श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 92 – नाहकता ☆

शब्दांची गर्दी हवी कशास नाहकता।

शब्दाविना वाढते भावनांची सुंदरता ।।

 

एक आर्त नजर तुझी खुप काही सांगते ।

लपलेली व्यथा तुझ्या नजरेतून जाणवते

मूक कटाक्ष सुद्धा तुझा घायाळ करतो पुरता।।१।।

 

समाधानाची ढेकर अशी दाद देऊन जाते।

आर्धी उष्टी खीर तुझी माझी काळजी सांगते ।

कपभर चहा ने तुझ्या शीण जातो पुरता ।।२।।

 

रुसवे-फुगवे सारे तुला शब्दाविना कळतात।

पश्चातापाचे भाव तुझ्या नजरेतच उमटतात ।

सुगंधी गजराही पुरतो मग मध्यस्थी करता।।३।।

 

विश्वासची ढाल तुझी लढण्याचे बळ देते।

नित्य अशी साथ तुझी अखंड मला लाभते।

कौतुकाच्या थापेलाही भासे शब्दांची नाहकता।।४।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments