मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – भंगारवाला…– ☆ श्री सुनीत मुळे ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – भंगारवाला… – ? ☆ श्री सुनीत मुळे ☆

(हायफाय हॉलबाहेर बेपर्वा श्रीमंतीनं फेकलेल्या अर्ध्या रित्या पाण्याच्या बाटल्या भंगारवाला झाडांच्या मुळात ओतत होता. एक संवेदनशील फोटो आणि काव्य रचना…)

वरवर बघता वाटत असेल,

याचा धंदा केवळ भंगार !

उपेक्षेच्या जगण्यालाही,

याने केला आहे शृंगार !

वजन कमी करण्यासाठी,

पाणी ओततो मुळावर !

आतमधे सजली माणसं,

अतृप्तीच्या सुळावर !

भंगारवाला नसेल तर,

बकाल होईल सगळं जग !

ए.सी.ची तर वृत्ती अशीच,

आत गारवा,बाहेर धग !

ओझं कमी करण्यासाठी,

ओतलं नाही वाटेल तिथं !

त्याचा सद् भाव ओतत गेला,

तहानलेली झाडं जिथं !

सावलीवरती हक्क सांगत,

झाडाजवळ थांबत नाही !

माझ्यामुळेच जगलंय असं,

स्वतःलाही सांगत नाही !

“निष्काम कर्म ” गीतेमधलं,

कळलेला हा पार्थ आहे !

“जीवन”देऊन,भंगार घ्यायचं,

केवढा उंच स्वार्थ आहे !

पाणी विकत घ्यायचं आणि,

अर्ध पिऊन फेकून द्यायचं !

कृतज्ञता / कृतघ्नता,

याचं भान केव्हा कसं यायचं?

डिग्रीपेक्षा नेहमीच तर,

दृष्टी हवी अशी साक्षर !

भंगारवाला अंतर्धान नि,

अवतीर्ण होतो ईश्वर !

कवी : अज्ञात

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 186 ☆ धर्मवीर संभाजी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 186 ?

धर्मवीर संभाजी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

शिवपुत्र शंभूराजे आम्हाला प्राणांहून प्रिय,

या भूमीवर सदैव राहो,

हे नाव ….अमर अक्षय!

वीर,पराक्रमी,राजा अमुचा,

निधड्या छातीचा,

अखेर तो ही होता छावा,

शूर सिंहाचा….!

लिहिले कोणी काहीबाही,

त्यात नसे काही अर्थ,

फुकाच का देते कोणी,

बलिदान असे व्यर्थ?

किती सोसले हाल शरीराचे,

डगमगला नाही,

क्लेश, यातना, छळ सोसूनही,

शरणागत जाहला नाही!

कवी मनाचा शूर वीर शंभू,

संस्कृत पंडित, “बूधभूषण” रचनाकार,

भव्य दिव्य त्या ग्रंथात होई,

देवी शारदेचा साक्षात्कार!

येसूबाई महाराणी शोभली,

अनुरूप अर्धांगिनी,

ती तर होती शंभूराजांची,

सदैव शुभांगिनी !

इतिहासाच्या पानांमधली….

प्रतिमा शोधू खरी,

वीर संभाजी महाराजांचे,

अल्पायुष्य लखलखते…भरजरी!!

चित्र साभार – विकिपीडिया 

© प्रभा सोनवणे

(१ जानेवारी १९९९)

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शाप… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शाप… ☆ श्रीशैल चौगुले ☆

किती मनातल्या सांगू गोष्टी

जीवन हे पडेल अपूरे

काळजातले शब्द अनेक

कवितेचे ते स्वप्न अधूरे.

ओठावरले रुळले गाणे

बकुळीच्या छायेत विरले

फक्त आठवणी वेचताना

कसे काय आयुष्य सरले.

घन दाटलेल्या पावसात

लख्ख दिवस चमकतात

अजून माळावरल्या कुशीत

गुपित फुले ऊमलतात.

अधिर होते मन ग्रीष्मात

पुन्हा भाव ते न येतील

उगी दूरच्या छटा पहाता

सुरकुतले तारे गातील.

एकांकी मंजुळ, वाट जळा

पक्षी हरवले डोळ्यांमधे

हाक एकदा तीच येऊ दे

दव विरघळे साधेसुधे.

काय लिहू सांग कविता

सांजही दैव बदलते

शपथ एक कथा होते

जन्म शाप नित्य सलते.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #192 ☆ करुणा सागर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 192 ?

करुणा सागर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

अनेक वळणे घेते होते तयार अक्षर

भाग्य लाभले अक्षरास ते नाही नश्वर

काला अक्षर भैस बराबर मूर्खांसाठी

अक्षर अक्षर गिरवत होई कुणी कलेक्टर

मुळाक्षरांना ईश्वर मानू पूजा बांधू

मिळेल आशिष होऊ आम्ही सारे साक्षर

अक्षर ओळख नाही त्याची ऐसी दैना

मूर्ख अडाणी आणिक म्हणती त्याला पामर

साहित्याचे जुने बाड अन् ग्रंथ जपूया

संगणकावर देऊ जागा करून आदर

माठ मातिचा इथे बनवला कुंभाराने

वर्गामधले माठ घडवतो आहे मास्तर

मराठीतली अभंग, ओवी अभंग आहे

या संताचा ठेवा म्हणजे करुणा सागर

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणूस ☆ आनंदराव (नंदकुमार) रघुनाथ जाधव ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ माणूस ☆  आनंदराव (नंदकुमार) रघुनाथ जाधव ☆

शोध स्वतःचा घेतो

मनाच्या अंतरंगात जातो

 

लळा जिव्हाळा वाटतो

आनंदी क्षणाला भेटतो

 

निस्वार्थी सदैव वागतो

माणूस माणूस बघतो

 

जो तो आपला मानतो

कर्तव्य भावना जाणतो

 

संकट समयी धावतो

जीव आनंदी होतो

 

मातापिता नतमस्तक होतो

जगण्याला अर्थ येतो

© श्री आनंदराव (नंदकुमार) रघुनाथ जाधव

सांगली ८८३०२००३८९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – वटवृक्ष…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– वटवृक्ष…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

कुटुंबवत्सल वटवृक्ष,

पसरला दाट दुरवर !

घनदाट  छाया त्याची,

वाटसरूच्या शिरावर !

लहान मुले खेळती बागडती,

खेळे सुरपारंब्या मनसोक्त !

मोठ्यांना मोह न आवरे खेळाचा,

टांगाळून घेती आनंद होऊन मुक्त !

प्राणवायूचे संतुलन राखतो,

विषारी वायू  स्वतः शोषून !

सहवास त्याच्या सोबत असावा,

सांगती शास्त्र आपणा उद्देशून !

भूजल साठा करतो मुळाशी,

सोडतो बाष्प उन्हाळ्यात !

अक्षयवृक्ष म्हणती यास,

हिरवागार साऱ्या ऋतूकाळात !

सुहासिनी पूजती यास,

मागती  दीर्घायुष्य पतीचे !

जन्मोजन्मीची साथ मागे,

पूजन करती पतिव्रतेचे !

उपयोग याचे असती अनेक,

दूर करी दंतदुखी असो मधुमेह !

लेप याचा ठरे मोठा गुणकारी,

आयुर्वेदात महत्व नि:संदेह !..

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ वात…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

काय आलं ,काय गेलं,

काय घेतलं काय दिलं

माझं मी गणित मांडलं,

तेव्हा मला कळून चुकलं

माझं मीच सर्वस्व माझं,

तुझ्याकडे गहाण टाकलं

 

आत्माहीन कलेवर, 

फिरत साऱ्या घरभर ,

उगीच आस वेडी म्हणते,

अजून थोडा धीर,

माणुसकी वर प्रेम कर

दुसऱ्यासाठी जगून मर,

 

तुझं माझं एक गाव,

एकरूप जगणं एकच ठाव,

,ऐलतीर पैलतीर जोडते

 पाणी तोच स्वभाव,

दोन्ही देहात एकच भाव,

कुठलं वेगळं सांगणार नाव .

 

खरोखर त्वरा कर ,

नको थांबू मार्ग धर, 

जगण्याचं एक साधन म्हणून ,

देहावरती प्रेम कर,

 

होऊन उंच आभाळभर ,

मातीमध्ये मूळ धर, 

हात दे ,साथ दे , तुझ्या

प्राणांची ज्योत दे ,

जगण्यासाठी एकरूपतेची

नवी वेगळी जात दे

पणती मधल्या तेलाला या

जळण्यापुरती वात दे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 135 ☆ अभंग – रंग भरे जीवनाला… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 135 ? 

अभंग – रंग भरे जीवनाला… ☆

केस तुझे हे मोकळे

उडतात भुरूभुरू

जैसे सुटले बघ ते

अचपळ शाम-वारू.!!

 

अचपळ शाम-वारू

घाल आवर तयाला

भोळा जीव माझा सखे

सखे तयात गुंतला.!!

 

सखे तयात गुंतला

हवा आधार मनाला

तुझ्या आधारे रंग

 रंग भरे जीवनाला.!!

 

रंग भरे जीवनाला

हेचि पाहतो स्वप्नाला

छान बकुळ फुलांचा

देतो गजरा केसाला.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बंगला… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बंगला ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

मला वाटते नको बंगला

बाग बगीचा रहावयाला

मनी असू दे विस्तृत जागा

ह्या अवघ्या विश्वाला

 

आरसपानी निर्मळ मन हे

परोपकारासाठी झटावे

हात धरुनी दुबळ्याचा हो

दीप होउनी पुढे चलावे

 

नको भुकेले कोणी रहाया

घास भुकेल्या मुखी भरवावा

एक दाणा मिळून खावा

मनोमनी आनंद भरावा

 

गंध दरवळू दे सुमनांचा

कधी नसावा विकल्प हेवा

मनाच्या या बंगल्यात

सदैव मोद नांदावा

 

परमेशाचे धाम मन हे

सदैव राहो शुद्ध आचरण

दया क्षमा शांती वसू दे

मन आत्म्यासी समर्पण

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठ… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्येष्ठ… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

वैशाख लाही निवू लागली

ज्येष्ठाची  लगबग सुरू जाहली

 

जांभुळ पिकल्या झाडाखाली

निळी, जांभळी माती सजली

 

आम्रतरूवर जमुनि पक्षी

सोनकेशरी सांडत नक्षी

 

सुगंध मोगरा सांज धुंद करी

मात त्यावरी मृद् गंध परि करी

 

रवीतापाने दग्ध धरित्री

शांतविण्या ये वळीव रात्री

 

धसमुसळा हा, रीत रांगडी

औटघडीचा असे सवंगडी

 

तप्त तनुला शांत जरी करी

अंतरंगा तो स्पर्श नच करी

 

अंतर्बाह्य तृप्ती तियेची

करील हळुवार धार मृगाची

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares