(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जीका हिन्दी बाल -साहित्य एवं हिन्दी साहित्य की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य” के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा “भ्रष्टाचार पर विजय”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 96 ☆
☆ लघुकथा — भ्रष्टाचार पर विजय ☆
मोहन ने कहा,” अपना ठेकेदारी का व्यवसाय है। इसमें दलाली, कमीशन, रिश्वत खोरी के बिना काम नहीं चल सकता है।”
रमन कब पीछे रहने वाला था,” भाई! मुझे आरटीओ के यहां से लाइसेंस बनवाने का काम करवाना पड़ता है। लोग बिना ट्रायल के लाइसेंस बनवाते हैं। यदि पैसा ना दूं तो काम नहीं चल सकता है।”
” वह तो ठीक है,” कमल बोला,” व्यापार अपनी जगह है पर रिश्वतखोरी हो तो बुरी है ना। नेता लोग करोड़ों डकार जाते हैं। बिना रिश्वत के रेल का बर्थ रिजर्व नहीं होता है। डॉक्टर बनने के लिए लाखों करोड़ों की रिश्वत देना पड़ती है। तब बच्चा डॉक्टर बनता है। यह तो गलत है ना।”
” हां हां, हम रिश्वत क्यों दें।” एक साथ कई आवाजें गुंजीं,” हमें अन्ना के आंदोलन का साथ देना चाहिए।”
तब काफी सोचविचार व विमर्श के बाद यह तय हुआ कि कल सभी औरतें अपने हाथों में मोमबत्ती जलाकर रैली निकालेगी और अंत में रिश्वत नहीं देने की शपथ लेगी। सभी ने यह प्रस्ताव पारित किया और अपनी-अपनी पत्नियों को रैली में सम्मिलित कराने हेतु घर की ओर चल दिए।
सभी के चेहरे पर भ्रष्टाचार पर विजय पाने की मुस्कान तैर रही थी।
(बहुमुखी प्रतिभा के धनी श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवा निवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण एवं विचारणीय रचना ।।देखने को सितारे पहले, अँधेरा जरूरी होता है।।)
☆ कविता – ।।देखने को सितारे पहले, अँधेरा जरूरी होता है।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆
(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी की अब तक शताधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं। जिनमें 70 के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत। इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। आप “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे ।
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ( २५ नोहेंबर १८७२ ते ऑगस्ट १९४८)
नाटक आणि पत्रकारिता या दोन्ही क्षत्रात मोठे कर्तृत्व दाखवलेल्या कृ. प्र. खाडिलकर यांचा आज जन्मदिन.
नाटककार खाडिलकर – आपल्या प्रखर राष्ट्रवादाच्या समर्थनार्थ त्यांनी नाटके लिहिली. कांचनगडची मोहना, सवाई माधवरावांचा मृत्यू , कीचकवध, संगीत बायकांचे बंड, भाऊबंदकी, संगीत मेनका, इ. १५ नाटके त्यांनी लिहिली. त्यात संगीत मानापमान, सगीत स्वयंवर, भाऊबंदकी, कीचक वध ही नाटके खूप गाजली. त्यांची नाट्यप्रतिभा पुराण काळ आणि ऐतिहासिक काळ यात रमली. पण नाटके लिहिताना जिथे शक्य असेल, तिथे त्यांनी वर्तमानाचा धागा पुराण काळाशी जोडला. कीचकवध या नाटकात कर्झनशाहीचे वर्णन आहे. कीचक हे पात्र कर्झनवरूनच रंगवले आहे. त्यामुळे १९१० साली या नाटकावर बंदी आली होती.
त्यांच्या लेखणीमुळे मराठी नाटकांना वैभवाचा काळ आला, असं म्हंटलं जातं. राघोबा,आनंदी, रामशास्त्री, द्रौपदी, कंकभट अशी अविस्मरणीय पात्रे त्यांनी निर्माण केली.
१९२१पत्रकारखाडिलकर – खाडिलकर यांनी १८९३ मध्ये लेखनाला प्रारंभ केला. १८९५ मध्ये विविधज्ञान विस्तारात त्यांनी लिहीलेल्या एका लेखामुळे लो. टिळकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि त्यांनी खाडिलकरांना केसरीकडे बोलावून घेतले. १८९७ मधे ते ‘केसरी’त दाखल झाले. लो. टिळकांच्या जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत लेखन केले. १९०८ ते १९१०मध्ये टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपदक झाले. पुढे त्यांनी केसरीचे संपादकपद सोडले. १९१८ मधे टिळक व केळकर विलायतेला गेल्यानंतर ते पुन्हा केसरीचे संपादक झाले. १९२०ला टिळकांच्या निधंनानंतर त्यांचा केसरीशी संबंध संपला.त्यानंतर टिळक संप्रदायापासून ते वेगळे झाले व गांधीजींच्या राजकारणाचे समर्थक बनले.
त्यांनी १९०१ मधे ‘गनिमी काव्याचे युद्ध, १९१३ मधे बाल्कन युद्ध, १९१४ मध्ये चित्रमय जगत मधे ‘पहिले महायुद्ध’ यावर लेखमाला लिहिल्या.
१९२५ मधे नवाकाळ साप्ताहिक सुरू केले. हे साप्ताहिक, दैनिकाच्या स्वरुपात अजूनही चालू आहे. १९२७ मधे ‘नवाकाळ’ या वृत्तपत्रात त्यांनी ‘हिंदू-मुसलमान वादाबद्दल एक लेख लिहिला होता. त्याबाद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
१९३५, ते ४७ या काळात त्यांनी अध्यात्म ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन केले.
१९०७ साली झालेल्या तिसर्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९२१ साली गंधर्व विद्यालयातर्फे आयोजित केलेल्या संगीत परिषदेचे ते अध्यक्ष होते.
१९३३ मधे नागपूर येथे झालेल्या १८व्यासाहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
खाडिलकरांचा लेखसंग्रह – ( भाग१ व २) – यात त्यांच्या महत्वाच्या लेखनाचा व भाषणांचा संग्रह केलेला आहे.
नाट्य परिषदेतर्फे नाट्यक्षेत्रात विशेष लक्षणीय कामगिरी करणार्या रंगकर्मीस, दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कारकृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो.
☆☆☆☆☆
यशवंतराव चव्हाण – ( १२ मार्च १३ त२ २५ नोहेंबर ८४ )
यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री हे सर्वपरिचित आहे. नंतर केंद्रात ते संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री झाले, हेही सर्वांना माहीत आहे. ते राजनीतिज्ञ होते, तसेच थोडे साहित्यिक आणि श्रेष्ठ रसिक होते, हेमात्र सर्वांना माहीत असेलच असे नाही.
त्यांचे प्रकाशित साहित्य – १. आपले नवे मुंबई राज्य (१९५७), २. ऋणानुबंध (ललित लेख ) – १९७१, ३. कृष्णाकाठ ( आत्मचरित्र) – १९८४ ४. भूमिका – १९७९ ५. विदेश दर्शन, ६. सह्याद्रीचे वारे ( भाषण संग्रह), ७. युगांतर –स्वातंत्र्यपूर्व व स्वतत्र्योत्तर हिंदुस्थानच्या प्रश्नांची चर्चा इ. त्यांची पुस्तके आहेत.
यशवंरावांवरही अनेक पुस्तके लिहिली आहेत. रामभाऊ जोशी, अनंत पाटील, गोविंद तळवलकर , कृस्मृतीदिन. भा. बाबर इ. नी त्यांच्यावर लिहिले आहे.
त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली
☆☆☆☆☆
लीलावती भागवत ( ५ सप्टेंबर १९२० २५ नोहेंबर २०१३ )
आज लीलावती भागवत यांचाही स्मृतीदिन. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९२०चा. मराठीत बाल-कुमारांसाठी त्यांनी विपुल लेखन केलं. आकाशवाणीवरील वनिता मंडळ हा स्त्रियांचा कार्यक्रम २० वर्षे चालवला. त्यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ ने १९४० मध्ये झाला. या दोघांनी मिळून ५१ मध्ये मुलांसाठी ‘बालमित्र’ हे मासिक सुरू केले. त्यात नामवंतांचे लेख व द.ग. गोडसे यांची चित्रे होती. मुलांचे ते आवडते मासिक होते. पण त्या काळात पुस्तके विकत घेऊन वाचायची मानसिकता नव्हती. त्यामुळे पुढे ते आर्थिक तोट्यात आले आणि बंद करावे लागले. उभय पती- पत्नींनी आपल्या घराभोवतालचा परिसर मुलांसाठी मोकळा ठेवला. तिथे मुलांनी येऊन कोणतेही पुस्तक त्यांच्याकडून घेऊन वाचावे, अशी सोय केली. त्यांनी भा.रा. भागवतांच्या पुस्तकाचे संकलन केले आणि त्यांच्या नावातली काही महत्वाची अक्षरे घेऊन
त्या संकलनाला ‘भाराभर गवत’ असे गमतीदार नाव दिले.
पुण्याच्या अखिल भारतीय बाल-कुमार सस्थेच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे.वयाच्या ९०व्या वर्षीही त्या उत्साही आणि क्रीयाशील होत्या.
त्यांनी मुलांसाठी बरीच पुस्तके लिहिली. त्यापैकी काही – १. अभयारण्याची चोरी, २.आला विदूषक आला, ३. इंजीन हे छोटे, ४.कुडकुड थंडी ५. कोण असे हे राव ६. कोणे एके काळी७. चिट्टू पिट्टूच पराक्रम ७.झुमझुम झोका नि चमचम चांदण्या,८. स्वर्गाची सहल इत्यादी पुस्तके आहेत.
त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २. माहिती स्त्रोत – इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
असं म्हणतात की दर पाच कोसावर बोलीभाषा बदलते. आणि प्रत्येक भाषेला एक स्वतःचा स्व-भाव असतो. अशातच माझ्या बाबतीत “मराठीने केला मालवणी भ्रतार” अशी अवस्था! त्यामुळे लनानंतर मी अत्यंत शुद्ध(?) अशा पुणेरी मराठीतून एकदम सुद्ध मालवणी भाषेच्या प्रदेशात येऊन पडले आणि अक्षरशः धडपडले. कारण ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय म्हणजे अस्सल मालवणी माणसांशी रोजचाच संपर्क! त्यामुळे घडलेल्या फजितीचे हे किस्से!
अगदी सुरुवातीला जेव्हा गर्भवती महिला तपासायला यायच्या तेव्हा आमच्यात घडणारे संवाद-
मी:- यापूर्वी कुठे दाखवले होते का?
रुग्णा:- हो, आमेरिक!
मी:- (आश्चर्याने तिला नखशिखांत न्याहाळत) अमेरिका? तुमचे मिस्टर तिकडे असतात का? रुग्णा:- नाय! आमचे मिशेश(?) हडेच असत.
मी:- मग तुमचे माहेर तिकडे का?
रुग्णा:- नाय! माझा मायार दोडामार्गाक!
मी:- (हैराण होऊन) बरं बरं.. तिकडचे काही तपासणीचे कागद आहेत का?
रुग्णा:- ह्या बघा तडेचा कार्ड( असं म्हणत आपले प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिलेले कार्ड पुढे करते)
मी:- हा हा, म्हणजे तुम्ही सरकारी दवाखान्यात तपासले होते तर…
रुग्णा:- ताच सांगलय मा मगाशी? आमेरिक म्हणून!
मग मला उलगडा झाला की आमच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ‛आंबेरी’ नावाच्या गावात आहे. त्यामुळे आंबेरीला असे सांगताना या बायका मालवणी भाषेत ‛आंबेरीक’ असे म्हणत आणि मला तो उच्चार अमेरिकेसारखा वाटे.
असेच एकदा साधारण आठ- नऊ वर्षांच्या दोन मुली आल्या. त्यांच्या- माझ्यातील हा संवाद-
मुलगी:- आयेन आपडीची गोळी देऊक सांगलय.
मी:- (गोंधळून) कसल्या गोळ्या?
मुलगी:- (जवळ येऊन कुजबुजत) आपडीच्या ओ…
मला तर “आपडी- थापडी गुळाची पापडी…” हा खेळच आठवू लागला. माझ्या चेहऱ्यावरील गोंधळलेले हे भाव तिथेच बसलेल्या आणि डॉक्टर असणाऱ्या माझ्या पतीच्या लक्षात आले. त्यांनी हसत – हसत एका कागदावर काहीतरी लिहून तो कागद माझ्याकडे सरकवला. तेव्हा माझा चेहरा अगदी आरशात पाहण्यासारखा झाला होता. कारण ‛आपडी’ म्हणजे ‛मासिक पाळी’ या नवीन शब्दाची माझ्या डिक्शनरीत नव्यानेच भर पडली होती.
आता मात्र मी पूर्णपणे मालवणी भाषा अवगत केली आहे. तरीसुद्धा रुग्णांची म्हणून एक वेगळीच परिभाषा असते. त्यातलाच हा एक नमुना-
रुग्ण:- बाईनु, गेल्या खेपेक तुम्ही ‛भुनी बुंदी ‘ दिला होतास ना तेना माका एकदम बरा वाटलला. ताच द्या माका.
मी:- अरे, तुला एवढा पित्ताचा त्रास होत असताना मी कशाला तुला बुंदी देईन? आणि असलं काही मी दवाखान्यात कशाला ठेवेन?
रुग्ण:- तुमीच तर दिल्यात.तडे मेडिकलातसून घेवूक चिठ्ठी दिललास. त्याच्याबरोबर खयचो तरी गूळ पण होता.
(हे सर्व ऐकून आपण डॉक्टर नसून हलवाई आहोत की काय अशी मला शंका येऊ लागली.) तेवढ्यात त्याने आधीचे प्रिस्क्रिप्शन काढून समोर ठेवले. त्यावरची नावे बघून मी कपाळाला हात लावला व मुकाट्याने पुन्हा नवीन प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात केली. कारण ती औषधे होती- भूनिंबादि काढा आणि योगराज गुग्गुळ!
सध्या या दीड- दोन वर्षात कोविडमुळे आम्हाला पेशंट लांबूनच तपासावे लागत आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करताना येणाऱ्या रुग्णांची मानसिकता बघता इंजेक्शन नाही आणि प्रत्यक्ष हात लावून तपासणी नाही म्हणजे ‛डॉक्टराक फुकट पैसे देना’ असा समज! अशीच एक रुग्णा व डॉक्टर यामधील घडलेला हा प्रत्यक्ष किस्सा-
डॉ. :- काय गे, हल्ली बरी असस वाटता. बरेच दिवसांनी इलस!
त्यावर बाईचा जवाब इतका लाजवाब होता की बाकीचे रुग्ण डॉक्टरांकडे जरा वेगळ्याच नजरेने बघू लागले आणि डॉक्टरना आता धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे असे वाटू लागले.
बाई:- काय करूचा येवून? तुम्ही काय आमका हात पन लावनास नाय काय जवळ पन घेनास नाय.
☆ साप…. भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
`रमलू…ए रमलू… ऊठ. वाड्यातून मुकादम बोलवायला आलाय.
`झोपू दे ना आई! आज माझा सुट्टीचा दिवस आहे. सांग त्या मुकादमाला.’
`अरे, तो म्हणतोय, वाड्यात साप निघालाय. म्हणून शेठजींनी तुला बोलावलय. जा. मुकादमाच्या सायकलवर बसून जा.’
`आज मी मुळीच जाणार नाही आई! काही का होईना तिकडे. यांना आम्ही आमचा देव समजतो. पण या लोकांच्या दृष्टीने आमची किंमत कौडीची. नोकरच आम्ही फक्त. साप निघू दे, नाही तर आग लागू दे! आम्हाला काय त्याचं? रमलू उठून खाटल्यावर बसला. तो पुढेही भुणभुणत राहिला. `त्यांच्याकडे नोकरी करायला लागून दोन वर्षं झाली. आधी म्हणाले, ऑफीसमध्ये काम करावं लागेल. पण आता शेतात-मळ्यात मजूरी, ट्रॅक्टरवर हमाली, त्यांच्या मुला-बाळांचं हागणं-मुतणं सगळं करवून घेतात. बारा तास करा… नाही तर वीस तास करा. कधी पाच रुपये स्वतंत्र फेकणार नाहीत. ते तर झालंच, यांची सायकल पंक्चर झाली तरी पंक्चर दुरुस्तीचे पैसे पगारातून कापून घेणार. मोठे शेठ म्हणवतात स्साले….!
`असं नाही बोलायचं बेटा, कसं का असेना, ते आपले अन्नदाते आहेत. जा. मुकादम उभा आहे बाहेर.’
`आई, मी काल तुला सांगितलं नाही? काल पाच हजार रुपये मागितले होते. आपल्या मुनियाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी. मुनीम, शेठजी, मोठ्या सूनबाई, धाकट्या सुनबाई सगळ्यांची विनवणी केली. गयावया केलं. पायसुद्धा धरले. पण सगळ्यांनी तोंड फिरवलं. पैसे मागितले, तेसुद्धा दान म्हणून नाही. अॅडव्हान्स म्हणून. मी म्हंटलंसुद्धा… दर महिन्याच्या पगारातून पाचशे रुपये कापून घ्या, पण कुणाला पाझर फुटला नाही.’
`अरे, मोठ्या शेठजींना सांगायचंस ना! ते तुझ्या वडलांपासून आपल्याला ओळखतात.’
`त्या मुठल्ल्यालासुद्धा सांगितलं. काय म्हणाला माहीत आहे? ‘
`काय? ‘
`म्हणाला उगीचच पैसे फुकट घालवता तुम्ही लोक. म्युन्सिपालटीच्या शाळेत का प्रवेश घेत नाही? तुम्हा लोकांसाठी ती शाळाच ठीक आहे. ‘
`अरे बेटा, एकदा नाही म्हंटलं, म्हणजे प्रत्येक वेळी नाहीच म्हणतील, असं थोडंच आहे? त्यांचीही काही अडचण असेल. तुझे बाबा गेल्यानंतर त्यांनी तुला नोकरी दिली नसती, तर आज आपण कुठे असतो? आज त्यांच्यावर संकट आलय, आणि आपण घरात झोपून राहतो, हे काही ठीक नाही.’
एवढ्यात झोपडीसमोर एक मोटरसायकल उभी राहिली. त्यावरून मुनीम आले होते.
`चल बेटा रमलू, वाड्यावर भयंकर गोंधळ माजलाय!’
`पण मुनीमजी, मी येऊन काय करू? मला साप पकडता येत नाही.’
एव्हाना रमलू चुळा भरून उपरण्याला तोंड पुसत बाहेर आला होता.
`तुझे वडील साप पकडायचे. त्यांचा कुणी साथीदार असेल, तर त्याला घेऊन जाऊयात. शेठजींनी त्यासाठी मोटरसायकल पाठवलीय.’
`अरे, ते रम्मैया चाचा असतील. तुझ्या बाबांबरोबर ते पण साप पकडायला जायचे.’
मुनीम आणि रमलू रम्मैयाचाचाकडे गेले, पण तिथे कळलं, ते आपल्या मुलाकडे पुण्याला शिफ्ट झाले आहेत.
रमलू मुनीमजींबरोबर वाड्यावर पोचला. शेठ-शेठाणी आणि घरातील इतर सगळे सत्रा-अठरा लोक अंगणात, कुणा संकटमोचकाची प्रतीक्षा करत उभे होते. मुकादम वाड्यावर आधीच पोचला होता. त्याने रमलूचा हात धरला आणि ज्या खोलीत साप होता, तिथे त्याला ताबडतोब घेऊन गेले. खोलीच्या दरवाज्याशी डावी-उजवीकडे दोन नोकर हातात लाठी घेऊन उभे होते. त्यापैकी एक जण म्हणाला, `सहा-आठ फुटापेक्षा कमी नाहीये! सगळ्यात आधी मोठ्या सूनबार्इंना दिवाणखान्यात दिसला. त्या ओरडल्या. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत कोठीच्या खोलीतून इथे रश्मीतार्इंच्या खोलीत पोचला.’
`वाटतय, अस्सल नाग आहे.’ दुसरा नोकरम्हणाला.
`नाग नाही, नागीण आहे. बहुतेक कात टाकणारे…त्यामुळेच तिची गती संथ झालीय. नाही तर आतापर्यंत सगळ्या वाड्यात फिरून आली असती. ‘ पहिल्या नोकराने विस्तृत माहिती दिली.
भाग 1 समाप्त
मूळ हिंदी कथा – साप मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती….) इथून पुढे —-
एकदा तिला म्हणालो, “ अशी भीक घेण्यापेक्षा ‘चार पैसे’ कमव… काहीतरी धंदा सुरू करू
आपण..”
ती म्हणाली होती, “ मुडद्या भांडवल काय माजा मेलेला बाप घाललं काय….? “
मी म्हणालो होतो, “ नाही ना, तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल घालल…. “
यावर तिने पदराला पुसलेले डोळे मला अजून आठवतात….
यानंतर मी तिला पाच ते दहा विक्रीयोग्य वस्तू विकत आणून दिल्या आणि तिला म्हणालो,
“ बघ हळूहळू हा व्यवसाय सुरु कर.”
तिने माझं ऐकलं…. मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीने तिने त्या फूटपाथवरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या…… व्हीलचेअर घेऊन ती आता घराबाहेर बसू लागली…. येणार्या-जाणार्या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करू लागली….
व्यवसाय हळूहळू वाढत गेला
मी दिलेल्या पाच दहा वस्तूंची संख्या वाढवत तिने ती दोनशे-तीनशेच्या वर नेली. आता वस्तू ठेवायला घर पुरेना… हे कर्तुत्व तिचं होतं….!
तिला मी फक्त एक हात दिला होता, तिने या संधीचे सोनं केलं…. ती आकाशात भरारी घेत होती….!
फुंकर मारल्याने दिवा विझतो….. अगरबत्ती नाही….!
जो दुसऱ्याला सुगंध देतो तो कसा विझेल….?
कोणतंही काम करण्याच्या पलीकडे गेलेला एक अपंग माणूस रोज तिच्या दारावर यायचा…. या ताईने त्याला रोज दोन वेळचं जेवण द्यायला सुरुवात केली.
स्वतःला जाणवते ती वेदना. पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते, ती म्हणजे संवेदना….!
तिने त्याची वेदना जाणून त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता….
आपण उठून उभे राहिल्यावर दुसऱ्याला सुद्धा मदतीचा हात द्यावा….. कुठून आला असेल हा विचार तिच्या मनात…?
मी तिला मनोमन नमस्कार करायचो.
ती मला नेहमी म्हणायची, “ एवढ्या लोकांचं करतोस, याचं पण पांग फेड बाबा, या अधू पोरासाठी पण कायतरी कर…. “
कालांतराने या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले. तो आता स्वतःच्या पायावर चालतो. यानंतर त्याला एका आश्रमात नोकरी मिळवून दिली आहे.
त्याचं सर्व छान झालं, या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल, तर तिला…!
दुसर्याच्या आनंदात आपलं सुख माणणं, म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं होणं…. बाकी नुसतंच वय वाढण्यानं कुणी मोठा होतं नसतो….!
मोठं होणं म्हणजे maturity येणं….!
किती कॅरेटचं सोनं घातलंय, यापेक्षा किती मूल्यांचं कॅरेक्टर आहे हे समजणं म्हणजे maturity….!
विझलेल्या दिव्यांना सुद्धा किंमत द्यायची असते, कारण कालची रात्र त्यांनीच प्रकाश दिलेला असतो….
आज जरी आई बाप म्हातारे आणि बिनकामाचे दिसत असले, तरी आपल्याला त्यांनीच उजळून टाकलंय….त्यांनाही किंमत द्यायची असते हे कळणं म्हणजे maturity….!
चुका शोधायला मेंदू लागतो…. पण माफ करायला हृदय…. हे समजणं म्हणजे maturity….!
…. अशाच एके दिवशी शिव्या देत फोन करत मला तिने घर बघायला बोलवलं…. तिथे तिने अनंत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, ते पाहून माझे डोळे दिपून गेले….
कृतज्ञतेने म्हणाली, “ ही भरभराट तुज्यामुळं झाली बाबा “.
खरंच तिची भरभराट झाली होती…. पण केवळ वस्तूंची संख्या वाढली म्हणून तिला भरभराट म्हणायचं का ? तर मुळीच नाही…..
काळ्याकुट्ट अंधारात मिणमिणता का होईना, पण दुसऱ्याच्या घरात एक दिवा लावणे म्हणजे भरभराट….
सर्व काही संपलेलं असतानासुद्धा उठून उभं राहण्याची इच्छा मनात बाळगणे म्हणजे भरभराट…
पाय नसतानाही आकाशात भरारी घ्यायचं वेड मनात बाळगणं म्हणजे भरभराट…
आपले डोळे पुसत असतांनाच, एक हात दुसऱ्यांचे डोळे पुसण्यासाठी पुढं जाणं म्हणजे भरभराट…
आपण पडलेले असतानासुद्धा, दुसऱ्याच्या आधारासाठी एक बोट आपोआप पुढं जाणं म्हणजे भरभराट….
आपल्याकडे काहीही नसणं आणि एके दिवशी खूप काही असणं– या दोन टोकामधलं अंतर जिद्दीने पार करणं म्हणजे भरभराट….
टोकियो ऑलिंपिकच्या पुरुषांच्या उंच उडी प्रकारातील स्पर्धा शेवटच्या टप्प्यात शिगेला पोहोचली होती…इटलीचा Gianmarco Tanberi व कतारचा Murtaz Essa Barshim हे दोघे, अटीतटीच्या प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकायचेच या ईर्ष्येने जीवाची बाजी पणाला लावत होते…प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोघांनी २.३७ मीटर उंचीचा टप्पा बरोबरीनेच कसाबसा, आटोकाट प्रयत्नांती ओलांडला होता. आता प्रत्येकाला पुढील टप्पा तीन प्रयत्नात ओलांडायचा होता…पण दोघेही तो टप्पा तीन प्रयत्नांतीही ओलांडण्यात अपयशी ठरले. आता ही कोंडी कशी फुटणार ? मोठा गहन प्रश्न उभा ठाकला. ऑलिंपिक अधिकाऱ्यांनी दोघांना आणखी एक संधी देऊन हा पेचप्रसंग सोडवण्याचे ठरवले. पण यापूर्वीच तीन प्रयत्नादरम्यान इटलीच्या खेळाडूच्या- Gianmarco Tanberi च्या पायाला गंभीर दुखापत झाली होती व नाईलाजाने शेवटची संधी घेण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगत त्याने स्पर्धेतून माघार घेतली. याचा अर्थ कतारचा खेळाडू Murtaz Barshim यास विजयी घोषित करून त्यास सुवर्णपदक दिले जाईल, याची त्याला कल्पना होती. पण त्याचा नाईलाज होता…आणि येथे खिलाडूवृत्तीचे विस्मयकारी दर्शन Murtaz Barshim ने दाखवले. त्याने जास्तीचा एक प्रयत्न आजमावून पाहण्याचीही गरज नव्हती. तो गप्प बसला असता तरीही त्यास सुवर्ण पदक मिळाल्याचे घोषित झाले असते. पण त्याने उमदेपणा दाखवित, “मी सुद्धा माघार घेतली तर आम्हा दोघांनाही सुवर्णपदक विभागून दिल्याचे घोषित केले जाईल का? “, अशी पृच्छा ऑलिंपिक अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी विचारविमर्श करून —
‘दोघांनाही ते पदक विभागून मिळेल ‘ असे कळवले...कतारच्या खेळाडूने आपली पण माघारी घोषित केली व इटलीच्या खेळाडूला गगन ठेंगणे झाले ! आणि कतारच्या खेळाडूने- Murtaz Barshim नेही सुवर्णपदक न चुकवता ही सर्वोच्च कोटीची खिलाडूवृत्ती आपण दाखवू शकलो, या आनंदाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मिठी मारली !
पात्रता नसतांनाही स्वयंघोषित सन्मान मिरवणारे ‘ वीर’ कुठे आणि सन्मानाचा हव्यास न दाखवणारे हे ऑलिंपियन कुठे ? बडा जिगरा चाहिए उमदेपणासाठी !
संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈