सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  एक अतिसुन्दर गझल – वृत्त- लवंगलतामुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 60 ☆

☆ गझल – वृत्त- लवंगलता ☆

 

मला चुलीची धुरकट औलण हवीहवीशी वाटे

जात्याचीही एक आठवण    हवीहवीशी वाटे

 

पिंपर्णी च्या  झाडाखाली खेळ खेळलो होतो

त्या उन्हातली प्रचंड रणरण हवीहवीशी वाटे

 

“बालपणाचा काळ सुखाचा” असे म्हणतसे कोणी

गणिताच्या तासाची भणभण हवीहवीशी वाटे

 

कोनाड्यातच सागरगोटे नऊखऊचा पाढा

मैतरणीची लाडिक तणतण हवीहवीशी वाटे

 

प्राजक्ताचे झाड आवडे, गर्द  सभोती  दाटी

अंगणातली नाजुक पखरण हवीहवीशी वाटे

 

पहाटवेळी सडासारवण  रांगोळीअन आई

गुलबक्षीची सुंदर गुंफण हवीहवीशी वाटे

 

कुरळ्या केसां मधला गुंता आई अलगद काढी

सागरवेणी, तीच विंचरण हवीहवीशी वाटे

 

डेक्कनवरचा काळ आठवे हिंदविजयचा “साथी”

अलका चौका मधली गवळण हवी हवीशी वाटे

 

मस्त पाऊस  पण  भिजण्याची हौसच फिटली आता

पाखरापरी  छोटी  वळचण हवीहवीशी वाटे

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

image_print
3.3 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुस्वागतम् आणि अभिनंदन.
आठवणींची गझल हवीहवीशी वाटणारी.खूप छान.

Prabha Sonawane

Thank you very much sir

Shyam Khaparde

सुंदर रचना

Prabha Sonawane

Thank you very much sir