कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 199 – विजय साहित्य ?

☆ वादळातील दीपस्तंभ तू…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

हे भीमराया गाऊ किती रे

तुझ्या यशाचे गान

जगण्यासाठी दिले आम्हाला

अभिनव संविधान… !

 

तूच घडवले  भीमसैनिका

जगती केले रे बलवान

शिका लढा नी संघटीत व्हा

जपला  स्वाभिमान…. !

 

माणूस होतो माणूस राहू

जातीभेदा नाही स्थान

ज्ञानी होऊ ज्ञान मिळवुनी

घडवू देश महान…. !

 

शिक्षण घेऊन झाला ज्ञानी

दिलेस आम्हा धम्माचे वरदान

प्रज्ञा, शील आणि करूणा

जीवनज्योत प्रमाण .. !

 

वादळातील दीपस्तंभ तू

चवदार तळ्याची आण

तुझ्या रूपाने पुन्हा मिळाला

जीवनी हा सन्मान…. !

 

चंद्र, सूर्य, जोवरी अंबरी

आम्हा तुझा  अभिमान

निळ्या नभाचे छत्र आमुचे

तू जगताची शान… !

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments