मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पन्हाळगड… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ पन्हाळगड… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆

सुंदर-सुंदर, रुप मनोहर

डोंगर-दर्या नि व्रुक्ष कलंदर

रस्ता हा सर्पिल वळणे बिलंदर

कडे-कपारी या भासती दुर्धर

 

  पन्हाळा असा हा चित्तास वेधक

  सांगू तरी किती स्थळाचं कौतुक

 नरवीर बाजी नि जिवाचं बलिदान

  मोरोपंतांच्या या आर्यांच गुणगान.

 

  पाहावे तरुवर,वेली नि उद्यान

  धान्याचं कोठार दरवाजा तीन

  शिवराय स्पर्शानं, भूमी ही पावन

  ताराराणींचा हा वाडा ही शान.

 

  तटबंदी भक्कम,बुरुजांचा मान

  गडाचं टोक ते भयावह. दारुण

  गनिमी वाटा या यशासी कारण

  आबालव्रुद्धांना खास आकर्षण.

 

  थंड ही झुळुक, वात हा शीतल

  शहारे तनमन,बनते ओढाळ

  फुलांचा सुगंध,दरवळे परिमळ

  धुके हे दाटते,वेढत स्थळ.

 

  गडात गड हा पन्हाळा छान

 शिवराय स्मृतींचे सोनेरी पान

 मराठी मनाला सार्थ अभिमान

 नतमस्तक होऊन राखावा मान.

 

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #144 ☆ रडला पाउस… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 144 ?

☆ रडला पाउस…

आकाशाने पंख झटकले पडला पाउस

तिच्या नि माझ्या प्रेमासाठी भिजला पाउस

 

भेटीसाठी झाडांच्या तो नित्य यायचा

वृक्षतोडही झाली म्हणुनी चिडला पाउस

 

सत्तेला या कळकळ नाही कधी वाटली

शेतकऱ्यांचा फास पाहुनी रडला पाउस

 

नांगरलेल्या ढेकळास ह्या मिठी मारुनी

कोंबासोबत हसता हसता रुजला पाउस

 

रात्री त्याने कहरच केला बरसत गेला

शांत जाहला बहुधा होता थकला पाउस

 

आकाशाच्या पटलावरती किती मनोहर

इंद्रधनुष्या सोबत होता नटला पाउस

 

गळून पडले फुलातील या पराग तरिही

तुझ्या नि माझ्या प्रीतीचा मी जपला पाउस

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ भेट… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

( वृत्त — चंद्रकांत )

निरव शांतता भरुन राहिली एकाकी रात्री

रातकिड्यांचा सूर भेदतो शांततेस रात्री

 

किती पाहती वाट सख्याची आतुरली गात्रे

एकांताचे सौख्य लाभता सुखावली गात्रे

 

जणू पसरला चांदणचूरा महालात माझ्या

चांद प्रितीचा प्रकाशला तो  महालात माझ्या

 

आश्वासक तो स्पर्श बोलला गुपीते मनाची

आणाभाका घेताना बघ साक्ष दो मनाची

 

संसाराची रेखिव स्वप्ने होती दोघांची

साक्षात पुढे उभी राहिली सृष्टी दोघांची

 

या भेटीतुन ये आकारा नाते जन्माचे

लाभले मला मनाजोगते इप्सित जन्माचे

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सदाफुली ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? कवितेचा उत्सव ?

☆ सदाफुली ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

साधेपणा तुझा हा विविधरंगी बहरतो.

प्रतिकूल समयी जीवन आस खुलवितो..!

 

जमीन खडकाळ पाषाण,पाणी कमी

तू उगवत राहतेस घेऊन अनोखी उर्मी

 

केसात माळून घेण आवडलं नसेल तुला

चरणी कुणाच्या बसणं,रुजलं नसेल तुला

 

फुलदाणीतही तू कधी दिसलीच नाहीस

सजवण्यासाठी वापर, तुला पटलेच नाही

 

स्वागतासाठी कुणाच्या सवड तुला नाही

कौतुकाची देखील तुला खबरबात नाही

 

ताठ मानेचे हिरवे लेणे,स्वाभिमानाने मिरवते

कोणाशी स्पर्धा नाही, मनोमनी सुखावते

 

सदाफुली तुझ्या जगण्यास,समरुप व्हावे,

सदा बहरत राहून,नित्य आनंद लूटावे..!

© डॉ.सोनिया कस्तुरे

5 जून 2021

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ टेक ऑफ… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ टेक ऑफ… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

टेकऑफ घेण्या ,

हीच योग्य वेळ.

बाकी सर्व खेळ,

संपुष्टात .

जपावी ही नाती,

अंतर राखून .

क्वारंटाईन व्हावे,

ज्याचेत्याने.

इदंन ममचा,

झाला साक्षात्कार .

केला स्वाहाकार ,

कोरोनाने.

कोरोनाने केले,

महाग जगणे.

स्वस्त झाले फक्त ,

मरणसरण.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गोड गोडूला ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? 😍 गोड गोडूला ! 💓 ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

न कळत्या वया मधे

धरून पुस्तक हाती

मन लावून शोधतो

जणू जगाची उत्पत्ती

पाहून ही एकाग्रता

चक्रावली मम मती

वाचाल तर वाचाल

हेच त्रिवार सत्य अंती

आदर्श गोड गोडुल्याचा

आजच्या पिढीने घ्यावा

चांगल्या पुस्तकात मिळे

तुम्हां ज्ञानामृताचा ठेवा

छायाचित्र – सुशील नलावडे, पनवेल.

© प्रमोद वामन वर्तक

१४-०६-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्पर्श… ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? कवितेचा उत्सव  ?

☆ स्पर्श… ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆ 

घनगर्जत पाऊस आला

चहूबाजूंनी कसा बिलगला

ओल्या मिठीत सजणा

स्पर्श तुझा ओथंबला…

 

शिल्पासम काया माझी

लाजूनी हळू थरथरली

धारात लक्ष सरींच्या

तव मिठीत अलगद मिटली..

 

थेंबांची नक्षी सजली

भिजलेल्या गाली ओठी

घे टिपून अधरांनी ती

जी केवळ तुझ्याचसाठी…

 

चेतविले तुझ्या स्पर्शाने

स्पंदने अधीरली हृदयी

आलिंगन देऊन सखया

हा दाह आता शांतवी…

© अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 108 – मोहात दंगतो हा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 108 – मोहात दंगतो हा ☆

 

मोहात दंगतो हा

प्रेमास साहतो हा

 

घेऊन आस खोटी

सत्यास जाळतो हा

 

खोटीच स्वप्न सारी

नित्यास पाहतो हा

 

तोडून प्रेम धागे

रूपास भाळतो हा

 

शोधात त्या परीच्या

राणीस टाळतो हा

 

गेली परी निघोनी

भोगास भोगतो हा

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिंडी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ दिंडी…   सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

दिंड्या चालल्या चालल्या

पंढरीच्या  वाटेवर

 वाट पहाते माऊली

 उभी तिथे विटेवर

 

  टाळ चिपळ्यांचा नाद

  सारा पावित्र्याचा वास

  वारकऱ्यांच्या पोटाला

  देई  माऊलीच घास

 

 मुखी विठ्ठल विठ्ठल

पाय तालावर  पडे

डोईवरची तुळस

भेटीलागी मन वेडे

 

 काळ्या ढगातून कधी

 विठू झरझर झरे

  पंढरीच्या वाटेवर

  विठूमय शेतशिवारे

 

 विठ्ठलाचा नामधोष

 नीत्य कानावर येतो

 वारकऱ्यांच्या वेषात

 मज सावळा भेटतो

विठ्ठल विठ्ठल  एकनाथ नामदेव तुकाराम 🙌

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #130 – ☆ संत तुकडोजी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 130 – विजय साहित्य ?

☆ संत तुकडोजी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

इंगळे कुलात | संत तुकडोजी |

माणिक बंडोजी | महाराज ||. १

 

माऊली मंजुळा | वडील बंडोजी |

गुरू आडकोजी | यावलीत || २

 

ग्राम विकासाचा| घेऊनीया ध्यास |

विवेकाची कास | पदोपदी || ३

 

स्वयंपूर्ण खेडे | सुशिक्षित ग्राम |

ग्रामोद्योग धाम | आरंभीलें || ४

 

सार्थ समन्वय | ऐहिक तत्त्वांचा |

पारलौकीकाचा | उपदेश || ५

 

खंजिरी भजन | राष्ट्रसंत मान |

संस्कारांचे वाण | तुकडोजी || ६

 

व्यसना धीनता | काढलीं मोडून |

घेतली जोडून | तरुणाई || ७

 

शाखोपशाखांचे | गुरू कुंज धाम |

सुशिक्षित ग्राम | सेवाव्रत || ८

 

नको रे दास्यात | नको अज्ञानात |

नारी प्रपंचात | पायाभूत || ९

 

कुटुंब व्यवस्था | समाज व्यवस्था  |

राष्ट्रीय व्यवस्था | शब्दांकित || १०

 

नको अंधश्रद्धा | सर्व धर्म एक |

विचार हा नेक | रूजविला || ११

 

कालबाह्य प्रथा | केलासे प्रहार |

विवेकी विचार | अभंगात || १२

 

एकात्मता ध्यास | केले प्रबोधन |

दिलें तन मन | अनुभवी || १३

 

लेखन विपुल | कार्य केले थोर |

राष्ट्र भक्ती दोर | तुकडोजी || १४

 

कार्य अध्यात्मिक | आणि सामाजिक |

साहित्य वैश्विक | ग्रामगीता || १५

 

कविराज लीन | टेकविला माथा |

तुकडोजी गाथा | वर्णियेली || १६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares