☆ उगवतीचे रंग – ओढ गावाची, ओढ निसर्गाची☆ श्री विश्वास देशपांडे ☆
(माझ्या रंगसोहळा या पुस्तकातील लेख)
निसर्ग जेवढा आपल्या डोळ्यांनी आपल्याला बाहेर दिसतो, तेवढाच तो मनामनात खोलवर रुजलेला असतो. आपलं बालपण गेलं, त्या ठिकाणच्या आठवणी या बहुतांशी निसर्गाशी निगडित असतात. कोणाला आपल्या गावातली नदी आठवते, कोणाला आपली शेत, त्या शेतातली झाडं , त्या झाडांशी निगडित असलेल्या अनेक आठवणी असं हे निसर्गचित्र तुमच्या आमच्या मनात पक्कं रुजलेलं असतं . ती झाडं , ते पशुपक्षी तुमच्या आमच्या मनाच्या आठवणींचा एक कप्पा व्यापून असतात. आपल्याकडे निरनिराळ्या समारंभाचे फोटो काढलेले असतात. त्याचे विविध अल्बम आपण आठवणी म्हणून जपून ठेवतो. पण कधी कधी या फोटोंमधले रंग फिके होऊ लागतात. चित्र धूसर होतात. पण मनामधला निसर्ग मात्र पक्का असतो. त्याचे रंग कधीही फिके होत नाहीत. उलट जसजसे वय वाढत जाते, तसतसे ते रंग गडद, अधिक गहिरे होत जातात. त्याचा हिरवा रंग मनाला मोहवीत असतो.
तुम्ही कामानिमित्त शहरात राहायला गेलेले असा, लॉकडाऊन मुळे घरात अडकलेले असा, तुमचा फ्लॅट, तुमचं घर छोटं असो की मोठं, तुमच्या मनात बालपणाचा तो निसर्ग ठाण मांडून बसलेला असतो. कोकणातून मुंबईत कामानिमित्त येणारे चाकरमानी, खेड्यापाड्यातून कामानिमित्त मुंबई पुण्याला स्थायिक झालेली माणसं ही सगळी वर्षातून एकदा तरी आपल्या गावी जायला मिळावं म्हणून केवढी आसुसलेली असतात. त्यांचं गाव, त्या गावातला निसर्ग त्यांना बोलावत असतो. त्याची ओढ असते. आणि तिथे गेल्यावर काय होतं ? जणू जादू होते. शहरामध्ये दररोजच्या कामाने त्रासलेला तो जीव, तिथे गेल्यानंतर ताजातवाना होतो. जणू जादूची कांडी फिरते. काय विशेष असते त्या गावात असे ? पण ते विशेष त्यालाच माहिती असते, ज्याने तिथे आपले बालपण घालवलेले असते. कवी अनिल भारती यांची ‘ खेड्यामधले घर कौलारू ..’ ही रचना पहा. किती साधे आणि सोपे शब्द.. ! पण त्यातला गोडवा किती कमालीचा…! मालती पांडे यांनी गायीलेलं हे गीत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल.
आज अचानक एकाएकी
मानस तेथे लागे विहरू
खेड्यामधले घर कौलारू.
पूर्व दिशेला नदी वाहते
त्यात बालपण वाहत येते
उंबरठ्याशी येऊन मिळते
यौवन लागे उगा बावरू
माहेरची प्रेमळ माती
त्या मातीतून पिकते प्रीती
कणसावरची माणिक मोती
तिथे भिरभिरे स्मृती पाखरू
आयुष्याच्या पाऊलवाटा
किती तुडविल्या येता-जाता
परि आईची आठवण येता
मनी वादळे होती सुरु.
अगदी साधे सोपे शब्द. पण त्या शब्दात ताकद केवढी ! जणू तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जातात ते शब्द. शब्द आपल्याला वाटतात तेवढे साधे नसतात. त्यांना आठवणींचा गंध असतो. पहिल्या पावसाने माती ओली होते. एक अनामिक पण हवाहवासा वाटणारा गंध आपल्यापर्यंत पोहचवते. जसं आपण म्हणतो, फुलाला सुगंध मातीचा, तसाच मातीलाही स्वतःचा एक सुगंध असतो. तो सुगंध आणतात त्या पावसाच्या धारा. जसा मातीला गंध असतो, तसाच शब्दांनाही गंध असतो. आणि तो गंध अनेक आठवणी आपल्यासोबत घेऊन येतो.
वरच्या कवितेतलं दुसरं कडवं नदीशी संबंधित आहे. कुणीतरी असं म्हटलंय की ज्याच्या गावात नदी असते, त्याचं बालपण समृद्ध असतं . आणि ते खरंच आहे. नद्यांना केवढं मोठं स्थान आपल्या जीवनात आहे ! प्रत्येकाच्या गावातली नदी छोटी असेल किंवा मोठी, पण तिच्याशी त्याच्या अनेक आठवणी निगडित असतात. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची नुसती नावं घेतली तरी त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. कुठेतरी लग्नात गुरुजींनी म्हटलेले मंगलाष्टक आठवते. कुठे अलाहाबादचा त्रिवेणी संगम आठवतो. तसंही ज्याच्या त्याच्या गावातली नदी ही त्याच्यासाठी गंगेसारखीच पवित्र असते. जेव्हा लोक नासिकला जातात आणि गोदावरीत स्नान करतात, किंवा तिथे जाऊन येतात, तेव्हा मी गोदावरीवर गेलो होतो असं म्हणत नाहीत. मी गंगेवर गेलो होतो असंच म्हटलं जातं . ( उगवतीचे रंग – विश्वास देशपांडे )
या कवितेचं तिसरं कडवं बघा. गावाकडची ओढ का असते लोकांना ? तर ‘ माहेरची प्रेमळ माती..’ ही माती केवळ अन्नधान्य पिकवीत नाही. त्या मातीतून प्रीती म्हणजेच प्रेमही पिकतं. शेतातल्या कणसांना जे दाणे लागतात, ते माणिक मोत्यांसारखे मौल्यवान आहेत. आणि त्याच्याशी कवीच्या स्मृती निगडित आहेत. स्मृतींचं पाखरू जणू तिथं घिरट्या घालत असतं . आणि शेवटचं कडवं तर अप्रतिमच. आयुष्यात आपण सुख दुःखाच्या, संकटांच्या अनेक पाऊलवाटा तुडवतो. पण त्याचं फार काही वाटत नाही आपल्याला. पण जेव्हा आईची आठवण होते, मग ती आपली आई असो वा काळी आई म्हणजे शेती, तिची आठवण आली की मनात वादळे सुरु होतात. मन तिच्या आठवणीने आणि ओढीने बेचैन होते.
असा हा निसर्ग आपल्याला समृद्ध करीत असतो. त्याच्यात आणि आपल्यात एक अतूट नातं असतं . खरं म्हणजे आपणही निसर्गाचाच एक भाग असतो. पण आपलं अलीकडंच जीवनच असं काही झालं आहे, की ते नातं तुटायची वेळ जणू काही येते. आणि माणसाच्या जीवनातून निसर्ग वजा केला तर, काहीच शिल्लक राहणार नाही.
मला कधी कधी भीती वाटते ती पुढच्या पिढीची. जी शहरातून राहते आहे. आणि निसर्गाच्या या सुंदर वातावरणाला आणि अनुभवाला पारखी होते आहे. याचा बराचसा दोष आमच्याकडेही जातो. आम्ही लहानपणी जी नदी पाहिली , अनुभवली ती आता आम्ही आमच्या मुलांना, भावी पिढीला अनुभवायला देऊ शकू का ? आम्हाला जसा निसर्गाचा लळा लागला, तसा त्यांना लावता येईल का ? त्यांच्या चार भिंतीच्या पुस्तकी शिक्षणात निसर्ग शिक्षणाला स्थान असेल का ? पुस्तकातल्या माहितीवर जशी आम्ही त्यांची परीक्षा घेतो, तशी त्यांना निसर्गज्ञान, निसर्ग अनुभव देऊन घेता येईल का ? त्यांना जंगलं , प्राणी, पक्षी हे अनुभवायला देता येतील का ? मोबाईल, टीव्ही, सिनेमे, पुस्तके यांच्यापलीकडेही एक वेगळे जग अस्तित्वात आहे याची जाणीव आम्हाला त्यांना करून देता येईल का ? सध्या तरी या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. त्यासाठी वेगळे स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पर्यावरण दिवस, वसुंधरा दिन इ साजरे करून आपण आपल्या मनाचे समाधान फक्त करून घेऊ.
आज प्राजक्ताचं लग्न.. दोन्ही घरात आनंद आणि उत्साह अगदी भरभरून ओसंडून वहातोय
प्राजक्ता तिच्या मनापासून आवडलेल्या मित्राशी, शशांकशी आज लग्न करतेय. किती खुशीत आहेत हे दोघेही. खरं तर प्राजक्ता आणि शशांक एकाच शाळेत होते. दोघेही चांगले मित्र, एकाच गल्लीत बालपण गेलं त्यांचं. पण पुढे प्राजक्ताच्या वडिलांनी लांब फ्लॅट घेतला आणि मग तसा त्यांचा आता जुन्या घराशी संबंध राहिला नाही फारसा. शशांक सी ए झाला आणि एका मोठ्या कंपनीत त्याला छान जॉबही मिळाला. त्या दिवशी तो मित्रांबरोबर हॉटेल ध्ये गेला होता. समोरच्या टेबलजवळ बसलेली मुलगी त्याच्याकडे एकटक बघत होती.मग ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, “ तू शशांक का रे? मी प्राजक्ता. आठवतेय का ?सायकल शिकताना मला ढकलून दिलं होतंस ते? ” शशांक हसायला लागला. “ बाई ग,अजून तशीच आहेस का ग?भांडखोर?झिपरी?” दोघेही हसायला लागले. एकमेकांचे सेल नंबर घेतले आणि प्राजक्ता मैत्रिणीबरोबर निघून गेली. प्राजक्ता डेंटिस्ट झाली आणि तिने एका मैत्रिणीबरोबर क्लिनिक उघडले.. त्या दोघींना खूप छानच रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांचे क्लिनिक मस्तच चालायला लागले. दिवसभर प्राजक्ता अतिशय व्यस्त असायची आणि तिला बाकी काही करायला वेळच नसायचा. त्यादिवशी अचानकच शशांक तिच्या क्लिनिक वर आला.” हॅलो,प्राजक्ता, किती वेळ लागेल तुला फ्री व्हायला? “ ..
“ तरी अर्धा तास लागेलच..बसतोस का तोपर्यंत? “ प्राजक्ताने विचारलं. ‘ ओह येस ! ‘ म्हणत शशांक तिथेच टेकला.आत प्राजक्ताची पार्टनर राही काम करत होती. किती सुरेख होती राही दिसायला..
ती डेंटल चेअरवरून बाजूला झाल्यावर शशांकला दिसलं..राही एका पायाने लंगडत चालतेय.खूप नाही पण तिच्या पायात दोष दिसत होता. काम संपवून प्राजक्ता बाहेर आली .” बोल रे.काय म्हणतोस?”
“ काही नाही ग,म्हटलं वेळ असेल तर तुला डिनरला न्यावे.मस्त गप्पा मारुया ..मग मी पोचवीन तुला घरी.” ’प्राजक्ता हो म्हणाली आणि राहीला सांगून दोघेही बाहेर पडले. त्या दिवशीची डिनर डेट फार सुंदर झाली दोघांची. शशांक म्हणाला, “ तुला माझा धाकटा भाऊ माहीत आहे ना? सलील? फक्त दीड वर्षानेच लहान आहे माझ्याहून.आम्ही दोघेही लागोपाठ शिकलो .मी सीए झालो आणि सलील इंजिनीअर. सलील यूएसए ला एम.एस. करायला गेला तो गेलाच. खूप छान आहे तिकडे नोकरी त्याला.मी जाऊन आलोय ना तिकडे. मस्त घर घेतलंय आणि खूपच पैसे मिळवतोय तो. म्हणाला मला, तू येऊ शकतोस इथे. पण मलाच नाही तिकडे जाऊन सेटल व्हायची हौस. माझं काय वाईट चाललंय इथं? मस्त नोकरी आहे, मोठे पॅकेज आहे. मला फारशी हौस नाही परदेशात जाऊन कायम सेटल व्हायची. “
यावर प्राजक्ता म्हणाली, “ हो तेही बरोबरच आहे आणि इथे छानच चाललंय की तुझं.”
त्या दिवशी प्राजक्ताची आई म्हणाली,”अग रोज भेटताय,हिंडताय मग आता लग्न का करून टाकत नाही तुम्ही?ठरवा की काय ते. पण आता उशीर नका करू बर का.” .. प्राजक्ताने शशांकला त्या दिवशी भेटून आपली आई काय म्हणते ते सांगितले.शशांक म्हणाला, “ बरोबरच आहे की. सांग,कधी करायचं आपण लग्न?मी एका पायावर तयार आहे.”
प्राजक्ताचे आईबाबा शशांकच्या घरी जाऊन भेटले आणि लग्न ठरवूनच परतले. पुढच्याच महिन्यात थाटात साखरपुडा झाला आणि आज शशांक- प्राजक्ताचं लग्न सुमुहूर्तावर लागत होतं . लग्नासाठी खास रजा घेऊन अमेरिकेहून सलील मुद्दाम आला होता. सगळं घरदार अगदी आनंदात होतं. प्राजक्ताचं लग्न झालं आणि चार दिवसांनी शशांक आणि प्राजक्ता हनिमूनला आठ दिवस बँकॉकला जाऊन आले. सगळ्यांना तिकडून करून आणलेली खरेदी दाखवली, हसत खेळत जेवणं झाली आणि दुसऱ्या दिवशी शशांकचे ऑफिस होते. प्राजक्ता म्हणाली, “ मलाही क्लिनिकवर जायला हवं. बिचारी राही एकटी किती काम करणार ना? मीही उद्यापासून जायला लागते दवाखान्यात.’’
त्यादिवशी घरात कोणीच नव्हते. शशांक ऑफिसला गेला आणि काकाकाकू मुंबईला गेले होते. प्राजक्ता अंघोळ करून आली आणि तिला कल्पनाही नसताना अचानक सलील तिच्या बेडरूममध्ये काहीतरी विचारायला म्हणून आला. प्राजक्ता त्याला बघून गोंधळूनच गेली.टॉवेल गुंडाळूनच ती बाथरूम बाहेर आली होती.सलील तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघतच राहिला आणि त्याने तिला मिठी मारली. न कळत नको ते दोघांच्या हातून घडले. सलीलचा तो उत्कट स्पर्श, धसमुसळा राकट शृंगार प्राजक्ताला आवडून गेला.
“सॉरी प्राजक्ता मला माफ कर.पण मला फार आवडलीस तू.’” .. सलील तिथून निघून गेला. त्या रात्री शशांकचा नर्म मृदु शृंगार तिला नकोसा झाला. हे अतिशय चुकीचे घडतेय हे समजत असूनही सलील आणि प्राजक्ता स्वतःला थांबवू शकले नाहीत.. सलील आणि प्राजक्ता बाहेर भेटायला लागले कोणाच्याही नकळत. लग्नाला अजून महिनाही झाला नव्हता.सलीलची यूएसए ला जायची तारीख जवळ आली.त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर सगळे जमले असताना प्राजक्ता म्हणाली ”मला तुम्हा सगळ्यांशी महत्वाचं बोलायचंय. तुम्ही अत्यंत रागवाल हेही मला माहीत आहे. शशांक सॉरी. मी सलीलबरोबर अमेरिकेला जाणार आहे.मला इथे रहायचे नाही. मी तुला बिनशर्त घटस्फोट देईन. मला काही नको तुझ्याकडून. पण मी सलीलशी लग्न करणार तिकडे जाऊन. तुझा यात काहीही दोष नाही पण मला सलील योग्य जोडीदार वाटतो ”.सलील मान खाली घालून हे ऐकत होता. हे ऐकल्यावर सगळ्या कुटुंबावर तर बॉम्बस्फोटच झाला.
” अग काय बोलतेस तू हे?अग तुझं शशांकशी लव्ह मॅरेज झालंय ना? अर्थ समजतो ना त्याचा?आणि काय रे गधड्या सलील? वहिनी ना ही तुझी? कमाल झाली बाबा.आम्ही हताश झालो हे ऐकूनच. प्राजक्ता,अग नीट विचार कर.हे फक्त शरीराचे आकर्षण नाहीये, आणि ते खरेही नसते.नातिचरामि ही लग्नातली शपथ तुलाही बांधील नाही का?” सासूबाई कळवळून म्हणाल्या. सलील म्हणाला “सॉरी शशांक.पणआता आम्ही मागे फिरणार नाही. तुझ्याशी लग्न ही चूक झाली प्राजक्ताची. ती माझ्याबरोबरच येणार आणि आम्ही तिकडे लग्न करणार हे नक्की.” त्याच रात्री प्राजक्ताच्या आई वडिलांनाही बोलावून घेतले आणि हे सगळे सांगितले. ते तर हादरूनच गेले हे ऐकून.” अग कार्टे,हे काय चालवलं आहेस तू?काही जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगा की. या बिचाऱ्या शशांकचे काय चुकले ग? कमाल आहे खरंच. शशांक, आम्हीच तुझी माफी मागतो रे बाबा ! “ आईबाबा तळतळ करत बोलत होते. “ हे जर केलंस ना प्राजक्ता तर तू मेलीसच आम्हाला म्हणून समज.” बाबा उद्वेगाने म्हणाले. सलील आणि प्राजक्ता गप्प बसून सगळे ऐकून घेत होते. काहीही न बोलता प्राजक्ताने घर सोडले आणि ती सलील बरोबर हॉटेलमध्ये रहायला गेली.
सासूसासरे थक्क झाले, ‘ हे इतके यांनी ठरवलं कधी आणि पुढे काय होणार? ‘त्यांनी सलीलशी बोलणेच टाकले. त्यानी विचारलेही नाही की तू कधी परत जाणार आहेस. शशांक सुन्न होऊन गेला होता. काय तोंड दाखवणार होता तो जगाला? महिन्यांपूर्वी लग्न झालेली आपली बायको,जी आधी प्रेयसीही होती,ती आपल्या सख्ख्या भावाबरोबर अमेरिकेला निघून गेली? शशांकची झोपच उडाली. या मुलीने व्हिसा कधी केला,तिचे जायचे कधी ठरले काही काही पत्ता नव्हता कोणालाही. ठरल्या वेळी सलील प्राजक्ता निघून गेले अमेरिकेला ..
शशांक तर उध्वस्त व्हायचा शिल्लक राहिला. जगाच्या डोळ्यातली कीव सहानुभूती आश्चर्य त्याला सहन होईना.पण त्याने स्वतःला सावरले. त्या दिवशी तो आई बाबांना म्हणाला,”आई बस झालं. ती निघून गेली हा तिचा निर्णय होता. आपण का झुरत आणि जगापासून तोंड लपवत बसायचं?आपण काय पाप केलंय? तुम्हीही आता आपलं नेहमीचं आयुष्य जगायला लागा. मीही हे विसरून नवीन आयुष्य सुरू करीन, अगदी आजपासूनच. अग, यातूनही काहीतरी चांगलं घडेल आई! “ त्याचे समजूतदारपणाचे शब्द ऐकून गहिवरून आलं आईला. .. ” शशांक,बाळा,माणसाने इतकेही चांगले असू नये रे की आपलं हक्काचंही आपल्याला सोडून द्यावं लागावं! मला अभिमान वाटतो रे तुझा .माझीच दोन मुलं पण किती वेगळी निघावी?दैव तुझं, दुसरं काय ! बघायचं आता काय होईल ते. आपल्या हातात तरी दुसरं काय आहे.”
☆ “वळवाचा पाऊस असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
एप्रिल महिन्यातलं कडक ऊन.. पारा चढलेला ..अंगाची लाहीलाही..जोरात फॅन सुरू केला तरी उकडतच होत.
काही वेळानंतर थोडं थोडं वातावरण बदलायला लागलं. हळूहळू वारा वहायला लागला. अचानकच काळे ढग दिसायला लागले. अंधारून आल्यासारखं झालं .आता तर वाऱ्याचा जोर फारच वाढला. झाडांच्या फांद्या हलायला लागल्या. धप्प धप्प आवाज करत दोन नारळ पडले. एक झावळी पण सुसू आवाज करत पडली..
फांद्या पुढे पुढे येत होत्या ..
त्या पावसाला आनंदानी हसत हसत ” ये ये “म्हणत आहेत असंच मला वाटायला लागलं …
वातावरण बदलूनच गेलं …
आलाच पाऊस वळवाचा… कोसळायलाच लागला ..बराच वेळ धो धो पाऊस बरसला .
काही वेळातच आला तसा निघूनही गेला…….
वातावरण शांत झाले .पाणी रस्त्यावरून वहात होते .खिडकीतून मी बघत होते .
बाहेर पडायचा मोह झालाच ..गेले.. मुलं जमली होती .शेजारच्या बिल्डींग मधल्या आंब्याच्या झाडाच्या खाली खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या .पोरांना भलतीच मज्जा वाटत होती .मुलं कैऱ्या गोळा करायला लागली.
काही कैऱ्या फुटल्या होत्या, काही पाण्यात चिखलात पडल्या होत्या ,रस्त्यावर सोसायटीच्या झाडांमध्ये पडल्या होत्या.
मुलांना फार गंमत वाटत होती.
” मला मिळाली ” “मला पण सापडली”
” अरे ही एक बघ केवढी मोठी आहे “
पोरं ओरडतच होती. एकाने चार कैऱ्या मला दिल्या .आजूबाजूचे लोकही जमा झाले होते .त्यांनाही त्या मुलांनी कैऱ्या दिल्या .खूप धमाल चालली होती .गार हवा आता फार सुखकारक वाटत होती.
इतक्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये नुकतेच ते लोक राहायला आले होते .
पोरांनी दिलेल्या कैऱ्या तिच्या हातात होत्या. त्यांच्याकडे बघत ती उभी होती .डोळे भरून वाहत होते. जवळ जाऊन विचारलं ..
“काय झालं ग?”
तिचा चेहरा रडवेला झाला होता. ती म्हणाली …
“सासऱ्यांचा सकाळीच फोन आला होता .असाच पाऊस काल आमच्या शेतातही पडला म्हणे.आंब्याचं खूप नुकसान झालं आहे .पीकं तर पार आडवी झाली आहेत.”
आता तर तिचा बांधच फुटला .ती फारच जोरात रडायला लागली ….
मी नि:शब्द झाले ..काय बोलायचं याच्यावर ? सांत्वन तरी कसं करायचं? मला काही समजेना..
ती पुढे म्हणाली
” नको तेव्हा हा वळीव येतो आणि काही तासातच हाता तोंडाशी आलेला घास घेऊन जातो”
मी नुसती उभीच..
” नको मला या कैऱ्या “
असं म्हणून तिने त्या कैऱ्या माझ्या हातात दिल्या .आणि शेजारच्या जीन्यानी वर निघून गेली.
इतका वेळ मी वरवर झाडाकडे पाहत होते …
आता खाली बघितलं मगाशी ती पुढे येणारी फांदी कदाचीत पावसाला
” थांब थांब ” म्हणत असावी का?…
अस आता मला वाटायला लागलं…
प्राप्त परिस्थितीचा आम्हाला हवा तो अर्थ आम्ही काढतो. वास्तव वेगळं असतं का?
अर्धा किलो कैरी मंडईतून आणणारे आम्ही … तेवढाच आमचा संबंध..त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे दुःख आमच्यापर्यंत पोहोचतच नाही … हे आज स्पष्टपणे कळलं..
मोठ्या ब्रॅण्डेड दुकानात वस्तूची जी किंमत असेल ती आम्ही देतो. आणि भाजी घेताना मात्र दहा वीस रुपयांसाठी घासावीस करतो.
आज तिच्यामुळे थोडी तरी भावना मनात जागी झाली .
असाही एक वळवाचा पाऊस विचार करायला लावणारा..
खरं सांगू तेव्हापासून पूर्वी इतका वळीव आता आनंदाचा राहिलेला नाही .
असा पाऊस आला की आता आठवतो तो कष्ट करणारा शेतकरी
त्याच शेत ….
तिचा रडवेला चेहरा..
आणि खूप काही….
कधी आम्ही शहाणे होणार कोण जाणे… पण निश्चित विचार करूया आणि थोडं बदलूया…
☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-१☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
इसवी सनाचे सतरावे शतक. तो काळ ‘मोगलाई’चा. ‘दहशतवाद’, ‘असहिष्णुता’ हे शब्द एखादवेळेस त्या काळातील शब्दकोषात देखिल नसतील, पण सामान्य मनुष्य ‘याचि देही याचि डोळा’ ते अनुभवत होता. सुलतानी आणि अस्मानी संकट एकाच वेळेला महाराष्ट्रावर आणि एकूणच भारतावर घिरट्या घालीत होते. ‘स्वधर्म’ नावाचा काही धर्म असतो आणि तो प्राणपणाने जगायचा, जपायचा असतो हे सांगण्याचे धाडस करण्याची तयारी देखील त्या काळात फार कमी लोकांची होती. एखादया भरलेल्या शेतात टोळधाड यावी आणि काही क्षणांत ते शेत फस्त करून टाकावे, अगदी अशाच पद्धतीने मोगल आणि इतर आक्रमक गावावर हल्ला करायचे आणि सोन नाणं लुटून न्यायाचेच, पण गावातील लेकीबाळी एकतर पळवून न्यायचे किंवा ‘नासवून’ टाकायचे. जनतेनं दाद मागायची कोणाकडे? कारण हिंदूंना राजा नव्हताच. काही सरदार होते, पण तेही बादशहाचे मांडलिक. त्यामुळे तेही वतने टिकविण्यासाठी आपल्याच लोकांशी भांडत होते. ब्राह्मण आपल्या कर्मकांडात गुंतले होते, क्षत्रिय तत्कालीन राज्य व्यवस्थेचे मांडलिक झाले होते. वैश्य जीव मुठीत धरून व्यापार करीत होते आणि तथाकथित शूद्र आपापले जीवन कसेतरी जगत होते. काहीही करून फक्त जीव वाचविणे हाच हाच त्याकाळातील जगण्याचा मूलमंत्र झाला होता. या सगळ्याचे वर्णन करण्यासाठी एकच सुयोग्य शब्द आहे ‘मोगलाई’
इसवीसनाच्या तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यात प्राण ओतण्याचे, त्याच्यातील ‘स्व’त्व जागृत करण्याचे कार्य चालू केले. त्या काळात समाजातील सात्विकता जवळ जवळ नष्ट होत चालली होती. चांगुल्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उरला नव्हता. त्याकाळात मनुष्याचा चांगुलपणा वरील विश्वास निर्माण करणे आणि तो टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे होते. सर्व संतांनी अगदी तेच केले. दुष्काळ पडला तर शेतकरी सर्वप्रथम आपले बियाणे सुरक्षित ठेवतो याच सुत्राप्रमाणे माऊलींनी आणि नंतर तत्कालीन संतांनी समाजातील सात्विकतेच्या बीजाचे संरक्षण आणि संवर्धन केले. माऊलींचा हरिपाठ, संत एकनाथांचे भारूड आणि इतर संताचे अभंग यामुळे समाजमन भक्तिरसात न्हाऊन निघत होते आणि ईश्वराच्या, नामाच्या सान्निध्याने मनुष्यातील सत्वगुण वृद्धीगंत व्हायला बळ मिळत होते. मनुष्याच मन विकसित करणे, हे फार अवघड काम. त्याहून अवघड म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत करून त्यास विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत करून राष्ट्रकार्य, समाजकार्य करण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे काम हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखे. माणूस जिवंत ठेऊन जुनं म्हणजे सडलेले हृदय बदलून तिथे नवीन हृदयाचे रोपण करायचे. खरे हृदय बदलणे त्यामानाने एकवेळ सोपे म्हणता येईल, पण मनुष्याचे विचार समूळ बदलणे हे गोवर्धन पर्वत उचलण्यापेक्षा महाकठीण. पण आपल्याकडील संत मंडळी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांनी ही सर्व शस्त्रक्रिया बेमालुमपणे आणि निष्णात तंत्रज्ञाप्रमाणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया झाल्याचे सामान्य मनुष्याला कळलेदेखील नाही, पण त्याचा ‘रोग’ मात्र बरा होण्यास निश्चित मदत झाली असे खात्रीने म्हणता येईल.
(संदर्भ:- अभंग क्रमांक १०१४ सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था) म्हणतात ते उगीच नव्हे!
मराठवाड्यातील जांब गावातील एका घरात एका मुलाचा जन्म झाला. अर्थात मुलाचा जन्म होणे ही तशी सामान्य घटना. पण त्याच मुलाने पुढील काळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपले आपल्या गावाचे, प्रांताचे नव्हे तर देशाचे नाव जगप्रसिद्ध केले, इतकेच नव्हे तर आज चारशे वर्षांनंतरही ते नाव एक दीपस्तंभ बनून आजच्या पिढीला मार्गदर्शन करीत आहे. माझ्यासारख्या एका अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास त्यांच्या चरित्राचे स्मरण करावेसे वाटते, त्याचे कर्तृत्व पुन्हा एकदा समाजाला सांगावेसे वाटते, यातच त्यांच्या अलौकिक आणि अपौरुषेय कार्याचे महात्म्य दडले आहे.
घरात अनेक पिढ्या चालत आलेली रामभक्ती !! मोठे बंधु त्यामानाने ज्येष्ठच. त्यामुळे हा बाळ आपल्या बालमित्रमंडळीत जास्त रमायचा. सुरपारंब्या आणि इतर तत्कालीन खेळ हे वेळ घालविण्याचे साधन. थोडा मोठा झाल्यानंतर मात्र सूर्यनमस्कार, पोहणे अशा गोष्टीत त्यास रस वाटू लागला. एकीकडे रामभक्ती चालू होतीच. आठव्या वर्षी मुंज झाली आणि अचानक वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनाचा बाळाच्या मनावर खोल परिणाम झाला. बाळ अंतर्मुख झाला. त्याचवेळेस गावात टोळधाड आली, समाजाची विदारक परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि या अंतर्मुखतेस एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.
“धर्माच्या करिता आम्हांस जगती रामाने धाडियले।”
रामकार्य करण्याचे ठरले आणि हनुमंत त्यांचा आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र झाला. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हनुमंताला आपल्या सोबत ठेवले. प्रत्येक गोष्ट हनुमंताला साक्षी ठेऊन आणि समर्पण करून केली. आयुष्यात परमेश्वरावरील अतूट श्रद्धा आणि शुद्ध साक्षीभाव किती काम करतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण !! आयुष्याचे ध्येय ठरले, निश्चय दृढ झाला, आता कृती !! सामान्य मनुष्याचे असामान्य संकल्प आईच्या अश्रूत वाहून जातात असा आपल्याकडील अनेक लोकांचा अनुभव आहे. ‘हुंडा मला नकोय पण आईसाठी घेतोय’, मला काही नकोय मात्र आईची इच्छा मोडवत नाही’, आई हो म्हणाली असती तर मी सैन्यात भरती झालो असतो, अशी ‘कारणे’ देणारी मंडळी आज देखील आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. पण याचे ध्येय पक्के होते, विशाल होते. ध्येय ‘रामराज्य’ प्रत्यक्षात आणण्याचे होते. हिंदूंना स्वतःचे सार्वभौम सिंहासन मिळावे, हिंदूसमाज जिंकू शकतो, हिंदू मनुष्य सार्वभौम राजा होऊ शकतो, इतकेच नव्हे हिंदू राजे जिंकलेल्या राज्याचा विस्तार करु शकतात, हिंदू ‘राज्य’ करु शकतात, हिंदू कारखाने चालवू शकतात, व्यापार करू शकतात, समुद्रावर सत्ता गाजवू शकतात, गडकिल्ले बांधू शकतात, शेती विकसित करू शकतात, हे दाखवून देण्याचा निश्चय झाला होता, आता हा संकल्प फक्त प्रत्यक्षात आणायचा होता. एका वाक्यात सांगायचे तर *सामान्य मनुष्यात ‘राष्ट्रभक्ती’, ‘राष्ट्रीय दृष्टीकोन’ राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे काम करायचे होते.
जगात कोणतीही गोष्ट दोनदा घडते. एकदा कोणाच्या तरी मनात आणि नंतर प्रत्यक्षात! हा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने संसारात रमणे सोयीचे नव्हते, म्हणून आईच्या शब्दांसाठी बोहल्यावर चढलेला हा मुलगा, “शुभमंगल सावधान….” ऐकताच ‘सावधान’ झाला आणि गोरजमुहूर्ताचा फायदा घेऊन बोहल्यावरून पळून गेला. त्याला पारंपरिक संसारात न अडकता विश्वाचा संसार करायचा होता. “चिंता करतो विश्वाची”, असा विचार करणाऱ्या मुलाला ‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.
बैठकीत विश्वास मिळतो तर माजघरात आपुलकी. स्वैपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !
तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते.
खरंच वास्तुदेवते, या सगळ्यांमुळे तुझी ओढ लागते.
तुझी शिकवण तरी किती बहुअंगी! खिडकी म्हणते, ‘दूरवर बघायला शिक.’
दार म्हणतं, ‘येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर.’
भिंती म्हणतात, ‘मलाही कान आहेत. परनिंदा करू नकोस.’
छत म्हणतं, ‘माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर.’
जमीन म्हणते, ‘कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत.’
तर बाहेरचं कौलारू छप्पर सांगतं, ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे की बाहेर शोभा दिसेल आणि आत ऊन, वारा लागणार नाही.’
इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि
निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस. इतकं मोठं मन आमचंही व्हावं, असा आशीर्वाद दे.
तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात, याचं खरंच वाईट वाटतं.
एकत्र कुटुंबपद्धतीकडून एकल कुटुंबपद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही, पण तरीही शेवटी ‘घर देता का कोणी घर’ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे !
कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाही, ते घर नसतं. बांधकाम असतं रे विटा मातीचं!
पण एक मात्र छान झाले की लॉकडाऊनमुळे ज्या सामान्य माणसाने तुला उभारण्यासाठी जिवाचे रान रान केले ना, त्याला तू घरात डांबून, घर काय चीज असते,ते मनसोक्त उपभोगायला लावलेस रे.
खरंच. हा अमूलाग्र बदल कोणीच विसरणार नाही रे.
वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची, ‘शुभ बोलावं नेहमी. आपल्या बोलण्याला वास्तुपुरुष नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असतो.’
मग आज इतकंच म्हणतो की, ‘तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं,मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट एकत्र वास्तव्यास येऊ देत.’
आणि या माझ्या मागण्याला तू ‘तथास्तु’ असंच म्हण, हा माझा आग्रह आहे .
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा ‘हद‘। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 141 ☆
☆ लघुकथा – हद ?☆ डॉ. ऋचा शर्मा ☆
मीता ने तेजी से काम निपटाते हुए पति से कहा – ‘रवि ! तुम्हारे फोन पर यह किसके मैसेज आते हैं ? कई दिनों से देख रही हूँ तुम रोज मैसेज पढ़कर हटा देते हो।‘
‘मेरे साथ ऑफिस में काम करती है मारिया। बेचारी अकेली है, तलाक हो गया है बच्चे भी नहीं हैं। उसकी मदद करता रहता हूँ बस।‘
‘पक्का और कुछ नहीं ना?’
‘नहीं यार, बहुत शक्की औरत हो तुम।‘
‘पर उसके मैसेज हटा क्यों देते हो ?’
‘यूँ ही, अपने सुख दुख की बात करती रहती है बेचारी। तुम तो जानती हो मेरा स्वभाव, मदद करता रहता हूँ सबकी।‘
‘मेरे ऑफिस में भी हैं एक मिस्टर वर्मा, बेचारे अकेले हैं। मैं भी उनकी मदद कर दिया करूंगी।’
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “आ पहुँचा था एक अकिंचन…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
हमारे आचरण का निर्धारण कर्मों के द्वारा होता है । यदि उपयोगी कार्यशैली है तो हमेशा सबके चहेते बनकर लोकप्रिय बनें रहेंगे । रिश्तों में जब लाभ -हानि की घुसपैठ हो जाती है तो कटुता घर कर लेती है । अपने आप को सहज बना कर रखने की कला हो जिससे लोगों को असुविधा न हो और जीवन मूल्य सुरक्षित रह सकें । ये तो आदर्श स्थिति है किंतु जमीनी स्तर पर ऐसा व्यवहार अब कठिन होता जा रहा है । कहने को तो नारी शक्ति संवर्द्धन पर विचार – विमर्श के सैकड़ों सत्र किए जा चुके हैं पर सही समय पर सही निर्णय लेने में जिम्मेदार लोग चूक जाते हैं । कारण साफ है कि बहुत से ऐसे बिंदु होते हैं जहाँ पर घेर का पीड़ित को ही कसूरवार ठहरा दिया जाता है ।
एक तो बड़ी मुश्किल से कोई हिम्मत जुटा पाता है उस पर इतनी जिरह कि कुछ दिनों बाद उसे अहसास होता है कि ऐसा निर्णय करके उसने अपनी मुसीबतें और बढ़ा ली है । ये सच है कि जुल्म के खिलाफ आवाज़ उठाना कोई सहज बात नहीं है लेकिन किसी न किसी को तो हिम्मत दिखानी होगी जिससे समाज की सोच को बदला जा सके । लोग जब जागरूक होने लगेंगे तो निश्चित ही अपराधी को सही समय पर उचित दण्ड मिलेगा जिससे दूसरे भी इस तरह की गलती करने से पहले सौ बार सोचेंगे ।
भाव विभोरक हिय हर्षाती
मन भावन सी नार ।
पावन गंगा पावन यमुना
पावन सी जलधार ।।
जलधार में पत्थरों को चीर कर राह बनाने की शक्ति होती है । जहाँ जल जीवन देता है वहीं धरती को तृप्त कर अन्न से पूरित करता है ।बिजली की शक्ति को धार कर असम्भव को सम्भव करने वाली कभी असहाय नहीं हो सकती ।
अब समय है सामाजिक जनचेतना का जो सत्यम शिवम सुंदरम के अर्द्ध नारीश्वर रूप को जाग्रत कर सतत सत्य के मार्ग का वरण करे ।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक
श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈