मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सोनसळी खेळ ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सोनसळी खेळ  ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

सुवर्ण बिंबाचा दिसताच

मोह पडे सकल विश्वाला

सुवर्ण उधळी माथ्यावर

पाखरे करूनी गलबला॥

*
परीस आहे का हा अरुण

शंका येतसे भाबडी भोळी

परीस परीसाच्या जादूई 

स्पर्शे परिसर सोनसळी॥

*

मल्हार आळवत सकल

आसमंत पहा भारावले

मल्हार प्रसिदण्या का कोणी

बेल भंडार हे उधळले॥

*

पितांबर नेसे नारायण

अर्घ्य अवनीचे स्विकारण्या

पिता अंबर माता धरती

हस्तांदोलनी ये पक्षी गाण्या॥

*

खेळ कोणता खेळते सृष्टी

अंदाज नाही येत सांगता

खेळ मना कल्पना विलासी

सुरुवातीस या ना सांगता॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आजी… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ आजी… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

नको गालिचे गाद्या गिरद्या

हवी आजीच्या पायाची उशी,

न्हाऊ घालिता आजी प्रेमाने

झोप घ्यावी म्हणतो जराशी !

*
खरी व्याख्या स्वर्ग सुखाची

नसे ठाऊक मजला दुजी,

दे देवा अशीच सकलांना 

मज सारखी प्रेमळ आजी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 267 ☆ अनिकेत… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 267 ?

☆ अनिकेत ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(अल्पाक्षरी)

‘धरणीमाते पोटात घे’

म्हणणाऱ्या साऱ्याच लेकींसाठी

धरणी नाही दुभंगत!

आम्ही ना अरत्र ना परत्र,

आम्हा ना पाताळ,ना साकेत,

आमचं अवघं अस्तित्वच–

अनिकेत!!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता माझी ओळख… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “कविता माझी ओळख…” ☆  डॉ. शैलजा करोडे

सखी जीवाभावाची ती

अभिव्यक्ती कवितेची

शब्द मळा फुलविते

गोडी मज व्यासंगाची

*

बळ देई झुंजण्याचे

संकटाशी तो सामना

मिळे स्फूर्ती नी चैतन्य

पूर्ण करीते कामना

*

अश्रू पुसे दुःखितांचे

घाली मायेची फुंकर

बळ देई जगण्याचे

वाट उजळी धूसर

*

शृृंगारते नवी नवी

न्हाते ती नवरसात

बाज लावणी ठसका

वीरगाथा पोवाड्यात

*

दिला मान व सन्मान

विशेषण कवयित्री

माझी ओळख कविता

तिचा ध्यास दिन रात्री

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनुभूती… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ अनुभूती… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

 जीवनात विषय, प्रसंग खूप असतात

 निवडक मात्र मनाला स्पर्शतात

न स्पर्शलेले काही गौण नाही

त्यावर व्यक्त व्हायला मनाची तयारी होत नाही.

*

खूप काळ लोटूनसुदधा त्यातली एखादी

गोष्ट वा प्रसंग मनात रुंजीधरून राहतात.

तिच्या किंवा त्यांच्या नकळत मग त्यांच्या

सुंदर अशा काव्यपंक्ती घडतात.

*

बनलेल्या काव्यपंक्ती कवीच्या

अनुभवाची सत्यता असतात.

म्हणूनच वाचणार्‍याला त्या एक

निखळ आनंद देऊन जातात.

*

स्वानुभवाने डवरलेली कविता

कवीसाठी सत्यानुभव असतो,

तिला वाचणार्‍यासाठी ती मात्र

निर्मळ, शुदध असा उपहार ठरतो

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #279 ☆ कैलास व्हावे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 279 ?

☆ कैलास व्हावे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वाटते मुद्दाम मी नापास व्हावे

मालकी मजला नको मी दास व्हावे

*

पाउले गिरिजा पतीची पूज्य मजला

त्याचसाठी वाटते कैलास व्हावे

*

रेशमी केसात गजरे माळले तू

वाटते आहे सुगंधी वास व्हावे

*

चाळलेला देह सारा हा तुझा मी

वाटते आता तुझा मी श्वास व्हावे

*

दूर तू आहेस याची जाण आहे

तू जवळ आहेस असले भास व्हावे

*

आसनावर तू बसावे छान पैकी

आसनाची मी तुझ्या आरास व्हावे

*

पाहिलेला हिंस्र प्राणी मी भुकेला

वाटते मज आज त्याचा घास व्हावे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधाकृष्ण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ राधाकृष्ण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

कृष्णमेघ लोचनात

राधिका ती संभ्रमात

पापण्याशी त्या नभात

दाटूनीया अकस्मात.

*

वायू होऊन बासरी

राधिके हृदयांतरी

बावरले भावबंध

कृष्णाच्याच प्रेमांतरी.

*

सृष्टी झाली मोरपीस

अन् धारांची ती राधा

मोहन प्रकटे हळू

रिक्त मनी शाम सदा.

*

तरि घटावर मुख

ठेऊन चिंतनी व्यस्त

भुमीचे हे वृंदावन

राधा-कृष्ण प्रीत मस्त

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागत… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वागत☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

आम्ही आहोत सगळे हिंदू

जोडू बघतो विश्वातले बंधू

द्वेष अाम्ही शिकलो नाही

वाटून घेतो असलेले काही

*

मुळात आम्ही उत्सवप्रिय

सगळ्याच सणांमधे सक्रीय

आम्ही आहोत परंपराप्रिय

मनानी नेहेमीच राहू भारतीय

*

लावून गुढ्या तोरणे दारात

गुढी पाडव्याच्या नववर्षात

आनंदाचा सोहळा उत्सवात

आप्तजनांच्या भेटीची बरसात

*

करूया स्वागत सौर वर्षाचेही

अवघे विश्व एक होऊ पाही

त्याग करूनी आंग्ल प्रथेचा

उत्सव मात्र हिंदू परंपरांचा

*

दारी रांगोळी गोड खाऊनी

उजळू दीप घरा घरामधूनी

सोमरसाला फाटा देऊनी

साजरा करूया आनंदानी

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पुण्यात्मा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पुण्यात्मा… ? श्री आशिष  बिवलकर ☆

अखेर संपली ती झुंज,

तुटली श्वासांची माळ |

घाला घालून गेला,

निर्दयी झाला काळ |

*

निष्प्राण देह उरला मागे,

तो ही झाला चितेच्या स्वाधीन |

हातात काहीच नसते आपल्या,

मनुष्य जन्म असतोच पराधीन |

*

आठवणींच्या शिवाय,

काही ना उरले आता मागे |

मागे वळून पाहता,

स्मृती पटलावर गुंतले धागे |

*
दुःखाचे कोसळले आभाळ,

आसवांचा बांध फुटला |

हळ हळ करत व्यक्त,

जो तो आज आतून तुटला |

*
देवाची सेवा करता करता,

देवाच्या घरी तो गेला |

मोक्ष प्राप्ती प्रारब्ध जीवाचे,

जन्म मृत्यूचा फेरा पूर्ण केला |

*

सुन्न झाले आज मन,

सुन्न झाली ही मती |

ईश्वरा प्रार्थना एकच,

दे पुण्यात्म्यास सद्गती |


(श्री महागणपती देवस्थान बदलापूरचे पुजारी आणि आमचे सहकारी प्रशांत पांडे यांचे काल दुःखद निधन झाले.. अतिशय सुस्वभावाने त्यांनी माणस जोडली.. All in one कोणतही काम असलं तरी स्वतःहून मदतीला पुढे येणं हा त्याचा स्वभाव…कधीही भरून निघणारी हानी झाली..त्यांना माझ्याकडून ही शब्दरूपी श्रद्धांजली..ॐ शांती…शांती…शांती 🙏) 

© श्री आशिष  बिवलकर

दि. 04 मार्च 2025

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ मर्मबंध… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मर्मबंध… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मी जे जगलो त्याचा हा तर मर्मबंध आहे

या गझलेचा अर्थ पसारा लांबरुंद आहे

*

साध्य साधना करून येथे पूर्ण कर्म केले

निवांत झाल्या देहकुडीचा श्वास मंद आहे

*

काळजातल्या कथाव्यथांचे स्तोम खूप झाले

त्याच सुखाच्या आठवणींचा मंद गंध आहे

*

संसाराच्या धकाधकीची रीत छान साधी

जगणे तेथे कालक्रमाने जेरबंद आहे

*

स्वैरपणाने भटकायाची शांत वेळ नाही

वातावरणातील जराशी हवा कुंद आहे

*

जमेल तितकी अध्यात्माची साथ घेत जावी

तप करण्याला सोबत तुमच्या संतवृंद आहे

*

स्वतंत्रतेचा आज जमाना फार ठारवेडा

गात आता जगणे म्हणजे मुक्त छंद आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares