प्रत्येक शब्दाचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अर्थ, रंग आणि भाव यामधील वैविध्य..! शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा तर शब्दार्थाइतकाच भावार्थही महत्त्वाचा ठरतो. शब्दाच्या एकाच अर्थालाही विविध रंगछटा असतात.
शब्द हे मनातील भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम. त्यामुळे शब्द जाणीवपूर्वक,योग्य पद्धतीने आणि अचूकपणे वापरले गेले तरच त्याचे अर्थ, त्यातील भाव आणि रंगासहित योग्य रितीने ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोचतात. एरवी वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दातील रंग उडून गेल्याने व भाव विरून गेल्याने भावार्थही लयाला गेलेला असतो. आणि उरतो तो शब्दाचा सातत्याने सरसकट सरधोपटपणे झालेल्या वापरामुळे ठळक झालेला फक्त रुढार्थ! याचे अतिशय चपखल उदाहरण म्हणजे ‘ धर्म ‘ हा शब्द. धर्म हा शब्द ‘ उपासना-प्रणाली, ईश्वर प्राप्तीचे मार्ग यासाठी आकाराला आलेले प्रचलित धर्म’ या अर्थानेच सर्रास वापरला आणि स्वीकारलाही जातो.त्यामुळे धर्म या शब्द फक्त ‘RELIGION’ या एकाच अर्थाने सर्रास गृहित धरण्यात येतो.पण ‘धर्म’या शब्दाला हाच एक अर्थ अभिप्रेत नाहीय. धर्म या शब्दाला श्रद्धा- प्रणाली, उपासना-पद्धती, ईश्वरोपासना, परमेश्वरप्राप्तीचे मार्ग, नीतिशास्त्र,व्यवहारशास्त्र, जीवनमार्ग, तत्त्वप्रणाली असे विविध अर्थरंगी पैलू आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘धर्माची आराधना’ या विषयाचे विवेचन धर्म या शब्दाच्या अनुषंगाने करायचे तर या शब्दाच्या वर उल्लेख केलेल्या अर्थांपैकी कोणता अर्थ गृहीत धरणे योग्य होईल याचा विचार करायला हवा. मला स्वतःला त्यातील ‘जीवनमार्ग’ या अर्थाच्या जवळ जाणारा ‘जीवनपद्धती’ हा अर्थ सर्वसमावेशक वाटतो.याला कारणही तसेच आहे. जीवन जगताना आपल्याला पार पाडाव्या लागणाऱ्या परस्पर वेगवेगळ्या अशा असंख्य भूमिका वठवत असताना आपला दृष्टिकोन नेमका कसा असावा हे विशद करणाऱ्या अनेक संकल्पनांना ‘धर्म’ हेच नामानिधान विचारपूर्वक जोडलेले असल्याचे लक्षात येते. उदा.- स्वभावधर्म,गृहस्थधर्म, पुत्रधर्म, मैत्रीधर्म,शेजारधर्म,सेवाधर्म राजधर्म आणि असेच अनेक.
जसा ‘धर्म’ तसाच ‘भक्ती’ हा शब्द.या शब्दाचेही विविध रंग आणि भाव ध्वनित करणारे तितकेच विविध अर्थ आहेत. भक्ती म्हणजे प्रार्थना.सेवा. उपासना. भक्ती म्हणजे नमन, पूजन,आळवणीच नाही फक्त तर अनुनय आणि मनधरणीही. निवेदन,विज्ञापन,मागणी, याचना, कळकळीने केलेली विनंती,असेही अर्थ ‘भक्ती’ या शब्दाच्या रंगछटांमधे लपलेले आहेत. यातील ‘कळकळीने केलेली विनंती ‘ या अर्थाची सावली असलेल्या प्रार्थना,नमन,पूजा इत्यादी अर्थांची नाळ थेट ईश्वराच्या आराधनेशी जोडलेली असते.
आराधना व भक्ती हे दोन्ही समानार्थी शब्द. त्यामुळे ‘आराधना’ या शब्दालाही प्रार्थना अनुनय,आळवणी,धावा हे सगळे अभिप्रेत आहेच.धर्म,भक्ती आणि आराधना या तीनही शब्दांचे हे विविध अर्थ,भावार्थ आणि त्यांचे विविधरंगी रूप लक्षात घेतले तर ‘धर्माची व भक्तीची आराधना’ यावर ‘नेमके कसे व्यक्त व्हावे?’ हा मनात निर्माण होणारा प्रश्न कांहीसा संभ्रम निर्माण करणारा ठरतो.
दैनंदिन जीवनाच्या संदर्भात याचा विचार करायचा तर मूल्याधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारून भक्तीयुक्त अंतःकरणाने केलेली जीवनमूल्यांची आराधना हीच परमेश्वरापर्यंत तात्काळ पोचते हे लक्षात घ्यायला हवे.ईश्वर उपासनेच्या विविध प्रणालींचा अंगिकार आणि प्रसार करणाऱ्या विविध धर्मांनीही त्यांच्या शिकवणूकीमधे याच तत्वाचा स्विकार केलेला आहे. त्यामुळेच तात्त्विकदृष्ट्या विचार करायचा तर कोणताच धर्म ‘अधर्म ‘ शिकवत नाही. धर्माच्या ‘कट्टर’ अंगिकारातूनच ‘अधर्म’ जन्माला येत असतो.कोणत्याही धर्माचा धर्मतत्त्वांचे महत्त्व आणि अपरिहार्यता समजून घेऊन अंगिकार करणारेच ‘मानवधर्म’ असोशीने कृतीत उतरवू शकतात. धर्माचा असा ‘कृतिशील स्वीकार’ हीच खरी आराधना असे मला वाटते. धर्माचा कट्टर विचारांच्या अधीन होऊन अट्टाहासाने प्रचार व प्रसार करणारे त्यांच्याही नकळत आराधनेऐवजी अतिरेकाचा अंगीकार करुन स्वथर्मच भ्रष्ट करीत असतात. दैनंदिन जीवन आनंददायी करण्यासाठी मूल्याधिष्ठित भूमिकेतून धर्माचा केलेला स्विकार आणि त्यातून निर्माण होणारी प्रत्येक कृती सहृदयतेच्या स्पर्शाने शुचिर्भूत झालेलीच असेल. तिथे अतिरेकाला थारा नसेल तर आराधनेला अभिप्रेत असलेला कळवळा असेल.
धर्म,भक्ती आणि आराधना हे तिन्ही शब्द म्हणूनच त्यांच्या विविध रंग,भाव न् अर्थासह मनोमन जपून ठेवणे अगत्याचे. हे झाले तर आपली आराधना सफल होण्यात प्रत्यवाय तो कोणता?
☆ साप…. भाग २ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
(मागील भागात आपण पहिलं – `नाग नाही, नागीण आहे. बहुतेक कात टाकणारे…त्यामुळेच तिची गती संथ झालीय. नाही तर आतापर्यंत सगळ्या वाड्यात फिरून आली असती. ‘ पहिल्या नोकराने विस्तृत माहिती दिली. आता इथून पुढे )
`मग तुम्ही लोकांनी तिला घेरून मारलं का नाही?’
`अरे बाबा, हे लोक सापाला मारत नाहीत ना! त्यांच्याकडे तर नागदेवतेची पूजा केली जाते.’
`मग तुम्ही लोक एवढ्या जाड जाड लाठ्या घेऊन का उभा राहिलाय?’ रमलूनेविचारले.
`शेठजीम्हणाले, त्यावर लक्ष ठेवा, नाही तर कुठे घुसेल, कुणासठाऊक!’
`मग आता कुठे आहे?’
`त्या कोपर्यात पुस्तकांच्या कपाटाखाली वेटोळं घालून बसलाय.’
रमलूला आपल्या वडलांची आठवण झाली. साप पकडण्याचं चांगलंच कसब त्यांच्याकडे होतं. अनेकदा त्यांच्या`साप-पकड- अभियानात रमलूदेखील सहभागी व्हायचा.
रमलूने डोळे मिटून भोळ्या शंकराचं स्मरण केलं. त्याचे वडील तसंच करायचे. मग म्हणाला, `एक मोठा माठ आणा आणि एक चांगलं मजबूत कापड. माठाच्या तोंडावर बांधण्यासाठी…. तुझा हा पंचासुद्धा चालेल.’ त्याने एका नोकराच्या खांद्यावरचा पंचा घेऊन आपल्या गळ्याभोवती लपेटला. मगत्याने ४-५ फूट लांबीची काठी घेतली आणि तो खोलीत शिरला. त्याने कपाटाला थोडासा धक्का देताच सापाने एक फुत्कार टाकला आणि तो सर्रकन बाहेर आला.
दरवाजाशी उभा असलेला एक नोकर ओरडला, `रमलू सावध राहा रे बाबा!’ दुसरा म्हणाला, लक्ष ठेव साप उसळी मारून, उलटा होऊनसुद्धा चावतो. ‘
रमलू अधीक सावध झाला. खोलीत लावलेल्या गुळगुळित टाईल्समुळे सापाला वेगाने सरकता येत नव्हतं. तो भिंतीच्या कडेने दरवाजाच्या दिशेने सरपटू लागला. रमलू सावधपणे पुढे झाला आणि लाठीचं टोक सापाच्या मानेपाशी पूर्ण ताकदीने दाबलं आणि उजव्या हाताने त्याची शेपटी मजबुतीने पकडून झटकन त्याला उलटं पकडलं. साप रमलूपेक्षा एखदा फूट जास्तच उंच होता. सापाला सावधपणे पकडून रमलू अंगणात आला. शेठजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी साप पाहिला, तेव्हा त्यांचे डोळे विस्फारलेच. तर्हेतर्हेच्या चर्चा सुरू झाल्या. या दरम्यान रमलूच्या इशार्यानुसार नोकर मोठं मडकं घेऊन तिथे आला. रमलूने सापाला मडक्यात सोडलं आणि पापणी लवायच्या आतआपल्या गळ्यातला पंचा काढून मडक्याचं तोंड बांधून टाकलं. सापाच्या अस्वस्थपणामुळे हलणारं मडकदेखील वाड्यातील लोकांच्या मनात भीतीचे शहारे उठवायला पुरेसं होतं. इकडे रमलूचं सारं शरीर पानाप्रमाणे थरथर कापत होतं. घामाने न्हाऊन निघाला होता रमलू. त्याने कोणत्या खुबीने सापाला कैद केलं, त्यालाच कळलं नव्हतं. शरीराची थरथर थोडी कमी झाली, तेव्हा घामाने ओला चिंब झालेला आपला सदरा काढला. पिळला आणि त्याने आपला देह पुसू लागला. शेठजी हे सगळं बघत होते. ते पुढे झले आणि रमलूला म्हणाले, `आज तू अगदी तुझ्या वडलांप्रमाणे बहादुरीचं काम केलंस. मी त्यांना साप पकडताना पाहिलं होतं.’
रमलूची बोलतीच बंद झाली होती. मोठ्या मुश्किीलीने त्याच्या कंठातून शब्द फुटले, `शेठजी, आता मला निघायला हवं. अंधार होण्यापूर्वी याला जंगलात सोडायला हवं. मुकादमांना, मला झोपडीपर्यंत पोचवायला सांगा.’
`झोपडीत जाऊन काय करणार? मुकादम थेट जंगलापर्यंत तुला घेऊन जाईल.’
`झोपडीत जाऊन मटक्याला शेंदूर लावायला लागेल. आम्हीदेखील सापाची पूजा करतो. पूजा झाल्यावर जंगलात सोडून येईन.’
`तुझे वडीलसुद्धा असं सगळं करत होते?’
`हो!’
`ठीक आहे. तू म्हणशील, तिथे मुकादम तुला सोडून येईल.’ शेठजींनी हाक मारली. एका क्षणात तिथे मुकादम हजर झाला. रमलूने माठ उचलला आणि मोटारसायकलच्या दिशेने निघाला. शेठजींनी पाचशेच्या दोन नोटा काढून रमलूच्या खिशात ठेवत म्हंटलं, `हे तुझं इनाम’
`माफ करा शेठजी, या कामासाठी कोणतंही इनाम घेतलं जात नाही. माझ्या वडलांनी शेकडो साप पकडून लोकांची सुटका केली होती. पण कधी कुणाकडून एक पैसासुद्धा घेतला नाही.’
`तो काळ वेगळा होता रमलू. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. आता काळ बदललाय. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. ठेव. तुझ्या कामी येतील.’
भाग 2 समाप्त
मूळ हिंदी कथा – साप मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(आपल्याकडे काहीही नसणं आणि एके दिवशी खूप काही असणं या दोन टोकांमधलं अंतर जिद्दीने काटणे म्हणजे भरभराट…. ) इथून पुढे —-
चार वर्ष मी या कुटुंबासोबत आहे….
रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी असा हा तिचा प्रवास…. मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे…. नव्हे अनुभवलाय….
या सर्व प्रवासात तिने आणखी एका व्यक्तीला हात दिला होता…. याचंच मला अप्रूप !
स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती, पण स्वतःला भूक लागलेली असताना, आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती….!
ती शिकलेली नाही, तिची भाषा ओबड-धोबड आहे…. पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे…!
या दिवाळीत तिने मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं….
भाऊबीजेच्यादिवशी तिने तिच्या घरासमोर, फुटपाथवरच एक चटई अंथरली….
तिथे तिने मला साग्रसंगीत ओवाळले…मी तिला ओवाळणी दिली.
तिने मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला….
“पेढ्याच्या बॉक्सवरच भागवते का म्हातारे… मला वाटलं जेवायला बोलवशील…”, मी हसत म्हणालो.
“दिसते तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण…” मुद्दाम मी तिला उचकवलं…. आता पुढं काय होणार हे मला माहित होतं…
“म्हातारी कुणाला म्हणतो रे मुडद्या… “बी असं म्हणत तिने पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती….
एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलेपेक्षा आणखी जास्त काय हवं….?
माझ्या आईच्या वयाची ती बाई, आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो.
तिच्या पाया पडत म्हणालो, “ तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही, तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे…. पण खरं सांगू का, ताई पेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे….!”
तिच्या भावूक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं…
तिला म्हणालो, “ अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस. मात्र जेव्हा स्वतः सावरलीस, तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस. हे सारंकाही एक आईच करू शकते….”
आता तिच्या डोळ्यात पाणी होतं…. ती म्हणाली, “ पाय नसत्यात तवा त्याचं दुःख काय आस्त हे मला म्हाईत हाय. रस्त्यावर कुत्र्यावानी निराधार म्हणून उनात पावसात पडणं म्हंजी काय आस्तंय, हे सुदा मला म्हाईत हाय. मला तू आदार देऊन पायावर हुबी केलीस…. डोक्यावर छत टाकलंस…. पोटातली भूक भागवलीस…. तू माजा कुनीही नसताना माज्यासाटी तू हे केलंस… मी तुजी आई नसताना तू माजा पोरगा झालास….म्हणलं, चला बिन बाळंतपनाचं या वयात आपल्यालाबी पोरगं झालंय…. तर संबळु या अपंग पोराला…. आपुन बी या वयात आई हुन बगु…. मी आय झाले आन ह्यो बाप……” तिने नवऱ्याकडे बोट दाखवत म्हटले….!
आता डोळ्यात पाणी माझ्या होतं….!
म्हटलं, “ म्हातारे तू लय मोठी झालीस…. “
यावेळी ” म्हातारी ” म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली….
हसत ती झोपडीत गेली आणि चार-पाच बोचकी उचकटली… त्यातून एक शर्ट काढला…. एक साडी घेतली आणि मला म्हणाली, “ दिवाळीला ह्यो शर्ट घालशील का ? तू घिवून जा, नाय बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पन दे… तिला म्हणावं साडीतच ब्लाउज पीस पन हाय….”
हा भरजरी पोशाख मी घेतला….
गाडीला किक मारली आणि तिला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हणालो, “ जातो मी माई…”.
ती म्हणाली, “ ए मुडद्या, जातो म्हणू न्हायी…. येतो म्हणावं…. आनी हो…. माई आणि ताई म्हणायची थेरं करू नगंस. मला आपली म्हातारीच म्हन….मी तुजी म्हातारीच हाय….! “
मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो….
डालडा सगळ्यांनाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सब्स्टिट्यूट असलेला हा डालडा–त्याचा तो डबाही मोकळा झाल्यावर भरपूर कामांसाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता, की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाचं नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.
हो वनस्पती तूप– एकेकाळी याच वनस्पती तुपाने संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवलं होतं. पण गंमत अशी की आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तसं नाही. या वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.
नारायणराव बाळाजी भागवत हे त्या माणसाचे नाव.
भागवत घराणे हे मूळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतलं. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना मानाची “जगन्नाथ शंकरशेठ” शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवाण बनले.
बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली, म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती, आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.
अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी १८८६ मध्ये नारायणरावांचा जन्म झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होती. नारायणरावांनादेखील आपल्या वडिलांच्याप्रमाणे “जगन्नाथ शंकरशेठ” स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले, “ नारायणा, तुझी आर्थिक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस. आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस. “
हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये “ इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ”ची स्थापना झाली होती.
भारतातील हे पहिले मूलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.
ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.
पास आउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा, इब्राहिमभाई लालजी यांचा, साबणाचा कारखाना होता. त्यांनी तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.
पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.
क्रमशः…..
संदर्भ : विज्ञान विशारद, लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन.
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“अरे मोरू, असं ओरडायला काय झालं, आग लागल्या सारखं ?”
“पंत आगच लागल्ये, पण ती न दिसणारी आहे !”
“आता हा कुठला आगीचा नवीन प्रकार मोरू ?”
“अहो माझ्या हृदयात लागलेली आग तुम्हाला कशी दिसेल ?”
“अरे आग बिग काही नाही, ऍसिडिटी झाली असेल तुला मोरू !”
“नाही हो पंत, ऍसिडिटी वगैरे काही नाही ! त्याच काय झालंय, गेल्या वेळेस तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी माझ्या बायकोकडून मिळणारे सगळे प्रोटीन्सचे डोस, निमूटपणे घेत होतो.”
“मग आता काय झाले मोरू ?”
“पंत, पण हा माझा मवाळपणा समजून, माझी ही मला हरभऱ्याचा डोस हल्ली जरा जास्तच प्रमाणात द्यायला लागली आहे बघा !”
“मग बरंच आहे ना रे मोरू, बायको खूष तर घर पण कसं शांत शांत !”
“अहो पंत, पण त्या हरभऱ्याच्या डोसांमुळे माझा खिसा फाटायची वेळ आल्ये, त्याच काय ?”
“म्हणजे, मी नाही समजलो मोरू ?”
“अहो ही हल्ली गोड गोड बोलून, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवते आणि एक एक नवीन नवीन मागण्या पदरात पाडून घेते आणि त्या पुरवता पुरवता माझ्या खिशाला मोठ मोठी भोक पडायला लागली आहेत त्याच काय ?”
“अस्स, मग आता तू काय करायच ठरवलं आहेस मोरू ?”
“पंत, मी ही गोष्ट काल माझ्या शेजारच्या राणे काकांना सांगितली.”
“बरं, मग !”
“त्यांनी लगेच त्यांच्या ओळखीतल्या भगताला मोबाईल करून यावर उपाय विचारला.”
“मग काय उपाय सांगितला त्या भगताने ?”
“तो भगत म्हणाला, अमावस्येच्या रात्री हरभऱ्याच्या झाडाखाली उलट्या पिसाची काळी कोंबडी…..”
“मोरू, अरे तुझा या असल्या अंधश्रद्धेवर विश्वास आहे ?”
“अजिबात नाही पंत, मी पण राणे काकांना सांगितलं, की मी असला काही अघोरी प्रकार करणार नाही म्हणून.”
“हे बरं केलंस मोरू !”
“पण पंत, आमचे बोलण चालू असतांना तिथे नेमके सावंत काका येवून टपकले !”
“आणि त्या सावत्याचा आणि त्या राण्याचा छत्तीसचा आकडा, होय ना ?”
“बरोबर ! मग सावंत काकांनी पण इरेला पेटून त्यांच्या भगताला फोन लावला.”
“अरे बापरे, म्हणजे तुझी फारच पंचाईत झाली असेल ना त्या दोघांच्या मधे मोरू ?”
“हो ना पंत, पण मी तरी काय करणार होतो गप्प बसण्याशिवाय !”
“अरे पण सावंताच्या भगताने काय उपाय सांगितला यावर ?”
“तो तर जास्तच खतरनाक होता पंत !”
“म्हणजे ?”
“तो म्हणला, अमावस्येची रात्र बरोबर आहे, पण कोंबडीच्या ऐवजी एकशिंगी बोकडाचा….”
“खरच कठीण आहे या लोकांच, आपलं काम होण्यासाठी त्या निष्पाप प्राण्यांना उगाच….”
“पण पंत मी ह्या पैकी काहीच करणार नाहीये, तुम्ही निर्धास्त असा !”
“मोरू, हे बरीक चांगले करतोयस तू !”
“हे जरी खरं असलं पंत, तरी माझे खिसे आणखी फाटायच्या आधी, आता यावर उपाय काय तो तुम्हीच सांगा म्हणजे झालं !”
“तसा एक उपाय आहे माझ्या डोक्यात मोरू !”
“सांगा पंत, लवकर सांगा, लगेच करून टाकतो तो उपाय आणि ह्या त्रासा पासून सुटका करून घेतो माझी !”
“अरे जरा धीर धर, हा उपाय पण तसा सोपा नाहीये बरं. या साठी तुला कित्येक रात्री आपल्या गच्चीवर प्रतीक्षा करावी लागेल.”
“असं रहस्यमय बोलून माझी उत्कंठा आणखी वाढवू नका पंत !”
“अरे मोरू, आपल्याकडे असा एक पिढीजात समज आहे, की जर तुम्ही रात्रीच्या वेळेस एखादा तारा निखळतांना बघितलात आणि त्या वेळेस एखादी इच्छा मनांत धरलीत तर…..”
“ती नक्की पूर्ण होते, बरोबर ना पंत ?”
“म्हणजे हा उपाय तुला माहित होता मोरू ?”
“पंत, नुसता माहित होता असं नाही, तर हा उपाय पण करून झाला आहे माझा !”
“तुला कोणी सांगितला हा उपाय ?”
“पहिल्या मजल्यावरच्या चव्हाण काकांनी.”
“मग त्याचा तुला काहीच उपयोग झाला नाही मोरू ?”
“पंत त्या उपायची पण एक गंमतच झाली !”
“म्हणजे ?”
“अहो चव्हाण काकांच्या सांगण्यावरून मी सतत तिन रात्री गच्चीवर जागून काढल्यावर, चवथ्या दिवशी मला एक तारा निखळतांना दिसला.”
“बरं, मग ?”
“पंत, मी लगेच माझ्या मनांत इच्छा धरली की मला माझ्या बायकोकडून मिळणारे हरभऱ्याचे डोस ताबडतोब बंद कर आणि चमत्कारच झाला !”
“कसला चमत्कार मोरू ?”
“अहो पंत, तो तारा पडतांना मी इच्छा मनांत धरायचाच अवकाश, तो तारा आपल्या जागेवर परत गेला, आता बोला !”
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है ट्रांसजेंडर विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा ‘उसका सच’.डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस विचारणीय लघुकथा रचने के लिए सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 79 ☆
☆ लघुकथा – उसका सच…. ! ☆
सूरज की किरणें उसके कमरे की खिडकी से छनकर भीतर आ रही हैं। नया दिन शुरू हो गया पर बातें वही पुरानी होंगी उसने लेटे हुए सोचा। मन ही नहीं किया बिस्तर से उठने का। क्या करे उठकर, कुछ बदलनेवाला थोडे ही है? पता नहीं कब तक ऐसे ही चलेगा यह लुकाछिपी का खेल। बहुत घुटन होती है उसे। घर में वह कैसे समझाए सबको कि जो वह दिख रहा है वह नहीं है, इस पुरुष वेश में कहीं एक स्त्री छिपी बैठी है। वह हर दिन इस मानसिक अंतर्द्वंद्व को झेलता है। उसके शरीर का सच और घरवालों की आँखों को दिखता सच। दोनों के बीच में वह बुरी तरह पिस रहा है। तब तो अपना सच उसे भी नहीं समझा था, छोटा ही था, स्कूल में रेस हो रही थी। उसने दौडना शुरू किया ही था कि सुनाई दिया – अरे! महेश को देखो, कैसे लडकी की तरह दौड रहा है। गति पकडे कदमों में जैसे अचानक ब्रेक लग गया हो, वह वहीं खडा हो गया, बडी मुश्किल से सिर झुकाकर धीरे धीरे चलता हुआ भीड में वापस आ खडा हुआ। क्लास में आने के बाद भी बच्चे उसे बहुत देर तक लडकी – लडकी कहकर चिढाते रहे। तब से वह कभी दौड ही नहीं सका, चलता तो भी कहीं से आवाज आती ‘लडकी है‘ वह ठिठक जाता।
महेश! उठ कब तक सोता रहेगा? माँ ने आवाज लगाई।‘ कॉलोनी के सब लडके क्रिकेट खेल रहे हैं तू क्यों नहीं खेलता उनके साथ ? कितनी बार कहा है लडकों के साथ खेला कर। घर में बैठा रहता है लडकियों की तरह।‘
‘मुझे अच्छा नहीं लगता क्रिकेट खेलना।‘
माँ के ज्यादा कहने पर वह साईकिल लेकर निकल पडा और पैडल पर गुस्सा उतारता रहा। सारा दिन शहर में घूमता रहा बेवजह। पैडल जितनी तेजी से चल रहे थे, विचार भी उतनी तेज उमड रहे थे। बचपन से लेकर बडे होने तक ना जाने कितनी बार लोगों ने उसे ताने मारे। कब तक चलेगा यह सब ? लोगों को दोष किसलिए देना? अपना सच वह जानता है, उसे स्वीकारना है बस सबके सामने। घर नजदीक आ रहा है। बस, अब और नहीं। घर पहुँचकर उसने साईकिल खडी की, कमरे में जाकर अपनी पसंद का शॉल निकाला और उसे दुप्पटे की तरह ओढकर सबके बीच में आकर बैठ गया। सूरज की किरणों ने आकाश पर अधिकार जमा लिया था।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है। आज प्रस्तुत है श्री विवेक जी द्वारा लिखित एक विचारणीय व्यंग्य ‘कंफ्यूजन में ग्लैमर का फ्यूजन’। इस विचारणीय आलेख के लिए श्री विवेक रंजन जी की लेखनी को नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 128 ☆
व्यंग्य – कंफ्यूजन में ग्लैमर का फ्यूजन
कंफ्यूजन का मजा ही अलग होता है. तभी तो लखनऊ में नबाब साहब ने भूल भुलैया बनवाई थी. आज भी लोग टिकिट लेकर वहां जाते हैं और खुद के गुम होने का लुत्फ उठाते हैं. हुआ यों था कि लखनऊ में भयंकर अकाल पड़ा, पूरा अवध दाने दाने का मोहताज हो गया. लोग मदद मांगने नवाब के पास गये. वजीरो ने सलाह दी कि खजाने में जमा राशि गरीबो में बाँट दी जाये. मगर नवाब साहब का मानना था की खैरात में धन बांटने से लोगो को हराम का खाने की आदत पड़ जाएगी. इसलिए उन्होंने रोजगार देने के लिए एक इमारत का निर्माण करवाया जिसको बाद में बड़ा इमामबाड़ा नाम दिया गया. इमामबाड़े में असफी मस्जिद, बावड़ी और भूलभुलैया है. दिल्ली में भी भूल भुलैया है, जो लोकप्रिय पर्यटन स्थल है. कई बाग बगीचों में भी इसी तर्ज पर ऐसी पौध वीथिकायें बनाई गई हैं जहां गुम होने के लिये प्रेमी जोडे दूर दूर से वहां घूमने चले आते हैं.
दरअसल कंफ्यूजन में मजे लेने का कौशल हम सब बचपन से ही सीख जाते हैं. कोई भी बाल पत्रिका उठा लें एक सिरे पर बिल्ली और दूसरे सिरे पर चूहे का एक क्विज मिल ही जायेगा, बीच में खूब लम्बा घुमावदार ऊपर नीचे चक्कर वाला, पूरे पेज पर पसरा हुआ रास्ता होगा. बिना कलम उठाये बच्चे को बिल्ली के लिये चूहे तक पहुंचने का शार्टेस्ट रास्ता ढ़ूंढ़ना होता है. खेलने वाला बच्चा कंफ्यूज हो जाता है, किसी ऐसे दो राहे के चक्रव्यू में उलझ जाता है कि चूहे तक पहुंचने से पहले ही डेड एंड आ जाता है.
कंफ्यूजन में यदि ग्लैमर का फ्यूजन हो जाये, तो क्या कहने. चिंकी मिन्की, एक से कपड़ो में बिल्कुल एक सी कद काठी,समान आवाज वाली, एक सी सजी संवरी हू बहू दिखने वाली जुड़वा बहने हैं. यू ट्यूब से लेकर स्टेज शो तक उनके रोचक कंफ्यूजन ने धमाल मचा रखा है. कौन चिंकि और कौन मिंकी यह शायद वे स्वयं भी भूल जाती हों. पर उनकी प्रस्तुतियों में मजा बहुत आता है. कनफ्यूज दर्शक कभी इसको देखता है कभी उसको, उलझ कर रह जाता है, जैसे मिरर इमेज हो. पुरानी फिल्मो में जिन्होने सीता और गीता या राम और श्याम देखी हो वे जानते है कि हमारे डायरेक्टर डबल रोल से जुडवा भाई बहनो के कंफ्यूजन में रोमांच, हास्य और मनोरंजन सब ढ़ूंढ़ निकालते की क्षमता रखते हैं.
कंफ्यूजन सबको होता है, जब साहित्यकार को कंफ्यूजन होता है तो वे संदेह अलंकार रच डालते हैं. जैसे कि “नारी बिच सारी है कि सारी बिच नारी है”. कवि भूषण को यह कंफ्यूजन तब हुआ था, जब वे भगवान कृष्ण के द्रोपदी की साड़ी अंतहीन कर उनकी लाज बचाने के प्रसंग का वर्णन कर रहे थे.
यूं इस देश में जनता महज कंफ्यूज दर्शक ही तो है. पक्ष विपक्ष चिंकी मिंकी की तरह सत्ता के ग्लेमर से जनता को कनफ्युजियाय हुये हैं. हर चुनावी शो में जनता बस डेड एंड तक ही पहुंच पाती है. इस एंड पर बिल्ली दूध डकार जाती है, उस एंड पर चूहे मजे में देश कुतरते रहते हैं. सत्ता और जनता के बीच का सारा रास्ता बड़ा घुमावदार है. आम आदमी ता उम्र इन भ्रम के गलियारों में भटकता रह जाता है. सत्ता का अंतहीन सुख नेता बिना थके खींचते रहते हैं. जनता साड़ी की तरह खिंचती, लिपटती रह जाती है. अदालतो में न्याय के लिये भटकता आदमी कानून की किताबों के ककहरे,काले कोट और जज के कटघरे में सालों जीत की आशा में कनफ्यूज्ड बना रहता है.
चिंकी मिंकी सा कनफ्यूजन देश ही नही दुनियां में सर्वव्याप्त है. दुनियां भ्रम में है कि पाकिस्तान में सरकार जनता की है या मिलिट्री की.वहां की मिलिट्री इस भ्रम में है कि सरकार उसकी है या चीन की और जमाना भ्रम में है कि कोरोना वायरस चीन ने जानबूझकर फैलाया या यह प्राकृतिक विपदा के रूप में फैल गया. इस और उस वैक्सीन के समाचारो के कनफ्यूजन में मुंह नाक ढ़ांके हुये लगभग बंद जिंदगी में दिन हफ्ते महीने निकलते जा रहे हैं. अपनी दुआ है कि अब यह आंख मिचौली बंद हो, वैक्सीन आ जाये जिससे कंफ्यूजन में ग्लैमर का फ्यूजन चिंकी मिंकी शो लाइव देखा जा सके.