो रूमवर परतला. आणि कोणाशीही न बोलता आपल्या रूममध्ये घुसला. संघरत्न, महेश आणि मित अशा तिघांची ती रूम होती. संघरत्नला उत्कृष्ट वाद्य वाजवता येत असल्याने त्याच्या बेडच्या आजूबाजू गिटार वगैरे असं त्याचं आवडतं साहित्य पडलेलं होतं. मित रूममध्ये आला तेव्हा संघरत्न कोणती तरी धुन वाजवण्यात मग्न होता. तसाच महेशही उत्तम कलाकार आणि तो छान डान्सरही आहे हे त्याचे कपडे केसांची स्टाईल आणि त्याच्या वागण्यावरून  कोणीही ओळखून घेईल. मित आला तेव्हा संघरत्न त्याला म्हटला “मित अरे बघ तूझ्या नव्या नाटकासाठी मी नविन धून तयार करतोय. ती जरा एकून सांग मला कशी झालीय ते. तुला काही सुधारणा हव्या असतील तर त्या ही सुचव.” पण मित त्याची कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून त्याने स्मित हसून त्याला म्हटले “अरे बाळं तू आज पर्यंत ज्या धून बनवलेल्या आहेत त्या कधी फेल गेल्या आहेत का? छानच असेल ही पण. तू सुरु ठेव” मितचे असं उत्तर देणं त्याला आवडलं नाही. त्याने रागाने गिटार बाजूला ठेवली. तेव्हा मित त्याच्या जवळ बसला. “अरे डार्लिंग, रागवतोय कशाला.” संघरत्न थोडा चिडलाच होता. ” रागावतोय म्हणजे मी एवढी मेहनतीने ती धून तुझ्यासाठी बनवली आणि हारामखोरा, तू इग्नोर करतोय” आणि त्याने मान तशीच रागात वळवली. त्याची मान स्वत कडे करण्याचा प्रयत्न करत मित त्याला म्हणाला. ” अरे मेरी जान. आय लव यू बोल दे एक बार” पण तो काही मानत नव्हता. म्हणून मितने मोबाईल घेतला आणि त्याच्यापुढे केला. ” अरे बघ इंस्टाग्रामवर एक मुलगी भेटलीय. खुप सुंदर आहे यार तीने आत्ताच फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेस्ट केली म्हणुन……” त्याचं बोलणं अपूर्णच सोडत संघरत्नने मोबाईल त्याच्या हातातुन घेतला. आणि म्हटला “काय? साल्या गुपचूप गुपचूप तू अशी कारस्थाने करतोयस आणि आम्हाला माहितीसुध्दा पडू देत नाही. दाखव कोण आहे ती, कशी आहे” मित ” अरे सावकाश. मी पण पाहिलं नाही तीला अजून पुर्ण” मितने त्याच्या हातातून मोबाईल परत घेतला. आणि नोटीफिकेशन आॅन केली. स्क्रिनवर “रिमझिम लवर” नावाचं अकाउंट दिसतं होतं. साधारण आठराएक फोटो पोस्ट केले होते. अधीर असलेल्या मितने पटकन एक फोटोवर क्लिक केले. फोटो फूलस्क्रीन दिसत होता. फोटो पाहताच त्याच्या अंगावर शहारा उठला. त्याचं. ह्रदय जणू बाहेर निघून नाचू लागलं होतं. तो हसत होता कि आणखी काही. हे त्यालासुद्धा कळत नव्हतं. त्याच्या चेह-यावरचे नेमके भाव काय आहेत हे सांगण्या पलिकडचे होते.  एवढं सुंदर देखणं रूप, जणू तारूण्याची ती मिसालच होती. ते बारीक-बारीक छोटे डोळे, लांबसडक काळेभोर दाट केसं, दिसायला सडपातळ पण सौंदर्याची खाणच होती ती. तिचे ते स्मित अधिकच मोहत होते. हसतांना गालावर पडलेली खळी तीला शोभून दिसत होती. जास्त नाही पण उंच सडपातळ असलेली ती लावण्यवतीच भासत होती. तीला पाहताच त्याचं ह्रदय प्रेमाच्या सागरात हेलकावे खाऊ लागलं होतं. त्याची दिवानगी फोटोगणिक वाढतच होती. संघरत्नचंही काहीसं असंच होतं. पण मितला त्या फोटोत पुर्णपणे बुडालेलं पाहून त्याने खांदा मारत म्हटले  ” अरे साल्या, कुठे भेटला हा कोहिनूर तूला.” मित फक्त स्मित देत होता. संघरत्नला कळाले कि त्याच्या मनात काय सुरू आहे. तो त्याला चिडण्यासाठी म्हटला ” काय? डायरेक्ट विकेट…….” मितने लाजून खाली मान घातली. संघरत्न ” अबे तू पण …….”

तो चकित होता. संघरत्न जेवढा मितला ओळखत होता. त्याला माहीत होतं प्रेम वगैरे या गोष्टींत मितला रस नव्हता. त्याच्या बाबांचं म्हणनं होतं की त्याने इंजिनियरींग करावं पण मितला लिखाणात फार रस होता. त्याने त्याच्या बाबांना सरळ सांगीतलं होतं कि त्याला लेखक, दिग्दर्शक व्हायचंय. त्याच्या निर्णयाचा सम्मान करत त्याच्या बाबांनी त्याला विद्यापिठात ड्रामा डिपार्टमेंटला प्रवेश घ्यायला परवानगी दिली होती. बाबांचा विश्वास सार्थ ठरवत मितने आतापर्यंत अनेक चांगल्या कथा लिहून त्यांना स्वतःच दिग्दर्शित करून अनेक बक्षिसांवर उत्कृष्ट दिग्दर्शक आणि लेखक म्हणून नाव कोरले होते. त्याने अनेक भयकथा, प्रेमकथा, प्रेरणादायी कथा लिहिल्या होत्या. त्याच्या शालेय जीवनात त्याने एक काव्य संग्रह ही प्रकाशीत केला होता. त्याला प्रेमकथा लिहीण्याची विशेष आवड होती. हे सांगणे अतिशयोक्तीचे नव्हते कि एवढ्या प्रेमकथा लिहीणारा मित अजूनही कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला नव्हता. पण या मुलीचा फोटो पाहून तो तिच्यावर भाळला हे मात्र खरे होते. त्याने ते सर्वच फोटो कितीतरी वेळा झूम करून पाहिले होते.

 ( क्रमशः )

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 4 ☆ फुलवा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनकी शिक्षाप्रद कहानी फुलवा

आज भी गांवों में और यहां तक क़ि शहरों में भी लोग अंधश्रद्धावश अपना सब कुछ खो देते हैं .  यह कहानी हमें प्रेरणा देती है क़ि यदि समय रहते किसी को अंधश्रध्दा से बचाया जा सके, तो उसे एक नवजीवन प्रदान किया जा सकता है और इससे बड़ी कोई भी समाजसेवा नहीं है.

 

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 4 ☆

 

☆ कथा – फुलवा  ☆

 

आठवड्याचा बाजार भरला होता. कोणती भाजी घ्यावी अन् काय काय घ्यावं ह्या विचारात शिंदेबाई बाजार बघत फिरत होत्या,तेवढ्यात त्यांच्या समोर एक वयस्कर बाई आली अन् हात जोडत बाईंना म्हणाली,”. तुम्ही शिंदेबाई नां ?मला तुमालाच भेटायचं हुतं ….वाईच बोलायचं हुतं तुमच्यासंगट “!…

शिंदे बाई म्हणाल्या मी ओळखलं नाही ..

तशी ती म्हणाली “आवो ईस बावीस वर्स झाली तुमच्या साळंशेजारी आमचं खोपाट हुतं…मी आन् माज्या दोन पोरी..

माझ्या लेकीला न्हाई कां तुम्ही आक्षी मरनाच्या दारातनं वडून आनलं  देवावानी…’

शिंदेबाईंच्या डोळ्यापुढे त्या बाईच्या दोन मुली, त्यातली मोठी  म्हणजे बाईंची अगदी लाडकी !…. सगळं अगदी सगळ्या घटनांचा पट डोळ्यसम़ोरुन सरकू लागला…..

सालाबादप्रमाणे जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि  पालक शाळेत मुलांची नावं दाखल करायला येऊ लागले.तशीच शेजारच्या खोपटातली एक विधवा तिच्या मुलीला घेऊन आली.

बाईंनी त्या मुलीचं नाव विचारलं..

‘फुलवा धोंडीबा सोनावने ‘ बाईंना हे ‘फुलवा ‘ नाव फारच भावल. त्यांनी तिच्याकडं कौतुकभरल्या नजरेनं  पाहिलं. मग त्या बाईला नाव विचारताच ती म्हणाली “या बया आता मला बी साळंत घालता कां काय ?”…

तशी बाई म्हणाल्या “अहो , आता आईचंही नाव लिहावं लागतं ..”

ही नवीन मुलगी ‘ फुलवा ‘  झोपडपट्टीत रहाणारी पण नाकी डोळी नीटस ,एकदम तरतरीत,बोलके डोळे तिला पहाताक्षणीच बाईंना ती छान वाटली…

ती रोज शाळेत वेळेत यायची. अंगावरचे कपडे साधेच पण नीटनेटके.वर्गात शिकविलेलं तिला लगेचच कळायचं… वर्गातल्या इतर मुलांपेक्षा ही एकदम चुणचुणीत..!…

हळूहळू बाईंच्या लक्षात आलं की हिचं अक्षर, चित्रकला सारंकाही सुंदर आहे. अगदी वर्गाच्या साफसफाईचं काम असो, रांगोळी, तक्ते,पताका चिकटवणं सर्व काम ती मन लावून करते. सर्व उपक्रमात हिचा सहभाग.!..

आता तर ती वर्गाची सेक्रेटरी झाली होती.ती सारखी बाईंच्या मागेपुढे असायची,याचं मुख्य कारण की बाई तिला प्रचंड आवडायच्या !..अन्  दुसरं म्हणजे तिची आई मजूरीवर दूर  जायची त्यामुळे दिवसभर खोपटाला कुलूप..मग बाईच तिचा खूप मोठा आधार ….

एक दिवस नेहमीप्रमाणे शाळा भरली पण फुलवा काही शाळेत आली नाही…बाईंना वाटलं आईंबरोबर गेली असेल येईल उद्या परवा…पण ते चार-पाच दिवसांपासून ती गैरहजर.

दुसऱ्या दिवशी शाळेत येताना बाईंनी तिच्या खोपटाचा उघडलेला दरवाजा पाहून त्या तिथं गेल्या.

पहातात तो ती एकटीच एका गोधडीवर अंगाचं मुटकुळं करून पालथी झोपली होती.

बाईंनी तिच्या आईला निरोप धाडला व बोलावून घेऊन सांगितलं की मुलगी एवढी आजारी असताना तिला एकटीला ठेवून तुम्ही कामावर जाता ? तिला असं एकटीला टाकून जाणं धोक्याचं आहे.त्यापेक्षा तुम्ही तिला शाळेत पाठवा इथं ती सुरक्षित तरी राहील व इतर मुलांबरोबर खेळली तर तिला बरं वाटेल. मग ती शाळेत आली..पण आता ती पूर्वीसारखी हसरी वाटत नव्हती. मुरझल्यासारखी दिसत होती.म्हणून बाईंनी जवळ जाऊन तिला विचारलं तुला काय होतंय गं ? तशी ती एकदम रडायला लागली,  म्हणाली बाईं माझ्या पाठीत दुखतंय..! बाईंनी तिच्या पाठीला हात लावून पाहिलं तर तिथं मोठा फोड आला होता अन् तिचं अंगही तापानं फणफणत होतं.

संध्याकाळी बाई तिच्याबरोबर तिच्या घरी गेल्या. तिची आई नुकतीच मजूरीवरनं आली होती. बाईंनी तिला सांगितलं “अहो, तुमच्या मुलीच्या पाठीवर एवढा मोठा फोड आलाय ती तापलीय, तिला दवाखान्यात न्या लौकर..”

तशी तिची आई म्हणाली “छ्या…छ्या..! आवं.. दवाखान्यात न्हिऊन ती बरी व्हनार न्हाई… तिला  ‘म्होट्टी बाई ‘ झालीया ..!”

आमच्या हितल्या साऱ्यांनी सांगितलंय की हिला औषधपानी केलं तर दुखनं वाढतं..! परवा. तिला देवरुषाकडं न्हेलं व्हतं. त्यो म्हनला हिला म्होटी बाई म्हंजे मोठ्ठा फोड येतो म्हणून ती बरी होन्यासाठी ‘ देवीची मांड’ भरायला सांगितली हाय. त्यासाटनं पन्नास लिंब, पंचीस नाऱ्याळ, याक बकरं, कोंबडं, साडीचोळी असं बरंच काईबाई आनाया सांगितलं हाय.त्यासाटंनच म्या पैकं गोळा करतीया…”

बाईंनी तर कपाळालाच हात लावला अन् म्हणाल्या तुम्ही अगोदर हिला दवाखान्यात न्या.! ती मोठीबाई वगैरे काही नसतं. पण तिची आई काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिचं म्हणणं एकच ‘पैकं जमलं की’ मांड भरनार बाकी काही न्हाई ‘..!

बाई मनात म्हणाल्या या अंधश्रद्ध लोकांना काय व कसं सांगावं..?…

शेवटी शिंदे बाईंनीच धाडस करून तिच्या आईला न सांगता त्या मुलीला सरकारी दवाखान्यात घेऊन गेल्या. डॉ नी तिच्या पाठीवरच्या गाठीची तपासणी तालुक्याच्या गावाला जाऊन करून आणायला सांगितली. बाईंनी ते सर्व केलं. डॉ नी तिला मणक्यांचा टी‌बी.असल्याचं सांगून तिला स्टेप्टोमायसीनची नव्वद इंजेक्शन व रोजच्या गोळ्या औषधं वेळच्या वेळी दिली व सकस अन्न खायला दिले तर ही वर्षभरात बरी होऊ शकेल असं सांगितलं.

बाईंनी तिची सर्व जबाबदारी घेतली. तिला दिवसाआड इंजेक्शनला नेणं, आणणं, रोजच्या गोळ्या औषधे वेळेवर देणं हे सर्व वर्षभर केलं.

तेव्हा दीड वर्षांने ती पूर्णपणे टीबीमुक्त झाली.

दीड वर्ष बाई रोज तिच्यासाठी डब्यात पौष्टिक आहार, फळं वगैरे आणून तिला मायेनं खाऊ घालायच्या. त्यामुळे ती  खडखडीत बरी होऊन पहिल्यासारखी छान दिसायला लागली.

तिच्या आईच्या हे लक्षात आलं होतं. ती म्हणाली  “अडानी लोकांचं ऐकून म्या पोरीला देवरुषाकडं न्हेलं असतं तर उपेग काईबी झाला नसता पन् माज्या पोरीचा हकनाक बळी मातुर गेला असतां..आन् आमची पोटं मारुन साठवलेला पैका त्या देवरुषाच्या मढ्यावर घालून पश्र्चाताप करायची येळ आली असती ..पन् बाईंनी  पैका न खर्च करता सरकारी दवाखान्यात उपचार देऊन माज्या पोरीला चांगली केली.

फुलवा आता चौथीत गेली होती. ती अभ्यासात हुशार होतीच, अक्षरही सुरेख मग बाईंनी तिला इतर मुलांबरोबर शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसवलंअन् ती केंद्रात चक्क पहिली आली. तिच्या आईलाही खूप आनंद झाला. चौथीची परीक्षा झाल्यावर ती पुढच्या वर्गात गेली व बाईंचीही दुसऱ्या शाळेवर बदली झाली अन् संपर्क तुटला….

शिंदे बाई बाजारातून घरी परत आल्या तशी ती मघाची बाजारात भेटलेली बाई घर शोधत आली.बाईंनी तिला पाणी दिलं. घरी आल्यावर तिला काय अन् किती सांगू असं झालं होतं…

ती सांगत होती..बरं कां बाई तुमी जिला वाचवली ती तुमची लाडकी फुलवा ल…ई.. ..शिकून आता मामलेदारीची परीक्षा दिली आन् तिला ती नोकरी पन् मिळनार हाय….! ही आनंदाची बातमी सांगाया  आन् तुमचं तोंड गोड कराया आज मी हितवर तुम्हाला सोधत आले.

खरंच ओ बाई तुमी त्या वक्ताला अक्षी देवावानी धावून आलात माज्या पोरीचा जीव वाचवलात म्हणून माजी “लेक वाचली” असं म्हणून तिला गहिवरुन आलं. बाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला व तिला शांत केलं. म्हणाल्या तुमच्यासारख्या अडाणी लोकांना ते देवरुशी लोक फसवतात अन् तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकता..! ..पण तसं होण्यापूर्वीच मी तिला उपचार सुरू केले आणि तिचं दैव व परमेश्र्वर कृपा यामुळे ती वाचली. मी फक्त निमित्तमात्र…!

सगळं ऐकल्यावर बाईंना खूप आनंद झाला. त्यांनी विचारलं आणि ती धाकटी …?

सरिता व्हय…! हितं न्हाई कां रोज साळा बुडवून माज्यासंगट कामावर मी जाईन तिकडं यायची.तिला नुसतं हुंदडायला आवडायचं.डोंगरावनं खाली पळत यायाचं पुन्ना चडून जायाचं, गुरं चारायला लांबलांब घिऊन जायाचं हेच तिला आवडायचं..!

ती भरभरून बोलत होती. आमी पुन्याला भावाकडं गेलो. तीथं तिला साळत घातली पन् हिचं धावायचं येड काही जाईना. हे तिच्या सरांच्या धेनात आलं. त्यांनी तिला

ते धावपटू का  काय म्हनत्यात त्ये करायचं ठरीवलं. तिनंबी लयी कष्ट घेतलं. आन् बाई ती धावन्याच्या स्पर्धेत पयली आली ती सोन्याचं पदक घीऊनच.

अरे..व्वा…! हे ऐकून तर बाईंना आणखीनच आनंद झाला.

थोडयाच दिवसांत फुलवा बाईंना. भेटायला आली ती मामलेदार होऊनच…!

समोरासमोर दोघींनी एकमेकींना पाहिल्यावर एकदम भरून आलं…तिनं पट्कन बाईंच्या पायाला स्पर्श केला. बाईंनी तिच्या खांद्यांना धरुन हलकेच उठवलं अन् जवळ घेत म्हणाल्या …”किती मोठी झालीस गं..!.” तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला तिला बाईंच्या प्रेमळ कुशीचा खूप छान आधार वाटला.

ती मुळातच छान होती पण आता तारुण्य आणि उच्च शिक्षणाचं एक आगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. बाई तिच्याकडं कौतुकानं पहातच राहिल्या.

फुलवा म्हणाली ..”बाई मी तुमचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाळांमधल्या गरीब व गरजू मुलींना शक्य होईल तशी मदत करणार आहे. पू. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेनुसार मुलगी दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा व अन्य खर्च उचलणार आहे…!’

‘हे सगळं करण्यात एक वेगळाच आनंद लपलेला असतो हे उमगलंय मला “.

शिंदे बाईंना तिच्या बोलण्याचं खूप कौतुक अन् तितकंच समाधानही वाटलं.

त्यांच्या मनात आलं  आपण लावलेल्या “आनंदाच्या” छोट्याशा रोपट्याला चैतन्याचे धुमारे फुटून नवं चैतन्याची फुलं बहरली आहेत…अन् ते” बाईंच्या डोळ्यापुढं वाऱ्याच्या झुळुकीनं डोलू लागलं…!!

तेवढ्यात शेजारच्या गाडगीळ काकू तिन्हीसांजेला म्हणत असलेल्या श्लोकातील शब्द कानावर आले…

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

 

©®उर्मिला इंगळे, सातारा

!!श्रीकृष्णार्पणमस्तु‌!!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कथा – ☆ वेग वाढला आणि शर्यत संपली ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे.

आज प्रस्तुत है  उनकी एक हृदयस्पर्शी कहानी  वेग वाढला आणि शर्यत संपली. हम सड़क पर भावावेश में  अपने वाहनों की गति बढ़ाकर स्पर्धा  करते हैं  और अचानक एक क्षण आता है जब स्पर्धा, दौड़ , शर्त और जीवन सब समाप्त हो जाता है. हम यह भी भूल जाते हैं क़ि हमारे साथ कई लोग जुड़े हुए हैं जो  जीवनपर्यन्त उस दुर्घटना को जीते हैं.  )

 

☆ वेग वाढला आणि शर्यत संपली ☆

 

स्पर्धेच्या मैदानावर धावतांना वेग अतिशय महत्वाचा असतो. आणि त्या वेगाला संयमाची जोड असली कि स्पर्धक स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहतो. आयुष्यही तसंच आहे अगदी स्पर्धेसारखं. इथ प्रत्येक माणुस स्पर्धा करतो आणि पळतो. आणि शर्यत जिंकतो. पण आशा काही शर्यती असतात ज्या जीवावर बेततात. माणसाला आपला प्राण गमवावा लागतो. आणि एकदा जीव गेला म्हणजे शर्यत संपते.

अशीच एक वेगाची शर्यत परवाच झाली. काही दिवसांपूर्वी जल संकटाने महाराष्ट्राला हैराण केलं होतं. त्या जखमातून महाराष्ट्र अजून सावरलेलं नाही तोच महाराष्ट्राच्या उत्तरेत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील निमगूळ येथे बस आणि कंटेनर मध्ये धडक झाली. आणि वेगाचा या अघोरी खेळात तेरा ते चौदा लोकांचा बळी चालला गेला. औरंगाबादहून शहादा कडे येणारी बस समोरून येणा-या कंटेनर मध्ये अशी काही घुसली जणू बनवणा-याने त्यांना त्यांच्या मर्जी विरूध्द वेगळे बनवले असावे. बसचा निम्म्यापेक्षा जास्त भाग त्या कंटेनर मध्ये घुसला होता. दोन्हीही ड्रायव्हर सोबतच बस मधील प्रवाशांचा यात नाहक बळी गेला. याच रस्त्यावर अशाच बसेस मधुन मी ही कधीतरी प्रवास केला होता. म्हणुन मला हा अपघात जरा मझ्या भावनांना जवळचा वाटून गेला

रक्षाबंधन आणि स्वतंत्र दिवसाचे पावन पर्व साजरे करण्यासाठी मी घरी गावाकडे जाऊन आलो. गावाकडे गेल्यावर शांतता असते. कसलीही वेळ फिक्स नसते.  रोजच्या वेळेवर ऑफिसला जायचे नव्हते म्हणुन मी उशीराच उठलो.  आणि सवयीप्रमाणे हाती मोबाईल घेतला. आणि डेटा चालू केला. रात्रीपासून डेटा बंद असल्यामुळे बरेच मॅसेज पेंडींगवर होते. मी पुर्ण मॅसेज येण्याची वाट पाहू लागलो. तेव्हा कानी आवाज आला. आमच्या शेजारी राहणारी मायाबाई तीच्या एकवीस वर्षीय मुलाच्या  हाती टिफीन देता म्हणत होती कि “वेळेवर जेवून घे. जेवन परत आणू नको. पुर्ण टिफीन संपव”  तो मुलगा आपल्या आईच्या शब्दाना होकार देत चालला गेला. एका आईची आपल्या मुलाबद्दलची काळजी सहाजीकच होती.

मी पुन्हा मोबाईल मध्ये लक्ष देउन एक कवितांचा समुह उघडून साहित्यीकांच्या दर्जेदार कविता आवडीने वाचायला लागलो. काही वेळाने उठलो आणि फ्रेश होऊन मामांच्या घरी गेलो. माझ्या मामांची मोठी मुलगी तीच्या बाळंतपणाला माहेरी आलीय. ती टि.व्ही. बघत बसली होती. मी सवयीप्रमाणे तीची खोडी काढायला लागलो. तेवढ्यात टि.व्ही वर एक बातमी झळकली. *नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील निमगूळ येथे बस आणि कंटेनर मध्ये धडक* . ज्यात ड्रायव्हरसह तेरा ते चौदा लोकांचा मृत्यु झाला असं म्हणत होते. माझं लक्ष आपोआपच तिकडे वेधलं गेलं.

टी. व्ही वर दाखवण्यात येत असलेल्या चित्रफितीमध्ये औरंगाबाद-शहादा  बसची पाटी पडलेली होती. ज्यावर रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसत होते. निम्म्यापेक्षा  जास्त बसचा भाग कंटेनरमध्ये घुसला होता. समोरचं चित्र अगदी विदारक दिसत होतं.  बातमी पाहून सुन्न झालो. ती रक्ताने माखलेली पाटी जणू हेच सांगत होती.  वेगाची नशा करू नका. कारण वेग फक्त रक्ताची नशा करत असतो.

पाटी आणि मृत झालेल्यांची स्थिती पाहून मला त्या आईची आठवण झाली. जीने कामावर जाणा-या मुलाला काळजीपूर्वक जायला सांगीतले होते. तसंच त्या मृतांच्या आईनेही त्यांना काळजीपूर्वक प्रवास करायला सांगितलं असेल. तिनेही त्यांना पाठवतांना देवाचं नामस्मरण केलं असेल. आणि त्यांनीही आईला तसाच होकार दिला असेल. पण रस्त्यावरच्या वेगाने त्यांचा तो होकार खोटा ठरवला होता. त्यांनी दिलेले  सुखरूप पोहोचायचे आश्वासन फोल ठरले होते. त्या आईची काळजी कधीच अश्रूमध्ये रुपांतरीत झाली होती.

मामांची मुलगी ते समोरील दृश्य पाहून घाबरली होती. तिच्याही उदरात एक प्राण वेगाने वाढत होता. काही दिवसांनी त्यालाही जगाच्या या शर्यतीत पळायचे होते.तो कसं हे सगळं सहन करेल. याच विचाराने  कदाचित ती हादरली असणार.  ती अगदी अधीर होऊन मला म्हटली. “कसं काय चालवतात हे गाड्या काय माहीत. एका क्षणांत एवढ्या लोकांना संपवून टाकले. दैव असं का सूड घेत कोणास ठाऊक. काय चुक होती त्या प्रवाशांची. ड्रायव्हरच्या चुकीमुळे एवढ्या लोकांनी जीव गमवावा लागला” तीच्या या निरागस प्रश्नात मला एका आईची काळजी जाणवली. मी तीला म्हटलं “इथं ना बस ड्रायव्हरची चुकी आहे ना कंटेनरच्या ड्रायव्हरची. इथं चुकी फक्त माणसाची आहे. ते रस्ते माणसाने बनवले. ती बस आणि कंटेनर माणसानेच बनवले. त्यांना वेगही माणसानेच दिला. माणुसच त्या गाड्या वेगाने चालवत होता. आणि त्यात मेलाही माणूसच.त्यात दैव ते काय करणार?” माझ्या ये उत्तराने ती समाधानी झाली की नाही मला माहीत नाही. पण तिच्या चेह-यावरचे भाव सांगत होते. कि माणसाने सुरू केलेली ही जीवानाची शर्यत त्याच्या जीवनासोबतच संपून जाते. आणि रक्ताने माखलेली ती नाही त्याच्या कधीतरी होण्याची ग्वाही देत पडून राहते. रस्त्यावर……..

 

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा

जि. नंदुरबार

मो  9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – ☆ अडगळ ☆ – सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

(सौ. सुजाता काळे जी की कथा ‘अडगळ ’ इस भौतिकवादी एवं स्वार्थी संसार की झलक प्रस्तुत करती है। इस मार्मिक एवं भावुक कथा के एक-एक शब्द , एक-एक पंक्तियाँ एवं एक-एक पात्र हमें आज के मानवीय मूल्यों में हो रहे ह्रास का एहसास दिलाते हैं ।यह जीवन की सच्चाई है। क्या  ‘समय’ के साथ ‘संबंध’  भी पुरानी वस्तुओं की तरह ‘कबाड़’ में तब्दील हो जाते हैं?  मैं इस भावनात्मक सच्चाई को कथास्वरूप में रचने के लिए सौ. सुजाता काळे जी की लेखनी को नमन करता हूँ।)

☆ अडगळ ☆

 

काल रात्री आव्वाचा फ़ोन आला. ‘ताई’ म्हणून ओक्साबोक्शी रडायला लागली. मला वाटलं  की आप्पांबरोबर भांडण झालं की काय ? तीच रडणं एकूण मलाही  धक्का  बसला. परवा तिचा एकुलता एक मुलगा सार्थक त्याच्या बायको मुलाबरोबर त्याच्या नवीन घरी राहायला गेला होता. तिचे घर सुने सुने झाले होते. रिकामे झाले होते. तिच्या घरट्यातील पाखरे उडून गेली होती आणि तिचे घर रिकामे झाले होते. म्हातारपणात उतार वय झालेल्या आई बापाला सोडून तो गेला होता. ज्या सार्थकला तिने जीवाचे रान करून, रात्रीचा दिवस करून, हाल अपेष्टा सोसून वाढवलं होत तोच तिचा एकुलता एक लेक या उतार वयात तिला सोडून वेगळं राहायला गेला होता.

नोकरी निमित्त मुलं परगावी – परदेशी राहणं वेगळं आणि एकाच शहरात बारा तेरा वर्षांनंतर आई बाप सोडून राहणं वेगळं, मग कारण काहीही असो ……! त्यात पोरकेपण , परकेपणा आणि एकटेपणाची भावना असते ती मन पोखरायला लागते. तिचं दुःख मला समाजात होत….. मला समाजात होत  की तिला काय सांगायचं  आहे….!!

अशीही तिनं गेली पाच सहा वर्षे घरात मौनच धारण केलं होतं.  ‘ मौनं सर्वार्थ साधनं …..! ‘   सार्थकच्या शिक्षित बायको बरोबर जुनी मॅट्रिक झालेल्या आव्वाचे लहान सहान वाद होतं असत.  संसार म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच. फक्त काम पुरताच बोलणे चालू होते.  पण आण्णांच्या स्वभावाला औषध नव्हतं. त्यांच्या वयाने अठ्ठ्याहत्तरी पार केली होती तरीही त्यांच्या तापट स्वभावात किंचित हि फरक झाला नव्हता. त्यांची सतत काही ना काही कुरबुर चालू असे. रेशनिंगच्या अन्नावर जगलेल्या आव्वाला सुस्थितीतील दिवसातील ढीगभर अन्न वाया गेलेले आवडत नव्हते. त्यामुळे घरात अधून मधून काही ना काही तक तक असे. आव्वाच्या अबोलाचे एक कारण असे की तिच्या स्वाभिमानी पण तापट मनाला तिच्या मुलाने सुनेसमोर केलेला अपमान सहन होतं नव्हता. गेल्या दहा बारा वर्षात ती हजारदा मला म्हणत असे की ताई तो मला असा बोलला …. तो मला तसा बोलला…. त्याच्या शब्दांनी माझ्या काळजात भोकं पडली आहेत. आणि तिचं काळीज रडताना बघून माझा थरकाप होतं असे. तिला मी खूप वेळा सांगितले की अशी तळ तळ करू नकोस. मलाही तिचं दुःख कळत होतं. एक आईचं दुसऱ्या आईचं हृदय समजू शकत होतं.

मी तिला बऱ्याचदा समजावले की लाखोंचा हिरा तुझ्या पासून दूर होण्यापेक्षा हजारांचे अन्न वाया जाऊ दे. असे असूनही सार्थक नवीन घर घेई पर्यंत गेली दहा बारा वर्षे एकत्र राहिला. त्यानेही गेली कित्येक वर्षे त्रास काढलाच. त्यामागे अनेक कारणे होती …… असो ….. घरातील चारीही माणसे हटवादी व तापट होती. त्यामुळे घराला तडा गेला होता. कधी कधी असं वाटत कि डिग्री घेऊन ज्ञान मिळतंच असे नाही. मनाचा मोठेपणा व समजूतदारपणाही हवा. तो कोणतीही डिग्री देत नाही.

आव्वाला हे माहित होताच की नवे घर घेतलं म्हणजे मुलगा व सून घराबाहेर पडणार. ती मला फोनवर सांगत होती की तिच्या सोन्यासारख्या नाती तिच्यापासून दूर केल्या. माझ्या मनाची तगमग माझ्या लेकाला कधीच कळली नाही. तो गेला तेव्हा मी घरात नव्हते पण शेजारची आक्का सांगत होती की तिने त्याला खूप समजावले की जाऊ नको. मुलींसाठी तरी रहा. दादा पण खूप  रडत होते……. पण त्याने ऐकले नाही.  ती सांगत होती…. रडत होती…. मी पण गळ्यात दाटून आलेला हुंदका गिळला. डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

मी एक दोनदा सार्थकला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मते आव्वाचंच चुकत होतं.  तीस वर्षे ज्याने आईचं ऐकलं त्याला आज आव्वा चुकीची वाटत होती. ज्या आव्वाची त्याने देवा सारखी पूजा केली होती ती आव्वा आज त्याला चुकीची वाटत होती. तो काहीही एकूण घेण्याच्या मनःस्तिथीत नव्हता. त्यानंतर मी त्याला समजावणे, सांगणे सोडू दिले होते. खर तो आमच्या सर्वांपासून मनाने खूप दूर गेला होता. नात्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. आता मलाच पोरकं आणि परकं परकं वाटत होतं.

मी कल्पना करू शकत होते की भविष्यात माझा  मुलगा  आला सोडून गेला तर ……  नकोच …. किती भयंकर कल्पना …… !!  हि कल्पना पण सहन होतं नव्हती…….!!  माझ्या अंगावर शहरे उभे राहिले …..!!

मी विचारात गर्क झाले होते . माझा हुंकार न मिळाल्यामुळे आव्वा ‘ताई , ताई .. म्हणून हाक देत राहिली.  मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हटलं , आव्वा मी ऐकत आहे . तू बोल. सगळं  सामान घेऊन गेला का? ‘ तर ती म्हणाली, ‘नाही,  अजून सगळं सामान घेऊन गेला नाही. गरजेचं नेलं आहे. जुनं जुनं सगळं इथंच आहे. नवीन घरात जुन्या वस्तू कशाला? असाही फ्रिज जुना झालाय, टी. व्ही. जुना झालाय, वाशिंग मशीन, मिक्सर जुना झालाय…. सगळं जुनं झालंय…. आम्ही पण जुने झालोय. अडगळीच्या वस्तू आणि आमची ‘अडगळ ‘ इथंच ठेवून गेलाय….. मला तिच्या ‘अडगळ’ म्हणण्याचा मत्यार्थ कळाला.  आव्वा बोलत होती …. रडत होती ….. मी ऐकत होते …. रडत होते …… किती अचूक शब्द प्रयोग केला तिनं ….. म्हातारपण म्हणजे खरंच ‘अडगळ ‘ असते का??

 

© सुजाता काले ✍

पंचगनी, महाराष्ट्र।

9975577684

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कथा – ☆ समतोल ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते।  हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है  उनकी एक कहानी समतोल ।)

 

☆ समतोल ☆

 

” काय होईल पुढच्या आयुष्यात काही कळत नाहीये यार. कुठली म्हणजे कुठलंही गणित जुळून येत नाहीये.” आदिती राघवला बोलत होती. बाजुला बसलेली रागीणीही गंभीर होऊन एकत होती.

रागीणी आणि राघव तिचे काॅलेजचे मित्र. पण त्यांच्यात एक जिवाभावाचं नातं बनलं होतं. माणसं जोडण्याची  किंवा जोडून ठेवण्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज नसते. हे त्यांच नातं गवाही देत होतं. त्यांचा गृपच एकंदर मस्तीखोर आणि अभ्यासूही तेवढाच होता.

काॅलेज सोडून पाच वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही त्यांची मैत्री घट्ट होती. कोणीही कोणालाही विसरलं नव्हतं. सुरूवातीला एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं पण वेळ सरकत गेली तशी काहींची लग्न झाली. तर काहीनी जाॅब मुळे भेटणं बंद केलं. पण फेसबुक, व्हाटसअॅप मुळे सगळे एकमेकांबददल अपडेट होते. काही खास मोक्याच्या वेळी येणं जाणं असायचंच. पण आज तिच्या वाढदिवसाला जास्त मित्र आले नव्हते. आदितीचाही वाढदिवस साजरा करण्याचा काही प्लॅन नव्हता. तिच्या मनात मागच्या काही दिवसापासुन कोणत्यातरी एका कारणावरून घालमेल सुरु होती. खुप विचार करूनही ती कुठल्या एका निर्णयावर पोहोचत नव्हती. नितीनने जेव्हा तिला बर्थडे पार्टीसाठी फोर्स केला तेव्हा ती आधी तयार नव्हती. पण मित्रांना भेटून काहीतरी मार्ग काढावा म्हणुन ती ही तयार झाली. निवांत बोलू म्हणुन तीने शहराबाहेर एक ढाबावर त्यांना नेले. राघवचे मामा तिथेच मॅनेजर होते. मामांनी त्यांना एक टेबल खाली करून दिला. केक कापला गेला. नेहमीच हसत राहणारी आदिती आज नेहमीप्रमाणे हसत नव्हती. चेह-यावर जरी हसू असले तरी डोळ्यांत ते स्मित दिसत नव्हते. हे राघवने कधीच हेरले होते.

केक कापून  झाल्यावर जेवण  मागवून त्यांनी जेवायला सुरुवात केली. आदितीने आपल्या हातातल्या चमचने पहिला घास उचलला. आणि तोंडात टाकायला घेतला. तेवढयात राघव तिला म्हटला. “आदिती, तु काहीतरी डिस्कस करणार होती ना आमच्याशी ?” त्याच्या प्रश्नाने आदिती दचकली. तिचा चमच ओठांजवळच थांबला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. त्याने एक घास घेतला आणि म्हटला. ” अगं बघतेयस काय? बोल ना काय म्हणणार होतीस ते”  ती अजुनही गोधळलेली होती. ” पण तुला कसं कळलं” तीने गोंधळून विचारले. राघव- ” बाळं, तु अजुन लहान बाळ आहेस. डोळ्यातले भाव लपवता येत नाही तुला अजुन. नुसतं चेह-यावर हास्य ठेऊन चालतं नाही. ते डोळ्यांतही असु द्यावं लागतं. बोल काय म्हणतेयस” ती आता पुर्णपणे कंफर्ट झाली होती. त्याचं तिला भारी कौतुक वाटलं. ती बोलू लागली ” काय होईल पुढच्या आयुष्यात काही कळत नाहीये यार. कुठली म्हणजे कुठलीही गणित जुळून येत नाहीयेत” ती क्षणभर थांबली. आणि बोलू लागली ” आज वयाची सव्वीस वर्षे पूर्ण झाली. सत्ताविस सुरूही झालं. आई म्हणतेय लग्न करून घे. काही कळत नाहीये. पुरता गोंधळ झालाय माझा.” त्याला तिच्या बोलण्यात गांभीर्य जाणवले. तो म्हटला  “अगं करायचं ना मग लग्न. त्यात काय एवढं विचार करण्यासारखं.”

आदिती मात्र गंभीर होती. ” इतकं सोपं नाहीये माझ्यासाठी ते. तुला माझी परिस्थिती माहीती आहे. बाबा चोवीस तास नशेत असतात. मोठया बहीणीचं लग्न झालंय. श्रध्दा आणि संध्या लहान आहेत अजुन. ते आईला नाही सांभाळू शकणार. भाऊ असता तर त्याच्या भरवशावर एकवेळ सोडलंही असतं. पण देवाने तिच्या नशिबी हे भोग दिलेत. आणि आता मी लग्न करून गेले तर किती मर-मर होईल तीची” बोलता-बोलता तिच्या डोळ्यांत पाणी आलं. रागीणीने तिच्या खादावर सहानुभूतीचा हात ठेवला. राघव ” आदिती बरोबर आहे तुझं म्हणणं. पण काही विशिष्ट गोष्टी विशिष्ट वेळेवर झाल्या कि आयुष्याची घडी व्यवस्थित बसते. लग्नही त्यातलंच एक. ते ही वेळेवर नाही झालं कि खुप सारे अर्थ उलगडत नाहीत. आज ठिक आहे तु यंग आहेस. तर सगळं काही करू शकतेस.  त्यांनाही आणि स्वतःलाही सांभाळू शकतेस. पण आजपासुन यु जर काही वर्षे पुढे गेली ना तेव्हा तुला दिसेल कि तु घेतलेला निर्णय चुक होता कि बरोबर.

मी हे म्हणत नाही कि तु लग्न कर. पण स्वत:ला थोडं पुढे नेवून चल. साधारणतः पंचेचाळीस-शेहेचाळीस वयामध्ये. आई बाबा हयात राहीले तर त्यांच म्हातारपण तुलाच सांभाळायचं आहे. आणि जर समजा नसले तर काय? तु स्वतच्या सामर्थ्यावर जे साम्राज्य उभं केलयस त्याचं काय? सोड साम्राज्याचं. पण हा जो तुझ्या आयुष्याचा वड आहे. त्या वडाला जर पारंबीचं नसेल तर त्याला काही शोभा राहणार का? कोणत्या आधाराने जगशील पुढचं आयुष्य? तुझ्या म्हातारपणाची काठी सांभाळायला तुला हात नकोत? बघ आदिती, माणसाला प्रत्येक परिस्थितीत जगावं लागतं. पण त्या जगण्यालाही काहीतरी कारण लागतं. आणि ते कारण तुला लग्न करूनच भेटतील”

आदिती त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होती. तिला मन मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. तिने डोळे पुसले. आणि म्हटली ” मग मी काय करायला हवं ?” तिने  त्याला प्रश्न केला. त्याला कदाचित हा प्रश्न अपेक्षितच होता. आणि त्याच्याकडे उत्तर तयारच होते. असे भाव त्याच्या चेह-यावर दिसत होते. ” अगं सोप्प आहे. जो कोणी मुलगा असेल ना त्याला सांग कि तुझी अडचण काय आहे.  तो समजुन घेईल तुला. मग तु तुझ्या आईची काळजीही घेऊ शकतेस. आणि तीला गरज पडली तर तुझा पगारही देऊ शकशील.” आदिती ” कोण भेटेल असा समजुन घेणारा ? तु करशील माझ्याशी लग्न? ” ती सरळ बोलुन गेली. त्यावर रागीणी पुरती दचकली. तिच्या हातातलं चमच खाली पडलं. ती वाट पाहु लागली कि राघवचे उत्तर काय असेल. तो मात्र शांत होता. स्मित हसुन तो बोलला. ” केले असते तुझ्याशी लग्न. तुझ्या सारखी मुलगी भेटायला भाग्य घेऊन जन्मावं लागेल. पण तु मला मित्र कमी आणि भाऊ जास्त मानले आहेस. आणि मी ही बहीणीपेक्षा कमी दर्जा नाही दिला तुला. म्हणुन एका भावाची जबाबदारी म्हणुन तुला हसत ठेवणं माझं कर्तव्य आहे.”

आदिती मात्र स्मित हसली. रागीणीलाही तिचं उत्तर मिळालं होतं. जेवण संपल्यावर त्यानी रागीणीला तिच्या घरी सोडले. आणि आदितीलाही पोहोचवण्यासाठी तिच्या घरापर्यंत गेला. आदिती गाडीतून उतरली. आणि जाऊ लागली. राघवने तिला आवाज दिला ” आदिती ” ती मागे फिरली. ” काळजी करू नकोस. कोणी नाही तर मी आहे सक्षम आईसाठी ” आणि तो निघून गेला. आदिती त्याला स्वाभिमानी नजरेने पाहत राहीली.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – ☆अनिश्चितता ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। हाल ही में आपकी एक मराठी कथा “पबजी” e-abhivyakti में प्रकाशित हो चुकी है। हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है उनकी एक भावुक एवं मार्मिक  मराठी कथा अनिश्चितता।)

 

☆ अनिश्चितता ☆

 

सकाळीच रोहितला जाग आली पण त्याला अंथरूणातुन उठावसं वाटत नव्हतं. रात्रीच्या जारणाने त्याची झोप पुर्ण झाली नव्हती. सवयीमुळे नेहमीच्याच वेळेवर त्याला जाग आली. पण डोळ्यांत झोप मात्र शिल्लक होती. अंग जड-जड वाटत होतं. डोकंही दुखत होतं. रात्री उशिरापर्यंत त्याला एकच विचार भेडसावत होता. कि काय होईल? या एकाप्रश्नाने त्याची झोप उडाली होती. वय  27  झाली होती. घरी बाबांची तब्येत बरी नव्हती. बाबांना दमाचा त्रास आहे. काही दिवसांपूर्वीच डाॅक्टरांनी निदान केलं होतं. बाबा म्हणत होते “मी जिवंत आहे तोवर संसाराला लागुन जा. मी गेल्यानंतर तुला कोणी विचारणार नाही. तो मोठा आहे. त्याचं लग्न झालंय. तो त्याच्या संसारात रमला आहे. तो तुझ्यावर लक्ष देणार नाही. त्यात तुझी आई म्हातारी ती काय करेल.”  बाबांचं म्हणणं जरी भावनिक होतं पण ते योग्य होतं. कारण त्याच्या मोठ्या भावाचं लग्न होऊन चार वर्षंपेक्षा जास्त वेळ झाला होता. लग्नानंतर मोजून दोन महिने राहिला असेल तो. नंतर त्याच्या बायकोला घेऊन बड्या शहरात निघून गेला होता. गेला तो परतला नव्हता. एकंदरीत म्हणायचं झालं तर त्यानं पुन्हा त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. म्हणुन तो काही करेल ही उमेद बाबांनीही आणि रोहितनेही सोडली होती. जे काही करायचं ते रोहितलाच करायचं होतं. वय झालं म्हणुन बाबांची तब्येत बरी राहत नव्हती. आणि त्यातच दमाचं नादान. म्हणजे पायाखालची जमीन सरकली होती रोहितची. मोठ्या भावाच्या गोड गोड शब्दाना भुलून होतं तेवढं शेतही विकून टाकलं होतं. आणि आता सगळंच आयुष्य उन्हात उभं होतं. ते घरच तेवढं शिल्लक राहिलं होतं. आणि त्या घराची परिस्थिती बदलावी. आणि गेलेलं शेत परत मिळावं म्हणून म्हणुन रोहितने एका अशा जगात उडी घेतली होती जिथं काही निश्चीत नव्हतं. सगळं काही अनिश्चित होतं. ते क्षेत्र असं होतं कि ज्यात आपलं कोणीच नव्हतं. तिथं जायला त्याच्यासाठी दरवाजे बंद होते. खिडकी तेवढी उघडी होती. तो दरवाजा आतुन उघडण्यासाठी तो जिवाचे रान करत होता. घरची गरिबी आणि सुखी भविष्याचे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला होता.

मुंबई म्हणजे पैसे वाल्यांची. आणि त्याच्याकडे तोच नव्हता. पण येणा-या काळावर आपल्या कौशल्याचा घाव घालून बदलावा. या निर्धाराने तो मुंबईत आला होता. सुरूवातीच्या चार- सहा महिन्यांच्या निराशेनंतर आता कुठेतरी जम बसायला लागला होता. काही अंशी त्याला यशही मिळू लागलं होतं. मुंबईने आता कुठे तरी त्याला आपलंसं करायला सुरूवात केली होती. पण जे काही मिळतं होतं त्यात त्याचं भागत होतं. आणि त्यांतच बाबांच्या आजाराचं निदान होणं. हे त्याला हैराण करून सोडणारं होतं. आता बाबांच्या इलाजासाठी त्याला पैसे हवे होते. ते कुठून नि कसे येणार? आणि आता पुढे काय?

बाबांचं म्हणणं होतं की लग्न कर. आता त्याच्या समोर तिहेरी संकट आलं होतं. हो संकटच म्हणावं लागेल. एक तर गेलेली शेती, लग्न आणि बाबांचा दवाखाना. भावाकडून त्याला अपेक्षा नव्हती. जे काही करायचं ते त्यालाचं करायचं होतं. आणि याच विचारांनी त्याला झोप आली नव्हती.

सकाळी उठला तेव्हा त्याचं डोकं दुखत होतं. शरीर जड-जड वाटत होतं. पण त्याकडे कानाडोळा करून तो अंथरूणातुन उठला. आणि आपल्या नित्याच्या कामाला लागला. तो कामावर जायची तयारी करत होता तेव्हा त्याला घरून फोन आला. ” बाबाना पुन्हा श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. तू लवकर घरी ये.” त्याने फोन ठेवला. आणि कामावर गेला. डोक्यात तोच विचार होता. रोहितने बाॅस कडे पैसे मागितले तेव्हा बाॅस म्हटला. ” अरे, आता तर जाऊन आला तू गावाकडे. आणि मागच्या महिन्यात तूझ्या किती सुट्या आहेत. पगाराची तारीख पण अजुन लांब आहे. कसा देऊ तुला पैसे?” म्हणत बाॅसने नकार दिला. पण थोडी विनवणी केल्यानंतर व त्याची सर्व हकीकत ऐकल्यानंतर बाॅस पैसे द्यायला तयार झाला. पण त्यापूर्वी त्याच्याकडून  मरणाचं काम  करून घेतले. थकलेल्या अवस्थेत तो घरी आला आणि न थांबता लगेच जायला निघाला.

गावी पोहोचल्यावर तो घरी न जाता सरळ दवाखान्यात गेला. डाॅक्टरांना भेटला. डाॅक्टरांशी भेट झाल्यानंतर बाहेर आला. तेव्हा समोर त्याचा भाऊ उभा दिसला. त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊ लागला. पण भाऊने त्याला हाक दिली “रोहित” तो मागे वळला. आणि एखाद्या अनोळखी माणसाने माणसाकडे आवाज दिल्यावर जसं उत्तर दिलं जातं. तस त्याने त्याला पाहीले. आईही बाजुलाच दवाखान्यातील खुर्च्यावर बसली होती. “फक्त तुझेच नाही माझेही बाबा आहेत ते. आता यापुढचा इलाज मी करेल त्यांचा” रोहीतने त्याला काही उत्तर दिले नाही. पण बाजुलाच बसलेल्या आईला त्याच्या बोलण्यात त्याचा स्वार्थ वाटला. तीने शांतपणे त्याला उत्तर दिले ” आता काही नाही रं बाबा आमच्याकडे तुला हिस्सा देण्यासाठी. डोकी लापवण्यासाठी तेवढी झोपडी -हायलीय.  जा घेऊन जा ती बी. पण अश्या येळेला नको येऊ बाबा मंधी. एकतर आधीच पोरगं मरतयं माझं” आईच्या या बोलण्याने भावाच्या डोळ्यांत पाणी आलं. रडतच त्याने आईचे पाय धरले. आणि म्हटला ” नाही आये, मी काही घेण्यासाठी नाही आलो. मोठा मुलगा म्हणुन माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी आलोय. चुकलं माझं, माफ कर मला” त्याच्या विरहाच्या दिवशी रडून-रडून डोळे सुजवून घेतलेली आईच्या डोळ्यांत आता मात्र एक थेंबही दिसत नव्हता. या आधीही त्याने अश्याच भावनिक गोष्टी बोलुन पार भिकेला लावलं होतं. म्हणुन त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. आणि म्हणुन ती गप्प होती. आईने कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणुन तो रोहित जवळ गेला. ” रोहित तू तरी सांग ना आईला. बघ ना ती कशी बोलतेय.” रोहितला मात्र त्याच्याबद्दल थोडीशीही तक्रार नव्हती. त्याने एक नजर आईकडे पाहिलं आणि भाऊकडे पाहून म्हटला. ” बाबा अजुन थोडेच दिवस………. ” अर्धवटचं बोलला आणि त्याचा अश्रंचा बांध फुटला. भाऊने त्याला मिठीत घेतले. आणि दोघेही ढसाढसा रडू लागले. दोघा भावांच्या कित्येक वर्षानंतरच्या भेटीने व त्या प्रेमळ मिठीने आईचेही डोळे पाणावले. ती ही निशब्द झाली होती.

 

© कपिल साहेबराव इंदवे

मु पो. मा. मोहीदा त श , ता. शहादा जि. नंदुरबार

मोब. 9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – ☆ पबजी ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे 

श्री कपिल साहेबराव इंदवे 

साहित्यिक प्रवास-

उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक म्हणुन लेखकाची ख्याती आहे. विविध सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग. पाणीटंचाई, वाढत चाललेली बेरोजगारी, विविध सामाजिक प्रश्न व हल्लीची राजकारणाची स्थिती यावर लेखक आपले स्वतंत्र मत मांडतात. लेखकाने अनेक कथा लिहील्या असुन. त्यांच्या लेखन शैली आणि कविता पाहुन ” *काव्य  स्पंदनी माझी  कविता*” या प्रातिनिधिक  काव्य संग्रहात प्रकाशकांनी त्यांच्या कवितांची दखल घेतली आहे. विविध कवी संमेलन, विद्रोही साहीत्य संमेलन यातुन लेखकांनी कविता सादर करतांना लेखकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. येत्या अल्प काळात ते आपला कविता संग्रह प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहेत.

 

☆ पबजी ☆

 

“अरे मार त्याला मार मार” रोहित जोरात ओरडला. सकाळची वेळ होती. सगळेजण अजुन झोपलेले होते. रोहित पलंगावर तर आई बाबा आणि समिर खाली जमीनीवर झोपले होते. त्याच्या अशा ओरडण्याने  आई बाबा आणि समिरही झोपेतून झटकन उठले. आईचं ह्रदय त्या  आरोळीने हादरलं होतं. ती उठताच त्याच्या जवळ गेली. आणि त्याच्या अंगावरचे पांघरून हळुच काढले.” काय झालं बाळं” अस काळजीपूर्वक विचारले. पण त्याच्या हातात मोबाईल आणि कानात इयरफोन होते. तो पबजी खेळण्यात दंग होता. त्याच्या अंगावरचं पांघरून काढलं म्हणुन तो आईवर चिडला. “अगं आई तुला काय गरज आहे पांघरून काढण्याची. तुला तुझं काम नाही करता येत का?” त्याचं असं रागावून बोलणं पाहुन ती बिचारी मागे झाली. तो आपल्या पबजी खेळण्यात दंग झाला.

झोपमोड झाली म्हणुन समिरही आईवर रागावला. “आई याला सांग हं असं ओरडत जाऊ नको म्हणुन विनाकारण ओरडतो आणि दुस-या लोकांना परेशान करतो” ती बिचारी शांतपणे ऐकत होती. “बस रे झोप आता गुमानं. मोठा आहे तो तुझ्यापेक्षा” बाबांनी त्याला दम भरला.” मोठा आहे तर मग मोठ्यासारखं वागायला लावा ना. कशाला लहान लेकरावाणी ओरडतंय” समिर हळू आवाजात अंगावर गोदडे ओढत म्हटला. त्याचंही बोलणं खरं होतं म्हणुन बाबा काही बोलले नाहीत. त्यांनी आईकडे पाहीले. तिच्याही डोळ्यांत  तक्रार दिसत होती. ती स्वयंपाक घरात चालली गेली.

बाबा उठले आणि तिच्याजवळ गेले. ते जवळ आलेले पाहुन आई म्हटली “अहो तुम्ही त्याला काही म्हणत का नाही. मोठा झालाय तो आता. शिकला नाही तरी काय झाले. काहीतरी चांगल्या कामाधंदयाला लावा ना त्याला. दिवसभर नुसता पबजी खेळत बसतो. आणि तो धाकटा टिकटाॅकवर व्हीडीओ बनवत असतो. कंटाळा आला त्याचा. काय मिळतं त्यांना त्यात  देव जाणे” “मी बोलतो त्याच्याशी. तु काळजी करू नकोस” बाबानी तिला धीर दिला. आणि रुमाल घेउन अंघोळीला चालले गेले. ते अंघोळ करून बाहेर आले. तोपर्यंत चहा बनला होता. ते पलंगावर जाऊन बसले. रोहित अजुनही पबजी खेळत होता. आईने बाबांना चहा दिला. आणि रोहितला म्हटले “रोहित उठ आणि चहा घे लवकर” रोहितने मोबाईल उशावर ठेवला. आणि कंटाळून उठला आणि तसाच आवाजात बोलला “हो आई” आणि उठून ब्रश करायला गेला. आई समिरलाही म्हटली “तुला काय वेगळं आमंत्रण द्यावं लागेल का रे उठ तु पण. दिवसभर मोबाईल मध्ये अडकून राहता. आणि  सकाळी दहा वाजेपर्यंत झोपता.”  असं म्हणुन ती स्वयंपाक घरात गेली. रोहित ब्रश करून आला. आईने त्यालाही चहा दिला. आणि भिंतीजवळ उभी राहीली. बाबा चहा घेत होते. आईने त्यांना डोळ्यांनीच इशारा केला. बाबा तिचा इशारा समजले. आणि चहाचा एक घोट घेत रोहितला म्हटले. “किती दिवस चालणार हे सगळं” रोहितला ते कळलं नाही. “काय” तो उद्गारला. बाबा “रोहित तु आता मोठा झाला आहेस. काही घराची काळजी घेणार आहेस कि नाही. किती दिवस ते मोबाईल मध्ये बोटं खुपसणार आहेस” रोहितला बाबांच्या बोलण्यातला सार कळला. बाबा बोलत होते “तु शिकला तर नाहीच. पण आता एखादं काम बघुन घरखर्चाला मदत करणार आहेस कि नाही. तुझं लग्नही करायचेय पुढे त्यासाठी थोडी बचत नको का करायला. दिवसभर नुसता पबजी, टिकटाॅक काही कळत नाही मला तुमचं. तो लहान आहे तो काय आदर्श घेईल तुझा” रोहितला डिस्टर्ब केलं म्हणुन तो आधीच चिडलेला होता. त्यावर अजुन सकाळी सकाळी रामायण म्हणुन तो अधिकच चिडला.  “काही पण घेऊ दे आदर्श. तो कुठे एकतो माझं काही. काही बोललं तर उलट फिरून बोलतो तो. मला काही सांगू नका आणि हे असं टोमणे मारणं बंद करा.”

बाबांनी पुन्हा त्याला समजावले. “अरे बाबा. तुला टोमणे नाही मारत आहोत. तुला घरची जबाबदारीची जाणीव करून देत आहोत. तो लहान आहे त्याला काय सांगणार मी.” बाबांचा चहा संपला होता. त्यानी हातातला कप बाजूला करत म्हटले. रोहित- “मग मी काही काम शोधत नाहीये का? मी काय रिकामा बसुन आहे. काम मिळत नाही त्याला मी काय करणार?” आणि रागातच त्याने अर्धवट पिलेला चहाचा कप जोरात खाली ठेवला. आणि झपाटयात बाहेर निघुन गेला. बाबा त्याच्या या अगतिक वागण्याकडे बघतच राहिले. ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे टाकायचे होते. जे हात त्यांना मदतीला हवे होते त्या हातांवर मोबाईलने कधीच कब्जा जमवून घेतला होता. ते पाहून त्यांचे डोळे पाणावले. पण त्यांनी ते कसेबसे लपवले. पण आईच्या नजरेतून सुटले नाहीत. ती ही अधिर होऊन बघत राहिली.

 

© कपिल साहेबराव इंदवे

मु पो. मा. मोहीदा त श , ता. शहादा जि. नंदुरबार

मोब. 9168471113

 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कथा/लघुकथा – ☆ साहेब…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साहेब…! ☆ 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।)

त्या दिवशी ऑफिस मधलं सारं काम आटपून मी बाहेरच्या चहाच्या गाडीवर येऊन थांबलो महीना आखेर मुळे पाकीटातल्या कमी झालेल्या पैशाची गोळा बेरीज आणि घरी जाताना पुन्हा ट्रेन मध्ये तीच धक्काबुक्की तीच गर्दी डोक्यात प्रश्नांची सरमिसळ चालू असतानाच ,चहाचा एक एक घोट  ट्रेन च्या लढाईवर जाण्यासाठी मला सज्ज करत होता.

चहा संपवून मी चहाचा कप खाली ठेवणार  एवढ्यात ” साहेब ” ही करूण हाक माझ्या कानावर पडली. मी त्या दिशेने पहाताच माझ्या समोर त्या माऊलीने पसरलेला हात मागे घेतला. तिच्या सोबत असणारं तिच लहान लेकरू तिला घट्ट बिलगून उभ राहील होतं. मी तिच्या हातावर रूपाया देण्यासाठी खिशात हात घालणार , एवढ्यात त्या माऊलीने पुन्हा माझ्यासमोर हात पसरला आणि लेकरांबद्दलची सारी माया एकवटून तिनं, “साहेब  ‘पाच रू’ आहेत का ?” म्हणून  विचारलं. खरं सांगायचं तर कुणीही पैशाची मदत मागितल्यावर त्याला कशासाठी म्हणून विचारायचं नाही. जमत असेल तर हो म्हणायचं नाहीतर नाही म्हणायचं असा माझा स्वभाव.  पण मुळात नाही म्हणणं आपल्या स्वभावात बसत नाही. पण त्या दिवशी तिनं पाच रूपये आहेत का विचारताच माझ्या तोंडून कसाकाय तो अचानक  ‘कशासाठी’ हा शब्द बाहेर पडला कदाचित त्या माऊलीच्या चेह-यावर एकवटलेली  तिच्या लेकरांबद्दलची माया बघूनच डोक्यात चाललेल्या प्रश्नांच्या गुंत्यातून वाट काढत तो शब्द ओठांवर आला असावा. तिनेही मग लेकराच्या डोक्यावरून हात फिरवत काहीशा अस्वस्थतेनच उत्तर दिलं  “लेकरांला भूक लागलीय , साहेब ” .मनात विचार केला की पाच रुपयात ह्या लेकराच पोट खरंच भरेल का? आणि त्याचं पोट भरलं तरी त्या मायेच्या भुकेच काय ? तिला भूक लागली नसेल का..? मी काहीच बोलत नाही हे बघून ती दोघं पुढे निघून जात असतानाच मी त्यांना आवाज दिला माघारी  बोलवलं.

चहाच्या गाडीवर कामाला असणा-या गणप्याला सांगून त्या माय लेकराला पोट भर मिसळ पाव खायला द्यायला सांगितलं. त्या माऊलीन माझ्यासमोर हात जोडले अन् म्हटली साहेब एवढं नको फक्त पाच रूपये द्या मी तिला काही न बोलताच दोघांनाही बसायला खुर्ची दिली त्या माऊलीने पुन्हा नकारार्थी मान डोलवली आणि म्हटली इथं नको आम्ही तिथं खाली बसून खातो मी म्हटलं नाही इथेच बसून खायचंय तेव्हा गणप्यानं रागानच त्याच्या समोर मिसळची डीश आणून ठेवली तेव्हा मी ही गणप्याकडं रागाने बघताच गणप्या निघून गेला. दोघा माय लेकरांना खाताना पाहून डोळ्यात पाणी दाटून आलं तिनं लेकरांला करून दिलेल्या पावांच्या तुकड्यां समोर माझ्या मनातले, प्रश्नांचे तुकडे अगदीच शूल्लक वाटू लागले त्या दोघांनीही पोटभर खाऊन हात धूतल्यावर  ती माऊली  पुन्हा माझ्या समोर येऊन उभी राहिली अन् पुन्हा माझ्या समोर हात जोडले अन् म्हटली ” खूप उपकार झालं  , येळेला मदत केली साहेब .” त्या माऊलीने मला साहेब म्हणून हाक मारताच मी म्हटलं साहेब नका म्हणू… मी त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवताच, ते दोघं निघून गेले .

पण मी मात्र त्यांना बराच वेळ पहात उभा राहिलो. साहेब शब्दात  अडकलेला मी  आज गरजवंताला देवता स्वरूप भासलो होतो. मी तसाच  उभा होतो. .  रोज रेल्वे स्टेशन वर गर्दी नसलेल्या ट्रेन ची वाट पहात उभा असतो तसाच……!!

 

© सुजित कदम, पुणे

मोबाइल 7276282626.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – ? वृत्ती -निवृत्ती ? – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

? वृत्ती -निवृत्ती ?

(सुश्री प्रभा सोनवणे जी  हमारी  पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं ।  हमें हमारे अस्तित्व से रूबरू कराती हुई वृत्ती -निवृत्ती  जैसी लघुकथा सुश्री प्रभा सोनवणे जी जैसी संवेदनशील लेखिका ही लिख सकती हैं।)

आजही कामवाली  आली नाही. निशा भांडी घासायच्या तयारीला लागली पण बराच वेळ भांडी घासायची मानसिकता होईना, नवरा म्हणाला “शेजा-यांच्या बाईला सांग ना आपलं काम करायला”!

“असं ऐनवेळी कोणी येणार नाही.” असं म्हणत ती भांडी घासायला लागली! कामवाली जे काम वीस मिनीटात करते त्याला पाऊण तास लागला!

हुश्श ऽऽ    करत निशा आराम खुर्चीत बसली. मोबाईल हातात घेतला उगाचच दोन मैत्रिणीं मैत्रिणींना फोन केले, नंतर फेसबुक ओपन केलं…तर समोर नॅन्सी फर्नांडिस  चा फोटो, “people you may know” मधे नॅन्सी फर्नांडिस! तिची कॉलेज मधली मैत्रीण! निशा ला अगदी युरेकाऽऽ युरेकाऽऽ चा आनंद! पन्नास वर्षांनी मैत्रीण फेसबुक वर दिसली! बी.एस.सी. च्या शेवटच्या वर्षी त्या दोघींचं कशावरून तरी बिनसलं होतं. सख्ख्या मैत्रिणी वैरीणी झाल्या!

पण त्या क्षणी निशाला नॅन्सी ची तीव्रतेने आठवण आली.  कॉलेज च्या पहिल्या दिवशीच नॅन्सी भेटलीआणि मैत्री झाली. तीन वर्षे  एकमेकींवाचून चैन पडत नव्हतं. पहाटे  अभ्यासासाठी नॅन्सी चं दार ठोठावलं की, नॅन्सी ची आई म्हणे,

“नॅन्सी म्हणजे “लेझी मेरी” आहे, दहा वेळा उठवलं पण अजून बिछान्यातच आहे!”

नॅन्सी च्या आईच्या हातचा तो मस्त  आल्याचा चहा… आणि  अभ्यास! किती सुंदर  होते ते दिवस….

कुठल्या शाळेत अगदी क्षुल्लक कारणावरून झालेलं भांडण…. एकमेकींपासून किती दूर नेऊन ठेवलं त्या भांडणाने….निशाचे डोळे भरून आले.

तिनं नॅन्सी ची फेसबुक प्रोफाईल पाहिली. ती वसई ला रहात असल्याचं समजलं….निशानं तिला रिक्वेस्ट पाठवली…

पाच सहा दिवस झाले तरी रिक्वेस्ट स्वीकारली गेली नव्हती. निशाचं आडनाव बदललेलं.. पन्नास वर्षात चेहरा मोहरा बराच बदललेला!

नॅन्सी ने ओळखलं नसेल का? की मनात राग आहे  अजून? निशा खुपच बेचैन झाली!

आणि  एक दिवस फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारल्या चा मेसेज आला. मेसेंजर वर नॅन्सी चे मेसेज ही होते, “कशी आहेस? खुप छान वाटलं तुला फेसबुक वर पाहून! आठ दिवस फेसबुक पाहिलंच नाही!”

मग महिनाभर चॅटींग, फोन  होत राहिले! नॅन्सी चा वसई ला ये…हे आग्रहाचं  आमत्रंण स्वीकारून निशा वसई ला पोचली! थांब्यावर नॅन्सी स्कूटर वर न्यायला आली होती. टिपीकल ख्रिश्चन बायका घालतात  तसा फ्रॉक, पांढ-या केसांचा बॉयकट….दोघी ही सत्तरीच्या  आत बाहेर!

नॅन्सी ची स्कूटर  एका चर्च च्या आवारात येऊन थांबली. बाजूलाच तिचं बैठं घर….मस्त कौलारू …प्रशस्त!

“हे घर माझ्या आजी चं आहे, मला  वारसा हक्काने मिळालेलं!”

नॅन्सी बरीच वर्षे  अमेरिकेत राहिलेली, नवरा, मुलं, सूना, नातवंडं  सगळे  अमेरिकेत!

नॅन्सी ला मातृभूमी चे वेध लागले आणि ती भारतात  आली. वसई तिचं  आजोळ, दोन वर्षांपूर्वी नॅन्सी इथे  आली, अगदी  एकटी….

“तुला एकटीला करमतं इथे?” या निशा च्या प्रश्नावर नॅन्सी हसली,

“आपण एकटेच  असतो गं आयुष्याभर, कुटुंबात राहून  एकटं असण्यापेक्षा, हे एकटेपण आवडतं मला!”

“पण मग वेळ कसा  जातो तुझा?”

“अगं  दिवस कसा जातो कळत नाही. माझी सगळी कामं मीच करते. बाई फक्त डस्टींग आणि झाडूफरशी करायला येते! आधी मीच करत होते, पण ती बाई विचारायला  आली,”

“काही काम  आहे का?”

“ती सकाळी लवकर येऊन काम करून जाते, आम्ही सकाळ चा चहा  आणि ब्रेकफास्ट बरोबर घेतो. खुप गप्पीष्ट आहे ती, लक्ष्मी नाव तिचं!”

मग दिवस भर मी एकटीच…स्वयंपाक, कपडे मशीन ला लावणं, भांडी घासणं, रेडिओ ऐकते, वाचन करते, मोबाईल आणि टीव्ही फारसा पहात नाही. आणि मुख्य म्हणजे मी लोकरीचं विणकाम भरपूर करते, दुपारी चार मुली येतात लोकरीचं वीणकाम शिकायला!

रविवारी  चर्च, गरीबांना मदत करते, माझं एकटेपण मी छान एंजॉय करतेय….

थोडं फार सोशल वर्क…गरीब गरजूंना मदत करते…पैसे आहेत माझ्या कडे आणि माझे खर्च ही फार नाहीत.

विशीत दिसत होती त्यापेक्षा नॅन्सी आता खुप सुंदर दिसत होती. चेह-यावर, व्यक्तिमत्वात जबरदस्त  आत्मविश्वास!

पूर्वी ची झोपाळू, हळूबाई असलेली नॅन्सी खुपच चटपटीत, स्मार्ट झाली होती. तिचा त्या घरातला वावर, व्यवस्थितपणा, वक्तशीरपणा, कामातली तत्परता, कामवाली शी बोलण्याची पद्धत, पटकन केलेला रूचकर स्वयंपाक सारंच विलोभनीय होतं!

चार दिवसांत निशानं  इकडचा चमचा तिकडे केला नाही..म्हणजे नॅन्सी ने तिला तो करू दिला नाही..” तू बस गं, ही माझी रोज ची कामं  आहेत”   असं म्हणत ती घरातली कामं फटाफट उरकत होती.

भरपूर गप्पा…जुनी गाणी ऐकणं…वसई च्या किल्ल्यातली आणि आसपासच्या परिसरातील भटकंती… सारं खुप सुखावह! पन्नास वर्षाचा भला मोठा कालखंड निघून गेला होता. पण या चार दिवसांत त्या कॉलेजमधल्या निशा – नॅन्सी होत्या.

“नॅन्सी किती छान योगायोग आहे  आपल्या भेटीचा! आठवणींना वय नसतं, त्या सदा टवटवीत  असतात…..जशी तू..मी मात्र  आता म्हातारी झाले…आणि म्हणूनच निवृत्त ही!”

“निशा निवृत्ती ला वय नसतं, ते आपण ठरवायचं…जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम ….”

“खुप छान वाटतंय गं, का अशा दूर गेलो आपण? आपल्या भांडणाचं कारण ही किती फालतू……”

“जाऊ दे निशा….नको त्या आठवणी, जर तसं घडलं नसतं तर आज हा आनंद  आपण घेऊ शकलो असतो का? सारी देवबापाची इच्छा!

नॅन्सी ला दोन मुलगे, निशाला दोन मुली सगळे  आपापल्या करिअर मधे, संसारात मश्गुल……

नॅन्सी सारे पाश सोडून इतक्या लांब नव्या  उमेदीने आलेली… वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी केलेली नवीन सुरूवात…तिच्या वैवाहिक  आयुष्याबद्दल ती फारसं बोलत नव्हती! निशा चा संसार ही फारसा सुखाचा नव्हता, गेली पन्नास वर्षे टिकून होता इतकं च!

निशा जायला निघाली तेव्हा नॅन्सी नं तिला घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यात  अश्रू च्या धारा…बाहेर पाऊस….

नॅन्सी ने स्वतः विणलेला बिनबाह्यांचा शुभ्र पांढरा स्वेटर निशा च्या अंगावर चढवला आणि हातात हात गुंफून पाऊस थांबायची वाट पहात बसून राहिल्या…

आता त्या परत कधी परत भेटणार होत्या माहित नाही….

निशा घरी पोचली तेव्हा, नवरा टीव्ही वर रात्री च्या बातम्या पहात होता…तिला पाहून त्याच्या चेह-या वरची रेषा ही हलली नाही.

निशा च्या  आळशी सुखवस्तूपणाची साक्षीदार  असलेली आराम खुर्ची तिची वाटच पहात होती…….

खरंच निवृत्ती ला वय नसतं ती वृत्ती असते निशा स्वतःला च सांग त होती…..

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

 

Please share your Post !

Shares
image_print