श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 285
☆ लढाई… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
घडले रामायण अन घडली काल लढाई
बलाढ्य रावण त्यावर रुसली काल लढाई
*
पाच पांडवा विरुद्ध होते शंभर कौरव
श्रीकृष्णाच्या सोबत दिसली काल लढाई
*
पानीपतच्या युद्धातच का हरलो आम्ही
गद्दारांनी होती पिडली काल लढाई
*
कान भरूनी निघून गेले तिला न कळले
घरात येउन पुरती फसली काल लढाई
*
अतिरेक्यांचा विनाश करण्या सैन्य निघाले
शत्रूच्या गोटातच घुसली काल लढाई
*
रक्तपात हा अन मांसाचे तुकडे सारे
मुडदे पाहुन रणात रडली काल लढाई
*
इतके सारे घडल्यावरही थांबत नाही
काही नाही येथे शिकली काल लढाई
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈