(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है। आज प्रस्तुत है आपका एक माइक्रो व्यंग्य – “खामोशी की आवाज…”।)
☆ माइक्रो व्यंग्य # 186 ☆ “खामोशी की आवाज…” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆
चूहा – प्रिये, देख लिया न मेरा जलवा,मेरे जीते-जी किसी की हिम्मत नहीं है कि कोई मेरे बिल में हाथ डाले, एक मेहमान आये थे तो कुछ बिल्ले चिल्ला रहे थे कि इस चूहे के बिल को हेडक्वार्टर बनाने की घोषणा कर दो, यहां ‘जे’ कर दो यहां ‘वो’ कर दो। प्रिये, तुम देख तो रही हो, बहुत आये और गए, हम अपने बिल के क्षेत्र को सबसे पिछड़ा क्षेत्र बनाना चाहते हैं, जहां कोई घुस न सके, विकास से कोसों दूर रखना चाहते हैं, ताकि लोग हजारों साल बाद भी याद रखेंगे कि चूहों को ऐसा भी सरदार मिला था, जो सबको खामोशी से कुतर देता था। भूल जाओ विकास। विकास का मतलब जानते नहीं और विकास -विकास का पहाड़ा पढ़ते हो।
चुहिया – मुझे प्रिये मत बोलना समझे। तुमने हम लोगों को ठगा है जीवन भर से तुम जिस थाली में खाते रहे उसी में छेद करते रहे, क्रीम लगाकर गोरे बनने का कितना भी प्रयास करो मन काला है तुम्हारा। हमारी खामोशी का मजाक मत उड़ाओ…
(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# तुम्हारे बिना… #”)
☆ विचार–पुष्प – भाग 65 – याची देही याची डोळा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
भारतभूमीवर पाऊल ठेवले आणि स्वामीजींचे स्वागत सोहोळे व स्वामीजींना भेटायला ,पाहायला येणार्यांची ही गर्दी या वातावरणाने सारा प्रदेश भारून गेला होता. २७ जानेवारीला स्वामीजी जाफन्याहून पांबन येथे आले. ते रामनाद संस्थानमध्ये उतरले. संस्थांनचे राजे भास्कर सेतुपती स्वत: स्वामीजींना सन्मानपूर्वक घेऊन आले.आल्या आल्याच स्वामीजींना त्यांनी व सर्व अधिकार्यानी साष्टांग नमस्कार केला. खास शामियान्यात औपचारिक स्वागत झालं.विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेला शिकागोला जावे म्हणून प्रयत्न करणार्यात राजे भास्कर सेतुपती होते. स्वागत समारंभा ठिकाणी घोडा गाडीने नेण्यात येत असताना लगेचच गाडीचे घोडे काढून लोकांनी स्वता ती गाडी ओढली आणि एव्हढेच काय स्वता राजे सुधा गाडी ओढण्यात सहभागी झाले होते स्वामीजीं बद्दल एव्हढा आदर सर्वांनी दाखवला. एका संस्थांनाचा अधिपति एका संन्याश्याची गाडी ओढत होता हे दृश्य प्राचीन परंपरेची आठवण करून देत होते.
पांबन नंतर ते रामेश्वरला गेले. स्वामीजी स्वागताला उत्तर देण्यासाठी भाषणकर्ते झाले. त्यांच्या इंग्रजी भाषणाचे तमिळ भाषेत रूपांतर करून सांगण्यात येत होते. सर्वश्रेष्ठ धर्मपुरुषाचा सन्मान मंदिरातील पुजारी व व्यवस्थापक यांनी केला. सजवलेले ऊंट, हत्ती, घोडे असलेली मिरवणूक काढून रामेश्वर मंदिरापर्यन्त नेण्यात आली. इथल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “केवळ मूर्तिपूजा करण्यापेक्षा दरिद्री माणसाला दोन घास अन्न आणि अंग झाकण्यासाठी वस्त्र देणे हाच खरा धर्म आहे”.
रामेश्वर नंतर रामनाद च्या सीमेवर जोरदार स्वागत करण्यात आले. स्वामीजींच्या आगमनार्थ तोफांची सलामीदिली, भुईनळे आतषबाजी केली, हर हर महादेव च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. रामनाद चे राजे स्वता स्वामीजींच्या गाडी समोर पायी चालत होते, पुढे पुढे तर स्वामीजींना घोडागाडीतून ऊतरवून, सजवलेल्या पालखीत बसविण्यात आले, भाषणे झाली, नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या करंडकातून स्वामिजिना मानपत्र अर्पण केले गेले. सत्कारादाखल उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, “प्रदीर्घ कालावधीची रात्र संपत आहे, अत्यंत क्लेशकारक दु:ख मावळू लागले आहे, मृतप्राय वाटणार्या शरीरात नवी चेतना जागी होत आहे, जाग्या होणार्या या भारताला आता कोणी रोखू शकणार नाही, तो पुन्हा निद्रित होणार नाही, बाहेरची कोणतीही शक्ति त्याला मागे खेचू शकणार नाही. अमर्याद सामर्थ्य असणारी ही भारतभूमी आपल्या पायांवर ताठ उभी राहत आहे”. केवळ या सुरुवातीच्या स्वागतासाठी उत्साहाने जमलेल्या स्वदेशातील बांधवांकडे बघून स्वामीजींना एव्हढा विश्वास वाटला होता. आणि आपला देश आता पुढे स्वत:च्या बळावर ताठपणे उभा राहील अशी खात्री त्यांना वाटली होती. एका निष्कांचन संन्याशाचा उत्स्फूर्तपणे होणारा गौरव ही स्वामीजींच्या जगातील कामाची पावती होती.
रामनाद सोडल्यानंतर स्वामी विवेकानंद मद्रासच्या दिशेने रवाना झाले. आतापर्यंत छोट्या छोट्या शहरात व गावातील उत्साह आणि आनंद एव्हढा होता, आता तर मद्रास सारख्या मोठ्या शहरात मोठ्या लोकवस्तीच्या ठिकाणी भव्य सोहळे होणार होते. रामनाद, परमपुडी, मानमदुराई,मीनाक्षी मंदिरचे मदुराई,तंजावर असे करत स्वामीजी कुंभकोणमला आले.कुम्भकोणम नंतरच्या एका रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार नव्हती तिथेही लोक स्वामीजींना बघायला आणि एकदा तरी त्यांचे दर्शन घ्यायला प्रचंड प्रमाणात जमले होते. गाडी थांबणार नाही असे दिसताचा लोक रेल्वे रुळांवर आडवे झाले आणि गाडी थांबवावी लागली तेंव्हा स्वामीजी डब्यातून बाहेर येऊन शेकडो लोकांनी केलेले स्वागत स्वीकारले, छोटेसे भाषण केले. त्यांच्याप्रती आदर दाखवला.
कुंभकोणमहून स्वामीजी मद्रासला आले. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामीजींनी अमेरिकेला जावे यासाठी मद्रास मध्ये खूप प्रयत्न केले गेले होते. त्यामुळे पाश्चात्य देशात उदंड किर्ति मिळवून वेदांतचा प्रचार करून आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्वागताची तयारी खूप आधीपासून केली होती, एक स्वागत समिति स्थापन करण्यात आली होती, पद्धतशीरपणे नियोजन केले गेले होते. वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध केले गेले. स्वामीजींच्या धडक स्वागत समारंभाची वृत्ते प्रसिद्ध होत होती. त्यांनी पाश्चात्य देशात केलेल्या कामांवर अग्रलेख लिहिले गेले. विविध शाळा, संस्था, महाविद्यालये बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणे येथे स्वामीजींना बोलावण्याचा धडाका सुरू होता. मद्रास मध्ये रस्ते, विविध १७ ठिकाणी कमानी, फलक,पताका, असे उत्सवी वातावरण होते. एगमोर स्थानकावर उतरल्यावर (६ फेब्रुवारी १८९७) स्वागत समितीने स्वागत केले. घोष पथकाने स्वागतपर धून वाजविली. मिरवणूक काढण्यात आली दुतर्फा लोक जमले होते, मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, प्रौढ, सर्व सामान्य नागरिक ते सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.
मद्रासमध्ये ९ दिवस मुक्काम होता. अनेक कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या भाषेतील २४ मानपत्रे त्यांना देण्यात आली. खेतडीचे राजा अजितसिंग यांनी मुन्शी जगमोहनलाल यांच्याबरोबर स्वागत पत्र पाठवले होते. कोणी स्वागतपर संस्कृत मध्ये कविता लिहून सादर केली.
७ फेब्रुवारीला मद्रास मध्ये विक्टोरिया हॉल मध्ये मद्रास शहराच्या वतीने स्वामीजींचा मोठा सत्कार समारंभ झाला. जवळ जवळ दहा हजार लोक उपस्थित होते. असे सत्कार स्वामीजींनी याची देही याची डोळा अनुभवले, लोकांचे प्रेम आणि असलेला आदर अनुभवला. पण मनात, शिकागो ल जाण्यापूर्वी आणि शिकागो मध्ये गेल्यावर सुद्धा ब्राम्हो समाज आणि थिओसोफिकल सोसायटीने जो विरोध केला होता, असत्य प्रचार केला होता, वृत्तपत्रातून लेख, अग्रलेख यातून स्वामीजींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे शल्य होतेच, त्याचे तरंग आता मनात उमटणे साहजिकच होते. यातील काही अपप्रचाराला उत्तर देण्याची खर तर संधी आता मिळाली होती आणि ती थोडी स्वामीजींनी घेतली सुद्धा. त्यांनी भाषण करताना अनेक खुलासे केले. धर्म नाकारणार्या समाज सुधारकांचा परखड परामर्श घेतला. भारताचे पुनरुत्थान घडवायचे असेल तर त्याचा मूळ आधार धर्म असायला हवा असे विवेकानंद यांना वाटत होते. भारतातील सुधारणावाद्यांचा भर सतत धर्मावर आणि भारतीय संस्कृतीवर केवळ टीका करण्यावर होता ते स्वामीजींना अजिबात मान्य नव्हते. मद्रासला त्यांची या वेळी चार महत्वपूर्ण प्रकट व्याख्याने झाली. एका व्याख्यानात त्यांनी म्हटले की, “आम्हाला असा धर्म हवा आहे की, जो माणूस तयार करील, आम्हाला असे विचार हवे आहेत की, जो माणूस उभा करतील”.
स्वामीजींचे मद्रासला आल्यावर जसे जोरदार स्वागत झाले तसे ते नऊ दिवसांनी परत जाताना त्यांचा निरोप समारंभसुद्धा जोरदार झाला. इथून ते कलकत्त्याला गेले. स्वामीजींचे मन केव्हढे आनंदी झाले असणार आपल्या जन्मगावी परतताना, याची कल्पना आपण करू शकतो. बंगालचा हा सुपुत्र त्रिखंडात किर्ति संपादन करून येत होता.
कलकत्त्याला स्वागता साठी एक समिति नेमली होती, अनेक जण ही धावपळ करत होते. कलकत्त्यातील सियालदाह रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी वीस हजार लोक जमा झाले होते.फलाट माणसांनी फुलून गेला होता. त्यांच्या बरोबर काही गुरु बंधु, संन्यासी, गुडविन, सेव्हियर पती पत्नी, अलासिंगा पेरूमल, नरसिंहाचार्य या सगळ्यांचे स्वागत केले गेले. सनई चौघड्याच्या निनादात आणि जयजयकारांच्या घोषणेत स्वामीजींचे पुष्प हार घालून स्वागत केले गेले. यावेळी परदेशातून सुद्धा अनेक मान्यवरांनी गौरवपर पत्रे पाठवली, त्याचे ही वाचन झाले व सर्वांना ती वाटण्यात आली.केवळ चौतीस वर्षाच्या युवकाने आपल्या कर्तृत्वाचीअसामान्य छाप उमटवली होती, त्याने बंगाली माणसाची मान अभिमानाने उंचावली होती. रिपण महाविद्यालय, बागबझार,काशीपूरचे उद्यान गृह, आलम बझार मठ, जिथे गुरूंचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प सारदा देवींसमोर सहा वर्षापूर्वी नरेंद्रने सोडला होता तिथे पाय ठेवताच आपण दिलेले वचन पुरे केले याचे समाधान स्वामीजींना वाटले, येथे रामकृष्णांनंद आणि अखंडांनंद यांनी दाराताच आपल्या नरेन चे स्वागत केले. पुजाघरात जाऊन श्रीरामकृष्णांना नरेन ने कृतार्थ होऊन अत्यंत नम्रतेने नमस्कार केला. नरेन ने ठाकूरांना नमस्कार केला तो क्षण गुरुबंधुना पण धन्य करून गेला.आता पुढच्या कार्याची आखणी व दिशा ठरणार होती.
त्या सगळ्या उच्चभ्रू बायका. नवरे अत्यंत श्रीमंत, म्हणून याही श्रीमंती मिरवणाऱ्या. पैसा मिळवायला कष्ट करावे लागतात, याची काडीमात्र जाणीव नसणाऱ्या —-
गीता अशीच, हाय सोसायटी लेडी. मस्त शोफरड्रिव्हन कार मधून फिरावे, खूप खरेदी करावी, क्लब मध्ये जावे, हेच आयुष्य. गीताला दोन मुले. समीर आणि सायली. सायली चांगली शिकली आणि
तिच्या मध्यम वर्गीय मैत्रिणीच्या भावाच्या प्रेमात पडली. गीता म्हणाली, ” सायली, अग कोण शोधलास हा इतका सामान्य मुलगा? काय ग तो साधा चार खोल्यांचा फ्लॅट आणि काय ती माणसं. तुझा निभाव लागणार नाही असल्या घरात. मी किती छान मुलगे बघत होते तुझ्यासाठी. ‘
सायली शांतपणे म्हणाली, “ आई, बस झाल्या तुझ्या त्या श्रीमंत आणि उच्च कल्पना. मला नाही आवडत ते मूर्ख श्रीमंत मुलगे. मला खात्री आहे, मी कपिल बरोबर नक्की सुखी होईन. काय ग कमी आहे त्याच्यात? एवढा छान शिकलेला, किती चांगला पगार आहे त्याला. आई, मी कपिलशीच लग्न करणार. बाबांना सुद्धा फार आवडलाय कपिल. सून आण हो तुझ्या असल्या उच्च हाय ब्रो सोसायटीची. ”
सायलीपुढे गीताचे काहीही चालले नाही. — खरं तर कपिल मध्ये नाव ठेवायला जागाच नव्हती. दिसायला छान, वागायला अतिशय सभ्य आणि हुशार मुलगा होता तो. त्याचे आईवडील, बहीण सगळे खूप चांगले, आणि सायली त्यांना फार आवडायची. पण गीताला ही मंडळी अजिबात आवडत नव्हती. तिचा क्लब, हाय फाय मैत्रिणींमध्ये हे कुटुंब अगदीच मध्यमवर्गीय ठरणार होते.
सायलीला छान नोकरी लागली, आणि तिने कपिलशी लग्न केले.
”अग निदान, वेगळी तरी रहा सायली. कशी राहणार तू त्या चारच खोल्यात. ?” गीताने खरोखरच्या काळजीने विचारले.
“ आई, मी काका काकूंबरोबरच रहाणार सध्या तरी. उगीच का म्हणून मी वेगळी राहू? बघू नंतर. ” सायली खूषच होती सासरी.
गीताला आता समीरच्या लग्नाचे वेध लागले. समीर कॅनडाला जॉब करत होता. समीर बेताचा, फार काही हुशार नाही, पण कॅनडामधून त्याने थोडे थोडे कोर्सेस केले, आणि बऱ्यापैकी नोकरीही मिळवली. त्याला कॅनडाची सिटिझनशिप मिळाली आणि गीताचे हात गगनाला टेकले.
“समीर, आता मुली बघायला लागूया ना रे? करायचंय ना यंदा लग्न? तू कुठे ठरवले असलेस तर सांग. नाही तर मी आता बघायला लागणार मुली तुला. ”
“ हो आई, बघा तुम्ही जरूर. मला फोटो पाठवत रहा, मग पुढे बघूया, काय काय होते ते. ”
गीताने मुली बघण्याची मोहीम हाती घेतली. विवाह मंडळात समीरचे नाव नोंदवले. दरम्यान गीताची मामी तिला म्हणाली, “ अग, आपल्या सीमाची मुलगी आहे लग्नाची. विचारू का, करतेय का लग्न तिचे? तुमच्या तोडीसतोड आहेत हो ते श्रीमंत. ”
गीता म्हणाली, ” हो, विचार मामी. सगळी माहिती काढ. मुलगी काय शिकलीय, तयार आहे का परदेशी कायम रहायला, ते विचार, आणि त्यांना मला फोन करायला सांग. ”
दोन दिवसांनी, गीताला फोन आला. — “ मी अजिताची आई बोलतेय. तुमच्या मामीनी मला तुमचा नंबर दिला. तुमचा मुलगा लग्नाचा आहे ना?”
त्यांनी त्यांच्या मुलीची सगळी नीट माहिती सांगितली. पत्रिका मेल करते, आणि बाकी सगळेही मेलवर पाठवते म्हणाल्या. — सगळी माहिती, प्रथमदर्शनी तरी योग्य वाटली गीताला. तिने रविला, तिच्या नवऱ्याला हे दाखवले, आणि आपण मुलगी बघायला त्यांच्या घरी जाऊया का असे विचारले. अजिताच्या आईवडिलांना तसा फोन गेला, आणि चार दिवसांनी दोघे दिघ्यांच्या घरी मुलगी बघायला गेले.
त्यांचा मोठा बंगला, थाटमाट, नुसत्या चहासाठी केलेले भरभरून पदार्थ, सगळं बघून गीता खूष झाली. अजिता चहा घेऊन आली. किती सामान्य होती ती दिसायला. आणि शिक्षणही नुसती आर्टस् ची डिग्री. — गीताला आणि रवीला प्रथमदर्शनी ती मुळीच आवडली नाही. पण अजिताच्या आईने खुबीने सुचवले,
“ एकुलती एक मुलगी आमची, हे सगळे तिचेच तर होणार आहे पुढे. ”
गीताने समीरला तिचा फोटो पाठवला.
“ आई, किती ग सामान्य मुलगी आहे ही. मला मुळीच नाही आवडली. तू कितीही वर्णने केलीस ना, तिच्या श्रीमंतीची, तरी ही मुलगी मला अजिबात नको. मला बायको चांगली, हुशार स्मार्ट हवीय. बंगले दागिने नको आहेत. प्लीज केवळ श्रीमंती बघून नको ग असल्या मुली बघू आई. ”
गीताला त्याचे म्हणणे अजिबात आवडले नाही, पण समीर हट्टी होता. गीताने मुली बघण्याची मोहीम चालू ठेवली, पण तिच्या चौकटीत बसेल अशी मुलगी मिळेना.
एक दिवस समीरचा फोन आला, “ आई, मी लग्न ठरवतोय. माझ्याच ऑफिसमध्ये काम करणारीआहे ती. आणि तुला आश्चर्य वाटेल, पण ती मराठी मुलगी आहे अग. नुकतीच इथे बदलून आलीय, आणि मूळची कनेडीअन सिटीझन आहे. तिचे आईवडील खूपच वर्षांपूर्वी इथे सेटल झाले, आणि ही मोना इथेच जन्मली म्हणून सिटीझन झाली. मी गेले वर्षभर तिला भेटतोय, पण नक्की नव्हते आमचे, म्हणून तुम्हाला नाही सांगितले. मी फोटो पाठवतो. आता मुली बघू नकोस. चांगली आहे मोना आणि तिची सगळी फॅमिली. ”
गीताला आनंदच झाला. त्याचे त्यानेच ठरवले, ते उत्तमच झाले की. आणि पुन्हा तिकडची, मिळवती मुलगी. गीताने दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला, आणि सगळी माहिती विचारली. समीर पुढच्याच महिन्यात लग्न करणार म्हणत होता. पण गीताला आणि तिच्या नवऱ्याला कॅनडाचा व्हिसा इतक्या लवकर मिळणे शक्य नव्हते.
“ अरे समीर, जरा उशिरा करा ना लग्न. एवढी काय घाई आहे रे? नाहीतर इकडे भारतात येऊन करा. ”
“ नाही ग शक्य. मोनालाही व्हिसाचा प्रॉब्लेम नाही का येणार? आणि तिच्या आईवडिलांना पुढच्याच महिन्यात वेळ आहे. नंतर ते भारतात येणार आहेत. मोनाच्या आजी खूप आजारी आहेत, म्हणून जायलाच हवेय त्यांना. तिकीटेही बुक झाली आहेत त्यांची. ”
गीताने आणि रवीने लगेच व्हिसाची डेट मिळवायचा प्रयत्न केला, आणि नशिबाने, त्यांना लग्नाच्या तारखे अगोदरचा व्हिसा मिळालाही. मोठ्या आनंदाने त्यांनी हे समीरला सांगितले, आणि तोही खूषच झाला.
विमानाची तिकिटे बुक केली, आणि गीताची खरेदीची लगीनघाई सुरू झाली. नव्या सूनबाईसाठी, गीताने हौसेने खूप खरेदी केली. नवीन गळ्यातले, कानातले, मंगळसूत्र घेतले. हौसेने हिऱ्याची अंगठी, नेकलेसही घेतले. दरम्यान, विडिओ कॉलवर मोना समीरशी त्यांना बोलता आले, बघता आले. छान होती मोना दिसायला. तरतरीत होती, आणि चांगली वाटली बोलायला. चांगले बोलत होती मराठी.
ठरलेल्या दिवशी गीता रवी कॅनडाला पोचले. मोना आणि समीर दोघेही आले होते एअरपोर्टवर त्यांना न्यायला. गीताला, रवीला अतिशय आनंद झाला त्या दोघांना बघून. गीताला वाटले, बरेच झाले. ही मुलगी नशिबात होती समीरच्या.
जेटलॅग गेल्यावर, मोनाने त्यांना आपल्या आईवडिलांकडे नेले. अतिशय सामान्य वस्तीत त्यांचे घर होते. गीताला आश्चर्यच वाटले, इतकी वर्षे परदेशात राहूनही, हे इतक्या साध्या अपार्टमेंट हाऊसमधेच राहतात अजून?– मोनाचे आईवडील, बाहेर आले. अगदी साधेसुधे लोक दिसले ते. पण बोलायला चांगल्या होत्या तिच्या आई. — म्हणाल्या, “ मी खरे सांगू का?”
आपल्याला आयुष्यात खूप माणसे भेटतात. आणि कायमच्या आठवणी देऊन जातात. आज सहज एक कार्यक्रम बघताना एक जुनी आठवण जागी झाली. कारण म्हणजे तो कार्यक्रम सादर करणारा आपल्या सर्वांचा लाडका उत्साहाने भरलेला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव.
२७/११/२०१५ रोजी आमच्या शाळेतील रखवालदाराचे लग्न मुंबईत होते. बोलावले की जाणे या तत्वानुसार आम्ही काही मंडळी कारने जाण्यास निघालो. लग्न संध्याकाळी ७ वाजता होते. पण चाललोच आहोत तर थोडी मुंबई बघू या म्हणून लवकर निघालो. मुंबईतले मला तर काहीच समजत नाही. एका पुलावर गेल्या नंतर मैत्रिणीने एक फोन लावला. व आलोच असे सांगितले. एका पॉश इमारती जवळ थांबलो. गाडी पार्क करून वर गेलो तर स्वागताला साक्षात सिद्धार्थ जाधव! डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनीच आगत्याने घरात नेले. त्या धक्क्यातून बाहेर त्यांनीच काढले. आणि मग काय मन मिळणारा आनंद स्वीकारायला तयार झाले. माणसाने किती साधे, प्रेमळ व अगत्यशील असावे याचे प्रत्यंतर येत होते. आमच्या सोबत एकच टेबलवर आमच्या शेजारी बसून आम्ही बरोबर नेलेला खाऊ साधी शंकरपाळी त्यांनी आवडीने चहात बुडवून चमच्याने खाल्ली. आमच्या चकलीचा आस्वाद घेतला. तेही मुक्त कंठाने आमचे कौतुक करत. नंतर मैैत्रिणीने सांगितले ते तिचे भाचे जावई आहेत. तो पर्यंत किती वेळा त्यांचे आम्हाला आत्या म्हणून हाक मारणे झाले होते. नंतर लहान मुलाला लाजवेल अशा उत्साहात सगळे घर दाखवले. घराच्या आठवणी सांगितल्या. त्यातून एक जाणवले की त्यांच्या दृष्टीने घर, फॅमिली किती महत्वाची आहे. मुलीच्या अगदी छोट्या छोट्या बाललिला मोठ्या कौतुकाने व आत्ताच घडल्या प्रमाणे भरभरून सांगत होते. मधे मधे महत्वाचे फोन चालू होतेच. पण घरी गेस्ट आहेत, लांबून आले आहेत. आज सगळे कार्यक्रम रद्द आहेत असे सांगितले जात होते. आम्हाला उगीचच व्ही. आय. पी असल्या सारखे वाटत होते. दरम्यान त्यांच्या मिसेस ने जेवायला बोलावले. काय जेवलो आठवत नाही. कारण सगळे लक्ष त्यांच्याच बोलण्याकडे होते. मला फक्त एवढेच आठवते, ते मला म्हणाले होते आत्या तू नॉनव्हेज खात नाहीस ना म्हणून कोबीची भाजी खायची वेळ आली आहे. जेवणा नंतर परत गप्पा, घरातील वस्तू ( प्रात्यक्षिका सह ) दाखवणे चालूच होते. आम्हाला पण ट्रायल मिळत होती. त्या वेळी एखादे लहान मूल असल्या प्रमाणे ते भासत होते. आत्ता पर्यंत त्यांना फक्त छोट्या, मोठ्या पडद्यावर बघत होतो. तिच व्यक्ती साध्या रूपात अगदी घरगुती गप्पात रंगून गेली होती. त्यांनाही त्या वेळी कलाकार आहोत याचा विसर पडला असावा. एकच व्यक्ती किती वेगळी असू शकते याचे प्रत्यंतर घेत होतो. आमच्या प्रश्नांना खरी व मनमोकळी उत्तरे मिळत होती. मधेच लग्ना नंतर परत या. आज इथेच रहा असा आग्रह पण चालू होता. मधेच तुमच्या शाळेत ( म. न. पा. च्या शाळेत माझी नोकरी झाली आहे. ) बोलवा. असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. त्यांचे शिक्षण महानगर पालिकेच्या शाळेत झाले आहे ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. व माझ्या येण्याने तुमच्या शाळेतून एक तरी सिद्धार्थ तयार होईल असे म्हणतात. संध्याकाळी ते जेव्हा जिम मध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनीच आठवण करून दिली. माझ्या बरोबर सेल्फी घ्यायचा नाही का? असे त्यांनी गमतीने विचारल्यावर आम्ही फोटो काढले. त्या नंतर आम्हाला पण लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघायचे होते. व परत कधी भेट होईल माहित नव्हते. निघताना आम्हाला वाकून नमस्कार ( पाया पडणे ) केला.
इतक्या प्रसिद्ध पण डोक्यात हवा न गेलेल्या एका सच्च्या कलाकाराने आमचा दिवस भारून टाकला होता.
एक कलाकार किती साधा, सच्चा असू शकतो. पण जीवनातील मोठी तत्वे अंगीकारतो याचा अनुभव खूप जवळून घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमिअर चे पास येतात त्या वेळी आवर्जून माझ्या नावाचा पास त्यात असतो. त्या नंतर आम्ही त्यांना आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास बोलावले होते. ते पण आवर्जून आले होते. मग काय शाळेत गर्दीच गर्दी पोलीस संरक्षण मागवावे लागले होते. एवढ्या गर्दीत पण त्यांनी माझ्या घरी आलेली आत्या कुठे आहे? म्हणून माझी विचारणा केली होती. माझ्या सारख्या व्यक्तीला लक्षात ठेवणे हे माझ्या साठी मोठे आश्चर्यच होते.
साधी रहाणी, खरेपणा, सर्वांना मदत करणे, उत्साह, बाल्य जपणे, माणसे धरून असणे असे अनेक पैलू समोर आले. आणि हा दिवस सिद्धार्थ दिवस ठरला तो कायम स्वरूपी आठवण ठेवून आहे.
☆ उसळ-चपाती… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.
तेवढ्यात अण्णा म्हणाले, “आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या. . !”
रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली. . मंडळी गाडीतून उतरली.
अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा. . !
अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं. . अण्णा म्हणाले, ‘काय, कसं काय? ओळखलंत का? बर्याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही. . ‘ अण्णा कानडीतनं बोलत होते.
रामण्णाही ओळखीचं हसले. . थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं. . आणि त्यांचा निरोप घेतला. .
साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला –
“इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.
स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा. . आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली”.
“उसळ-चपाती पाहिजे काय?”, असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.
रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार. . !”
“घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा. . !”
“जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.
रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती. . साथीदार मंडळी गप्प होती. . गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते. .
रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.
तात्पर्य – हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असावेत.🙏🏻
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈