मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – काहूर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? काहूर… ? श्री आशिष  बिवलकर ☆

डोळ्यादेखत त्याला मारतांना,

तिनेच सर्व काही पाहिलं आहे |

असंख्य विचारांच काहूर,

तिच्या मनात माजलं आहे |

*
निशब्द हेच शब्द आहेत,

आज माझ्याकडे फक्त |

पून्हा एकदा नंदनवनात,

सांडले निरपराधांचे रक्त |

*
जात, भाषा, राज्य विचारले नाही,

विचारला फक्त त्यांनी धर्म |

फैरी वर फैरी झाडत गेले,

घडवले हैवानांनी दुष्कर्म |

*

प्रत्येक हिंदूच्या मनात,

आज फक्त प्रचंड चीड आहे |

आमच्याच देशात येऊन,

आम्हालाच खाणारी कीड आहे |

*
बंगाल, केरळ असो वा काश्मीर,

आमचीच केली जात आहे शिकार |

लांगुलचालन आता बस झाले,

संपवायलाच हवा देशद्रोही विकार |

*
अहिंसेचा चरखा कातून,

समस्या कधी सुटत नाही |

सर्जिकल स्ट्राईक शिवाय,

दुसरा पर्याय सुचत नाही |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विश्वास… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? विश्वास  ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

काडी काडी जमवून तिने

गाडीवरती घरटे केले

विश्वासाने घरट्यामध्ये

उबवण्यास्तव अंडे ठेवले

*
पाहून मी या विश्वासाला

मनोमनी चकितची जाहले

जपण्यासाठी विश्वासाला

किल्लीला मी अडकवून ठेवले

*
पंख फुटूनी पिल्ले उडतील 

तदनंतर ही हलेल गाडी

माणूस म्हणूनी पक्षासाठी

कृती करू शकते एवढी – – – 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माया… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ माया… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

दृश्य अनोखे आज 

रस्‍त्‍यावर मला दिसले

पाहून निर्मळ प्रेम ताईचे 

डोळे माझे ओले झाले 

*

असेल हरवले बहुदा

छत्र डोईवरचे मायेचे 

आले म्हणून ताईला 

भान मग कर्तव्याचे

*
घेण्या छोट्याची काळजी 

जरी बालपण गमावले 

शिरणे भूमिकेत आईच्या 

तिने आनंदाने स्वीकारले

…. तिने आनंदाने स्वीकारले

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाहुनी बहावा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पाहुनी बहावा... ? सौ शालिनी जोशी 

पाहुनी बहरलेला तो बहावा

सहजच शब्द आले वाहवा

*
घोसांनी पिवळ्या तरु तो झाकला

भूमीवर गालिचा पिवळ्या फुलांचा अंथरला

*

जणू पितांबर नेसुनी श्रीराम मूर्ती अवतरली

आणि धरती ही पिवळे वधूवस्त्र लेवून सजली

*
जणू तरुवर रघुराजाने वर्षाव सुवर्णाचा केला

सडा त्याचा धरणीवरही पडला

*
पिवळ्या रत्नांचे जणू टांगले झुंबर

प्रकाशकिरण त्यातून पडले भूमीवर

*
निसर्गाचा वातावरण तज्ज्ञ हा तरु

बहरानंतर साठ दिसांनी पाऊस होई सुरू

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – दिव्यत्व साकार तेज:पुंज !! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दिव्यत्व साकार तेज:पुंज !!  ? श्री आशिष  बिवलकर ☆

कर्दळीवनात! झाला चमत्कार!

दिव्यत्व साकार! तेज:पुंज !! १ !!

*
चैत्र शु. द्वितीया! स्वामी आगमन !

प्रकटले तन! दर्शनासी !! २ !!

*

अक्कलकोटला! स्वामी प्रकटले !

भाग्य उमटले! उद्धारासी !! ३ !!

*

चोळप्पाच्या घरी! स्वामींचा निवास !

स्वामी सेवा ध्यास! चोळप्पासी !! ४ !!

*

दत्त अवतार! त्रिपुंड कपाळी !

रुद्राक्षाच्या माळी! दिव्यदृष्टी !!५ !!

*

भिऊ नकोस तू! मी आहे पाठीशी !

विश्वास गाठीशी! स्वामी भक्ता !! ६ !!

*

आशिष वंदितो! भक्तीने स्मरून !

नेतोय तारुन! भवसिंधू !! ७ !!

© श्री आशिष  बिवलकर

दि. 04 मार्च 2025

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बहावा… (विषय एकच… काव्ये तीन) ☆ सुश्री नीलांबरी शिर्के  – डॉ. सोनिया कस्तुरे – श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  बहावा… (विषय एकच… काव्ये तीन) ? सुश्री नीलांबरी शिर्के  – डॉ. सोनिया कस्तुरे – श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

सुश्री नीलांबरी शिर्के

हिरवा चुडा हातात लेऊन

झाड हळदुले नवरी झाले ..  की ..  

रविराजाने विसरून जाऊन

सुवर्ण घडे इथे ओतले

*

रखरखत्या उन्हात फिरता

दृश्य असे दृष्टीस पडता

निसर्ग संपन्नतेपुढे आपला

आपसुक झुकतोच ना माथा  

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

( २ )

डॉ.सोनिया कस्तुरे

निसर्गाची गुढी | उभी उंच नभी 

तम, प्रखरता | नाही तमा मनी

*
डौलदार बांधा | हळद पिऊनी 

सोनेरी झुंबर | जणू नभांगणी

*

कोवळी नाजुक | हिरवी पालवी

अंगीखांदी कशी | मधून डोकावी

*
रुणझुण तिला | पवन डोलवी

गाणे सुखे गाते | रणरणत्या उन्ही

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

( ३ )

श्री आशिष बिवलकर   

ऋतू चक्राचा

घेऊन सांगावा |

चैत्र पावलांनी,

फूलला बहावा |

*
ग्रीष्माचा कहर,

तापले माळरान |

पिवळ्या फुलांनी,

सजला तरु छान |

*
उकाड्याने हैराण,

जीवास लागे उमासा |

रंगांची चाले उधळण,

दृष्टीस मिळे दिलासा |

*
तरुवर लटकली झुंबरे,

तरुतळी गालिचा सुवर्ण |

उष्ण गंधीत समीर,

डुलती तालावर पर्ण |

*
रंगांनी रंगला बहावा,

नादच त्याचा खुळा |

निरंतर चालत असे,

निसर्गाचा सोहळा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वर्णीम पहाट… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्वर्णीम पहाट… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

चैतन्य चराचरी

झाली सोनेरी पहाट 

तम गेले लया

सुवर्ण फुले फुलली…

 

साधन नीत ज्याचे

अंतरीचा भानू उदेला

सत्कर्म नीत ज्याचे 

सुवर्ण फुले फुलली..

 

सदगुरुमय हृदय ज्याचे

तमाची रात्र‌ संपलीच

संपलीच चिंता, आता 

सुवर्ण फुले फुलली…

 

मन प्रसन्न ज्याचे

वाणीतही गोडवा

गुरुसेवा हेचि कर्म

सुवर्ण फुले फुलली…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ उलगडणं… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सोनसळी खेळ  ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

अंगावरची अहंपणाची

प्रतिष्ठेची आवरण काढावीत – –

निवांत सुखावह बसावं 

हातात घ्यावं आपलंच मस्तक – – 

आपणच वाचावं स्वतःला

जणू वाचतोय एखादं पुस्तक – – 

काना, मात्रा, वेलांट्या 

अर्धविराम, प्रश्नचिन्ह यातून

उलगडत जाऊ आपण आपल्याला – – 

चला व्हा निवांत,

आपणच आपणास समजून घ्यायला – – 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सोनसळी खेळ ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सोनसळी खेळ  ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

सुवर्ण बिंबाचा दिसताच

मोह पडे सकल विश्वाला

सुवर्ण उधळी माथ्यावर

पाखरे करूनी गलबला॥

*
परीस आहे का हा अरुण

शंका येतसे भाबडी भोळी

परीस परीसाच्या जादूई 

स्पर्शे परिसर सोनसळी॥

*

मल्हार आळवत सकल

आसमंत पहा भारावले

मल्हार प्रसिदण्या का कोणी

बेल भंडार हे उधळले॥

*

पितांबर नेसे नारायण

अर्घ्य अवनीचे स्विकारण्या

पिता अंबर माता धरती

हस्तांदोलनी ये पक्षी गाण्या॥

*

खेळ कोणता खेळते सृष्टी

अंदाज नाही येत सांगता

खेळ मना कल्पना विलासी

सुरुवातीस या ना सांगता॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आजी… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ आजी… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नको गालिचे गाद्या गिरद्या

हवी आजीच्या पायाची उशी,

न्हाऊ घालिता आजी प्रेमाने

झोप घ्यावी म्हणतो जराशी !

*
खरी व्याख्या स्वर्ग सुखाची

नसे ठाऊक मजला दुजी,

दे देवा अशीच सकलांना 

मज सारखी प्रेमळ आजी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares