मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 135 ☆ गाव आठवांचा एक… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 135 ?

☆ गाव आठवांचा एक… ☆

गाव आठवांचा एक

रोज स्वप्नात दिसतो

दिसे डोंगर साजिरा

सूर्य जाताना हसतो

 

सूर्य जाताना हसतो

पश्चिमाही लालेलाल

सांज सावळी होताना

वारा पुसे हालचाल

 

वारा पुसे हालचाल

वृक्ष वेली धुंदावती

आल्या गेल्या पाहुण्यांशी

चूली पेटत्या बोलती

 

चूली पेटत्या बोलती

येतो गंध भाकरीचा

बेत फक्कड असावा

वास छान ओळखीचा

 

 वास छान ओळखीचा

येते दाटून ही भूक

माय प्रेमाने वाढते

याला म्हणतात सुख

 

याला म्हणतात सुख

ओटी भरून घेतले

आणि गावाच्या बाहेर

    नवे शहर गाठले

 

नवे शहर गाठले

परी गाव खुणावते

त्या पाण्यात पाटाच्या

अनवाणी घोटाळते

 

अनवाणी घोटाळते

कधी बोरी बाभळीशी

सांगा विसरू कशी मी

 आहे नित्य हृदयाशी !

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #141 ☆ चंद्र काचेचा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 141 ?

☆ चंद्र काचेचा 

लावली शब्दास तूही धार आता

म्यान झाली बघ मुकी तलवार आता

 

पापण्यांखाली लपवले शस्त्र आहे

फक्त नजरेनेच करते वार आता

 

उंबऱ्यातच ती उभी, का भास आहे ?

रात्रभर उघडे घराचे दार आता ?

 

एक नाही दोन नाही तीन नाही

कैक पक्षी तूच केले ठार आता

 

छान झाले संपण्या आधी बहर तू

टाकला देऊन मज होकार आता

 

चंद्र काचेचा इथे जन्मास येता

अंगणातिल संपला अंधार आता

 

सात फेरे घेतले मी सोबतीने

टाकला पदरी तिच्या संसार आता

 

भूल नाही कोणत्याही अत्तराची

घाम हा माझा तिला स्वीकार आता

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांग सये… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ सांग सये… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सांग सये तुज कुठे मांडावे

कवितेच्या चौकटीतुनी का

भरून आल्या आभाळातूनी

तुझ्याच ठायी दिसते मजला

क्षितीजामधली गूढ निळाई ….. १

 

तुझ्या मौनाची निरगाठ ही

वाटे व्हावी सैल थोड़ी

सांधलेस तू सगे सोयरे

वळ गाठीचे तुझ्याच पायी ….. २

 

तिलांजली दिलीस सर्वांसाठी

तुझ्यातल्या स्त्रावांना होमातूनी

तुझ्यातल्या तुला कसे ग

दिलेस कायम दूर लोटुनी …. ३

 

बघ जरा तू सत्वर आता

काय मागते तुझी ही काया

झुगारून दे पायातील बेड्या

बोलावती तुला वाटा या वेड्या …….. ४

 

खुलु देत नवे पंख मनीचे

स्वार होऊनी जा तुझ्याच देशा

होईल मनोहर स्वप्न अंतरीचे

पूर्णत्वाची प्रचीती द्याया ….. ५

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अजूनही…! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अजूनही…!  ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

अजून वेळ पहाते वाट

तोच मनात विश्वास घेत

वचन एक ते भेटण्याचे

जगण्याला या आधार देत.

 

सारे आयुष्य नसते खोटे

आठवणी का मग छळती ?

ऋतू का सांगती बदलाव

श्रावण-वसंता घेता कवेत.

 

याच जीवनी प्रेम पुरावे

वळणावर भेट-दुरावे

हृदय स्पंदनी तेच दुवे

अश्रू विरही शब्दांसवेत.

 

विरले गीत तरी परंतु

कोकीळ गातो अजून तिथे

व्याकुळ सांज ओशाळ जिथे

कवण जीवंत हाक देत.

 © श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #83 ☆ तप्त उन्हाच्या झळा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 83 ? 

☆ तप्त उन्हाच्या झळा… ☆

तप्त उन्हाच्या झळा

चैत्र महिना तापला

पळस फुलून गळाले

होळीचा सण आटोपला…०१

 

तप्त उन्हाच्या झळा

जीव अति घाबरतो

थंड पाणी प्यावे वाटे

उकाडा बहू जाणवतो…०२

 

तप्त उन्हाच्या झळा

शेतकरी घाम गाळतो

अंग भाजले उन्हाने

तरी राब राब राबतो…०३

 

तप्त उन्हाच्या झळा

फोड आला पायाला

अनवाणी फिरते माय

चारा टाकते बैलाला …०४

 

तप्त उन्हाच्या झळा

सोसाव्या लागतील

थोड्या दिसांनी मग

मृगधारा बरसतील…०५

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पर्यावरण दिन – चल मित्रा, एक झाड लावू… ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? कवितेचा उत्सव ?

☆ पर्यावरण दिन – चल मित्रा, एक झाड लावू… ☆ श्री आनंदहरी ☆

कायद्याने जरी असला गुन्हा

शोधल्या पळवाटा पुन्हा पुन्हा

तोडत राहिलो झाड न् झाड

करत राहिलो सारेच उजाड

कळले नाही कधीच कुणा

आड आला मी, माझेपणा

निसर्गाचाही एक कायदा असतो

तो पाळायचा जन्मतःच केलेला वायदा असतो

‘ सारे काही विसरून जाऊ

उद्याचे काय ते उद्याच पाहू ‘

म्हणता म्हणता काळ सरला

श्वासासाठी प्राणवायू न उरला

तरीही अजुनी जाग नाही

जागेपणाचा काहीच माग नाही

झोपेचं जर घेशील सोंग

( जगणं होईल नुसतंच ढोंग )

भोगावे लागतील अनंत भोग

नको कविता लिहीत राहू

‘कोरडा भवताल’ फिरून पाहू

उठ, आतातरी बाहेर जाऊ

चल मित्रा, एक झाड लावू

..….चल मित्रा, एक झाड लावू !

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृतार्थ मी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कृतार्थ मी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

जीवन माझे कृतार्थ झाले

ज्या दिवशी मी आई झाले।।धृ।।

 

अंगणातल्या वेलीवरती एक कळी दिसली

चाहूल लागता बाळाची रोमांचित काया झाली

आगमनाने बाळाच्या घर माझे सजले।।१।।

 

इवल्याशा त्या मुखावरती

भाव निरागस किती मज दिसती

टॅह्या टॅह्या स्वर रुदनाचे ते कर्णातच घुमले।।२।।

 

फुटला पान्हा मातृत्वाचा

दिव्यानंद तो स्तनःपानाचा

चुटुचुटु करिता दुग्धप्राशन अमृतघट भरले।।३।।

 

बाळकृष्ण तो रांगत आला

आई आई बोलू लागला

बोल चिमखडे गुंजत कानी धन्य मजसी वाटले।।४।।

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – जपा पर्यावरणाला जपा वसुंधरेला – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – जपा पर्यावरणाला जपा वसुंधरेला –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

सूर्याभोवती पृथ्वी करितसे भ्रमण

फाटले की हो ओझोनचे आवरण

मानवा जागा हो सांभाळ पर्यावरण

वृथा होईल तुझी प्राणवायूसाठी वणवण…

झाडे तोडूनी जंगले ओसाडली

पर्जन्यराजाने नाराजी व्यक्त केली

मातीने तर आपली कूस बदलली

वार्‍याने उलट्या दिशेस मान फिरविली…

प्रखर दुपारी झाडांवरी कशी पाखरे गातील ?

गंध घेऊनी झुळूझुळू वारे सांगा कसे वाहतील ?

तार्‍यांचे ते लुकलुकणें तरी कसे पाहतील ?

पिढीतील लेकरे आपुलीच पुढे काय अनुभवतील..?

धरणीमाय तर तुझ्यासाठी आतुर

नको रे करूस तिचे स्वरुप भेसूर

हाती तुझ्याच आहे,रोख प्रदूषण

कर वृक्ष-संवर्धन तेच अमूल्य भूषण…

मनुजा जागा हो..हो तू शहाणा

नको लावूस बट्टा पर्यावरणाला

राखूनी हिरवं रान निसर्गाचं जतन

सांभाळ रे आपुल्या वसुंधरेला..

चल पृथेस हिरवळीने सजवायाला

चल पृथेस हिरवळीने सजवायाला…!!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 105 – ही आस जीवनाची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 105 – ही आस जीवनाची ☆

ही आस जीवनाची सोडू नको अशी।

उर्मी नवी मनाची हरवू नको अशी।

 

येतील वादळे ही झेलीत जा तया।

हा तोल सावराया कचरू नको अशी।

 

दारूण हार येथे चुकली कधी कुणा?

हो सज्ज जिकं ण्याला परतू नको अशी।

 

हेफास पेरलेले गळ लावले जरी।

प्रत्येक पावलांवर दचकू नको अशी।

 

स्पर्धेत खेचणारे आप्तेष्ट ते जनी

घे वेध भावनांचा अडकू नको अशी।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आता थोडं जगून घे… ☆ सुश्री जयश्री कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ आता थोडं जगून घे… ☆ सुश्री जयश्री कुलकर्णी ☆ 

किती दिवस  उरलेत आता

 थोडं तरी जगून घे

येत नसेल कविता करता

 तीही थोडी शिकून घे

      आता थोडं जगून घे

 

 हातात हात घे तिचा

 म्हण थोडं फिरायला जाऊ

सुंदर आहे विश्व सारं

 त्यातलं सौंदर्य बघून घे

          थोडं तरी जगून घे

 

 सतत आपल्या कपाळाला आठ्या

 घालून सांग का बसतोस?

 अरे कधीतरी ,केव्हातरी ,

मनापासून हसून घे

          थोडा तरी जगून घे

 

प्रश्न कधी संपत नाहीत

 पण त्यात गुंतून बसू नकोस

 विश्वासाने कोणाच्या  खांद्यावर

 मान ठेवून रडून घे

          थोडं तरी जगून घे

 

आला क्षण थांबत नाही

 ठाऊक आहे सारं तुला

 पुढे चाललेल्या क्षणाबरोबर

 थोडा आनंद भोगून घे

      थोडं तरी जगून घे

© सुश्री जयश्री कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print