सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
Marathi Kavita
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ “आयुष्याच्या ताम्रपटावर…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
☆
धूळ झटकता पटलावरची
लख्खच सारे दिसू लागले
जरी दडवले होते काही
सारेच कसे पुन्हा उजळले॥१॥
*
वाटेवरचे क्षण काटेरी
तसेच काही आनंदाचे
पुन्हा एकदा त्यात हरवले
सुटले धागे सुखदुःखाचे॥२॥
*
मुठीत वाळू हळू सांडली
प्रीत अव्यक्त मनात दडली
काळजातली हुरहुर सारी
आवेगाने कशी दाटली ॥३॥
*
निष्ठा साऱ्या मी बाळगल्या
देणी घेणी चुकती केली
बाकी सारे शून्य जाहले
आता कसली भीती नुरली॥४॥
*
आयुष्याच्या ताम्रपटावर
एक ओळ ती होती धूसर
शब्द प्रितीचे कोवळ्यातले
तिथे राहिले कसे आजवर
☆
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ एकदातरी भेटशील ना?… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
एकदा भेटायचं रे तुला
मनातील भरभरून बोलायचं
जीवनातील सुख दुःखाच्या गोष्टी
सांगायच्या…
डोळ्यातील आसवं तुझ्या खांद्यावर
रिचवायचे
भेटशील ना एकदा, देशील ना खांदा
तुझ्या प्रेमात न्हाऊन निघायचं
सोबत सगळेच आहेत पण मनाला
काय वाटत माहित नाही
तुझ्या जवळच मन मोकळं करायचं
तुझ्याकडे का मन ओढ घेत कळतं नाही
तुझ्यात काहीतरी स्पेशल दिसतं
या वेड्या मनाला काही आवरणं
होत नाही
तुझी आठवण मनातून जात नाही
तुला भेटल्याशिवाय राहवत नाही
सांग ना, एकदातरी भेटशील ना
मन मोकळं करायला थोडी जागा देशील ना?
☆
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री अपर्णा परांजपे
कवितेचा उत्सव
☆ गंगासागर…. 💧🌊💧 ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
☆
कडे कपारी कापत कापत
का पुढे धावते?
नितळ निर्मळ रुप असोनी
का चिखल झेलते?
थांबून स्तब्ध मी तळे न रहाता
पुढे पुढे चालते
वाटेवरल्या तहानलेल्या जीवास तृप्त करते
जीवन दान हे देत असता
कर्तव्य पूर्ती करणे
खाच खळगे काही न त्याचे परोपकारी जीवन करणे
माझे माझे मी मी करूनी
तळे बनावे का?
देतच रहावे असे करोनी
कल्याण करावे का?
प्रश्न नाही उत्तर नाही
फक्त पुढे जायचे
ही धाव ही आतून असते
न्यून न घडायचे..
मार्ग खडतर तरीही सुखमय
गती अशी पकडता
सुखमय वाटे प्रवास केवळ
निर्विकार असता…
ओढ कशाची काही नकळे केवळ पुढे धावता
प्रशांत जलाशय समोर दिसता भय वाटे चित्ता
काय करावे कसे करावे मार्ग मागचा नाही
पुढे जलाशय उभा ठाकला
बुध्दी चालत नाही.
आत शिरावे दुसरे काही अस्तित्वच नाही
मी माझे जे काही आहे
शिल्लक काही नाही..
पुढे चालणे हे जे जीवन
चूक का असावे वाटे
रत्नाकर मज खुणावतो ही
सार्थकताही वाटे
विलीन होणे दुसरा मार्ग न माझ्यापुढती आता
हतबलता ही नाही मात्र
कृतकृत्य वाटे आता…
खडतर वाटा पार कराव्या का वाटत होत्या
न दिसणारा बलाढ्य सागर
आतुर वाटे आता..
देता देता प्रवास होता
माझे मज दिसले
धाव कशाची होती माझी
आज मला कळले..
मी मी करून देता देता
अभिमान उरी ठसला
समोर सागर उभा ठाकला
अभिमान गळोनी पडला..
भय दाटले मनात किंचित कसे शिरावे कवेत
माझे मी पण क्षणात संपून
जाईल त्याच्या आत..
केलेल्या उपकाराची फेड करण्या ही सुसंधी खरी
निर्विकार होऊनी घेतली
क्षणात समुद्री उडी..
मी न सरिता आता मर्यादित जलप्रवाह
अमर्याद विस्तीर्ण जलाशय
प्रशांत नीरव स्तब्ध..
गोड असोनी विलीन होऊन
खारट झाले आता
सामान्यातून असामान्याचा हा प्रवास थांबला आता…
फक्त किनारी सुख पेरणे गौण वाटले आता
पूर्ण जगाची तृष्णा रिझवू
मिळून “सागर सरिता”…🌧️
☆
🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 241 – विजय साहित्य
☆ अभंग – गाथा तुकोबांची…! ☆
☆
गाथा तुकोबांची,
अमृताची धारा.
प्रबोधन वारा,
प्रासादिक..! १
*
तुकाराम गाथा,
जीवन आरसा.
तात्त्विक वारसा,
विठू नाम…!२
*
दिली अभंगाने,
दिशा भक्तीमय.
षडरिपू भय,
दूर केले…!३
*
अभंगांचे शब्द,
जणू बोलगाणी.
झाली लोकवाणी,
गाथेतून…!४
*
जीवनाचे सूत्र,
महा भाष्य केले.
भवपार नेले,
अभंगाने…!५
*
तुकाराम गाथा,
आहे शब्द सेतू.
प्रापंचिक हेतू,
पांडुरंग…!६
*
वाचायला हवी,
तुकाराम गाथा.
लीन होई माथा,
चरणातें…!७
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ झेप घेतसे पाखरु ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(कुटुंबातील मुले कर्तृत्ववान होताना आईच्या भावना)
☆
हासू कसले आसू कसले नका विचारु कुणी
एक पाखरु झेप घेतसे पंख नवे लावुनी
*
उरातली ही धडधड माझ्या नकोस ऐकू बाळा
अजून माझ्या कानी घुमतो तुझाच घुंगुरवाळा
बघू नको तू मागे आता, ‘आई, आई’ म्हणुनी
एक पाखरु झेप घेतसे पख नवे लावुनी
*
अंगण सोडून नभांगणाचा ध्यास तुला लागला
निरोप तुजला देताना परि दाटून येतो गळा
खुशाल जा तू सोडून माया, ठेवून आठवणी
एक पाखरू झेप घेतसे पंख नवे लावुनी
*
दूर यशाचे शिखर खुणविते, गाठायाचे तुला
काटे वेचुन कर्तृत्वाचा फुलवायाचा मळा
वाटेवरुनी चालत जा तू ध्येय एक ठेवुनी
एक पाखरु झेप घेतसे पंख नवे लावुनी
*
असेच येतील अश्रू नयनी तू परतून येता घरी
ओठही हसतील झेलत असता तुझ्या यशाच्या सरी
मायपित्याचे आशिर्वच जा, सोबतीस घेउनी
एक पाखरु झेप घेतसे पंख नवे लावुनी
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ अष्टविनायक…! ☆
☆
मोरगावी मोरेश्वर
होई यात्रेस आरंभ
अष्ट विनायक यात्रा
कृपा प्रसाद प्रारंभ….!
*
गजमुख सिद्धटेक
सोंड उजवी शोभते
हिरे जडीत स्वयंभू
मूर्ती अंतरी ठसते….!
*
बल्लाळेश्वराची मूर्ती
पाली गावचे भूषण
हिरे जडीत नेत्रांनी
करी भक्तांचे रक्षण….!
*
महाडचा विनायक
आहे दैवत कडक
सोंड उजवी तयाची
पाहू यात एकटक….!
*
थेऊरचा चिंतामणी
लाभे सौख्य समाधान
जणू चिरेबंदी वाडा
देई आशीर्वादी वाण…!
*
लेण्याद्रीचा गणपती
जणू निसर्ग कोंदण
रुप विलोभनीय ते
भक्ती भावाचे गोंदण….!
*
ओझरचा विघ्नेश्वर
नदिकाठी देवालय
नवसाला पावणारा
देई भक्तांना अभय….!
*
महागणपती ख्याती
त्याचा अपार लौकिक
रांजणगावात वसे
मुर्ती तेज अलौकिक….!
*
अष्टविनायक असे
करी संकटांना दूर
अंतरात *निनादतो
मोरयाचा एक सूर….!
☆
© श्री सुजित कदम
मो.7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ आकाश माझे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
नात्यास आपल्या जरीही,
रुढ नाव कोणतेच नाही.
तरी कसे निक्षून सांगू,
आपल्यांत नातेच नाही.
*
भान ठेऊ अंतराचे,
जे आजही रुंदावले.
थंडावले आवेग सारे,
मनोवेगही मंदावले.
*
मेघ कांही भरुन आले,
आत्ताच ते बरसून गेले.
मागमूस अवघे पुसोनी,
आकाश माझे स्वच्छ झाले.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 259
☆ कृष्णार्पण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
गॅसवरचं दूध ऊतू जाणं
तसं नित्याचंच
आणि बोलणं खाणं अटळ!
कानकोंडं होणं, अपराधी वाटणं,
चुटपूट लागणं, हे ही वर्षानुवर्षे!
दूध ऊतू गेलं की वाईट वाटतं ते
साय वाया गेल्याचं,
अंशानं लोणीतुपाचंही नुकसान!
अनेकदा ठरवूनही,
नाही थांबवता आलं ऊतू जाणं!
फायद्याची गणितंही
नाहीच साधता आली!
आजी म्हणाली होती एकदा,
“आवडत नसलं तरी ,
कपभर दूध घेत जा रोज, कॅल्शियम असतं त्यात!”
अंगी लागण्यापेक्षा ऊतूजाणंच
अंगवळणी पडत गेलं!
नवरा म्हणतो कुत्सितपणे,
“आमच्या घरी रोजच रथसप्तमी”
स्वतःच्या वेंधळेपणाचं समर्थन न करता ,
मी ही गॅसवर दूध ठेवून,
उचलते फोन, घुटमळते टीव्ही समोर, डोकावते वर्तमानपत्रात…..
गॅसवरच्या दूधासारखंच
मनाचंही ऊतूजाणं !
मनाला शिस्त लावण्याऐवजी,
कृष्णार्पण म्हणून टाकावं,
सा-याच ऊतू जाण्याला!
हेच तेवढं हाती उरलंय ……
ऊतू जाणं अटळ झालंय!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ वसंत ऋतुच्या शुभेच्छा ..☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
(अष्टाक्षरी)
☆
वसंताला येता भर
वारा हळुंच झुलतो
गुलाबाच्या कळीसह
गीत प्रणयाचे गातो
*
आनंदाने डोलणार्या
कळीसवे बागडतो
उद्या पूर्ण फुलण्याचे
स्वप्न तिला दाखवतो
*
फुलणार्या कळीसंगे
झिम्मा फुगडी खेळतो
चार दिवस सुखाचे
आनंदाने घालवतो
*
एक फुल कोमेजते
दुजे सुरेख खुलते
भुंग्याचाही गुंजारव
कळी डौलात डोलते
*
वसंताचा जाई थाट
रोपे बनती उदास
ग्रीष्म करतो कहर
वर्षा देई पुन्हा श्वास
*
ऋतुराज पावसाळा
येतो जरी सालोसाल
दरवर्षी आनंदाचे
वाण वाटे हरसाल
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈