हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #130 ☆ लघुकथा – समय की धार ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं एक विचारणीय लघुकथा  “समय की धार।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 130 – साहित्य निकुंज ☆

☆ लघुकथा – समय की धार ☆

इंदु की बाहर पोस्टिंग हो जाने बाद आज उसका फोन आया. वहां के सारे हालचाल सुनाए और निश्चितता से कहा बहुत मजे से जिंदगी चल रही है.

हमने ना चाहते भी पूछ लिया अब शादी के बारे में क्या ख्याल है यह सुनते ही उसका गला भर आया.

उसने कहा..”माँ  बाबूजी भी इस बारे में बहुत फोर्स कर रहे हैं लेकिन मन गवाही नहीं दे रहा कि अब फिर से वही जिंदगी शुरू की जाए. पुराने दिन भुलाए नहीं भूलते।”

हमने समझाया ” सभी एक जैसे नही होते, हो सकता है कोई इतना बढ़िया इंसान मिले कि तुम पुराना सब कुछ भूल जाओ।”

“दी कैसे भूल जाऊं वह यादें… ,कितना गलत था मेरा वह निर्णय, पहले उसने इतनी खुशी दी और उसके बाद चौगुना दर्द, मारना -पीटना, भूखे रखना. उसकी माँ जल्लादों जैसा व्यवहार करती थी।”

“माँ बाप की बात को अनसुना करके बिना उनकी इजाजत के कोर्ट मैरिज कर ली और हमारे जन्म के संबंध एक पल में टूट गये।”

“देखो इंदु , अब तुम बीती बातों को भुला दो और अब यह आंसू बहाना बंद कर दो।”

“दी यह मैं जान ही नहीं पाई कि जो व्यक्ति इतना चाहने वाला था वह शादी के बाद ही गिरगिट की तरह रंग कैसे बदलने लगा।”

“इंदु अब तुम सारी बातों को समय की धार में छोड़ दो।”

“नहीं दी यह मैं नहीं भूल सकती, मैंने अपने माता पिता को बहुत कष्ट दिया, इसका उत्तर भगवान ने हमें दे दिया.”

“इंदु एक बात ध्यान रखना माता-पिता भगवान से बढकर है, वे अपनी संतान को हमेशा मांफ कर देते है।”

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #120 ☆ नीको लगे यह ब्रज हमारो ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.  “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं  भावप्रवण रचना “नीको लगे यह ब्रज हमारो। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 120 ☆

☆ नीको लगे यह ब्रज हमारो 

कन कन में बसते मन मोहन, मोहक राज दुलारो

ब्रज की रज चंदन सी महके, वृंदावन है प्यारो

जित बसते हों राधेरमना, सुख मिलतो है सारो

रहे  कबहुँ न दुख को अंधेरों, पास रहे उजियारो

ब्रज की बोली बड़ी रसीली, प्रेम पाग उचारो

ब्रज की रज “संतोष” लपेटें, कहते प्रभु अब तारो

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 17 (11-15)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #17 (11 – 15) ॥ ☆

रघुवंश सर्ग : -17

 

बाजों ने बजकर किया सुखप्रद घोष महान।

जैसे घोषित किया हो सतत अतिथि-कल्याण।।11।।

 

वयोवृद्ध जन ने किया जाति-प्रथा अनुसार।

आरती ले दूर्वा-कमल दल औं पीपल छाल।।12।।

 

कुछ पुरोहितों ने किया अथर्व-मंत्रोच्चार।

अतिथि अजेय हो कर सकें ग्रहण नृपति का भार।।13।।

 

सिर पर यों शोभित हुई पड़ी नेक जलधार।

जैसे शिव के शीश पै हो गंगा की धार।।14।।

 

फैले चारों ओर फिर चारण के संगीत।

ज्यों बादल की प्रशंसा में चातक के गीत।।15।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

सुमती पायगावकर

सुमती पायगावकर (7 जून 1910 – 6 मे 1995) या बालसाहित्य लेखिका होत्या. त्यांचे शालेय शिक्षण प्रथम दिल्ली व नंतर इंदूर येथे उर्दू व हिंदी माध्यमातून झाले. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईला एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. बी. ए., बी.टी.होऊन त्या शिक्षिका झाल्या. नंतर शिक्षण-निरीक्षक पदावर कार्यरत असताना त्या सेवानिवृत्त झाल्या.

शालेय काळात त्यांनी लेखन सुरू केले. त्यांची छोटी कादंबरी ‘सरोज’ प्रकाशित झाली. नंतर त्या बालसाहित्याकडे वळल्या.

इंग्रजीतील बालसाहित्याने त्यांना आकर्षित केले. इंग्रजीतील पारंपारिक कथांचा त्यांनी सुटसुटीत, सुबोध शैलीत अनुवाद केला.

‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’, ‘ अरेबियन नाईट्स’, ‘ देशोदेशींच्या कथा’, त्याचप्रमाणे ‘स्वप्नरेखा’भाग 1, ‘चाफ्याची फुले’, ‘पोपटदादाचे लग्न’, ‘यमाशी पैज’, ‘छोटा देवदूत’ इत्यादी त्यांची पुस्तके उल्लेखनीय आहेत.

मुलांसाठी लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांमध्ये सुमती पायगावकर यांचे स्थान आहे.

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विवेक महाराष्ट्र नायक, लेखक :वि. ग. जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सौ.पुष्पा नंदकुमार प्रभूदेसाई – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

? सौ.पुष्पा नंदकुमार प्रभूदेसाई  – अभिनंदन ?

रूग्ण सेवा प्रकल्प तर्फे आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका सौ.पुष्पा नंदकुमार प्रभू देसाई यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

हा निबंध आपल्या वाचनासाठी दोन भागात देत आहोत.

💐 ई- अभिव्यक्ती कडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.💐

संपादक मंडळ

 ई-अभिव्यक्ती मराठी.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दूर दूर …☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ दूर दूर … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

दूर दूर माळरानात

पेटत्या उन्हाच्या ज्वालेत

गर्द झाडाच्या छायेत

तन-मन करावे शांत शांत

 

हिरव्या हिरव्या डोंगरात

मधूर झरे खळाळत

एकांत क्षणी जावे

पिऊन जलास होण्या तृप्त

 

दूर दूर वेळूच्या बनात

शीळ घुमते कानात

हरवूनी वेळूच्या बेटात

नाद साठवावा अंतरंगात

 

अथांग निळ्या सागरात

लाटांच्या संथ हेलकाव्यात

व्हावे मन पीस पीस

तरंगावे खुशाल जलाशयात

 

उंच उंच किल्ल्यावर

जावे चढणी चढत

पराक्रम आठवून शिवबांचा

स्फुल्लिंग पेटावे रोमरोमात

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #123 – विजय साहित्य – साथ…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 123 – विजय साहित्य ?

☆ साथ…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

बहरली प्रीतवेल

दुःख रंगले सुखात

तुझा लागताच वारा

पडे पक्वान्न मुखात….!..१

 

बहरली प्रीतवेल

नाही ओंजळ रिकामी

तळहाती भाग्यरेषा

तुझ्या विना कुचकामी…!..२

 

अंतरीच्या अंतरात

चाले तुझी वहिवाट

काट्यातल्या गुलाबात

विश्वासाची पायवाट…..!..३

 

बहरली प्रीतवेल

तिथे फिरे तुझा हात

आठवांची मुळाक्षरे

गिरवितो अंतरात….!..४

 

ऊन पावसाळे किती

तुझ्या धामी विसावले

ऋतू जीवनाचे माझ्या

तुझ्या नामी सामावले…!..५

 

बहरली प्रीतवेल

सुखी संसाराची छाया

साथ तुझी पदोपदी

लाभे सौख्य शांती माया….!..६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वनौषधी संरक्षण…एक आव्हान आणि उपाय – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ वनौषधी संरक्षण…एक आव्हान आणि उपाय – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(ऋग्ण सेवा प्रकल्प तर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला लेख.)

एकदा वाचनात आलेली गोष्ट आठवली. एक ऋषी  आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत असताना, त्यांनी मुलांना सांगितले, आज तुम्हाला सगळ्यांना फिरायला सोडणार आहे. त्याच बरोबर एक काम पण आहे. सर्वत्र फिरत असताना, ज्या ज्या वनस्पतींचा काही उपयोग नाही, अशा घेऊन यायच्या. संध्याकाळी बऱ्याच जणांनी भारेच्या भारे आणले. एक जण मात्र संकोचून बाजूला गप्प उभा राहिला. तो मोकळ्याच हाताने परत आला. त्याच्याबद्दल, बाकीचे ” आळशीपणाचे लक्षण ” असे म्हणू लागले. ऋषींनी सर्वांना उभे केले. जो मोकळा आणि मूक उभा होता त्याला मोठे बक्षीस दिले. बाकीच्यांना आश्चर्य वाटले. गुरुजींनी सांगितले की मी तुम्हाला सांगितले होते की, ” ज्या वनस्पतींचा काही उपयोग नाही त्या घेऊन या “. पण या मुलाला बक्षीस का दिले तर त्याने ओळखले की निरुपयोगी अशी एकही वनस्पती नाही. प्रत्येकाचा काही ना काही उपयोग हा आहेच. नंतर  गुरुजींनी निरूपयोगी अशी कोणतीच वनस्‍पती नाही सगळ्या वनस्पती  या औषधी आहेत. आणि उपयुक्तही आहेत.

चरक, सुश्रुता, वाग्भट, शारंगधर चवन अशा अनेक ऋषींनी वनस्पतींच्या पंचांगांचा (मूळ, खोड, पान, फुल, फळ) अभ्यास केला. त्याला त्यांनी शास्त्राचा दर्जा दिला. आयुर्वेद. (यजुर्वेदाचा उपवेद). )आताच्या दृष्टिकोनातून या ऋषींना सुपर स्पेशालिस्ट म्हणायला हरकत नाही.

आपली भारतीय संस्कृती ही निसर्गाधिष्टीत आणि विज्ञानाधिष्ठित अशी आहे. पंच महाशक्तीना माणसांनी देवत्व दिलं. (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) आदरणीय ठरवलं. आपले सण, उत्सव व्रतवैकल्य या सर्व गोष्टी निसर्गाशी संपर्क साधणाऱ्याच आहेत. गुढीपाडव्याला गुढी बरोबर डोलणारा कडुलिंबाचा आणि आंब्याच्या पानाचा ढाळा, वटसावित्रीची वडाच्या झाडाची पूजा, हरतालिकेला वाहिली जाणारी सोळा प्रकारची पत्री, फूलं, शंकराला आवडणारा बेल, दसऱ्याच सोन, म्हणजे आपट्याची पाने आणि गव्हांकूर, यज्ञात वाहिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या समिधा , अशी कितीही उदाहरणं दिली तरी कमीच! अन्न वस्त्र , निवारा या मूलभूत गोष्टीही या वनश्री पासूनच आपल्याला मिळतात. आपल्या संस्कृतीत झाडं , वेली , फुलं देणाऱ्या वनश्री कडे निर्जीव म्हणून पाहिलं जात नाही. तर सजीव म्हणजे भावभावना असलेल्या, असं समजून त्या परिसरात जोपासल्या जायच्या. जोपासना, संगोपन , वर्धन आदरान केलं जायचं. हंगामाप्रमाणे त्या साठविल्या जायच्या. त्यावर संस्कार केले जायचे. ज्यांना आपण  देववृक्ष म्हणतो  (वड, पिंपळ, औदुंबर, पारिजात, शमी, आणि चिंच) कारण ते वृक्ष 24 तास हवेत ऑक्सिजन सोडतात. ज्यावर आपलं जीवन जगणं अवलंबून आहे. त्याच प्रमाणे ज्याला आपण ‘ पंचवट, ‘ म्हणतो, ते व , पिंपळ, औदुंबर, बेल, आणि पारिजात हे होत. त्यांचे वैशिष्ट्य असे की या वृक्षां मधून ओझोन वायू प्रक्षेपित होतो. जो वातावरणात दुर्मिळ असतो. किती महत्व आहे बरं या वृक्षांच! मोठ्या वृक्षांप्रमाणेच लहान वेली, छोटी झुडपेही तितकीच उपयुक्त व महत्त्वाची आहेत.

प्रत्येकाच्या दारात सन्मानाने डोलत राहणारी व देवाच्या नैवेद्यावर  ताठ्यात उभ्या असणाऱ्या तुळशीचे महत्त्व किती सांगावे तितके कमीच! छोटसच रोपट पण  छत्तीस रोगांवर उपचार करतं म्हणतात. आपण तर सोडाच, पण ग्रीसमधील ‘ईस्टर्न चर्च, ‘ नावाच्या संप्रदायात ही तुळशीची पूजा करतात. चरक, धनवंतरी, सुश्रुत यांनी, तिचे सौंदर्यवर्धक, त्रिदोषनाशक असं  वर्णन केले आहे. कोरफड, शतावरी, अश्वगंधा, जेष्ठमध,  गुळवेल, विजयसार, वावडिंग किती औषधी सांगायच्या! सौंदर्यासाठी, पोटासाठी, तापासाठी, अनेक आजारांवर उपाय तर आहेतच  पण आजार होऊ नयेत, प्रतिकारशक्‍ती वाढावी यासाठीही आयुर्वेदात वनौषधींची यादीच सांगितली आहे. या वनौषधींनी आपल्यावरच उपकार केले आहेत असे नाही , तर त्यावर राहणारे, जगणारे कीटक, पशुपक्षी यांनाही जीवन दिले आहे. अत्यंत सूत्रबद्ध अशी निसर्ग साखळी आहे. आपल्यावर उपकार करणाऱ्या, आपल्या जीवनाशी एक अविभाज्य अंग बनलेल्या, या वनस्पती आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशात प्रचंड प्रमाणावर होत्या. सह्याद्री, सातपुडा, हिमालयासारख्या पर्वतराजीत तर जगातील सर्वात जास्त व सर्व रोगांवर उपयुक्त अशा वनस्पतींचे भांडारच आहे म्हणा ना! पण पैशाचा लोभापायी झालेली वृक्षतोड हा फार मोठा शाप त्याला लागलेला आहे.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रतिकृती… – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ प्रतिकृती… – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)

हे वाचून जॉन ची माहिती आपल्याला कशी मिळणार? कोणाची मदत घ्यावी.? हां !या हॉस्पिटल मधल्या मॅटर्निटी  मधले सगळे रिपोर्ट्स पाहायला हवेत. सगळे रेकॉर्ड्स पाहायला हवेत. इतक्या वर्षापूर्वीची माहिती मिळणार का? बघू तरी. म्हणून म्हणून तिने आपला शोध त्या दिशेने सुरू केला. वीस वर्षापूर्वी जन्माला आलेल्या बाळांची नावे, महिन्याचे रेकॉर्ड करत करत अचूक त्या दिवसापाशी ती आली. जॉन चे ना व पाचवे होते. शिवाय त्याच्या नावापुढे चांदणीची खूण केली होती. काय बरे सुचवायचे या चांदणीतून? त्या चांदणीच्या चिन्हाचा शोध घ्यायला तिने सुरुवात केली. त्या इन्स्टिट्यूट मधली अतिशय गुप्त बातमी तिला वाचायला मिळाली. त्या चांदणीची खूण म्हणजे ते बाळ” टिश्यू कल्चर”या नवीन प्रगत पद्धतीतून जन्माला आले. आहे. विशेष म्हणजे त्या बाळाची वाढ आईच्या युटेरस मध्ये नुसती झाली आहे. पण प्रत्यक्ष त्या आईचा, तो जीव निर्माण करण्यात काहीही वाटा नव्हता. फक्त वाढ करायची, त्याचे पालन पोषण करायचे. . नॉर्मल फलन प्रक्रिया इथे घडलीच नाही. टिशू कल्चर या अत्यंत प्रगत प्रक्रियेतून या बाळाचा जन्म झालाय.

त्यावेळी डॉक्टर सु झी हॉस्पिटल मध्ये जॉईन होऊन दोनच वर्षे झाली होती. सु झी ला संशोधनात खूप इंटरेस्ट होता. रोज चे पेशंट तपासत तपासत तिचे निम्मे डोके काहीतरी वेगळे करावे याचाच विचार करत असे. अचानक तिच्या वॉर्डमध्ये एक तरुण, तरतरीत महाराष्ट्रीयन मुलगा बेशुद्ध अवस्थेत ऍडमिट झाला. पाय घसरून पडण्याचे निमित्त झा ले आणि तो बेशुद्ध झाला. तो – आपल्या डॉक्टरेटचा शोध निबंध

वाचण्यासाठी पॉंडेचरी मध्ये आला होता. अन अचानक तिथे अपघात झाला. त्याच्याबरोबर त्याची काळजी घेणारे कोणी नव्हते. डॉक्टर सु झी आणि तिच्या स्टाफ ने त्याची जबाबदारी स्वीकारली. सु झीला त्या तरुणाचा चेहरा खूप आवडला. तिने तरी लग्न न करण्याचे ठरवले होते. याचा चेहरा बघून ती इतकी भूलली की अशा चेह्ऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आपल्याला असावी म्हणून तरी लग्न करावे असे तिला वाटले. पण तेवढ्यात साठी का त्या बंधनात गुंतायचे? छे छे ! नको. सु झीचे विचार चक्र जोरात फिरायला लागले. टिशू कल्चर च्या मदतीने आपण याच्या सारखे बाळ जन्माला घातले तर? यालाही काहीच कळणार नाही आणि आपली हौस फिटेल. हा आता बेशुद्ध असताना आज आपण त्याच्या शरीरातले टिश्यू प्रिझर्व करू शकू. पुढचे काम कसे करायचे नंतर पाहू आणि खरच सुहास च्या उजव्या दंडातली 5 एमजी टिशू काढून घेऊन दोन स्टिचेस घालून टाकले.

नंतर योग्य ट्रीटमेंट मुळे सुहास लवकर बरा होऊन आपल्या घरी गेला. त्याला काही पत्ताही नव्हता की आपल्या शरीराच्या प्रयोगासाठी अशा तर्‍हेने वापर झालेला आहे.

सुझीने मात्र नंतर आपल्या डि न ना आपली कल्पना सांगितली. त्या एक्स प्लांटचे इन प्लांटेशन स्वतःचा युटरस मध्ये करू घेऊन आपणच त्याला वाढवणार असल्याचे सांगितले.  

सुरुवातीला डिनअशा प्रकारच्या प्रयोगांना परवानगी द्यायला तयार नव्हते. अखेर खूप विचारांती आणि खूप गुप्तता पाळून डॉक्टर सु झिला परवानगी देण्यात आली. सु झी मोठ्या उत्साहाने कामाला लागली. तो टिश्यू तिने कल्चर मेडियम मध्ये त्याचे वाढ केली. पुढच्या योग्य त्या स्टेप्स वापरून छोटीशी सर्जरी करून सु झी च्या युटेरस मध्ये ते इम्प्लांट केले.

पूर्ण नऊ महिने सूझी डॉक्टरांच्या देखरेखी खालीच होती. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी डीन पासून नर्सेस पर्यंत सगळे जातीने लक्ष देत होते आणि अखेर दौंड मुलाच्या जन्मानंतर प्रयोगाची यशस्वी सांगता झाली. सुझीला अगदी हवा तसाच मुलगा झाला. हुबेहूब तिचा तो पेशंट !त्या बाळाचे रीत सर पालकत्व तिने मिळवले. आणि त्याला जीव लावून वाढवले.

मात्र म्हणतात ना, “रक्तातले अनुवंशिक गुण मुलात उतरतात”. इथेही तसेच झाले. हा मुलगा जरी  सुझी जवळ पांडेचरीत वाढत होता तरीआवड-निवड सगळी टिपिकल महाराष्ट्रीयन मुलाची होती. त्यात तसूभरही बदल नव्हता. सुझी ने ही त्याच्या आवडीप्रमाणे त्याला वाढवले.

तोच जॉन पॉंडेचरी हून महाराष्ट्रात इंटरव्यू साठी आला होता.

ही सगळी माहिती गोळा करता करता सुखदा चा मेंदू अगदी पुरता शीण होऊन गेला. पण सुहासला ही माहित नसलेले गुपित तिला समजले होते. हा जॉन म्हणजे सुहास चा मुलगा !. म्हणजे तिचाच. पण छे ! याला मुलगा कसा म्हणता येईल? प्रतिकृती !

आपण आरशात कसे आपले प्रतिबिंब पाहतो, कशी हा सुहास ची प्रतिकृती!

सुखदाने घड्याळात पाहिले. बापरे !रात्रीचे नऊ वाजून गेले होते. सगळा दिवस तिचा या संशोधनात गेला. एका नवीन संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वीच दुसरेच संशोधन नकळत तिच्याकडून झाले होते.

आता हे सगळे सुहासला कसे सांगायचे आणि कसे पटवून द्यायचे याचाच विचार करून ती परत आपल्या केबिन मधून गाडी कडे चालली.

ज्या उत्साहात ती सकाळी आली होती, त्याच उत्साहात पण मोठे गुपित शोधून ती घरी चालली होती. सुहास ला त्याच्या प्रतिकृती ची खबर सांगायला.

समाप्त

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भलत्याच निघाल्या आजीबाई… ☆ संग्रहिका – सौ.स्वाती घैसास ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ भलत्याच निघाल्या आजीबाई… ☆ संग्रहिका – सौ.स्वाती घैसास ☆

बऱ्याच वर्षांपासून बागेत एक आजी भेटतात. प्रत्येक वेळी माझा व्यवसाय बदलत राहतात. कधी मला विचारतात, ‘ काय गं कसा चालू आहे तुझा नकली दागिन्यांचा व्यवसाय?’

कधी विचारतात- आमच्या शेजारचा यश तुझ्याच पाळणाघरात येतो का गं?

त्यांच्या चौकशीनुसार मी आतापर्यंत भाजी, पनीर, कपडे असं बरंच काही विकलेलं आहे.

शिवाय सरकारी नोकरी, बँकेत नोकरी, प्रायव्हेट नोकरी अशा नोकऱ्यादेखील केलेल्या आहेत.

हे आणि असं बरंच काही.

पहिले एक दोन वेळा मी त्यांचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी वेगळं काम मला दिलेलं बघून मनात म्हटलं, कदाचित आजींना स्मृतिभ्रंश वगैरे असेल, आपण कशाला उगीच नकारघंटा लावून त्यांना त्रास द्यायचा.

काही महिन्यांपूर्वी भेटल्या तर मला म्हणाल्या, ‘ बरी आहे का गं तुझी तब्येत?’

मी काय म्हणणार, बरी आहे म्हटलं.

आज पुन्हा खाली भेटल्या.

बाकावर मैत्रिणीबरोबर बसलेल्या होत्या. मला म्हणाल्या, ‘ शाळेला सुट्टी लागली का गं तुझ्या?’

मी म्हटलं, ‘ हो लागली.’

माझ्याबरोबर पण माझी मैत्रीण होती, तिने पुढे गेल्यावर विचारलं, ‘ काय गं, कसली शाळा?’

मी- अगं आजी काहीही विचारतात. बहुतेक स्मृतिभ्रंश आहे त्यांना, म्हणून मी पण हो ला हो करते.

तितक्यात मागून आजींचा त्यांच्या मैत्रिणीला बोलताना आवाज आला, ‘ बघ, मी तुला म्हटलं होतं ना, ती थोडी वेडी आहे अगं. प्रत्येकवेळी मी तिला वेगळंच काहीतरी विचारते आणि तीदेखील सगळ्याला हो म्हणते. थोडा परिणामच झालेला आहे तिच्या डोक्यावर. आजपण बघ कशी शाळेला सुट्टी लागली का विचारलं तर हो म्हणाली’

भलत्याच निघाल्या आजीबाई

🤭😂😝

संग्रहिका – सौ. स्वाती घैसास

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares