श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ बेपत्ता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

किती दिसांनी त्यक्त मंदिरी

येवुन कोणी दिवा लावला

घंटानादे ढळे समाधी

मूर्तीमधला देव जागला !

 

तुडुंब भरल्या कृष्णघनांचे

किती दिसांनी ऊर मोकळे

चिंब धरित्री भिनल्या धारा

नवसृजनाचे पुन्हा सोहळे 

 

इतिहासाची गहाळ पाने

पत्ता शोधित आली दारी

दंतकथांचे हो पारायण

नवसमराची पुन्हा तयारी !

   

 किती दिसांनी दुभंग वारुळ

 एक तपाची होय सांगता

 नवीन स्पंदन,नव संजीवन

 नवा अनंत नि उरात आता !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments