कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 250 – विजय साहित्य ?

☆ धर्मवीरता…

प्रती शिवाजी, संभाजी राजे,

न्याय नितीची, सखोल जाण.

धर्मवीरता, लौकीक गाजे,

शौर्य धाडसी, स्वराज्य वाण.! १

*

नाना भाषा, केल्या अवगत,

बुधभूषण, सुवर्ण‌पान.

नायिका भेद, सात सतक,

नखशिखा हे, काव्य‌ महान..! २

*

मूर्तीमंत, शौर्याचे लक्षण,

घोर झुंजला, मर्दानी छावा.

कसे करावे, धर्म रक्षण,

घेई शिकोनी, गनिमी कावा.! ३

*

युद्ध कलेचा, धाक दरारा,

गिरी कंदरी, शस्त्र प्रभावी.

शिवपुत्राचा, प्रभाव न्यारा,

सान वयाते, जोखीम नामी..!४

*

वीर साहसी, दिव्य प्रतापी,

एकशे वीस, युद्ध विजेते.

शत्रू अवघे, रणात कापी,

छत्रपती ते, थोर प्रणेते..! ५

*

कधी न झुकले, राजे मानी,

तख्त हलवले, दिला लढा.

सदा पाठीशी, माय भवानी,

स्वराज्य रक्षक, सदा खडा.! ६

*

माय जिजाऊ, वत्सल माया,

 येसू बाई ही, लाडकी राणी.

शौर्य गर्जना, स्वराज्य छाया,

सवे झुंजली, रण रागीणी.! ७

*

शौर्य भरारी, ते रणगाजी,

धर्मवीर हे, पुन्हा न झाले.

जय शिवाजी, जय संभाजी,

बोल रौरवी, वादळ प्याले..! ८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments