मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीप पाजळू या !!☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ ” दीप पाजळू या !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आईबाबांचा लेक लाडका

दीप सर्वांच्या आशेचा असे

भविष्यातील आधार काठी

मानसिक स्वास्थ्य जपतसे ||

 

ज्ञानदीप उजळी जीवना

दूर करूनिया अज्ञानाला

विद्येचे हे पवित्र मंदिर

देतसे आकार आयुष्याला ||

 

स्नेहदीप हा माणुसकीचा

घराघरातून तेवतसे

स्नेहबंध हा मानवतेचा

घट्ट बांधुनिया ठेवीतसे ||

 

मांगल्याचा दीप उजळतो

शांतपणाने देवघरात

चैतन्याच्या लहरी उठवी

प्रसन्नचित्ते चराचरात ||

 

दीपकाचे पूजन करिती

कुटुंब स्वास्थ्य समृद्धीसाठी

विनम्र आवाहन तेजाला

उत्तम आरोग्य सर्वांसाठी ||

 

ज्योतीने पेटवितो ज्योत

दीप करीतसे दीपोत्सव

अखंडतेचे तत्व चेतवी

तिमिरातूनी  प्रकाशोत्सव ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनंताचा मंत्र… ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ अनंताचा मंत्र… ☆ श्री आशिष मुळे ☆

दगडा वरती कोरत जावे

कागदा वरती छापत जावे

मना वरती उठवत जावे

लिहिणाऱ्याने लिहीत जावे।

 

बघणाऱ्याने निरखत जावे

जळणाऱ्याने निंदत जावे

हसणाऱ्याने चघळत जावे

लिहिणाऱ्याने लिहीत जावे।

 

भावणाऱ्याने रड़त जावे

जाणणाऱ्याने पारखत जावे

वाचणाऱ्याने शिकत जावे

शिकता शिकता लिहित जावे।

 

लिहिता लिहिता वाटत जावे

वाटता वाटता मरून जावे

मेल्यानंतर अमर व्हावे

लिहिणाऱ्याने लिहीत जावे।

 

कालचक्रात फिरता फिरता

स्मृतिरुपी पसरत रहावे

अंधकार जगी उगवता

ज्ञानप्रकाशे जगी अवतरावे।

 

लिहिणाऱ्याने लिहित जावे

वाचणाऱ्याने शिकत जावे

शिकता शिकता लिहित जावे॥

© आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 105 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 105 ? 

☆ अभंग… ☆

सोज्वळ नजर, सतत असावी

कधीच नसावी, अमंगल…०१

 

पाहता सहज, प्रेमळ भासावी

नकोच रुतावी, आरपार…०२

 

बोलतांना कधी, क्रोधीत न व्हावे

सहज जपावे, अनुबंध…०३

 

निर्भेळ बोलावे, मुक्तत्वे हसावे

आणि ते कळावे, सकळिक…०४

 

ऐसी व्हावी ख्याती, तुम्ही मितभाषी

न व्हावे दोषी, नजरेत…०५

 

शब्द माझे वेडे, लिहिले वाहिले

पूर्णत्वास नेले, अभंगाला…०६

 

तोडके मोडके, बोल हे बोबडे

गिरविले धडे, हळूहळू…०७

 

कवी राज म्हणे,असू द्यावे भान

आपण सुजाण, कविवर्य…०८

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरली  दिवाळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सरली  दिवाळी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सरली आज दिवाळी,

 जपू मनी आनंदाचे क्षण!

प्रत्येक दिवाळीची ,

 मनी असे वेगळी आठवण!

 

वसुबारस ते भाऊबीज,

 दिवस असती प्रकाशाचे !

तोच प्रकाश मनात राहो,

 दिवे उजळीत अंतरीचे !

 

 स्नेहभाव वाढीस लागे ,

 उणी दुणी विरघळून जाती!

दीपावलीच्या आनंदात ,

 झरती स्नेहाच्या बरसाती!

 

रेखते अंगणी रांगोळी,

 ठिपक्यांची अन् नक्षीची!

तशी राखावी सर्वांची अंतरे,

 रेखीव, सुंदर नात्यांची !

 

असेच राहो मन आनंदी,

 निमित्त कशाला दिवाळीचे?

प्रार्थना करू ईश्वराची ,

 निरंतर राहो सौख्य मनाचे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वचन… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वचन 💦 सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सागरलाटा धावत येती

किनाऱ्या भेटण्याला

अडवी वारा भाग पाडतो

परत लोटण्याला

 

किती काळ तिष्ठत राही

किनारा मीलनाला

पुनरपि लाटा धाव घेती

किनारी मिटण्याला

 

आर्जवे तरी किती करावी

मनास उमगत नाही

अचल मी साद घालतो

त्यांस समजत नाही

 

वेल्हाळ या लाटा उसळती

अधिर जाहल्या मनी

कवेत घेण्या आतुरसा

दाटली असोशी मनी

 

पूर्तता  कधी प्रतिक्षेची

आर्त आर्त उर्मी

अनंतकाळ वाट पाहीन

वचनची दिधले मी

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बोगनवेल ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? बोगनवेल ! ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

असे दुनिया रंगीत माझी

दुरून जणू कागदी वाटे,

नसे मज कुठला सुवास

फुलांपेक्षा अंगभर काटे !

शोभा वाढवी कुंपणाची

राखण गुराढोरांपासून,

नको जवळीक माझ्याशी

काटे काढतील सोलून !

दिसती पाकळ्या शोभून

माझ्या एखाद्या हारात,

वाढे सुंदरता कुणा घरची

कमान करता गवाक्षात !

नको मज जादा निगराणी

वाढीस पुरे थोडसं पाणी,

जरी नसले फुलांची राणी

नयन सुखावती रंग झणी !

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संदेश… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ संदेश… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सुखी माणसाचा चोरावा सदरा

कुणी असे सुखी, जगी सांगा जरा.

 

धन-दौलत आहे चिंता खातसे

ज्ञानी परंतु समाजाची ती कारा.

 

राजा प्रजेचा शत्रु सिंहासनार्थी

बंधू-भाव छळती कौरवी नारा.

 

रित प्रत्येकाची स्वार्थ प्रमाणात

शोध आत्मानंदी व्यर्थ चंद्र-तारा.

 

सुखी माणसाचा चोरावा चेहरा

डोळ्यात आसवे माया शिरजोरा.

 

फासूनीया रंग भुमिका साधतो

विदुषक जीवनात दैव दोरा.

 

सुखी माणसाचे चोरावे काळीज

विकारदुषित मौज नशा भारा.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 127 – आधार ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 127 – आधार ☆

जरी ईश्वरा तू निराकार आहे

मनाला तुझा एक आधार आहे

 

नको वासना ती वृथा लोभ सारे

मनी मानसी एक ओंकार आहे

 

घडावा सदा संग तो सज्जनांचा

वृथा वागणे हा अहंकार आहे

 

स्मरावे तुझे रूप चित्ती असे तू

अनादी आनंता निराकार आहे

 

उणे वैगुणाला नसे येथ कांही

क्षमा याचनेला पुढाकार आहे

 

असावी कृपाही मला बालकाला

सदा ह्या पदांना नमस्कार आहे

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जरा अलगद… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ जरा अलगद 🪔 डॉ.सोनिया कस्तुरे ☆

जरा अलगद उचला

या विझलेल्या पणत्यांना

काल अंधाऱ्या रात्री ज्यांनी

प्रकाश दिलाय आपल्याला

खूप सोसलं असेल यांनी..

कधी हळूवार तर कधी

सोसाट्याचा वारा..!

 

झेलली असतील अनेक वादळं

अंधारलेला पावसाळा !

 

कोणालातरी वा काहीतरी जाळून

आनंद नाही त्यांनी निर्माण केला

स्वतः जळून, पेटत राहून

उजेड दिलाय आपल्याला

जरा हळूच उचला

या विझलेल्या पणत्यांना..!

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #149 ☆ देव देव्हार्‍यात नाही …! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 149 – विजय साहित्य ?

☆ देव देव्हार्‍यात नाही …! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

पैशामधे मोजमाप

देव देव्हार्‍यात नाही

शोधूनीया पाही

जगतात . . . !

 

सेवाभाव जाणायला

हवे नात्यांचे गोकुळ

विसंवादी मूळ

देखाव्यात. . . !

 

देवरुप जाणायला

नररूप आधी जाण

देव्हार्‍याची खाण

सापडेल. . . !

 

अशा देव्हार्‍यात

देव राही जागा

ह्रदयाचा धागा

विचारात.

 

देवरूप शोधायला

मायबाप आधी जाणा

कैवल्याचा राणा

अंतरात. . . . !

 

गरजेस बघा

येतो धावून माणूस

नसे मागमूस

उपकारी.. . . !

 

अशा देवासाठी

मनी हवी भूक

देव्हार्‍याचे सुख

कश्यासाठी. . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares