सध्याचं प्रत्येकाचं जीवनमान हे खूप धकाधकीचे, घाईगडबडीचे झाले आहे.पर्यायाने ते कसल्यातरी तणावाचे पण झाले आहे.आपल्या नित्य दैनंदिन कामकाजात आपण खूप लोकांशी संवाद साधतो.त्या संवादातून, जवळीकेतून कधी मदतीच्या भावनेने आपली कामे इतरांकडून करुन घेतो वा आपण इतरांची कामे करुन देतो.हे सगळं आपण करतो खरं पण अजूनही आपल्याला पूर्णत्वाचा,संतोषाचा, समाधानाचा कळसोध्याय हा पूर्णच झाल्या नसल्याचे उमगते.आणि मग कारणं शोधतांना एक महत्वाचे कारण सापडते तो म्हणजे आपल्या आतील मनाचा आवाज ऐकण्याचा अभाव.आपले अंतर्मन नेहमी आपल्याला ज्या हव्याहव्याशा वाटणा-या गोष्टी सांगतं त्या खुणावणा-या गोष्टींकडं आपण कधी गरज म्हणून तर कधी संकोच म्हणून, कधी आडमुठेपणा तर कधी संस्कारांचा पगडा म्हणून चक्क कानाडोळा करतो. ह्याचे परिणाम लगेच दिसतं नसले तरी मनावर खोल दूरगामी उमटतं असतात.त्यामुळे सगळं हातातच असून वाळू निसटल्यागतं सारखा गमावल्याचा भास होतो आणि हा भासच आपल्याला आनंदी राहण्यापासून वंचित ठेवत़ो.हा विचार करतांना ह्या मला सुचलेल्या काही ओळी खालीलप्रमाणे………
(संगीता आपल्या मावसभावाच्या संपर्कात होती, ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आधी प्रणिताचा बेड तयार होता.) – इथून पुढे —
ॲम्बुलन्स हॉस्पिटलजवळ आली. लगेच मनीषने सर्व कागदपत्र हॉस्पिटलच्या ऑफिसमध्ये नेऊन दिले. दोन मिनिटात प्रणिता स्पेशल रूममध्ये ऍडमिट झाली. मग भराभर सर्व टेस्ट घेतल्या गेल्या. ऑक्सीजन सिलेंडर जोडला गेला, अंगात भराभर इंजेक्शन दिली गेली. सलाईन मधून औषधं दिली गेली.
रात्री दहाच्या सुमारास मनिषच्या मोबाईलवर प्रणिताच्या भावाचा फोन आला, मनीषने त्याला ज्युपिटर हॉस्पिटल जवळ बोलावले. तिचा भाऊ हॉस्पिटलकडे आला, त्याची व मनीषची ओळख झाली. मनीषने त्याला आपल्या एस ए ग्रुप मधील मंडळीची ओळख दिली.
भाऊ – कशी आहे तिची तब्येत? आणि कोठे अपघात झाला आणि कसा?
वंदना – तिचा अपघात झाला नाही, पण ती काल सकाळी फोन उचलेना तेव्हा मी तिच्या घरी गेले. तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. मी लगेच आमच्या ग्रुपवर ही बातमी कळवली आणि तिला काल दुपारी वाशीमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि मग सायंकाळी या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.
तिचा फेसबुक वर पाहिलेला फोटो आणि पोलिसांनी फोडलेले दार या सर्व गोष्टी तिच्या भावापासून लपविल्या.
भाऊ – मग डॉक्टरांचे काय म्हणणं आहे?
मनिष – सध्या आम्हाला कोणाला तिला भेटायला देत नाही आहेत, त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे एवढ्यात कळणार नाही. ती शुद्धीवर आली की सर्व काही कळेल. तिची आई येते आहे का?
भाऊ –हो, आरती माझ्या आई बाबांना घेऊन येते आहे. एवढ्यात पुण्यापर्यत आली आहे.
संगीता – तिचे बाबा पण येत आहेत का, बरं झालं .
तोपर्यंत प्रणिताच्या बाबांचा फोन भावाच्या मोबाईलवर आला. तिच्या भावाने आपण हॉस्पिटलजवळ पोहोचल्याचे सांगितले. तिची सर्व मित्रमंडळी म्हणजेच त्यांचा एस ए ग्रुप तिच्यासाठी धडपडत आहे, त्यामुळे तुम्ही सावकाश आनंदाने या असा निरोप दिला.
आत डॉक्टर्स प्रांणिताच्या ऑक्सिजन लेवलवर लक्ष ठेवून होते, ब्लडप्रेशर वर येण्यासाठी धडपडत होते.
बाहेर एस ए ग्रुपचे शंभराहून जास्त मेंबर्स चांगल्या बातमीची वाट पहात होते. तसेच प्रणिताची आई वडील येणार, त्याची वाट पहात होते.
पहाटे चार वाजता हॉस्पिटलकडून सांगण्यात आले की प्रणिताची ऑक्सिजन लेव्हल 90 पर्यंत आली आहे, ब्लडप्रेशर नॉर्मल होत आहे. एस ए ग्रुपच्या मेंबर्सनी आनंदाने जल्लोष केला. प्रणिताच्या भावाच्या डोळ्यात अश्रू आले. कोण कुठलीही अनोळखी मुले, नाटक सिनेमाच्या वेडापोटी इकडे जमा झाली आहेत, अजून पाय स्थिर नाहीत, आज काम आहे तर उद्या नाही अशी परिस्थिती, पण प्रेमाने एकमेकाला धरून राहिले आहेत
पहाटे चार वाजता आरती प्रणिताच्या आई-बाबांना घेऊन हॉस्पिटल जवळ आली. प्रणिताचा भाऊ बाहेर होताच. काळजीत पडलेल्या तिच्या आई-बाबांना त्याने धीर दिला, तसेच तिची तब्येत संकटातून बाहेर पडल्याचे त्याने त्यांना सांगितले. ही सर्व मुलं प्रणिताची मित्रमंडळी, तिच्यासारखी नाटक सिनेमा मालिकाच्या वेडापायी घरदार सोडून या पट्ट्यात राहत आहेत. कधी जेवण मिळते कधी नाही. कधी काम असते कधी नसते. पण सर्वजण एका ग्रुपवर मैत्री सांभाळतात. आज सकाळपासून हीच मंडळी प्रणिताच्या आजूबाजूला आहेत. या मंडळींना कळले की ती रूममध्ये बेशुद्ध पडली आहे. त्यावेळीपासून ही मुलं ती बरी होण्यासाठी धडपडत आहेत… प्रणिताच्या आईने सर्वाकडे प्रेमाने पाहिले, बाबा पण सदगदित झाले. त्यांनी मनिषच्या खांद्यावर थोपटले.
एव्हडयात हॉस्पिटल मधून बातमी आली, प्रणिता शुद्धीवर आली आहे. एस ए ग्रुप ने आनंदोत्सव सुरू केला. सकाळी सहा वाजता प्रणिताच्या आईला तिला भेटायची परवानगी मिळाली. आईला बघतल्यावर प्रणिता पुन्हा रडू लागली. मग तिचे बाबा, भाऊ आत गेले. प्रणिताच्या लक्षात येत नव्हते, आपण कुठे आहोत? आजूबाजूला सलाईन, ऑक्सीजन मॉनिटर दिसतो आहे, म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये असणार. मग आपल्याला इकडे कुणी आणले?
सकाळी नऊ वाजता डॉक्टरांची टीम तपासण्यासाठी आली. त्यांनी तिला तपासले आणि आता ती संकटातून बाहेर आल्याचे तिच्या आई-बाबांना सांगितले. बाबांनी डॉक्टरांना विचारले ..
“पण ती बेशुद्ध का झाली?
डॉक्टर – तिला ड्रग्सचे व्यसन आहे, ड्रग्सचा जास्त डोस तिच्या शरीरात गेला होता, आता ड्रग्सपासून तिला लांब ठेवायला हवे. ती वेळेत या हॉस्पिटलमध्ये पोचली म्हणून.. अन्यथा तिचा कालच अंत झाला असता.
प्रणिताचे आई-बाबा सुन्न झाले. काय आपल्या या मुलीची परिस्थिती? प्रणिताच्या बाबांच्या मनात आले, आपण सुद्धा तिच्या या परिस्थितीला जबाबदार आहोत. तिची आवड निवड आपण लक्षात घेतली नाही. तिच्याशी संबंध तोडले. तिच्या आईला पण तिला भेटायला बंदी केली. जर तिच्या आवडीला आपण सुद्धा प्रोत्साहन दिले असते, तर ती एकटी पडली नसती. प्रणिताची आई गप्प बसून होती, तिचा भाऊ पण गप्प बसून होता, ड्रगचे व्यसन लागलेल्या आपल्या या बहिणीला त्यातून कसे बाहेर काढायचे याचा तो विचार करत होता. प्रणिताची आई मनात म्हणत होती, आपल्या घरी किंवा माहेरी कुणाला सुपारीचे सुद्धा व्यसन नाही, उलट तिचे बाबा कोण व्यसनी दिसला तर त्याचे व्यसन कसे सुटेल, यासाठी धडपड करतात, आणि आमची मुलगी….
दुपारी प्रणिता पूर्णपणे शुद्धीवर आली, पण आता तिच्या ड्रग्स घेण्याची वेळ झाली होती, त्यामुळे ती रेस्टलेस होऊ लागली, आळोखे पाळोखे देऊ लागली, तिची बुबूळ वर खाली होऊ लागले. पुन्हा डॉक्टर धावत आले, त्यानी तिला झोपेचे इंजेक्शन दिले तशी ती झोपी गेली.
दुपारी प्रणिताचे बाबा आणि भाऊ बाहेर आले, बाहेर एसए ग्रुपचे मेंबर्स उभे होते. एवढ्या कडकडीत दुपारी सुद्धा 50 पेक्षा जास्त मंडळी बाहेर उभी असल्याचे पाहून बाबांना गहिवरून आले.
बाबांनी मनीषला जवळ घेऊन सांगितले,
” डॉक्टर म्हणतात तिला ड्रग्सचे व्यसन लागले आहे. मघा ती जागी झाली, पुन्हा तिचे शरीर ड्रग्स मागू लागले, ती रेस्टलेस झाली, डॉक्टरांनी झोपेचे इंजेक्शन देऊन झोपून ठेवले आहे, पण पुढे काय? या ड्रग्सच्या विळख्यातून ती बाहेर कशी पडणार?
एस ए ग्रुप मधील पूर्वा बोलू लागली
” अंकल, याकरता तिला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवायला हवे. माझा मामेभाऊ असाच ड्रगच्या विळख्यात अडकला होता, पण पुण्यातील डॉक्टर अवचटांच्या व्यसनमुक्ती केंद्रात त्याच्यावर योग्य उपचार झाले आणि तो त्याच्या व्यसनातून बाहेर पडला. तुम्ही जर हो म्हणालात तर मी माझ्या भावाकडे चौकशी करून थोड्या वेळात तुम्हाला सांगते.”
प्रणिताच्या बाबानी होकार देताच तिने त्वरित आपल्या भावाला फोन लावला. त्याच्याकडून व्यसनमुक्ती केंद्राचा फोन नंबर घेतला. आणि तेथूनच व्यसनमुक्ती केंद्राला फोन लावून प्रणिताची केस सांगितली. व्यसनमुक्ती केंद्राने प्रणिताला आपल्या केंद्रात आणण्याची परवानगी दिली. चार दिवसांनी प्रणिता ठणठणीत बरी झाली आणि आई बाबा, भाऊ यांनी तिला व्यसनमुक्ती केंद्रात नेण्याची तयारी केली. प्रणिताचे आई बाबा एस ए ग्रुप मेंबर्सना भेटले. “ तुमच्यासारखी धडपडी प्रेमळ मुलं आहेत म्हणून जगात माणुसकी शिल्लक आहे हे म्हणायचे, “ असे म्हणताना ते भावुक झाले. “ या एसए ग्रुप मुळेच माझी मुलगी मला मिळाली, असेच एकत्र रहा, एकमेकांसाठी धावा, एकमेकांना मदत करा. तुमचे उपकार न फेडण्यासारखे “. प्रणिताची आई सर्वाना सांगलीत येण्याचे आमंत्रण देत राहिली.
शेवटी प्रणिता आपल्या ग्रुप मेम्बर्सना भेटली, विशेष करून वंदना आणि मनीष, त्यांनी धावपळ करून घर फोडून आपल्याला हॉस्पिटल मध्ये नेले नसते तर….
प्रणिता व्यसन मुक्ती केंद्रात जाताना पुन्हा सर्व एस ए ग्रुप हजर होता. सर्वांनी तिला निरोप दिला.
त्या व्यसनमुक्ती केंद्रात ती दीड वर्ष राहिली पेशंट म्हणून, व्यसनातून पूर्ण बाहेर पडली आणि त्याच व्यसनमुक्ती केंद्रात मार्गदर्शक म्हणून काम करू लागली.
पण तिच्या मनात एस ए ग्रुप बद्दल कृतज्ञता कायम राहिली.
☆ “हे सोहळे की देखावे….…” – लेखिका : सुश्री ज्योती चौधरी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
नाना आमचे स्नेही.. परवा त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटामाटानं संपन्न झाला खरंतर हा सोहळा त्यांच्या मनाविरुद्धच, कारण त्यांना त्यांचा जन्मसोहळा नव्हे तर 81 वी जीवनयात्रा त्यांच्या ठराविक स्नेह्यांसमवेत घरी साजरी करायची होती पण मुलांसाठी सुनांसाठी अन नातवंडांसाठी ही एक पर्वणी होती स्वतः चे हितसंबंध जपण्याची !
आता बघा नाना रिटायर्ड -80 पूर्ण तर नानी 75 वर्षाच्या! तिन्ही मुलं फ्लॅट संस्कृतीत रमणारे, गावातच राहतात अन बैठ्या घरात नाना नानी एकटेच राहतात ! जमत नाही हल्ली स्वयंपाक करणं म्हणून एका मावशींकडचा डबा सकाळीच येतो. खरं तरं गरमागरम जेवण ही नानांची तरुणपणची आवडच !
“ बरेच दिवस झालेत गरमागरम जेवण जेवून “.. चार दिवसापूर्वीच ते नानींना म्हणालेत ! पोळी चावत नाही, भाजी तिखट असते म्हणून नानी मिक्सरमधून पोळी काढून वरणासोबत देतात. घरकामास अनेक वर्षांपासून मदतीला असते मालू !
आठ दिवसांपूर्वी मुलं सुना सर्वजण नानींकडे जमले, नानींना कोण आनंद झाला. लगेच त्यांनी श्रीखंडाच्या वड्या सर्वांच्या हातावर ठेवल्या. धाकट्या सुनेनं येण्याचं प्रयोजन सांगितलं .. ‘ आम्हा सगळ्यांना नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करायचाय,’ क्षणभर शांतता.!.
.. हल्ली असले सोहळे आणि तो दिखावू थाट नाही सहन होत म्हणून नानांनी विषय बंद केला ,नानी म्हणाल्या, ” छान घरी करू साजरा यांचा वाढदिवस, तुमच्या किलबिलाटानं घरं हसेल, आनंदून मोहरेल . यांना आवडेल असे गरमागरम दोन पदार्थ अन् मऊसा वरण- भात- तूप ठेवू, त्यांचे समवयस्क स्नेही
बोलवू !” …..पण नवीन पिढीला नव्या पद्धतीने करायचं होतं सेलिब्रेशन.. परवा नाना-नानींना सत्कार मूर्ती बनवून बॅंक्वेट हॉलच्या सजवलेल्या सोफ्यावर बसवलं, नाना कडक सफारीत तर नानी भारी भक्कम पैठणीत आणि दागिन्यांनी मढवलेल्या..चेहरा थकलेला न् शरीर दमलेलं ! येणारे पाहुणे कुणीच ओळखीचे नसल्यानं आलेली, भेदरलेली भावना !
मुलांचे बॉस.. सहकारी.. मित्र मंडळ.. नातवंडांचे कॉलेज कंपू.. सुनांचे किटी ग्रुप्स.. सोशल नेटवर्किंग, यात 250 माणसं झाली मग झालं काय…नाना अन् नानींचे 8-10 जण ‘ उगीचच वाढतात ‘ म्हणून बोलवले गेलेच नाहीत..! त्यामुळे सोहळा नक्की कुणाचा याचा नाही म्हटलं तरी नानींना राग आलेला ! बरं दणक्यात सोहळा करायचा तर पदार्थही वेगवेगळे हवेत ! कुणाला चायनीज आवडतं तर कुणाला पंजाबी ..साउथ इंडियन डिशसुद्धा आपली स्टाईल दाखवत होत्या..महाराष्ट्रीयन पदार्थ नेहमीच होतात म्हणून त्यांना सुट्टी दिलेली ! आईस्क्रीम अन् विविध पदार्थांची रेलचेल ..पण नाना नानींना गोडबंदी होती, मग खायचं काय..?दात नसलेल्या सत्कारमूर्तींसाठी खाण्याचा पार आनंदच होता ! बरं खाण्याच्या टेबलपर्यंत जायचं कसं? मॅनर्स पाळायला हवेत म्हणून आजी आजोबा गेल्या तीन तासापासून नुसतेच सूप पिवून गप होते !
एकदाचा सत्कार सोहळा दिमाखात संपन्न झाला अन आता रात्रीचे 10:30 झालेत. ‘ जेवण जात नाही रे बाबाsss ‘ म्हणत दोघांनी जरासं पुन्हा सूपच घेतलं ! मुलांनी रात्री 11वाजता नानांना घरीच रिलॅक्स वाटतं म्हणून बैठ्या घरी आणून सोडलं…!
….. ….
सकाळी मालू आली.. जणू सगळं जाणणारी…
नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा याचा नीट उच्चारही करता न येणा-या, न समजणा-या तिनं मात्र आज त्यांच्या आवडीचा गरमागरम वरण भात घरून करून आणला अन् वरून तुपाची धार ओतत ती म्हणाली,
” माह्या मायबापाले मी तं पायलं नाय जी, पर तुमी मायेनं मले वागोता यातच मले माहे बावाजी भेटले.. माह्याकडून काय द्यावा इचार केल्लो अन् आठोलं तुमाले गरम वरन भात लै आवडते..नानी नं दिवाडीले देल्लेल्या जास्तीच्या पैशातनं तूप आनलं.. नाई मनू नका जी..! “
… काय बोलणार होते दोघं …. डबडबलेल्या डोळ्यांनी नानींनी नानांना वरण भाताचा घास भरवला..
मालू आज दोघांसाठी ख-या अर्थी अन्नपूर्णा होती. !
लेखिका : ज्योती चौधरी
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मोडेन पण वाकणारनाही…☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
आमचे काका ति स्वः दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मितल्या,ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या शूरवीरांच्या कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता- ऐकतांना प्रसंग डोळ्या समोर उभा राहयचा.लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली, अंगावर शहारे आणणारी ही कथा आहे; श्री कर्णिकांची. पुण्यातल्या श्री तांबडी जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता,..थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडुशेट गणपती मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे नां ! तोचं तो रस्ता. त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दिपस्तंभ अजूनही कित्येक वर्षाचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे. आणि त्यावर नांव कोरलय” –भास्कर दा.कर्णिक.– कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठ बलिदान केलंआहे . पण=पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावांची ही निशाणी? श्री कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श -त्यांचं बलिदान, त्यांच नांव आपण मनांत जागवूया. श्री.भास्कर दा.कर्णिक ऑडिनन्स फॅक्टरीत नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व . त्या काळचे १९४० -४२ सालचे उच्च पदवी विभूषित असलेले हे धडाडीचे तरुण,देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनांत विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तिथलीच सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब तयार केले. थोडे थोडके नाहीं तर अर्धा ट्रॅक भरून बॉम्बची सज्जता झाली. आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांव सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे श्री दिक्षित श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय देवीच्या मंदिरातही हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबतं होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले. पण — पण हाय रे देवा ! कसा कोण जाणे! दुर्देवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारासह श्री कर्णिक पकडले गेले. फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं, आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे नां ?तीच ती जागा!.पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण.. पण श्री कर्णिक, मुख्य आरोपी म्हणून, डाव फसलयामूळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं भान त्यांना आलं .. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजुला गेले. क्षणार्धात… क्षणार्धात.. खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते,.. ते कोसळले…. आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग -केला. तर मंडळी असा आहे त्या पायरीचा इतिहास….. मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी,हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय. मध्यंतरी बराच काळ गेला आहे .भास्कर दा. कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत.त्यामुळे आतां – -हया हुताम्याचाही दुर्देवाने पुणेकरांना विसर पडलाय. संपली श्री भास्कर दा. कर्णिक यांची कहाणी . ज्यांना ही कथा माहित आहे. ते दगडूशेठ गणपती मंदिरातून बाहेर पडतात. डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात. क्षणभर विसावतात. आणि नतमस्तक होतात.
तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात.
कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तू सध्या उपेक्षित ठरलीय. कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. स्तंभावरील अक्षरे पण पुसट झाली आहेत. तरीपण आपण श्री कर्णिकांच्या शौर्याला स्मरून,ह्या हुतात्म्याची आठवण म्हणून, स्तंभापुढे नतमस्तक होऊयात का ?
चांडी सार पासून सानुर एक दीड तासावरच आहे.(by road) बॅगा पॅक करून, भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो. दोन निळ्या रंगाच्या स्वच्छ आणि आरामदायी टॅक्सीज आमच्यासाठी हजरच होत्या ऐटदार गणवेशातले हसतमुख ड्रायव्हर्स आमच्यासाठी स्वागताला उभे होते. दीड दोन तासातच आम्ही आमच्या कर्मा रॉयल सानुर रिसॉर्टला पोहोचलो. पुन्हा एक सुंदर अद्ययावत सुविधांचा बंगला. सभोवताली आल्हाददायी रोपवाटिका आणि जलतरण तलाव. इथे एक आवर्जून सांगावसं वाटतं की प्रत्येक शयनगृहात शयनमंचावर चाफ्याची फुले पसरलेली होती आणि हिरव्या पानांच्या कलात्मक रचनेत वेलकम असे लिहिले होते. मन छान गुलाबी होउन गेले हो!
वातावरणात काहीशी उष्णता आणि दमटपणा असला तरी थकवा मात्र जाणवत नव्हता. मन ताजे प्रफुल्लित होते. एका वेगळ्याच सुगंधी, मधुर आणि थंड पेयाने आमचे शीतल स्वागतही झाले. प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आम्ही ८० च्या उंबरठ्यावरचे सहा जण नकळतच वय विसरत होतो हे मात्र खरे.
इथे आम्ही फक्त एकच दिवस थांबणार होतो.
संध्याकाळी जवळच असलेल्या सिंधू बीचवर जायचे आम्ही ठरवले. इथल्या अनेक दुकानांची नावे, समुद्रकिनार्यांची नावे, अगदी माणसांची विशेषनामेही संस्कृत भाषेतील आहेत. पुराणातल्या व्यक्तींची नावे आहेत. जरी बालीनीज लिपीतल्या पाट्या वाचता येत नसल्या तरी इंग्लिश भाषांतरातील भगवान, कृष्णा, महादेव सिंधू अशी नावे कळत होती.नावात काय आहे आपण म्हणतो पण परदेशी गेल्यावर आपल्या भाषेतलं नाव आपुलकीचं नातं लगेच जोडतं.
संध्याकाळी बीचवर फिरायचे व तिथेच रेस्टॉरंट मध्ये स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा आम्ही ठरवले. हा समुद्रकिनारा काहीसा चौपाटी सदृश होता. पर्यटकांची गर्दी होती. फारशी स्वच्छता ही नव्हती. फेरीवाले, किनाऱ्यावरची दुकाने ,हॉटेल्स यामुळे या परिसरात गजबज आणि काहीसा व्यापारी स्पर्श होता. पण बाली बेट हे खास सहल प्रेमींसाठीच असल्यामुळे वातावरणात मात्र मौज मजा आनंद होता. तिथे चालताना मला पालघरच्या केळवा बीचची आठवण झाली. रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह करणारी गरीब विक्रेती माणसं, यात अधिक तर स्त्रियाच होत्या. इथे भाजलेली कणसे आणि शहाळी पिण्याचा काहीसा ग्रामीण आनंद आम्ही लुटला. पदार्थ ओळखीचे जरी असले तरी चावीमध्ये बदल का जाणवतो? इथले मीठ तिखट, आपले मीठ तिखट हे वेगळे असते का? की जमीन, पाणी, अक्षांश रेखांश या भौगोलिक घटकांचा परिणाम असतो? देशाटन करताना या अनुभवांची खरोखरच मजा येते.
इथल्या फेरीवाल्यांकडे आम्ही अगदी निराळीच कधी न पाहिलेली न खाल्लेली अशी स्थानिक फळे ही चाखली. मॅंगो स्टीन नावाचे वरून लाल टरफल असलेले टणक फळ फारच रसाळ आणि मधुर होतं .फोडल्यावर आत मध्ये लसणाच्या पाकळ्यासारखे छोटे गर होते. काहीसं किचकट असलं तरी हे स्थानिक फळ आम्हाला खूपच आवडलं.
बालीमध्ये भरपूर फळे मिळतात. अननस, पपनस, पपया, फणस, आंबे पेरू या व्यतिरिक्त इथली दुरियन (काटेरी फणसासारखं पण लहान ), लाल रंगाचं केसाळ मधुर चवीचं राम्बुबुटन,टणक टरफल फोडून आत काहीसा करकरीत सफरचंदासारखा गर असलेले सालक.. असा बालीचा रानमेवा खाऊन आम्ही तृप्त झालो.
पाणी प्यावं बारा गावचं, चाखावा रानमेवा देशोदेशीचा—— असंच म्हणेन मी.
सी फुड साठी प्रसिद्ध असलेलं हे बाली बेट. शाकाहारी लोकांसाठी भरपूर पर्याय असले तरी मासे प्रेमी लोकांसाठी मात्र येथे खासच मेजवानी असते असे म्हटले तर ते चुकीचे नाही.
समुद्रकिनाऱ्यावर आम्ही असे खात पीत भरपूर भटकलो. सहा म्हातारे तरुण तुर्क!
आता आम्हाला स्थानिक मासे खाण्याचा आनंद लुटायचा होता. मेरीनो नावाचे एक बालीयन रेस्टॉरंट आम्हाला आवडले. किनाऱ्यावरचे सहा जणांचे टेबल आम्ही सुरक्षित केले. कसलीच घाई नव्हती. आरामशीर मासळी भोजनाचा आनंद लुटायचा हेच आमचे ध्येय होते. सारेच स्वप्नवत होते. समुद्राची गाज ,डोक्यावर ढगाळलेलं आकाश आणि टेबलावर मस्त तळलेले खमंग चमचमीत ग्रेव्हीतले मोठे झिंगे( प्राॅन्स) , टुना मासा आणि इथला प्रसिद्ध बारा मुंडी मासा. सोबतीला सुगंधी गरम आणि नरम वाफाळलेला भात आणि हो.. सोनेरी जलपानही. रसनेला आणखी काय हवे हो? गोड गोजीर्या बालीयन लेकी आम्हाला अगदी प्रेमाने वाढत होत्या! बाळपणीच्या, तरुणपणीच्या आठवणीत रमत आम्ही सारे तृप्तीचा ढेकर देत फस्त केले. वृद्धत्वातही शैशवाला जपण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. नंतर पावसाच्या सरी बरसु लागल्या. भिजतच आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि टॅक्सी करून रिसॉर्टवर परतलो. जेवणाचे बिल अडीच लाख आयडिआर, आणि टॅक्सीचे बिल तीस हजार आयडिआर. धडाधड नोटा मोजताना आम्हाला खूपच मजा वाटायची.
आता आमच्या सहलीचे तीनच दिवस उरलेले होते आणि या पुढच्या तीन दिवसाचा आमचा मुक्काम कर्मा कंदारा येथे होता. कंदारा मधली कर्मा ग्रुपची ही प्रॉपर्टी केवळ रमणीय होती. निसर्ग, भूभागाची नैसर्गिक उंच सखलता, चढ-उतार जसेच्या तसे जपून इथे जवळजवळ ७० बंगले बांधलेले आहेत. आमचा ६७ नंबरचा बंगला फारच सुंदर होता.आरामदायी, सुरेख डेकाॅर, सुविधायुक्त, खाजगी जलतरण तलाव, खुल्या आकाशाखाली ध्यानाची केलेली व्यवस्था वगैरे सगळं मनाला प्रफुल्लित करणार होतं. रिसेप्शन काउंटर पासून आमचा बंगला काहीसा दूर होता. पण इकडून तिकडे जायला बग्या होत्या. एकंदरीत इथली सेवेतली तत्परता अनुभवताना समाधान वाटत होते. बारीक डोळ्यांची गोबर्या गालांची, चपट्या नाकांची, ठेंगणी गुटगुटीत बाली माणसं आणि त्यांची कार्यक्षमता प्रशंसनीय होती. त्यांच्या बोलण्या वागण्यात एक प्रकारचा उबदारपणा होता. वास्तविक फारसे उद्योगधंदे नसलेला हा प्रदेश. शेती, मच्छीमारी या व्यतिरिक्त पर्यटन हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. त्यांचे सारे जीवन हे देशोदेशाहून येणाऱ्या पर्यटकांवरच अवलंबून. त्यामुळे पर्यटकांना जास्तीत जास्त कसे खूश ठेवता येईल यावरच त्यांचा भर असावा.
यानिमित्ताने दक्षिण पूर्व आशिया खंडातल्या इंडोनेशियाबद्दलही माहिती मिळत होती. इथल्या बाली बेटावर आमचं सध्याचं वास्तव्य होतं. मात्र जकार्ता राजधानी असलेला इंडोनेशिया म्हणजे जवळजवळ १७००० बेटांचा समूह हिंदी आणि पॅसिफिक महासागरात पसरलेला आहे. हिंदू आणि बुद्ध धर्माचे वर्चस्व असले तरी ८७ टक्के लोक मुस्लिम आहेत. जवळजवळ तीन शतके इथे डच्यांचे राज्य होते. १७ ऑगस्ट १९४५ साली नेदरलँड पासून ते स्वतंत्र झाले आणि प्रेसिडेन्शिअल युनिटरी स्टेट ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया म्हणून ओळखले जाऊ लागले जगातली तिसरी मोठी लोकशाही येथे आहे २००४ पासून जोकोविडो हे इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत. अनेक नैसर्गिक आपत्ती, भौगोलिक विषमता, जात, धर्म भाषेतील अनेकता सांभाळत इंडोनेशियाची इकॉनॉमी ही जगात सतराव्या नंबर वर आहे.
इथल्या वास्तव्यातलं आमचं आजचं प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे बाली फायर डान्स . अग्नी नृत्य. याविषयी आपण पुढच्या भागात वाचूया.
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-6 – कौई लौटा दे मेरे बीते हुए दिन ☆ श्री कमलेश भारतीय ☆
(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)
सच! कितनी प्यारी पंक्तियाँ हैं :
कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन
प्यारे प्यारे दिन,
वो मेरे प्यारे पल छिन!
कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन!
नहीं हम सब जानते हैं कि बीते हुए दिन कभी नहीं लौटते, बस उन दिनों की यादें शेष रह जाती हैं। मेरे पास भी बस यादें ही बची हैं, जालंधर में बिताये सुनहरी दिनों कीं! बात हो रही थी डाॅ तरसेम गुजराल के संपादन में प्रकाशित कथा संकलन ‘खुला आकाश, की और उसमें प्रकाशित कथाकारों की ! इसमें खुद तरसेम गुजराल, रमेश बतरा, योगेन्द्र कुमार मल्होत्रा (यकम), राजेन्द्र चुघ, रमेंद्र जाखू, कमलेश भारतीय, सुरेंद्र मनन, विकेश निझा वनऔर मुकेश सेठी जैसे दस कथाकार शामिल थे। आपस में हम सब मज़ाक में कहते थे कि हम दस नम्बरी लेखकों में शामिल हैं। हम में से विकेश निझावन अम्बाला शहर में रहते थे जिन्होंने आजकल “पुष्पांजलि’ जैसी शानदार मासिक पत्रिका का प्रकाशन शुरू कर रखा है। इनके पास मैं और मुकेश सेठी नवांशहर से अम्बाला जाते और उन बसंती दिनों में रात का सिनेमा शो भी देखते। विकेश निझावन की कहानियों को जालंधर दूरदर्शन पर नाट्य रूपांतरण कर प्रसारित किया गया तब उनकी खूब चर्चा हुई। यही नहीं उन्हें हिसार में प्रसिद्ध कवि उदयभानु हंस ने हंस पुरस्कार से भी पुरस्कृत किया। जिन दिनों मुझे हरियाणा ग्रंथ अकादमी का उपाध्यक्ष बनाया गया तब हिसार से चंडीगढ़ जाते या लौटते समय मैं ड्राइवर को उनके घर गाड़ी रोकने को कहता। विकेश निझावन का घर बिल्कुल मेन सड़क पर ही है और हम चाय की चुस्कियों के साथ पुराने दिनों को याद करते। इनके पापा डाॅक्टर थे।विकेश ने पुष्पगंधा’ के कथा विशेषांक में मेरी कहानी भी चुनी। छोटे बच्चों का स्कूल यानी किनरगार्डन भी चलाते रहे।
हम वरिष्ठ व चर्चित कथाकारों स्वदेश दीपक व राकेश वत्स के संग भी बैठते और कथा लिखने पर बातें करते करते कथा लेखन की बारीकियाँ भी सीखते! अफसोस आज न स्वदेश दीपक हैं और न ही राकेश वत्स! स्वदेश दीपक के प्रथम कथा संग्रह- अश्वारोही को हम दोनों ने राजेन्द्र यादव के अक्षर प्रकाशन से मंगवाया और खूब डूब कर, गहरे से पढ़ा। ये अलग तरह की कहानियों का संकलन है। स्वदेश दीपक फिर एच आर धीमान के सुझाव पर नाटक लिखने लगे और उनका लिखा नाटक-कोर्ट मार्शल न जाने देश भर में कहां कहां मंचित किया गया! फिर उन्होंने मेरे द्वारा दैनिक ट्रिब्यून के लिए हुई इंटरव्यू में कहा भी कि कहानियों के पाठक कम और नाटक के दर्शक ज्यादा होते हैं और इनका दर्शकों पर ज्यादा प्रभाव पड़ता है। देर तक मन पर प्रभाव बना रहता है। दुख यह है कि स्वदेश दीपक के अंदर कहीं गहरे उदासी और आत्मघाती भावना किसी कोने में रहती थी जिसके चलते एक बार रसोई गैस सिलेंडर से खुद को जला लिया और पीजीआई, चंडीगढ़ में दाखिल करवाया गीता भाभी ने! उन दिनों तक मैं देनिक ट्रिब्यून में उपसंपादक हो चुका था। यह सन् 1990 के आसपास की बात होगी ! मैने संपादक विजय सहगल को यह जानकारी दी तो उन्होंने मेरे साथ फोटोग्राफर मनोज महाजन को भेजा कि उनसे हो सके तो कुछ बात करके आऊं! हम दोनों पीजीआई गये। बैड के पास गीता भाभी उदास बैठी थीं और मनोज ने पट्टियों में लिपटे स्वदेश दीपक की फोटो खींची और मैने रिपोर्ट लिखी- ‘स्वदेश दीपक को अपनों का इंतजार’ जिसमें चोट हरियाणा साहित्य अकादमी पर की गयी थी कि ऐसे चर्चित कथाकार की कोई सहायता क्यों नहीं की जा रही। मेरी रिपोर्ट का असर भी हुआ। अकादमी ने बिना देरी किये पांच हजार रुपये देने की घोषणा कर दी। इस रिपोर्ट की कटिंग बहुत साल तक मेरे पर्स में पड़ी रही। पता नहीं क्यों? तब तो स्वदेश दीपक बच गये क्योंकि अभी उन्हें हिंदी साहित्य को शोभायात्रा जैसा नाटक और मैने मांडू नहीं देखा जैसी कृतियाँ देनी थीं लेकिन फिर कुछ वर्षों बाद वही आत्मघाती भावना ने जोर मारा और वे बिना बताये घर से चले गये! कोई नहीं
जानता कि उनका अंतिम समय कहाँ और कैसे हुआ! राकेश वत्स भी पिंजौर जाते हुए बुरी तरह दुर्घटनाग्रस्त हुए और उनके इलाज़ उपचार में शास्त्री नगर में बनाया खूबसूरत मकान भी बिक गया लेकिन वे नही बच पाये! वैसे वे स्कूटर पर ही चंडीगढ़ आते जाते। हमने भी उनके स्कूटर की सवारी का लुत्फ चंडीगढ़ में अनेक बार उठाया। उनकी भी इंटरव्यू करने जब अम्बाला छावनी गया था तब अपना शानदार मकान दिखाते बड़े चाव से बताया था कि यह मकान मैंने अपनी मेहनत से बनाया है लेकिन अफसोस वही मकान बेच कर भी उन्हें बचाया न जा सका! राकेश वत्स सरस्वती विद्यालय नाम से प्राइवेट संस्था चलाते थे और उन्होंने ‘मंच’ नामक पत्रिका भी निकाली और ‘सक्रिय’ कहानी आंदोलन चलाने की कोशिश की जिसमें उन्हें सफलता नहीं मिली। दोनों की कहानियों को मैंने हरियाणा ग्रंथ अकादमी की कथा समय पत्रिका में प्रकाशित किया और सम्मान राशि इनके परिवारजनों को भिजवाई। स्वदेश दीपक की कहानी महामारी और राकेश वत्स की कहानी आखिरी लड़ाई प्रकाशित की। तब इनकी पत्नी नवल किशोरी ने मुझे आशीष दी थी, आज वे भी इस दुनिया में नहीं है। स्वदेश दीपक की सम्मान राशि इनकी बेटी पारूल को भिजवाई जो अब इंडियन एक्सप्रेस में सीनियर पत्रकार हैं और उसका पंजाब विश्वविद्यालय में एडमिशन फाॅर्म लेकर देने मैं ही उसे लेकर गया था, प्यारी बेटी की तरह क्योंकि मैं दैनिक ट्रिब्यून की ओर से पंजाब विश्वविद्यालय की कवरेज करता था तो मेरी सीनियर डाॅ रेणुका नैयर ने पारूल को विश्वविद्यालय लेकर जाने को कहा था। पारूल आज भी मेरे सम्पर्क में है। राकेश वत्स के बेटे बल्केश से कभी कभार बात हो जाती है !
खैर! आप भी सोचते होंगे कि कहाँ जालंधर और कहाँ अम्बाला छावनी पर मैं और मुकेश सेठी एकसाथ अम्बाला छावनी और जालंधर जाते थे और बाद में चंडीगढ़ भी साथ रहा। मुकेश सेठी और जालंधर के किस्से कल आपको सुनाऊंगा!
(श्री सुरेश पटवा जी भारतीय स्टेट बैंक से सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों स्त्री-पुरुष “, गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की (नर्मदा घाटी का इतिहास) एवं तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकश।आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल “शहादत तय होती है परवाना की…” ।)
ग़ज़ल # 111 – “शहादत तय होती है परवाना की…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’