मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – अदलाबदल – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – अदलाबदल – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

आई मूल नाते गोड 

माय जगे बाळासाठी 

साऱ्या विश्वाच्या सौख्याला 

बांधी त्याच्या मनगटी ||

*

ठेच लागता बाळास 

कळ माऊलीच्या उरी 

नाही आईच्या मायेस 

कशाचीही बरोबरी ||

*

तिचा काळीज तुकडा

येई ग नावारूपाला 

लेक कर्तृत्वसंपन्न 

नेई जपून आईला ||

*

आई मुलाच्या नात्याची 

अदलाबदल होते 

एका पिढीचे असे हे 

आवर्तन पूर्ण होते ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 262 ☆ सहचर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 262 ?

☆ सहचर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मी केली नाही कधीच….

खास तुझ्यासाठी कविता !

अधून मधून,

डोकवायचे तुझे संदर्भ….

कधी चांगुलपणाचे,

कधी कडवटपणाचे!

 खरंतर किती साधं असतं आयुष्य,

आपणच बनवतो अवघड!

नाहीच भरता आले रंग,

एकत्र,

आयुष्याच्या रांगोळीत!

समांतर रेषांसारखे,

जगत राहिलो,

आता सांजसावल्या,

झेलत असताना,

तू जास्त थकलेला दिसतोस,

भर उन्हातही….

ताठ कण्याने उभा होतास,

मावळतीची उन्हंही,

तशीच झेलत रहा….

सहचरा…..

नाहीच देता आलं काही,

जन्मभर!

स्वर्गात बांधलेल्या गाठी मात्र

 निभावल्या गेल्या आपसूकच,

स्वर्गस्थ ईश्वरानंच करावा न्याय,

देता आलंच काही,

तर सहचरा—

देईन तुला उरल्या आयुष्याचं दान!

दयाघना तू आहेसच ना,

इतका महान!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शेवटचा निरोप… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ शेवटचा निरोपसौ. वृंदा गंभीर

एकत्र शिकलो एकत्र वाढलो

सुख दुःखात एकत्र सामील झालो

नोकरीच्या निमित्ताने गेलो निघून

मित्रा शेवटचा निरोप द्यायला

येशील ना रे धावून

 

घराट्या तील पाखरं उडून गेली

आनंदी वस्तू आता सुनी सुनी झाली

थकलो रे फार एकटा धीर धरून

मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील

ना रे धावून

 

वय होतं चाललं अशा नाही उरली

आयुष्याची गणितं जुळवता वेळ सरली

डोळे झाले लाल वाट तुझी पाहून

मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील

ना रे धावून

 

या बाल मनाला साथ हवी तुमची

बोलता बोलता सत्तरी आली आमची

ध्यास धरला मित्रांचा वेड्या मनानं

मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील

ना रे धावून

मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील

ना रे धावून

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #274 ☆ यमराजाशी लढले… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 274 ?

यमराजाशी लढले… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नावेत तुझ्या चढले मी

प्रेमात तुझ्या पडले मी

*

होतास गुरू तू माझा

प्रेमात तुझ्या घडले मी

*

ओढले मला तू वरती

अन डोंगरही चढले मी

*

पहाड होता तो माझा

पाठीमागे दडले मी

*

सावित्रीच्या बाण्याने

यमराजाशी लढले मी

*

होता सोबत तू माझ्या

नाहीच कधी अडले मी

*

नाग समोरी दिसला अन

त्यालाच इथे नडले मी

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रभात प्रतिक्षा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रभात प्रतिक्षा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

पिवळ्या जर्द अबीराला

कुसूम लाली कुणी फासली

पश्चिम नगरी फुलता

अजनी उदासशी हसली.

*

काळा बुक्का घेऊन सांज

नाचू लागेल रंग पुसूनी

तारांकित शाल पांघर

शीतल शशी गगन लेणी.

*

सरोवर भासे लोचन

प्रतिबींब न्याहाळती जळी

अंतरंगी उठे लहर

वायू हुंगीत प्रहर कळी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – महादेव शिवशंकर… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? महादेव शिवशंकर... ? श्री आशिष  बिवलकर ☆

सर्व देवांच्यात सर्वश्रेष्ठ,

असती हर हर महादेव!

सृष्टीचा तारणहार,

शिवस्तुती करावी सदैव!….. १

*

पत्नी पार्वती,

पुत्र कार्तिकेय -गणपती ! 

पुत्री अशोक सुंदरी,

भक्तांच्या हाकेला धावती!…. २

*

शिरी चंद्रकोर धारण,

हातात त्रिशूल डमरू! 

नंदीवर होई स्वार,

भोलेनाथ बाबा अवतरू!….. 3

*

जटातून वाहे गंगा,

म्हणती कुणी गंगाधर!

कंठात हलाहल केले प्राशन,

नीळकंठ परमेश्वर !….. ४

*

चिताभस्म नित्य लावे,

कंठाभोवती वासुकी नाग!

व्याघ्र चर्मावर बैसे,

त्रिकाळाची असे जाग!….. ५

*

त्रिनेत्र सामर्थ्य शिवाचे,

पाही भूत, भविष्य, वर्तमान!

तांडव नृत्य करून,

नृत्यात नटराज सामर्थ्यवान!….. ६

*
त्रिदल बेल वाहता,

होई भोलेनाथ प्रसन्न!

मनोप्सित वर देऊन,

भक्तांना करी धन्य!….. ७

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सवाल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ सवाल ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

सामान्य माणसाचा साधा सवाल आहे

हा राजकारणी का जळता हिलाल आहे?

 *

सत्तांध होत कोणी सेवा कशी विसरतो

इतके कसे कळेना तुमची कमाल आहे

 *

जनता तुम्हास भजते आदर्श भावनेने

पण का तुम्हीच येथे झाला दलाल आहे

 *

विसरू नका कुणी ही साधी सुधी विधाने

हा काळ माणसांचा वैरी कराल आहे

 *

कर्तव्य लाभकारी तुमच्या कडून व्हावे

तुमचीच आज येथे ख्याती विशाल आहे

 *

जपण्यास या प्रजेला व्हा सावधान आता

उधळायचा सुखाचा आता गुलाल आहे

नेते बनून तुम्ही सुखरूप वाट शोधा

तुमच्या समर्थ हाती आता मशाल आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ 💃 ती, ती, ती, आणि ती सुद्धा ! 💃 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

💃 ती, ती, ती, आणि ती सुद्धा ! 💃 श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

 शब्दांच्या झुल्यावर

झुलते ती कविता

वृत्तांच्या तालावर

नाचते ती कविता

*

 भाव मनातले

 जाणते ती कविता

 जखम हृदयात

 करते ती कविता

*

शब्दांशी खेळत

हसवते ती कविता

घायाळ शब्दांनी

रडवते ती कविता

*

 साध्या शब्दांनी

 सजते ती कविता

 वेळी अवेळी

 आठवते ती कविता

*

मनाचा गाभारा

उजळवते ती कविता

जखम बरी करून

व्रण ठेवते ती कविता

व्रण ठेवते ती कविता

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ।। साधूया संवाद ।। ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

।। साधूया संवाद ।। ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

काहीच संवाद। त्यात विसंवाद।

म्हणूनी विवाद। नेहमीची।।

 *

नेहमीची चाले। तक्रारे निवाले।

अहंती हवाले। स्वतःच्याच।।

 *

स्वतःच्याच मापे। इतरांसी नापे।

म्हणे महापापे। हरिकृत्ये।।

 *

हरिकृत्ये बाणू। उभय सुकाणू।

मीपणा विषाणू। विग्रहाने।।

 *

विग्रहाने वाद। त्यात सुसंवाद।

साधुया संवाद। नेहमीची।।

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वार्थातूनपरमार्थ… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ स्वार्थातूनपरमार्थ… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

कुणब्याचा जीव साधाभोळा

मातीत रंगतो जीवन सोहळा

मातीत राबतो उन्हात नाहतो

तण काढाया कमरेस विळा

*

 मायेने करतो माती मशागत

 बीज पेरायाचे तया भूगर्भात

 बीज पेरता नभा विनवणी

 पाड अंबरा पाऊस शेतात

*

 चरितार्थार्थ राबे दिनरात

 स्वार्थातून साधे इथे परमार्थ

 अन्नदात्याच्या कष्टाने घास

 विश्व मानवजाती मुखात

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares