☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर ☆
वैभव जोशी यांच्या गझलचं रसग्रहण
आज त्यांची देवप्रिया(कालगंगा)वृत्तातली एक गझल मी रसग्रहणासाठी घेतली असून त्यातील प्रत्येक शेराचा आशय माझ्या कुवतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आणखी अनेकांना यातील शेरांच्या अर्थाचे वेगळे पदर उलगडतीलच.
आजची रचना
द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा
लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा
तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी
पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा
जे युगांपासून काहीही कधी ना बोलले
त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा
काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका
त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा
मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले
माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा
वैभव जोशी
आता प्रत्येक शेराचा आशय आपण पाहू..
शेर क्र.१
द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा
लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा
एका लेखकासाठी किंवा साहित्यिकासाठी त्याची लेखणी हीच त्याला मिळालेली अमोघ अशी ताकद असते.आपल्यापाशी असलेली शब्दसंपदा लेखणीच्या माध्यमातून तो रसिक मायबापापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो.पण या लेखणीतून फक्त शब्दबुडबुडे बाहेर न पडता जगातल्या दुःखितांच्या,पीडितांच्या वेदना जाणून घेण्याचं सामर्थ्य दे असं मागणं गझलकार ईश्वराकडे मागत आहे!खूप सुंदर असा मतल्याचा शेर!
शेर क्र.२
तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी
पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा
या शेरात गझलकार वरवर अगदी साधं वाटणारं पण अतिशय कठीण,सत्वपरीक्षा पाहणारं मागणं ईश्वराकडे मागत आहेत.आपल्या अवतीभवती भुकेने तडफडणारे अनेक लोक आहेत आणि अशी वेळ कुणावरही,कधीही येऊ शकते!यदाकदाचित असा प्रसंग स्वतःवर कधी आलाच तर एकवेळ पोटाची खळगी भरायला भाकरी नाही दिलीस तरी चालेल,पण भूक सहन करण्याचं बळ दे,आणि तशा अवस्थेतही स्वत्वाची भावना कधी ढळू देऊ नकोस,पोटासाठी लाचारी पत्करायला लावू नकोस असं गझलकारांचं मागणं आहे..असं कुणी एखादाच मागू शकतो कारण आज माझं हक्काचं आहे ते हवंच पण दुसऱ्याचं आहे तेही हवं अशी लोकांची मनोधारणा बनत चालली आहे!खूप गहन अर्थाचा शेर!
शेर क्र.३
जे युगांपासून काहीही कधी ना बोलले
त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा
वाह! या जगात जसे असामान्य लोक आहेत तसेच अतिसामान्यही आहेत.कुणी सडेतोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतो तर कुणी मूग गिळून बसत सतत अन्याय सहन करत राहतो.बळी तो कान पिळी या न्यायाने मोठा अधिक मोठा होत जातो आणि सर्वसाधारण आहे तो जैसे थे अवस्थेत पिचून जातो.प्रत्येक युगात हे असंच चालत आलंय पण अशा वंचितांना आपली व्यथा बोलून दाखवण्याची स्फूर्ती परमेश्वराने द्यावी,त्यांच्या जाणिवा जागृत व्हाव्यात असं या शेरात गझलकारांचं मागणं आहे!सुंदर शेर!*ज्येष्ठ दिवंगत गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांची
बोल बाई बोल काही
हा अबोला ठीक नाही
असा शेर असलेली गझल मला सहज आठवली हा शेर वाचताना!
शेर क्र.४
काय कामाचा गड्या ओठातला हा हुंदका
त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा
हाही शेर खूप उंचीचा खयाल असलेला!आधीच्या शेरात म्हटल्याप्रमाणे युगानुयुगे केवळ अन्याय सहन करत कुढत जगणाऱ्या माणसांच्या शब्दांना कधी तरी वाचा फुटावी आणि मनात दाटून आलेलं सगळं बाहेर यावं जेणेकरून पुढची वाटचाल सुकर होईल!
हो मोकळी बोलून तू हृदयात जे जे दाटले
का भावनांना आपल्या अव्यक्त मग ठेवायचे
या शेरात म्हटल्याप्रमाणे मनातल्या भावनांची कोंडी फुटल्याशिवाय जगणं सुखाचं होणार नाही आणि त्यासाठीच ईश्वराने आपलं मन मोकळं करण्याची स्फूर्ती माणसांना द्यावी,मूक हुंदके सहन करण्यापेक्षा परिस्थितीचं,काळाचं आव्हान पेलण्याची ताकद दे,अश्रूंपेक्षा हिम्मत दे असं गझलकार इथे सुचवतात.
शेर क्र.५
मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले
माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा
वाह,हा शेवटचा शेर तर एखाद्या पोथीचा कळसाध्याय असावा तसा आहे!सामान्य माणसाला रोजची भाकरी आणि रहायला मठी असावी एवढीच अपेक्षा असते,त्याला कुठल्या शिखरावर जायची आस नसते आणि किमान सुखाचं आयुष्य लाभावं इतकं त्याचं अल्प मागणं असतं.
प्रस्तुत शेरात गझलकार म्हणतात की मला त्या ध्रुवासारखं आकाशातलं अढळपद मिळण्याची लालसा नाही तर अवतीभवतीच्या माणसांच्या काळजातच जागा हवी आहे जेणेकरून त्यांची सुखदुःख,व्यथा वेदना जाणून घेता येतील.स्वतःपुरेसंच जगण्याची संकुचित वृत्ती न जोपासता इतरांची मनं वाचण्याचा व्यापक दृष्टिकोन या शेरात प्रभावीपणे व्यक्त झाला आहे आणि म्हणूनच या शेरातला खयाल खूप उच्च दर्जाचा वाटतो!एका कवीसाठी, गझलकारासाठी माणसं वाचण्याहून दुसरं मोठं काही नसतं असाही एक विचार इथे गवसतो!खूप आवडला हा शेर!
ही रचना मला का आवडली?
देवप्रिया वृत्तातली ही खूप सुंदर रचना आदर्श मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यातला प्रत्येक शेर खास आहे. दे रे ईश्वरा या रदिफला अगदी समर्पक असे वरदान,जाण, त्राण, स्फूर्तीगान,आव्हान आणि स्थान हे कवाफी चपखलपणे वापरले आहेत. लेखणी,भूक,भाकरी,हुंदका,गगनातलं अढळपद अशी प्रतीकं, रूपकं आणि प्रतिमा या रचनेचं सौंदर्य खुलवतात त्यामुळे प्रत्येक शेर वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतो!श्री.वैभव जोशी यांच्या तरल आणि संपन्न प्रतिभेला मनापासून नमस्कार!आजच्या वाढदिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा!
कादंबरीचे सुरुवातच भविष्यकालीन सूचक अशा घटनातून केली आहे. मॅनोर फार्मचा मालक ‘जोन्स ‘ हा दारू ढोसून झोपतो. बाहेर टांगलेला दिवा जोर जोरात झोके घेत असतो. एक ,एक प्राणी हळूहळू मोकळे व्हायला लागतात. ओल्ड मेजर हा वयोवृद्ध डुक्कर (लेनिन) याला सर्वजण मान देत असतात. त्याला स्वप्न पडतं की ,सर्व प्राणी स्वतंत्र होऊन त्यांचीच शेती झाली आहे. तो सर्वांना एकत्र बोलावून आपले स्वप्न सांगतो. सर्वांना पटवून देतो की, हा माणूस तुम्हाला लुटतोय. कोंबड्यांची अंडी ,गाईचे दूध , मेंढ्यांची लोकर सगळं तो वापरतोय. Man is the only enemy we have. Man is the only creature, that consumes without producing. स्वप्न साकार करायचे म्हणून प्रेरणा देतो. सर्वांना उत्साह येतो. सर्व प्राणी फेर धरून गाणे म्हणतात. “beasts of england, beasts of Ireland. beasts of every land and clime. herken to my joyful things of the golden future time. “
प्राण्यांमध्ये प्रचंड उत्साह सळसळतो. आणि सर्वजण मिळून जोन्स (झारला) मॅनोर फॉर्म मधून हाकलून ,ते ताब्यात 1घेतात. ओल्ड मेजर चा अंत होतो. नेपोलियन, बॉक्सर आणि स्क्विलर हे तीन स्वतःला बुद्धिमान समजणारे डुक्कर, (बुद्धिमान बोल्शेविक फार्मचा ताबा घेऊन , मॅनोर फार्मचे नाव बदलून “ॲनिमल फार्म “असे नाव देतात. सर्वांच्या भल्यासाठी, असं सांगून सात तत्व ( कमांडमेंट ) तयार करून ,एका पाटीवर लिहिली जातात. ती रोज सर्वांनी वाचायची असे ठरते.
1 ). What ever goes upon two legs is an enemy.
2) what ever goes upon four legs or has wings,is a friend.
3) no animal shall wear clothes.
4) no animal shall sleep in bed.
5) no animal shall drink alcohol.
6)no animal shall kill any other animal.
7)all animals are equal.
हे वाचता येणारे फक्त बेंजामिन गाढव आणि म्युरिअल शेळी इतकेच होते. मार्च 1917 ला मोन्शेविक गटाने क्रांती केली़. नंतर लेनिन परतला. आणि त्याने बंड करून बोलशेविक क्रांती केली. सर्वसामान्य माणसे स्वातंत्र्याचे स्वप्न पहात होती. समानता आणि स्वातंत्र्याचे स्वप्न बाळगणारा ,बॉक्सर घोडा अखंड कष्टाला तयार असतो. बेंजामिन गाढवही मूकपणे कष्टाला तयार असते. शेळ्या ,मेंढ्या ,छोटे छोटे कोंबड्या, बदकासारखे प्राणी आलेल्या सूचनांप्रमाणे शहानिशा न करता वागणारे नागरिक. लवकरच नेपोलियन आणि स्नो बॉल यांच्यामध्ये संघर्ष होतो. आणि दुसरी क्रांती होते. 26 ऑक्टोबर 1917. नेपोलियनने कुत्र्यांच्या पिलांना बाजूला ठेवून, शिकवून तयार केलेले असते. (गुप्त पोलीस पथक ) त्यांना स्नो बॉलच्या अंगावर सोडून त्याला हाकलून लावून ,सर्वांकष सत्तेवर येतो तो नेपोलियन. (स्टलिन).
हुकूमशाहीला सुरुवात होते. नेपोलियनची पैसा आणि सत्तेची हाव वाढायला लागली. प्रत्येक वाईट गोष्टींना स्लोबल कारणी भूत आणि चांगल्या गोष्टी नेपोलियन मुळे, असा विचार प्राण्यांच्या मनावर बिंबवला गेला. माँली घोडी चैनी होती. ती शहरात पळून गेली.
हळूहळू विंकर या माणसाच्या मध्यस्थीने ,दूध ,अंडी, लोकर, अगदी चारा सुद्धा बाहेर विकून, डुकरांसाठी चैनीच्या वस्तू यायला लागल्या. इतरांची उपासमार व्हायला लागली. काही प्राणी पुन्हा जोन्सकडे जाण्याचा विचार करायला लागले. त्यांना सरळ सरळ मारून टाकले. सगळ्यांच्या काबाडकष्टाने उभी केलेली पवनचक्की शेजारच्या मालकांनी त्यांची फसवणूक केल्याने त्याने उद्ध्वस्त करून केलेल्या गोळीबारात अनेक प्राणी मरून गेले. या सगळ्या गोष्टींना स्नो बॉलच कारणीभूत आहे, असे पसरवले गेले. प्रत्येक वेळी स्क्विलर जोन्सचा गुप्तहेर म्हणून काम करायचा. दूध, अंडी, सफरचंद डुकरे स्वतःसाठी बाजूला ठेवायला लागली. गाद्यांवर झोपायला लागली. दारू प्यायला लागली. मोजेस कावळा ढगांनी पलीकडच्या स्वर्गीय गप्पा सर्वांना ऐकवून , डुकरांकडून दारू मिळवायला लागला. प्राण्यांचं अन्न कमी झालं. हळूहळू करत सातही तत्त्वात बदल झाले.
1) four legs good. two legs better.
2) no animal shall drink excess.
अस करत प्रत्येक तत्व बदल करत करत शेवटी स्वार्थ साधून , सोयिस्करपणे all animals are equal,but some animals are more equal than other. पूर्वीच बिस्टस ऑफ इंग्लंड हे गाणं रद्द झालं. कोणी म्हटलं तर त्याला मृत्युदंड. नवीन गाणं सुरू झालं.
“Friends of fatherless, fountain of. Happiness —– – – – -like the sun in the sky., Comrade Nepoleon. झेंड्याचा रंगही बदलला. सगळं पहाताना प्राण्यांचा गोंधळ व्हायला लागला. अ पवन चक्की चा दगड ओढताना बॉक्सर जखमी झाला.
अत्यंत स्वाभिमानाने प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या बॉक्सरला दवाखान्यात नेतो असं सांगून खोटं सांगून कसा याकडे पाठवलं जातं बेंजामिन गाढवाला सगळं कळत होतो पण गप्प बसून तो सगळं पाहत होता इतर प्राणी खवळले नेपोलियन महान आहे असं शेवटी बॉक्सर बोलला आणि त्याला वीर मरण आले असं स्केलर ने सांगून सर्वांचा राग शांत केला
हळूहळू डुकरे (बोलशेविक) पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागायला लागतात. सर्वसामान्यांना काहीच कळत नाही. जी तात्विक मूल्ये दाखवून सत्तेवर आले , ती मूल्ये बदलून, पूर्वीचे आणि आत्ताचे सत्ताधारी मॅनोर फार्म वर गप्पा मारत असतात. सगळे प्राणी खिडकीतून पाहतात. त्यांना प्राणी आणि माणसात काहीच फरक कळत नाही. सर्वसामान्यांना गप्प बसण्या वाचून मार्ग नसतो. येथे कादंबरीचा शेवट होतो.
☆ तीन लघुकथा (भावानुवाद) – श्री कमल चोपड़ा, सुश्री मीरा जैन, श्री राम मूरत ‘राही’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
☆ (१) चूक… ? की बरोबर…?? – श्री कमल चोपडा (२) यात सौदा कसला ?… – सुश्री मीरा जैन (३) चोरी म्हणजे ??… – श्री राम मूरत ‘राही’ ☆
☆ १. चूक… ? की बरोबर…??(अनुवादित कथा) ☆ श्री कमल चोपडा ☆
नितीनने एक जोरदार शॉट मारला, आणि बॉल जवळच्या एका उघड्या गटारात जाऊन पडला. आता त्या गटारातून बॉल काढणार कोण ? घाण आणि दुर्गंधीने भरलेलं खोल आणि अगदी घाणेरडं गटार होतं ते.
चरणू नावाचा एक मुलगा मोठ्या आशेने त्या मुलांचा खेळ बघत बसला होता ….. ती मुलं त्यालाही त्यांच्यात खेळायला बोलावतील म्हणून वाट बघत होता. पण कोणीच त्याला बोलावत नव्हतं. पण आता मात्र नितीनने त्याला हाक मारली.. “ ए मुला, त्या गटारातून आमचा बॉल काढून दे जा … बघ .. त्यासाठी आम्ही तुला एक रुपया देऊ .. आणि आमच्यात खेळायलाही देऊ. “
चरणू लालचावला, आणि गटारात उतरण्यासाठी त्याच्या कडेला लटकला. पण अचानक त्याचा हात घसरला आणि तो धपकन आतल्या घाणीत जाऊन पडला. तो धडपडत हात-पाय मारायला लागला.. जणू प्राणांची बाजी लावल्यासारखा.
बाकीची मुलं कडेला उभं राहून नुसती हसत होती … कधी एकदा तो बॉल काढून आणतोय याची वाट बघत होती.
“ किती तुच्छ मुलगा आहे ना हा… एक रुपयासाठी या घाणीत उतरलाय ..”
“ ही गरीब माणसं इतकी हपापलेली असतात ना … एक रुपयाच काय, एका पैशासाठी सुद्धा प्राणही देतील हे “
चरणू नेमका त्याचवेळी बाहेर आला होता. डोक्यापासून पायापर्यंत घाणीने बरबटला होता. तोंडालाही सगळी घाण आणि चिखल लागलेला होता.
“ हा घे एक रुपया, आणि आमचा बॉल आम्हाला दे. “…
चरणू त्याच्यापुढे अक्षरशः फेकलेल्या त्या एक रुपयाच्या नाण्यावर पाय ठेऊन उभा राहिला, आणि गंभीर होत म्हणाला, “ या एका रुपयासाठी मी इतका मोठा धोका पत्करला नव्हता .. “
“ मग काय आता शंभर रुपये हवेत की काय तुला ? “
“ नाही. पैसे नकोच आहेत मला .. मला खेळायचंय तुमच्याबरोबर … “
त्याची ती काहीतरी जगावेगळी आणि विचित्र इच्छा ऐकून बाकीची मुलं खळखळून हसायला लागली.
“ साल्या तू आमच्याबरोबर खेळणार ? .. आधी स्वतःची अवस्था बघ कशी झाली आहे ती. असं वाटतंय की एखादं डुक्कर चिखलात मस्त लोळून आलंय …” आणि सगळे आणखीच जोरजोरात हसायला लागले.
“ हे बघा .. मला खेळायचंय … तुम्ही खेळा आणि मलाही खेळू द्या की … घ्याल ना मला खेळायला ..की नाही ? “ … चरणूने जरा आवाज वाढवत विचारलं.
“ तुला सांगितलं ना एकदा… आमचा बॉल आम्हाला दे आणि तू लगेच निघून जा इथून … नाहीतर ..” नितीन चिडून म्हणाला.
“ नाहीतर काय ?.. “ आणि चरणूने जणू जीवाची बाजी लावून तो बॉल ज्या घाणेरड्या खोल गटारातून काढून आणला होता, त्याच गटारात सगळी ताकद एकवटून पुन्हा जोराने फेकून दिला. आणि …
“ आता बघतोच तुम्ही तरी कसे खेळता ते … “ असं म्हणत एका वेगळ्याच निर्धाराने तो तिथून निघून गेला.
………
मूळ हिंदी कथा : खेलने दो
कथाकार : श्री कमल चोपडा, दिल्ली
भावानुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆☆☆☆☆
☆ २. यात सौदा कसला ?… (अनुवादित कथा) ☆ सुश्री मीरा जैन ☆
पाच वर्षांची मुक्ता आज सारखी आत-बाहेर आत-बाहेर करत होती. बहुतेक कुणी तरी येण्याची वाट पाहात होती. मध्येच वरच्या खोलीत जात होती – परत खाली येत होती. गॅलरीत जाऊन लांबवर बघून येणं तर सारखंच चाललं होतं. अचानक झोपाळ्यावर बसून मोठाले झोके घेत होती ….. पण असं सगळं करत असतांना तिचं सगळं लक्ष मात्र बाहेरच्या दाराकडे होतं. इतक्यात तिला तिच्या आजीची हाक ऐकू आली …
“ मुक्ता .. पटकन ये बाळा, नाश्ता करून घे . आज तुझ्या आवडीचा शिरा केलाय बघ.. आज अजून भूक कशी लागली नाहीये माझ्या छकुलीला .. “
“ आजी थांब ना जरा. अजून भूक लागलीच नाही आहे गं मला “..
…. इतक्यात दारात टॅक्सी थांबल्याचा आवाज आला… आणि मुक्ता पळतच दाराकडे गेली. नीता – तिची आई एकदाची तिला दिसली आणि नीताने दारातून आत पाऊल टाकल्याक्षणी ती जाऊन नीताला बिलगली. नीतानेही तिला छातीशी घट्ट कवटाळलं आणि पटापट तिचे मुके घेतले. दोघींच्याही डोळ्यातून आसवांच्या धारा वहात होत्या…. कितीतरी वेळ दोघी तशाच उभ्या होत्या. जराशाने रडतरडतच मुक्ता तिला म्हणाली ..
“ आई आता मला सोडून तू कुठेही जायचं नाहीस हं .. “ नीताने पुन्हा तिला घट्ट मिठी मारली, आणि जणू सगळा आत्मविश्वास एकवटून तिला अगदी ठामपणे सांगितलं … “ नाही बाळा.. नाहीच जाणार .. आता तुला सोडून नाही.. तर तुला माझ्याबरोबर घेऊनच जाणार आहे परत.. “
तिची आईही तोपर्यंत तिथे आली होती. तिचं बोलणं ऐकून ती आश्चर्यचकित झाली होती. न रहावून तिने विचारलं … “ नीता अगं हे काय करते आहेस तू ? ते लोक कधीच मुक्ताचा स्वीकार करणार नाहीत हे चांगलंच ठाऊक आहे तुला .. तुझ्याकडून तसं आधीच कबूलही करून घेतलंय ना त्यांनी … तरीही … ? “
“ हो, ठरलं होतं तसं .. पण आई तूच सांग … एखाद्या पूर्णपणे परक्या मुलाची मी आई होऊ शकते … केवळ त्याच्या वडलांशी मी पुनर्विवाह केलाय म्हणून.. आणि अगदी मनापासून तसा प्रयत्नही करते आहे ना मी. पण म्हणून.. मी जिला जन्म दिलाय त्या माझ्या स्वतःच्या मुलीला मी माझ्यापासून दूर लोटावं … तिला कायमचं विसरून जावं अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे …. मला ते पटणारही नाही.. आणि जमणार तर मुळीच नाही … अगं मी पुन्हा लग्न केलं आहे… याचा अर्थ एखादा सौदा नाही केलाय… माझ्या ममतेचा… माझ्या पोटाच्या गोळ्याचा. …आणि आई, सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं हे. चल मुक्ता.. “…
मूळ हिंदी कथा : पतझड बसंत
कथाकार : सुश्री मीरा जैन, उज्जैन
भावानुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆☆☆☆☆
☆ ३. चोरी म्हणजे ??… (अनुवादित कथा) ☆ श्री राम मूरत ‘राही’☆
मी आणि बायको दर्शन घेऊन देवळातून बाहेर पडलो. पाहिलं तर बाहेर ठेवलेल्या बायकोच्या चपला कुठेच दिसत नव्हत्या. काल-परवाच घेतलेल्या नव्याकोऱ्या चपला होत्या त्या. साहजिकच आम्ही जरा जास्तच अस्वस्थपणे त्या शोधू लागलो. तेवढ्यात मला अगदी गरीब वाटणारा एक पाच -सहा वर्षांचा मुलगा हातात माझ्या बायकोच्या चपला घेऊन जातांना दिसला.
मी पटापटा चालत त्याच्याजवळ गेलो आणि त्याला थांबवून विचारलं.. “ बाळा या चपला घेऊन कुठे चालला आहेस तू ?” — त्याचा कोवळा निरागस चेहेरा पाहून मी रागावू शकलोच नाही त्याच्यावर.
“ घरी चाललोय. “ – तो म्हणाला.
“ ही चप्पल कुठून आणलीस तू ? “
“ देवळाच्या बाहेर ठेवलेली होती – तिथून. “
“ बाळा पण ही चप्पल घेऊन काय करणार तू ? “
“ माझ्या आईला देणार … “
“ आईला देणार ? का ? “
“ कारण माझ्या आईकडे चपला नाही आहेत ना …. आम्ही खूप गरीब आहोत .. “
“ पण बाळा ही तर चोरी झाली ना ? “
“ चोरी ?.. चोरी म्हणजे काय असतं ? “
“ अरे एखाद्याला न विचारता त्याची एखादी वस्तू घेऊन टाकायची याला चोरी करणे म्हणतात.. आणि ही अगदी चुकीची आणि वाईट गोष्ट आहे. “
“ मला तर हे माहितीच नव्हतं “ … तो मुलगा विचार करायला लागला… आणि मग एकदम वळून देवळाकडे जायला लागला. मी त्याला थांबवलं आणि विचारलं .. . “ कुठे निघालास रे .. “
“ देवळात “.
“ का “.
“ चपला ठेवायला “
“ राहू दे बाळा. आता या चपला तू तुझ्या आईला नेऊन दे … जा “.
“ पण या तर चोरीच्या आहेत ना ? “
“ अरे आता या चोरीच्या नाहीयेत “.
“ म्हणजे ? … ते कसं काय ? ‘
“ कारण या आमच्या चपला आहेत, आणि आम्ही तुला त्या घेऊन जाण्याची परवानगी देतोय. “
… हे ऐकून त्या मुलाला फार आनंद झाला होता हे त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं … तो धावतच तिथून निघून गेला.
लगेचच माझी बायको माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि रागानेच म्हणाली .. “ अहो काय तुम्ही …. सरळ माझ्या चपला नेऊ कशा काय दिल्यात त्याला ? “
“ अगं तो त्याच्या आईसाठी घेऊन चालला होता.. म्हटलं ने. तुझ्यासाठी दुसऱ्या घेऊ ना आपण “…
यावर बायकोने त्याच रागाने मान उडवली.
मग मी तिला शांतपणे म्हटलं …. “ एक गोष्ट लक्षात आली नाही का तुझ्या … अगं त्या लहानग्याला आपण तिथल्या चपला उचलतोय म्हणजे “ चोरी “ करतोय…. काहीतरी वाईट काम करतोय .. हे सुद्धा कळत नव्हतं. “ चोरी म्हणजे काय “ हे इतक्या निरागसपणे विचारलं ना त्याने… आणि ते समजल्यावर चपला परत ठेवायला निघाला होता तो… पाहिलंस ना ? आता पुन्हा कधी तो असा वागणार नाही बघ …. खात्री वाटतेय मला “ …..
मूळ हिंदी कथा : मां के लिये – कथाकार : श्री राम मूरत ‘राही’
भावानुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆☆☆☆☆
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ज्योतिष शास्त्रासंबंधीत ‘ व्यवसाय जातक’ नावाचे एक पुस्तक वाचनात आहे. यात ‘सुखवस्तू’ लोकांचे ग्रहयोग दिले आहेत. थोडक्यात खूप काही Ambitious नसलेले , आहे त्यात समाधानी, फारशी रिस्क न घेणारे, परंपरेने आलेला व्यवसाय चालवणारे, मुळ गाव न सोडणारे इ इ लोक्स या वर्गीकरणात येतात. यांच्या पत्रिकेतील ग्रहांचे नाते एकमेकांशी गुण्या- गोविंदाचे असते. उगाच कोण वक्री नसतो, एकमेकांशी स्फोटक केमिस्ट्री नसते , शुभ ग्रह खूप चांगले नसतात, पापग्रह खूप त्रास देत नाहीत.दशा ही फारशा वाईट नसतात. जन्म, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, संतती, निवृत्ती, वृधत्व हे चक्र व्यवस्थित पार पडते.
ऍडजेस्टमेंट, फ्लेक्झिबलपणा त्यांच्या रक्तात असतो. पत्रिकेतील बहुसंख्य ग्रह द्विस्वभाव राशींसंबंधित असतात.
त्यामुळे त्यांचा विशेष काही आग्रह नसतो
थोडक्यात जातकाला आणि ज्योतिषांनाही फारसा ताप न देणारी यांची पत्रिका असते.
” काहीपण ” चालेल हे यांच्या जीवनाचे सूत्र.
आज नाष्टयाला काय करायचे असे घरी विचारले गेले(च) तर – “काहीपण” हेच उत्तर ब-याचदा त्यांच्याकडून येते
फिरायला कुठे जायचे – कुठेही, सिनेमा कुठला बघायचा – ‘कुठलाही’ हीच वृत्ती ते कायम ठेवतात.
उद्या हे मंत्री झाले आणि खातेवाटपाच्या वेळीही फारशी किरकिर न करता ‘काही पण’ चालेल (पण द्या )ही भूमिका ठेवतील.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका भावप्रवण गीत – कुछ कहना है…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 148 – गीत – कुछ कहना है…