मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाते नव्याने… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नाते नव्याने… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

साद घालता मेघांना ,

हाकांचा पाउस आला.

थेंब जपला डोळ्याचा,

अनाहूत ओघळला .

मोर नाचले तमात,

कसे उस्फूर्त जोमात .

चमकल्या साैदामिनी,

मेघ जमल्या नभात.

रान बहकले थोडे,

वृक्ष चिंबचिंब झाले.

थेंबथेंब अमृताने,

विश्व अवघे नहाले.

धरा आकाशाचे जसे,

आज अद्वैत घडले.

क्षितिजासी अघटित ,

नाते नव्याने जडले.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #188 ☆ ग्रहण… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 188 ?

लागले सूर्यास येथे ग्रहण आहे ?

चंद्र करतो चक्क त्याचे हरण आहे ?

पांढरे बगळे इथे आले चराया

देश म्हणजे एक मोठे कुरण आहे

साखरेचा रोग आहे अन् तरीही ?

दाबुनी खातो फुकटचे पुरण आहे

लाज वाटावी कशाला वाकण्याची

माय-बापाचेच धरले चरण आहे

भासला नाहीच तोटा अश्रुचाही

दोन भुवयांच्याच खाली धरण आहे

मार्ग भक्तीचाच आहे भावलेला

कृष्णवर्णी शाम त्याला शरण आहे

भरजरी वस्त्रात गेली जिंदगी पण

शेवटाला फक्त मिळते कफण आहे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मातीत मुळे रुजताना… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– मातीत मुळे रुजताना…– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

मूळास ओटीपोटी धरूनी

माती मजला उठ म्हणाली

फोडून  माझे अस्तर वरचे

पानोपानी हळू फुट म्हणाली

मी न सोडीन मूळास कधीही

तुझ्या कुवतीने वाढ म्हणाली

नभास पाहंन हरकून मीही

पिसार्‍यासम फुलत राहीली

काही दिसानी सर्वांगावरती

इवले इवले कळे लागले

क्षणाक्षणांनी कणाकणांनी

ते ही हळूहळू वाढू लागले

पहाटे अवचित  जागी होता

गंधाने मी पुलकीत झाले

अय्या आपला चाफा फुलला

आनंदाने कुणी ओरडले

भराभरा घरातील सगळे

माझ्या भवती झाले गोळा

फुलवती मी गंधवती मी

मीअनुभवला गंध सोहळा

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मधुमालती… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ मधुमालती… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

फुललेली मधुमालती सुंदर दिसते

मंद सुगंध सगळीकडे पसरते

साधे पणाने मन प्रफुल्लित करते

पण तिला देवघरात स्थान नसते

 

कधी केसात वेणी बनून असते

कधी मुलांचे खेळणे बनते

कधी नुसतीच पायदळी जाते

कधी कचरा म्हणून हिणवली जाते

 

तरीही रोज रोज फुलते

आनंदाने बहरत जात असते

बघणाऱ्यांना आनंद देत असते

जणू आपल्याला संदेशच देत असते

 

कुणी कसेही वागले

कुठेही स्थान नसले

कोणी काळजी घेणारे नसले

तरीही आपण आपला धर्म सोडू नये

घेतला वसा टाकू नये

आनंद व सुगंध देणे थांबवू नये

 

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 131 ☆ माझी वेदना…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 131 ? 

☆ माझी वेदना…! ☆

(विषय – तू अबोल का झाली..!)

तू अबोल का झाली

कुठे उणीव भासली

सौख्य प्रीत बहरतांना

का अशी दूर गेली.!!

 

तू अबोल का झाली

बोल नं मधुर बोली

सखे उक्त कर काही

नको राहू, अबोली.!!

 

तू अबोल का झाली

मज चिंता पडली

विरहात तुझ्या मृग-नयने

तहान भूक हरली.!!

 

तू अबोल का झाली

कर राज, उक्त लवकरी

होईल ते होऊ दे परंतु

बोल नं माझे, सोनपरी.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सोबत (भुजंगप्रयात)… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 

? कवितेचा उत्सव ?

☆ सोबत (भुजंगप्रयात)… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

नको रे लपंडाव खेळू असा तू

नको भावनांना दुखावू असा तू

 

ढगाआड चंद्रासवे तारकांना

किती कष्ट होती तया शोधताना

 

किती घेतल्या आणभाका मिळोनी

अजूनी मनी ठेविल्या मी जपोनी

 

कुठे सर्व गेली तुझी प्रीतवचने

तुझ्यावीण माझे अधूरेच असणे

 

जळावीण मासा तडफडे जसा रे

विनासंग माझी तशी ही दशा रे

 

सदा मी जगावे तुझ्या सोबतीने

हसावे रडावे तुझ्या संगतीने

 

असू देत ध्यानी तुझी साउली मी

तुला साथ देणार दर पाउली मी

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भाग्यरेषा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

🌳 भाग्यरेषा… 🌳 श्री सुहास सोहोनी ☆

ना पुष्प लगडले

कधीहि फांदीवर

मग यावे कैसे

मधूर फळ रुचकर

खरखरीत पाने

हिरवट मळकट  दिसती

खोडावर खवले

दृष्टीसही बोचती —

 

वृक्षांच्या गर्दित

मीहि एकला वृक्ष

सामान्य कुळातिल

करावया दुर्लक्ष

संगोपन होण्या

कधीच नव्हतो पात्र

मोजतो जन्मभरि

दिवस आणखी रात्र —

 

ना मिळे भव्यता

पिंपळ वटवृक्षाची

ना सुंदरता ती

कदंब वा बकुळीची

भरगच्च दाटि ना

फांद्यांवर पर्णांची

ना पिले खेळती

अंगावर पक्षांची —

 

परि भाग्य लाभले    

भरुन काढण्या उणे

अन् देवदयेने सुदैव

झाले दुणे

मन तृप्त होउनी

न्हाले संतोषात

मज जन्म लाभला

पवित्र देवराईत !! —

 

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

दि. १९-०३-२०२३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मुरली-धर… – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मुरली-धर ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

अप्रतिम कल्पना आहे बासरीच्या जन्माची. चित्रही तितकेच सुरेख.निवडलेले रंगही अचूक आणि प्रभावी. बासरीच्या जन्माची कल्पना वाचून सुचलेले  काव्य :

लहरत लहरत येता अलगद

झुळुक शिरतसे ‘बासां’मधूनी 

अधरावरती ना धरताही

सूर उमटती वेणू वनातूनी

त्याच सूरांना धारण करता

श्रीकृष्णाने अपुल्या अधरी

सूर उमटले ‘बासां’मधूनी

आणि जन्मली अशी बासरी.

बांस,वेणू =बांबू

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कर्मवीर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ कर्मवीर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(९  मे २०२३ – कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्त या महामानवाला मी वाहिलेली काव्यश्रद्धांजली)

भावसुमांची गुंफून माला पूजा तव बांधली

हृतपटलावर मुहूर्त करूनी श्रद्धांजली वाहिली

 

अज्ञानाचा संहारक तू ज्ञानदीप आमुचा

अनेक वलया मधुनी तुझिया सूर्य तळपतो ज्ञानाचा

तू वीरांचा वीर अग्रणी कर्मवीर माऊली

 

महाराष्ट्राच्या कडेकपारी तूच बांधली ज्ञानमंदिरे

उद्धरली अन् त्यांच्यामधूनी रयतेची बलशाली पोरे

 सरस्वतीच्या हातामधली विणा झंकारली

 

कर्मवीरा तुज म्हणती अण्णा यातच तव श्रेष्ठत्व वसे

शिक्षणक्षेत्री कामधेनू तू तुझे भले पण तिथे दिसे

कर्तव्याच्या तुझ्या मेरुतही  रत्न खाण लागली

 

राजांना ही लाजवील तव कर्तव्याचा अमोल ठेवा

 श्रद्धा आमुची तुझ्याच चरणी देवाला ही वाटे हेवा

 तू देवातील देव आमुचा चरणधुली चर्चिली

 

करू कशी सांगता याची शब्द अपुरे पडती

अंतरात परी लाख लाख त्या तिथे नौबती झडती

तुझ्या कृपेच्या कल्पतरूतळी  समाधीच लागली

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 152 – तुझे रूप दाता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 152 – तुझे रूप दाता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

तुझे रूप दाता स्मरावे किती रे ।

नव्यानेच आता भजावे  किती रे।

 

अहंकार माझा मला साद घाली ।

सदाचार त्याला जपावे  किती रे।

 

नवी रोज स्पर्धा  इथे जन्म घेते।

कशाला उगा मी पळावे किती रे ।

 

नवी रोज दुःखे  नव्या रोज  व्याधी।

मनालाच माझ्या छळावे किती रे।

 

कधी हात देई कुणी सावराया।

बहाणेच सारे कळावे किती रे ।

 

पहा  सापळे हे जनी पेरलेले ।

कुणाला कसे पारखावे किती रे।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares