(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं “मुक्तक – गीत रमता गया…”।)
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण ग़ज़ल “दर्द-ए-गम बेहिसाब लिखता हूँ…”. आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 180 ☆
☆ “दर्द-ए-गम बेहिसाब लिखता हूँ…” ☆ श्री संतोष नेमा ☆
💐 The GLOBAL WRITERS ACADEMY has awarded Captain Pravin Raghuvanshi the BEST POET. 💐
It’s a great pleasure to share with you all that Capt. Pravin Raghuvanshi ji has been awarded the Best Poet by the Global Writers Academy. Shri Biswananda Sinha, President, Global Writers Academy, announced this great news on the occasion of the 77th Independence Day celebrations of our beloved country India.
Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.
Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.
Capt. Raghuvanshi ji is the Editor (English) of this popular e-magazine, www.e-abhivyakti.com.
💐 The e-abhivyakti family congratulates Capt. Pravin Raghuvanshi ji for this great achievement. 💐
☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
(कारण कुटुंब, समाज आणि राष्ट्र आपल्या प्रत्येक घटक जनांचे संरक्षण, पालन आणि पोषण करत असते. असा मोठा फायदा असल्याने या संकल्पना जगात आज खोलवर रुजल्या आहेत.) – इथून पुढे
सद्य परिस्थितीत राष्ट्र ही सर्वात मोठी व्यवहारी संकल्पना आहे. देशाच्या अंतर्गत समाजकंटकांपासून न्यायप्रिय लोकांचे रक्षण करण्यासाठी पोलिस व न्याययंत्रणा असतात. राष्ट्राचे शत्रूराष्ट्राच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी सीमेवर सेनादले कार्यरत असतात.
दुसऱ्याच्या कष्टाचे ओरबडण्याला चोरी वा लुट असे म्हणतात. राष्ट्र सुद्धा चोऱ्यामाऱ्यांचा शॉर्टकट घेवून मोठे होण्याचा प्रयत्न करतात. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून तेथील साधनसंपत्तीची लुटालुटली केल्याची अगणित उदाहरणे इतिहासात सापडतील.
भारताने मात्र आजवर कुठल्याही राष्ट्रावर असा अन्याय केला नाही. पण भारतीयांच्या या सभ्यपणाला कदाचित भारताची कमजोरी समजली गेली. त्यामुळे खैबर खिंडीतून भारतावर आजवर अनेक आक्रमणे आली.
एक हजार वर्षांपुर्वी भारताची अर्थव्यवस्था इतकी मजबुत होती की जगाच्या GDP च्या 37% वाटा एकट्या भारताचा होता. इतकी आर्थिक सुबत्ता असुनही सैन्यदले कमकुवत ठेवण्याची चुक आपल्या पुर्वजांनी केली. परिणामी एक हजार वर्षांची गुलामगिरी आणि प्रचंड आर्थिक शोषणाला भारत बळी पडला.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची GDP जगाच्या GDP च्या केवळ 3% इतकीच शिल्लक राहिली होती. कधी काळी सोन्याचा धुर निघणारा संपन्न देश स्वतंत्र होईपर्यंत पार उघड्या-नागड्या लोकांचा देश झाला होता.
सीमेवर सेना सज्ज असेल तर देशाअंतर्गतही शांतता आणि स्थैर्य राहते. देशाअंतर्गत शांतता आणि स्थैर्य असेल तर देशात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की शेती, व्यापार आणि उद्योगधंदे बसतात. परकीय गुंतवणूक निघून जाते. म्हणून देशांच्या सीमेवर शांतता राहणे महत्वाचे असते.
सीमेवर पराक्रमी सेना पहारा करत असेल तर देशामध्येही कायद्याचे राज्य येते. शांत आणि स्थिर वातावरणात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. परकीय गुंतवणूक वाढते. तंत्रज्ञानाचा विकास होतो. आर्थिक सुबत्ता येते. या आर्थिक सुबत्तेतून सेना सक्षम होते. सक्षम सेनेच्या फक्त धाकाने शत्रू आक्रमणाची हिंम्मत करत नाही. त्यातून देशात अजून स्थिरता आणि स्थैर्य येते. अशा प्रकारे सेनेच्या रक्षणातून शेती-व्यापार-व्यवसाय वाढतात. तसेच शेती-व्यापार-व्यवसाय वृद्धीतून सेना सुदृढ होते. या सकारात्मक चक्रातून राष्ट्र बलवान आणि संपन्न होत जाते.
देशाची सेना मजबुत करण्याची जबाबदारी फक्त एकट्या सरकारची नसून राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची असते. सेनेसाठी नागरिक जेव्हा तण-मन-धन अर्पण करतात तेव्हा सेना बलवान होते. सेनेवर नागरिक तण-मन-धन अर्पण करत असतील तर सेनेचे मनोबल वाढते. शेवटी प्रत्येक सैनिकाला ‘मी कुणासाठी जीव धोक्यात घालून लढतोय’ हा प्रश्न पडतोच की!
पायाजवळचा स्वार्थ पाहणे सोडून सेना संवर्धनाचा दुरचा विचार करणारे सुज्ञ नागरिक ज्या देशात राहतात त्या देशाची सेनादले मजबूत होतात. ते जीव तोडून देशाचे रक्षण करतात. तिथेच प्रगती होते. हेच देश आज विकसित म्हणून गणले जातात.
कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलांचे आपण देणे लागतो का? असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडायलाच हवा. कुणी असे म्हणू शकते की इतके मोठे सैन्यदल! मी एकटा अशी किती मदत करू शकतो? पण सामान्य भारतीयांकडे अशी एक शक्ती आहे जी कुठलाही बदल घडवून आणू शकतो. ती शक्ती आहे संख्याबळ!
140 कोटींचा देश! प्रत्येकाने 100 रुपये दिले तरी 14000 कोटी जमतील. देशातील लोकांच्या एक वेळच्या चहा-नाष्ट्याच्या पैशात संपुर्ण सैन्याला बुलेटप्रुफ जॕकेट मिळाले असते. पण तरी जवानांना इतकी वर्षे वाट पहावी लागली.
जर लोकांनी पैसे जमा केले तर हा सगळा पैसा योग्य मार्गाने जाणेही आवश्यक असते. नाहीतर अशा पैशांना वेगवेगळ्या वाटा फुटून तो पैसा ठगांच्या खिशात जातो. इंटरनेटवर थोडे पाहिल्यावर कळाले की सैन्यदलांनी त्यासाठी छान व्यवस्था करून ठेवलेली आहे.
National Defence Fund !
1962 च्या युद्धात सामान्य जनतेने यथाशक्ति मदत केली व कोट्यावधी रुपये सैन्याला दिले. या पैशाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी National Defence Fund ची स्थापना झाली. या फंडात आपण नेट बँकींगने आॕनलाईन पैसे पाठवू शकतो.
2016 सालच्या उरी हल्ल्यानंतर मी हादरून गेलो होतो. त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने मला रोमांचित केले होते. पण 2019 च्या जानेवारीत उरी चित्रपट पाहिल्यावर मी सर्जिकल स्ट्राईक मधील खरा थरार अनुभवला. त्यात डोणज्याच्या दवाखान्यात मला दाखवायला BSF चा हा जवान आला होता. त्याची गोष्ट ऐकली आणि अंगावर काटा आला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून हा जवान वाचला होता. त्याचा मित्र आणि सहकारी मात्र इतके नशीबवान नव्हते. सैन्यदलासाठी आपणही काहीतरी करावे हा विचार मनातून काही केल्या जाईना.
प्रत्येक वर्षी एका सैनिकाला लागणारे बॕटल गिअर खरेदी करता येतील इतके पैसे National Defence Fund मध्ये द्यावेत यावर मी विचार करू लागलो. मग नेटवर सैन्यदलांच्या सौद्यांविषयीच्या जुन्या बातम्या शोधल्या. सैन्यातील मित्रांना विचारले. थोडी माहिती मिळाली.
Bullet proof jacket- कंपनी SMPP Pvt Ltd- किंमत प्रतिनग 35000 रुपये
Assalt rifle- कंपनी SIG SAURE / कंपनी AK203- किंमत प्रतिनग साधारण 80000 रुपये
Helmet- कंपनी Kanpur-based defence firm MKU- किंमत प्रतिनग 10800 रुपये
Helmet mounted Night vision camera – कंपनी PVS 7 Gen 3 Night Vision Goggles- किंमत 65000 रुपये.
एकूण 35000 + 80000 + 10800 + 65000 = 190800 म्हणजे वर्षाला 200000 /- रुपये.
हा सर्व विचार चालू असतानाच 14 फेब्रुवारी 2019 ची पुलवामाच्या आत्मघाती स्फोटाची बातमी आली. एक दहशदवादी स्वतःबरोबर चाळीस चाळीस जवान उडवून देतो. मन विषन्न झाले. देशाच्या शत्रूंची विद्ध्वंसक मानसिकता यातून पुन्हा जाणवली. दर वर्षी सैन्य दलाला दोन लाख रूपये द्यायचा मी तात्काळ निश्चय केला.
खरे तर दोन लाख ही रक्कम माझ्या कमाईचा मोठा भाग होता. पण माझा निर्णय पक्का झाला होता. आता मागे फिरण्याचा विचारही शक्य नव्हता. माझ्या दवाखान्याशिवाय मी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आॕपरेशन करायला जातो. त्याचे जे पैसे मिळतात ते या कामासाठी वापरायचे असे मी ठरवले. बायकोला बेत सांगितला. ती तर माझ्यापेक्षा जास्त खुष झाली. “नक्की करा आणि घरखर्चाची चिंता करू नका. या कामात काही मदत लागली तर मलाही सांगा” असं ती म्हणाली. आणखी हुरूप वाढला.
पहिले इंटरनेट बँकींग ॲक्टिव्हेट करून घेतले. पहिले दोन लाख नॕशनल डिफेंस फंडाला पाठवले. काही मिळाले की आनंद मिळतो याचा अनुभव आजवर होता. देण्यातही खुप आनंद असतो याची मला प्रथमच प्रचीती आली.
☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग १ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
पिंजर्यात कोंडलेल्या प्राण्यांप्रमाणे या वर्षी सगळ्या मुलांची अवस्था झाली होती. सारखे सारखे घरी बसून कंटाळा आला होता. गणपती आले आणि गेले सुद्धा! मुलांना काॅलनीमधल्या, बिल्डींगमधल्या गणपतीबाप्पाची आरती मनसोक्त करायला मिळालीच नाही. प्रसादाच्या खाऊची गंमत नाही की कुठली स्पर्धा नाही. बाप्पा घरी गेल्याबरोबर घरी बसून ऑनलाईन शाळा सुरू.
अथर्वनं आज ठरवलंच होतं, बाईंना आज काही म्हणजे काही शिकवू द्यायचं नाही. काहीतरी वेगळं करायचं. मोठ्या उत्साहात तो स्क्रीनसमोर बसला. वर्गातली सगळी मुलं दिसल्यावर बाईंनी बोलायला सुरूवात केली. “मुलांनो, आज तुम्हाला असं वाटतंय ना गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हालाऽ” “नको तो अभ्यास, नको ते शिकणे”. अथर्व जोरात ओरडला, “होऽय. नकोच आहे अभ्यास.”
आई-बाबांनी आणि आजींनी चमकून अथर्वकडे पाहिलं. आज काय झालं याला? एवढा जोरात का ओरडतोय? तेवढ्यात तिकडे बाई पण जोरात म्हणाल्या, “आज मुळी नाहीच करायचा अभ्यास.” सगळी मुलं खुष. अथर्वच्या चेहर्यावर आनंद पसरला. बाई आता काय सांगताहेत, याकडे मोठ्ठे डोळे करून तो पहायला लागला आणि मनापासून ऐकायला लागला. बाई म्हणाल्या, “तुम्ही सगळ्यांनी उद्या मला, तुम्हाला आपण काय असतो तर आवडलं असतं, ते सांगायचं. म्हणजे बघा हं, अवनीला वाटतं, मी फुलपाखरू असायला पाहिजे होतं. रमाला वाटतं, मी पाण्यातला मासा असते तर किती छान झालं असतं. आर्यन सांगेल तो घोडा असता तर गाडीपेक्षा जोरात, हाय स्पीडनं धावला असता. राधा म्हणेल, नाही बाई, मी आपलं मनीमाऊचं पिल्लूच होणार. सुश्रियाला पक्षी होऊन उंच आकाशात उडायला आवडेल. अथर्वला वाटेल हत्तीचं पिल्लू होऊन सोंडेनं पाणी मारायला मिळेल. जंगलात फिरायला मिळेल. ओके? आता सगळ्यांनी मोबाईल बंद करायचा आणि शांतपणे विचार करायचा. आपल्याला काय वाटतं, ते वहीमध्ये लिहायचं आणि उद्या वाचून दाखवायचं. अंडरस्टूड?”
व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक म्हणून सामाजिक क्षेत्रात गेली 25 वर्षे काम करीत आहे.
वाचन आणि लेखनाची आवड. विविध नामवंत वर्तमान पत्रामध्ये सामाजिक प्रकल्पा विषयी लेखन प्रसिद्ध तसेच सामाजिक आशय असलेल्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
२०१६ मध्ये मे महिन्याच्या एका रविवारी पहिल्यांदा संडे डिश या नावाने लघुकथा लिहिली. ती व्हॉटसपवर पाठवली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आजतागायत सलग 373 रविवार विविध विषयांवरच्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
संडे डिश या रजिस्टर ब्रॅंड नावाने दर रविवारी सकाळी प्रसिद्ध होणारी लघुकथा वाचणं हा अनेक रसिकांसाठी रविवारचं नवं रुटीन झालयं.
अभिवाचन,ऑडिओ,व्हिडीओ,पुस्तक या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध वाचकांपर्यंत पोहचलेल्या संडे डिशचं पुस्तकही प्रसिद्ध झालंय.
मनमंजुषेतून
☆ “कोसळणारा पाऊस…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
साल १९८६…
पावसाळ्याचे दिवस,मी सातवीत असतानाची गोष्ट.संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी न जाता ग्राऊंडवर खेळत होतो. ढग दाटून आल्याचं खेळण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. शिपाईमामा ओरडल्यावर निघालो. काही वेळातच धो धो पावसाला सुरवात झाली. एका दुकानाच्या शेडमध्ये उभा राहिलो. दोन तीन लोक आधीपासून होतेच. पावसाचं आक्राळविक्राळ रूप पहिल्यांदाच बघत होतो. सुरुवातीला भारी वाटलं परंतु वीजांचा कडकडाट,लाईट गेलेले,सगळीकडे अंधार झाल्यावर घाबरलो. बराच वेळ झाला तरी पाऊस पडतच होता. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. खूप रडू येत होतं पण कसबसं आवरलं, कारण आजूबाजूला सगळे अनोळखी. रस्त्यावरसुद्धा फार गर्दी नव्हती. धीर सुटत चाललेला.
’काय व्हायचं ते होऊ दे, पण थांबण्यापेक्षा भिजत जाऊ ’ असं सारखं वाटायचं पण हिंमत होत नव्हती. सडकून भूक लागलेली. शेवटी कसंबसं रोखून धरलेलं रडू फुटलंच. हमसून हमसून रडायला लागलो तेव्हा सोबतच्या लोकांनी पाठीवरून हात फिरवत धीर दिला. इतक्यात…………
……. माझ्या नावाची नेहमीची हाक ऐकायला आली. कान टवकारले तर आवाज ओळखीचा वाटला. शर्टाच्या बाहीनं डोळे पुसून अंधारात आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर समोर गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट, शर्ट, एका हातात जुनी छत्री अन दुसऱ्या हातात स्टीलची मोठी बॅटरीच्या प्रकाशात आडोशाला थांबलेल्या प्रत्येकाकडं कावऱ्याबावऱ्या नजरेनं पाहणारे ‘नाना’ दिसले. जीव भांड्यात पडणं ही शाळेत शिकवलेली ‘म्हण’ पुरेपूर अनुभवली. “ नाना,नाना ” मोठयानं ओरडत पावसाची पर्वा न करता नानांच्या दिशेने धावत गेलो आणि घट्ट बिलगून जोरजोरात हमसून हमसून रडायला लागलो. नानांनी उचलून कवटाळलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं.
“ नाना,तुम्ही रडताय ”
“ नाही रे.पावसाचं पाणी तोंडवर उडलयं ”.. नानांनी तोंड फिरवून डोळे पुसलेले पाहिलं पण गप्प बसलो. घरी जाताना पाऊस होताच परंतु आता भीती वाटत नव्हती, कारण खांद्यावर दफ्तर एका हातात छत्री, बॅटरी असलेला हात मी घट्ट पकडलेला.. असे ‘नाना’ सोबत होते. हिमालयासारखा भक्कम आधार असल्यानं काही वेळापूर्वी भीतीदायक वाटणारा पाऊस आता भारी वाटत होता.
—-
साल २०२3
पावसाळ्याचे दिवस … संध्याकाळी पाच वाजताच आभाळ भरून आल्यानं लवकर अंधारलं. घाईघाईत ऑफीसमधून निघालो, तितक्यात धो धो कोसळायला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा जोर वाढत होता. लगेच ट्राफिक जाम,जागोजागी पाणी साठलं मग नेहमीप्रमाणे …. ..चीड, संताप, वैताग, हतबलता अशा भावना मनात येऊन नंतर सवयीनं शांत झालो. इंच इंच गाडी दामटत तब्बल दीड तासानं घरी पोचलो. सगळीकडे अंधार होता. अंगात रेनसुट असूनही ओला झालोच. मला पाहून बायको प्रसन्न हसली.
“देवाची कृपा !! सुखरूप आलात”
“काय भयानक पाऊस आहे. ”
“हो ना.तुम्ही येईपर्यंत जीवात जीव नव्हता. पाऊस अन त्यात हा अंधार,फार भीती वाटत होती.”
“नाना आणि चिरंजीव कुठयंत ”
“नाना रोजच्याप्रमाणे फिरायला गेलेत आणि लेकाचा फोन आला होता दहा मिनिटात घरी येतोय.”
“एवढ्या पावसात फिरायला??”
“ते बाहेर पडले तेव्हा पाऊस नव्हता. सारखा फोन करतेय पण उचलत नाहीत.”
“छत्री??”
“नाही नेली. मी सांगितलं,जाऊ नका, तरीही बाहेर पडले.”
“त्यांना घेऊन येतो. छत्री दे”
“आधी घरात या. कपडे बदला तोपर्यंत मी चहा करते. मग जा”
“नको.जवळच कुठेतरी असतील आधी त्यांना घेऊन येतो मग निवांत चहा !!!”
अंगात रेनकोट असूनही छत्री घेऊन चालतच बाहेर पडलो. सोसायटीत,रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य होतं….. ‘ काही गरज नव्हती.एक दिवस घरात बसले असते तर काही बिघडलं नसतं पण ऐकायचं नाही ’ स्वतःशीच चडफडलो.
मोबाईल टॉर्चमध्ये आडोशाला थांबलेल्यामध्ये शोधत होतो पण नाना दिसले नाहीत. फोन केला तर उचलला नाही. चक्क कॉल कनेक्ट झाला.
“ नाना,नाना मी बोलतोय.कुठे आहात ”.. काहीच प्रतिसाद नाही. मी ‘हॅलो,हॅलो’ करत असतानाच फोन कट झाला. पुन्हा कॉल केला. नुसतीच रिंग वाजत होती. काहीवेळानं उभा असलेला प्रत्येक माणूस नानांसारखाच वाटायला लागला. जवळ जाऊन पहायचं, खात्री पटली की पुढे जायचं, असं करत करत घरापासून दोन चौक पुढे आलो पण…. मनातली धाकधूक वाढली. सत्तरी पार केलेले नाना कुठं असतील, कसे असतील, काय करत असतील, .. ‘मन चिंती ते वैरी ना चिंती’ हेच खरं.
पुढे असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये चारपाच जण उभे होते. जवळ जाऊन पाहीलं पण पुन्हा निराशा. पुढे निघालो. पुन्हा फोन केला अन मागे असलेल्या दुकानाच्या बाजूनं ओळखीची रिंगटोन ऐकायला आली. जोरजोरात “नाना,नाना” अशा हाका मारायला लागलो. तेव्हा तिथल्या माणसांमध्ये हालचाल जाणवली. सर्वात मागे उभे असलेले नाना सावकाश पावलं टाकत पुढे आले. भीतीमुळे हात थरथरत होते. डोळे किलकिले करून ते अंदाज घेत होते. अंधारामुळे मला ओळखलं नाही. त्यांना सुखरूप पाहून अतिप्रचंड आनंद झाला.
“नाना !!!” म्हणत मिठी मारली तेव्हा त्यांनी घट्ट पकडलं. त्यावरून मन:स्थितीचा अंदाज आला. खांद्यावर डोकं ठेवल्यावर दिलेले हुंदके जाणवले, तेव्हा मीसुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकलो नाही.
“चला” पुढे केलेला हात त्यांनी घट्ट पकडला आणि काठी टेकवत चालू लागले.
“मी आहे काळजी नको”
“आजकाही खरं नव्हतं. मी तर आशा सोडली होती.वाटलं की आता……” कापऱ्या आवाजात नाना म्हणाले.
“नका टेंशन घेऊ. फोन का घेतला नाही”
“कसा घेणार, गडबडीत चष्मा फुटला. नीट दिसत नव्हतं. त्यात अंधार, एकदोनदा घेतला तर आवाज आला नाही म्हणून.. खरं सांगू खूप घाबरलो होतो. देवासारखा धावून आलास.”
“आठवतं… माझ्यासाठी तुम्हीपण असंच शोधत आला होता.” नाना फक्त हसले…..
… घरी जाताना मोबाईल वाजायला लागला मी दुर्लक्ष केलं. एका हातात छत्री अन दुसरा हात नानांनी पकडलेला.
काळासोबत आम्हां बापलेकाच्या आयुष्यातल्या जागा, भूमिका आणि जबाबदाऱ्या सगळं सगळं बदललं. फक्त एक गोष्ट कायम होती ती म्हणजे कोसळणारा पाऊस. आमच्या बदलत्या नात्याचा साक्षीदार …..
सोसायटीत पोचलो तेव्हा समोरून छत्री घेऊन येणारे चिरंजीव भेटले….
“बाबा,फोन का रिसिव्ह करत नाही”
“पाऊस होता म्हणून…”
“आईनं सगळा प्रकार सांगितला. तुम्ही दोघंही बाहेर, त्यात फोन उचलत नाही, मग शोधायला निघालो” .
नाना आणि मी एकमेकांकडे पाहून हसलो तेव्हाच लाईट आले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला त्यात कोसळणारा पाऊस फारच सुंदर दिसत होता.
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या ऋचा उषा देवातेला आवाहन करतात.
या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी अश्विनीकुमार देवतांना उद्देशून रचलेल्या सतरा ते एकोणीस या ऋचा आणि उषादेवतेला उद्देशून रचलेल्या वीस ते बावीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
आश्वि॑ना॒वश्वा॑वत्ये॒षा या॑तं॒ शवी॑रया । गोम॑द्दस्रा॒ हिर॑ण्यवत् ॥ १७ ॥
अश्वधनुंच्या संगे घेउनी पशुधनाला या
सुंदरशा हे अश्विन देवा आम्हा आशिष द्या
प्रसन्न होऊनी अमुच्यावरती दान आम्हा द्यावे
वैभवात त्या सुवर्ण धेनू भरभरुनी द्यावे ||१७||
☆
स॒मा॒नयो॑जनो॒ हि वां॒ रथो॑ दस्रा॒वम॑र्त्यः । स॒मु॒द्रे अ॑श्वि॒नेय॑ते ॥ १८ ॥
व॒यं हि ते॒ अम॑न्म॒ह्यान्ता॒दा प॑रा॒कात् । अश्वे॒ न चि॑त्रे अरुषि ॥ २१ ॥
विविधरंगी वारू सम तू शोभायमान
तेजाने झळकिशी उषादेवी प्रकाशमान
सन्निध अथवा दूर असो तुझे आम्हा ध्यान
येई झडकरी आम्हासाठी होऊनिया प्रसन्न ||२१||
☆
त्वं त्येभि॒रा ग॑हि॒ वाजे॑भिर्दुहितर्दिवः । अ॒स्मे र॒यिं नि धा॑रय ॥ २२ ॥
सामर्थ्याने सर्व आपुल्या ये करि आगमन
उषादेवते आकाशाच्या कन्ये आवाहन
संगे अपुल्या घेउनी येई वैभवपूर्ण धन
दान देई गे होऊनिया आमुच्यावरी प्रसन्न ||२२||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)