☆ साने गुरुजींचे पुस्तक – शामची आई ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे”
संपूर्ण मानवतेला एका ओळीत मार्गदर्शन करून काव्य समजावून देणाऱ्या साने गुरुजींना वंदन !
मराठी साहित्या मध्ये साने गुरुजींचे”श्यामची आई” हे पुस्तक म्हणजे मातृ प्रेमाचा मुकुटमणी आहे.
सध्याच्या मतलबी जगामध्ये,निर्मळ मनाची, प्रेमळ , अतिशय संवेदनशील मन असणारी व्यक्ती होऊन गेली असे सांगितले तर पटणे कठीण.पण खरेच मऊ मेणाहुनी द्ददय असणारे होते गुरुजी आणि ते तसे घडले त्यांच्या परमप्रिय मातेमुळे .
कोकणामध्ये गरिबीमध्ये राहून, स्वाभिमानाने , इतरांना मदत करत, कसे जगावे, सर्वांवर प्रेम कसे करावे हे आपल्या आईने कसे शिकवले , कसे घडवले , हे, गुरुजींनी स्वातंत्र्यासाठी कारावासात असताना सांगितलेल्या कथा म्हणजे पुढे तयार झालेले पुस्तक श्यामची आई .नाशिकच्या तुरुंगात जन्माला आलेले ऋदयस्पर्शी भावनिक बाळ म्हणजे श्यामची आई .तुरुंगातील 42 पैकी 36 रात्री गुरुजींनी आपल्या आईचे सर्वांग सुंदर संस्कार क्षम अंतरंग उलगडून दाखवत सर्वांना अश्रूंनी ओले चिंब भिजवून टाकले .
गुरूजी सांगतात,”आपल्यामध्ये फक्त , प्रेम, दया असून भागत नाही , तर, प्रेम ज्ञान आणि शक्ती हे महत्त्वाचे तीन गुण सुद्धा हवेतच.प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. आपला स्वतःचा हा विकास आईच्या रोजच्या जीवनाच्या अनुभवातून कसा घडत गेला त्या आठवणींचा मधुर ठेवा आपल्याला श्यामची आई मध्ये वाचायला मिळतो.
माणसानी माणसाशी माणसा सम कसे वागावे हे आईनेच त्यांना शिकवले .जात, पात न मानता, गरीब भुकेल्यालाआपल्याकडे जे अन्न आहे त्यातलाच घास देऊन त्याची भूक कशी भागवावी हे आईने त्यांना कृतीतून शिकवले.
पाय घाण होऊ नयेत म्हणून आईच्या पदराला वरून चालत येणाऱ्या श्यामला आई समजावते,”श्याम,शरीराला घाण लागू नये म्हणून जेवढं जपतोस, तेवढंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो.”धन्य ती माऊली आणि धन्य ती चा सुपुत्र जो हे ऐकतो मानतो आणि मित्रांना ही आवर्जून सांगतो.
आईने श्यामला देवभक्ती देशभक्ति शिकवलीच . त्याच बरोबर मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला, त्यांच्यावर माया करायलाही . कष्ट करायला, काम करायला, मदत करायला लाजायचे नाही हे श्याम आईकडूनच शिकला .प्रत्येक प्रसंगातून आईने आपल्या मातृ गाथेतून मार्ग दाखवला आणि ते सगळे प्रसंग लक्षात ठेवून आठवणीने तुरुंगामध्ये सोबती ना सांगून मातृ ऋणही श्यामने फेडले .
श्यामची आई हे पुस्तक हृदयाचा ठाव घेणारे आहे .हे पुस्तक वाचून आपोआप डोळे भरून वाहू लागले नाहीत तर ती व्यक्ती खरोखरच पथ्य राहून कठोर मनाची म्हंटली पाहिजे .
आईची शिकवण श्यामच्या श्वासामध्ये मनामध्ये इतकी खोलवर रुजली होती की त्या आठवणींचा वृक्ष पुस्तकाच्या रुपाने झाला .
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रम निर्मिती सहकार्य आणि भारत निर्माण माहितीपटात भूमिका.
विविध दैनिके,साप्ताहिके,दिवाळी अंक यातून सातत्याने लेखन.
पुरस्कार:
काव्यशिल्प पुरस्कार,जनसेवा ग्रंथालय,रत्नागिरी.
राज्यस्तरीय विशेष सन्मान,फ्रेंड सर्कल,पुणे
मिरज तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, 2000 व 2002साठी.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.म.रा.मा. शिक्षक संघटना.
नेशन बिल्डर ॲवाॅर्ड,इंनरव्हिल क्लब ऑफ सांगली, 2017.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक,रोटरी क्लब,सांगली 2018.
कवीभूषण पुरस्कार,नांदेड.
‘गंध सोनचाफी’ कवितासंग्रह प्रकाशित. तीन पुरस्कार प्राप्त.
विविधा
☆ संस्काराचा दीपस्तंभ… साने गुरुजी ☆ श्री गौतम रामराव कांबळे ☆
साने गुरुजी हे नाव जरी उच्चारलं तरी आठवते ती आईची ममता. गाईचं वात्सल्य. आपल्या साध्या सोप्या ओघवत्या वाणीतून संस्काराचा झरा आजही साने गुरुजींच्या साहित्यातून अलगद झुळझुळत राहिला आहे.
ज्याने ज्याने साने गुरुजींचे साहित्य वाचले आणि तो हळवा झाला नाही असा माणूस शोधून सापडणार नाही.
खरा धर्म असतो तरी काय? हे साने गुरुजी आपल्या गीतात सांगतात, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ धर्माच्या नावाखाली चाललेल्या ओंगळपणाला किती सुंदर उत्तर दिलंय गुरुजीनी! जे रंजले गांजलेले, दीन दुबळे आहेत अशांना मदतीचा हात द्यावा. हे गांधीवादी तत्त्वज्ञान गुरुजी अलगदपणे सांगतात.
शिक्षक म्हणून काम करताना केवळ विद्यार्थीच नाही तर समाजशिक्षण देण्याचं कार्य साने गुरुजीनी केलं आहे.
‘शामची आई’ हे गुरुजींचं पुस्तक तर संस्काराचा अनमोल ठेवा आहे.
केवळ उक्ती करून बसायचे नाही. तर ते कृतीतही आणावे लागते. याचे उदाहरण म्हणजे गुरुजींचा पंढरपूरच्या विठ्ठल मंदीर प्रवेशाचा सत्याग्रह. सर्व परमेश्वराचीच लेकरे असतील तर त्या परमेश्वराचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला अस्पृश्यतेच्या नावाखाली का नकार असावा? हा प्रश्न त्या सत्याग्रहात होता. अतिशय शांतपणे, अहिंसक मार्गाने गुरुजीनी हा लढा दिला होता. मेणाहून मऊ हृदय असणारी माणसं सत्यासाठी वज्राहून कठीण होऊ शकतात. व तेही समाजास्वास्थ्य बिघडू न देता. हे गुरुजीनी दाखवून दिले.
गुरुजीनी माणसावर प्रेम तर केलंच; पण झाडे, वेली, निसर्ग, पशु पक्षी यांच्या मनाचा ठाव घेताना त्यांच्याही मातेचं स्थान त्यांनी प्राप्त केलं.
साने गुरुजींची शिकवण प्रत्येक ठिकाणी उपयुक्त ठरते.
मुलांच्या बाबतीत साने गुरुजी खूप हळवे होते. ‘मुलं ही देवाघरची फुलं’ आहेत. असं त्यांचं मत होत होतं. ती फुलं सतत हसती खेळती, टवटवीत असावीत यासाठी ते धडपडत. त्यासाठी त्यांच्याकरिता गाणी गोष्टी ते लिहायचे. आनंदाबरोबरच त्यांच्यावर संस्कार व्हावेत हाही हेतू असायचा.
या निमित्ताने मला एक प्रसंग आठवतो.
आपली शाळा सुंदर असावी. झाडा फुलांनी बहरलेली असावी. त्या झाडांवर पाखरांचा किलबिलाट असावा. असं वाटायचं.
योगायोगाने शाळेत झाडा फुलांवर अतिशय प्रेम करणाऱ्या एक बाई, विजयादेवी पाटील बदलीने आल्या. त्या मलाच पहिलीला शिकवायला होत्या. आम्ही खूप वेगवेगळ्या फूलझाडे लावली. सुंदर फुले डोलू लागली. नंतर त्या गावातील लोक बाईना फुलांची आई म्हणू लागले. पण, शाळेला कसलेच कुंपण नव्हते. लहान मुलांना तर फुलांचे आकर्षण असते. फुले तोडल्याने ती झाडे निस्तेज वाटायची.
त्या वेळी सानेगुरुजींच्या एका संस्कार कथेनं आधार दिला.
पाठ्यपुस्तकातच ती कथा होती. शामची आई या संग्रहातली.
त्याचा सारांश होता, शाम एकदा फुलझाडावरच्या कळ्या तोडून आणतो. त्यावेळी आई त्याला सांगते, ‘बाळ, कळ्या म्हणजे वेलीची बाळे असतात. आणि ती बाळे आईच्या मांडीवरच सुरक्षीत असतात. त्या बाळाला आईच्या मांडीवरुन तोडून दूर नेले तर ती रडतील. कोमेजतील.’
याचा संदर्भ घेऊन आपल्या बाबतीत असे घडले तर चालेल का? असे वारंवार विचारून मुलांच्यात बदल घडवला. आजही त्या शाळेतील मुलेच काय, पालकही फुलांना हात लावत नाहीत. ही जादू आहे साने गुरुजींच्या संस्काराची.
साने गुरुजींचे विचार, संस्कार माणसाला मानवतेकडे नेण्यासाठी एखाद्या दीप स्तंभासारखे चीरकाल मार्गदर्शन करत राहणार आहेत.
डॉ. आंबेडकर चौक हा आमच्या गावातील एक प्रमुख चौक. याच चौकात असलेलं पुजारी हॉटेल आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी वेगळेपण जपून होतं. आमच्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंतच्या आमच्या जीवनात या हॉटेलचे अनेक अनुभव स्मृतीपटलावर कोरले गेले आहेत .आज सहजच पुजारी हॉटेलच्या जागेवर बांधल्या गेलेल्या शोरुम कडे पाहिलं आणि पुजारी हॉटेलच्या आठवणी मन:चक्षुसमोरून सरसरत गेल्या.
पुजारी हॉटेल म्हणजे काही भव्यदिव्य वास्तू नव्हती. दहा बाय वीस पंचवीस फूट क्षेत्रफळ असलेल्या टिनाच्या शेडमध्ये हे हॉटेल होते. पण इतके लहान असले तरी आम्हाला ते कधी अडचणीचे वाटले नाही. पश्चिम व दक्षिण दिशेला असलेले दरवाजे आम्ही कधी बंद झालेले पाहिले नाहीत .दोन तीन टेबलं , त्याभोवती खुर्च्या. कोपऱ्यात एक निमुळता टेबल व त्यामागे लाकडी खुर्ची म्हणजे मालकाचे काऊंटर. उत्तरेकडे सदैव पेटत असलेली भट्टी. कोपऱ्यात पाण्याचे टाके, त्यावर पाण्याचा नळ. याच टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. नोकरही चार ग्लास बोटात धरून टाक्यातील पाण्यात बुडवत आणि तसेच टेबलवर आणून ठेवत. आणि याला त्यावेळी कुणाचाही आक्षेप नसायचा. मिनरल वॉटर तर माहीतच नव्हते, पण कुणी आजारी पडल्याचे कधी ऐकले नाही .नगर परिषदेच्या नळाचे पाणी म्हणजे शुद्ध पाणी असा तेव्हा नियम होता . .या हॉटेलचे वेगळेपण म्हणजे ते जवळपास दिवसरात्र सुरू असायचे. रात्री दोन तीन तास लाईट बंद केले की हॉटेल बंद. हॉटेलचे नोकर तिथेच रहायचे .काही विशिष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध म्हणावे तर तसेही नव्हते .भजी, आलुबोंडे ,शेव चिवडा असे नेहमीचेच पदार्थ तिथे मिळायचे. मिठाई म्हणजे जिलेबी व केव्हातरी बनविलेले पेढे बस. पण केव्हाही गरम मिळणारा एक पदार्थ तिथे मिळायचा तो म्हणजे मिसळ, त्याचीही रेसिपी ठरलेली होती. हॉटेलच्या भट्टीवर सदैव एक गंज मांडलेला असायचा- त्यात केव्हातरी बनविलेली दह्याची कढी सदैव गरम होत राहायची. मिसळ म्हणजे दोन चार भजी, त्यावर शेव चिवडा, आणि गरम कढी टाकलेली असायची.
हे पुजारी हॉटेल पदार्थासाठी महत्वाचे नव्हते, तर ते अनेकांचा आधार होते. त्याकाळी चंद्रपुरात सायकल रिक्षे होते.रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर असे रिक्षावाले हॉटेलच्या आश्रयाने उभे असायचे. रात्री साडेबाराला सिनेमाचे शो संपायचे ,अनेक लोक चहा नाश्त्यासाठी याच हॉटेलचा आश्रय घ्यायचे. दुसरे महत्वाचे म्हणजे तेव्हा पॅसेंजर ट्रेन हेच लोकांच्या आवागमनाचे साधन होते. नागपूरकडे जाणारी व नागपूरकडून येणारी- अशा दोन्ही गाड्या मध्यरात्रीच येत असत. या दोन्ही गाड्यांचे प्रवासी रात्रीचा वेळ पुजारी हॉटेलच्या आसपास घालवीत असतं. साधारणतः रात्री दोन तीन पर्यंत सुरू असलेले ते हॉटेल पहाटे पाचला पुन्हा सुरू व्हायचे. रात्रीच्या गाडीने आलेले पाहुणे पहाट होईपर्यंत हॉटेल परिसरात थांबायचे, कारण तिथे रात्रीही वर्दळ असायची.
हॉटेलमध्ये नॅशनल एको कंपनीचा रेडिओ होता, जो सकाळी सहाला सुरू व्हायचा तो रात्री रेडिओ प्रक्षेपण बंद होईपर्यंत सुरू असायचा. हॉटेललगत एक मोठे सिरसाचे झाड होते.. त्यावर एक मोठा स्पीकरबॉक्स लावलेला होता. तो रेडिओला जोडला असल्यामुळे रेडिओचे सर्व कार्यक्रम परिसरात ऐकू जायचे. त्यावेळी “ सिलोन ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन का व्यापारी विभाग “ हे रेडिओ स्टेशन प्रसिद्ध होते.बिनाका गीतमाला, आपहीके गीत, भूले बिसरे गीत, असे अनेक कार्यक्रम ऐकण्यासाठी लोक तिथे थांबायचे .अमीन सयानीचा आवाज ऐकू आला की लोकांची पावले नकळत थांबत. आमच्यासाठी तर ते घड्याळही होते.आमची सकाळची शाळा असायची. साडे सातला शाळा सुरू व्हायची. सात वीस ला प्रार्थना व्हायची . हॉटेलपासून शाळा पाच मिनिटाच्या अंतरावर होती. सव्वासातला रेडीओवर `सत्तेशू समाचार` हा ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारा कार्यक्रम लागायचा व नंतर समाचार लागायचे. आम्ही तिथे पोहोचलो की कोणता कार्यक्रम सुरू आहे ते ऐकायचो.समाचार सुरू नसतील तर बरोबर प्रार्थनेला हजर. नाहीतर उशीर म्हणून छड्या बसत असेत . सिरसाचे ते झाड आणखी एका बाबतीत मनोरंजक होते. या झाडावर गावातील सिनेमा थियेटरमध्ये लागलेल्या सिनेमाचे बोर्ड टांगलेले असायचे. कोणत्या टॉकीजमध्ये कोणता सिनेमा लागलाय ते तिथे समजायचे .शाळा सुटली की तिथे उभे राहून ते बोर्ड पाहणे हा आमचा आवडीचा विषय होता .
“पुजारी हॉटेल“ या नावातील `पुजारी` या शब्दाचाही एक इतिहास आहे. पुजारी हे मालकांचे आडनाव नव्हे, तर मालकाचे वडील गुजरात राज्यातून चंद्रपूरच्या लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी म्हणून आले होते. पुढे त्यांचे मूळ आडनाव मागे पडून पुजारी हेच नाव प्रसिद्ध झाले.
हॉटेलचे एक आणखी वैशिष्टय म्हणजे हॉटेलमध्ये लावलेले फोटो. यात अनेक राष्ट्रीय पुरुषांचे फोटो होते.आम्ही शिकतांना दहावीत काँग्रेसच्या स्थापनेचा इतिहास शिकला होता. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी, बद्रुद्दिन तय्यबजी,दादाभाई नौरोजी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, यालन ह्यूम, वेडरबर्न, या सर्वांचे फोटो तिथे लावले होते. हे त्यांचे अनौपचारिक शैक्षणिक कार्यच होते.
आणखी एक वैशिष्टय म्हणजे या हॉटेलच्या दर्शनी भागात बँडवाल्यांची वाद्ये लटकवलेली असायची.कारण हॉटेल मालकांच्या लहान भावाची इंडिया बँड पार्टी होती.त्या परिसरातील बँडवाल्यांनी आपसातील भांडणाला कंटाळून त्यांना आपले प्रमुख नेमले होते. ` बँड पार्टीचे ब्राम्हण प्रमुख ` हे कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. गावातील सर्व लग्नाचे बँड पुजारी होटलातच ठरायचे. महत्वाचे म्हणजे ही बँडपार्टी व त्याचे ` पुजारी ` हे मालक अजूनही आहेत . नुकताच त्यांनी त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
असे हे वैशिष्टयपूर्ण पुजारी हॉटेल नवीन पिढीने विकले– तिथे दुसरे शोरुम उभे राहिले. पण माझ्या पिढीतील अनेक चंद्रपूरकर या हॉटेलला कधीही विसरू शकत नाहीत —कारण ते फक्त हॉटेल नव्हतेच.
☆ गोत्र म्हणजे काय ?.☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
गोत्र म्हणजे काय ?
धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा `आपले गोत्र काय ` असा प्रश्न गुरुजी विचारतात तेव्हा ` गोत्र म्हणजे काय `असा
प्रतिप्रश्न करणारे देखील असतात, अशावेळेला पूर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देऊन वेळ मारुन नेणारेही काही जण असतात. पण तसे नसून गोत्र ही वैदिक धर्माने दिलेली देणगी आहे. जन्मवंश शास्त्र दृष्ट्या अत्यंत सूक्ष्मस्तरीय एक मानवशाखा आहे.
“धर्मसिंधु” ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे दिलेले आहे—
विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ,आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी अगस्त्य हे
होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य म्हणजे गोत्र होय. त्या त्या ऋषींच्या नावांना गोत्र असे म्हणतात.
प्रमुख गोत्र व त्यांची प्रवरे
१ अत्रि : आत्रेय -आर्चासन -श्यावाश्व
२ अघमर्षण : वैश्वामित्र -अघमर्षण-कौशिक
३ आंगिरस : आंगिरस -आंबरीष -यौवनाश्व
४ आयास्य : आंगिरस -आयास्य -गौतम
५ आर्ष्टिषेण : भार्गव – च्यावन -आप्न्वन – आर्ष्टिषेण -अनूप
६ उपमन्यु : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु
७ कण्व : आंगिरस -आजमीढ -कण्व
८ कपि : आंगिरस -आमहीयव -औरुक्षयस
९ काश्यप : काश्यप -अवत्सार -नैधृव( काश्यप ) -अव्त्सार -असित
१० कुत्स : आंगिरस -माधांत्र -कौत्स
११ कौंडिण्य : वासिष्ठ -मैत्रावरुण -कौंडिण्य
१२ कौशिक : वैश्वामित्र –अघमर्षण -कौशिक
१३ गार्ग्य : आंगिरस -शैन्य -गार्ग्य
१४ जामदग्न्य : भार्गव – च्यावन -आप्न्वन -और्व -जामदग्न्य
१५ नित्युन्द : आंगिरस – पौरुकुत्स्य -त्रासदस्यु
१६ नैध्रुव : काश्य्प -अव्त्सार – नैध्रुव
१७ पाराशर :वासिष्ठ -शाक्त्य -पाराशर
१८ बादराण : आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु
१९ बाभ्र्व्य : वैश्वामित्र -देवरात -औदास
२० बिद : भार्गव – च्यावन -आप्न्वन-और्व – बिद
२१ भारव्दाज : आंगिरस बार्हस्पत्य -भारव्दाज
२२ मित्रायु :भार्गव – च्यावन -देवोदास
२३ मुद्ग् गल : आंगिरस -भार्ग्याश्व -मौद्ग्गल्य
२४ यस्क : भार्गव वैतहव्य -सावेतस
२५ रथीतर :आंगिरस -वैरुप -रथीतर
२६ वत्स : भार्गव – च्यावन -आप्न्वन-और्व -जामदग्न्य
२७ वासिष्ठ : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु
२८ विष्णुवृद्ध :आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु
२९ वैश्वामित्र : वैश्वामित्र -अघमर्षण -कौशिक
३० शांडिल्य : शांडिल्य -असित -देवल
३१ शालाक्ष : वैश्वामित्र -शालंकालय -कौशिक
३२ शौनक : भार्गव -शौनहोत्र -गार्स्तमद
प्रवर म्हणजे काय ?
गोत्रांची संख्या अगणित असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. प्रत्येक गोत्रांना प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तीन ते पाचपर्यंत प्रवर्तक असतात. या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असे म्हणतात.
काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला जातो. तसेच उपनयन प्रसंगी बटूस गोत्र प्रवर ,स्वतःची वेदशाखा,
सूत्र, स्वतःचे नक्षत्र व चरण नाम यांची माहिती करुन दिली जाते.
ही माहिती शेयर करण्याचे कारण म्हणजे आपले पूर्वज आणि आपली हिंदू संस्कृती किती संपन्न होती ह्याचे हे छान उदाहरण आहे…..
जेनेटिक्सचा अभ्यास करणाऱ्यांनी हे मान्य केलेले आहे की एका गोत्रात लग्न केल्यामुळे अनेक आजार ( जेनेटिकली ट्रांसमिटेड डिसीज ) होऊ शकतात आणि आपल्या पूर्वजांनी जे नियम घालून दिले आहेत ते योग्य आहेत…..
त्यातील बऱ्याच गोष्टीची उकल जेनेटिक्सवाले आता करत आहेत …
आपली हिंदू संस्कृती अतिशय पुढारलेली आहे . त्यामुळे योग्य अभ्यास करून मगच त्यावर टीका करा….
धन्यवाद ………….
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दि बुक थिफ … दिग्दर्शक – ब्रायन पर्सिवल ☆ परिक्षण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
युद्धातल्या खऱ्या रम्यकथा…
मार्कस झुसॅक यांच्या कादंबरीवर आधारित
दिग्दर्शक – ब्रायन पर्सिवल
सध्या आपण रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या बातम्या ऐकतो आहोत, पाहतो आहोत आणि या युद्धाचे इतर देशांवर होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, गंभीर-किरकोळ स्वरूपाचे परिणामदेखील पहात आहोत, अनुभवत आहोत. यावरून माझ्या एकच लक्षात आलं की आता युद्ध ही संकल्पना कुठल्याही ठराविक भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा सामाजिक सीमेपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर ती पृथ्वीच्या कुठल्याही एका बिंदूपासून सुरू होऊन हळूहळू संपूर्ण पृथ्वीला कह्यात घेते… आणि एका विषयापासून सुरू होऊन इतर अनेक विषयांनाही कवेत घेते. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या तीनही काळांचा संबंध युद्ध या संकल्पनेशी घट्ट रुजलेला आहे. त्यामुळे आधी घडून गेलेल्या काही युद्धांच्या कथा जरी अत्यंत विनाशकारी असल्या तरी आजही पुन्हा पुन्हा आठवल्या जातात. त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा घडत राहते. आणि हळूहळू या कथा निरनिराळ्या साहित्यकृतींचं ही आकर्षण ठरतात.
दुसरं महायुद्ध हे आजही अनेकदा चर्चिलं जातं, आणि त्याबरोबरच चर्चिला जातो तो या युद्धाचं केंद्रस्थान असलेला, अनेकांच्या दृष्टीने खलनायक ठरलेला हिटलर. याच हिटलरच्या कारकिर्दीतील एका युद्धघटनेवर आधारित‘द बुकथीफ‘ हा चित्रपट नुकताच पाहण्यात आला. आणि हा चित्रपट पाहताना आणि पाहून झाल्यावरही कित्येक काळ यातले अनेक प्रसंग माझ्या मनात रुंजी घालत राहिले.
युद्धस्य कथा रम्या: असं जे म्हटलं जातं ते का म्हटलं जात असावं… संपूर्ण मानवी सृष्टीचा संहार करणाऱ्या युद्धामध्ये रम्य असं काय असतं, असा माझा प्रश्र्न… केवळ पराकोटीचं साहस, वीरता, आपल्या धर्माचे रक्षण, देशप्रेम दर्शवण्याची एक संधी, की कुणा एकाची अर्तक्य साम्राज्यलालसा. यापलीकडे युद्ध नक्की काय सांगतं… जे सर्वसामान्य लोक या सगळ्यापासून पूर्णपणे अलिप्त असतात आणि आपलं मानवी जीवन शांततेनं, प्रेमानं जगू इच्छितात त्या लोकांच्या मनात या युद्धकाळामध्ये नक्की काय विचार मंथन चालू असतं? ते या युद्धाकडे नक्की कोणत्या दृष्टीने बघत असतात? आपल्या देशाविरुद्ध लढण्यासाठी उभ्या असणाऱ्या देशाप्रती, तिथल्या समाजातल्या असंख्य लोकांप्रती त्यांच्या नक्की काय भावना असतात? हे युद्ध झाल्यानंतर कोणीही जिंकलं किंवा कोणीही हरलं तरी या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने त्यांच्या जगण्यात काय फरक पडतो? आणि या युद्धांच्या घटनांचं जे वार्तांकन केलं जातं… युद्धभूमीवरील वार्तांकनाने देशन् देश पेटून उठलाय असं सांगितलं जातं, ते खरंच तसं असतं का… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याफार प्रमाणात का होईना हा चित्रपट देतो. भले मग चित्रपट या माध्यमातलं कलात्मक आणि काल्पनिक स्वातंत्र्य या दोन गोष्टी जरी गृहीत धरल्या तरीदेखील या चित्रपटात युद्धकाळात दिसणारे सर्वसामान्यांचे जीवन आणि त्यांच्या माणूस म्हणून एकमेकांप्रती असलेल्या भावना या अतिशय प्रामाणिक आणि खऱ्या वाटतात. आणि म्हणूनच यातल्या अनेक घटना माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला महत्त्वाच्या वाटतात आणि मनावर खोल परिणाम करतात.
मुळात या चित्रपटाची कथा आपल्याला सांगतो तो निवेदक साक्षात मृत्यू आहे. आणि आपण करत असलेल्या कामाबद्दल तो अतिशय तटस्थपणे सांगत आहे. आपण आजपर्यंत कितीतरी खलनायकांसाठी अतिशय आज्ञाधारकपणे काम केलंय हे तो खुलेपणाने मान्य करतो. पण त्याच वेळेस एका सर्वसामान्य घरातल्या सर्वसामान्य लहान मुलीच्या तो प्रेमात पडलाय याचं त्यालाही वाटणारं आश्चर्य तो व्यक्त करतो.
आणि मग सुरु होते कहाणी लीझल नावाच्या मुलीची. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक व्यथांचा जन्मच हिटलरच्या काळ्या कारकीर्दीत होऊ लागतो. आपले सख्खे नातेवाईक गमावण्यापासून ते आपण ज्यांच्याकडे आश्रित म्हणून राहायला आलो आहोत त्यांनाही गमावण्यापर्यंत अनेक प्रसंग घडत जातात. पण असं असलं तरीही ही कहाणी फक्त मृत्यूच सांगत नाही, तर या प्रत्येक मृत्यूमधलं जीवनदेखील आपल्याला सांगते आणि ज्या लीझल नावाच्या मुलीची ही कथा आहे त्या मुलीला अंधारी आणि अधांतरी अवस्थेत हे जीवन सापडतं तरी कुठे? तर ‘पुस्तकांमध्ये’.
आश्चर्यचकित झाला असाल कदाचित; पण तरीही हेच उत्तर आहे. आणि हेच वैशिष्ट्य आहे या चित्रपटाचं. आपल्याला वाचता येत नाही हे माहीत असूनसुद्धा ही मुलगी आपल्या भावाच्या मृत्युनंतर त्याच्या कबरीजवळ पडलेलं ‘कबर कशी खोदावी?` हे सांगणारं एक पुस्तक चोरते. ते पुस्तक चोरताना ते नक्की कशाचं आहे आणि आपल्याला त्याचा काय उपयोग आहे यापैकी कश्शाचाही विचार तिच्या मनात येत नाही. तिच्या दृष्टीने फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे ते पुस्तक तिच्या भावाच्या कबरीजवळ त्याची कबर खोदताना पडलेलं आहे. आणि त्यामुळेच आपल्या भावाचा एक छोटा फोटो ती त्या पुस्तकात ठेवून देते आणि ते पुस्तक जिवापाड जपते.
पुढे मग ती हे पुस्तक वाचायला कशी शिकते, ते शिकताना तिला काही अडथळे आले तर त्यावर कशी मात करते, हे सगळं पाहणं अतिशय हृद्य आहे. याबरोबरच पुस्तक वाचण्याचा तिला लागलेला लळा हा तिला पुस्तक-चोर बनवतो. पण ही चोरी तिला तिच्या आयुष्यात किती समृद्ध बनवते हे या चित्रपटातून अतिशय उत्तमरित्या मांडलेलं आहे. पुस्तक वाचनाच्या तिच्या वेडामुळेच तिच्या घरी आश्रयासाठी लपून राहिलेला ज्यू तरुण, मॅक्स तिचा घट्ट मित्र बनतो आणि तिने आता वाचनाबरोबर लिहिलं पाहिजे हे आग्रहानं तिला सांगतो. मॅक्स आणि लीझल यांच्यातले प्रसंग मला सर्वांत जास्त भावले… मग तो हिटलरच्या आईनं त्याला पत्र लिहिण्याच्या काल्पनिक प्रसंगाचा असो किंवा बाहेरचं वातावरण कसंय ते मला तुझ्या शब्दांत सांग असं म्हणल्यावरचा असो, किंवा तिनं बाहेरुन त्याला बर्फ आणून देण्याचा असो, किंवा तळघरात त्यांनी गुप्तपणे ख्रिसमस साजरा करण्याचा असो, किंवा ज्यू लोकांमध्ये शब्द म्हणजे काय हे सांगण्याचा असो… हे प्रसंग अतिशय तरल, काव्यात्मक, उत्कट पण तितकेच खरेही वाटतात.
शिवाय अजून एका प्रसंगाचा तर आवर्जून उल्लेख करायलाच हवा. युद्ध चालू झाल्यावर त्यापासून वाचण्यासाठी सगळेजण एका तळघरात जमलेले असतात आणि तिथे तिला अचानक गोष्ट स्फुरू लागते. ती गोष्टदेखील एका काळ्या रंगाच्या आड लपणाऱ्या भावाची आहे, जो तिच्या बहिणीला भेटत असतो. प्रतिकात्मक अशी अत्यंत सुंदर गोष्ट. चित्रपटातील हे सगळे प्रसंग जरी काल्पनिक असले तरी ते अत्यंत खरे वाटतात, कारण प्रतिकूल परिस्थितीत आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवणारे मानवतावादी लोक असं साधं-सोपं, निरलस वागू शकतात किंबहुना वागतात.
लीझल, मॅक्स यांबरोबरच ज्यांच्याकडे हे दोघं आश्रित म्हणून राहत असतात ते हान्स आणि रोझा, लीझलच्या प्रेमात पडलेला तिचा शेजारी मित्र रूडी, त्याचे आई-वडील, नगराध्यक्षाची बायको या सगळ्याच व्यक्तिरेखा अत्यंत जीवन अभिलाषी आणि नात्यांवर विलक्षण प्रेम, विश्वास आणि श्रद्धा असलेल्या आहेत. युद्धकाळात आपापसातल्या अनेक चौकटी विसरून एकमेकांना मदत करण्यासाठी सरसावलेली ही जिवंत माणसं म्हणजेच युद्धातल्या खऱ्या रम्यकथा म्हणाव्यात असं मला वाटतं. आणि म्हणूनच कीकाय मृत्यूदेखील त्यांच्या नात्यांच्या मोहात अडकलेला आहे.
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख संपन्नता मन की । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 136 ☆
☆ संपन्नता मन की☆
संपन्नता मन की अच्छी होती है; धन की नहीं, क्योंकि धन की संपन्नता अहंकार देती है और मन की संपन्नता संस्कार प्रदान करती है। शायद इसलिए ही धनी लोगों में अहंनिष्ठता के कारण ही मानवता नहीं होती। वे केवल हृदय से ही निर्मम नहीं होते; उनमें औचित्य-अनौचित्य व अच्छे-बुरे की परख भी नहीं होती। वे न तो दूसरों की भावनाओं को समझते हैं; न ही उन्हें सम्मान देना चाहते हैं। सो! वे उन्हें हेय समझ उनकी उपेक्षा करते हैं और हर पल नीचा दिखाने में प्रयासरत रहते हैं। इसलिए दैवीय गुणों से संपन्न व्यक्ति को ही जग में ही नहीं; जन-मानस में भी मान-सम्मान मिलता है। लोग उससे प्रेम करते हैं और उसके मुख से नि:सृत वाणी को सुनना पसंद करते हैं, क्योंकि वह जो भी कहता व करता है; नि:स्वार्थ भाव से करता है तथा उसकी कथनी व करनी में अंतर नहीं होता। वे भगवद्गीता के निष्काम कर्म में विश्वास करते हैं। जिस प्रकार वृक्ष अपना फल नहीं खाते; पथिक को छाया व सबको फूल-फल देते हैं। बादल भी बरस कर प्यासी धरती माँ की प्यास बुझाते हैं और अपना जल तक भी ग्रहण नहीं करते। इसलिए मानव को भी परहिताय व निष्काम कर्म करने चाहिए। ‘अपने लिए जिए तो क्या जिए, तू जी, ऐ दिल ज़माने के लिए’ से भी यही परोपकार का भाव प्रकट होता है। मुझे स्मरण हो रहा है एक प्रसंग– जब मीरा जी मस्ती में भजन कर रही थी, तो वहां उपस्थित एक संगीतज्ञ ने उससे राग के ग़लत प्रयोग की बात कही। इस पर उसने उत्तर दिया कि वह अनुराग से कृष्ण के लिए गाती है; दुनिया के लिए नहीं। इसलिए उसे राग की परवाह नहीं है।
‘ब्रह्म सत्यं जगत् मिथ्या’ ब्रह्म ही केवल सत्य है। उसके सिवाय इस संसार में सब मिथ्या है, परंतु माया के कारण ही वह सत्य भासता है। शरतचंद्र जी का यह कथन कि ‘मित्रता का स्थान यदि कहीं है, तो वह मनुष्य के मन को छोड़कर कहीं नहीं है’ से स्पष्ट होता है कि मानव ही मानवता का सत्पात्र होता है। परंतु उसके मन की थाह पाना आसान नहीं। उसके मन में कुछ और होता है और ज़ुबाँ पर कुछ और होता है। मन चंचल है, गतिशील है और वह पल भर में तीनों लोगों की यात्रा कर लौट आता है।
‘वैसे आजकल इंसान मुखौटा धारण कर रहता है। उस पर विश्वास करना स्वयं से विश्वासघात करना है।’ दूसरे शब्दों में मन से अधिक छल कोई भी नहीं कर सकता। इसलिए कहा जाता है कि यदि गिरगिट की तरह रंग बदलने वाला कोई है, तो वह इंसान ही है। यही कारण है कि आजकल गिरगिट भी इंसान के सम्मुख शर्मिंदा है, क्योंकि वह उसे पछाड़ आगे निकल गया है। यही दशा साँप की है। काटना उसका स्वभाव है, परंतु वह अपनी जाति के लोगों को पर वार नहीं करता। परंतु मानव तो दूसरे मानव पर जानबूझ कर प्रहार करता है और प्रतिस्पर्द्धा में उसे पछाड़ आगे बढ़ जाना चाहता है। इस स्थिति में वह किसी के प्राण लेने में लेशमात्र भी संकोच नहीं करता। दुष्टता में इंसान सबसे आगे रहता है, क्योंकि वह मन के हाथों की कठपुतली है। अहंनिष्ठ मानव की सोचने-समझने की शक्ति नष्ट हो जाती है और उसे सावन के अंधे की भांति केवल हरा ही हरा दिखाई देता है। वह अपने परिवार के इतर कुछ सोचता ही नहीं और स्वार्थ हित कुछ भी कर गुज़रता है। मानव का दुर्भाग्य है कि वह आजीवन यह नहीं समझ पाता कि उसे सब कुछ यहीं छोड़ कर जाना है। मेरी स्वरचित पंक्तियाँ ‘यह किराए का मकाँ है/ कौन कब तक ठहर पाएगा/ खाली हाथ तू आया है बंदे!/खाली हाथ तू जाएगा’ इसी तथ्य को उजागर करती हैं। काश! इंसान उक्त तथ्य को आत्मसात् कर पाता तो संसार में धर्म, जात-पाति व अमीर-गरीब आदि के झगड़े न होते और न ही किसी प्रकार का पारस्परिक वैमनस्य, भय व आशंका मन में उपजती।
‘काश! जीवन परिंदो जैसा होता/ सारा जग अपना आशियां होता।’ यदि मानव के हृदय में संकीर्णता का भाव नहीं होता, तो वे भी अपनी इच्छानुसार संसार में कहीं भी अपना नीड़ बनाते । सो! हमें भी अपनी संतान पर अंकुश न लगाकर उन्हें शुभ संस्कारों से पल्लवित करना चाहिए, ताकि उनका सर्वांगीण विकास हो सके। वे कर्त्तव्यनिष्ठ हों और उनके हृदय में प्रभु के प्रति आस्था, बड़ों के प्रति सम्मान भाव व छोटों के प्रति स्नेह व क्षमा भाव व्याप्त हो। पति-पत्नी में सौहार्द व समर्पण भाव हो और परिजनों में अजनबीपन का एहसास न हो। हमें यह ज्ञान हो कि कर्त्तव्य व अधिकार अन्योन्याश्रित हैं। इसलिए हमें दूसरों के अधिकारों के प्रति सजग रहना आवश्यक है। हमें समाज में सामंजस्य अथवा सत्यम्, शिवम्, सुंदरम् की स्थापना हेतू सत्य को शांत भाव से स्वीकारना होगा तथा झूठ व मिथ्या को त्यागना होगा। सत्य अटल व शिव है, कल्याणकारी है, जो सदैव सुंदर व मनभावन होता है, जिसे सब धारण करना चाहते हैं। जब हमारे मन में आत्म-संतोष, दूसरों के प्रति सम्मान व श्रद्धा भाव होगा, तभी जीवन में समन्वय होगा। इसलिए इच्छाओं पर अंकुश लगाना आवश्यक है, क्योंकि आवश्यकताएं पूरी की जा सकती हैं; इच्छाएं नहीं। यदि हमारे कर्म यथोचित होंगे, तभी हमारी इच्छाओं की पूर्ति संभव है।
जीवन में संयम का सर्वश्रेष्ठ स्थान है। जो व्यक्ति काम, क्रोध, लोभ, मोह आदि पर अंकुश नहीं रख पाता, तो उससे संयम की अपेक्षा करना निराधार है; मात्र कपोल-कल्पना है। महात्मा बुद्ध की यह सोच अत्यंत श्लाघनीय है कि ‘यदि कोई आपका अनादर कर रहा है, तो शांति स्थापित होने तक आपको उस स्थान को नहीं छोड़ना चाहिए।’ सो! आत्म-संयम हेतू वाणी पर नियंत्रण पाना सर्वश्रेष्ठ व सशक्त साधन है। वाणी माधुर्य से मानव पलभर में शत्रु को मित्र बना सकता है और कर्कश व कटु शब्दों का प्रयोग उसे आजीवन शत्रुता में परिवर्तित करने में सक्षम है। यह शब्द ही महाभारत जैसे बड़े-बड़े युद्धों का कारण बनते हैं।
हर वस्तु की अधिकता हानिकारक होती है,भले वह चीनी हो व अधिक लाड़-प्यार हो। इसलिए मानव को संयम से व्यवहार करने व अनुशासन में रहने का संदेश दिया गया है। ‘आप दूसरों से वैसा व्यवहार कीजिए, जिसकी आप उनसे अपेक्षा करते हैं, क्योंकि जीवन में वही लौट कर आपके पास आता है’ में दिव्य अनुकरणीय संदेश निहित है। इसलिए बच्चों को शास्त्र ज्ञान, परमात्म तत्व में आस्था व बुज़ुर्गों के प्रति श्रद्धा भाव संजोने की सीख देनी चाहिए। बच्चे अपने माता-व गुरुजनों का अनुकरण करते हैं तथा जैसा वे देखते हैं, वैसा ही व्यवहार करते हैं। इसलिए हमें फूंक-फूंक कर कदम रखने चाहिए, ताकि हमारे कदम ग़लत दिशा की ओर अग्रसर न हों और हमें किसी के सम्मुख नीचा न देखना पड़े। हमें मन का अंधानुकरण नहीं करना चाहिए, क्योंकि जहाँ वह हमारा पथ-प्रशस्त करता है, वहीं भटकन की स्थिति उत्पन्न करने में भी समर्थ है।
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।)
आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता – नदी का उद्गम।)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)
We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem “गिलहरी” . We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)