मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवीश्वर…☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ कवीश्वर… ☆ सौ. मुग्धा कानिटकर 

कवी रचतो सृष्टी

सृष्टी नाम शब्द

शब्द  होई काव्य

काव्य नूतन नित्य

नित्य रंगवी स्वरूप

स्वरूप निनादे स्वर

स्वर करत संकल्प

संकल्प साधत वाङ्मय

वाङ्मय प्रकट वाणी

वाणी  दर्शन ईश्वर

ईश्वर वर्णाकृती जशी

जशी साक्षात चित्रवाणी

चित्रवाणी खेळ प्रकाश

प्रकाश अनंत दिव्य

दिव्य भासे विश्व

विश्व पालक विष्णू

विष्णू  हाच कवीश्वर

विष्णू हाच कवीश्वर

© सौ. मुग्धा कानिटकर

सांगली

फोन 9403726078

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 118 – बाळ गीत – गुणवत्तेचा ध्यास ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 118  – बाळ गीत – गुणवत्तेचा ध्यास 

गुणवत्तेचा ध्यास लागला

गुरुजींच्या राग पळाला ।

गुरुजी आले खेळायला

आलीय रंगत शिकण्याला ।।धृ।।

 

गोष्टी गाणी धमाल सारी

तालात नाचती पोरं  पोरी ।

बदलून गेली शाळा सारी

गुरुजीही लागले नाचायला ।

हो आलीय रंगत …  ।।१।।

 

साहित्याची जत्रा भरली

सारीच मुले खेळत रंगली।

खेळातून ही अक्षरे जुळली

मजाच येते ही शिकामाला

हो आलीय रंगत … ।।२।।

 

चढवू मुखवटे खोटे खोटे

बनुया सैनिक छोटे-छोटे ।

अभिनयातून गोष्टही पटे

खोटी तलवारी खेळायाला

हो आलीय रंगत … ।।३।।

 

अंका ऐवजी दाखवू बोटे

कृती करूनी अंकही पटे।

झटक्यात करू दशक सुटे।

टाळ्या नी वाजवायला ।

गणिती भाषा शिकण्याला … ।।४।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी फुलवेडी वेल ☆ शिरीष पै ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ माझी फुलवेडी वेल ☆ शिरीष पै ☆

माझी फुलवेडी वेल

तिची फुलांची लहर

नेमावाचून बहर

 

तिची फुलण्याची खुशी

जेव्हा लागतसे कळ

पानापानामागे फूल

 

असा प्राणाचा बहर

रोज येईल कुठून

देठ जाईल तुटून

 

देठ तुटताना तरी

डोळे यावेत भरून

वेड वेलीचे स्मरून

 

– शिरीष पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हवे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हवे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

               भेटायला हवे

               बोलायला हवे

 

               दु:ख सुखापरी

               झेलायला हवे

 

               कोठेतरी.. कधी

               थांबायला हवे

 

               डोळे दुज्याप्रती

               ओलायला हवे

 

               वारा फिरे तसे

               चालायला हवे

 

               सांजावता ‘तिथे’

               पोचायला हवे

 

               ‘नाही’ कधीतरी

                सांगायला हवे

 

                बोलावया; पुरे

                ऐकायला हवे

 

                भूतास संशयी

                गाडायला हवे

 

                आल्या भरू मना

                सांडायला हवे

 

                वागेल तो; तसे

                वागायला हवे

 

                आयुष्य पाहिजे?

                सोसायला हवे

 

                बाकी उरावया

                भागायला हवे

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #140 ☆ गणाधीश गणपती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 140 – विजय साहित्य ?

☆ गणाधीश गणपती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

माझा गणपती बाप्पा

कलागुण अधिपती

आद्य काव्य लेखनिक

गणाधीश गणपती…! १

 

माझा गणपती बाप्पा

पाई जास्वंदीचे फूल

लोटांगण देवा तुला

नको संकट चाहूल….! २

 

अष्ट विनायक क्षेत्री

पाहू तुझे निजरूप

सुखकर्ता दुःख हर्ता

परीमळे दीप धूप….! ३

 

गौरी पुत्र गजानन

लंबोदर एकदंत

आहे संकट नाशक

दूर करी क्लेष खंत….! ४

 

माझा बाप्पा गणपती

माझा सखा सवंगडी

जपोनीया ठेवितसे

गोड गुपिते ती बडी…..! ५

 

कार्यारंभी स्तवनाने

कार्य निर्विघ्न सफल.

आहे ओंकार स्वरूप

विघ्नेश्वर हा सकल…..! ६

 

कला आणि विद्याधीश

माझा बाप्पा गणपती

नाम संकीर्तनी वाढो

कविराज मतीगती……!७

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू आणि मी… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तू आणि मी … ☆ सौ राधिका भांडारकर

आठवतात मजला

ते सागर किनारे

बुडत्या सूर्याच्या साक्षीने

दिलेले प्रीत नजारे…

 

चिंब पावसातले ते

स्पर्श ओले थरथरते

तुझ्या देहगंधातले

तरंग ते आठवते….

 

तू प्रतिक्षा केलीस माझी

त्या हिरव्या झाडाखाली

दोघांच्या भेटीची ओढ

राघू मैनेने पाहिली..

 

हाती हात गुंफुनी

त्या माळरानातूनी

मुक्त चालताना

कितीदा घेतले लपेटुनी…

 

सळसळ पर्णांची

छुमछुम पाण्याची

मिसळली तालात

धून आपल्या प्रेमाची…

 

वेचते आहे क्षण सारे

तुझ्या माझ्या शिंपल्यातले

खिडकीवर टपटपणारा पाऊस

सांडतो मोती आठवणीतले,,,.

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चित्रातून कशीबशी बाहेर आली मोनालिसा?  ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? चित्रातून कशीबशी बाहेर आली मोनालिसा? ? ☆ सुश्री निलिमा ताटके ☆ 

चित्रातून कशीबशी बाहेर आली मोनालिसा.

लपून, हळूच घेते आजूबाजूचा कानोसा.

फार कंटाळली होती, एके ठिकाणी बसून.

जाम वैतागली होती खोटं खोटं हसून.

कडक चहा हवा बुआ ! हा आळस घालवायला.

चहाबरोबर चालेल मला काही तोंडांत टाकायला.

करा तयारी चहा-नाश्त्याची, मी पटकन् अंघोळ करुन येते.

फ्रेश फ्रेश होते, नि पुन्हा प्रसन्नशी हसते.

माझे हसू, लोकं होतील परत फिदा.

जगा वेड लावीन मी नव्याने पुन्हा.

छायाचित्र  – सुश्री निलिमा ताटके.

© निलिमा ताटके

23.8.2022.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || श्री गणेश || ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ || श्री गणेश ||  ☆ सौ. विद्या पराडकर ☆

वंदन श्रीयेशा,

वंदन श्रीयेशा,

बुद्धिदायक हे परमेशा,

यशकीर्तिच्या परेशा ||

 

कार्यारंभी आवाहन करतो,

मनोभावे पूजा करतो,

सुरवर सारे तुजला स्तविती,

दैत्यांनाही येई प्रचिती ||

 

रिद्धीसिद्धी चा आहेस कर्ता,

विघ्ननाशका विघ्नहर्ता,

सुखकारक तू दुःखहर्ता,

सगुणरुपी तू आनंद दाता ||

 

पृथ्वी प्रदक्षिणेची चुरस लागली,

कार्तिक, गणेश सज्ज जाहले,

प्रथम निघाले मयुरावरी कार्तिक,

श्रीगणेशाने मातेलाच प्रदक्षिणा घातली ||

 

प्रदक्षिणेने श्रीगणेशास जयश्रीने सजविले,

बुद्धिमत्तेचे द्योतक श्रीगणेश शोभले,

चौदा विद्यांचा खरे आहेस तू कर्ता,

चौसष्ट कलांचा आहेस दाता ||

 

इतिहासाने सांगितले,

गणेशजी मुषकावरून जात असता कोसळले

त्यामुळे चंद्र हासला शाप दिला गणेशाने

मुख चंद्राचे जो पाही, आळ चोरीचा येई ||

 

शंकराचे आत्मलिंग लंकेश्वर नेता,

अडविले श्रीहरीने गणेश हस्ता,

पश्चिम समुद्री स्थापिले आत्मलिंग हे असे

गोकर्ण महाबळेश्वर म्हणून नावाजले कसे ||

 

ये हासत नाचत गणेशा

दूर करी रे देश समस्या

एकजुटीचा मंत्र देई

देशभक्तीचे गीत गाई ||

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस असा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस असा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

पाऊस असा घनघोर ,

जिवाला घोर.

खचतील ,

संयमी भिंती .

पाऊस जरी घनघोर ,

होउन यार,

ठरवितो व्यर्थ ,

मनाची भीती.

पाऊस असा मायावी,

गारुड घालून अवघे,

व्यापतो पुरा,

मनस्वी .

पाऊस असा दयावंत ,

बरसून अमृतधारा.

संपन्न चिंब करुनी,

साक्षात उभा भगवंत.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बहिणाबाई चौधरी… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ बहिणाबाई चौधरी ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

बहिणाबाई चौधरी - विकिपीडिया

बहिणाबाई चौधरी

(११ ऑगस्ट, इ.स. १८८० – ३ डिसेंबर, इ.स. १९५१)

बहिणा तुझ्या नजरेने

टिपले अवघे सजीव

बांधून त्याना शब्दात

दिलेस अमरत्व !

ताकद पक्षी चंचूची

समजली तुला कशी गे

मानवाची दहा बोटे

वाटली तुला फिकी गे !

चुलीवरचा तवा देतो

जरी चटके हाताला

तोच तवा गरम भाकरी

खाऊ घालतो आम्हाला !

नित्य साध्या गोष्टीतून

दिलेस तू आम्हा ज्ञान

त्यामुळेच असून निरक्षर

ठरलीस खरी साक्षर !

गिरवावा तुझा धडा

पुस्तकाच्या शिक्षणाने

असे तुझे तत्वज्ञान

 मिरवावे अभिमाने !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares