मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विचार आपला आपला… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

विचार आपला आपला☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

देतेस रोज पाणी उपकार जर म्हणावे

देतो फळे फुले ते उपकार का नसावे

 *

देतोस काय मजला हाती धुपाटणे हे

देऊनही मते मी, लाचार काय व्हावे

 *

ते पारधी ससा मी, हातातलाच त्यांच्या

मी नेहमी तयांच्या, खाद्यास का मरावे

 *

चोरी करून सुटका होईल का सदाही

तू एकदाच माझ्या पंजात सापडावे

 *

दिसतोस फक्त जेव्हा, येतात नेमणूका

खुर्ची तुला मिळावी, मी तर उगा जळावे

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्गनिर्मित… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ निसर्गनिर्मित… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

निसर्ग निर्मित सुंदर पेले

उमललेत तुमच्यासाठी

सदगुणांचे पेय भरूनी

हे चषक लावा ओठी

*

या पेयाची धुंदी देईल

नवचैत॔न्याची अनुभूती

करीता प्राशन पेया होई

सदविचारी ती व्यक्ती

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मन सैतानाचा हात“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ मन सैतानाचा हात ☆ श्री सुहास सोहोनी

मन सैतानाचा हात —

मन देवाचे पाऊल —

 🌿

मन उफराटे झाले वाघुळ

उलटे लोंबतसे

म्हणे परि माजून, जगत हे

उलटे झाले कसे…

 *

छतास उलटे लटकुन, म्हणते

पशु, पक्षि, माणसे

शीर्षासन कां करुन चालती

धावति, उडती तसे…

 *

काय म्हणावे या मूर्खाला

झाली का बाधा

कोणी धरिले या झाडाला

भूत, प्रेत, समंधा…

 *

देव राक्षसा जखडुन टाकिन

नित्य करी दर्पोक्ती

बलाढ्य आणिक बुद्धिमान मी

अतुल्य माझी शक्ती

 *

शेफारुनिया गर्व चढे कां

मनास उन्मत्त

कोणी मजसम नाही दुसरा

म्हणा कुणीहि प्रमत्त…

उचलुनिया खांद्यावर घ्या रे

मीच लाडका खरा

टाळ मृदुंगा बडवुनि माझा

जयजयकार करा

 *

तोच दुरूनी रेड्यावरुनी

आला यमधर्म

देह न्यावया यमलोकांसी

जैसे ज्याचे कर्म…

 *

यमास बघता थरथरले मन

सैरभैर झाले

देहासंगे मृत्यु मनाचा

ज्ञान जुने स्मरले

 *

साक्षात मृत्यू समोर येता

मनासि फुटला घाम

पोकळ दावे वितळून गेले

मनी उमटला राम…

 *

बलशाली किति झालो तरिही

जन्म नि मृत्यू कुठले

नाहि कधी कक्षेत माझिया

कळुन मला चुकले…

 *

फुटला फटकन् फुगा भ्रमाचा

झाला चोळामोळा

नियती पुढती तनमन दुर्बल

जसा मातिचा गोळा…

🌺

मन राखावे सदा जसे की

पवित्र निर्मळ गंगा

मनामधूनी नित्यचि गावे

विठुच्या गोड अभंगा…

🌺

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 240 ☆ आद्य पत्रकार..! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 240 – विजय साहित्य ?

☆ आद्य पत्रकार..! ☆

(काव्यप्रकार अष्टाक्षरी.)

बाळशास्त्री जांभेकर,

आद्य पत्रकार थोर .

वृत्तपत्र दर्पणाने ,

जगी धरलासे जोर…! १

*

सहा जानेवारी रोजी ,

वृत्तपत्र प्रकाशीत .

शोभे पत्रकार दिन ,

ख्याती राहे अबाधीत…!२

*

शास्त्र आणि गणितात ,

प्राप्त केले उच्च ज्ञान .

भाषा अकरा शिकोनी ,

केले बहू ज्ञानदान….!३

*

छंद शास्त्र , नीतीशास्त्र ,

व्याकरण, इतिहास .

पाठ्य पुस्तके लिहोनी ,

ज्ञानमयी दिला ध्यास…!४

*

पुरोगामी विचारांनी ,

केले देश संघटन .

विज्ञानाचे अलंकार ,

अंधश्रद्धा उच्चाटन…!५

*

स्थापियले ग्रंथालय ,

ज्ञानेश्वरी मुद्रांकीत  .

शोध निबंध जनक ,

नितीकथा शब्दांकित ..!६

*

दिले ज्ञान वैज्ञानिक ,

केले कार्य सामाजिक .

पुनर्विवाहाचे ध्येय,

ज्ञानदान अलौकिक..! ७

*

भाषा आणि विज्ञानाचा ,

केला प्रचार प्रसार .

दिली समाजाला दिशा ,

तत्वनिष्ठ अंगीकार….!८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “खिचड़ी…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “खिचडी…” ☆ श्री आशिष मुळे ☆

आयुष्याची खिचडी काळाचा अग्नी

शरीराचे पातेले मनाचे पाणी

तांदूळ प्रयत्नांचे हळद संस्कारांची

मीठ भावनांचे अन डाळ नशिबाची …

*

डाळ शिजायला लागतो सर्वात जास्त वेळ

म्हणून खिचडी करायची कोण सोडत नाही

तांदूळ शिजतात लगेच म्हणून

मीठा शिवाय नुसते कुणी खात नाही…

*

कधी झालेच मीठ जास्त

तर होते मनाचे पाणी पाणी

अजून पाणी ओतल्या शिवाय

खिचडीचे खरे नाही …

*

चवीला थोडीफार उन्निसबीस

कशीतरी जाते खपून

पण हळदी शिवायच्या खिचडीला

कोणी खात नाही चापून ….

*

थोड्या थोड्या वेळाने कायम

ढवळावी लागते खिचडी

राहिली स्थिर तर करपेल कारण

कालाग्नी कुणाचा गुलाम नाही …

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हळवा मोहर” – कवयित्री : शांताबाई शेळके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “हळवा मोहर” – कवयित्री : शांताबाई शेळके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

(वरील सुंदर पेंटिंग पाहून आठवल्या शांताबाईंच्या काव्यपंक्ती…! — संग्राहक : चंद्रशेखर देशपांडे ) 

या वळणावर वळताना मज

आठवते, की हेच तुझे घर

कोनावरले झाड तेच ते

अजुन ढाळिते हळवा मोहर

*

या वळणावर वळतांना मी 

कितीदा झाले कंपित, कातर

वीज धावली तनूतुनी जरि –

क्षण अडखळले पाऊल आतुर !

*

ओठांवरचे अधीर हासू

धीट लाजही डोळ्यांमधली

पुन्हा पुन्हा मनी घुटमळणाऱ्या

कवितेतील भावोत्कट ओळी –

*

अता न उरले तसले काही

संथ जाहले डचमळुनी जळ

गहन एकदा जे गमले मज

आज तयाचा सहज दिसे तळ

*

वळणावर या वळता तरिही

भरते काही उरी अनावर –

सुन्या मनाच्या भूमीवरती

ढळत राहतो हळवा मोहर !

कवयित्री – शांताबाई शेळके

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनाचे मंदिर… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ मनाचे मंदिर सुश्री नीलांबरी शिर्के 

मन मंदिरा देव्हारी

सदविचार गाभारा

सद वर्तन हा देव

मांगल्य ये परिसरा

*

 मन मंदिर स्वच्छता

 नीत्य नियमीत व्हावी

 माया ममतेची फुले

 अंतरातच फुलावी

*

 नको द्वेष न् मत्सर

 आप पराचे अंतर

 सत् कर्म करूनिया

 जपू मनाचे मंदिर

 

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य – “छोट्या छोट्या चुका…!” ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य – छोट्या छोट्या चुका…! ☆ श्री सुजित कदम ☆

त्याच त्याच गोष्टीआपण

किती वेळा ऐकतो

तरीसुद्धा आपण पुन्हा

त्याच चुका करतो…!

*

चुकांमधून काहीतरी

शिकता यायला हवं

कुठे चुकलो आपण

हे समजून घ्यायला हवं

*

पुन्हा पुन्हा त्याच चुका

म्हणजे शुद्ध गाढवपणा

चुकून सुद्धा नाही म्हणणं

म्हणजे केवळ मूर्खपणा

*

चुकलं तर चुकूदे

हरकत नाही काही..

आपण काही कुणी

साक्षात परमेश्वर नाही

*

चुकांमधून थोडा तरी

बोध घ्यायला हवा

पुन्हा चुक होणार नाही

हा संकल्प करायला हवा…

*

लहानपणी ऐकलेल्या

गोष्टी जरा आठवूया.

छोट्या छोट्या चुका आता

आपणच आपल्या टाळूया…!

© श्री सुजित कदम

मो .. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गय… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ गय… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

सुखाला नुसते ‘शब्द’देखील सहज गवसत नाहीत

पण दुःख मात्र सोबतच घेऊन येते आपली ‘लय’

*

त्या वेशीवरती जर नसतीच झाली आपुली भेट

तर डोळ्यांमध्ये का दाटून आली असती ‘सय’

*

रोज सुचतच नाही लिहायला मजला काहीबाही

पण लिहिते करते दुःखानेही सोडून जायाचे ‘भय’

*

तसे ऋतूंचे बहरणे होते नेहमी‌प्रमाणेच सुरळीत

पण बेसावध क्षणी मोहरण्याचे होते आपुले ‘वय’

*

मी थांबले होते नंतर त्या मोहक वळणापाशी

पण होकाराच्या विलंबाने केलीच नाही माझी ‘गय’

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लाडाची गं लेक माझी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ लाडाची गं लेक माझी… ☆ सुश्री त्रिशला शहा

लाडाची गं लेक माझी

आली माझ्या गं भेटीला

कशी दिसते साजिरी

द्रुष्ट लागू नये तिला

*

आला संक्रांतीचा सण

काय सांगू तिचा थाट

काळी नेसली चंद्रकळा

गोड हसू चेहऱ्यावर

*

सासूसासऱ्यांची आहे 

लाडाची ती सून

कौतुक करती तिचे सारे

पुरविती तिची हौस

*

कशी नटली सजली

हलव्याच्या दागिन्यांनी

गळा शोभतो हा हार

आणि कानातले डूल

*

अशी सदैव असावी

हसत रहावी तु बाळा

आस हिचं माझ्या मनीची

डोळा भरुन पाहते तुला

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares