दिवाळी तशी आटोपून गेली तरी अजून फराळाचे डबे गच्च भरलेले आहेतच. आम्हां बायकांची एक गम्मतच असते एकीकडे वजन वाढतयं म्हणून काळजीत पडतो आणि एकीकडे खाद्यपदार्थांच्या डब्यांची शीग उतरु मुळी देत नाही. खरचं आपली खाद्यसंस्कृती आहे मोठी विलक्षण.
ह्या खाद्ययात्रेत दोन गट पडतात . एक गट तब्येतीनं खाणा-यांचा आणि एक गट भरभरून खाऊ घालणा-यांचा. आग्रहाने खाऊ घालणा-या तमाम लोकांना सलाम आणि त्यांच्या पदार्थांना न्याय देणा-या, अन्नदात्यांना “सुखी भव”असा आशिर्वाद देणा-यांनांपण सलाम.
एक नोव्हेंबर. नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस,पहिली तारीख. ही एक तारीख पुर्वी नोकरदारांसाठी फार महत्त्वाची असायची. आजचा हा दिवस “जागतिक शाकाहार दिन” म्हणून ओळखल्या जातो.
कुठल्याही व्यक्तीची आहाराविषयी आवडनिवड ही त्याच्या रहिवासाच्या भोवताली असणारी भौगोलिक परिस्थिती, हवामान तसेच आजुबाजुचे वातावरण, लहानपणापासूनच्या सवयी,मनावर असलेला पगडा ह्यावर अवलंबून असते. खरं सांगायचं तर ज्या गावातून, घरातून, संस्कृतीतून,संस्कारांमधून आम्ही मोठे झालो, घडलो त्यात लहानपणी तर शाकाहाराशिवाय दुसरा कुठला आहार असतो हे आमच्या गावीही नव्हंतं.किंबहुना शाकाहाराशिवाय दुसरा कुठला सामिष आहार असतो ही गोष्ट लहानपणीच्या आकलनशक्ती पलीकडील बाब होती.
पुढे हळूहळू वयाची शाळकरी फेज पार करतांना विज्ञानाचा अभ्यास करतांना “जीवनसाखळी”ची संकल्पना वाचनात आली, आणि मग सामिष आहार हा आपण घेत नसलो तरी तो आहार निषीद्ध नसून उलटपक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक सुद्धा असतो ही नवी बाब कळली. जीवनसाखळी सुरळीत सुरू राहण्यासाठी मी जरी शाकाहारी असले तरी सामिष आहार घेणारे पण भरपूर लोक असतात हे मैत्रिणींच्या बरोबर गप्पांच्या ओघातून कळले.
आपली शाकाहारी खाद्यसंस्कृती होते पण एक अफाट खाद्यसंस्कृती आहे हे नक्की. खरतरं फक्त शाकाहारी आणि दोन्ही प्रकारचा आहार घेणाऱ्यांमध्ये कोण चूक कोण बरोबर हा मुद्दाच नसतो मुळी.कारण मानवाला नुसते उदरभरण म्हणून अन्न सेवन करायचं नसतं तरं त्याचबरोबर “जिव्हा”याने की “रसना”तिलापण प्रसन्न, तृप्त ठेवायचं असतं.आणि प्रत्येक व्यक्तीचे जीभेचे चोचले हे वेगवेगळे असूच शकतात. फक्त खाणं असो वा बोलणं, आपली जिव्हा ही आपल्याच ताब्यात हवी हे मात्र नक्की.
मी स्वतः संपूर्णपणे शाकाहारी असले तरी वेगवेगळे सामिष, पौष्टिक पदार्थ खाणा-या दर्दी मंडळींचं मला प्रचंड कौतुक वाटतं.खरी दर्दी मत्स्यप्रेमी,मांसाहारी मंडळी डोळेमिटून कुठल्या प्राणीजातीचा आहार आपण घेतोय हे छातीठोक सांगू शकतात त्यांच्या खव्वैयेगिरीला आणि अभ्यासाला सलाम.
शाकाहारी मंडळींमध्ये एकच प्रकार असतो परंतु मासांहारी मंडळींमध्ये वेगवेगळे प्रकार असतात,एक बेधडक सामिष आहार घेतो हे सांगणारे आणि दुसरे लपूनछपून खाणारे. असो
पु.ल.देशपांडे ह्यांची खाद्यसंस्कृती वाचली की शाकाहाराचा आवाका किती मोठा,प्रचंड आहे ह्याची कल्पना येते.मी तर पु.ल.चं खाद्यसंस्कृती वाचल्यानंतर प्रत्येक वाचनानंतर मला काहीतरी दरवेळी वाचन हाती लागतं.
☆ अरूंद वाट प्रेमाची… भाग 3 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले- मधुलिकाने खोलीत जाऊन ‘मोहिनी’कडे बघितलं, तेव्हा ती चकीतच झाली आणि तिच्या गळ्यातून सहाजोद्गार बाहेर पडले, ‘वा: काय सौंदर्य आहे. जो कुणी एकदा हिला बघेल, आपलं सारं राज्य तिच्यावर उधळून देईल.’ असं बोलता बोलता तिने आपल्या गळ्यातली मोत्यांची सुंदर माळ काढली आणि मोहिनीच्या गळ्यात घातली. अन्य स्त्री-रूपावर मोहित होऊन तिचा गौरव स्त्रीनेच करावा, अशी ही पहिलीच वेळ असेल आणि इथे तर गौरव करणारी खुद्द मधुलिकाच होती. आता इथून पुढे )
त्या दिवसात ‘मोहिनी’च्या पॅकिंगची तयारी चालू होती. एक दिवस पुन्हा एकदा मधु बिछान्यावर नाही असं पाहून मधुलिका ‘मोहिनी’च्या खोलीत गेली आणि तिथलं दृश्य पाहून ती हैराणच झाली. मधुने ‘मोहिनी’ला आपल्या बाहुपाशात घेतलं होतं आणि तो तिच्या गळ्यातील मोत्याच्या माळेशी खेळत होता. मधुलिकाने आपल्या मनाला समजावले की तो कदाचित माळेतील मोती सारखे करत असेल. नीट करत असेल आणि एवढ्यात तिला दिसलं की मधुने आपला उजवा हात ‘मोहिनी’च्या वक्षस्थळावर ठेवलाय आणि ओठ ‘‘मोहिनी’च्या ओठांवर. मधुलिकाच्या देहावर जणू काही एका वेळी शेकडो झुरळे सरपटू लागली. ती गुपचुप आपल्या बिछान्यावर परत आली.
दुसर्या दिवशी मधुलिका स्वत: बाजारात गेली आणि पॅकिंगसाठी आवश्यक ते सगळं साहित्य घेऊन आली. जितक्या लवकर शक्य असेल, तितक्या लवकर पॅक करून ‘मोहिनी’ ला बाजूला ठेवण्याचा तिचा विचार होता. रात्री ती पुन्हा मधुची बिछान्यावर वाट पाहू लागली. मध्यरात्र सरली पण मधु आला नाही. मधुलिका तडफडली आणि उठून ‘मोहिनी’च्या खोलीत गेली. ‘मोहिनी’च्या खोलीचा दरवाजा अनपेक्षितपणे बंद होता. मधुलिकाने हळूच एक दार उघडलं आणि आत नजर टाकली. आतील दृश्य कल्पनेपलिकचं होतं. तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. मधुने ‘मोहिनी’ला मिठीत घेतलं होतं आणि तो वेड्यासारखी तिची चुंबने घेत होता. तिच्या अंग-प्रत्यंगांशी खेळत होता. मधुलिकाला जसा काही अनेक विंचवांनी डंख मारला. ती आपली शुद्ध घालवून बसली. तिने धडकन दरवाजा उघडला नि ती आत घुसली. मग तिने झपाट्याने पूर्ण ताकद लावून ‘मोहिनी’ला मधुपासून दूर केलं आणि खोलीत असलेल्या मोठ्या पॅकिंग बॉक्समध्ये फेकून दिलं. क्रोध आणि मत्सर यामुळे तिच्या डोळ्यातून ठिणग्या बरसत होत्या. तिने मधुचं मनगट घट्ट पकडलं आणि त्याला जवळ जवळ ओढतच बेड-रूममध्ये घेऊन आली. म्हणाली-
इथे रात्र रात्र मी तुझी वाट बघत बिछ्न्यावर तळमळत असते आणि तू त्या मातीच्या मूर्तीला उराशी धरून रात्र घालवतोस. लाज नाही वाटत तुला? वेडा झालयास का तू? तू असं काय तिच्यात पाहिलंस, जे माझ्यात नाही? … आज एक महिना होऊन गेला, तू मला.. ‘
‘मी अजूनही तुझ्यावरच प्रेम करतो मधुलिका, अगदी सुरुवातीच्या दिवसात करत होतो, तितकंच…’ असं म्हणत म्हणत मधुने मधुलिकाला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.
‘नाही. आज-काल तू माझ्याऐवजी मूर्तीवर अधीक प्रेम करू लागला आहेस.’
‘ती मूर्ती आता तुटून गेलीय मधुलिका. किती परिश्रमाने आणि प्रेमाने बनवली होती ती मूर्ती मी…. आणि तूसुद्धा … प्रदर्शनात आपल्याला पुरस्कार मिळेल म्हणून… ‘
‘मष्णात जाऊ दे ते प्रदर्शन…. आणि त्यातले पुरस्कार. आता तुझ्या-माझ्यामध्ये भिंत होऊन रहाणारी असली मूर्ती पुन्हा या घरात कधीही बनणार नाही.’ मधुलिका एखाद्या सिंहिणीसारखी चवताळून म्हणाली.
‘जरा विचार कर मधु! अग वेडे, आपल्या दोघांमधे ही मातीची मूर्तीसुद्धा तू सहन करू शकली नाहीस, मग कुणा स्त्रीला कशी सहन करशील? इतकं सोपं नसतं ग सगळं काही. आपले कबीरजी म्हणतात ना, ‘प्रेम गली अति सांकरी, जा में दो ना समाए.’ अग, प्रेमाची ही वाट इतकी अरुंद आहे, तिच्यावरून मी एकीसोबत, तुझ्या एकटीच्या सोबतच चालू शकतो. तिथे दुसरीला जागाच नाही मुळी. तुला हे समजावं, म्हणून तर हे सारं नाटक रचलं मी.’ आणि मधुने मधुलिकाला आपल्या मिठीत घेतलं. आता मधुलिकाने विरोध केला नाही.
बाहेर पाऊस कोसळत होता. आतमध्ये मधुलिकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या. मधु त्यात किती तरी वेळपर्यंत भिजत राहिला. दोघांमध्ये कोणतंच शून्य आता बाकी उरलं नव्हतं.
समाप्त
मूळ हिंदी कथा – ‘गली अति सॉँकरी’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भगवंत सगळे बघत असतो… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
महेशचं घर एका देवळासमोर होतं. पहाटेच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, रस्त्यावर असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिलेली होती.
चडफडत महेश गाडीजवळ गेला, किती नुकसान झालंय ते बघायला. तर काचेवर एक चिठ्ठी अडकवलेली होती. त्या चिठ्ठीवर एक नाव आणि फोन नंबर लिहिलेला होता, आणि फोन करण्यास सांगितले होते.
त्याने त्या नंबरवर फोन लावला.
पलीकडचा माणूस म्हणाला, ‘‘ मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच.
मी काकड आरती करून बाहेर आलो. चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. पहाटे तुम्हाला त्रास द्यायला नको म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’
त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं, आणि तो माफीही मागत होता.
महेशला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘ तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. आपणहून कबूल कसं काय केलंत? हे सगळं टाळू शकला असतात.”
यावर तो माणूस म्हणाला…
“कोणी बघत नव्हतं कसं? भगवंत सगळं बघत असतो आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर— तर माझ्यासारख्या माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार? “
संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मयुरेश देशपांडे यांनी लिहिलेला ‘अल्याड पल्याड’ हा अलक कथासंग्रह आज वाचून संपवला. एका बैठकीत नाही. कारण त्यातील प्रत्येक कथा आकाराने लहान असली तरी मानवी जीवनातील काही विदारक तर काही सुखांत सत्त्ये पानोपानी आढळून येतात. म्हणून बारकाईने सगळ्या अलक वाचल्यावर माझी मतं लिहितो.
‘ आजकाल वाचन कमी होत आहे,वाचनसंस्कृती वाढायला पाहिजे,वाचणं हीच माणसाची खरी ओळख आहे…’ वगैरे वगैरे कितीही म्हटलं तरी एक सत्य आहे -आज माणसांना मिळणारा फावला वेळ कमी असतो, त्यातही आपले प्राधान्यक्रम हेही या तक्रारीमागचं एक मोठं कारण आहे. मला आठवतं, पूर्वी गावात वर्तमानपत्रं फक्त ग्रामपंचायतीत येत. तेही सायंकाळी ती वाचणं हा माझा रोजचा काही तासांचा दैनंदिन उपक्रम असायचा. क्वचित मिळणारी नियतकालिकंही पुरवून पुरवून म्हणजे एकच मजकूर मी अनेकदा वाचून काढी. पुस्तकातल्या कविताच नव्हे तर काहो धडेही माझे पाठ होते. आज हे थांबलं ही शोकांतिका असली तरी खरं आहे. आज भेट मिळालेलीच काय अगदी विकत घेतलेली पुस्तकं, अगदी नामवंत लेखकांचीही असली तरी आपण पूर्ण वाचत नाही. समाजमाध्यमं इतकं साहित्य उपलब्ध करून देतात की, काय वाचू आणि कधी हेच ठरवता येत नाही. या पार्श्वभूमीवर ‘अल्याड पल्याड’ हे पुस्तक अपवाद ठरते. यातील पहिलीच अलक लेखकाने भारतीय समाजात वंचितांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी लिहून औचित्य साधले आहे. सगळ्याच अलक कथा या अर्थपूर्ण आहेत. अनेक लेखक मराठीच्या आत्यंतिक प्रेमापोटी अनाकलनीय मराठी शब्दांचा प्रयोग करून लिखाण हे बोजड करतात. इथे लेखकाने ते जाणीवपूर्वक टाळले आहे. लेटमार्क,बेस कॅम्प असे शब्द हे दर्शवतात. अनेक अलकमधून स्थानिक बोलीभाषेची योग्य रचनाही दिसते. समाजातील विदारक सत्ये दाखवताना अनेक विसंगत बाबीही परिणामकारकपणे मांडल्या आहेत. ‘ वडापाव ‘ या आशयाच्या कथेतून स्त्री सक्षमीकरण, पत्नीची कुटुंबातील महत्त्वाची भूमिका जाणवते. वैद्यकीय उपचारांसाठी घरातल्या बायकोच्या राहिलेल्या मंगळसूत्राकडे पहाणा-या नवऱ्याची अगतिकता प्रभावीपणे एका अलकमधून उलगडते. भंगार गोळा करणारी स्त्रीही आपले सौंदर्य फुटक्या आरशात पहाते, ही अलक आपल्या समाजातील आजचे एक सत्त्य सांगते. मात्र केवळ दु:ख उगाळत बसणारा हा लेखक नाही, तर ‘ दु:ख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही ‘ हा बाबा आमटे यांचा आशावादही इथे ठायीठायी दिसून येतो. सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
माणूस हा श्रेष्ठ आहे याच भूमिकेतून लिहीत असलेले साहित्यिक मयुरेश देशपांडे यांच्या साहित्यप्रवासाला मनापासून शुभेच्छा.
परिचय – प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.
मो ९९७५४३५१५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख परिस्थितियाँ व पुरुषार्थ । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 157 ☆
☆ परिस्थितियाँ व पुरुषार्थ ☆
‘पुरुषार्थ से दरिद्रता का नाश होता है; जप से पाप दूर होता है; मौन से कलह की उत्पत्ति नहीं होती और सजगता से भय नहीं होता’ चाणक्य की इस उक्ति में जीवन-दर्शन निहित है। मौन व सजगता जीवन की अनमोल निधियां हैं। मौन से कलह का दूर का भी नाता नहीं है, क्योंकि मौन को नवनिधि की संज्ञा से अभीहित किया जाता है। मौन रहना सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ है, जिससे बड़ी से बड़ी समस्या का स्वत: समाधान हो जाता है, क्योंकि जब एक व्यक्ति क्रोधवश अपना आपा खो बैठता है और दूसरा उसका उत्तर अर्थात् प्रतिक्रिया नहीं देता, तो वह भी शांत हो जाता है और कुछ समय पश्चात् उसका कारग़र उपाय अवश्य प्राप्त हो जाता है।
सजगता से भय नहीं होता से तात्पर्य है कि जो व्यक्ति सजग व सचेत होता है, उसे आगामी आपदा व बाधाओं का सामना नहीं करना पड़ता। दूसरे शब्दों में वह हर कदम फूंक-फूंक कर रखता है, क्योंकि वह व्यर्थ में कोई भी खतरा मोल लेना नहीं चाहता। वह भविष्य के प्रति सजग रहते हुए वर्तमान के सभी कार्य व योजनाओं को अंजाम देता है। सो! मानव को भावावेश में कोई भी निर्णय नहीं लेना चाहिए, बल्कि हर स्थिति में विवेक से निर्णय लेना चाहिए अर्थात् किसी कार्य को प्रारंभ करने से पहले मानव को उसके सभी पहलुओं पर विचार-विमर्श व चिंतन-मनन करने के पश्चात् ही उसे करने का मन बनाना चाहिए। उस स्थिति में उसे भय व शंकाओं का सामना नहीं करना पड़ता। वह निर्भय व नि:शंक होता है तथा उसका तनाव व अवसाद से कोसों दूर का भी नाता नहीं रहता। उसका हृदय सदैव आत्मविश्वास से आप्लावित रहता है तथा वह साहसपूर्वक विषम परिस्थितियों का सामना करने में समर्थ होता है। सो! पुरुषार्थ से दरिद्रता का नाश होता है, क्योंकि जो व्यक्ति साहसी व निर्भीक होता है, उसे अपने परिश्रम पर भरोसा होता है और वह सदैव आत्मविश्वास से लबरेज़ रहता है।
सुखी जीवन जीने के लिए मानव को यह सीख दी गयी है कि ‘अतीत की चिंता मत करो; भविष्य पर विश्वास न करो और वर्तमान के महत्व को स्वीकारते हुए उसे व्यर्थ मत जाने दो।’ दूसरे शब्दों में अतीत अर्थात् जो गुज़र गया, लौटकर नहीं आता। इसलिए उसकी चिंता करना व्यर्थ है। भविष्य अनिश्चित है, जिससे सब अनजान हैं। यह शाश्वत् सत्य है कि संसार में कोई भी प्राणी इस तथ्य से अवगत नहीं होता कि कल क्या होने वाला है? इसलिए सपनों के महल सजाते रहना मात्र आत्म-प्रवंचना है। परंतु मूर्ख मानव सदैव इस ऊहापोह में उलझा रहता है। सो! संशय अथवा उधेड़बुन में उलझे रहना उसके जीवन का दुर्भाग्य है। ऐसा व्यक्ति अतीत या भविष्य के ताने-बाने में उलझा रहता है और अपने वर्तमान पर प्रश्नचिह्न लगा देता है। सो! वह संशय अनिश्चय अथवा किंकर्तव्यविमूढ़ स्थिति से मुक्ति नहीं प्राप्त सकता। वह सदैव अधर में लटका रहता है और उसका कोई कार्य समय पर संपन्न नहीं होता। वह भाग्यवादी होने के कारण दरिद्रता के चंगुल में फंसा रहता है और सफलता से उसका दूर का संबंध भी नहीं रहता।
कबीरदास जी का यह दोहा ‘काल करे सो आज कर, आज करे सो अब/ पल में प्रलय होएगी, मूर्ख करेगा कब’ वर्तमान की महत्ता को दर्शाता है और वे मानव को सचेत करते हुए कहते हैं कि कल कभी आता नहीं। इसलिए मानव को वर्तमान में सब कार्यों को संपन्न कर लेना चाहिए और आगामी कल के भरोसे पर कोई भी काम नहीं छोड़ना चाहिए। यह सफलता प्राप्ति के मार्ग में प्रमुख अवरोध है। दूसरी ओर समय से पहले व भाग्य से अधिक मानव को कभी कुछ भी प्राप्त नहीं होता। ‘माली सींचे सौ घड़ा, ऋतु आए फल होय’ द्वारा भी यह संदेश प्रेषित है कि समय आने पर ही सब कार्य संपन्न होते हैं।
‘सुमिरन कर ले बंदे! यही तेरे साथ जाएगा’ स्वरचित गीत की ये पंक्तियाँ मानव को प्रभु का नाम स्मरण करने को प्रेरित करती हैं, क्योंकि यह मुक्ति पाने का सर्वश्रेष्ठ साधन है। इंसान संसार में खाली हाथ आता है और उसे खाली हाथ ही जाना है। परंतु जप व नाम-स्मरण से पापों का नाश होता है। वह मृत्यु के उपरांत भी मानव के साथ जाता है और जन्म-जन्मांतर तक उसका साथ निभाता है। ‘यह दुनिया है दो दिन का मेला/ हर शख्स यहां है अकेला/ तन्हाई संग जीना सीख ले/ तू दिव्य खुशी पा जाएगा’ स्वरचित गीत की पंक्तियों से तात्पर्य है कि जो व्यक्ति स्व में केंद्रित व आत्म-मुग्धावस्था में जीना सीख जाता है; उसे ज़माने भर की अलौकिक खुशियाँ प्राप्त हो जाती हैं।
मानव जीवन क्षणभंगुर है और संसार मिथ्या है। परंतु वह माया के कारण सत्य भासता है। सब रिश्ते-नाते झूठे हैं और एक प्रभु का नाम ही सच्चा है, जिसे पाने के लिए मानव को पंच विकारों काम, क्रोध, लोभ, मोह व अहंकार से मुक्ति पाना आवश्यक है, क्योंकि वही मानव को लख चौरासी से मुक्त कराता है। परंतु यह मानव की नियति है कि वह दु:ख में तो प्रभु का नाम स्मरण करता है, परंतु सुख में उसे भुला देता है। इसीलिए कबीरदास जी सुख में उस अलौकिक सत्ता को स्मरण करने का संदेश देते हैं, ताकि दु:ख उसके जीवन में पदार्पण करने का साहस ही न जुटा सके।
सुख, स्नेह, प्रेम, सौहार्द त्याग में निहित है अर्थात् जिन लोगों में उपरोक्त दैवीय गुण संचित होते हैं, उन्हें सुखों की प्राप्ति होती है और शेष उनसे वंचित रह जाते हैं। रहीम जी प्रेम की महत्ता बखान करते हुए कहते हैं ‘रहिमन धागा प्रेम का, मत तोरो चटकाय/ टूटे से फिर ना जुरै, जुरै ते गांठ परि जाए।’ मानव को प्रत्येक कार्य नि:स्वार्थ भाव से करना चाहिए और गीता में भी निष्काम कर्म का संदेश प्रषित है, क्योंकि मानव को कर्म करने का अधिकार है; फल की इच्छा करने का नहीं है। जो संसार में जन्मा है, उसकी मृत्यु निश्चित है। इसलिए मानव को सत्कर्म व सत्संग करना चाहिए, क्योंकि यही मानव की कुंजी है। इंसान इस संसार में खाली हाथ आया है और उसे खाली हाथ लौट जाना है। इसलिए मानव को माया-मोह व राग-द्वेष के बंधनों का त्याग कर प्रभु से लौ लगानी चाहिए।
जीवन संघर्ष का पर्याय है। जो व्यक्ति पुरुषार्थी व परिश्रमी है; जीवन में सदैव सफलता प्राप्त करता है और वह कभी भी दरिद्र नहीं हो सकता। जो मौन साधना करता है; विवादों से दूर रहता है, क्योंकि संवाद संबंधों में स्थायित्व प्रदान करते हैं। संवाद संवेदनशीलता का प्रतीक हैं, परंतु उनमें सजगता की अहम् भूमिका है। रिश्तों में माधुर्य व विश्वास होना आवश्यक है। सो! हमें रिश्तों की अहमियत को स्वीकारना चाहिए। परंतु जब रिश्तों में कटुता आ जाती है, तो वे नासूर बन सालने लगते हैं। इससे हमारा सुक़ून सदा के लिए नष्ट हो जाता है। इसलिए हमें दूरदर्शी होना चाहिए और हर कार्य को सोच-समझकर अंजाम देना चाहिए। लीक पर चलने का कोई औचित्य नहीं है और अपनी राह का निर्माण स्वयं करना श्रेयस्कर है। इतना ही नहीं, हमें तीसरे विकल्प की ओर भी ध्यान देना चाहिए और निराशा का दामन नहीं थामना चाहिए। स्वामी रामतीर्थ के अनुसार प्रत्येक कार्य को हिम्मत व शांति से करो, यही सफलता का साधन है अर्थात् मानव को शांत मन से निर्णय लेना चाहिए तथा साहस व धैर्यपूर्वक प्रत्येक कार्य को संपन्न करना चाहिए। जो व्यक्ति सजगता व तल्लीनता से कार्य करता है और प्रभु नाम का स्मरण करता है– उसके सभी कार्य संपन्न होते हैं और उसे मोक्ष की प्राप्ति होती है।
(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को विगत 50 वर्षों से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। अब तक 350 से अधिक लघुकथाएं रचित एवं ग्यारह पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं (वार्षिक) का सम्पादन एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन। आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम साहित्यकारों की पीढ़ी ने उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है,जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं। आपने लघु कथा को लेकर कई प्रयोग किये हैं। आज प्रस्तुत है आपकी एक लघुकथा ‘हमें वधू चाहिए ’। )
☆ लघुकथा – हमें वधू चाहिए ☆ डॉ. कुंवर प्रेमिल ☆
अखबार में वर वधू स्तम्भ के अंतर्गत विज्ञप्ति छपी थी।
लिखा था – हमें ऐसी वधू चाहिए जो कार लेकर आए। साथ में नकद भी लाए। अपना एवं अपने पति का खर्च स्वयं चलाए ।
दूसरी विज्ञप्ति – वधूपूरी तरह विश्वसनीय होनी चाहिए। सास ससुर की देखभाल करें एवं अलग रहने का सपना ना संजोए।
तीसरी विज्ञप्ति – सुंदर सुडौल । मन की साफ हो। पति से चुगली न करे और घर के काम काज में बराबरी से हाथ बटाए।
चौथी विज्ञप्ति – पड़ोसयों से बतियाने की सख्त मुमानियत रहेगी।
– ननद का सम्मान करना जानती हो तथा बार-बार मायके जाने की धमकियाँ न देती हो।
पाँचवी विज्ञप्ति – हमें विदेश में जॉब करने वाली वधू स्वीकार्य होगी।
अब कोई उनसे जाकर पुछे, क्या ऐसी वधू मिली या उनके लड़के अभी तक कुँवारे ही घूम रहे हैं।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ आपदां अपहर्तारं ☆
🕉️ श्री महालक्ष्मी साधना सम्पन्न हुई 🌻
आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆