मराठी साहित्य – चित्रपटावर बोलू काही ☆ The Chorus ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
सुश्री तृप्ती कुलकर्णी
चित्रपटावर बोलू काही
☆ The Chorus ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
१९८२ सालची इराणची ‘द कोरस’ ही शॉर्ट फिल्म पाहण्यात आली.
तर मंडळी ही फिल्म खूप जुनी असल्यानं ती बऱ्यापैकी ब्लर दिसते. पण यातले प्रमुख पात्र ‘आजोबा’ आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र काही काही प्रसंगात स्पष्ट दिसतात. आणि त्यावरून फिल्मच्या मूळ चित्रीकरणाचा दर्जा लक्षात येतो.
ऐकू येत नाही म्हणून कानाला मशीन लावावं लागणारे आजोबा एका घोडागाडीच्या खाली येता येता वाचतात. नंतर मात्र ते न विसरता कानाला यंत्र लावतात आणि काही बाजारहाट करून घरी जातात. इथं एक गोष्ट मला फार आवडली की फिल्ममध्ये संवाद अत्यल्प आहेत. जवळ जवळ नाहीच असं म्हणलं तरी चालेल. पण आजोबांनी कानाला मशीन लावलं की आपल्याही आवाजाची तीव्रता वाढते आणि काढलं की कमी होते. हा साउंड इफेक्ट इथं फारच परिणामकारक वापरला आहे. कारण संवादाच्या अनेक जागा या ‘साउंडनं’ भरून काढल्या आहेत. किंबहुना आवाज हाच या फिल्मचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. या फिल्ममध्ये जाणवलं की व्यक्ती म्हणजे त्यांचे पोशाख, हुद्दा, त्यांचे चेहरे वगैरे गोष्टी इथं महत्त्वाच्या नाहीत पण ‘त्यांनी ऐकणं’ आणि त्यावर प्रतिक्रिया देणं जास्त महत्त्वाचं आहे.
तर...