हे वाचूनच छान वाटते.काही जण म्हणतील की आनंदी मन असेल तर शांत झोप लागेल.आणि काहींचे म्हणणे असेल शांत झोप लागली तर मन आनंदी होईल.थोडक्यात या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.
प्रथम आपण शांत झोप लागण्या साठी काय करायचे ते बघू.
यात काही भौतिक ( शारीरिक व्याधी व बाह्य ) व काही मानसिक कारणे असतात.
बाह्य कारणे आपणच निर्माण करतो. त्या साठी पुढील उपाय करावेत.
१) झोपण्या पूर्वी किमान ३ तास आधी जेवावे.
२) जेवल्यावर शतपावली करावी
३) झोपण्या पूर्वी २ तास टीव्ही,मोबाईल अशी साधने दूर ठेवावीत.
४) झोपण्या पूर्वी १ तास आधी एखादे पुस्तक वाचावे/नामस्मरण करावे/ मंद संगीत ऐकावे.
मानसिक कारणे
🔹 भूतकाळातील कटू आठवणी
🔹 आपल्या चुका
🔹 ईर्षा, राग, वाईट विचार, हतबलता, जबाबदाऱ्या
हे सगळे विचार झोपताना येतात आणि झोप येत नाही.
या साठी पुढील गोष्टी करता येतील.
शांत झोप येण्यासाठी हे करू शकतो.
१) सकाळी मेडिटेशन करणे.
२) दिवसात आवश्यक तेव्हा व्हाईट लाईट घेणे.
३) दीर्घ श्वसन करायचे.
झोपताना म्हणायचे, मी एक महान, पवित्र आत्मा आहे. मला शांत व गाढ झोप लागली आहे. या मुळे मनाला तशी आज्ञा मिळते.
४) असे डोळ्या समोर आणायचे, माझ्या हृदयातून शांती व प्रेमाची किरणे बाहेर पडून ती मेंदूत जात आहेत. आणि तिथे खूप शांती अनुभवत आहे.
हे केल्यामुळे
शांत झोप लागते
कमी वेळेत झोप पूर्ण होते.
सकाळी गजर न लावता जाग येते.
उत्साही व प्रसन्न वाटते.
♦️ या मुळे दिवसाची सुरवात प्रसन्न चित्ताने व आनंदाने होते.
या उपयामुळे जो आपला मूळ विषय आहे, शांत झोप आनंदी मन साध्य करू शकतो.
(किती अल्प संतुष्ट आहे ग हं विशाल. नुसता स्वभाव चांगला असून काय उपयोग? महत्वाकांक्षा नको का काही ?” ) इथून पुढे —-
“ बरं वैदेही, ते जाऊ दे आता. किती पैसे लागतील ते सांग मला. मी चेक देते तेवढ्या रकमेचा “ .वैदेही आणि ऋचाला रडू आलं. आपल्याला वाटलं तशी आजी कठोर आणि आपमतलबी नाही हे ऋचाला समजलं. “ किती व्यवहारी आहे आपली आई ! तिचं ऐकलं असतं तर आपणही ताई माई सारखे पैसा गाठीला लावून राहिलो असतो.” वैदेहीला ऋचाचं लग्न केवळ आईच्या मदतीमुळे चांगलं करता आलं. ऋचाला छान नेकलेस, व्याह्यांचे मानपान, सगळं हौसेने करता आलं.
ऋचा सासरी जाताना आजी सांगायला विसरली नाही, “ ऋचा, बाईला आपली आयडेंटिटी जपता आली पाहिजे बरं ! तुझी नोकरी तू काहीही झालं तरी सोडू नकोस. तुझ्या आईची फरपट कायम लक्षात ठेव. इतकी गुणी आणि हुशार माझी वैदेही, पण बघ ना, एक चुकीचा निर्णय आणि जन्मभर पश्चाताप आला बघ नशिबाला. माझा जीव तुटतो तिच्यासाठी ! तुझ्या दोन्ही मावश्या पण लबाड आहेत बरं का ग! जपूनच अस हो त्यांच्यापासून !”
ऋचा हसली आणि आजीला मिठी मारून म्हणाली,”आज्जी, कित्ती ग हुशार होतीस तू ! अशीच आहेस का ग पहिल्यापासून?” आजी हसली आणि म्हणाली, “नको का अशीच मी ऋचा? तुझे आजोबा भोळे सांब ! मी खमकी होते म्हणून नीट संसार केला बरं ! अग, संसाराला बाई चतुर धोरणी हुशार लागते बाळा! कायम लक्षात ठेव !अग पैसा असेल तरच सगळं खरं बरं ! नाहीतर सगळे गुण मातीमोल होतात. कायम लक्षात ठेवा. आणि ए रोहित ठोंब्या,तू सुद्धा !” रोहितने आजीला उंच उचलले आणि गरगर फिरवले. “ अरे हे काय मेल्या, मरेन ना मी !”– “ छे ग आजी,अजून मी डॉक्टर कुठे झालोय? मी डॉक्टर झालो की मग मरायचं ! आत्ता नाही !” – “ बाई गं वैदेही,अफाट आहे बरं पोरगं तुझं.” आजी खुदुखुदु हसत आत गेली.
ऋचा सासरी गेली आणि वैदेहीला घर सुनंसुनं झालं. आईला म्हणाली, “आई यावेळी नको ना जाऊ माईकडे ! थांब माझ्याजवळ ! मला माहीत आहे, तिकडे तुझी आबाळच होते, पण तू बोलत नाहीस. दोघींकडे सुना मुलं नातवंडे असा धबडगा असतो. मला समजतं ग ! माझी जागा मोठी असती तर मी कायम तुला संभाळले असते बघ !” आई उदास झाली. म्हणाली, “चालायचंच वैदेही ! त्यानाही करू दे जरा आईची सेवा !तरी मी तुझ्याचकडे राहते जास्त, आणि ते पथ्यावरच पडलंय त्यांच्या ! यावेळी राहीन बाळा, पण दरवेळी नको आग्रह करू हं !” दोघींचे डोळे भरून आले. आजी खूप थकली आणि मग मात्र ती जास्त जास्त वैदेहीकडे राहू लागली. ताई माई लहर लागली तर फिरकत,, नाही तर येतही नसत. रोहित सुंदर मार्क मिळवून डॉक्टर झाला आणि त्याला हवी तशी सर्जरीला ऍडमिशन मिळाली आजीला अतिशय आनंद झाला.आजी म्हणाली,” रोहित, माझं एक काम करशील? आपल्या नगरकर वकिलांचा मुलगा वकील झालाय ना? त्याला बोलावून आण.उद्याच.” रोहितने वकिलांना बोलावून आणले. आतल्या खोलीत बराच वेळ चर्चा चालली होती, पण ती कोणीच ऐकली नाही. दुसऱ्या दिवशी नगरकर वकील गाडी घेऊन आले आणि आजींचे मृत्युपत्र रजिस्टर झाले सुद्धा ! आजींना फार समाधान झाले. ” रोहित, मला वचन दे.तू वैदेहीला नीट संभाळशील. कधीही अंतर देणार नाहीस “ .. .” नाही ग आजी, मी असं कसं करेन? मी आईला कायम संभाळणारच ! आणि तुला सुद्धा ! माझं लग्न नाही का बघणार तू?” रोहित लाजला. “ अरे लबाडा ! आत्ता सांगतोस होय? ये बघू घेऊन तिला उद्या !”
दुसऱ्याच दिवशी रुचिराला घेऊन रोहित घरी आला. “आजी, ही बघ तुझी नातसून ! अगदी ढ आहे, काहीही येत नाही स्वयंपाक ! नुसतीच आहे डॉक्टर ! तूच शिकव हं हिला सगळं ! “ रुचिरा हसत होती. “आजी, मला सगळं येतं हो !काहीही सांगतो हा गाढव !”— “आजी, सर्जन नवऱ्याला गाढव म्हणत का ग तुमच्या वेळी?” सगळे हसण्यात सामील झाले.
वैदेहीला,आजीला ही गोड रुचिरा अतिशय आवडली. त्याच रात्री, काहीही हासभास नसताना आजी झोपेतच गेल्या. रोहितला अतिशय वाईट वाटले. त्याची आजी म्हणजे तर त्याची जिवाभावाची मैत्रीण– ती गेली ! पण सगळ्यानी समजूत घातली, “अरे किती जगायचे रे त्यांनी ! चौऱ्याण्णव हे काय कमी झालं का वय? सगळं बघितलं त्यांनी !अगदी नातसून सुद्धा !आणखी काय हवं रोहित? झोपेत किती छान शांत मृत्यू आला त्यांना !”
दिवस कार्य झाल्यावर नगरकर वकील आले. “ सगळ्याना बोलावून घ्या,आजीचं मृत्युपत्र वाचायचं आहे तुमच्या समोर ! “— ‘आईनं मृत्युपत्र केलं होतं? आम्हाला नाही बोलली काही कधी !’ ताई माई म्हणाल्या. अतुलही अमेरिकेतून आला होता.
नगरकर वकीलानी सगळ्यांसमोर मृत्युपत्र उघडले. मृत्यूपूर्वी आठच दिवस आजीने रजिस्टर्ड मृत्युपत्र केले होते. आजींनी त्यात लिहिले होते,— “ माझा जुना वाडा रोहितला द्यावा. तिथे त्याने हॉस्पिटल काढावे. हवे तर पाडून नवीन हवी तशी इमारत बांधावी. आमच्या वास्तूचा असा सदुपयोग दुसरा कशाने होणार? माझ्या ताई माईना मी माझ्या फिक्स डिपॉझिट रिसीट निम्म्या निम्म्या देऊ इच्छिते. माझा दुसरा फ्लॅट वैदेहीला देण्यात यावा. माझे दागिने अतुलला मिळावेत. तसाही त्याला पैशाचा, घराचा उपयोग नाही. आणि माझी सगळ्यात जास्त सेवा वैदेहीने निरपेक्षपणे केली आहे, म्हणून तिला माझा फ्लॅट मी देतेय. बाकी माझे आशीर्वाद तर कायम तुम्हाला आहेतच. विल वाचून संपले. .सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. अतुल म्हणाला, “ हे काय असलं विल ! मी एकुलता एक मुलगा !माझा हक्कच आहे दोन्ही घरांवर !” ताईमाई म्हणाल्या, “ हे काय आईचं वागणं !आम्ही काही कमी नाही केलं आईचं ! या रोहितला सगळा वाडा ! आणि वैदेहीला फ्लॅट पण ! आम्हाला हे मान्य नाही.”
नगरकर हसायला लागले. तुमच्या मान्य-अमान्यचा प्रश्नच येत नाही. आजींनी हे सगळं ओळखून रजिस्टर विल केलंय. त्यात कोणालाच बदल करता येणार नाहीत. तुम्हालाही पुष्कळ पैसे मिळाले आहेत. आजींच्या एफ डी मला माहीत आहेत किती रकमेच्या आहेत ते ! अतुलराव, उगीच वाकड्यात शिरू नका. किती वेळा आलात हो गेल्या पाच वर्षात आईकडे बघायला, भेटायला ? कधी तिला अमेरिकेला चल, असं तरी म्हणालात का ? मिळालंय तेही खूप आहे. कमी नाहीये. आजी हुशारच होत्या. मला जास्त तोंड उघडायला लावूच नका. मी, माझे बाबा असल्यापासून तुमच्या घरी येतोय. तुमच्या वडिलांचे वकील होते माझे बाबा. मी ओळखतो सर्व मंडळींना ! आजींनी फार विचारपूर्वक छान, आणि कोणत्याही कायदेशीर त्रुटी न ठेवता विल केलंय. तुम्हाला माहीत नसणार म्हणून सांगतो, त्यांनी लिव्हिंग विल पण केलेय. म्हणजे, त्यांना वेळ आलीच तर कोणत्याही कृत्रिम उपायांनी जगवू नये, व्हेंटिलेटरवर अजिबात ठेवू नये असे ! नेत्रदान करावे. ते तर आपल्या रोहितने केलेच म्हणा ! किती हुशार होत्या आजी बघा. त्यांच्या अंतिम इच्छेला मान देणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कोणालाही काहीही कमी मिळालं नाही आणि असलं तर ज्याने त्याने त्यांनी असं का केलं ते समजून घ्यावे ! माझी जबाबदारी सम्पली.” — नगरकर वकील निघून गेले.
चेहरे पाडून ताईमाई आणि अतुल, तिथून चहासुद्धा न घेता निघून गेले. पैसा माणसात वाकडेपणा आणतो हे वैदेहीला पुन्हा एकदा समजले. तिला अतिशय वाईट वाटले. रोहित म्हणाला,”आई, तू का वाईट वाटून घेतेस? आजीला माणसांची चांगलीच पारख होती. आला वाईटपणा तर येऊ देत. तू शांत रहा आणि आजीच्या इच्छेला आपण मान देऊया. तू किंवा मी, काहीही मागायला गेलो नव्हतो आजीकडे ग ! आपल्याला तिचे विल माहीत तरी होते का? नाही ना? मग बस झाले.” रोहितने आईची समजूत घातली आणि तो रुचिराला फोन करायला वळला.
– समाप्त –
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तपासणी झाली. नवऱ्याला आत बोलवायला सांगितलं. दहा बारा महिन्याचं बाळ अगदी काळजीपूर्वक सांभाळत तो आत आला.
खूपदा दिसणारं हे चित्र. कुटुंबनियोजनाची काळजी घेण्यात अजूनही बरीच जनता उदासीन असते. काही हजार मोजले की मोकळं ! हा सोप्पा पण चुकीचा समज.
“अडीच महिने झालेत.”
“हो, पाडायचं.”
“आधी काळजी घ्यायची की मग.”
“ ….”
“आधीचं काय?”
“मोठा मुलगा पाच वर्षांचा, अन् ही मुलगी दहा महिन्यांची !”
“ॲापरेशन करून टाकायचं असतं… किमान लवकर तरी यायचं, मोठा गर्भ पाडायचा म्हणजे तिला त्रास होणारच की !”
“आम्हाला ठेवायचंच होतं, म्हणून इतकं लांबलं.”
“इतकं लहान बाळ असून ठेवायचं होतं?” आता आईच्या कडेवर विसावलेल्या गुटगुटीत मुलीकडे पहात विचारलं.
“हे भावाचं आहे. भाऊ चार महिन्यांपूर्वी ॲक्सिडेंटमधे गेला. त्याची बायको दोन महिन्यापूर्वी बाळाला टाकून गेली, त्यामुळे हे आता आमचंच. म्हणून आता तिसरं नको.” नवरा बाळाच्या केसात हात फिरवत म्हणाला.
“आताचा भावनेच्या भरात केलेला विचार कायम राहील का नंतरही?” सर्वसाधारण प्रश्न आणि शंका!
“विचार बदलू नये अन् बारकीवर अन्याय होऊ नये म्हणूनच हे पाडायचं अन् लगेच ॲापरेशन करायचंय. कारण तीन तीन लेकरं पोसण्याइतकी ऐपत नाही आमची.” तिचं पोरीचा गालगुच्चा घेत ठाम उत्तर !
आपल्या आजूबाजूलाच कितीतरी अगदी साधीसुधी दिसणारी, पण खूप मोठ्या उंचीवरची माणसं आपल्याला पहायला मिळतात ! देव फक्त मंदिरातच विराजमान असतो असं थोडंच आहे !! देवत्व असं कितीतरी लोकांच्या मनात आणि वागणुकीतही दिसतं कधीकधी आणि आपल्या मनाचं मोरपीस करतं !!!
लेखिका : सुश्री रश्मी लाहोटी
प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १ ते ७ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा १ ते ७
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या सात ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
आज अनिताकडे पार्टी आहे . तिच्या आणि अजयच्या ओळखीच्या पाच फॅमिलीज् येणार आहेत . त्यामुळे सकाळपासून तयारी सुरू आहे .
पहिल्यांदाच सर्वांना घरी बोलविण्याचा बेत तिने ठरविला . नाहीतर महिन्यातून एकदा सर्व मित्र बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. गप्पा टप्पा मारतात , आणि रिचार्ज होऊन घरी येतात . हॉटेल असेच शोधतात जेथे मुलांना मस्ती करायला भरपूर जागा असेल.••••
या सर्व कार्यक्रमात आजी-आजोबा घरीच राहतात , त्यांना रात्रीचे बाहेर जाणं , उशीरा जेवणं तेवढं झेपत नाही .. यावेळेस अनिता-अजयने घरीच बोलविण्याचा प्लान ठरविला. ज्या परिवारात आजी आजोबा आहेत त्यांनाही आमंत्रण दिले .
सर्वांच्या सोयीनुसार दुपारच्या जेवणाचा बेत ठरविला. आपल्या मनोरंजनाची पद्धत थोडी बदलावी ,असं तिच्या मनात होतं .
घरचे जेष्ठ ,Retired from work जरी असले तरी They are not retired from fun,
असं तिचं मत आहे . नेहमी आपण बाहेर जातो ,ते काहीही तक्रार न करता घरी राहतात . येताना आपण त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम आणले, तरी अगदी आनंदाने ते त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात .
त्यांचे बाहेर जाणं कमी झालेलं आहे . बदल, change प्रत्येकाला आवडतोच .
आपण आपल्या पद्धतीत थोडा बदल केला तर त्यांना पण आपल्यात सामावून घेता येईल .हा विचार अनिताच्या मनात होताच.
खरंतर दोन चार दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं हा बदल करण्याचा विचार तिच्या मनात आलेला अजून दृढ झाला.
परवा आजोबांचे चार मित्र त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून घरी आले, तर अनिताच्या मुलीने म्हणजे प्रियाने खाडकन आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला . हे अस वागणं बरोबर नाही. खरंतर पंधरा वर्षांच्या प्रियाने सर्व आजोबांना हसून नमस्कार करणे आणि त्यांना पाणी आणून देणे एवढ करणं तरी नक्कीच अपेक्षित होतं .
बरं ! आजच्या मुलांना लेक्चर देऊन चालत नाही .ऐकतील की अजून बिथरतील सांगता येत नाही .
मुलांना आपल्यापेक्षा लहान मोठे सर्वांबरोबर व्यवस्थित वागता आलं पाहिजे . थोडं बहुत काम करायची सवयही असलीच पाहिजे. आज समोर दिसणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .
तेव्हा घरी गेटटूगेदर करायचे तिने ठरविले .
जेव्हा तिने हा विचार आपल्या मैत्रिणींमध्ये मांडला ,तेव्हा सगळ्यांना तो एकदम पटला असं झालं नाही . वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या .•••••
“अग ! ते खूप बोलतात . आपल्याला फ्रीली बोलता येणार नाही .” “त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागते . आपला अर्धा वेळ त्यातच जाईल .” “मग रोजच्या सारखंच होणार ना , बदल कुठे झाला ?” “त्यांना लवकर जेवायचे असते . रात्रीचे झेपत नाही” वगैरे वगैरे .
अनिता म्हणाली “अग! आपण थोडा बदल करून तर बघू . माझ्या घरी सुरुवात करू .अग! जमेल सर्व .मी करते तयारी . त्यांना ही बरं वाटेल . मुलांनाही मदतीला घेऊ.”
रश्मी कशीबशी या प्लॅनसाठी तयार झाली.
आज देशपांडे आजी आजोबा , कुलकर्णी आजी आजोबा ,जाधव आजोबा, आणि देशमुख आजी आनंदात होते .आणि आश्चर्य चकितही होते.
मुलांबरोबर लग्नाला जाणे , एखाद्या कार्यक्रमात जाणे, यांची त्यांना सवय आहे. पण मुलांबरोबर त्यांच्या मित्रांच्या पार्टीला जायचे होते . उत्साह तर होता, बरोबर थोडं टेंशन ही होतं.
पार्टी छान झाली . सर्वांनी enjoy केलं . लहान मुलांनी खूप धमाल केली. बरोबर त्यांची मदतही झाली .आजी आजोबांकडे लक्ष द्यायचे काम त्यांनी छान केले .
सिनीयर्सची आपापसात छान ओळख झाली . गप्पा झाल्या .यंग जनरेशनच्या मनसोक्त गप्पा रंगल्या . हॉटेलपेक्षा हे option छान आहे . छान हातपाय पसरून गप्पा मारता येतात, हे सर्वांना पटलं .
फॅमिली गेटटूगेदर छान रंगलं.
दुपारच्या चहानंतर अंताक्षरीचा कार्यक्रम झाला. तरुण वर्ग, बच्चा पार्टी आणि आजीआजोबा ग्रुप असे तीन गट होते . सर्वांनी धमाल केली .आजी आजोबांनी जुनी गाणी छान म्हटली .
अगदी अंगाई गीत ,मंगलाष्टक तर
*जा मूली जा दिल्या घरी तू सुखी रहा .
*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
*घट डोईवर ,घट कमरेवर •••
शेवटचं देशपांडे आजींचे गाणं ऐकून तर सर्वांच्या डोळ्यात पाणीच आले .गाणं होतं ••••
*घरात हसरे तारे असता ,मी पाहू कशाला नभाकडे.•••*
शेवटी देशपांडे आजोबा म्हणाले ,”धन्यवाद मुलांनो, आज तुमच्यात सामील केल्याबद्दल. आज खूप दिवसांनी नवीन गाणी ऐकायला मिळाली . आम्ही दहा वर्षांनी लहान झालो.
Hope ,We have not troubled you.”
प्रियाने सर्वांसाठी चहा केला. त्याचं तर खूपच कौतुक झालं .
अनिताने ज्या उद्देशाने हे पाऊल उचलले , त्याची सुरुवात योग्य दिशेने झाली आहे हे तिच्या लक्षात आले.
म्हणतात ना •••
समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट जरी माणसाजवळ असली तरी प्रश्न सहज सोडविता येतात.
माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे,परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.
लेखिका :सुश्री.संध्या बेडेकर
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
… असं म्हणतात की जो इथं जन्माला आला त्याच्या अन्नाची सोय झालेली असतेच. अर्थात चोच आहे तिथे चाराही असतो.. फक्त ज्याला त्याला तो शोधावा लागतो.. त्यासाठी त्याला जन्मताच मिळालेले हातपाय योग्य वेळ येताच हलवावे लागतात.. असेल माझा हरी देई खाटल्यावरी असे भाग्यवंत खूप विरळे असतात.. अदरवाईज जिथे जिथे दाणा पाणी असेल तिथवर यातायात हि करावीच लागते.. बरं पोटाची व्याप्ती पण एकच एक दिवसाची असते.. होय नाही तर ते एकदा ओतप्रोत.. नव्हे नव्हे तट्ट ( फुटेपर्यंत) भरले एकदा आता पुढे चिंता मिटली असं का होतं. तुमचा आमचा अनुभव असा तर अजिबात नाही ना हे सर्व मान्य अक्षय सत्य आहे. दुसरं त्यात पहाना आपलं एकटयाचंच उदरभरणाची गोष्ट असती तर एकवेळ थोडा पोटाला चिमटा घेऊन रोजची हि दगदग न करता एक दोन दिवसाच्या फरकाने चाऱ्याचा शोधात हिंडता आले असते. पण तसं नशिबात नसतं. आपल्या बरोबर आपलीच रक्तामासाची, आपुलकीच्या वीणेने बांधलेली नाती यांची जबाबदारी …घरटयातला कर्त्याला कर्तव्य चुकत नसतं.. अन मग रोज मिळालेला चारा सर्वांना पुरणारा नसेल तर स्वताच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो तो खऱ्या अर्थाने. तैल बुद्धीच्या माणसांसारखा हा अन्नाचा साठा करून ठेवण्याची क्षमता आमच्या पक्ष्यांच्या घरटयात नाही.. त्यामुळे फार काळ साठवलेले अन्नधान्य नाहक नाशवंत होण्याचा धोकाही होत नाही…उन्हाळ्या असो वा पावसाळा, वा हिवाळयाचा कडाका , दाण्याच्या शोधात गावात करावा लागतोच फेरफटका… हि आम्हाला पक्ष्यांना नैसर्गिक शिकवण दिलीयं.. गरजेपुरते आजचे घ्या आणि इतर भुकेलेल्यांना शिल्लक ठेवा निस्वार्थ बुद्धीने.. त्यामुळे कधीही कमतरता पडलीच नाही, भुकबळी झालाच नाही, ना चाऱ्यासाठी आपापसांत भांडण तंटे, चोऱ्यामाऱ्या झाल्या नाहीत.. जे आम्हाला माणसांच्या जगात नेहमी दिसत आलयं.. जे मिळालयं त्यात तृप्तता आमच्या अंगाखांद्यावर दिसून येते..निसर्गत: सामाजिक बांधिलकीची समज असते ती आपल्या सर्वप्राणीमात्रात फक्त आम्हाला उमजलीय .. नि तुम्हा मानवांना स्वार्थाचा तण जो असतो तो मात्र उमजून घेण्याची तसदी घेत नाही… ती लवकरच उमजून यावी हि त्या जगनियंत्याला प्रार्थना..
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “क्यों दाता बनें विधाता…?”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 150 ☆
☆ क्यों दाता बनें विधाता…? ☆
प्रचार- प्रसार के माध्यमों से लोक लुभावन सपने दिखाना तो एक हद तक सही हो सकता है, किंतु मुफ्त में सारी सुविधाओं को देने से कामचोरी की आदत पड़ जाती है। जो आर्थिक रूप से कमजोर हैं, अशक्त हैं उन्हें मजबूत करने के प्रयास हों। पर जाति, धर्म, अल्पसंख्यक के नाम पर समाज को विभाजित करके सुविधाओं का आरक्षण देना समाज को जड़ से कमजोर करने की दिशा में उठाया गया कदम साबित हो रहा है।
जब राष्ट्रवाद की परिकल्पना साकार होती है तो व्यक्ति हर प्रश्नों से ऊपर उठकर अपना कर्तव्य निभाने की ओर चल देता है। हर वर्ग ने जाति, धर्म, अमीरी- गरीबी से ऊपर उठ केवल देश हित को सर्वोपरि माना है। कहा भी गया है – जननी जन्मभूमिश्चय स्वर्गादपि गरियसी अर्थात जननी और जन्मभूमि स्वर्ग से भी बढ़कर होती है।
जो भरा नहीं है भावों से, बहती जिसमें रसधार नहीं।
हृदय नहीं वह पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं। ।
राष्ट्रकवि मैथिलीशरण गुप्त जी की ये पंक्तियाँ सबका मार्गदर्शन करती हैं। क्या अच्छा नहीं होगा कि सत्ता को पाने के लिए दाता बना भाग्य विधाता की सोच से ऊपर उठकर हम कार्य करें। जनमानस को सचेत होकर अपने दायित्वों का निर्वाहन करना होगा तभी बिड़गी चाल पर नियंत्रण रखा जा सकेगा।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्री हनुमान साधना संपन्न हुई साथ ही आपदां अपहर्तारं के तीन वर्ष पूर्ण हुए
अगली साधना की जानकारी शीघ्र ही आपको दी जाएगी
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “लंगर, भंडारा और कार सेवा”।)
अभी अभी # 50 ⇒ लंगर, भंडारा और कार सेवा… श्री प्रदीप शर्मा
सेवा से बड़ा कोई धर्म नहीं! सेवा नि: स्वार्थ हो तो क्या बात है। अन्नदान नहीं आसान। अगर आप किसी भूखे को भोजन करवाते हैं, तो बहुत बड़ा काम करते हैं। भंडारा और लंगर वह भोजन होता है जो शुद्धता से बनाया जाता है और इंसान से पहले अपने आराध्य को वह अर्पित किया जाता है। बाद में प्रसाद के रूप में वह सार्वजनिक रूप से परोस दिया जाता है।
तीनों प्रकार की ये सेवाएं आस्था से जुड़ी हैं। समय और परिस्थिति अनुसार इन सेवाओं में फेरबदल हो सकता है, लेकिन सेवा की भावना ही इन सबमें प्रमुख है। आज अन्नदाता पर राजनीति संभव है लेकिन अन्न सेवा पर नहीं। बड़े बड़े शहरों में आजकल घर घर राम रोटी जैसी योजनाएं सामाजिक संस्थाएं चला रही हैं, जहां हर घर से अस्पताल के मरीजों और उनके परिजनों के लिए ना केवल भोजन, अपितु दवाइयों और वस्त्रों की भी व्यवस्था की जा रही है। लेकिन वे किसी राजनीतिक आंदोलन का हिस्सा नहीं, एक स्वयं – स्फूर्त सेवा है। ।
सेवा नि:स्वार्थ की जाती है फिर भी बच्चों की तरह इसमें भी लालच दिया जाता है। करोगे सेवा, तो पाओगे मेवा, और लोगों ने मेवा हासिल करने के लिए समाज सेवा को अपना लिया। राजनीति से बड़ी कोई मानव सेवा नहीं। राजनीति में मेवा ही मेवा है।
सेवा ही धर्म है! आप जो रोज भोजन करते हैं, उसमें न केवल एक रोटी गाय और कुत्ते की निकाली जाती है, संस्कारी परिवारों में पहले भगवान को भोग लगाया जाता है, उसके बाद ही भोजन ग्रहण किया जाता है। मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे में भी पहले अपने आराध्य को भोग लगाया जाता है, बाद में वह भक्तों में प्रसाद स्वरूप बांटा जाता है। कभी इसे भोग, राजभोग अथवा छप्पन भोग भी कहते हैं। हमारे शहर में लॉक डाउन के पूर्व एक भंडारे में दस लाख लोगों ने सड़क पर बैठकर हनुमान जी की प्रसादी ली थी। छोटे छोटे व्यापारी और ऑटो रिक्शा चालक तक मिल जुलकर सांई बाबा के भंडारे का आयोजन करते हैं। अन्नपूर्णा के भंडारे में कभी कोई कमी नहीं होती। लोग मुक्त हस्त से दान दे, पुण्य अर्जित करते हैं। ।
कार सेवा के बारे में हर कार मालिक और चालक जानता है कि नियत समय पर कार की भी सर्विसिंग करवानी पड़ती है। आडवाणी जी ने एक रथयात्रा निकालकर यह संदेश हर राम भक्त तक पहुंचाया कि ईश्वर की सेवा ही सच्ची कार सेवा है। वही आपकी ज़िंदगी की गाड़ी चला रहा है। तब से ही हर राम भक्त एक कार सेवक कहलाने लगा। उसी कार सेवा के फलस्वरूप आज अयोध्या में राम मंदिर बनने जा रहा है। धर्म की रक्षा के लिए सभी आंदोलन जायज हैं।
गुरुद्वारों में रात दिन चौबीसों घंटे कार सेवा चलती रहती है। धर्म से बड़ा कोई शासन नहीं होता। धर्म शासनत:।। लंगर, भंडारे और महाप्रसाद में कोई अंतर नहीं होता। हम अपने इष्ट की सेवा में सर्वस्व अर्पित करने की भावना रखते हैं। उसी भावना से प्रेरित है गुरुद्वारे का लंगर। अमीर गरीब, साधु शैतान और दोस्त दुश्मन जैसा भेद लंगर अथवा भंडारे में कभी नहीं किया जाता। पांच सितारा भोजन भी लंगर के आगे फीका होता है। भक्ति और भाव की जहां गंगा बहती है, वहीं लंगर होता है, भंडारा होता है, ठाकुर जी को भोग लगता है, प्रसादी मिलती है।
पावन उद्देश्य से की गई सभी सेवा, सभी आंदोलन, भोजन, भंडारे, लंगर, एवं कार सेवा समाज के कल्याण के लिए होती हैं, बस इनका उद्देश्य अगर राजनीतिक ना होकर पारमार्थिक हो। देखो ऐ दीवानों तुम ये काम ना करो, कार सेवा, भंडारे और लंगर जैसे पवित्र सत्कार्यों को बदनाम ना करो। बोले सो निहाल। जय श्री महाकाल …!!!