मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 36 – वैभव जोशी….. एक वैभवशाली गझलकार ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनका  एक  स्मृति चित्र “वैभव जोशी….. एक वैभवशाली गझलकार.  अक्सर हमारे जीवन में कुछ लोग मिलते हैं और अपने सहज सौम्य व्यक्तित्व की एक अमिट छाप छोड़ देते हैं। साहित्यिक विभूतियों का जीवन भी कुछ भिन्न नहीं है।  ऐसे ही प्रभावशाली व्यक्तित्व के  धनी हैं  श्री वैभव जोशी जी। मैं आभारी हूँ , सुश्री प्रभा जी  का जो उन्होंने मेरे आग्रह को स्वीकारा और सुप्रसिद्ध मराठी कवि / ग़ज़लकार / गीतकार श्री वैभव जोशी जी  के सन्दर्भ में अपने आत्मीय विचार उतने ही सहज भाव से हमें हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करने का अवसर दिया।   

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 36 ☆

☆ वैभव जोशी….. एक वैभवशाली गझलकार ☆ 

कवी / गझलकार / गीतकार  म्हणून  आज वैभव जोशी सर्वदूर परिचित आहेत.

माझ्या मते वैभव सध्या  सर्वाधिक लोकप्रिय कवी आहे! मी वैभव जोशींना सर्व प्रथम वाईच्या “गजल सागर” च्या  संमेलनात सर्वप्रथम ऐकलं, त्यांची गझल आणि सादरीकरण अप्रतिम होतं!

त्या वर्षी मी “काव्य शिल्प” या कवींच्या संस्थेची अध्यक्ष होते, एका कार्यक्रमात मी वैभव जोशी ना पाहुणा म्हणून बोलंवलं! कारण  गजलसागरच्या नियतकालिकांमध्ये वैभवच्या गझला वाचल्या होत्या, तीच आमची ओळख एकमेकांशी!

त्यानंतर नागपूर च्या अ.भा.साहित्य संमेलना निमित्ताने  नागपूर येथे भेट झाली मी निमंत्रित कविसंमेलनात होते तर वैभव गझलसंमेलनात!

वैभव च्या वाढदिवसानिमित्त उद्यानप्रसाद कार्यालयात आयोजित केलेल्या चंद्रशेखर सानेकरांबरोबरच्या   कार्यक्रमाला मी गेले होते नंतर भरत नाट्यमंदिरात झालेल्या सौमित्र बरोबर च्या कार्यक्रमानंतर  वैभव चे अनेक कार्यक्रम पाहिले, टीव्ही, सिनेमात वैभव ची गीतं ऐकली, फेसबुक वर अनेक कविता, गझला ऐकल्या!

दोन वर्षांपूर्वी माझा सत्तावन्न वर्षाचा मामेभाऊ गेला, ती भावना व्यक्त करणारी पोस्ट मी फेसबुक वर टाकली तेव्हा वैभवची कमेन्ट होती, “ताई…क्लेश होणारच,  कधीही एकाकीपण वाटलं तर मला हाक मारा . मी आहे”.

वैभव मला नेहमीच धाकट्या भावासारखाच वाटतो, मी गेली अनेक वर्षे काव्यक्षेत्रातील वैभवची दैदिप्यमान कारकीर्द पहाते आहे. कवी म्हणून आणि माणूस म्हणूनही वैभव आवडतोच, हसतमुख, प्रेमळ, वडिलधा-यांचा आदर ठेवणारा! एक कवयित्री मध्यंतरी खुप भारावून सांगत होती, “अगं  वैभव जोशी नी मला अगदी वाकून नमस्कार केला”!

मी म्हटलं “तो सगळ्या म्हाता-या कवयित्रींना तसा नमस्कार करतो, मलाही!”

एकूण वैभव च्या डोक्यात हवा गेलेली नाही, त्याच्या अनेक गझला, कविता, गीतं आवडतात…..पूर्वी मला तो क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत सारखा वाटायचा…आता कधीतरी त्याच्यात यशवंत दत्त चा भास होतो, असो. तरीही वैभव वैभव आहे एकमेव! अनेकांचा लाडका कवी! स्वतःचं वेगळेपण जपणारा! वैभव ची “वगैरे” गझल खुप गाजलेली!

शेवटी माझा आवडता वैभव जोशी चा शेर—

बोलला सायलेंटली पण जाब मागत राहिला,

रात्रभर माझ्या उशाशी फोन वाजत राहिला

अनेक शुभेच्छांसह,

-प्रभा सोनवणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ वार्ता ☆ शब्दांचा प्रवास हृदयपासून हृदयपर्यन्त – कविराज विजय यशवंत सातपुते ☆ वार्ताकार – श्री काशिराम खरडे

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है  मोहरली लेखणी साहित्य समुह का विशेष  वार्ता कार्यक्रम  आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत…। किसी भी विशिष्ट व्यक्ति से वार्ता एक कला है। श्री काशिराम खरडे जी वास्तव में इस कला में दक्ष हैं। हम इस विशेष वार्ता के लिए कविराज विजय यशवंत सातपुते जी, मोहरली लेखणी साहित्य समुह एवं श्री काशिराम खरडे जी  के हृदय से आभारी हैं । 

 मोहरली लेखणी साहित्य समुह प्रस्तुति –  आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत… ☆

नमस्कार मोहरलीकर…

आज आपण _आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत…_ या आपल्या साप्ताहिक उपक्रमाअंतर्गत एका अशा साहित्यिकांशी संवाद साधणार आहोत, जे मागिल तीन दशकांहून अधिक काळ साहित्यसेवा करत आहेत. राज्य शासनाच्या अनुदानातून ज्यांचा काव्य संग्रह रसिकांपर्यंत पोहोचला. शेतीमाती पासून चित्रपटांपर्यंत ज्यांच्या शब्दांनी रसिकमनाला भुरळ घातली. असे जेष्ठ साहित्यिक “कवीराज विजय सातपुते”…

चला तर मग… जाणून घेऊया विजयजींकडून त्यांच्या साहित्यिक प्रवासाबद्दल…

नमस्कार कवीराज

मोहरली लेखणी साहित्य समुहाच्या “आठवांच्या हिंदोळ्यावर.. काशिराम खरडे सोबत… आ उपक्रमात आपले स्वागत..

खरं तर एवढा मोठा साहित्य प्रवास, साहित्याची अस्सल जाण, साहित्यासोबतच पत्रकारीतेच्या क्षेत्रातही नावलौकिक मिळवत शब्दांची नैसर्गिकता जपणं… हे खूप कमी लोकांना जमतं. आपण ‘साहित्य’ या संकल्पनेकडे कसं बघता….

विजय सातपुतेनमस्कार, सर्व प्रथम  आपल्याला.  आणि समस्त मोहरली करांना.

कथा,  कविता, लेख यांची निर्मिती करताना मांडलेले  आशय, विषय जितके लोकाभिमुख तितके  आपले साहित्य रसिकांना जास्त भावते त्या साठी वाचन, लेखन, चिंतन आणि मनन, यांचा व्यासंग खूप  उपयोगी ठरतो  असे मला वाटते. साहित्य हे माणूस जीवंत ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे  असे मला वाटते.

काशिराम खरडे व्वाह…!!

माणसाचं जिवंतपण साहित्यात दडलेलं आहे हा अतिशय उमदा विचार आपला… बहोत खूब…!

सर, आपण १९८८ पासून लिहिताय, असं आम्हाला कळलं. हा एवढा प्रदीर्घ साहित्यिक अनुभव गाठीशी बांधून साहित्याच्या प्रांगणात वावरत असतांना बऱ्याच आठवणींच्या गाठोड्यातील एखादी अशी आठवण सांगता येईल की ज्यामुळे आपण साहित्याशी जुळले गेलात…?

विजय सातपुतेखरं तर  आज मागे वळून बघताना  इतका साहित्य प्रवास  आपला होईल हे त्या वेळी कुणी भाकीत केले  असते तर ते खोटे ठरले  असते पण दोन महत्वपूर्ण घटना घडल्या  आणि मी साहित्याशी जोडला गेलो.

1992 मध्ये राज्य स्तरीय काव्य संमेलन आणि स्पर्धा चे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. यावेळी राजा गोसावी, वसंत शिंदे, वसंत बापट आणि जीवन राव कीर्लोस्कर व्यासपीठावर होते. तेव्हा मी केलेले स्वागत गीत आणि मोरपीस कविता सर्वांना  अतिशय  आवडली.  वसंत बापट यांनी सभागृहातून माझ्या वडिलांना व्यासपीठावर बोलावून घेतले. त्यांच्या हातून पुष्पहार अर्पण केला व पेढे दिले आणि त्याच वेळी मला कविराज पदवी बहाल केली. हा  आनंद क्षण आणि जगदीश खेबुडकर यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन मला साहित्याचा नावकरी आणि गावकरी बनवून गेले.

ऐन वसंती,  बहर संगती

वसंत बापट नाव गाजते

भावनेच्या शिशिरालाही

वसंत वैभव देऊन जाते

धन्य लेखणी नरोत्तमाची

स्वागत करतो तिचे

स्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम.

 

राजा राजा काय चीज ही

वाचून पाहून सांगा मजला

गोष्ट राजा गोसावींची

धन्य धन्य त्या  अभिनयाची

स्वागत करतो  अभिनयाचे

स्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम.

 

असे त्यातील ददोन कडवी होती.

काशिराम खरडे खरंच किती भाग्यवान आहात आपण इतक्या उत्तुंग व्यक्तीमत्वांकडून कौतुकाची थाप मिळणं, ही खूप मोठी गोष्ट आहे.

आपल्या एकंदरीत साहित्य प्रवासाबद्दल सांगावं…

विजय सातपुतेसाहित्यिक, नाट्य, संगीत, आणि तमाशा कलावंतांना जवळून पाहण्याची संधी या साहित्य प्रवासाने दिली. 1993 ते 2013 पर्यत डिफेन्स अकौंट मध्ये सर्व्हिस केली.  अनेक कविता लिहिल्या.  2005 मध्ये पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला.  अक्षरलेणी या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे  अनुदान मिळाले.  अनेक शासकीय  आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले.  अक्षरलेणीकार म्हणून  ओळख मिळाली. प्रस्तावना कार,  मानपत्र लेखन  आणि वृत्त पत्र स्तंभलेखन यातून संपूर्ण महाराष्ट्रात मित्रपरीवार रसिक वर्ग निर्माण झाला.

2012 मध्ये अक्षरलेणी संग्रहाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली.  या संग्रहास महाकवी कालिदास पुरस्कार प्राप्त झाला.

आजपर्यंत कवितेच्या प्रत्येक काव्य प्रकारात लेखन केले आहे. विविध काव्य प्रकारात प्रविण्य संपादन करून अनेक पुरस्कार कवितानी मिळवून दिले आहेत.  गझल, हायकू,  चारोळी,  छंदोबद्ध रचना, मुक्त छंद रचना,   अभंग ,ओवी,  अष्टाक्षरी आणि नवकाव्य प्रकारात आजवर विपुल लेखन केले आहे. कथा लेखन,  ललित लेख लेखन दिवाळी अंकासाठी दरवर्षी केले जाते.  बालसाहित्य देखील लिहिले आहे.  अनेक शाळातून मुलांसाठी काव्य सादरीकरण केले आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावरून माझ्या जास्तीत जास्त कथांचे  अभिवाचन झाले आहे.  अनेक काव्य लेखन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा  आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी  आयोजन केले आहे.  अनेक कार्यक्रमांचे निवेदन केले आहे .या प्रवासात  वीस हून अधिक संस्थेत विविध पदांवर कार्यरत आहे ही संधी साहित्य क्षेत्राने दिली.

काशिराम खरडे आजवरच्या वाचनात सर्वात जास्त आडलेली साहित्याकृती….

विजय सातपुतेवाचनाचा वारसा  आईकडून मिळाला.  माझी आई 1967 सालची जगन्नाथ शंकर शेठ स्काॅलरशीप मिळालेली विदुषी आहे.  माझ्या दुप्पट वाचन तिचे आहे.  माझे वडील सरकारी कर्मचारी. पण वाचन संस्कृतीचा प्रचार  आणि प्रसार करण्यासाठी होम सर्व्हिस लायब्ररी भाग्यश्री वाचनालय सुरू केले. त्यामुळे विपुल वाचन केले  आहे. छावा कादंबरी, कुसुमाग्रज यांचा विशाखा कविता संग्रह  आणि शांता शेळके यांचा रेशीमरेघा कविता संग्रह या  आवडत्या साहित्य कलाकृती  आहेत.  डिटेक्टिव्ह कथा देखील खूप वाचायला  आवडतात.

काशिराम खरडे आपण पुणेकर आहात. पुणे हि खरंतर आपली सांस्कृतिक राजधानी. पण वेगळ्या अर्थाने विचारायचे झाल्यास पुणेरी पाट्या, पुणेरी टोमणे, पुणेरी लहेजा या व अशा इतर तत्सम गोष्टींमधूनही साहित्य डोकावतच असतं. पुण्याला साहित्याचा वारसाही खूप मोठा आहे. पुणेरी साहित्याबद्दल काय सांगाल…?

विजय सातपुते साहित्य जेव्हा लोकाभिमुख होते तेव्हा प्रांतनिहाय त्याचे वर्गीकरण लोकवैशिष्ट्ये पाहून केले जाते.  यात मनोरंजन,  प्रबोधन या बरोबरच स्वभाव प्रणित शब्द चित्र, व्यक्ती चित्रण देखील तुम्हाला लोकाभिमुख करतात. पुणेरी पाट्या, पुणेरी टोमणे याबरोबरीने  अभिजात साहित्यिक पुण्याने दिले आहेत.   वसंत बापट यांनी कित्येक संस्थाची घोषवाक्ये,  जाहिराती स्लोगन लिहिलेली आहेत. घेतलेल्या  अनुभवांच प्रगटीकरण करताना माणूस माणसाशी जोडला जावा हा लेखन  उद्देश मनात ठेऊन  आजवर चे लेखन  आणि साहित्यिक वाटचाल झाली आहे.  अजूनही सुरू आहे.

काशिराम खरडे कवितेबद्दल काय सांगाल…?

विजय सातपुते शब्दांचा प्रवास ह्रदयापासून ह्रदयापर्यत होताना होणारी कविता स्वतः जगते आणि  आपल्यातल्या माणसाला जगवते . कवितेने  मला  आजवर जे काही दिले आहे त्यात रसिकांचा  आशिर्वाद आणि दैनंदिन लेखन कला व्यासंग माझ्या दृष्टीने  अत्यंत महत्त्वाचा आहे.

जन्मणारी आपली प्रत्येक कलाकृती ही नवजात किंवा नवोदित  असते ती रसिकांसमोर स्पर्धा,  सादरीकरण या माध्यमातून  आली पाहिजे.  आपण  आता ज्येष्ठ झालो अमुक स्पर्धेत सहभागी होऊ नये हे मला पटत नाही. हा पण पुरस्कार मिळाले की लेखन  अधिक जबाबदारीने करावेसे वाटते त्यामुळे लेखन काळजीपूर्वक केले जाते. नाविन्य  आणि विविधता लेखनात  असावी त्या शिवाय लिखाण समृद्ध होत नाही  असे माझे मत आहे.  अनेक विषयांवर लेखन  आत्ता पर्यंत वृत्त पत्रातून कैले आहे.

काशिराम खरडे आणखी काय सांगाल…?

विजय सातपुते निवेदन, वृत्त पत्र लेखन,  काव्य लेखन,  कथा, कादंबरी,   आणि चित्रपट पटकथा लेखन  असा साहित्य प्रवास झाला आहे. दक्ष या  चित्रपटाची पटकथा व तीन गाणी लिहिली आहेत. मार्च 2020 मध्ये शुटिंग सुरू होईल. जय जवान, जय किसान या विषयावर सदर चित्रपट आहे.

प्रकाश पर्व हा कविता संग्रह जून 2019 मध्ये प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र भूषण  अष्टपैलू व्यक्ती मत्व म्हणून पुरस्कार डॉ  श्रीपाल.  सबनीस यांच्या हस्ते  आजवरच्या साहित्यिक वाटचालीकरता प्रदान करण्यात आला आहे.

निवेदन, वृत्त पत्र लेखन,  काव्य लेखन,  कथा, कादंबरी,   आणि चित्रपट पटकथा लेखन  असा साहित्य प्रवास झाला आहे. दक्ष या  चित्रपटाची पटकथा व तीन गाणी लिहिली आहेत. मार्च 2020 मध्ये शुटिंग सुरू होईल. जय जवान, जय किसान या विषयावर सदर चित्रपट आहे.

धन्यवाद विजय सातपुते जी. मोहरली लेखणी साहित्य समुहाला वेळ आणि मुलाखत दिली. आपल्या आगामी साहित्य प्रवासाला अनेक शुभेच्छा

प्रस्तुति – मोहरली लेखणी साहित्य समुह – आठवांच्या हिंदोळ्यावर… काशिराम खरडे सोबत…

साभार – विजय यशवंत सातपुते, यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009., मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ नव वर्ष विशेष -आज ह्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस… ☆ – सुश्री आरुशी दाते

सुश्री आरुशी दाते

( नव वर्ष की पूर्व संध्या पर  सुश्री आरूशी दाते जी  का  एक आलेख आज ह्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस… )

 

☆ आज ह्या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस…  

 

ह्या वर्षी जीवनात अनेक चढ उतार पाहिले, भिन्न भिन्न लोकांना भेटले, काही लोकं सोडून गेले(का ते मला माहित नाही), काही नवीन लोक जोडले गेले, काही जुनेच लोक नव्याने समोर आले…

खूप सारे अनुभव गाठीशी आले, कोणी चिखलफेक केली तर कोणी कौतुकाची फुलं उधळली, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या… मला माझा छंद जोपासता आला… अपेक्षित, अनपेक्षीत प्रसंगांना सामोरं जावं लागलं, कधी कधी पार खचून गेले, कधी कधी तब्येतीनं नाराजी व्यक्त केली…

हाती घेतलेली काही कामं सोडून द्यावी लागली, तर नवीन कामांची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली… पण हा प्रवास कुठेही थांबला नाही… मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक बाजू सांभाळताना होणारी ससेहोलपट आठवली की अंगावर शहारा येतो… अनेक संकटे आली तरी, सुखाच्या क्षणांनी संकटांना तोंड देण्यासाठी पंखात बळ दिले…

ह्याच सुखाच्या क्षणांना सोबत घेऊन आणि हे सुखाचे क्षण माझ्या आयुष्यात आणणारे माझे पती, माझी मुलगी, सासरचे कुटुंबीय, माहेरचे कुटुंबीय, नातलग आणि जीवश्च कठश्च मित्र मैत्रिणी ह्यांच्या सोबतीने पुढील वर्षात पदार्पण करते…

तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि तुमच्या ऋणात राहू दे हेच मागणे मागते…

आपणासर्वांना नवं वर्ष सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

 

लोभ असावा,

 

© आरुशी  दाते 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 29 – मला प्रभावित करणा-या स्त्रिया ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनका एक संस्मरणात्मक आलेख   “मला प्रभावित करणा-या स्त्रिया.  सुश्री प्रभा जी  ने  अतिसुन्दर, सहज एवं सजीव  रूप से उन सभी स्त्रियों  के साथ अपने संस्मरणों पर विमर्श किया है, जिन्होंने उनके जीवन को प्रभावित किया है। ऐसा अनुभव होता है जैसे वे क्षण चलचित्र की भांति हमारे नेत्रों के समक्ष व्यतीत हो रहे हों।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 29 ☆

☆ आलेख – मला प्रभावित करणा-या स्त्रिया ☆ 

मला वाचनाची आवड  इयत्ता  आठवी/ नववीत लागली. मी शिरूर च्या विद्याधाम प्रशालेत शिकत होते. आम्ही पुण्याहून  शिरूर ला आमचे  नातेवाईक पवार यांच्या घराजवळ रहायला गेलो. पवारांचं सरदार घराणं! पवार काकी खरोखरच एक घरंदाज खानदानी व्यक्तिमत्व, त्यांचा प्रभाव माझ्यावर निश्चितच पडला. त्यांच्याच घरात वाचनाची गोडी लागली. पवार काकींची पुस्तकाची लायब्ररी समोरच होती. एक कादंबरी  आणि  एक मासिक मिळत  असे. तो काळ मराठी लेखिकां चा सुवर्णकाळ होता. पण शैलजा राजे या लेखिकेच्या कथा कादंब-या मी त्या काळात खुप वाचल्या. साकव .साकेत.. दोना पाॅवला, अनुबंध   इ. त्या काळात त्या माझ्या आवडत्या लेखिका बनल्या. पुढे पुण्यात आल्यावर माझ्या घराच्या  अगदी जवळच “सुंदर नगरी” त त्या रहायला होत्या. मी धाडस करून त्यांना भेटायला गेले. त्या काळात आमचा दूधाचा व्यवसाय होता. मी त्यांच्या साठी डब्यात खरवस घेऊन गेले होते. त्या डब्यात त्यांनी बोरं घालून दिली.. रिकामा डबा देऊ नये म्हणून… त्या नंतर मी त्यांच्या घरी  अनेकदा गेले… त्या खुप छान आणि  आपुलकीने बोलायच्या. माझ्या कविता त्यांनी खुप लक्षपूर्वक  ऐकल्या होत्या आणि छान दाद ही दिली होती. पुढे मी अभिमानश्री हा दिवाळी अंक सुरु केल्यावर त्यांनी अंकासाठी कथा ही दिली होती.

विद्या बाळ, छाया दातार, गौरी देशपांडे या स्रीवादी लेखिकांचाही माझ्यावर खुप प्रभाव राहिला आहे…..

मी स्रीवादी बनू शकले नाही. पण स्रीवादी चळवळीचा आणि विचारसरणी चा प्रभाव माझ्यावर आहे. विद्याताई बाळ यांचा नारी समता मंच  आणि मिळून सा-याजणी मासिकामुळे परिचय झाला. गौरी देशपांडे चे साहित्य मी झपाटल्यासारखे वाचले आणि पीएचडी साठी “गौरी देशपांडे च्या समग्र साहित्याचा चिकित्सक  अभ्यास” हा विषय घेतला होता त्या संदर्भात गौरी देशपांडें शी काही पत्रव्यवहारही झाला (त्या काळात त्या परदेशात  असल्यामुळे) पण  माझे संशोधन पूर्ण होऊ शकले नाही. आणि त्यांच्या प्रत्यक्ष भेटीची  इच्छा ही पूर्ण होऊ शकली नाही.

वरील सर्व स्त्रियां चा माझ्या  आयुष्यावर  प्रभाव राहिला आहे हे नक्की.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी हे सुद्धा लहानपणापासून आवडणारं प्रभावी व्यक्तिमत्व!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ रंजना जी यांचे साहित्य #- 26 – आजची युवा पिढी आपल्या मुळ संस्कृतीपासुन दुरावत चालली आहे…? ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है एक आदर्श शिक्षिका के कलम से  मात्र युवा पीढ़ी ही नहीं अपितु हमारी पीढ़ी के लिए भी एक सार्थक सन्देश  देता आलेख  “आजची युवा पिढी आपल्या मुळ संस्कृतीपासुन दुरावत चालली आहे…?”  यह आलेख साहित्यधारा साहित्य समुह अमरावती व्दारा आयोजित भव्य लेख स्पर्धा में प्रविष्टि स्वरुप  प्रेषित किया गया था। )

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 26 ☆ 

 ☆ आजची युवा पिढी आपल्या मुळ संस्कृतीपासुन दुरावत चालली आहे…? 

 

नशीब  म्हणायचं की, डोळ्यासमोर स्वतःसाठी वृद्धाश्रम दिसायला लागल्या नंतर तरी आपल्याला संस्कृतीची आठवण झाली. आणि युवा पिढीला संस्कार नाहीत संस्कृती पासून दुरावत चालली हे म्हणणे कितपत बरोबर आहे.  कारण संस्कार आणि संस्कृती पुस्तके वाचून शिकायची नव्हे तर आचरणातून घडवायची बाब आहे. मुलं जे पाहातं तेच शिकत असतं.

मुलांना नावं ठेवणाऱ्या पालकांना माझा साधा प्रश्न आहे.. किती आईवडील संध्याकाळी आपल्या मुलांना घेऊन शुभंकरोती म्हणतात?  बोधकथा सांगतात, मुलांसमोर आई वडील सासू सासरे इतर मोठी माणसं यांचा मान ठेवतात. निःस्वार्थ शेजार धर्म पाळतात, किती गरजू लोकांना मदत करतात  हाहीप्रश्नच आहे.

शिवाय मुलांना फास्ट फूड,कोल्ड्रिंक्स, पिझ्झा बर्गरची, सवय कुणी लावली?

किती जणांच्या घरी आज घरी बनवलेले लोणचे, पापड, कुरडई, साखर आंबा, आवळ्याचा मुरंबा, तिळाची, पोळी गुळाची, पोळी, तीळ / शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थ बनवलेले असतात ?  जे आपण लहानपणी भरपेट खाल्ले,….

अनेक माता आज मुलांना डब्यात चक्क मॕगी करून देतात. काहीजण मुरमुरे तेलमीठ लावून तर काहीजणी चक्क दहा रूपये देऊन मुलांना कुरकुरे,चक्के पे चक्का घ्यायला सांगतात.  मग त्या पैशात मुलांनी नेमकं काय केलं हे पाहायची सुद्धा तसदी घेत नाहीत. … मी मुलांना डब्यात पोळी भाजीची सक्ती केली तेव्हा  घरी बसणाऱ्या एका माऊलीने चक्क एक रूपयाची लोणच्याची पुडी आणि एक पोळी देऊन पाठवलं.  रोज पोहे चालणार नाहीत असा निरोप दिल्या नंतर मला तीनचार डबे द्यावे लागतात “मह्यानं व्हतं नाही” असं उत्तर दिलं.  आम्ही काही देऊ मॕडमला काय करायचं अशी आपलीच  भावना असते, आणि मग यातूनच जो रोज नवनवीन फास्ट फूड आणणार  तोच श्रेष्ठ आदर्श बनतो ते पाहून बाकीचे घरी हट्ट करून तेच आणतात.  दिलेल्या दहा रूपयातून  चौथी पर्यंतचा मुलगा पाच रूपयाची माजाची किंवा थम्सअपची बॉटल विकत घेतो, यात जर आई वडीलांना काही वावगे वाटत नसेल, तर बारावीत त्याने ड्रिंक्स घेतले तर त्यात नवल  ते काय !

एखाद्या वेळी सर मॕमनी मारलं, की दंड थोपटून आपणच भांडायला तयार. …..! आम्हाला वेळ नाही आणि शाळेतल्यांना काय करायचं……. यातूनच शिक्षक फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढेच आपले काम समजतात. . ….बाकी अभ्यासाचं गुत्ते ट्युशनचे . ….. आणि मग आम्ही झालो आदर्श पालक! हे झालं श्रीमंती थाटाचे लक्षण.

याशिवाय गरीबांनाही मुलं इंग्रजी शाळेतच हवे असतात.  तिथं मुलं काय शिकतात हे यांना कळत नाही, हे मुलांना कळायला फार वेळ लागत नाही.  मग मुलं श्रीमंत मुलांची बरोबरी करण्याच्या नादात अनेक भलेबुरे मार्ग अवलंबतात. शिवाय गरीब असो की श्रीमंत आई वडीलां पेक्षा आपणच हुशार आहोत ते बिन डोकं असा समज झाल्यानंतर सुरूवातीला ते आईला तुला काही कळत नाही म्हणतात, त्यात काही वावगं आहे असं कोणालाही वाटत नाही  मग हळूहळू वडीलांचा नंबर , मग अशा आई वडीलांच काही ऐकण्याचा प्रश्न येतोच कुठे? अशी  मुलांची हळूहळू  मानसिकता बनते आणि यातूनच मुलं  उद्धट,  उद्दाम होतात. पुढे नकळतच   मोकाट होतात यात शंकाच नाही.

आजी आजोबा शिवाय घर असण्याची ही तिसरी पिढी आहे खरंतर. ..परंतु आपण एवढे दिवस आई बाबा आणि मुलं या चौकोनी घरात खुश होतो. पण आता आपलाच पत्ता काटला जात आहे याचं टेन्शन आल्या मुळे मुलं संस्कार आणि संस्कृती पासून दूरावत असल्याची जाणीव आपल्याला व्हावी ही खेदाची बाब आहे

आदरनिय बाबा आमटे यांची सलग तिसरी पिढी त्यांचे कार्य अविरत पुढे चालवत असेल. … आणि तेही आपल्या मते आजच्या रसातळाला पोहचू पाहणाऱ्या संस्कृतीत……!  तर कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच गरज आहे.  यासाठी प्रबोधन हवेच असेल तर अगोदर प्रौढांचे करण्याची गरज आहे, कारण हे संस्काराचे बीज त्यांच्याच आदर्शातून उगवलेले आहे असं माझं स्पष्ट मत आहे.

कारण सकाळच्या वेळी सुंदर भजन लावून ठेवायला, देव पूजा करायला,एक टिकला गंध लावायला, घरातील मोठ्यांच्या पाया पडायला, घरी आलेल्यांची अस्थेने चौकशी करायला, घरी आणलेली नवीन वस्तू शेजारी किंवा निदान कामवालीला तरी घासभर द्यायला,फारसा वेळ किंवा पैसा लागत नाही. परंतु याची आपल्याला गरजच वाटत नसेल तर मुलांच्या नावाने ओरडण्यात काय अर्थ आहे.

दिवसभर व्यस्त आहात ठीक आहे पण निदान रात्रीचे जेवण सर्वांनी मिळून  टीव्ही लावून न करता आपल्या लहानपणी करत असू तसं गप्पा गोष्टीत करायला काय हरकत. तोही वेळ आपण मुलांसाठी देत नसू तर मुलांना सांभाळणारी आया किंवा गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड जवळचे वाटले तर त्यात नवल काय?

थोडं आपलं लहानपण आठवून पाहा अशा कितीतरी गोष्टी असायच्या ज्या पळत येऊन ताई- दादा, आई- बाबा,आजी- आजोबांना सांगायच्या असायच्या आणि त्या बदल्यात ढीगभर प्रेम किंवा तोंडभर खाऊ घेऊन आपण नाचत पळायचो.  दंगामस्ती करायला घरचं काय अख्खी गल्ली सुध्दा कमी पडायची.. … चिखल,माती, दगड, वाळू, पाऊस कशाचीही तमा नसायची.  ओलसर मातीचे किंवा वाळूचे खोपे बणवण्यात तासन् तास गुंग असायचे आणि मोठेही कौतुकानं पाहायचे तोंडभर कौतुक करायचे…. मूठभर मास चढायचं…..

नुसतं पास झालो कळालं तरी पेढ्यांचा पुडा घेऊन गल्लीभर वाटायचो. ….जसं काही एव्हरेस्ट सर केले एवढा आनंद असायचा. सागळ्यांच्या कौतुकानं छाती फुगून यायची. .. केवढा!! आत्मविश्वास वाढलेला असायचा. आज मुलं घाबरतात. ….स्वच्छ आई बाबांना…! मुलांना शी घाण च्या नावावर माती, पाणी, पाऊस, वाळूपासूनच नव्हे तर स्वच्छंदपणा पासूनच तोडलं आहे आपण,  घरात घाण नको,पसारा नको, मोठ्याने आवाज नको, घरी कुणी,सोबती नको बाहेरची मुलं घरात नको. ….

मग. …..पुस्तकात,नजर चुकवून मोबाईल किंवा टीव्हीला डोळे लावून बसतात. …. बऱ्याच माऊली सुद्धा मुलगा  शांत बसतो म्हणून मोबाईल हाती देऊन धन्यतेचा अनुभव घेत असतात.

मुलांना 80%,90% मार्क्स मिळाले तरी कुणाला तरी 95% मिळाल्यामुळे कमीपणाची भावना आणि पालकांची भिती वाटत असते.  मुलं म्हणजे काय मशीन आहेत का?  आणि सगळ्यांनाच 99% टक्के कसे पडतील सगळेच डॉक्टर झाले तर कसं चालेल हो…. अन् क्लासवन अॉफिसर सोडले तर बाकी लोक जगतात ते  काय जीवन नसतं. ….! नंबर वनच्या नादात आपण आपलं जीवन हरवून बसतं आहोत हेच मुळी आपल्याला समजेनासे झाले आहे.  मुलांशी मुक्त संवाद नाही त्यांच्या आवडी, निवडीचा विचार नाही, अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं चक्क गुदमरून जाऊन टोकाची पाऊले उचलतात. मग ती आत्महत्या असो की व्यसनाधिनता……!

नातेवाईकांचे येणे जाणे नाही कुणी आलं गेलं तरीसुद्धा हातचं राखून. …..! प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट पैशात मोजून, तुसडेपणाणे  आपले वागणे….

मुल जेव्हा मावस चुलत आत्ते भावंडे जमतात तेव्हा हिशोब करतात त्यांच्यापासून वस्तू लपवून ठेवतात त्यांना नीट बोलत नाहीत  ते कधी जातील याची वाट पहातात तेव्हा आपल्याला मजा आणि त्यांच्या हुशारीचं कौतुक सुद्धा वाटतं, परंतु हीच मुलं जेव्हा आपल्या बाबतीत हिशोब लावतात तेव्हा आपल्याला संस्कृतीचा ऱ्हास जाणवायला लागतो. परंतु ही संकुचित वृत्ती निर्माण कोणी केली याचा विसर आपल्याला पडलेला आसतो.  पेराल तेच उगवते हाच जगाचा नियम आहे हेच सत्य आहे. याचं भान प्रत्येकाला असायलाच हवं.आणि तरीदेखील संस्कार /संस्कृती ऱ्हासाचं खापर आपण त्यांच्याच माथी फोडत असू तर हा चक्क कृतघ्नपणा ठरेल.

अर्थातच हे मत माझें आहे आणि याला अनेक अपवाद सुद्धा असू शकतात. परंतु बहुतांशी हेच चित्र सत्य आहे.

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ मी_माझी – #31 – ☆ Generation Gap ☆ – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी  ‘Generation Gap‘.  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं.  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं।  सुश्री आरुशी जी का आज का आलेख दो  पीढ़ियों के बीच मानसिक द्वंद्व का पर्याय ही तो है।  यह आलेख पढ़ कर हमें अपनी पिछली पीढ़ी का यह वाक्य  कि “हमारे  जमाने में तो …” अनायास ही  याद आ जाता है और हम अगली पीढ़ी को भी अपने अनुभव ऐसे ही उदाहरण देकर थोपने की कोशिश करते हैं। यह पीढ़ियों से चला आ रहा है। हम भूल जाते हैं कि हमारे समय मैं वह कुछ नहीं था जो आज की पीढ़ी को मिल रहा है चाहे वह रहन सहन से सम्बंधित हो, रुपये का अवमूल्यन हो या लोकतंत्र के चौथे स्तम्भ ‘ मीडिया’  का तकनीकी विकास हो। यदि हम इन तथ्यों पर विचार कर आपसी सामंजस्य  बना लें तो  दो पीढ़ियों के बीच के  Generation Gap की प्रत्येक समस्या का हल संभव हो जावेगा। सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों  तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़  सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #31 ☆

☆ Generation Gap☆

 

काय ही आजकाल ची मुलं, आमच्या वेळी असं नव्हतं बाई !

आपल्याला हे वाक्य आधीच्या पिढीच्या तोंडून बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. आणि ते खूप अंशी खरं ही आहे. कारण गोष्टी बदलत असतात, दगडासारखं दगडही बदलतो, त्याचं रूप, रंग बदलतो. वातावरणाचा परिणाम गडदामध्येही नैसर्गिक रित्या बदल घडवून आणतो… मानव निर्मित बदल तर खूप होतात… काही आवश्यक, काही अनावधानाने, काही दुर्लक्ष केल्यामुळे…

आता बघा ना, पूर्वी स्त्रिया रोज साडी नेसत असत, पण आता बऱ्याच स्त्रिया रेग्युलर बेसिस वर ड्रेस घालतात. ह्यात साडीला कमी दर्जा द्यायची भावना नसते, पण ड्रेस जास्त सोयीस्कर असल्याने त्याचा वापर वाढला आहे.

पूर्वी फ्रीज नव्हते, दिवे नव्हते, मिक्सर नव्हते पण मानवाने ह्या गोष्टींचा शोध लावून आपले आयुष्य सोपे करायचा मनापासून प्रयत्न केला आहे, ह्यात काहीच वावगं नाही.

पण म्हणतात ना अति तिथे माती, ही म्हण कायम लक्षात ठेवायला हवी. नवीन गोष्टी आत्मसात करताना निसर्गाची हानी होणार नाही ह्याची खबरदारी घेणं तितकंच आवश्यक आहे. नाही तर आज आपण जी दुष्काळाची परिस्थिती भोगतो आहोत अशा अनेक कठीण प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि ही हानी थांबली नाही तर गोष्टी कंट्रोल च्या बाहेर जायला वेळ लागणार नाही.

आपल्या खूप सखोल अशी भारतीय संस्कृती मिळाली आहे, त्यात सुद्धा मानव आणि निसर्ग ह्याचा समतोल कसा राखता येईल ह्याची योग्य शिकवण आहे, पण आपण सोय आणि पैसा ह्यापुढे काहीच बघत नाही. ते मिळवण्यासाठी इतर नुकसान झाले तरी त्या कडे कणा डोळा केला जातोय, जे भविष्यासाठी खूप घटक आहे. मानवी संस्कृती टिकवण्यासाठी फक्त स्वार्थ उपयोगी पडणार नाही. कितीही जागतिकीकरण झाले, तरी मूळ मूल्यांना विसरून चालणार नाही. आधीची पिढी किती बुरसटलेली होती असे म्हणणे योग्य ठरणार नाही, कारण त्यांच्या वेलची जीवन व्यवस्था आणि आजच्या पिढीची जीवन व्यवस्था ह्यात आणि विचारसरणी ह्यात खूप फरक असतो, आणि हा फरक स्वीकारला तरंच दोन्ही पिढ्यामधील अंतर कमी व्हायला मदत होईल. दोन्ही पिढ्यांनी एकमेकांना थोडं तरी समजून घ्यायला हवं. ओपन minded असायला हवं, दोन्ही पिढ्यांमध्ये सुसंवाद असायला हवेत.

म्हणून जून तेच योग्य हाही विचार सोडला पाहिजे, किंवा त्या पिढीची मते अयोग्य आहेत हेही मनात ठेवून वागता कामा नये, तेव्हाच नवीन गोष्टी आत्मसात करू शकतो. नाही तर विकासाचे मार्ग बंद राहतील, कोणीच आपल्या बुद्धीचा वापर करणार नाही, त्यातून प्रगती होणार नाही… सगळं जैसे थे राहील … आणि मग जीवन कदाचित कंटाळवाणं होईल, नाही का? एकाच ठिकाणी असून न राहता, जुन्यातील योग्य, नव्यातील फायदे लक्षात घेऊन पावलं पुढे टाकली पाहिजेत.

ही Generation Gap खूप काही घडवून आणते, निदान वैचारीक उलाढाल नक्की घडते…

Generation Gap हा कधीही न संपणारा विषय आणि पण त्यातून होणारे वाद विवाद नक्किच कमी करता येऊ शकतात. त्यासाठी दोन्ही पिढ्यांमध्ये मैत्रीचं नातं एडेल तर सुसंवाद घडू शकतो आणि दोघांमधील वैचारिक दरी कमी होऊ शकते. ह्यासाठी दोन्ही गटांना किंवा व्यक्तींना फकेक्सिबल किंवा open minded असणं उपयुक्त ठरेल. जून तेच योग्य हा हेका थोडा बाजूला ठेवून नवीन घडणाऱ्या गोष्टींकडे सकरतामक दृष्टीने पाहिलं तर अनेक समस्या दूर होतील. तसेच लहान मोठा, गरीब श्रीमंत, उच्च नीच हा भेदभाव दूर ठेवला तर वादाचे मुद्देच कमी होतील. माणूस म्हणून त्याच्या मताचा आदर करणे, मीच फक्त बरोबर, हा हट्ट न करणे, तो कोण मला सांगणारा हा अहंकार जवळ येऊ न देणे, ह्यातूनच दोन पिढीतील अंतर कमी होऊन योग्य निर्णय घेतले जातील.

 

© आरुशी दाते, पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण आणि हृदयात वाहत असलेली दुःखाश्रूची धार ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे.

आज प्रस्तुत है  उनका  स्वर्गीय डॉ बाबासाहेब भीमराव अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस पर  अश्रुपूरित श्रद्धांजलि अर्पित करता हुआ विशेष आलेख  “बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण आणि हृदयात वाहत असलेली दुःखाश्रूची धार”।  )

 

बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण आणि हृदयात वाहत असलेली दुःखाश्रूची धार

 

साल 1956. डिसेंबर महिन्याचा सहावा दिवस. अन् हृदयत धडकी भरवणारी, उभ्या भारताच्या काळजाचा ठोका चूकवणारी बातमी सुर्य प्रकाशाच्याही अती वेगाने भारतासह जगात पसरते. समतेची, ज्ञानाची आणि न्यायाची ज्योत पेटवून ती अखंडपणे तेवत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांवर सोपवून ज्ञानाच्या प्रखर तेजाने तडपणारा क्रांतीचा सुर्य, प्रत्येक भारतीय जनमानसाच्या डोळ्यांचे तेज असणारा एक प्रखर तेजोमेघ दिल्लीत मावळतो. आणि न भूतो न भविष्यति असा अश्रूंचा महापूर संपूर्ण भारतातून एकसोबत वाहतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाणाची बातमी एकून धरणीही शहारते. या भारत भूमीची शान आज तिच्या कुशीत शांत झोपी गेली होती. आकाशात तडपणारा सुर्यच्याही अंगाला काटे फुटले असावेत. महासागरातही एवढा ओलावा नसेल एवढी ही भारतभूमी पाणावली होती. ज्वालामुखीच्या जबरदस्त स्फोटाने प्रचंड हादरे बसावेत तसा दिल्लीचा दरबार हादरला. जनसामान्यांपासून ते तत्कालीन प्रधानमंत्री, राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांचीच पायाखालची जमीन सरकली. त्या गुरूवारच्या रात्री दोनच्या सुमारास ‘त्या’ तेजोमेघाला घेऊन विमान मुंबईला उतरलं. दादरस्थित राजगृहावर नेण्यात आले. तोपर्यंत अरब सागरालाही लाजवेल. असा प्रचंड जनसागर तेथे धडकला होता. दादरच्याच शिवाजी पार्कवर अरबी समुद्राच्या किनारी चैत्यभूमीवर उभ्या भारताचा भाग्य विधाता चंदनाच्या चितेवर चिरनिंद्रेत झोपला होता. तेव्हा तो अरब सागरही बाबासाहेबंना डोळे भरून पाहण्यासाठी, वंदन करण्यासाठी दादरच्या किनारी धावून आला. आणि बाबासाहेबांचे अंतीम दर्शन घेऊन ढसाढसा रडला. आणि समोर उभा असलेला बाबासाहेबचा विचारांचा जनसागर पाहून शेवटचे बाबासाहेबांच्या  पायावर नतमस्तक होऊन माघारी फिरला.

बाबासाहेबांनी शेवटचा श्वास आजपासून 63 वर्षाआधी दिल्लीत घेतला. 56 साली डिसेंबरच्या पहिल्या गुरूवारी ही बातमी भारतासोबतच जगभर पसरली. आणि आकाशात सुर्य मावळावा तसा ज्ञानाच्या प्रखर तेजाने तडपणारा क्रांतीसुर्य भारतात मावळला आणि जनसामान्यांच्या मनांत काळोख झाला. पण बाबासाहेबांनी त्या गर्द काळोखातही जीवनरूपी रस्ता पार करण्यासाठी संविधान नावाची एक ज्योत भारतीय नागरिकांच्या हाती दिली. आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्या विचारांचं सुरक्षाकवच प्रत्येक भारतीयाला दिले.

बाबासाहेबांच्या पश्चात 63 वर्षापासून भारतीय संविधान सामान्य माणसाचं, पददलित,  गोरगरिब जनतेचं आणि स्त्रियांची रक्षण करतेय. अमानवी अत्याचाराने भरलेल्या त्या विषमतावादी सापाला आपल्या विचारांच्या धारेने ठेचून काढतंय.

संविधानाच्या  अंमलबजावणीच्या दिवसापासून ते आज पावेतो काल परवाच हैदराबादला प्रियंका रेड्डी सोबत पिशाची वृत्तीचा नराधामांनी माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तशा घटना तेव्हापासून एव्हाना त्याच्याही आधीपासून घडताहेत. मग ती दिल्लीची निर्भया असो, कि खैरलांजीची प्रियंका भोतमांगे, जम्मूची आसिफा असो कि माग हैदराबादची प्रियंका रेड्डी. नाव, चेहरे, ठिकाण बदलतंय. नराधामांची कृती मात्र तीच. असले पिशाची कृत्य करणारे लोकं त्या मानसिकतेचे असतात. जे वासनेची भूक भागवण्यासाठी स्वतःच्या घरचे दरवाजे तोडायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. अशा नीच मानसिकतेच्या लोकांची शिक्षा एकच आणि ती म्हणजे अंत. नव्हे क्रूर अंत.

पण प्रश्न असा उपस्थित राहतो. की अशा लोकांना शिक्षा देण्यात कायदा कमी पडतोय का?  मागील काही दिवसांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून कायद्यावर, प्रशासनावर बोट ठेवलं जातंय. काहींनी तर कायदा पूर्णपणे निष्क्रिय आहे असे शिक्कामोर्तब देखील केले. माझ्या वाचनात आलेल्या ज्या काही ट्विट किंवा फेसबूक, व्हाटसअॅप वरिल मॅसेज होते. त्या मॅसेजेस किंवा नेटकरी बांधवांबद्दल किंवा त्याच्या ट्विटस बद्दल काही म्हणायचे नाही. पण एक गोष्ट मी जरूर म्हणेन की ज्या दिवशी संविधानाचा स्विकार केला गेला त्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी ‘ संविधान कितना ही अच्छा क्यो ना हो वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल मे लाने वाले लोग बुरे होंगे और संविधान कितना ही बुरा क्यो ना हो वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल मे लाने वाले लोग बुरे होंगे इसलिए जनता या राजनीतिक दलों को संदर्भ मे लाये बिना संविधान पर कोई भी टिप्पणी करना मेरे विचार मे व्यर्थ है’  हे स्टेटमेंट दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच आहे. आणि मला वाटतं जे कायदा व प्रशासनावर बोट ठेवताहेत त्यांना. हे नक्कीच समाधानकारक उत्तर आहे. आणि बाबासाहेबांचे ते विधान व्हीडीओ स्वरूपात युटयुब किंवा गुगलवर अगदी सहज सापडेल.

कोणावर टिका करायची नाही. किंवा माझं कोणाशी वैर नाही. फक्त मागील दिवसांमध्ये जे सोशल मिडियाद्वारे कायदा कमकुवत दाखवण्याचा ट्रेड चालू आहे. त्यावर आणि त्यासारख्या अनेक प्रश्नांवर बाबासाहेबांचं वरिल स्टेटमेंट अगदी योग्य उत्तर आहे असं मला वाटतं. कायदा कितीही कठोर असला तरी त्याचा अंमल योग्य होत नसेल तर त्यात कायद्याची चूक नसते तर तो राबवणा-यांची चूक असते. जर 2006 ला खैरलांजीची प्रियंका भोतमांगे आणि आजवर जेवढे बलात्कारच्या घटना घडल्या त्यांच्या गुन्हेगारांना जर फाशी किंवा देहांताची शिक्षा झाली असती तर आज हैदराबाद मध्ये प्रियंका रेड्डीला नरक यातना सोसाव्या लागल्या नसत्या. प्रियंका रेड्डीच नव्हे तर असंख्य त्या मुली ज्यांना नराधामांच्या वासनेला बळी पळावे लागले नसते. आणि आजवर ज्याही मुली या नराधामांच्या वासनेला बळी पडल्या आहेत त्यांना शिक्षा झाली तरच येणा-या काळात आपल्या आया-बहिणी सुरक्षित राहू शकतील. त्यासाठी  कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावे. असेच वाटते. जेणे करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.

बाबासाहेबांना आदरांजली वाहत असतांना डोळ्यांतली एक धार त्या सर्व पिडीतांच्या दुःखासाठीही वाहत आहे.

 

 

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार (महाराष्ट्र)

मो  9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ मी_माझी – #30 – ☆ प्रिय तनु ☆ – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की अगली कड़ी  प्रिय तनु   सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं.  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं।  सुश्री आरुशी जी का आज का आलेख, एक पत्र स्वरुप आलेख  है जिसका पात्र तनु है।  यह पात्र इतना भावप्रवण  एवं आत्मीय है कि आप इसे पूरा पढ़ कर आत्मसात करने से नहीं रोक पाते। सुश्री आरूशी  जी  का यह कथन ही काफी है  “first impression is best impression”  पात्र तनु को अपने ह्रदय के उद्गारों से अवगत करने के लिए। सुश्रीआरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों  तथा काव्याभिव्यक्ति का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़  सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #30 ☆

☆ प्रिय तनु ☆

 

प्रिय तनु,

विषयलाच हात घालते… आज चक्क तुला पत्र लिहायचं आहे… generally जी व्यक्ती आपल्यापासून दूर असते तिला पत्र लिहितो, नाही का! पण तू कधी दूरच गेला नाहीस त्यामुळे तुला पत्र लिहायची वेळच आली नाही… खरं तर हे एक कारण झालं माझा बचाव करण्यासाठी दिलेलं…

मी जाईन तिथे तू, हे समीकरण कायम होतं, त्यात कधीच बदल झाला नाही… rather आरुशी म्हटलं की तुझीच प्रतिमा समोर येते. आणि ती प्रतिमा जोपासण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न मी नेहमीच करते… first impression is best impression ह्यावर माझा दृढ विश्वास आहे… हे impression किंवा image तू जपलीच पाहिजेस, हा अट्टाहासच म्हण हवं तर… त्यात तुला कधीच ढवळाढवळ करता आली नाही, हो ना ! माझं वर्चस्व गाजवलं आणि त्यातूनच सुखावत राहिले…

थाम्ब, थाम्ब, ह्याचा अर्थ मी तुझ्याकडून काम करवून घेत आले असाच होतो ना ? तुला राबवून घेतलं का रे? तुझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या का? हे प्रश्न केव्हा पडतात माहित्ये, जेव्हा तू, मी सांगेन त्याप्रमाणे वागायला नकार देतोस तेव्हा. आणि तेव्हाच लक्षात येतं की मी तुला कायम गृहीत धरत आले आणि तुझ्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करत राहिले.

शाश्वत – अशाश्वत वगैरे गोष्टी सुरू झाल्या की तू नश्वर, अशाश्वत म्हणून बऱ्याच वेळा तुला कमी दर्जाची वागणूक देण्यात आली असेल… पण ज्या चैतन्याने, ज्या पंचमहाभूतांनी तुला तयार केलं आहे, त्यांना ह्या गोष्टींचा विसर पडत नाही… मग कधी कधी त्यांच्या मनाविरुद्धा गोष्टी घडायला लागल्या की ह्या देहाकडे लक्ष द्या, त्याची काळजी घ्या ह्याची वॉर्निंग मिळतेच लगेच… ह्याचा त्रास तुझ्याबरोबर मलाही होतोच की ! पण माझ्यासाठी तू जास्तीतजास्त सहन करत राहतोस हे नक्की. कारण काही ही झालं तरी तुला ठीक ठाक राहवच लागत ना. मग काय माझ्या मनाविरुद्ध व्यायाम सुरू होतात, औषध सुरू होतात, योगा पण सुरू होतं, हल्ली तर ते diet चं फॅड तर तुझं जिणं नको नको करून टाकत असेल नाही !

एकंदरीत काय, तुला डावलून आयुष्य पुढे जाऊ शकत नाही, ह्याची जाणीव जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुझ्या माझ्यातील सख्य बहरेल, एका सुंदर विचारधारेला मूर्त रूप मिळेल, नाही का !

मी एवढंच म्हणेन, माझं अस्तित्व, माझं म्हणून टिकवायला तू कारणीभूत आहेस आणि तुझी सोबत माझ्यातील ‘मी’ ला सावरत असते, फुलवत असते. तू असाच सोबत राहशील, अशी रचना अजून तरी अस्तित्वात नाही ह्याचं खूप दुःख आहे आणि ते बदलणं माझ्या हातात नाही, ही खंत कायम राहील. माझ्याकडून निश्चित रूपाने जे होणे ठरलेले आहे, ज्याचा माझ्या भाळी शिक्कामोर्तब झाला आहे, ते घडायला, तू आहेस हीच खात्री निभावून नेऊ शकते.

कित्ती छान, सुंदर, अफाट अशा विशेषणांनी माझं आयुष्य रंगलेलं जरी नसलं तरी, तुझ्यामध्ये निवास केल्याने ह्या आयुष्याची व्याख्या नक्कीच बदलते, असं मी म्हणू इच्छिते. माझ्या आयुष्याला एक वेगळाच आयाम मिळतो, आणि आरुशी ह्या नावाला एक ओळख बहाल करतोस, ह्यासाठी मी तुझी कायम ऋणी राहीन ह्यात वाद नाहीच !

 

© आरुशी दाते, पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 15 ☆ श्रीमंती ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनका  एक भावप्रवण  आलेख  श्रीमंती। )

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 15 ☆

☆ श्रीमंती ☆

घराबाहेर पडले अन् चालायला सुरुवात केली तेवढ्यात ‘ आवं ताई..! आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर रस्त्याकडेला कधीमधी बसणारी वयस्कर बाई मला बोलावीत होती.मी म्हटलं, कां हो..?

तशी ती जरा संकोचल्यासारखी झाली न् म्हणाली..”ताई तुमच्या अंगावरलं लुगडं लयी झ्याक दिसतया बगा.!”

मी हसून पुढं चालायला लागले तशी ती पट्कन म्हणाली मला द्याल कां वं ह्ये लुगडं..?अक्षी म ऊशार  सूत हाय असलं मला कुनीबी देत न्हाई वं ! हे थंडीच्या दिसांत लयी छान..! आन् आमाला ही असली देत्यात असं म्हणून तिनं अंगावरची सिंथेटिक साडी दाखवली.

मी थोडी विचारात पडले कारण मी नेसलेली साडी एका भव्य प्रदर्शनातल्या आंध्रप्रदेश स्टाॅलमधून मी नुकतीच खरेदी केली होती.आणि माझ्या आवडीचा ग्रे कलर,साडीचं सूत पोत अतिशय सुरेख मस्त कांबिनेशनची साडी मिळाल्याने मी हरकून गेले होते.आणि मी आज पहिल्यांदाच नेसले होते.

मी विचारात पडलेली पाहून ती बाई म्हणाली ताई तुमची इच्छा असल तरच द्या.

मी आता वेगळ्याच विचारात होते.मी अंगावरची साडी तिला कशी द्यावी. म्हणून तिला म्हटलं माझ्याकडे आणखी छान साडी आहे तुला आणून देते.तशी ती म्हणाली दुसरी नको..हीच …

तुमच्या अंगावर कायम सुती लुगडी असत्यात मला लयी आवडत्यात.पन् ही आजची माझ्या मनात भरलीया..!

मग मी म्हटलं हो हीच देईन पण अशीच कशी देऊ धुवून नंतर देते.

नंतरच्या रविवारी ती बसलेली मला दिसली मग मी घरुन धुवून इस्त्री करुन ठेवलेली ती साडी त्यावरचं ब्लाऊज व त्यावर  एक नवीन ब्लाऊजपीस असं तिच्या हातावर ठेवलं व तिला वाकून नमस्कार केला.तशी ती थोडी मागे सरकून म्हणाली हे काय वं ताई..? मला नमस्कार करताय.?

मग मी तिला म्हटलं मी तुला खूप वर्षापासून ओळखते.आज तू खूप दिवसांनी दिसलीस .पण पंचवीस तीस वर्षांपूर्वी आमचं हे घर शेणामातीच्या भिंतींचं होतं तेव्हा तूंच मला ते सारवण्यासाठी शेण आणून द्यायचीस.मला भिंती सावरायला घर साफ करायला मदत करायचीस.हे मी विसरले नाही.तेव्हा मी तुला नमस्कार करण्यात  वेगळं  काहीच नाही.

मी स्वत: नोकरी करत असल्याने मी तशी साडी केव्हाही घेऊ शकले असते पण आज तिला त्या साडीची जास्त गरज होती व तिच्या मनात ती भरली होती.

पुढच्या रविवारी जाताना माझं सहज लक्ष गेलं तर ती साडी नेसून मॅचिंग ब्लाऊज घालून उभी होती.मी तिच्याकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्याची श्रीमंती काही वेगळंच सांगत होती.मी भरुन पावले.

©®उर्मिला इंगळे

सातारा.

दिनांक:-२८-११-१९

!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 9 ☆ दारा बांधता तोरण – कवयित्री इंदिरा संत ☆ – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

 

(सुश्री ज्योति  हसबनीस जीअपने  “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के  माध्यम से  वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख  “दारा बांधता तोरण – कवयित्री इंदिरा संत”.  यह आलेख साहित्य अकादमी सम्मान से सम्मानित सुप्रसिद्ध मराठी कवयित्री इंदिरा संत जी  की रचनाओं पर आधारित है ।  थे। इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)

☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 9 ☆

☆ दारा बांधता तोरण – कवयित्री इंदिरा संत☆ 

विसाव्या शतकातील एक नावारूपाला आलेली, राजमान्यता पावलेली कवयित्री म्हणून ‘इंदिरा संत’ ओळखल्या जातात. ४ जानेवारी १९१४ साली जन्मलेल्या ह्या थोर कवयित्रीने आपल्या संवेदनशील आणि सहजसुंदर लिखाणाने रसिकवाचनांवर मोहिनी तर घातलीच पण आपल्या आशयघन कविता , ललितगद्य लेखनाने मराठी साहित्यविश्व देखील अधिकच समृद्ध केले . ‘कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे’ असे त्या स्वत:बद्दल म्हणत. ‘शेला’ ’मेंदी’ ’रंगबावरी’ह्या कवितासंग्रहांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तर त्यांच्या ‘गर्भरेशीम’ ह्या कविता संग्रहाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरविले गेले . आज ह्या कवयित्रीची अतिशय गोड कविता घेऊन मी येतेय.

☆ दारा बांधता तोरण ☆

 

दारा बांधता तोरण घर नाचले नाचले

आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाउले

 

भिंती रंगल्या स्वप्‍नांनी झाल्या गजांच्या कर्दळी

दार नटून उभेच, नाही मिटायाची बोली

 

सूर्यकिरण म्हणाले घालु दारात रांगोळी

शिंपू पायावरी दंव म्हणे वरून पागोळी

 

भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून

देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हासून

 

येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी

सोनचाफ्याची पाउले आज येतील अंगणी

 

आगमन घरातले , मग ते छोट्या जिवाचे असो , की नववधूचे , सारी वास्तूच स्वागताला आतुरलेली असते . येणाऱ्या सोनपावलांच्या स्वागतासाठी उत्सुक झालेलं अधीरं मन सगळी जय्यत तयारी करून वाट बघत असतं आणि घरादारावर बागेवर एक दृष्टीक्षेप टाकतांना जाणवतं की अरे ह्या सोनपावलांच्या स्वागताची चाहूल तर घरादाराच्या स्पंदनाने केव्हाच हळूवारपणे टिपलीय . स्वागतासाठी दारी तोरण बांधण्याचाच अवकाश एक उत्सवी रूपच घरदार ल्यायलंय . भिंतीभिंतीतून स्वप्नाचे हुंकार ऐकू येतायत , खिडक्या खिडक्यांतून फुललेली कर्दळ डोकावतेय जणू गजांच्याच कर्दळी झाल्यायत. सूर्याची कोवळी किरणं अंगणभर पसरलीयत आणि किरणांचे कोवळे कवडसे जणू अंगणात रांगोळीच रेखल्यागत भासतायत , येणाऱ्या सोनपावलांवर दंव शिंपूयात या तयारीत पागोळ्या झरतायत , बागेतला बहर ओंजळीत रिता करायला बाग अगदी आनंदाने तरवरलीय , आशिर्वाद देईन म्हणून केळही मनोमन सुखावलीय , मंद गंधीत वारा जणू सोनचाफ्याच्या पावलांच्या प्रतीक्षेत अस्वस्थपणे येरझारा घालतोय , सारा परिसरच सोनचाफ्याच्या पावलांच्या प्रती़ेक्षेत अधीरलाय , आनंदलाय आणि स्वागताच्या जय्यत तयारीत साऱ्या घरादारानेच आपला वाटा मनापासून आनंदाने उचललाय .

कवयित्रीचं हे तरल भावविश्व कविता वाचतांना इतकं सुंदर उलगडत जातं आणि मंत्रमुग्ध करतं आणि बघता बघता आपणही तिच्या ह्या उत्सवी आनंदात सामिल होतो .

घरी येणाऱ्या नवागताचं स्वागत करतांना आपल्याही मनाची अशीच स्थिती होत असते नाही का …काय करू आणि काय नको ..! आणि सारं घर दार स्वागतासाठी सजवतांना आपल्याही नकळत वास्तू देखील आपल्यालारखीच स्वागतोत्त्सुक मोहरलेली आहे असंच आपल्यालाही वाटू लागतं ना ?

इंदिरा संतांची ही गोड कविता वाचतांना त्यातले मधुर भाव मनभर अलगद पसरतात आणि मन एका अननुभूत आनंदलहरींवर तरंगत राहतं !

 

© ज्योति हसबनीस,

नागपुर  (महाराष्ट्र)

Please share your Post !

Shares
image_print