मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्लेप्टोमॅनिया — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ क्लेप्टोमॅनिया — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(किती हो गुणी मुलगी आहे सुरुची.  देवाने हा असला दुर्मिळ आजार या सोन्या सारख्या मुलीला का द्यावा?” माहीच्या डोळ्यात पाणी आलं..).. इथून पुढे —

दोघी मैत्रिणी खुशीत मावशीच्या फार्म हाऊसवर गेल्या..  खूप मजा केली त्यांनी.. मावशीने खूप लाड केले त्यांचे. दोघी खूप हिंडल्या, दंगामस्ती केली,धबधब्याखाली मनसोक्तभिजल्या. रोज जेवल्यावर  माहीला हळूच आपली पर्स दाखवायची सुरुची.. त्यात कधी चमचे कधी टिशू पेपर असल्या फुटकळ वस्तू असत तर कधी काहीही नसे.. माही गुपचूप सगळ्या वस्तू जागेवर ठेवून देई.. सुरुचीला अत्यंत गिल्टी वाटे .ती माहीला म्हणायची,”माही,कोण होतीस तू माझी मागच्या जन्मी?किती मला संभाळून घेतलंस ग आजपर्यंत? पण कायम अशी तुझ्यावर अवलंबून कशी रहाणार मी?काय आहे माझ्याभविष्यात देव जाणे.” खिन्न होऊन सुरुची म्हणायची..

“होईल ग सगळं ठीक!आत्तापर्यंत नाही का झालं तसंच होईल”  माही म्हणाली..

दोघींचे रिझल्ट्स लागलेआणि दोघींनाही पहिल्याच लिस्ट मध्ये मेडिकलला ऍडमिशन मिळाली.

दोघींचा आनंद गगनात मावेना..  छोट्या डबक्यातले मासे आता नदीत पोहायला जाणार होते,क्षितिजे विस्तारणार होती..

नवीन कॉलेज सुरू झाले.. दोघींच्या टर्म्स नशिबाने एकत्रच लागल्या.. अभ्यास प्रॅक्टिकल्स करताना दिवस कसे कुठे जात ते दोघींनाही समजत नसे..  माहीची परिस्थिती जरा बेताची होती..माही परीक्षेच्या दिवसात सुरुचीकडे रहायलाच यायची.. सुरुचीच्या बेडरूम मध्ये कॉट वर पडून दोघी आपली स्वप्नं रंगवत..”माही, मी नोकरी करणार नाही. स्वतःचेच क्लिनिक सुरू करीन.उगीच दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन माझा हा आजार लक्षात आला तर किती बदनामी होईल माझी..”  शहाणी सुरुची म्हणायची. .माहीला या गुणी मैत्रिणीबद्दल फार वाईट वाटायचे..

दिवस भरभर उलटत होते.. बघताबघता दोघीही  चांगले मार्क्स मिळवून पास झाल्यासुद्धा.. माहीने पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन ला प्रवेश घेतला. कितीही आग्रह करूनही सुरूचीने ठाम निर्णय घेतला, मी पुढे काहीही करणार नाही.. मला स्पेशलायझेशन करायचं नाही.मी सरळ आता दवाखाना उघडणार. बाबांच्या बंगल्यातला खालचा मजला घेईन छान रिनोव्हेट करून..”कितीही सांगून माही ,सुरुचीचे बाबा दमले तरी सुरूचीने ऐकलं नाहीच..  “बाबा, इतके दिवस माझ्या मागे  माही ढाली सारखी उभी राहिली म्हणून निभावलं. तिला तिचं आयुष्य नाहीये का? तिलाही पुढे शिकू दे,दुसरे मित्र मैत्रिणी जमवू दे.. आता मात्र नको बाबा..चोरटी  डॉक्टर म्हणून मला मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन बदनामी नाही करून घ्यायची..हे कधीतरी लोकांना  समजणार हो बाबा..त्यापेक्षा माझे स्वतःचे क्लिनिकच बरे… झाकली मूठ राहू दे झाकलेलीच राहील तितकी..” सुरुचीच्या डोळ्यात पाणी आलं..

बाबा,अजून आठवतं हो मला,लहानशी सुरुची कोपऱ्यात उभी असलेली आणि बस मधली मुलं तिच्याकडे संशयाने बघत असलेली!  पण त्याचा गाजावाजा झाला नाही.. मला चांगलं काही दिसलं की ते उचलायची अनावर उर्मी यायचीच.. आणि नंतर ती नाहीशीही व्हायची..  तेव्हा तुम्ही ,माही,शाळेतले सहृदय फादर माझ्यासाठी उभे राहिलात..म्हणून तर आजचे हे दिवस मला दिसत आहेत..

नशिबाची फार परीक्षा बघू नये असं तुम्हीच म्हणता ना? मी इथेही छान यशस्वी होऊन दाखवीन बाबा.  “सुरुची म्हणाली.  ठीक आहे म्हणून बाबा मागे फिरले.  त्यांनी सुरुचीला खालचा मजला सुंदर रिनोव्हेट करून दिला.. सुरूचीने दवाखाना सुरूकेला..कॉलनीत  दुसरा डॉक्टर नव्हताच..सुरुचीच्या गोड बोलण्याने,उत्तम रोगनिदानाने बघता बघता तिचा उत्तम जम बसला. सुरूचीने माया म्हणून हुशार रिसेप्शनिस्ट नेमली होती..कोणत्याही  पेशंटने आपली कोणतीही वस्तू पर्स काहीही आत आणायचे नाही..

तपासण्याच्या रूममध्ये रिकामे जायचे हा कडक नियम होता सुरुचीच्या दवाखान्यात..  त्याचे कारण फक्त सुरुचीलाच माहीत होते..त्या दिवशी माही सुरुचीला भेटायला आली.  वॉव सुरुची..केवढी गर्दी ग दवाखान्यात.

मिंटिंग मनी हं? ग्रेट.  अगदी अचूक ठरला तुझा निर्णय ग. .शाबास!!”माही मनापासून म्हणाली..

बरं हे पेढे घ्या..झाली तुझी मैत्रीण एम डी.. अजूनही कष्ट संपत  नाहीत”..हसत हसत माही म्हणाली..” हो ग माही,सोपी आहे का तुझी ही वाट?पण मग  सोन्याची फळंही मिळतील बरं.”सुरुची हसून म्हणाली..  सुरुचीच्या आईबाबांना तिच्या लग्नाचे वेध लागले..आपली ही गुणी मुलगी चांगल्या मुलाच्या हातात पडावी असं मनापासून वाटायचं त्यांना..इतकी गुणी, हुशार भरपूर पैसे मिळवणारी मुलगी  कदर असणाऱ्या मुलाला मिळावी या अपेक्षेत  गैर काय होते? सुरुचीची अट होती. मला कोणालाही फसवून लग्न करायचे नाही.मला क्लेप्टोमॅनिया आहे हे सांगूनच मी लग्न करणार. मग भले मी तशीच राहिले तरी चालेल. सुरुची आपल्या म्हणण्यावर ठाम होती..  नंतर ते लग्न मोडण्यापेक्षा आधीच सत्य माहीत असलेले केव्हाही चांगले असे सुरुचीचे मत…दरम्यान माही लग्न होऊन परदेशात गेली..  सुरुचीची प्रॅक्टिस आणखीच जोरात चालायला लागली.  एक दिवस तिच्या दवाखान्या समोर एक  कार येऊन उभी राहिली..  सुरुची खाली मान घालून काहीतरी काम करत होती.. वर बघितलं तर हे कोण आहे?असं तिने प्रश्नार्थक नजरेने बघितलं..बसा ना, मी ओळखलं नाही तुम्हाला.  सुरुची म्हणाली.. 

आठवतो का मी? शिरीष? तुझ्या वर्गात होतो शाळेत.. तुझं कसं लक्ष जाणार म्हणा? बॅक बेंचर आम्ही आणि तू स्कॉलर!  पटतेय का ओळख?”त्याने हसून विचारलं..

अरे हो!  शिरीष तू? बस ना..इथे कसा आलास?” सांगतो. माही भेटली होती मला अमेरिकेत.. मी गेलो होतो तिकडे कॉन्फरन्स साठी..अर्थात तुझी चौकशी केलीच मी..  माही मस्त आहे तिकडे. तुम्ही आहात ना रोज  टेक्स्ट वर?  मस्त चाललंय तिचं. तर मला माहीने तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय.मी डॉक्टर झालो पण इथून नाही,, गुजरात मधून.. .म्हणून मला इथली तुमची काहीच माहिती नव्हती. आता पुण्यात आलोय आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला जॉब करतोय. सुरुची, मला लग्न करायचं आहे तुझ्याशी..ते क्लेप्टोमॅनिया बद्दल मला सगळं सांगितलंय माहीने.मी त्याला महत्व देत नाही.उगीच त्याचा बाऊ करू नकोस. तुझ्या सगळ्या गुण दोषांसकट तू मला हवी आहेस..” बोल काय ते. आधीच उशीर झालाय. आता नाही म्हणू नकोस.”  सुरुचीच्या डोळ्यात पाणी आलं. उठून उभं रहात तिने घट्ट मिठीच मारली  शिरीषला.. शिरीष हसायला लागला .सुरुची लाजून दूर झाली.  दोनच महिन्यात सुरुची आणि शिरीषचं शुभमंगल झालं .. सुरुचीच्या आईवडिलांना स्वप्नात कल्पना केली नव्हती असा जावई मिळाला..आज सुरुचीला दोन मुलगे आहेत आणि तिचा संसार मस्त चाललाय.  याचं श्रेय शिरीष आणि सुरुची अर्थात माहीला देतात. बालवर्गापासून ते आपल्या लग्नापर्यंत सतत आपल्या मागे सावली सारख्या उभ्या असलेल्या माही सारख्या आधारवडाला विसरणे, सुरुचीला  शक्य  तरी होते का?

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दगडातला देव …” भाग – १ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दगडातला देव …” भाग – १ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

जोशी काकांबरोबर कोकणातली  ट्रिप सुरू होती. संध्याकाळ झाली होती. आम्हाला जायचं होतं ते ठिकाण अजून लांब होत. 

अचानक एका देवळासमोर गाडी थांबली. आम्हाला काही कळेना.इथे का थांबलो?…. 

खाली उतरलो.काका म्हणाले

“गणपतीचे दर्शन घेऊया “

एक साधेच  नेहमी असते तसे देऊळ होते. दर्शन घेतले. 

काका म्हणाले “आता सगळेजण आपण इथे बसून अथर्वशीर्ष म्हणुया”

काकांच हे काय चालल आहे आम्हाला कळेना..

तेवढ्यात काकांनी खणखणीत आवाजात सुरुवातही  केली. 

“ओम भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:..”

आम्ही पण सगळे म्हणायला लागलो..

“हरि ओम् नमस्ते गणपतये…”

अथर्वशीर्ष म्हणून झाल्यावर बाहेर आलो.

देवळाच्या आवारात छोटे छोटे असंख्य दगड टाकलेले होते आणि त्याच्या मधून छान  रस्ता केलेला होता.

काका म्हणाले

“या देवळाच्या आसपासचे हे दगड बघितलेत का?”

“दगड.”

“हो ..दगडच “

त्यात काय बघायचं ?..आम्हाला समजेना..

“तुम्हाला या देवळाची एक विशेष गोष्ट सांगायची आहे.

तुम्ही देवळाची प्रदक्षिणा करा आणि कुठलाही एक दगड उचला..

तो गणपतीच आहे…

अट एकच आहे फक्त एकदाच दगड उचलायचा…”

“म्हणजे?”

काका काय म्हणत आहेत हेच आम्हाला कळेना …त्यांनी परत सगळे सांगितले.

असं कसं असेल?

आम्हाला वाटल काका आमची मजा करत आहेत.

पण काका अगदी गंभीरपणे सांगत होते.

“स्वतः करून बघा तुम्हीच…”ते म्हणाले..

आम्ही प्रदक्षिणा करून आलो..

आता गंमत सुरू झाली.

कुठला दगड उचलावा हे कळेचना… आम्ही सर्वजण उभे होतो.

काका एकदम म्हणाले

“गणपती बाप्पा मोरया…”

आणि आम्ही प्रत्येकाने खाली वाकुन एक एक दगड उचलला.

प्रचंड उत्सुकता…. कुतूहल ….अपेक्षा….

दगडाच निरीक्षण  सुरू झालं…

आणि मग काय मजाच सुरू झाली….

प्रत्येकाला त्याच्या दगडात बाप्पा दिसायला लागला. तुझा बघु …. माझा बघ… प्रत्येकाने निरीक्षण केलं…

कोणाला डोळा दिसत होता ..कोणाला सोंड दिसत होती ..

काहीजण हिरमुसले… त्यांना बाप्पा दिसला नाही .मग कुणीतरी म्हटलं पालीचा आणि लेण्याद्रीच्या गणपतीचा  भास होतो आहे…..

कितीतरी वेळ आम्ही त्याच नादात होतो.

काकांनी परत एकदा गणपती बाप्पाचा गजर केला.आणि  म्हणाले 

“चला बसा गाडीत “पुढच्या प्रवासाला निघालो.. 

काही जणांना ती गंमत वाटली त्यामुळे त्यांनी तो दगड टाकून  दिला. तर काही जणांनी तो  दगड श्रद्धेनी बरोबर घेतला..

गाडी सुरू झाली आणि लक्षात आलं की मगाशी हळूहळू  गचके खात चालणारी   गाडी आता सुसाट चालली होती…

गाडी दुरुस्त झाली होती.

अरेच्चा अस होत तर….

तेवढा वेळ काकांनी आम्हाला गुंगवून ठेवले होते .आणि नकळतपणे आम्ही पण त्या खेळात रंगून गेलो होतो…

गाडी बिघडली… असे सांगितले असते तर आमचा हिरमोड झाला असता. आम्ही कंटाळलो असतो… त्यासाठी काकांनी ही युक्ती केली होती.

काकांना किती छान सुचलं नाही का?

विघ्न आलं…  संकट आलं की घाबरायचं नाही .आपलं लक्ष दुसऱ्या एखाद्या चांगल्या सकारात्मक  गोष्टीकडे लावायचं. त्यात मन रमवायचं ….काही वेळ जाऊ द्यायचा कदाचित प्रश्न सुटतातही….

पण एक मात्र सांगू का?

त्या दिवशी आम्हाला खरंच प्रत्येकाच्या दगडात थोडा का होईना देव दिसला…..

बस मधून उतरताना काका म्हणाले…..

“आज दगडातला देव बघितलात. आता माणसातला देवही बघत जा बरं का….. देवाशी वागता तस माणसाशीही वागुन बघा …”

आम्ही सगळे स्तब्ध झालो …

त्या छोट्याशा वाक्यातून काकांनी आम्हाला खूप काही सांगितले शिकवले….

हळूहळू आम्ही शिकत आहोत.

त्या गणपतीकडे बघितले की मला हे सर्व आठवते.

माझा तो दगड अहं …गणपती आता माझ्याकडे आहे.

मला त्यात बाप्पा दिसतो…

आज काका नाहीत ..

पण त्यांनी सांगितलेले जीवनाचे तत्वज्ञान तुम्ही पण लक्षात ठेवा हं..ते आयुष्यभर पुरणारे आहे…

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दुःखद सुख… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ दुःखद सुख… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

तंत्रज्ञान, बदलत्या प्रथा यामुळे बरच  बदलून जातं आणि अनेक गोष्टी, धंदे, माणसं हरवून जातात कालौघात. परवा काही कारणाने आळंदीला गेलो होतो तेंव्हा तिथे वासुदेव दिसला घाटावर. तसंही शहरात तो पूर्वी फार दिसायचा असं नाही पण धूमकेतूसारखा अधून मधून दिसायचा. पोलिसाचा किंवा इतर कुठला वेष घेऊन येणारे बहुरूपी तर आता दुर्मिळ झाले. सगळं खोटं आहे हे माहीत असलं तरी त्यांच्या मागून हिंडायला मजा यायची. वासुदेवाच्या टोपीत ती धूळ खालेल्ली मोरपिसं तो बदलतो कधी की तो मुगुट तो तसाच धुतो असा मला प्रश्न पडायचा. श्रावणात ‘आsssघाडा, दुर्वा, फुलं’ अशी हाक भल्या पहाटे यायची. ‘सुया घ्ये, पोत घ्ये, मनी घ्ये, फनी घ्ये’ अशी -हिदम असलेली हाळी तर किती वर्षात ऐकलेली नाही. आपल्या अंगणात फतकल मारून बसून गोधडी शिवून देणा-या बायका गायब झाल्या. 

अप्पा बळवंतला एका लाकडी फळीवर रेमिंग्टन, गोदरेजचे टाईपरायटर ठेवून वन प्लस फोर अशा कॉप्या काढणारे कधीच अस्तंगत झाले. त्यांची कडकट्ट चालणारी बोटं आणि कागद वर सरकवून परत पहिल्या जागी मशीन घेऊन यायचा स्पीड मी बघत बसायचो. स्टुलावर बसून मान पाठ एक करून कडेच्या कागदात डोकावत किंवा आधी मॅटर काय ते समजून घेऊन टाईप करून द्यायचे ते. कुठे गेले असतील, काय काम केलं असेल नंतर त्यांनी. लहानपणी मला कंडक्टर झालो तर खूप पैसे मिळतील असं वाटायचं. असतात एकेकाच्या विक्षिप्त कल्पना, मला कुठलाही धंदा बघितला लहानपणी की वाटायचं, हे काम जमेल का आपल्याला, यात साधारण श्रीमंत होण्याएवढे पैसे मिळत असतील का? जाकीट घालून रस्त्यात मिळेल त्या जागी बसून आपल्या कळकट्ट भांड्यांना ब्युटी पार्लरमधे नेऊन आणल्यासारखे कल्हई करणारे कल्हईवाले गायब झाले. लहानपणी चाळीत तो फकीर यायचा रात्री, हातातल्या धुपाटण्यावर ती उद आणि धुपाची पावडर फिसकारली त्याने की जो पांढरा धूर आणि वास येतो तो अजून विसरलेलो नाही.

रात्री दहाच्या सुमारास एकजण पान विकायला यायचा. मस्स्स्साला पान दहा पैसे, स्पेशल मस्स्साला पंधरा पैसे. जेमतेम अर्ध पान, चुना, काताचा, सुपारीचा तुकडा, बडीशेप, स्पेशल मधे गुलकंद अत्तर लावल्यासारखं असायचा. एकजण तळलेले पापड विकायचा. सणसणीत मोठे पापड असायचे, दहा पैशाला एक, पाच पैसे दिले तर अर्धा पापड. चोपटण्याने अंगण करण्यात मजा होती. एसटी स्टँडवर तांब्याची कानकोरणी घेऊन फिरणारे दिसत नाहीत आता. काय तन्मयतेने ते काम करायचे. भुयारातून काहीतरी नक्की निघणार अशा आशेवर असलेल्या इतिहास संशोधकासारखे ते कानात डोकवायचे. रस्त्यात कुठल्या तरी झाडाखाली मोठी पेटी घेऊन सायकल दुरूस्तीवाले बसायचे. दोन्ही बाजूला एकेक दगड ठेऊन तो हवा भरायचा पंप उभा ठेवलेला असायचा. एकेकाळी पीसीओच्या त्या चौकोनी ठोकळ्याबाहेर लोक रांग लावून उभी रहायचे. आतल्याचं बोलणं लवकर संपावं आणि माझ्यानंतर बाहेर कुणाचाही नंबर असू नये हे प्रत्येकाला वाटायचं.  

शाळेच्या बाहेर एक म्हातारी बसायची वाटे लावून, चिंचा, चन्यामन्या, बोरं, काळी मैना, भाजके चिंचोके, पेरू, बाहुलीच्या गोळ्या असायच्या. एक काला खट्टा, रिमझिम, ऑरेंज, लेमन, वाळा अशी सरबताची गाडी असायची. बर्फाचे गोळे विकणारे क्वचित दिसतात अजून. छत्री दुरुस्त करणारे कुठे गेले काय माहीत. एखादी टेकस मारली चपलेला तर पैसे न घेणारे पूर्ण पिकलेले चप्पल दुरुस्तीवाले आजोबा तर कधीच गेले. चार आणे तास मिळणारी सायकलची दुकानं गायब झाली. आपल्याला नको असलेले कपडे घेऊन चकचकीत भांडी देणा-या बार्टर सिस्टीम फॉलो करणा-या बोहारणी कुठे गेल्या असतील? सीताहरणाला कारण ठरलं म्हणून अंगात चोळी न घालता आपल्या पाटा, वरवंटा, जात्याला टाकी लावून द्यायच्या त्या वडारणी दिसणं शक्य नाही. कडेवर एक पोर आणि डोक्यावर विक्रीसाठी पाटा वरवंटा असायचा. त्या वरुटा म्हणायच्या त्याची मजा वाटायची. काही शब्द पण गायब झाले याची खंत वाटते. मायंदाळ, वळचण, हाळी, बैजवार, औंदा, बक्कळ असे अनेक शब्द असतील. मूळ विषय तो नाही, त्यावर परत कधी. 

‘बाई, तुझं मन चांगलं आहे, तू देवभोळी आहेस, मनात पाप नाही, दानी आहेस पण तुला यश नाही’ अशी पाठ केलेली कॅसेट लावणारे कुडमुडे ज्योतिषी कंटाळवाणी दुपार हसरी करायचे. चाळीत तुम्हांला सांगतो, वल्ली असायच्या एकेक. एका ज्योतिषाला ‘लग्न कधी होईल सांगा’ म्हणत दोघींनी हात दाखवला, त्याने पण सहा महिन्याच्या आत पांढ-या घोड्यावर बसून राजकुमार येईल एवढं सोडून सगळा सोनसळी भविष्यकाळ रंगवला. घसघशीत दक्षिणा मिळणार म्हणजे अजून घरं फिरायची गरज नाही हे त्याच्या चेह-यावर दिसत होतं. ‘तुझा मुडदा बशीवला भाड्या’ म्हणत त्यांनी आजूबाजूला खेळणारी आपापली पोरं दाखवली आणि त्याला हुसकवून लावलं. दक्षिणा बुडली त्यापेक्षा आपलं ढोंग उघडकीला आलं याचा राग त्याने मार बसणार नाही इतपत शिव्या देऊन काढता पाय घेतला. बाबाजी का बायोस्कोप मधे ‘मेरा नाम जोकर’मधे दिसला तेंव्हा आठवला. क्षणिक खेळ असायचा पण डोळ्यांभोवती दोन्ही हात धरून त्या नळकांड्यात डोकावण्यात अप्रूप होतं.   

फक्त दिवाळीला पोस्त मागणारे गुरखे नाहीसे झाले. रात्री फिरताना क्वचित दिसायचे. क्वचित येणारं कार्ड देणारे आमचे पोस्टमन इंदोंस अशी हाक मारायचे. आमचा पत्त्यातला चाळ नंबर कितीही चुकीचा टाकलात तरी पत्र यायचंच आमच्याकडे. त्यांनी कधीही आमच्याकडे पोस्त मागितली नव्हती. सायकलच्या मधल्या दांड्याला ग्राईंडिंग व्हील लावून मागच्या कॅरिअरवर बसून पेडल मारत चाकू, सुरे, कात्र्यांना धार लावणारे गायब झाले. आता भंगार कच-यात टाकतो पण आधी भंगारवाले यायचे, द्याल ते घायचे. प्लास्टिक बाटल्या, बरण्या, पत्र्याचे डबे, ते देतील ती किंमत. स्टोव्ह रिपेअरवाले एक वेगळीच गंमत असायची. दुरुस्तीत फार रॉकेल संपू नये ही काळजी असायची बाईला आणि हा बाब्या फारफार पंप मारून बर्नर तापवून लालबुंद करायचा. आतली काजळी काढून बर्नर फिट करून हवा भरून पिन मारली की बोर्नव्हिटा प्यायल्यासारखा स्टोव्ह झळाळता पेटायचा पण त्याचा आनंद अल्पकाळ साजरा व्हायचा आणि महिनाभर रॉकेल पुरवायला हवं या काळजीने ती बाई किल्ली सोडून पहिल्यांदा स्टोव्ह बंद करायची.       

या सगळ्यात रात्री दारोदार फिरून ‘अन्न वाढा हो माय’ म्हणणारे भिकारी नाहीसे झाले याचा मला आनंद आहे खूप. सगळे काही उपाशी मेले नसतील, जगण्यासाठी, पोटाची आग भागवण्यासाठी त्यांनी काहीतरी तजवीज केली असेलच. पण ती हाक बंद झाली ते बरं झालं. आम्ही चाळीत रहायचो तिथे रात्री साधारण नऊनंतर एक बाई यायची. तुम्ही द्याल ते ती घ्यायची. ती कुणाच्या दरवाज्यासमोर उभी रहायची नाही, सर्वसमावेशक अशी ती हाळी द्यायची, मग ज्याच्याकडे उरलं असेल तो तिला हाक मारून ते द्यायचा. पोळी, भाकरी, भातासाठी एकच पिशवी असायची. भाजी, आमटी जे काही असेल ते सगळं ती एकाच वाडग्यात घ्यायची. संतमहात्म्यांचे किस्से आपण ऐकतो की ते सगळं अन्न एकत्र करून खायचे पण इथे चव काय आहे यापेक्षा भुकेची आग मोठी होती. कालौघात काही गोष्टी नष्ट होतात ते बरच आहे. चांगल्या गोष्टी नाहीशा होतात या दुःखापेक्षा वाईट गोष्टी संपतात त्याचा आनंद जास्त असतो. 

ही किंवा आत्ता लगेच न आठवलेली माणसं हरवली म्हणून अडून काहीच राहिलं नाही पण गतायुष्याचा ती एक भाग होती. मागे वळून पहाताना काही नेमकं आठवतं तसंच भारंभार संदर्भ नसलेलं ही आठवत राहतं. त्या प्रत्येक गोष्टीशी काही ना काही तरी चांगली वाईट आठवण जोडलेली असते. माणसाला अमरत्व नाही हे वरदान आहे. किती गर्दी झाली असती नाहीतर. आयुष्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी हरवतात. माणसं हरवतात ते वाईट. 

प्रत्येकजण या प्रवासात उतरून जाणार मधेच कधीतरी हे माहित असतं, काहीजण काही न सांगता घाईने उतरून जातात, काही लपून बसतात, काही दिसतात पण आपण त्यांना हाक मारू शकत नाही. न सांगता उतरून गेलेल्या, सोडून गेलेल्या, दुरावलेल्या, हरवलेल्या माणसांच्या आठवणींनी मन सैरभैर होतं. डोळ्यात नकळत पाणी दाटतं. अशावेळी काय करायचं? प्रवासात करतो तेच करायचं. खिडकीतून बाहेर बघायचं, हलकेच डोळे पुसायचे आणि दिसतंय त्यात हरवून जायचं. आपणही कुणाच्या तरी विश्वात त्यांच्या दृष्टीने हरवलेले असू शकतो या वाटण्यात पण एक दुःखद सुख आहे. 

आपल्यासारखंच कुणाच्या डोळ्यात पाणी असतंच की, माणसं काही फक्त आपलीच हरवत नाहीत.  

लेखक : श्री जयंत विद्वांस

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक 

मुलींनो,

तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता, तसा तुमचा नवराही खूप लाडा-कोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हांला वाटतं, तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.

लग्नापर्यंत तोही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्या सोबतच सुरू होतो.

आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो, तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं, ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही, हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.

तुमची पाळी आल्यावर लगाबगीने तो तुमच्या उशा-पायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल, अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो, हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला (कदाचित्) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.

नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिकमतीवर काय करू शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.

तुम्ही जसं उंची, अनुरूपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता, तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी ‘हो’ म्हणावं, असं होत नसतं.

तुम्हाला तुमची आई प्रिय आहे, तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो, तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरू नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न, हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.

सासूसासरे नक्कोच असतील, तर अनाथ मुलाशी लग्न करावं !

तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनिटं बोलला की तुमचा जळफळाट होणार, हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.

आईबरोबरच मित्र, मैत्रिणीही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.

दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला- गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इत्यादी बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.

आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल, ते समोरून सांगावं. मुलांना आईने ‘मनातलं ओळखून दाखव बरं‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.

खरे तर जनमानसात हा बदल होणे गरजेचे आहे.तेव्हाच मुलामुलींचे संसार खुशहाल  होतील व ते आनंदात राहतील.

लेखिका :श्रीमती प्राजक्ता गांधी

प्रस्तुती : श्रीमती उषा नाईक

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बोलका निसर्ग… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ बोलका निसर्ग… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

गजरा ल्यायली जणू वाटते

हिरवीगार फांदी

नैसर्गिक सौंदर्याची असावी 

खरी हीच नांदी

*

निसर्ग झुलतो तोच डोलतो

निसर्ग शृंगार करतो     

निरामय मन जवळ जयाच्या

निसर्ग त्यासवे बोलतो

*

निसर्गास कितीतरी वेदना

मानवनिर्मित 

मूकपणाने तरी साधत जातो

तो जगताचेच हित

*

ज्यांच्यासाठी झटतो जीवनभर

तयाला जवळ करावे

निसर्गासही असते ना मन

ते संवादे सुखवावे

*

निसर्ग मानव समतोलाला

जरा स्वतः पुढे यावे

जपा जपुया सृष्टी श्रीमंती

नव्या पिढीच्या सुखास्तव

 ….. तुम्ही ,आम्ही अन सर्वांनी

 ….. जाणुया खरे वास्तव

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-24 – राहों पे नज़र रखना और होंठों पे दुआ… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग -24 – राहों पे नज़र रखना और होंठों पे दुआ… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)

समय के साथ साथ कैसे व्यक्ति ऊपर की सीढ़ियां चढ़ता है, यह देखना समझना हो तो आजकल ‘जनसत्ता’ के संपादक मुकेश भारद्वाज को देखिए !

मुकेश भारद्वाज को याद करते हुए विनम्रता से यह बताना बहुत जरूरी समझता हूँ कि यह उन दिनों की बात है जब मैंने बीएड की परीक्षा पास की ही थी। नवांशहर के मेरे बीएड काॅलेज की प्राध्यापिका व मेरी बहन डाॅ देवेच्छा ने मुझे काव्य पाठ प्रतियोगिता का पहली बार निर्णायक बनाया। परिणाम घोषित किया तो एक लम्बा सा , पतला सा लड़का हम निर्णायकों के पास आया और विनम्रता से द्वितीय पुरस्कार दिए जाने का आभार व्यक्त करने लगा। वह होशियारपुर से आया था। वह मुकेश भारद्वाज था जो आज ‘दैनिक जनसत्ता’ का दिल्ली में संपादक है।

मुकेश ने कहा कि कोई राह सुझा दीजिए। मैं तब तक अध्यापन के साथ ‘दैनिक ट्रिब्यून’ का नवांशहर क्षेत्र में आंशिक रिपोर्टर हो चुका था और मुझे अध्यापन से ज्यादा पत्रकारिता में मज़ा और रोमांच आने लगा था। मैंने उसे पत्रकारिता की जितनी मेरी समझ बनी थी उसकी जानकारी दी और होशियारपुर चूंकि मेरा ननिहाल था , इसलिए लकड़ी के खिलौनों पर फीचर लिखने का सुझाव दिया। मुकेश ने लिखा और ‘दैनिक ट्रिब्यून’ में भेजा , जिसे तब रविवारीय संस्करण के प्रभारी और सहायक संपादक वेदप्रकाश बंसल ने प्रकाशित भी कर दिया। इसके बाद मुकेश भारद्वाज के भारद्वाज के अनेक फीचर ‘दैनिक ट्रिब्यून’ में आए। एक बार मैं चिंतपुर्णी (हिमाचल)जाते समय सपरिवार मुकेश का पता खोजते मिलने पहुंच गया और उसके परिवार से मिला। बहन कैलाश भी अब चंडीगढ़ में रहती है। इसके बाद मुकेश सन् 1987 में ‘जनसत्ता’ में टेस्ट दिया और रिपोर्टर चुना गया।

समय का कमाल देखिए कि सन् 1990 में मैं भी शिक्षण को अलविदा कह ‘दैनिक ट्रिब्यून’ में उपसंपादक बन कर चंडीगढ़ पहुंच गया। ‘जनसत्ता’ कार्यालय में मुकेश से मिलने गया। कैंटीन में भीड़ होने के कारण हमने चाय की चुस्कियां सीढ़ियों पर बैठ कर लीं और खूब बतियाए।

मैं सन् 1997 में हिसार का रिपोर्टर बन कर हरियाणा आ गया तब से मुलाकात नहीं हुई लेकिन सम्पर्क बना रहा।

एक दिन हिसार के ‘नभछोर’ के संपादक ऋषि सैनी ने कहा कि मैं ‘जनसत्ता’ के संपादक मुकेश भारद्वाज को फोन लगाता हूं लेकिन सम्पर्क नहीं होता , बात करने की इच्छा है। असल में वे ‘जनसत्ता’ के फैन हैं और प्रभाष जोशी को भी खूब पढ़ते रहे थे। मैंने कहा कि लीजिए बात करवा देता हूँ।

 मैंने तुरंत मुकेश को फोन लगा दिया। उसने बड़े आदर से ‘सर’ कह कर  संबोधित किया और मैंने ऋषि सैनी से बात करने को कहा। जब दोनों की बात खत्म हुई तब मुकेश ने कहा कि सर को फोन दीजिए। उसने बड़े आग्रह से कहा कि आप तो पंजाब के कथाकार हो। ‘जनसत्ता’ के लिए कहानी भेजिए। मैंने दूसरे दिन ही कहानी भेज दी और उसी आने वाले रविवारी जनसत्ता में प्रकाशित भी हो गयी। यह उसका मेरे प्रति आदर था या कृतज्ञता या गुरु दक्षिणा, कह नहीं सकता। फिर और कहानियां भी भेजीं जो प्रकाशित होती गयीं। ‘नानी की कहानी’, ‘चरित्र’ आदि कहानियाँ प्रकाशित हुईं।

फिर ‘जनसत्ता’ के गरिमामयी दीपावली विशेषांक में भी मेरी कहानी आई -नीले घोड़े वाले सवार।  फिर ‘दुनिया मेरे आगे’ में भी लेख भी आये।

इन दिनों मुकेश हर शनिवार ‘जनसत्ता’ में अपना साप्ताहिक स्तम्भ-बेबाक बोल लिख रहा है जो खूब चर्चित भी है और पसंद भी किया जा रहा है। लगे रहो। बस, कलम पैनी रखना।

मुकेश भारद्वाज पंजाबी कवियों के अंशों को भी अपने स्तम्भ में बड़ी सही जगह उपयोग करता है, जो यह बता देता है कि मुकेश एक कवि /लेखक भी है और पंजाबी साहित्य से भी जुड़ा है।

 आज सुबह वैसे ही मन आया कि रास्ता तो एक शिक्षक पूरी क्लास को दिखाता है लेकिन कोई कोई मुकेश भारद्वाज जैसा प्रतिभावान अपनी मंजिल खुद बना और पा लेता है। बधाई मुकेश। इसमें तुम्हारी मेहनत ज्यादा झलकती है।

यह चंडीगढ़ ही था जहाँ मुझे डाॅ योजना रावत, बृज मानसी से मिलने का अवसर मिला। ये दोनों ‘जनसत्ता’ में काॅलम लिखती थीं। बृज मानसी पंजाब विश्वविद्यालय के कार्यक्रमों में मिलती और हिमाचल से आई थी एम ए अंग्रेज़ी करने ! उसने एक बार ‘दैनिक ट्रिब्यून’ में समीक्षा स्तम्भ में जुड़ने की इच्छा जाहिर की और मैंने संपादक विजय सहगल से मिलवाया और उसकी यह इच्छा भी पूरी है गयी। फिर वह अमेरिका चली गयी और संबंध वहीं छूट गया। योजना रावत के कथा संग्रह के विमोचन पर भी मौजूद रहा और कहानी भी प्रकाशित की – ‘कथा समय’ में ! राजी सेठ और निर्मला जैन विशेष तौर पर आमंत्रित थीं।

चंडीगढ़ में ही वरिष्ठ पत्रकार ज्ञानेंद्र भारद्वाज का इंटरव्यू लेने तब भेजा गया जब वे हिंदुस्तान से सेवानिवृत्त होकर अपने पैतृक गांव बद्दी बरोटीवाला जा रहे थे और सामान पैक हो रहा था। वे समाजसेवा में जाना चाहते थे लेकिन ज़िंदगी ने उन्हें यह अवसर न दिया। वैसे वे मेरी साहित्यिक यात्रा के पहले संपादक रहे। वे जालंधर से प्रकाशित ‘जन प्रदीप ‘ के संपादक थे और मेरी पहली पहली रचनाएँ इसी में प्रकाशित हुई और मैं कभी कभी भगत सिंह चौक के सामने बने कार्यालय में भी जाता। वहीं अनिल कपिला से पहली मुलाकात हुई, जो बरसों बाद ‘दैनिक ट्रिब्यून’ में फिर जुड़ गयी ! ‘जन प्रदीप’ में साहित्य संपादक थे पूर्णेंदू ! वे हर माह किसी न किसी शहर में काव्य गोष्ठी रखते और एक बार लुधियाना में काव्य गोष्ठी रखी साइकिल कंपनी के मालिक मुंजाल की कोठी में, ये वही मुंजाल फेमिली है, जो आजकल हीरो हांडा के लिए जानी जाती है ! वैसे यह भी बताना कम रोचक नही होगा कि ज्ञानेंद्र भारद्वाज की बेटी सुहासिनी  ‘नभ छोर’ द्वारा प्रकाशित अंग्रेज़ी दैनिक ‘ होम पेजिज’ में रिपोर्टर बन कर हिसार आई और कुछ कवरेज के दौरान मुलाकातें होती रहीं। भारद्वाज की बड़ी बेटी मनीषा प्रियंवदा से भी जब हरियाणा ग्रंथ अकादमी का उपाध्यक्ष बना तब मुलाकात हुई और वह हमारे मित्र हरबंश दुआ की पत्नी है, जो खुद एक अच्छे लेखक हैं और उनकी किताबें आधार प्रकाशन से आई हैं। ‌वैसे वे बहुत ही क्रियेटिव शख्स हैं और मोहाली में उनका ऐसा शानदार शो रूम भी देखने को मिला! उन्होंने ही बताया कि सुहासिनी आजकल विदेश में है ! ज्ञानेंद्र भारद्वाज की वही इंटरव्यू मेरी पुस्तक ‘ यादों की धरोहर, में भी शामिल है।

मित्रो फिर‌ वही बात कि मैं कहाँ से कहां पहुंच गया ! इन पंक्तियों से आज विदा लेता हूँ :

होंठों पे दुआ रखना, राहों पे नज़र रखना

आ जाये कोई शायद दरवाजा खुला रखना!

क्रमशः…. 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – मृत्यु के पाँव – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है  मारीशस में गरीब परिवार  में बेटी की शादी और सामजिक विडम्बनाओं पर आधारित लघुकथा “मृत्यु के पाँव।) 

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी ☆ — मृत्यु के पाँव — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

एक विस्मयकारी कहानी लिखने का मैं साहस कर रहा हूँ। चोर ने एक घर से बहुत पैसा चुराया, लेकिन तभी कुत्ते भौंकने लगे। भागने की प्रक्रिया में पैसे का थैला कहीं गिर गया। उस पैसे के लिए वह तड़पता था। उसने अपनी मृत्यु के दिन उस पैसे का साक्षात्कार किया। पैसा एक सूखे गहरे चट्टानी कुएँ में पड़ा हुआ था। उसने कुएँ में छलांग लगा दी। तभी उसका परिवार रो पड़ा। घर में उसकी मृत्यु का शोक छा गया।

© श्री रामदेव धुरंधर

15 – 06 — 2024

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चुप्पी – 18 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  चुप्पी – 18 ? ?

(लघु कविता संग्रह – चुप्पियाँ से)

क्या आजीवन

बनी रहेगी तुम्हारी चुप्पी?

प्रश्न की

संकीर्णता पर

मैं हँस पड़ा,

चुप्पी तो

मौत के बाद भी

मेरे साथ ही रहेगी!

© संजय भारद्वाज  

प्रातः 9:01 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना ज्येष्ठ पूर्णिमा तदनुसार 21 जून से आरम्भ होकर गुरु पूर्णिमा तदनुसार 21 जुलाई तक चलेगी 🕉️

🕉️ इस साधना में  – 💥ॐ नमो भगवते वासुदेवाय। 💥 मंत्र का जप करना है। साधना के अंतिम सप्ताह में गुरुमंत्र भी जोड़ेंगे 🕉️

💥 ध्यानसाधना एवं आत्म-परिष्कार साधना भी साथ चलेंगी 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #243 – 128 – “तुम हर वक्त ख़ुद से ही लड़ते रहते हो…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल तुम हर वक्त ख़ुद से ही लड़ते रहते हो…” ।)

? ग़ज़ल # 128 – “तुम हर वक्त ख़ुद से ही लड़ते रहते हो…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

नसीब  सबके  कुछ  इसी तरह होते हैं,

तुम्हारी क़िस्मत में कुछ भी अजीब नहीं।

*

तुम हर वक्त ख़ुद से ही लड़ते रहते हो,

जमाने में  तुमसे बड़ा कोई रक़ीब नहीं।

*

इस महफ़िल में सब सुनाने आए खुदी को,

तुम्हारी ग़ज़ल  सुनने  कोई  अदीब नहीं।

*

इश्क़ का  अमृत चख  कर देख यारा तू,

है  आबे जमज़म  नरक की ज़रीब नहीं।

*

मुसीबत से  निकलने  तरसता  आतिश,

सिवाय फ़ना अब बची कोई तरकीब नहीं।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 404 ⇒ कड़वाहट (Bitterness)… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “कड़वाहट (Bitterness)।)

?अभी अभी # 404 ⇒ कड़वाहट (Bitterness)? श्री प्रदीप शर्मा  ?

हमारा भारतीय दर्शन जीवन में मिठास घोलता है, कड़वाहट नहीं। दो मीठे शब्द, कुछ मीठा हो जाए। यहां अगर जन्म उत्सव है है, तो मृत्यु भी उत्सव।

जन्म पर बधाई गीत तो विवाह के अवसर पर बैंड बाजा बारात और अंतिम विदाई भी गाजे बाजे के साथ। जन्मदिन पर केक तो तेरहवें पर भी नुक्ति सेंव, लड्डू।

परीक्षा के दिनों में मां घर से दही शक्कर खिलाकर पाठशाला भेजती थी। गर्मी के मौसम में जगह जगह मधुशालाओं में गन्ने का रस नजर आता था।

एकाएक बच्चन जी एक और ही मधुशाला लेकर आ गए, जहां हिन्दू मुस्लिम आपस में बैठकर प्यालों में कड़वा पेय का सेवन करने लगे। बस तब से ही खुशी के पल हों, या गम गलत करना हो, यह कड़वी चीज हमारे मुंह लग ही गई।।

आज जगह जगह गन्ने के रस की नहीं, शासकीय देशी और विदेशी मदिरा की मधुशालाएं लोगों के जीवन में जहर घोल रही हैं। जिस तरह लोहा लोहा को काटता है, कुछ लोगों का यह भ्रम है कि आत्मा की कड़वाहट इस कड़वी चीज से कुछ कम हो जाती है।

जैसे जैसे यह कड़वा जहर शरीर में फैलने लगा, इंसान की कड़वाहट भी बढ़ने लगी ;

कोई सागर दिल को बहलाता नहीं।

बेखुदी में भी करार आता नहीं।।

कौन सा जहर ज्यादा खतरनाक है, कड़वे नशे का जहर अथवा नफरत का जहर, इसका फैसला करना इतना आसान नहीं। उनकी जुबां तो पहले ही कड़वी थी, बेचारा करेला मुफ्त ही बदनाम हो गया।

मीठे बोलने से कोई बीमारी नहीं होती, लेकिन हां मीठा खाने से जरूर होती है, और वह भी मधुमेह ही है। कड़वी शराब से मधुमेह बढ़ता है और कड़वे पदार्थ नीम, करेला, मैथीदाना मधुमेह को कंट्रोल करते हैं।।

कौन है जो हमारे रिश्तों में कड़वाहट घोल रहा है, भाई और भाई के बीच दीवारें खड़ी हो रही हैं। जिस जुबां से कभी शहद टपकता था आज वही जबान अभद्र, अश्लील और बुरी तरह कड़वी हो गई है। बात बात पर तैश खाना और आपा खोना क्या हमारा नैतिक पतन है अथवा तामसी जीवन का असर। कहीं इसके लिए हमारी शिक्षा दीक्षा अथवा आसपास का वातावरण तो जिम्मेदार नहीं।

भौतिकता की अंधी दौड़, पारिवारिक और सामाजिक जीवन में प्रेम और सद्भाव का अभाव शायद कुछ हद तक इसके लिए जिम्मेदार हो। सद्बुद्धि, आचरण की शुद्धता, संयम, विवेक और परस्पर प्रेम ही इस बढ़ती कड़वाहट को दूर कर सकता है। काश ऐसी कोई मधुशाला हो जहां ;

अरे पीयो रे

प्याला राम रस का।

राम रस का प्याला

प्रेम रस का।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares