डॉ.सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “ऊसतोड सखी…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

गारठल्या रात्रीला । स्वेटरची साथ होती.

गरम जेवण उरकून । बेडवर गेली झोपी

मधाळ स्वप्नी रमता । पहाट प्रहर आली

घुंगरु निनादाने । नकळत जागी झाली

हळूच उठून मग  । खिडकीपाशी गेली

ऊसतोड सखी । बैलगाडीत दिसली.

फाटलेले पातळ । गारठा झेलत होती

अंग दूमडून । थंडीशी झुंजत होती.

वाळलेला देह तिचा । चेहरा काळवंडला 

कडब्यासम शरीर । नवजात चिकटलेला

स्तनाग्र चोकत शिशू । निपचित पडलेला

दूध कसे पुरेल । आईचा देह वटलेला 

ती सद्गदित होते । गाडी धुक्यात हरवते.

खिडकीतून गजाआड । वाकून पाहाते.

अस्वस्थ होऊन । पुन्हा पलंगावर येते

पांघरुणात शिरताना । रडवेली होते.

“थोडं झोप” म्हणत । पती कुस बदलतो

 मिठित शिरुन । बोचरी थंडी अनुभतो.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments