मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्पर्श… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ स्पर्श… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

तुझा स्पर्श बोले, तू मला मोहरावे

तुझ्या धुंद प्रेमाने उमलुन यावे

नकळत तुझ्या स्पर्शाची किमया घडावी

तुझी मी, अन माझा तू ही कवाडे खुलावी

अलगद मी तुझ्या श्वासात मिसळावे

तू असाच माझ्या अंतरी स्थिरावे

रोमारोमातून मग तुझीया मी पाझरावे

अन् मला सावराया तू तल्लीन व्हावे .

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #134 ☆ सुज्ञ कातळ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 134 ?

☆ सुज्ञ कातळ ☆

वंचितांसाठीच तळमळ पाहिजे

अंतरीचा बुद्ध प्रेमळ पाहिजे

ज्या गळाला लागते ही मासळी

जाहला तो रेशमी गळ पाहिजे

माणसांच्या गोठल्या संवेदना

वाटली शस्त्रास हळहळ पाहिजे

लष्कराच्या छावण्या येथे नको

साधुसंतांचीच वरदळ पाहिजे

चिंतनी एकाग्रता इतकी हवी

साधनेने गाठला तळ पाहिजे

कुंपनाने फस्त केले शेत तर

साक्ष देण्या एक बाभळ पाहिजे

नम्र हातातून घडतो देवही

त्याचसाठी सुज्ञ कातळ पाहिजे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवऋतू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ नवऋतू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

नवपल्लवी सृष्टीवल्लरी

ऋतूराज्यश्री वसंतराजा

हृदयसुखे  धरागोचरी

ऊष्मचक्रधारी चैत्रभुजा.

क्वचित वायुस्पर्श अल्हाद

शीतलहर अंतरी साजा

ऊषःऊगम-अस्ता भोवती

पुष्पपळस गुंफे विश्वप्रजा.

नादब्रम्ह ऊमा-शिव हिमांती

पर्वत जळस्थळे जपपूजा

महिमा ऐसा ग्रीष्मसखा थोर

सर्वत्र नवविहार मनुजा.

 © श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #78 ☆ गंध मातीचा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 78 ? 

☆ गंध मातीचा… ☆

गंध मातीचा, हृदयस्पर्शी

गंध मातीचा, मातृस्पर्शी

गंध मातीचा, सप्तरंगी

गंध मातीचा, चिरा चौरंगी

गंध मातीचा, मनास भुलवी

गंध मातीचा, तेज वाढवी

गंध मातीचा, मातृस्पर्श जैसा

गंध मातीचा, मोगरा फुलला तैसा…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिचे घड्याळ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ तिचे घड्याळ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

घड्याळाच्या काट्या बरोबर

धावते तिचे  तन-मन

सगळ्यांचा ताळमेळ

घालण्याचेच मनी चिंतन ||

काळ वेळाचे गणित हे

सोडवण्याची खटपट

घरदार करिअरची

कामे निभावी पटपट ||

प्रत्येक वेळ महत्त्वाचीच

चुकवून कशी चालेल

वेळ गाठण्यासाठी ती

मग धावाधाव करेल ||

कधीतरी अचानकच

ऑफ पिरियड मिळतो

सारे व्याप विसरून

मनाशी धागा जुळतो ||

घड्याळाची आणि तिची

कायमचीच घट्ट मैत्री

दोघेही देत रहातात

अखंड चालण्याची खात्री ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सगळंच काही… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ सगळंच काही… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

सगळंच काही…

 सगळंच काही नसतं

   घालायचं कंसात !

 कधी लागतो अर्धविराम

तर काहींना स्वल्पविराम

 पूर्णविरामानेही काहींची

 पूर्तता होत नाही…

मग, विचार करायला

लागते प्रश्नचिन्ह !

 चिंतनाच्या गुहेतून

अजाणता येतो उदगार !

पण ते असते स्वगत

 बसत नाही कंसात

त्याचे स्थान फक्त मनात !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जय हनुमान ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ जय हनुमान… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

जय हनुमान प्रेमळ दाता

सकल जनांचा तूच त्राता

राम लखन जानकी माता

भक्ती गुण तूच सच गाता

मन प्रेमळ भक्त तूच साचा

सूर्य तेज तूच झेप रे घेता

क्षण तन ह्दयी बस जाता

तूच तारक प्रसन्न हो आता

मम अंतरी दुःख भर जाता

लोचनी आसू झर कर आता

तुज चरण अश्रू जल रे धोता

कर पावन मनतन जीव आता

तूच संजीवन जीवन मज देता

ह्दयी तुझ्या राम जानकी माता

राम नाम फत्तर तर जल तरता

कनक लंका तूच नाश कर देता

शक्ती बुध्दी तूच असे हनुमंता

पाप ताप दर्द नाश कर आता

तुज अर्पितो अश्रूजल अक्षता

रुई पर्ण गळा नमीतो मी माथा

पंचमुखी हनुमान दर्शन दे आता

माझा खरा तूच आहेस रे त्राता

फुल भक्ती प्रेम संजीवन रे होता

दुःखपाश श्रृंखला तोड रे स्वतः

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – गुंज – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – गुंज –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

थांबली जराशी तरुपाशी

घेण्यास क्षणभर विश्रांति

मनांत खळबळ विचारांची

मागे पाश हे कोणते ओढती ?

डोईवर नीळे अंबर खुले

सूचित स्पंदन थबकले

पर्ण पालवीच्या हिरवाईतून

नकळे कोणते गुपित दडले ?

घनसावळे मेघ कधीतरी

आभाळात दाटूनी आले

मूक संवाद..अलवार स्पर्श

हितगुजात तन रोमांचले..

भिजविले होते त्या अश्रूंनी

रुक्ष सुक्या पाचोळ्यासी

भारावली भावना ऋतूगानी

उन्मिळले स्वप्नपाकळ्यांसी..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ या अशा, निशब्द वेळी ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ या अशा, निशब्द वेळी ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

या अशा निशब्द वेळी, ये प्रिये जवळी जरा

माळू दे केसांत तुझिया, हा सुगंधी मोगरा ||धृ ||

त्या निळ्या डोहात दोघे, हरवुनी रंगून जाऊ,

प्रीतीची गाणी अनोख्या, लाजऱ्या छंदात गाऊ,

संभ्रमी पडता जुळावा, भावभोळा अंतरा ||१ ||

ओठ हे प्राजक्त देठी, सांग काही बोलले?

का रतीच्या पैंजणाचे घुंगरू झंकारले?

दिलरूबा छेडीत बसली, काय कोणी अप्सरा ||२||

चांदणे गाईल तेव्हा, गाऊं दे बागेसरी,

ऐकू दे तुझीया स्वरांची, जीवघेणी बांसरी,

स्पर्शता जुळतील तारा, धुंद वारा बावरा ||३||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 98 – दूर कोठेतरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 98 – दूर कोठेतरी ☆

दूर कोठेतरी, साद घाली कुणी ।

नाद का जाणवे , या आठवातुनी ।।धृ।।

सांग का शोधिशी, प्रेम शब्दाविना ।

भाव तू जाणले , आज अर्थाविना।

प्रितीची आस ही, दाटे डोळ्यातुनी ।।१।

भाव वेडी मने, गुंतली ही अशी।

प्रेमवेडी तने,दोन होती कशी।

मार्ग हा कंटकी, चाले काट्यातुनी ।।२।।

बंध हे रेशमी, वीण नात्यातली ।

ओढ ही मन्मनी, चाल शब्दातली ।

आर्त ही भावना, बोले काव्यातुनी ।।3।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares