कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 251 – विजय साहित्य ?

☆ संमोहन तू..!

प्रेम करुणा,नेत्री भरता,

दिसे सावळा,शाम मुरारी.

नंदलाल हा, पार्थसारथी,

दिव्य कांतीचा, हा गिरिधारी. १

*

कंज लोजनी,अजन्मा तू,

हिरण्यगर्भा,पद्मनाभ तू.

अजया तूची, वासुदेव‌ तू,

रवि लोचनी, विश्व मूर्ती तू.२

*

दहि दुधाचे, संमोहन तू,

तुला आवडे ,साखर लोणी.

तुझ्याच साठी,यमुने काठी,

तुझ्या दर्शना,झुरते कोणी.३

*

दामोदर वा,गोपीनाथ तू,

कृष्ण मुरारी राधा रमणा.

तुला‌ पाहता,भान हरावे,

करीसी लिला,किती मोहना.४

*

मौत्तिक माला,तारावली ही,

रत्न माणके,तडीतप्रभा.

बाहु भुषणे, कर्णकुंडले  ,

सालंकृत ही, मुकूट आभा.५

*

पिवळ्या रंगी,साज केशवा,

पारीजातकी, तुझा गोडवा.

कोस्तुभ रत्ने, कंठमणी हा,

दिसे उठोनी, रूप माधवा.६

*

वैजयंतीची, मोहक माला,

मोर पिसांची ,शिरी झळाळी.

अलंकार हे, अंग हरीचे,

जिथे लक्षुमी,चवरी ढाळी.७

*

प्रेम भक्तीचा,झरा खळाळे,

तुझी लागता,चित्ती चाहूल.

स्वर्ग सुखाचा,दिसे आरसा,

जिथे विसावे,कृष्णा पाऊल.८

*

चराचराला,ठेवी बांधून,

यमुना तिरी,कदंब वृक्षी.

कृष्ण विसावा, रम्यस्थळीते,

झुले डहाळी,रेखीत नक्षी.९

*

तुला पाहण्या,तुला‌ ऐकण्या ,

फांदी वरती,बसला रावा .

घाल मोहिनी,मुरली वंशी,

वाजव वेणू,ऐकव पावा.१०

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments