ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
माधव मनोहर वैद्य
समीक्षेतील फौजदार असा ज्यांचा दबदबा होता त्या माधव मनोहर यांनी कथा, कादंबरी, नाट्य अशा अन्य साहित्य प्रकारातही लेखन केले होते. इंग्रजी साहित्याचे वाचन केल्यावर त्या साहित्याने ते प्रभावित झाले व मराठी साहित्याची समीक्षा करावी असे वाटल्यामुळे ते समीक्षेकडे वळले. केसरी, सोबत, नवशक्ती, रत्नाकर, रसरंग अशा विविध दैनिके व नियतकालिकांमधून त्यांनी ललित व समीक्षात्मक लेखन केले. कोणत्याही लेखकाच्या साहित्यातील गुणदोषांकडे ते समान वृत्तीने पहात असत. त्यामुळे त्यांच्या समीक्षेला महत्व प्राप्त झाले होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या साहित्याची समीक्षा करावी असे साहित्यिकांना वाटत असे.
त्यांची काही भाषांतरीत व रूपांतरीत नाटके :
आई,आजोबांच्या मुली,आपण सा-या दुर्गाबाई,चेटूक,प्रकाश देणारी माणसं,रामराज्य इ.
अन्य साहित्य :
कथा व कादंबरी: आशा,मुलांची शाळा,अन्नदाता,एक आणि दोन,किल्ली इ.
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे जन्मलेले काटकर यांनी बी.ए.बी.टी.शिक्षण पूर्ण केले व शिक्षकी पेशा स्विकारला.त्यांनी कथा,कविता,बालसाहित्य विपुल प्रमाणात लिहीले आहे.
(बाणाक्षरी मध्ये एक विषय घेऊन प्रथम एका शब्दाने सुरूवात करून क्रमाक्रमाने शब्द वाढवत तो विषय बाणाप्रमाणे सरळ रेषेत लिहित जाणे. व शेवट करताना पुन्हा शब्द संख्या वाढवणे. यामुळे कवितेला बाणाप्रमाणे आकार मिळतो..)
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
नरेंद्र आणि श्री रामकृष्ण यांची पहिली भेट १८८१ च्या डिसेंबरमध्ये दक्षिणेश्वरला झाली. ‘मन चलो निज निकेतने’, म्हणजे, ‘हे माझ्या मना आपल्या घरी परत चल’,आणि ‘जाबे की दिन अमार विफले चलीये’, म्हणजे, ‘माझे सारे दिवस असे व्यर्थच जाणार काय? अशी दोन बंगाली गीतं नरेन्द्रने मोठ्या आर्ततेने म्हटली आणि नरेंद्रचे व्यक्तिमत्व वेगळेच होते, कलकत्त्याच्या भौतिक शहरातून आलेला असूनही आध्यात्मिक धारणा असलेला नरेंद्र बरोबरच्या मित्रांमध्ये वेगळा उठून दिसत होता. जे रामकृष्णांना अत्यंत भावले होते. नरेंद्रचे भजन म्हणणे इतरांहून निराळे होते. त्या आर्त स्वरांनी श्री रामकृष्णांच्या अंत:करणाची तार छेडली गेली होती. “पहा पहा साक्षात सरस्वती त्याच्या उज्ज्वल दर्शनात प्रकट होत आहे”. असे उद्गार त्यांनी यावेळी भक्तांसमोर काढले होते.
नरेंद्रचे सुप्त आध्यात्मिक गुण रामकृष्णांनी ओळखले होते. त्यांनी नरेंद्रला विचारले, “रात्री झोपी जाताना डोळ्यासमोर प्रकाश दिसतो का?” नरेंद्र म्हणाला, “हो दिसतो”. त्यावरून रामकृष्णांनी ओळखले की हा जन्मत:च ध्यानसिद्ध आहे. पहिल्या भेटीतच रामकृष्ण नरेंद्रला म्हणाले होते, “किती उशीर केलास? प्रपंचात बुडालेल्या या सार्या लोकांच्या कथा ऐकून माझे कान किटून गेले आहेत. माझ्या खोल मनातील अनुभव ऐकून समजून घेणार्याची मी कधीची वाट पाहतोय. हे प्रभो मी जाणून आहे, की नारायणाचा अवतार असा जो प्राचीन नर ऋषि तो तू आहेस आणि मानव जातीच दु:ख हरण करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेऊन आला आहेस”. आपलं असं कौतुक ऐकून नरेंद्र गोंधळून गेला होता.
पुढे अजून भेटी झाल्या. रामकृष्णांना नरेंद्रची भेट रोज व्हावी असे वाटू लागले. श्रीरामकृष्णांच्या रूपाने देव पाहिलेली व्यक्ती आपल्याला अखेर भेटली याचा आनंद नरेंद्रला झाला होता. वेगवेगळे अनुभव येत होते. नरेंद्र ब्राम्ह समाजात जात होताच. मूर्तिपूजा निषेध हा तिथल्या सिद्धांतापैकी एक सिद्धांत होता. इकडे श्री रामकृष्ण तर, कालिमाता मानणारे, तिन्ही त्रिकाल पूजाअर्चा करणारे मूर्तिपूजक होते. मनात द्वंद्व चालू होतच. या सगळ्याचा मेळ लावायचा नरेंन्द्र प्रयत्न करत होता. काहीतरी सखोल अनुभूति त्यांच्यात आहे हे जाणवत होते. पवित्र अंत:करणाचा, सर्व मानवजातीने आदर करावा अशा योग्यतेचे ते आहेत असे मनाला पटले आणि नरेन्द्रने त्यांना मनोमन नमस्कार केला. जवळ जवळ चार वर्षे नरेंद्रला श्रीरामकृष्णांच्या सहवासात येऊन झाली होती.
श्रीरामकृष्ण यांच्याकडे रोज भक्तगण येत असत. त्यांच्याशी ते संवाद साधत असत, एखादा अवघड सिद्धांत स्पष्ट करताना ते छोट्या छोट्या कथांचा वापर करत आणि समजावून सांगत असत. त्यांचे बोलणे हे नुसत्या ग्रंथांतील सिद्धांताच्या आधारवर नसे तर ते स्वत:च्या अनुभवावर आधारित असायचे. एकदा असेच भक्तांशी संवाद चालू असताना श्रीरामकृष्ण सांगत होते, “लोक आपल्यावर टीका करतील, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करावे. आणि आपला मार्ग सोडू नये. कुत्री भुंकत असतात पण हत्ती आपल्या मार्गाने जात राहतो तशी आपली वृत्ती असावी”. असे विवेचन चालू असताना त्यांनी नरेंद्रला विचारले, काय नरेन तुला काय वाटतं ?ईश्वराची भक्ती करणार्यांची संसारी लोक त्यांच्या मागे निंदा नालस्ती करतात. तुझ्या माघारी लोक तुझ्याबद्दल वाईट बोलू लागले तर, तू काय करशील”? नरेन्द्रने उत्तर दिले, “ ती माणसं म्हणजे,उगाच भुंकणारी कुत्री आहेत. असं म्हणून मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीन”. यावर श्री रामकृष्ण म्हणतात, “नाही नरेन एव्हढी कठोर प्रतिक्रिया होता कामा नये. अचेतन सचेतन अशा सार्या चराचरात तो ईश्वर भरून राहिलेला आहे. तेंव्हा कोणी कसाही वागो, त्याच्याबद्दल योग्य तो आदर आपण ठेवला पाहिजे”.लोकांच्या टीकेकडे आपण दुर्लक्ष करावे. खरे पण त्या टीका करणार्यांबद्दल ही आपण आपल्या मनात दुजाभाव धरू नये. जो वाईट वागतो, त्याचेही आपण हिताच चिंतावे. असा उपदेश यातून दिसतो.
रावसाहेब निवृत्त होऊन फंड-ग्रॅज्युईटीची रक्कम मिळून, निवृत्तिवेतन सुरू होईपर्यंत वर्ष कसे सरले हे समजलेच नाही. निवृत्तीनंतरही सारी कामे सुरळीत पार पडली तसे रावसाहेब, राधाबाई निवांत झाले. त्यांनी मुलाशी चर्चा करून एका चांगल्या यात्राकंपपनीची एक महिन्यानंतर निघणारी उत्तर भारताची सहल निवडली. त्याचे पैसे भरले. दोघेही रोज निवांत वेळी सहलीचीच चर्चा करू लागले. राधाबाईंनी तर सहलीची तयारीही सुरू करायला घेतली तसे रावसाहेब हसले.
” अगं, अजून जवळजवळ महिना आहे. आत्तापासून काय तयारी करतेस? आदल्यादिवशी बॅग भरायची आणि निघायचे. . “
” तुम्ही बॅग भरणार, ? उजेड. . अहो, एकदोन दिवसासाठी तुम्ही कुठं जाणार असला तरी अजूनही मला बॅग भरून हातात द्यावी लागते. . “
राधाबाई हसत म्हणाल्या,
” तू कधी काही करू दिलंयस का मला. . ? तू आल्यापासून सवयच नाही राहिलेली काही काम करायची…नुसता लाडाऊन ठेवले आहेस मला?”
” कशाला काय करू द्यायचे तुम्हांला? एक काम धड कराल तर शप्पथ ! तेच काम मला दुसऱ्यांदा करावे लागणार असेल तर मग तुम्हांला करायला सांगूनही काय फायदा. . त्यापेक्षा आधीच मी केलेलं बरे नाही का? “
खाली मान घालून काम करत करता राधाबाई म्हणाल्या आणि त्यांनी रावसाहेबांकडे पाहिले. . ते काहीसे गंभीर झाल्यासारखे दिसले तसे त्या हसत हसत म्हणाल्या, उगा माझ्या लाडोबाला कशाला त्रास? “
आणि रावसाहेबांकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाल्या,
” हो की नाही रे लाडोबा. . ?”
रावसाहेबांच्या चेहऱ्यावर हसू तरळले. आपण बोलता बोलता नवऱ्याला एकेरी बोललो हे जाणवताच राधाबाईंनी जीभ चावली.
” हळूच. . नाहीतर मला आळणी खावे लागेल? “
” म्हणजे? “
मध्येच आळणी खाण्याचा विषय रावसाहेबांनी कुठून काढला? हे न समजून राधाबाईंनी विचारले.
” अगं, जीभ जोरात चावलीस तर तुझ्या तोंडाला तिखट लागू देणार नाही पण त्याची शिक्षा बिचाऱ्या माझ्या जिभेला नाही का मिळणार? “
आपण नकळत एकेरी बोलून गेलो ते रावसाहेबांच्याही लक्षात आलंय हे पाहून राधाबाईनी लाजून खाली मान घातली. त्यांचे लाजणे पाहून रावसाहेब सुखावले. . क्षणभर त्यांच्याकडे पहातच राहिले. . रावसाहेब गप्प झाल्याचे पाहून राधाबाईंनी चमकून वर पाहिले तर रावसाहेबांच्या डोळ्यांत मिश्किलता तरळत होती. . राधाबाई पाहतायत हे पाहून हसत हसत रावसाहेब म्हणाले,
” तशीही तुझी चव जिभेला आवडतेच माझ्या. . आता इतकी वर्षे झाली पण आवड काही कमी झालेली नाही. . . . “
” अगं, चावटपणा काय केला मी. . . तुझ्या हातच्या जेवणाबद्दल म्हणतोय. “
” कळलं हं कळलं. . कहीपे निगाहे. . आणि तुम्हांला मी काही आज ओळखत नाही म्हणलं. बस झाल्या गप्पा. आता जावा बघू आत. काल वाचनालयातून आणलेलं पुस्तक तुमची वाट बघत असेल. मला माझी कामे करू देत जरा. . ”
रावसाहेब हसत हसत बाहेरच्या खोलीत गेले. पाठमोऱ्या रावसाहेबांकडे पाहत राधाबाईंच्या मनात आले. . ‘ अजूनही यांच्यात खोडकर, खेळकर बालक लपलेला आहे… असा नवरा मला मिळालाय ते माझे भाग्यच…’
सहलीला जायचा दिवस जवळ जवळ येऊ लागला तसे राधाबाईंच्या मनातील अवस्थता वाढत चालली होती. कधी अशा दूरच्या आणि इतक्या दिवसांच्या सहलीला त्या गेल्याच नव्हत्या. ‘सहल नीट पार पडेल ना?’ त्यांना उगाचच धाकधूक लागून राहिली होती. रावसाहेबांना ते जाणवले तसे ते म्हणाले,
” अगं, तुझी खूप इच्छा होती ना सहलीला जायची. आजवर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जायला कधी जमलंच नाही. आता जमतंय, निघालोय तर त्याचा आनंद होण्याऐवजी तू तर काळजीच करत बसलीयस. . “
” तसे नव्हे हो. . “
” अगं, आपण दोघेच का निघालोय काळजी वाटायला. यात्रा कंपनीतून जातोय, खूप लोक असतात. . अगदी ऐंशीच्या घरातलेही असतात… उगा नको काही विचार करुस.. तिथे यात्रेकरूंची काळजी घेणारे कंपनीचे लोकही असतात. . काळजी सोड आणि आपल्याला जायला मिळतंय, आपण जातोय याचा आनंद घे. “
” तरी पण…”
” राधे, आता हे काय वय आहे का गं ‘पण’ लावायचं? जेव्हा ‘पण’ लावायचा तेंव्हा बिनबोभाट प्रेमाने माळ घातलीस. . . . हां पण तेव्हा तुझा कोणताही ‘पण ‘ असता तर मी जिंकलोच असतो बरं का?. . “
रावसाहेब हसत म्हणाले तसे राधाबाई काहीशा खुलल्या आणि निर्धास्त झाल्या. किती दिवसांनी त्यांनी ‘ राधे ‘ म्हणून संबोधले होते. त्यांचे ते’राधे’ ऐकून त्यांना पूर्वीचे दिवस आठवले आणि त्यांच्या चेहऱ्यावर मंदसे स्मित झळकले. राधाबाई खुललेल्या पाहून रावसाहेबांना बरे वाटले.
सहलीची सारी तयारी झाली होती. . चारपाच दिवसांनी पुण्याला जायचे आणि तिथून यात्राकंपनीसोबत उत्तर भारताची यात्रा. मन प्रसन्न झाले होते. कितीक दिवसांचे स्वप्न पूर्ण होणार होते. तशा काही दिवसांपासून कोरोनाच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती पण भारतातील जनजीवन सुरळीत होते. शेजारचा बंडू दहावीच्या परीक्षेला बसला होता. रोज पेपरला जाण्याआधी तो नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला यायचा. राधाबाई जाताना त्याच्या हातावर दहीसाखर ठेऊन आशीर्वाद द्यायच्या. त्याचा शेवटचा भूगोलाचा पेपर. राधाबाईंनी वाटीत दहीसाखर तयारच ठेवले होते. रावसाहेब त्याची हॉल मध्ये वाटच पाहत होते. बंडूची येण्याची रोजची वेळ टळून गेली तसे दोघेही अस्वस्थ झाले. ‘ का आला नाही बंडू अजून? ‘ दोघांच्याही मनाला काळजी पोखरू लागली.
” अहो, बंडू का आला नाही अजून? त्याचा आज शेवटचा पेपर आहे. जरा हाक मारून बघता का? “
रावसाहेबांनी बंडूला हाक मारली तसे त्याचे बाबाच बाहेर आले. रावसाहेबांनी बंडू न आल्याबद्दल विचारताच ते म्हणाले,
” अहो काका, त्याचा पेपर रद्द झालाय. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झालंय. बातम्या ऐकल्या नाहीत वाटते तुम्ही? अहो सगळेच बंद. बाहेर पडायचेच नाही घरातून. कोरोनाचे पेशंट वाढायला लागलेत. “
बराच वेळ बंडूचे बाबा माहिती सांगत होते. रावसाहेब, राधाबाई अस्वस्थ होऊन सारे ऐकत होते.
नेमकं काय झालंय? नेमकं काय घडतंय? काहीच समजत नव्हते. एक प्रकारची अस्थिरता, स्तब्धता, अनिश्चितता आणि अनामिक भय जगण्याला ग्रासून गेले होते. संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागू झाले. सारेच व्यवहार, व्यापार बंद होते. अत्यावश्यक कारण वगळता घरातून बाहेर पडायला बंदी होती. सारे जनजीवनच ठप्प झाले होते.
प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते.
ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे….. आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो? तो फक्त असतो. त्याच्या असण्यानंच खूप काही होतं, तशीच ही ऊर्जा केवळ “असण्याची ऊर्जा” आहे.
ही एनर्जी घरात असल्यानं घरात स्नेह,ओलावा,चैतन्य आहे,घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. तिनं काही करणं हे अतिशय सुंदर एक्स्ट्रा काम आहे, एनर्जीचा उपयोग करुन ती स्वयंपाक करते , घर सजवते. पण कधी तिनं ही एनर्जी वापरुन काही केलं नाही तरी तिची किंमत कमी होत नाही, ती एनर्जी घरात आहे आणि ते असणंच एक समाज- देणं आहे. घरासाठी तर वरदान आहे
याचा अनुभव प्रत्येकाला आहे ,एखाद्या एकट्या रहाणा️ऱ्या पुरुषाचं घर, बॅचलरच्या रुमचं उदाहरण घेऊ,
तिथे गेल्यावर कसं वाटतं , ते अनुभवा. तिथे काहीतरी उणिव वाटते ती कसली?
तर फेमिनाईन एनर्जीच तिथं नाही….किंवा घरातली आई/ पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर घरात कसं वाटतं ते पण तपासा.
दोन दिवस कदाचित बदल चांगला वाटेल, पण नंतर मात्र सगळी कामं करणारे, सेवा देणारे असूनही काहीतरी रिकामं वाटेल, रुक्ष वाटेल…. ती उणिव आहे केवळ स्त्री एनर्जीची.
लग्न झाल्यावर लेक घर सोडून जाते तेव्हा घर रितं रिकामं होतं—ही ऊर्जा जाते, फक्त घरातली मुलगी नाही, ही ऊर्जा पण तिच्यासोबत जाते…
अगदी घरातलं लहान बाळ एखादी मुलगी असेल तर घरातलं वातावरण पहा आणि तिचं असणं म्हणजे काय ते पण फील करा. ती एनर्जी त्या नवजात मुलीतही आहे…ही एनर्जी निसर्गाची निर्मितीची- क्रिएशनची ऊर्जा आहे,
घरातली सगळी प्रगती, सगळयांचा विकास, सगळयांचं खूप पुढे जाणं, यश प्राप्ती होणं , यासाठी तीच एनर्जी वापरली जाते….
मुलांच्या अभ्यासातल्या यशासाठी हीच घराघरातली सरस्वती आहे—
नव-याच्या आर्थिक यशाचं कारण हीच लक्ष्मी आहे…
घरातली प्रत्येक स्त्री काय देते? काय करते?
तर ती असते ! तिचं असणंच देणं आहे, तिनं आणखी काही करायची गरजच नाही, (तरी ती इतकं करते.)
तिच्या असण्याचीच किंमत खूप आहे जी पैशात मोजता येत नाही
जिथं अनादर आणि अपमान होतो, तिच्या एनर्जीचं शोषण होतं ,तिथं ती नकारात्मक होते, आणि
सगळया घराला त्याचे परिणाम भोगावे लागतात,
म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी म्हणून पूजा करायला सांगितलंय.
पूजा प्रतिकात्मक आहे – पूजा म्हणजे आदर आणि कदर करणे…
आपल्या यशात आपल्या सुखात तिचा न दिसणारा वाटा मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे…!
मला वाटतं प्रत्येक स्त्रीला आपल्यातल्या या एनर्जीची खात्री पटली तर तिच्या मनातला अपराधीभाव आणि न्यूनगंड लगेचच जाईल.
वीजेसारखी ही ऊर्जा दिसत नाही, पण असते. एवढंच काय तर, स्त्रीच्या ऊर्जेवर घराचं घरपण टिकून असतं.
तिच्या कामांमधून ऊर्जा अभिव्यक्त होते , आणि त्यामुळे इतरांना पुढे जाता येतं…कोणत्याही स्त्रीनं स्वतःची किंमत आपण नोकरी करतो की नाही, पैसा कमवतो की नाही, या निकषावर करायची गरज नाही.
अनुकूल परिस्थिती नसेल आणि स्त्रीआयुष्यातल्या ऋतुप्रमाणे कधी थांबावं लागलं तरी स्वतःला आळशी, निरुपयोगी समजू नका, कारण निसर्गाची प्रचंड ऊर्जा पेलून ती इतरांना सहज देत तुम्ही स्थिर उभ्या आहात ज्यासाठी तुम्ही ताकत लावलेली आहे…
हे घरात नुसतं बसणं नाही, हे घरात ‘असणं’ आहे, जे अमूल्य आहे.
सर्व स्त्री वर्गाला मनापासून धन्यवाद आणि खूप खूप सदिच्छा
संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर विचारणीय व्यंग्य ‘मर्ज़ लाइलाज’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 140 ☆
☆ व्यंग्य – मर्ज़ लाइलाज ☆
नगर के स्वघोषित महाकवि अच्छेलाल ‘वीरान’ की हालत निरंतर चिंताजनक हो रही है। पहले वे रोज़ शाम को छड़ी फटकारते पास के पार्क तक घूमने निकल जाते थे। वहाँ तीन-चार साहित्यकार मित्र मिल जाते थे। उनके साथ घंटों गोष्ठी जमी रहती थी।
अब यह सिलसिला बन्द है। घर में ही पलंग पर लेटे सीलिंग की तरफ टुकुर-टुकुर निहारते रहते हैं। कभी धीरे-धीरे गेट पर आकर खड़े होते हैं, लेकिन किसी परिचित को देखते ही जल्दी से घर में बन्द हो जाते हैं। घर में कोई तबियत का हाल-चाल पूछे तो ‘हूँ’ ‘हाँ’ में टरका देते हैं। कोई ज़्यादा पूछे तो उसे खाने को दौड़ते हैं। लेटे लेटे कुछ बुदबुदाते रहते हैं। घरवालों ने कान देकर सुना तो पता चला ग़ालिब का शेर बोलते हैं— ‘कोई चारासाज़ होता, कोई ग़मगुसार होता।’ भोजन में रुचि निरंतर कम होती जा रही है। भोजन देखकर मुँह फेर लेते हैं। घर वाले परेशान हैं।
महाकवि की चेला-मंडली विशाल है, लेकिन अभी उनकी हिम्मत गुरूजी का सामना करने की नहीं होती। शिष्यों के सामने आते ही महाकवि के मुख से ‘नाकिस,नाकारा, नालायक’ जैसे सुभाषित फूटते हैं। इसीलिए चेले गुरू जी के गेट पर तो मंडराते रहते हैं, लेकिन भीतर घुसने से कतराते हैं।
फ़ेमिली डॉक्टर को बुला कर महाकवि की जाँच पड़ताल करायी गयी है। डॉक्टर के पल्ले कुछ नहीं पड़ा। कह गये, ‘शारीरिक रोग तो कोई समझ में नहीं आता। किसी दिमाग के डॉक्टर को दिखा लो।’
चेलों को गुरूजी का रोग पता है। मर्ज़ की जड़ यह है कि एक साल से महाकवि का कहीं सम्मान नहीं हुआ। नगर के दूसरे कवियों के कई सम्मान-अभिनंदन हो गये, लेकिन महाकवि साल भर से सूखे हैं। न गले में माला पड़ी, न कंधे पर दुशाला। इसके पहले कोई साल सम्मान-विहीन नहीं गुज़रा। किसी चेले के सामने आते ही महाकवि किसी सुखद समाचार की उम्मीद में उसके चेहरे की तरफ देखते हैं, लेकिन वहाँ बैठी मायूसी पढ़ कर बुदबुदाते हैं— ‘डूब मरो चुल्लू भर पानी में।’
अंततः गुरुपत्नी ने चेलों को अल्टीमेटम दे दिया कि अगर महाकवि को कुछ हो गया तो उन्हें गुरुहत्या का पाप लगेगा और उन्हें नरक में भी जगह नहीं मिलेगी।
घबराकर चेलों ने जुगाड़ जमाया। एक शाम गुरूजी को सूचित किया कि अगले सवेरे घर पर ही नगर की जानी-मानी संस्था ‘साहित्य संहार’ द्वारा उन्हें सम्मानित किया जाएगा। सुनकर महाकवि के चेहरे पर रक्त लौटा। चेलों को भरे गले से आशीर्वाद दिया। चेलों ने चन्दा करके सम्मान का खर्चा संस्था को सौंप दिया।
दूसरे सवेरे महाकवि जल्दी उठकर, कपड़े बदल कर, पलंग पर अधलेटे हो सम्मान टीम का इंतज़ार करने लगे। थोड़ी देर में संस्था के अध्यक्ष और सचिव और चेलों का हुजूम आ गया। महाकवि के कंठ में माला, हाथ में श्रीफल और कंधों पर शॉल अर्पित की गयी। फिर सम्मान-पत्र पढ़ा गया। संस्था के अध्यक्ष हँस कर बोले, ‘आपके सम्मान-पत्र के लिए हमारे सचिव ने तीन दिन तक शब्दकोश छान कर आला दर्जे के विशेषण निकाले।’ महाकवि ने सचिव को धन्यवाद दिया।
आज बहुत दिनों के बाद सम्मान- दल के साथ महाकवि ने ठीक से जलपान किया। परिवार ने राहत की साँस ली।
महाकवि ने शरीर में नये बल के संचार का अनुभव किया। सम्मान-टीम विदा होने लगी तो उठकर गेट तक उन्हें छोड़ने आये। फिर लौटकर पत्नी से बोले, ‘बहुत दिनों से टहलने नहीं गया। मित्रों से भी नहीं मिला। आज शाम को जाऊँगा। अब तबियत बिलकुल ठीक लग रही है।’
शिष्य-मंडली भी एक साल की मोहलत पाकर खुशी खुशी विदा हुई।
(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।)
आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – प्रार्थना।)
☆ लघुकथा – प्रार्थना ☆ श्री हरभगवान चावला ☆
“तुम रोज़ सुबह क्या प्रार्थनाएँ बुदबुदाती हो।”
“मैं अपने देवताओं से प्रार्थना करती हूँ।”
“क्या माँगती हो इनसे?”
“कुछ नहीं।”
“ऐसा कैसे हो सकता है? कुछ न कुछ तो माँगती ही होगी। मुझे लगता है अपने और अपने देश के लिए बेहतर भविष्य माँगती हो।”
“भविष्य तो वे लोग तय करते हैं जिनके हाथ में वर्तमान का नियंत्रण होता है। उन्हीं के आज के कार्यकलाप में भविष्य देखा जा सकता है।”
“तो फिर भविष्य में क्या देख रही हो तुम?”
“गुंडों की दनदनाती टोलियाँ! सब के एक जैसे कपड़े, एक जैसे नारे, एक जैसी गालियाँ। सबके हाथ में चाक़ू, तलवार, फरसे, पिस्टल। सबके चेहरों पर नृशंसता… सब तरफ़नफ़रत की आग जिसमें प्यार लकड़ी की तरह जल रहा है… सब तरफ़ धर्म का शोर है पर धर्म कहीं नहीं… मौत का जश्न मनाते वीभत्स चेहरे… और… और…”
“इतना भयानक भविष्य अगर तुम देख रही हो तो फिर यह प्रार्थना किसके लिए?”
“इस नृशंसता के बावजूद मुझे यक़ीन है कि कुछ लोग इन्सानियत को बचाने में जुटे रहेंगे। मैं चाहती हूँ कि सूर्य, पृथ्वी, जल और वायु देवता कभी कुपित न हों। ये हमेशा ऐसेलोगों के साथ बने रहें। बस यही प्रार्थना मैं रोज़ इन देवताओं से करती हूं।”
“मैं तुम्हारी प्रार्थनाओं में इन देवताओं की सलामती की दुआ शामिल करता हूँ। वर्तमान जिनके नियंत्रण में है, वे इन्सान और इन्सानियत के ही नहीं, देवताओं के भी शत्रु हैं।”
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 138 ☆ स्थितप्रज्ञ ☆
एक ऑटो रिक्शा ड्राइवर हमारी सोसायटी के पास ही रहा करते थे। सज्जन व्यक्ति थे।अकस्मात मृत्यु हो गई। एक दिन लगभग उसी जगह एक रिक्शा खड़ा देखा तो वे सज्जन याद आए। विचार उठा कि आदमी के जाने के बाद कोई उसे कितने दिन याद रखता है? चिता को अग्नि देने के बाद परिजनों के पास थोड़ी देर रुकने का समय भी नहीं होता।
एक घटना स्मरण हो आई। एक करीबी परिचित परिवार में शोक प्रसंग था। अंतिम संस्कार के समय, मैं श्मशान में उपस्थित था। सारी प्रक्रिया चल रही थी। लकड़ियाँ लगाई जा रही थीं। साथ के दाहकुंड में कुछ युवा एक अधेड़ की देह लेकर आए थे। उन्होंने नाममात्र लकड़ियाँ लेकर अधिकांश उपलों का उपयोग किया। श्मशान का कर्मचारी समझाता रह गया, पर केवल उपलों के उपयोग से से देह के शीघ्र फुँक जाने का गणित समझा कर अग्नि देने के तुरंत बाद वे सब चलते बने।
हमें सारी तैयारी में समय लगा। दाह दिया गया। तभी साथ वाले कुंड पर दृष्टि गई तो जो दृश्य दिखा, उससे भीतर तक मन हिल गया। मानो वीभत्स और विदारक एक साथ सामने हों। उस देह का एक पाँव अधजली अवस्था में लगभग पचास अंश में ऊपर की ओर उठ गया था। अधिकांश उपलों के जल जाने के कारण देह के कुछ अन्य भाग भी दिखाई दे रहे थे।
श्मशान के कर्मचारी से सम्पर्क करने पर उसने बताया कि हर दिन ऐसे एक-दो मामले तो होते ही हैं, जिनमें परिजन तुरंत चले जाते हैं। बाद में फोन करने पर भी नहीं आते। अंतत: मृत देह का समुचित संस्कार श्मशान के कर्मचारी ही करते हैं।
लोकमान्यता है कि जिसका कोई नहीं होता, उसका भी कोई न कोई होता है। अपनी कविता ‘स्थितप्रज्ञ’ याद हो आई-
शव को / जलाते हैं / दफनाते हैं,
शोक, विलाप / रुदन, प्रलाप,
अस्थियाँ, माँस, / लकड़ियाँ, बाँस,
बंद मुट्ठी लिए / आदमी का आना,
मुट्ठी भर होकर / आदमी का जाना,
सब देखते हैं /सब समझते हैं,
निष्ठा से / अपना काम करते हैं,
श्मशान के ये कर्मचारी
परायों की भीड़ में /अपनों से लगते हैं,
घर लौटकर /रोज़ाना की सारी भूमिकाएँ
आनंद से निभाते हैं / विवाह, उत्सव
पर्व, त्यौहार /सभी मनाते हैं
खाते हैं, पीते हैं / नाचते हैं, गाते हैं,
स्थितप्रज्ञता को भगवान,
मोक्षद्वार घोषित करते हैं,
संभवत: / ऐसे ही लोगों को,
स्थितप्रज्ञ कहते हैं..!
विश्वास हो गया कि जिसका कोई नहीं होता, उसका भी कोई न कोई होता है। इस स्थितप्रज्ञता को प्रणाम !
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆