सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ कोकीळ ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पानांच्या घुंघटात लपेटून,

 कोकिळ गाई मंजुळ गाणे!

साद कोकिळेस दे आनंदाने,

 सूर सप्तकातील मधुर तराणे!..

*

 चाहूल देईल वसंताची,

 वास पसरील मोहोराचा!

 धुंद फुंद होऊनी परिसर,

 नाचू लागे मोर अंतरीचा!

*

 वसंत राजा सहा ऋतूंचा,

 आंबा राजा जसा फळांचा!

 कोकिळ गाई सुंदर गाणे,

 गान तपस्वी असे निसर्गाचा!

*

 जसा बहावा शोभून दिसतो,

 ऊनझळांच्या सोन संगती!

 प्रत्येकाची वेगळीच महती,

 उमजून येई निसर्गात ती !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments