आपल्या भुकेल्या मुलाला दोन मिनटात मँगी खाऊ घालणारी आई.फक्त कमी वेळेचे गणित मांडते.पौष्टिक घटक, गुणवत्ता लक्षात घेत नाहीं! तोच प्रकार खेळात.. पाच दिवसांची मँच..एक दिवसावर…वीस षटकांवर आली. कमी वेळात ..जास्त मँचेस असे गणित मांडले जाते.
….रंगमंचावर पण तेच चित्र. पाच अंकी नाटक. तीन…दोन…एकांकीवर आले. नंतर पंधरा मिनिटांची नाटुकली. संख्यात्मक विचार .काळाचे भान ठेऊन वेळेची बचत करणे. ही सोय ठरली !
८ मार्च चे औचित्य साधून..भारतात प्रथमच रंगमंचावर रुजणार …दोन मिनटांच्या नाटिका. अन् त्या ही महिलांद्वारे..
आता फक्त दोन मिनटात.. साभिनय स्वत:ला सिद्ध करणे. एकपात्री / सामुदायिक, संपूर्ण मुभा आहे!
सामाजिक विषयांचे अनेक पदर फक्त दोन मिनटात गुंफायचे… आशय महत्वपूर्ण.
विषयात खोलवर डुंबायचे नाहीं!! शिवाय कमी वेळात अनेकांना संधी मिळणार ! तोंडाचा रंग पुसण्याची जरुरी नाहीं. दोन मिनटाचा खेळ खेळून.. एका दिवसात अनेक भरा-या घेऊन उच्चांक गाठु शकता. चला तर मग… बांधा पदर… व्हा ..अभिनेता 🎭 / अभिनेत्री 🎭 …
आपण एकेक गंमती बघत रहायचे.
“मी दोन मिनटांचे एका दिवसात पन्नास प्रयोग केले”
नटाने फुशारकी मारायची ..
आणि आपण त्या दोन मिनिटाच्या प्रयोगासाठी इंधन, वेळ, पैसे खर्चून जायचे.
आपली किमान 20 मिनिटे घालवायची…….असो.
आपण शुभेच्छा देऊया.
लेखिका उन्नती गाडगीळ
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मृणालला जाग आली आणि किती वाजले बघायला मोबाईल घेण्यासाठी हात सवयीनं बाजूला करायला गेली. अरेच्चा! हाताला हे काय अडकतंय? तिनं खडबडून डोळे उघडले आणि हाताला लावलेल्या सलाईनकडे तिचं लक्ष गेलं. आपण हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट आहोत याची तिला जाणीव झाली.
काल सकाळी जरा कणकण वाटत होती, पण करोना काळात अत्यावश्यक सेवेत असल्याने तिला रजा घेणं कठीणच होतं. ती महानगरपालिकेची कर्मचारी होती आणि सध्या कामाचा ताण भरपूर होता. काही कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबीय करोना बाधित झाल्याने कामावर येऊ शकत नव्हते. म्हणून काम भरपूर आणि स्टाफ कमी अशी अवस्था होती. त्यामुळेच ती ८.४० ची सी. एस. टी. लोकल पकडून शिस्तीत आॅफिसला गेली. फ्रेश होऊन कँटिनवाल्याकडून एक कडक काॅफी घेतल्यावर जरा बरं वाटलं आणि ती कामाला लागली. पण साडेबाराच्या सुमारास तिला अस्वस्थ वाटायला लागलं. चक्कर येतेय, श्वास अडकतोय अशी विचित्र अवस्था झाली. मैत्रिणीनं गरम पाणी दिलं, अॅसिडिटी असेल तर म्हणून, पण फरक पडेना. मग मात्र गाडी बोलावून त्यांनी तिला हाॅस्पिटलमध्ये आणलं. करोनाची लक्षणं म्हणून तिची रक्त तपासणी आणि छातीचा एक्सरे काढला गेला. आणि विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार सुरू झाले होते. त्यानंतरचं तिला काही आठवत नव्हतं आणि आत्ता सकाळी जाग आली होती.
बापरे! आपल्या घरी काय हाहाकार माजला असेल? सवितानी मुकुंदला फोन करून आपल्या घरी कळवलं असेलच. तिच्या घरी मुकुंद – तिचा रिटायर्ड नवरा, विशाल-विराज हे दोन्ही मुलगे – नोकरी करणारे, सासूबाई वय ८० – बी. पी., डायबेटिस पेशंट, जेमतेम स्वतःचं करणाऱ्या आणि ७६ वर्षांची आई संधिवाताने अंथरूणाला खिळलेली. कसं होणार या सगळ्यांचं या विचाराने तिचं डोकं परत गरगरायला लागलं.
मृणाल एकुलती एक मुलगी. ग्रॅज्युएट झाल्यावर महानगरपालिकेत नोकरीला लागली. आणि पुढच्याच वर्षी कर्णिकांच्या घरात सून म्हणून प्रवेशली. मुकुंद केमिकल इंजिनियर,त्याचे वडील दोन वर्षांपूर्वीच निधन पावलेले. मोठ्या बहिणीचं लग्न होऊन ती अंधेरीला राहात होती. त्यामुळे घरी फक्त आई आणि तो, अशी दोनच माणसं! मुलुंडला थ्री बीएचके फ्लॅट होता त्यांचा. घरात पोळ्यांना आणि वरकामाला बाई होती. सासूबाई तेव्हा तब्येतीने ठणठणीत होत्या, पण सुनेनं आपल्याला सगळं हातात दिलं पाहिजे, या वृत्तीच्या. मृणाल तशी सोशिक स्वभावाची, शिवाय आईला दुखवायचं नाही, हा नवऱ्याचा बाणा! त्यामुळे तिची कायम फरपट होत राहिली. पुढे दोन वर्षांच्या अंतराने विशाल, विराजचं आगमन झालं. दोन्ही बाळंतपणं तिच्या आईनेच केली. घरी आल्यावर लांबून कौतुक करण्याइतपतच सासूबाईंना नातवंडांचं प्रेम!
मुलांना सांभाळायला मात्र पाळणाघरात ठेवायचं नाही हो, हा त्यांचा आदेश! त्यामुळे त्यांना सांभाळायला घरातच बाई ठेवली होती. मुकुंदला त्याचवेळी प्रमोशन मिळालं आणि तो बेंगलोरला गेला. मग काय महिन्यातून दोन-तीन दिवसच घरी यायचा. तसाही घरात तो तिला काही मदत करत नव्हताच. मुलांचं संगोपन ही आईचीच जबाबदारी, हा साई-सुट्ट्यो ! सासूबाई हाॅल मध्ये सोफ्यावर बसून टी. व्ही. मालिका बघणार, जेवणार खाणार आणि निवांत झोप काढणार, सून घरात असेल तोवर तिला आपल्या तालावर नाचायला लावणार आणि कुरबुरी करत राहणार, हाच त्यांचा दिनक्रम होता. मृणाल तारेवरची कसरत करत गाडा रेटत राहिली. विशाल – विराज, दोन्ही मुलं हुशार निघाली. एक सी. ए. आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झाला.
पाच वर्षांपूर्वी मृणालचे बाबा गेले. पण आग्रह करूनही आई तिच्याकडे राहायला तयार झाली नाही. ती एकटीच कळव्याला राहात होती. पण दोन वर्षांपूर्वी आईला संधिवाताने गाठलं आणि ती बिछान्याला खिळली. मग मात्र मृणाल तिला आपल्या घरीच घेऊन आली.तिच्यासाठी दिवसा आणि रात्री अशा दोन केअरटेकर ठेवल्या होत्या. सासूबाई आणि आई अश्या दोघी वयस्कर, आजारी! मुलं आपल्या नोकरीत आणि स्वतःत रममाण होणारी, मुकुंद मागच्या वर्षी रिटायर झाला, त्यालाही बी. पी., शुगर आणि एक हार्ट अॅटॅक येऊन गेलेला. त्यामुळे सगळी धडपड, धावपळ मृणालनंच करायची. जीव मेटा…
लेखिका – प्रणिता खंडकर
संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈