मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – संत तुकाराम – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – संत तुकाराम –  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

तुकारामाचे अभंग

त्यात वेगळाले रंग

आठशे बत्तीस विषय

अभंगांचे अंतरंग—-

माझिया मुखाने

नाही मी बोलत

मजलागी बोलवितो

सखा भगवंत—-

सामान्यांची भाषा

तुकाराम बोले

म्हणूनी.सकलांना

ते वाटती आपुले—-

जगण्याचे सार

सांगे तुकाराम

करी निरसन

मनातला भ्रम—–

तत्वज्ञानी भाषा

तुका न वापरी

अभंग पोहोचले

त्याचे घरीदारी—–

अंधश्रद्धेवर तुका

सदा करीत प्रहार

नवसाने नाही होत

कधी कुणा पोर—–

सर्वसामान्यांचा तुका

सर्वा वाटतो आपला

संतांचिया मेळ्यामधे

तुका कळस जाहला—-

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे पांडुरंगा ☆ सौ. विद्या पराडकर

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हे पांडुरंगा ☆ सौ. विद्या पराडकर ☆

मन माझे पांडुरंग

गात होते अंग अंग

 

भक्ती भाव मनी नाचला

हर्ष भाव मनी खेळला

पंढरीची चन्द्र भागा वाहते अथांग

 

ज्ञानबा, तुकाराम गजर जाहला

टाळी वाजविता बुक्का उडाला

वारकरी नाचण्यात झाले दंग

 

कासे पीतांबर कटीवरी हात

गळ्यामध्ये शोभे वैजयंती माळ

भक्तांसाठी तू सगुण रुपात दंग

 

तव चरणी  आस देवा

सतत करु दे तव धावा

माऊली मी तुझे बाळ राहो अभंग

 

© सौ. विद्या पराडकर

पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #146 ☆ पिंजऱ्याचे दार… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 145 ?

☆ पिंजऱ्याचे दार…

मी कशाला बांध घालू आसवांना ?

रोखुनी का त्या धरावे यातनांना ?

 

बातम्यांचा पूर तसल्या रोज येतो

बांध घालू भोगवादी वासनांना

 

वृक्ष आहे माय-बापाहून मोठे

काळजाला घर पडावे छाटताना

 

जीर्ण नाही का तरीही फाटते हे ?

त्रास होतो हृदय कायम टाचताना

 

झोपण्याची वेळ झाली ही तरीही

पाहिला मी चंद्र रात्री जागताना

 

माणसांसाठीच आहे जन्म अपुला

हे अजूनी का कळेना माणसांना ?

 

पिंजऱ्याचे दार आता मी उघडले

हर्ष होतो पाखरांना सोडतांना

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई –  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

आई बाबा जेव्हा गेले

चार भावंडेच उरले

चार वर्षाची मुक्ताई

तीन मोठे भाऊ राहिले—–

सहा वर्षाचा सोपाना

आठ नऊचा होता ज्ञाना

निवृत्तीदादा मोठा होता

केवळ अकरा बाराचा—–

कोरान्नाची भिक्षा मागती

नेहमी निवृत्ती अन ज्ञाना

छोट्या मुक्ताईला सांभाळी

मोठा होऊनी सोपाना—–

हीच छोटी मुक्ताबाई

झाली सर्वांची ताई

कोंडुन बसल्या ज्ञानासाठी

विनवित ताटीचे अभंग गाई—–

गोऱ्या कुंभाराचे मडके

कच्चे तिनेच दाखवले

वडील आणि गुरूस्थानी

निवृत्ती नाथा पूजियले—–

मुक्ताबाई श्रेष्ठ योगिनी

निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर

बळ देऊनी वारकरी पंथा

अठराव्यात होई समाधिस्थ—-

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन वारी… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन वारी… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

मूलमंत्र जीवनाचा रुजवी वारी

शिस्तपालन  प्रवाहित करते वारी

 

समता हाच आत्मा सांगे  हो वारी

वारकऱ्यात माऊली दाखवी वारी

 

निसर्गास समर्पित दिसली  वारी

मग अतिथीतच विठ्ठल पाहे वारी

 

कर्मकांडा विन ईश पूजा सांगे वारी

निष्कांचनास  समृद्धी दावी वारी

 

निष्काम कर्मयोगी घडवि वारी

माणसास माणूस बनवी वारी

 

मार्ग गीतेचा जगवी जीवनी वारी

जीवन  जगावे सहज बनून वारी

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 88 ☆ शापित गंधर्व… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 88 ? 

☆ शापित गंधर्व.… ☆

काटा पायात रुततो

तरी तसाच राहतो

कुटुंब पोसण्या बाप

अजन्म हो लढतो…०१

 

काट्याचे कुरूप जाहले

बापाचा पाय तो सडला

रुतणाऱ्या काट्याने

पिच्छा नाहीच सोडला…०२

 

एक वेळ अशी येते

पायच तोडल्या जातो

उभ्या आयुष्याचा तेव्हा

स्तंभ सहज ढासळतो…०३

 

तरी हा पोशिंदा बाप

लढत पडत राहतो

त्याच्या रक्तात कधी

दुजा भावच नसतो…०४

 

पूर्ण आयुष्य बापाने

डोई भार वाहिला

कुटुंबास पोसण्या

दिस-वार ना पहिला…०५

 

ना रडला कधी बाप

ना कधी व्यथा मांडल्या

मोकळे आयुष्य जगतांना

कळा भुकेच्या सोसल्या…०६

 

असा बाप तुमचा आमचा

अहोरात्र झुंजला गांजला

का कुणास ठाऊक मात्र

बाप शापित गंधर्व का ठरला…०६

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – चंद्रभागा – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – ना निगराणी,नाही पाणी –  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

अष्टमीचा चंद्र नभी

शोभा आणीतसे नभा

तशी तु ग चंद्रभागा

पंढरीची जणू गंगा—-

तुझ्या पावन स्नानाने

वारकरी   प्रफुल्लित

विठ्ठल विठ्ठल म्हणत

जाती  विठू मंदिरात—-

 माऊलीच्या पायी डोई

 होई सार्थक  जन्माचे

 वाळवंटी  फडकती

 झेंडे वारकरी स्वमानाचे—–

 चंद्रभागा होई तृप्त

 वारकऱ्यांच्या भेटीने

 तिचे अंगण भरले

 विठू भक्तांच्या दाटीने—–

  

दाटीतून घुमतसे 

  साऱ्या संतांचाही घोष

  विठु ,ज्ञाना, तुका नामा

  तिला दिसे आसपास

  त्याच्या नाम दर्शनाने

  होय तीज समाधान

  मैलोनमैल वहायाचे

  क्षणी विसरते श्रम—–

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वंदु विठुचे चरण… ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सुश्री गायत्री हेर्लेकर

? कवितेचा उत्सव ? 

☆ वंदु विठुचे चरण ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

         मना लागलीसे आस,

         पांडुरंगा तुझा ध्यास ||१||

 

        कानी घुमतसे सुर,

        “विठु माऊली” गजर ||२||

 

         डोळा दिसतसे वारी,

         ज्ञाना-तुक्याची हो स्वारी ||

 

         झुले पताका भगवी,

         डोई तुळस हिरवी ||४||

 

         गावोगावच्या अंगणी,

         वारु नाचतो रिंगणी ||५||

 

         टाळ-चिपळ्या घ्या करी,

         आली पंढरी पंढरी ||६||

 

         भुलोकीच्या या वैकुंठी,

         संतजन गळाभेटी ||७||

 

        पूर्वसंचित भक्तीचे

        दर्शनासी या जन्मीचे ||८||

 

        सदा हरीचे स्मरण ,

        वंदु विठुचे चरण ||९||

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – निसर्ग… –   ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – निसर्ग… –  ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

डोळे उघडून बघा जरा

निसर्ग काय सांगतो आहे

लहान मोठ्या गोष्टीतून

खूप काही शिकवतो आहे.

हात पाय खुशाल तोडा

सोलून  काढा कणाही

मूळ,माती यांचे नाते

विसरू नका जराही.

मारणा-याने मारत जावे

झेलणा-याने झेलत जावे

तोडणा-याने तोडत जावे

फुलणा-याने फुलत जावे.

चित्र साभार – सुहास रघुनाथ पंडित

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुंभाराचे घडे… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कुंभाराचे घडे… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

एक नियंता कसा घडवितो

अनेकरंगी सृष्टीला

कुंभारच तो घडे बनवितो

आकार देतसे मनुजाला…..

 

प्रत्येकाचे रूप वेगळे

दैव तयांचे किती आगळे

काट्यातुनी या गुलाब फुलले

पंकामधुनी कमळ उगवले…..

 

कोणी मानिती सुखी स्वतःला

दुःखात बुडाले कितीतरी

सुखदुःखाचे गणित कसे हे

सोडवितो का कुणीतरी…..

 

आज पौर्णिमा सुखद नि शीतल

अवस उद्याची काळोखीणू

कालचक्र हे अविरत फिरते

हेच सत्य सदा ओळखी…..

 

मकरंद सेवतो कमलभृंग तो

दर्दूराला चिखल प्रिय भारी

कोणी टिपतो क्षण सौख्याचे

कोणी गर्तेत डुबक्या मारी…..

 

रंग भरावे ज्यांनी त्यांनी

असीम आहे आकाश

मेघ दाटती काळेकुट्ट

कुणा दिसे उजळता प्रकाश…..

 

पक्षी होऊन स्वैर उडावे

फुलपाखरासम विहरावे

जीवन आहे नितांत सुंदर

मधुकण त्यातील वेचीत जावे…..

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

२७/०६/२०२२

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares